चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ५)
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी पाचवा भाग काढत आहे. पहिल्या चार भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती.
ग्रेटा थनबर्गच्या टूलकिट प्रकरणी बंगलोरची तथाकथित चळवळी दिशा रवीची दिल्लीच्या कोर्टाने तीन दिवसांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. तसेच थोडीफार प्रसिध्दी मिळाली म्हणून आपण वाटेल त्या विषयावर बोलायला मोकाट आहोत हा सोस अनेकांना आवरत नाही त्याचाच एक भाग म्हणजे ग्रेटा थनबर्गचे नवे वक्तव्य . आता ती नासाच्या मंगळ मोहिमेवर वक्तव्य करत आहे आणि म्हणत आहे की अशा मोहिमांसाठी असा खर्च करायची काहीही गरज नाही.
श्रीगुरुजी, फडणवीसांनी तुम्ही म्हणता तस त्यांच्या मार्गतले भाजपा मधील अडथळे दूर केले असतील पण हे करताना त्यांनी जात पात बघितली नाही. त्यांनी मागासवर्गीय बरोबरच मराठा नेत्यांनाही तिकीट दिले नाही.हे बरोबर आहे. भाजपच्या पूर्वीच्या अवतारावर, म्हणजे जनसंघावर, ब्राह्मणी छाप होती. त्यामुळे एका ठराविक मर्यादेपलिकडे जनसंघ वाढत नव्हता. भाजप या नव्या अवतारात जनसंघ परतल्यानंतर भाजपच्या वसंतराव भागवतांनी पक्षवाढीसाठी "माधव" (म्हणजे माळी, धनगर, वंजारी) हे सूत्र अंमलात आणून पक्षात इतर जातीतील नेते पुढे आणण्यास सुरूवात केली. त्यामुळे गोपीनाथ मुंडे (वंजारी), ना. स. फरांदे (माळी), अण्णा डांगे (धनगर), एकनाथ खडसे (लेवा पाटील), बावनकुळे (तेली), महादेव शिवणकर असे अनेक नेते पुढे आले व त्यातून पक्ष वाढत गेला. ९० च्या दशकात मंडल आयोगामुळे या जाती इतर मागासवर्गीय गटात गेल्या व भाजपत इतर मागासवर्गीयांचे प्राबल्य वाढले. प्रमोद महाजन हे एकच मुख्य ब्राह्मण नेता होते व त्यांना केंद्रीय राजकारणातच रस होता. २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे असते तर तेच मुख्यमंत्री झाले असते. परंतु ते नसल्याने अचानक फडणवीस मुख्यमंत्री झाले. नंतर पंकजा मुंडे व खडसे यांनी जाहीरपणे मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त केल्याने भविष्यात हे आपल्या जागी येऊ नयेत यासाठी त्यांच्यामागे प्रकरणे लावून देऊन नंतर पद्धतशीर काटा काढला. बावनकुळेंंना अडकविता न आल्याने त्यांना उमेदवारी नाकारून बाजूला केले. विनोद तावडेंनाही प्रतिस्पर्धी समजून काटा काढला. फडणवीसांनी जात न पाहता फक्त आपल्या सर्व प्रतिस्पर्ध्यांंचा काटा काढला. परंतु हे सर्व नेते इतर मागासवर्गीय जातीतील असल्याने फडणवीस इतर मागासवर्गीय नेत्यांना संपवित आहेत अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. >>> त्यांनी मागासवर्गीय बरोबरच मराठा नेत्यांनाही तिकीट दिले नाही. त्याच बरोबर मोहिते पाटील, विखे आशा लोकांना भाजपा मध्ये स्थान दिले हे केवळ आपापल्या प्रदेशातील प्रस्तापित आल्यामुळे ते मराठे असल्याचा ह्यात काहीही संबंध नसावा. >>> भाजपत आणलेले बहुसंख्य आयाराम मराठा आहेत. २०१७ पासून फडणवीसांनी मराठ्यांवर सवलतींचा वर्षाव करून शेवटी बनावट अहवाल बनवून १६ टक्के राखीव जागा दिल्या. ब्राह्मण आमदारांना उमेदवारी नाकारून मराठा उमेदवार दिले. त्यामुळे ते भाजपला मराठा पक्ष बनवित आहेत अशी प्रतिमा निर्माण झाली आहे. >>> एका बाजूला तुम्ही आस म्हणता की भाजपा चे 105 आले ते आयराम आणि सेने मुळे आणि हे बरोबरच आहे पण त्याच वेळी तुमचा सेने बरोबर युती साठीही विरोध आहे. सध्या तरी महाराष्ट्रा मध्ये आपल्या स्वतःच्या जीवावर सत्तेत येईल असा एकही पक्ष नाही. >>> पक्षातील इतर मागासवर्गीय नेत्यांना संपविले नसते, ब्राह्मणांवर अन्याय केला नसता, मराठ्यांचे लांगुलचालन केले नसते तर घायकुतीला येऊन तब्बल १२४ जागा सेनेला देऊन युती करण्याची गरज नव्हती. >>> फडणवीसांनी ह्याच साठी दुसऱ्या पक्षातील लोकांना भाजपा मध्ये घेतले असेल, काहीही करून त्यांना 144 च्या जवळ जायचे होते व सेने वरचे अवलंबन कमी करायचे असणार. >>> आपल्या कारस्थानी निर्णयांंमुळे इतर मागासवर्गीय व ब्राह्मण मते कमी होणार हे फडणवीसांनी नक्कीच ओळखले होते. ही कमी भरून काढण्यासाठी त्यांनी आयाराम पक्षात आणून वारंवार मातोश्रीवर फेऱ्या मारून सेनेला युती करायला लावली. >>> 2014 मध्ये भाजपा चे 288 मधून 43 च्या सासरी ने 123 आमदार निवडून आले तर 2019 ला 164 मधून 64 च्या सरासरी ने105 आले. याचाच अर्थ भाजपा कमी झाला नाही पण स्वतः एकटे लढून सत्तेत येता येत नाही म्हनून युती करावी लागली. >>> इतर मागासवर्गीय व ब्राह्मण मतांचा फटका बसणारच होता. सवलतींचा वर्षाव करूनही फारशी वाढीव मराठा मते मिळणार नव्हती. अशा परिस्थितीत भाजप एकटा लढला असता तर फार तर ५० आमदार निवडून आले असते. त्यामुळे अत्यंत कासावीस होऊन फडणवीसांनी युती केली व पोत्याने आयाराम भाजपत भरले. म्हणून तर १०५ आले. परंतु सेनेला युतीला राजी करण्यासाठी तब्बल १२४ जागा देणे, ४ वेळा जिंकलेला पालघर मतदारसंघ सेनेला देऊन टाकणे, सेनेच्या मागणीमुळे सोमय्यांना उमेदवारी नाकारणे अशा अटी मान्य केल्या. त्याबरोबरीने काही काळ मुख्यमंत्रीपद देण्याचे सुद्धा निदान मोघम आश्वासन सुद्धा दिले असावे. यातून भाजपचे नुकसानच झाले. आधीच्या चुकांचा परीणाम कमी करण्यासाठी अजून चुका केल्या. >>> परंतु तरीही भाजपा ने फडणवीसांना बदलण्याची घाई करू नये. चंद्रकांत पाटलांना मात्र तात्काळ हटवले पाहिजे. >>> एवढ्या चुका करूनही फडणवीस बदलले नाहीत. अजूनही चुका सुरूच आहेत. बरीच वाट पाहून शेवटी खडसे बाहेर पडले. पंकजा मुंडे, बावनकुळे, मेधा कुलकर्णी, तावडे यांचे पुनर्वसन अजूनही झालेले नाही. अजूनही बाहेरील मराठा उमेदवार लादणे सुरू आहे. त्यामुळे फडणवीस व पाटील या दोघांनाही नेतेवदावरून काढणे आवश्यक आहे. मी भाजपचा कायमच समर्थक आहे. परंतु २०१९ विधानसभा निवडणुकीत मतच दिले नाही कारण फडणवीसांचे काही विश्वासघातकी निर्णय अक्षम्य आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपलाच मत देणार. परंतु जोपर्यंत फडणवीस-पाटील नेते आहेत तोपर्यंत मी व माझे कुटुंबीय इतर कोणत्याही निवडणुकीत भाजपला मत देणार नाही.