चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ५)
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी पाचवा भाग काढत आहे. पहिल्या चार भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती.
ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणी बंगलोरची तथाकथित चळवळी दिशा रवीची दिल्लीच्या कोर्टाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच थोडीफार प्रसिध्दी मिळाली म्हणून आपण वाटेल त्या विषयावर बोलायला मोकाट आहोत हा सोस अनेकांना आवरत नाही त्याचाच एक भाग म्हणजे ग्रेटा थनबर्गचे नवे वक्तव्य . आता ती नासाच्या मंगळ मोहिमेवर वक्तव्य करत आहे आणि म्हणत आहे की अशा मोहिमांसाठी असा खर्च करायची काहीही गरज नाही.
भाजपला, महाराष्ट्रात, दुसरा पर्याय शोधावा लागेल. आयाराम गयाराम पण बरेच असल्याने, ही गोष्ट अजूनच कठीण झाली आहे.खडसे, बावनकुळे, मुंडे असे जे पर्याय होते, ते सर्व पर्याय या जोडगोळीने राजकीयदृष्ट्या संपविले व त्यांना संपविण्यासाठी भाजपश्रेष्ठींंचीही संमती होती. गडकरी हा अजून एकच पर्याय शिल्लक आहे. भाजप २०१४ पर्यंत इतर मागासवर्गीय नेतृत्व असलेला पक्ष होता. परंतु पक्षातील सर्व इतर मागासवर्गीय नेत्यांना संपवून व अनेक आयारामांना (विशेषतः मराठा जातीचे) पक्षात आणून या जोडगोळीने हा मराठा जातीचा पक्ष बनविला आहे. परंतु मराठा जातीचे मतदार भाजपला फारशी मते देत नाहीत व आता इतर मागासवर्गीय मतदार दूर जात आहेत. त्यात भर म्हणून भाजपचे पारंपरिक समर्थक ब्राह्मण मतदार सुद्धा नाराज आहेत.पवार यांच्या खेळीचे दुरगामी परिणाम, भाजपला महाराष्ट्रात भोगायला लागतील.ही फडणवीस-पाटलांची खेळी आहे. पवार फक्त या खेळीचा फायदा घेत आहेत.संख्येच्या दृष्टीने मराठा लोकसंख्या ही महाराष्ट्र मध्ये जास्त आहे म्हणून त्याचेच प्रतिबिंब प्रत्येक पक्षाच्या आमदाराच्या संख्येत दिसणारं.मराठा ३२% असल्याचा दावा आहे. इतर मागासवर्गीय अंदाजे ५२% असल्याचा दावा आहे (१९३१ च्या जनगणनेनुसार). ब्राह्मण ४%, मागासवर्गीय १५%, मुस्लिम १३-१४%, इतर धर्मीय ४-५%, आदिवासी/भटक्या जमाती वगैरे ८-१०% याची बेरीज केली तर १२५% हून अधिक होते. माझ्या मते मराठे १५-१६% असावे. परंतु अनेक शतके मराठे राज्यकर्ते असल्याने व मराठा अत्यंत आक्रमक जात असल्याने सरकार, विधीमंडळ अशा सर्व ठिकाणी मराठ्यांचे प्राबल्य आहे.१६४ मधून भाजपा चे १०५ निवडून आलेत. गेल्या २०-३० वर्षात तरी दुसऱ्या कुठल्या पक्षाला हे जमले नसावे,यामध्ये सेनेबरोबरील युती व आयाराम ही प्रमुख कारणे आहेत. १०५ मध्ये २ आमदार मित्रपक्षांचे व १७-१८ आमदार आयाराम आहेत. १९९० मध्ये कॉंग्रेसचे एकट्याचे १४१ आमदार होते. तसेच २०१४ मध्ये भाजपचे एकट्याचे स्वबळावर १२२ आमदार होते. या तुलनेत २०१९ मध्ये युती असूनही फक्त १०५ आमदार येणे ही घसरण आहे.बावनकुळे आणि मुंढे हे फडणवीस यांना पर्याय होऊ शकत नाहीत, मुंढे स्वतः निवडणूक हरल्या आहेत. हा फडणवीसांनी त्यांचे खच्चीकरण केले असावे त्याच बरोबर विनोद तावडे हे मराठा असून सुद्धा त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणजेच मराठयांना favour केले जातेय हे ही पटत नाही.भाजपमध्ये सुरूवातीपासूनच इतर मागासवर्गीयांचे प्राबल्य होते. खडसे, बावनकुळे, मुंडे, फरांदे, डांगे असे अनेक इतर मागासवर्गीय नेते भाजपने पुढे आणले. २०१४ मध्ये अचानक फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे व खडसेंनी जाहीररित्या मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने फडणवीस सावध झाले. त्यांनी लगेच मुंडे व खडसे यांना काही प्रकरणात गुंतवून काटा काढण्याचा प्रयत्न केला व शेवटी २०१९ मध्ये काटा काढला. तावडेंचेही नाव माध्यमातून येत होते. त्यांचाही काटा काढला गेला. बावनकुळे विदर्भातील वरीष्ठ नेता असल्याने त्यांचाही काटा काढून फडणवीसांनी आपला मार्ग निष्कंटक केला. योगायोगाने हे सर्व इतर मागासवर्गीय नेते आहेत. यांच्या खच्चीकरणामुळे इतर मागासवर्गीय मतदारात चुकीचा संदेश गेलाय. इतर मागासवर्गीय मतांवर झालेला परीणाम ओळखून फडणवीसांनी मराठा जातीला जवळ करण्याचा आटापिटा केला. राणे, विखे, मोहिते, भोसले, पद्मसिंह पाटील असे अनेक मराठा आयाराम भाजपत आणले. मेधा कुलकर्णी, विजय काळे या ब्राह्मण आमदारांची उमेदवारी कापून मराठ्यांना दिली. त्यांना विधानपरीषदेचे आश्वासन देऊनही पाळले नाही. पुणे पदवीधर मतदारसंघात सुद्धा मेधा कुलकर्णींना उमेदवारी न देता सांगलीच्या मराठा उमेदवाराला उमेदवारी दिली. बहुसंख्य मराठा सदस्य असलेला आयोग नेमून मराठे प्रगत असूनही ते अत्यंत मागास आहेत असा अहवाल तयार करून घेतला व तो दाखवून तब्बल १६% राखीव जागा मराठ्यांना दिल्या. हे करताना भाजपचे समर्थक असलेल्या अराखीव वर्गावर अन्याय केला. सारथी नावाची सरकारी संस्था स्थापन करून त्याद्वारे मराठ्यांवर सवलतींची खैरात केली. फडणवीसांनी इतर सर्व जातींकडे दुर्लक्ष करून, प्रसंगी त्यांच्यावर अन्याय करून फक्त मराठ्यांना फेवर केले. त्यांच्या दुर्दैवाने इतर जातींची मते कमी झालीच, पण मराठ्यांचीही फारशी मते भाजपला मिळाली नाहीत. फडणवीस व पाटील नेतेपदी कायम राहिले तर पुढील स्थानिक व विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार आहे.तसेच भाजपामधले फडणीस विरोधक जास्ती जास्ती आक्रमत होत जाणंच पुढे त्यांना फायदेशीर ठरणार आहे. कारण अस्तनीतले निखारे फारच त्रासदायक असतात.खडसे बाहेर पडलेत (बाहेर पडण्याची त्यांची वेळ चुकली). तावडे, पंकजा मुंडे व बावनकुळे निष्प्रभ झालेत. गडकरी दिल्लीत रमलेत. मुनगंटीवार व महाजन फारसे प्रभावी नाहीत व ते फडणवीसविरोधात नाहीत. त्यामुळे आता भाजपत फडणवीस विरोधक शिल्लक नाहीत.माझ्या मते फडणवीसांना पर्याय नाही. त्यांची विश्वासार्हता जनतेत वाढत चाललेली आहे. त्यामुळे त्यांना धोका नाही.पूर्ण असहमत. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीत सेनेबरोबर युती असूनही भाजपला बऱ्याच जागा गमवाव्या लागल्या. २०१४ मध्ये विदर्भातील ६२ जागांपैकी ४४ जागा भाजपने स्वबळावर जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये युती असूनही फक्त २९ जागा जिंकल्या. बावनकुळे व गडकरींना डावलल्याचा हा परीणाम असू शकतो. आयाराम नसते तर भाजप फार तर ८५ पर्यंत गेला असता. मुंडे व खडसेंच्या सुनेचा पराभव झाल्याने इतर मागासवर्गीय जातीत आता नाराजी अजून वाढलीये व पुढील निवडणुकीत याचा जास्त परीणाम दिसेल. ब्राह्मणांमध्येही फडणवीसांविरूद्ध नाराजी वाढत आहे. अजित पवारांशी हातमिळवणी केल्याने अनेक कट्टर भाजपसमर्थक नाराज आहेत. यावर्षी ४ महापालिकांंची निवडणुक होण्याची शक्यता आहे. चारही ठिकाणी भाजप सत्तेत नाही. परंतु भाजपच्या जागा कमी होण्याची बरीच शक्यता आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये १० महापालिकांंची निवडणुक आहे. त्यात ८ ठिकाणी भाजप सत्ताधारी आहे. त्यातील बहुसंख्य महापालिका भाजप गमाविणार हे नक्की. नुकत्याच झालेल्या पदवीधर-शिक्षक विधानपरीषद आमदार निवडणुकीत भाजपला पुणे व नागपूर हे दोन्ही मतदारसंघ मोठ्या फरकाने गमवावे लागले. फडणवीस-पाटील या जोडीच्या विरूद्ध असलेल्या वातावरणाचा हा परीणाम आहे.स्वच्छ चारित्र्याचा, बहुमत नसतानाही, पवार साहेब समोर असतानाही, शिवसेनेचे रूसवे फुगवे चालू असतानाही, पाच वर्षे राज्य करत राहाणे ही कामगिरी मला सामान्य वाटत नाही.केवळ अनैतिक तडजोडी करून आणि सहकाऱ्यांचा व मतदारांचा विश्वासघात करून त्यांनी सत्ता टिकवली. सेनेच्या सर्व मागण्या मान्य करून उद्धवना खुश ठेवणे, राष्ट्रवादीच्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाई न करता बॅकअप सपोर्ट तयार ठेवणे, पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांंना चौकशीच्या जाळ्यात अडकवून त्यांना संपविणे, भ्रष्ट व जातीयवादी आयाराम पक्षात आणणे, मराठ्यांवर सवलतींचा वर्षाव करून खुश ठेवणे या मार्गाने त्यांनी सत्ता टिकवली. परंतु हे करताना महाराष्ट्र हिताकडे दुर्लक्ष करणे, अराखीव वर्गावर अन्याय करणे, भाजपच्या मताधाराला सुरूंग लावणे या गोष्टींची त्यांनी पर्वा सुद्धा केली नाही. अशा मार्गाने सत्ता टिकविणे याला राजकीय कौशल्य म्हणत असतील. परंतु यातून फक्त फडणवीसांचाच फायदा झाला आहे.