Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ४)

च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/16/2021 - 06:27
🗣 267 प्रतिसाद
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी चौथा भाग काढत आहे. पहिल्या तीन भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. ग्रेटा थनबर्गच्या तथाकथित टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेली बंगलोरची २१ वर्षीय तरूणी दिशा रवीने ग्रेटाशी टेलिग्रामसारख्या माध्यमातून चर्चा केली होती आणि त्यात असे केल्याने आपल्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकेल असा उल्लेख त्यात होता अशा बातम्या येत आहेत. तसे असेल तरी त्याउपरही हे टूलकिट प्रकरणाचे धाडस केलेल्या कर्माची फळे तिला भोगावीच लागायला हवीत. दिशा व्यतिरिक्त निकिता जेकब आणि शंतनू मुळुक यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे आणि ते फरार आहेत अशाही बातम्या आहेत. तसेच ग्रेटाने चुकून ते टूलकिट जगजाहीर केल्यानंतर दिशाच्या पाचावर धारण बसली होती अशाही बातम्या आहेत. काहीही झाले तरी कायद्याचा धाक असायलाच हवा. या मंडळींनी कायदा मोडला असेल तर त्याची फळे त्यांना भोगायला लावलीच पाहिजेत. नेहमीप्रमाणे मग सरकार २१ वर्षाच्या तरूणीला घाबरले का, ती लहान आहे वगैरे म्हणणे सुरू झाले आहे. तसेच ती प्राणीप्रेमी कशी आहे, ती व्हेगन कशी आहे याचेही कौतुक सुरू झाले आहे. मागे काश्मीरात दहशतवादी बुरहान वाणीला सुरक्षादलांनी ठार मारल्यावर तो शाळाशिक्षकाचा मुलगा कसा होता याचे कौतुक सुरू होते. म्हणजे तिशीपर्यंतच्या कोणी असे अडकल्यास ते वयाने लहान, त्यांचे आईवडिल काबाडकष्ट करून त्यांना वाढवत आहेत हे कौतुक, त्यानंतर ३० ते ६० या वयातील कोणी अडकल्यास ते कसे कुटुंबवत्सल, ते कसे विचारवंत, ते कसे नाकासमोर चालणारे सामान्य लोक याचे कौतुक होते आणि साठीच्या पुढचा कोणी अडकल्यास इतक्या वयाच्या माणसाला कसे पकडले, त्याच्या प्रकृतीचे काय वगैरे कौतुक सुरू केले जाते. एकूणच काय की यांच्या कळपातील कोणावरही कितीही गंभीर आरोप असले आणि वरकरणी त्यांना तुरूंगात टाकण्याइतका पुरावा असला तरी त्यांच्याविरूध्द बोलायचे नसते अशी या विचारवंतांची अपेक्षा असते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61996 views

🗣 चर्चा (267)
प
पिनाक Mon, 02/22/2021 - 17:51 नवीन
1. सध्या सरकारची परिस्थिती इतकी वाईट आहे की पेट्रोल चे टॅक्स कमी करणे शक्य नाही. 2. टॅक्स कमी करायचे तर सरकारला नोटा छापाव्या लागतील जेणेकरून महागाई प्रचंड वाढेल, रुपयांचे अवमूल्यन करावे लागेल. कुठला पर्याय योग्य वाटतो?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/18/2021 - 15:45 नवीन
इथे एकत्र आलेली बघून डोळे पाणावले.केवढे तर महान आणि उद्दात्त विचार. केवढे ते देश प्रेम .
  • Log in or register to post comments
श
शलभ गुरुवार, 02/18/2021 - 18:14 नवीन
पण तुमची सर कुणालाच नाही. :D
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/18/2021 - 18:05 नवीन
मिलिंद देवरा भाजपत चालले वाट्टं?

One needn’t be a BJP supporter to welcome E Sreedharan’s entry into active politics.

A thorough professional & one of the county’s most accomplished engineer-bureaucrats, E Sreedharan belongs to all of India.

Our politics needs more like him.

— Milind Deora | मिलिंद देवरा ☮️ (@milinddeora) February 18, 2021
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/18/2021 - 18:36 नवीन
भारतात सिंचन क्षमता वाढवायला हवी होती राज्य सरकार शी संबंधित अडचण असेल तर त्या राज्यांना सहकार्य करण्यास दबाव टाकला पाहिजे होता. शेती लय वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. आरक्षण साठी विविध जाती चे मोर्चे निघायल नकोच होते . ज्यांनी बँकेचे पैसे लुबाडून पळ काढला आहे ते आता तुरुंगात हवे होते. प्रशासन सुधारले हवे होते.भ्रष्ट अधिकारी ,कर्मचारी तुरुंगात हवे होते. न्यूज चॅनेल जे चुकीचे वार्तांकन करून भारता मधील सामाजिक ऐक्य धोक्यात आणत आहेत त्या सर्व न्यूज चॅनल चे मालक तुरुंगात हवे होते. भारता मधील न्याय व्यवस्था जी सुस्त आहे त्यांची कार्य शैली सुधारली हवी होती. अशी खूप काम बहुमत असलेल्या केंद्र सरकार नी करायला हवी होती. लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले असते पण. ह्यांनी काय केले. राम मंदिर ला जास्त प्रोजेक्ट करून सामाजिक विभाजन कसे होईल हे बघितले. काही मार्गावर सरकारी infrastructure फुकट करून रेल्वे चालवायला उद्योग पती ना निवडणूक फंडाची परतफेड केली. चीन शी सीमावाद सरकार पर्यंत च मर्यादित न ठेवता त्याचे राजकीय भांडवल केले. फायद्यात चालणाऱ्या सरकारी कंपन्या विकायची घाई केली. बघावं तेव्हा कोणत्या ही देशप्रेमी भारतीय नागरिकाला देशद्रोही ठरवले. It cell च वापर फक्त बुधीभ्रम करण्याच्या हेतू नीच केला. कधी नव्हे महागाई उच्च स्तरावर पोचली. समजा विघातक कायदे करण्यासाठी बहु मताचा वापर केला. आपल्या नालायक पना चे जे परिणाम होत आहे त्याला नेहरू पासून आता पर्यंत च्या सर्व सत्ताधारी लोकांना दोष देण्यास सुरुवात केली. हे सर्व सामान्य लोकांच्या नजरेत आले आहे.
  • Log in or register to post comments
उ
उपयोजक गुरुवार, 02/18/2021 - 19:37 नवीन
पुरावा म्हणून कितपत ग्राह्य ? https://www.facebook.com/forthepeople.newschannel/videos/3812993698766341/
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/19/2021 - 03:53 नवीन
आधी जबाबदारी घ्यायची आणि ती पार पाडता आली नाही की, ढकलंपंची करायची .... https://www.loksatta.com/nagpur-news/up-to-100-units-of-electricity-waiver-on-recovery-of-arrears-abn-97-2404017/ आश्र्वासन देण्या पुर्वी, ही अट का नाही घातली?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 02/19/2021 - 03:57 नवीन
माजी पंतप्रधान राजीव गांधींचे जवळचे मित्र-सहकारी आणि काँग्रेस नेते कॅप्टन सतीश शर्मा यांचे परवा १७ फेब्रुवारीला वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. राजीव गांधी १९९१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशातील अमेठीतून उमेदवार होते. त्यांची हत्या व्हायच्या आदल्या दिवशीच अमेठीत मतदान झाले होते. अर्थातच राजीव गांधी ती निवडणूक जिंकले पण त्यांची हत्या झालेली असल्याने नोव्हेंबर १९९१ मध्ये तिथे पोटनिवडणुक झाली. त्या पोटनिवडणुकीत कॅप्टन सतीश शर्मा काँग्रेसचे उमेदवार होते.ते पोटनिवडणुक जिंकले आणि नंतर १९९३ ते १९९६ या काळात नरसिंहरावांच्या सरकारमध्ये पेट्रोलियममंत्री होते. सतीश शर्मा १९९६ मध्येही अमेठीतून जिंकले पण १९९८ मध्ये काँग्रेसचा उत्तर प्रदेशातून व्हाईटवॉश झाला आणि एकही जागा जिंकण्यात यश आले नाही. त्यातच सतीश शर्मांचाही पराभव झाला. पुढे १९९९ मध्ये स्वतः सोनिया गांधी अमेठीतून उमेदवार झाल्यानंतर सतीश शर्मांना गांधी घराण्याच्याच शेजारच्या रायबरेली जागेवरून उमेदवार करण्यात आले. तिथे ते जिंकले. Image removed.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/19/2021 - 05:38 नवीन
https://maharashtratimes.com/india-news/india-china-face-off-galwan-bloody-clashes-four-chinese-solders-death/articleshow/81102936.cms आता, परमपूज्य राहुल गांधी, काय म्हणतात, ते वाचणे, रोमांचक ठरेल.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/19/2021 - 05:43 नवीन
https://maharashtratimes.com/india-news/rahul-gandhi-in-puducherry-a-fisherwoman-complaint-against-cm-narayansamy-goes-astray/articleshow/81087957.cms सामान्य माणसांना, पण समजायला लागले आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 02/19/2021 - 05:51 नवीन
दिशा रवी प्रकरणावर गृहमंत्री अमित शहा म्हणाले आहेत की कायद्यापुढे वय आणि स्त्री/पुरूष हे बघितले जायचे कारण नाही. https://timesofindia.indiatimes.com/india/shah-on-disha-age-gender-not-relevant-in-assessing-culpability/articleshow/81100424.cms अमित शहांचे म्हणणे नक्कीच चुकीचे आहे. जर कोणी उच्चवर्णीय प्रतिगामी (म्हणजे पुरोगामी विचारवंतांच्या कळपात नसलेला) पुरूष असेल तर त्याच्याविरूध्द अत्यंत कडक कायदे असले पाहिजेत. पण इतर सगळ्यांना वय, लिंग आणि इतर सगळ्या गोष्टींचा संशयाचा फायदा दिलाच पाहिजे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/19/2021 - 06:15 नवीन
All are Equal, but, Some are moreEqual.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Fri, 02/19/2021 - 06:50 नवीन
गंभीर गुन्हे ज्यांच्यावर दाखल होते ते वैधनिक पदावर विराजमान आहेत.आणि किरकोळ गुन्हे करणारे गरीब कच्चे कैदी जामीन द्यायला काही नाही त्या मुळे वर्षणंवर्ष तुरुंगात खितपत आहेत. त्यांचा गुन्हा सहा महिने पण शिक्षा होईल एवढे मोठे नाहीत पण पैसे नाहीत म्हणून जामीन नाही आणि केस पण उभी राहत नाही त्या मुळे तुरुंगात आहेत.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Fri, 02/19/2021 - 07:52 नवीन
सूर्यचंद्र दादा , पाचवा भाग आणा हो लवकर.. स्क्रोल मोडकळीस येईल अश्याने!!
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 02/19/2021 - 12:10 नवीन
सूर्यचंद्र दादा , पाचवा भाग आणा हो लवकर..
सूर्यचंद्र नाही. चंद्रसूर्य. :) अडीचशे झाल्यावर पुढचा भाग काढतोच.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/19/2021 - 12:15 नवीन
आजच होतील त्यामुळे, जास्त उशीर कशाला?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/19/2021 - 12:07 नवीन
अनावश्यक, एखाद्याला आयुष्यातून उठवणे, चुकीचे आहे.... https://www.loksatta.com/mumbai-news/five-held-for-conspiring-to-frame-ncp-leader-vijay-koli-in-false-drugs-case-sgy-87-2404328/
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा