Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ४)

च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/16/2021 - 06:27
🗣 267 प्रतिसाद
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी चौथा भाग काढत आहे. पहिल्या तीन भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. ग्रेटा थनबर्गच्या तथाकथित टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेली बंगलोरची २१ वर्षीय तरूणी दिशा रवीने ग्रेटाशी टेलिग्रामसारख्या माध्यमातून चर्चा केली होती आणि त्यात असे केल्याने आपल्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकेल असा उल्लेख त्यात होता अशा बातम्या येत आहेत. तसे असेल तरी त्याउपरही हे टूलकिट प्रकरणाचे धाडस केलेल्या कर्माची फळे तिला भोगावीच लागायला हवीत. दिशा व्यतिरिक्त निकिता जेकब आणि शंतनू मुळुक यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे आणि ते फरार आहेत अशाही बातम्या आहेत. तसेच ग्रेटाने चुकून ते टूलकिट जगजाहीर केल्यानंतर दिशाच्या पाचावर धारण बसली होती अशाही बातम्या आहेत. काहीही झाले तरी कायद्याचा धाक असायलाच हवा. या मंडळींनी कायदा मोडला असेल तर त्याची फळे त्यांना भोगायला लावलीच पाहिजेत. नेहमीप्रमाणे मग सरकार २१ वर्षाच्या तरूणीला घाबरले का, ती लहान आहे वगैरे म्हणणे सुरू झाले आहे. तसेच ती प्राणीप्रेमी कशी आहे, ती व्हेगन कशी आहे याचेही कौतुक सुरू झाले आहे. मागे काश्मीरात दहशतवादी बुरहान वाणीला सुरक्षादलांनी ठार मारल्यावर तो शाळाशिक्षकाचा मुलगा कसा होता याचे कौतुक सुरू होते. म्हणजे तिशीपर्यंतच्या कोणी असे अडकल्यास ते वयाने लहान, त्यांचे आईवडिल काबाडकष्ट करून त्यांना वाढवत आहेत हे कौतुक, त्यानंतर ३० ते ६० या वयातील कोणी अडकल्यास ते कसे कुटुंबवत्सल, ते कसे विचारवंत, ते कसे नाकासमोर चालणारे सामान्य लोक याचे कौतुक होते आणि साठीच्या पुढचा कोणी अडकल्यास इतक्या वयाच्या माणसाला कसे पकडले, त्याच्या प्रकृतीचे काय वगैरे कौतुक सुरू केले जाते. एकूणच काय की यांच्या कळपातील कोणावरही कितीही गंभीर आरोप असले आणि वरकरणी त्यांना तुरूंगात टाकण्याइतका पुरावा असला तरी त्यांच्याविरूध्द बोलायचे नसते अशी या विचारवंतांची अपेक्षा असते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61996 views

🗣 चर्चा (267)
ग
गणेशा गुरुवार, 02/18/2021 - 08:10 नवीन
नक्कीच..वाचायला आवडेल. Psu च्याही पुढे जाऊन उद्या मोठ्या भांडवलदार लोकांना फायनान्स कंपन्यासोडून बँक व्हायचंय, तुर्तास यावर काहीच नाही, प्रतिबंध आहे बहुतेक किंवा कोठे जास्त माहिती नाही. पण असे झाले तर कर्ज पुरवठादार हेच.. कर्ज घेणारे हेच आणि त्या कर्जा ने विकत घेणारे हेच.. हे किती किती तरी भयानक आहे.. पण याचे दुरागामी परिणाम न पाहता, काँग्रेस ने हे केलेच होते तेंव्हा चालते का, मग आम्ही केले तर काय असेच चालणार असेल तर भविष्यातील भारताचा पंतप्रधान हा भांडवलदार असेल हे नक्की
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/18/2021 - 08:13 नवीन
भविष्यातील भारताचा पंतप्रधान हा भांडवलदार असेल हे नक्की भविष्यातील भारताचा पंतप्रधान हा कम्युनिस्ट नक्कीच नसावा आणि समाजवादी सुद्धा नकोच.
  • Log in or register to post comments
प
पिनाक गुरुवार, 02/18/2021 - 08:44 नवीन
सरकार चे काम governance हे असते. सरकारने नोकऱ्या तयार करणे उद्योगधंदे चालवणे, वस्तू निर्माण करणे अपेक्षित नाही. सरकारने नोकऱ्या तयार करणाऱ्या उद्योगधंद्यांना पोषक वातावरण तयार करणे, कारखाने सुरू करण्यास प्रोत्साहन देणे , बॅंक्स सुरू करण्यास आणि ठेवण्यासाठी काम करणे हे अपेक्षित आहे. संसद कायदे करते आणि सरकार कायदे लागू करते. त्या पलीकडे कोणताही रोल त्या बॉडी कडून अपेक्षित नाही. जर सरकारने उद्योगधंदे चालवायला सुरवात केली तर सरकार त्या मार्केट मध्ये एक प्लेअर म्हणून काम करते. आणि मग मूळ उद्देशापासून ते दूर जाते. उद्योगधंदे काढणे आणि चालवणे हे पाप नव्हे. सरकार ने या सर्व गोष्टींवर स्वतः सहभागी न होता नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे. तेव्हा सरकारने सगळे stakes विकून टाकावेत आणि governance वर लक्ष द्यावे हे आपण 1991 पासून सुरू केले आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 02/18/2021 - 08:45 नवीन
तुम्ही उजवे बुर्ज्वा आणि भांडवलदारांचे हस्तक नक्कीच आहात.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/18/2021 - 09:03 नवीन
जे काम सरकारचे नाही, ते काम सरकारने करू नये ... नियंत्रण ठेवणे हे सरकारचे काम आहे .... दुसर्या महायुद्धात, फोर्डने पण बाँबर विमानांसाठी, सुटे भाग बनवले होते...
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 02/18/2021 - 09:02 नवीन
तुम्ही पण आय.टी सेलचे दिसता. मी पण त्यातलाच. त्यामुळे उगीचच इतरांकडून शालजोडीतले खातो. काय करणार.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/18/2021 - 09:06 नवीन
घराणेशाहीच्या चपला उचलण्या पेक्षा, शालजोडी उत्तम
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/18/2021 - 09:06 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/18/2021 - 15:33 नवीन
सरकार चे काम governance हे असते. सरकारने नोकऱ्या तयार करणे उद्योगधंदे चालवणे, वस्तू निर्माण करणे अपेक्षित नाही.
governance करणे हेच फक्त काम आहे, तर खुद्द सरकार ने तसे जाहीर रित्या एकदा सांगून टाकावे.. म्हणजे लोक का कंपण्या विकल्या काही विचारणार नाही.. आणि जर फक्त तेच काम आहे तर.. पायाभुत सुविधा देणे - मग त्या सुविधा शेतकऱ्यां संबंधित असो, लोकांसाठी असो वा व्यावसायिकांसाठी असो, त्यावर भर हवाच.. (शेती आणि रस्ते यावर लिहिले आहे, लिंक देत नाही पण येथे हि पुन्हा देत नाही ) शिक्षण आणि त्याची किंमत अशी ठरवणे कि समाजातील प्रत्येक घटक उच्च शिक्षण घेऊ शकेल.. कर भरमसाट घेता तर तो शिक्षणा मध्ये वापरला जावा कि इतर कोणत्या गोष्टीत हे पारदर्शक हवेच हवे.. रस्ते, आरोग्य, नद्या, निसर्ग यांचा समतोल आभाळण्यासाठी कामे झाली पाहिजेत.. मग हे ७० वर्षात काय केले हा प्रश्न घेऊन येण्यापेक्षा ७ वर्षात हे केले हे घेऊन येण्यात मतलब आहे.. २०१९ च्या निवडणुकीत, आम्ही काय काय करत आहोत हे ऐकायचे होते, पाकिस्तान, काँग्रेस, हिंदू हे सोडून कोणते मुद्दे मोदींनी निवडणूक प्रचारात मांडले? मग तुम्ही मुद्दे लिहिताय हे त्यांना का नाही सांगता आले? त्यामुळे सुयोग्य शासन हे बोलायचे किंवा कंपन्या विकायचे नक्कीच नाही.. ते लोकां पर्यंत पोहचण्याचे आहे..आणि ते नक्कीच पोहचत नाही.. काँग्रेस बरोबरच का compair करायचे? त्यांनी केले नाही असे म्हणा पण निदान अटल बिहारी यांच्या कार्यकाळाशी तरी compare करून वाटचाल केली पाहिजे.. असो, सरकार कोणते असु, या ५ वर्षात काय केले आणि काय आश्वासन दिले होते हे तरी नीट बोलण्यास काय होतं असावे?
  • Log in or register to post comments
प
पिनाक गुरुवार, 02/18/2021 - 18:54 नवीन
उत्तर खाली देत आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/19/2021 - 06:55 नवीन
पाकिस्तान, काँग्रेस, हिंदू हे सोडून कोणते मुद्दे मोदींनी निवडणूक प्रचारात मांडले? According to data from the Income Tax department, number of income tax returns filed grew 6.5% in FY15 to 40.4 million, then surged 14.5% in FY16 before jumping 20.5% in FY17, the year of demonetisation. In the subsequent year, FY18, income tax returns filed surged 23.1% to 68.7 million. The Indian economy grew at a steady pace to 8.2% in FY17 from 6.4% in FY14. Although, economic growth slipped to 7.2% in FY18 from 8.2% in the year before, tax return filings had surged 23.1% in FY18. एकंदर संकलित कराच्या प्रमाणात वैयक्तिक आयकराचे प्रमाण २०१६ मध्ये १९ टक्के होते ते वाढत वाढत २०२० मध्ये २६ टक्के झाले. म्हणजेच करचुकवेगिरी मोठ्या प्रमाणावर कमी झाली केवळ रिटर्नची संख्या वाढली असे नाही निश्चलनीकरणाचा परिणाम म्हणून लोकांचे कर भरण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले हे रामानुज प्रसाद सिंह यादव (रा. मोहनलाल गंज) किंवा मुथुस्वामी नाडर (रा. तिरुतुरईपुंडी) ला सांगून उपयोग होईल का? हे श्री मोदींना समजते म्हणून ते अशा मुद्द्यांचा निवडणूक प्रचारात वापर करत नाहीत. उगाच का ते २००२ पासून सतत सलगपणे निवडून येत आहेत बाकी श्री मोदी यांनी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक प्रचार करावा हे कोणी आणि का ठरवावे? ज्यांना समजत आहे त्यांना समजून घ्यायचेच नसते आणि नुसती राळ उडवायची असते. त्यांना श्री मोदी फाट्यावर मारतात याचे मोठे न सांगता येण्यासारखे दुःख आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 02/19/2021 - 07:03 नवीन
याचे मोठे न सांगता येण्यासारखे दुःख आहे.... सहमत आहे ....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Fri, 02/19/2021 - 07:55 नवीन
पायाभूत सुविधा, वाढत जाणारी बेरोजगारी, अर्थ नीती, रस्ते, शिक्षण यावर प्रत्येक राज्यकर्त्याने बोलले पाहिजेच.. जर हे पण governance मध्ये येत. नसेल असे तुमचे मत असेल तर तुमच्या मतावर माझा आक्षेप नाही, ते तुमचे मत आहे..
उगाच का ते २००२ पासून सतत सलगपणे निवडून येत आहेत बाकी श्री मोदी यांनी कोणत्या मुद्द्यावर निवडणूक प्रचार करावा हे कोणी आणि का ठरवावे?
बरोबर आहे, पण मग या ७ वर्षात काय काय काम केले हे विचारने चूक नाही.. अर्थनीती, governance याबद्दल विचारले किंवा ते बोलले हे योग्यच आहे.. पण समजत नाही त्याला ते फाट्यावर मारतात, ह्याचे दुःख आहे वगैरे हे असले शब्द आणि वाक्य लिहून तुम्ही रिप्लाय खराब करू नये.. तुम्हाला जे लिहायचे आहे ते स्वतंत्र लिहा..मला रिप्लाय देताना भाषा नीटच वापरा... नसेल जमत तर सोडून द्या... कृपया यावर मला अश्याच भाषेत रिप्लाय देता येत नाही असे समजू नये... कृपया संयमाची परिक्षा बघू नका.. Plz understand..
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 02/19/2021 - 08:41 नवीन
तुम्हाला मिरच्या झोंबायचे कारण नाही. त्यांनीं आपल्या निवडणूक भाषणात काय सांगावे किंवा नाही हे ठरवणारे तुम्ही (म्हणजे इतर कोणीही) कोण? श्री मोदी हे पत्रकारांना फाट्यावर मारतात याबद्दल ते लिहिलेले आहे. त्यासाठी वैयक्तिक रित्या घेण्याची गरज नाही. तुम्ही टीका करा. त्यांना विचारायचं ते विचारा तो तुमचा हक्क आहे. त्याला उत्तर द्यायचे कि नाही हा त्यांचा पण हक्क आहे. तुम्ही मतदार म्हणून त्यानी "वाटेल त्याला उत्तर दिलेच पाहिजे" हा हक्क तुम्हाला घटनाकारांनी दिलेला नाही. तुम्हाला "त्यांना मत द्यायचे कि नाही" एवढाच हक्क आहे. तसेच आम्हाला वाटले तर आम्ही प्रतिसाद देऊ नाही तर देणार नाही. तुमची चिडचिड होण्याचे कारण वेगळेच असावे. काळजी घ्या
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Wed, 02/17/2021 - 10:00 नवीन
भारताने आफ्रिकेला पाठ्वलेले 10 लाख कोरोना लसीचे डोस आफ्रिकेने परत पाठवले. आफ्रिकेत असणाऱ्या कोरोनावर या लसीचा परिणाम होत नसल्याने डोस परत पाठवावे लागले. भारतात देखील आफ्रिकेतील कोरोना विषाणूचे काही रुग्ण सापडलेत.. भारतात हा नवीन विषाणू स्प्रेड झाल्यास मग अवघड आहे. तसेच वॅक्सीन आली म्हणून आता कोरोना लवकरच संपेल या आशेवर पाणी फिरू लागलेय. वेगवगळ्या देशात वेगवेगळे कोरोना विषाणू सापडतायेत त्यामुळे लसीकरण पुन्हा स्लो होईल आणि पुन्हा नव्याने संशोधन करावे लागेल असे वाटतेय. जग पुढच्या 2 वर्ष्यात नॉर्मल होईल असा माझा अंदाज होता.. तो आता चुकणार असे वाटतेय.. कदाचित 5 किंवा 10 वर्षे लागतील असे वाटू लागलेय.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 02/17/2021 - 10:48 नवीन
लस घाईत launch ही सौम्य ओरड होतीच,पण संशोधन अजूनही चालूच आहे.हो कोरोनाचे म्युटेशनचे सर्व अवतार आपल्याला सहन करावे लागणार आहेत.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण गुरुवार, 02/18/2021 - 14:40 नवीन
भारताने आफ्रिकेला पाठ्वलेले 10 लाख कोरोना लसीचे डोस आफ्रिकेने परत पाठवले. आफ्रिकेत असणाऱ्या कोरोनावर या लसीचा परिणाम होत नसल्याने डोस परत पाठवावे लागले. @ बाप्पू ही फेक न्यूज खरी बातमी :- South Africa did not return AstraZeneca vaccines to India, says country's health minister आपल्या देशात देशद्रोही मिडिया मोकाट सुटला आहे, जे सत्य आणि योग्य आहे ते लिहायचे नाही तर लपवायचे आणि खोट्या बातम्या निर्माण करुन त्याचे मात्र रान उठवायचे हा यांचा रोजचा पोट पाण्याचा उध्योग आहे. माचो मिडिया चे अगदी ताजे उदाहरण पहायचे असेल तर देशा बाहेरील आणि देशातील लोकांनी लोकांनी जेव्हा शेतकरी आंदोलनाची बाजु घेउन आपल्याला कसा शेतकर्‍यांचा कळवळा आला आहे हे सांगण्याचा आव आणला आणि जेव्हा त्यांचे टूल त्यांच्यावरच उलटले तर हाच देशद्रोही मोचो मिडिया कट करणार्‍यांची बाजु घेउन मुक्ताफळे उधळु लागला.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Pyar Deewana Hota Hai... :- Kati Patang
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू गुरुवार, 02/18/2021 - 14:51 नवीन
धन्यवाद मदनबाण. मला स्पष्ट आठवतेय कि ही बातमी मी tv9 ला ऐकलेली. तसंही Tv9 मराठी फेक बातम्या देण्यात आणि लोकांमध्ये सणसणी निर्माण करण्यात एक्स्पर्ट आहेत याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 02/17/2021 - 11:01 नवीन
मला एक प्रश्न नेहमी पडतो. महागाईचा दर नक्की कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असतो? आणि ह्या बाबी देशागणिक बदलू शकतात काय? कुणास माहित असल्यास सांगावे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 02/17/2021 - 14:10 नवीन
महागाईचा दर नक्की कोणकोणत्या बाबींवर अवलंबून असतो?
आमचे मिल्टन फ्रीडमन साहेब नेहमी म्हणायचे- Inflation is always and everywhere a monetary phenomenon in the sense that it is and can be produced only by a more rapid increase in the quantity of money than in output. म्हणजे एकूण आऊटपुट जेवढ्या वेगाने वाढत आहे त्यापेक्षा जास्त वेगाने मनी सप्लाय वाढला की महागाई वाढते.
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 02/17/2021 - 15:15 नवीन
ओक्के.. - म्हणजे पैसा खेळत असला आणि जरूरी पेक्षा जास्त असला, तर खरेदीसाठी वातावरण पोषक. - म्हणजे मागणी वाढण्याची शक्यता. त्यात पुरवठा कमी झाला तर किंमती वाढणार.. एकुणात महागाई वाढणार. इतपत समजले. याचा अर्थ - १. पुरवठा मागणीपेक्षा कमी होऊ न देणे किंवा/आणि खेळता पैसा कमी ठेवणे.. हा त्यावरचा उपाय? २. खेळता पैसा जास्त असला की चलनाची किंमत घसरणार. परिणामी विकत घेण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार. पैसा जर देशातच खेळला तर कदाचित त्यावर कंट्रोल ठेवता येईल पण बाहेर गेला आणि पैसा बाजारात स्त्रोत येण्याचा विक्रीचा स्त्रोत आटला तर आणखी चलन छापावे लागणार? असे झाले तर ते एक दुष्टचक्र असेल. थांबवता आले नाही तर तीच मंदीची सुरुवात म्हणायची काय? त्यावर उपाय काय?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 02/17/2021 - 15:39 नवीन
१. पुरवठा मागणीपेक्षा कमी होऊ न देणे किंवा/आणि खेळता पैसा कमी ठेवणे.. हा त्यावरचा उपाय?
कागदावर याचे उत्तर हो असे आहे. पण प्रत्यक्षात हे अंमलात आणणे कठीण आहे. पहिली गोष्ट म्हणजे ऋण महागाईचा दर असण्यापेक्षा धन असलेला चांगला (याला पण काही तज्ञांचा विरोध असतो) आणि खूप जास्त महागाईचा दर नक्कीच वाईट. तेव्हा तो दर २% ते ६% मध्ये ठेवावा असा करार रिझर्व्ह बँकेने २०१४ मध्ये भारत सरकारबरोबर केला होता. दुसरी गोष्ट म्हणजे मनी सप्लाय म्हणजे नुसत्या नोटा नाहीत तर त्यात बँकेत खात्यांमध्ये असलेले पैसे, फिक्स्ड डिपॉझिट्स वगैरेंचा पण समावेश होतो. आणि खात्यांमध्ये असलेले पैसे किती वाढणार यावर रिझर्व्ह बँकेचे नियंत्रण नसते तर बँका किती रक्कम कर्जाऊ देतात यावर ते अवलंबून असते. त्यामुळे यावर रामबाण उपाय नाही तर व्याजाचे दर वाढवून रिझर्व्ह बँक कर्जाऊ दिली जाणारी रक्कम नियंत्रणात ठेऊन एकूण मनी सप्लाय नियंत्रणात ठेऊ शकते. तेवढेच त्यांच्या हातात असते.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/17/2021 - 13:59 नवीन
पंजाब मधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस चा दणदणीत विजय bjp च सुपडा साफ
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Wed, 02/17/2021 - 18:39 नवीन
मग काय.. आज पार्टी देताय का??
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/17/2021 - 14:17 नवीन
ह्याच्या शी लोकांना काही देणेघेणे नसते महागाई वाढली आणि लोकांकडे पैसे कमी येवू लागले की. लोक सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत आस्मान दाखवतात.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/17/2021 - 14:18 नवीन
ह्याच्या शी लोकांना काही देणेघेणे नसते महागाई वाढली आणि लोकांकडे पैसे कमी येवू लागले की. लोक सत्ताधारी पक्षाला निवडणुकीत आस्मान दाखवतात.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/17/2021 - 16:05 नवीन
सी ए अन सी एस इन्स्टिट्यूटचे फतवे ... सी ए अन सी एस लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर जपून लिहिण्याचे इशारे
  • Log in or register to post comments
श
शा वि कु गुरुवार, 02/18/2021 - 04:21 नवीन
ICAI बद्दल ट्विटरवर विद्यार्थ्यांनी अत्यंत चुकीच्या आणि खोटारड्या गोष्टी लिहिल्या होत्या. डिसेंम्बर मध्ये परीक्षा घेऊच नये अशी अपेक्षा विद्यार्थ्यांची होती. Icai ने परीक्षेतून बाहेर पडण्याची सुविधा दिली होती आणि जे बाहेर पडलेत त्यांच्यासाठी पुन्हा जानेवारीत परीक्षा घेणार असे आश्वासन दिले होते, (आणि पूर्ण सुद्धा केले.) इतके असताना परीक्षा घेऊच नका हा हट्ट अनाकलनीय होता. तुम्हाला नसेल द्यायची तर घरी बसू शकताच की. त्यावर ट्विटर वर ICAI विद्यार्थ्यांच्या जीवावर टपलीये असा ओरडा सुरु होता.इतकेच नाही, तर प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटना अक्षरश: स्पॅम केलं परीक्षा रद्द करण्याचा मागण्या करून. परीक्षा चालू असताना सुद्धा ICAI ची व्यवस्था अगदी ढिसाळ आहे असा कांगावा चालू होता. दिल्ली आणि मुंबईत काही विद्यार्थ्यांना खरोखर त्रास झाला, पण ते अगदी मोजक्या सेंटर्स मध्ये. सर्व कॉलेज आणि शाळा बंद असताना,परीक्षा घेण्यासाठी राज्य आणि केंद्र दोघांची परवानगी लागत असताना देशभरात ज्या प्रकारे परीक्षा घेतल्या ते कौतुकास्पद नियोजन होतं, आणि तारेवरची कसरत होती. ICAI ला ह्यात चिडवणारी गोष्ट म्हणजे ICAI वर नियंत्रण असणाऱ्या सरकारी संस्थांकडे सुद्धा विद्यार्थ्यांचा आरडाओरडा चालू होता. (Mca, nfra ईई.) #ICAI_Be_Transparent भारतात एक नं ट्रेंडिंग आलेलं. हे सगळे विद्यार्थी परीक्षेच्या आदल्या दिवशी ट्विट करत बसलेले. ICAI वर चिडण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पण ही त्यातली नाही असं मला वाटतं. Icai वर टीका सोशल मीडियावर पूर्वीपासून होतंच आहे, आणि कोणी आडकाठी घालायचा प्रयत्न केला नव्हता. (अर्थात, ICAI ने खरोखरीच सोशल मीडियाच्या पोस्टवरून कारवाई करूच नये. समज देण्यापूरताच नियम मर्यादित ठेवावा.)
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/17/2021 - 16:08 नवीन
https://maharashtratimes.com/india-news/govt-looks-for-cyber-volunteers-to-report-anti-national-activities/articleshow/80780066.cms हिटलर ची सुद्धा एस एस अशी एक संस्था होती म्हणे ============================================== विशेष म्हणजे, देशविरोधी मजकूर किंवा कारवाईची नेमकी व्याख्या ठरविणारी कोणतीही स्पष्ट कायदेशीर चौकट सध्या सरकारकडे नाही. स्वयंसेवक होण्यासाठी काय पात्रता लागते हे अजुन निश्चित नाही .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/17/2021 - 19:00 नवीन
देश विरोधी म्हणजे काय?, देश म्हणजे काय? देशाचे हित कशात असते ? देशात देशप्रेमी कोणाला म्हणायचे? देश हा एकसंघ राहण्यासाठी काय आवश्यक आहे? ह्या सर्व प्रश्नांची उत्तरं आणि व्याख्या पाठ करून तसे वर्तन करण्यास पुढचे १०० वर्ष तरी नक्कीच लागतील. अशी आपली अवस्था आता आहे.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/17/2021 - 16:37 नवीन
इंधन दरवाढ हे तर मागच्या सरकारांचे पाप - शेठ नेहरू नसते तर शेठ कशावर जगले असते ? हा मोठा प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 02/17/2021 - 17:57 नवीन
बऱ्याच दिवसांनी आगमन झाले
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/17/2021 - 21:09 नवीन
मूळ मुद्द्याला बगल देण्याचे कसब उत्तम ! याच शेठचा किंमत स्वतः कमी केलेल्यचे क्रेडिट घेतानाचा व्हिडिओ लावू का ? चांगला झाला की क्रेडीट यांचे आणि वाईट झाले कि मागची सरकारे ! पण तो लावल्याने तुम्हाला काही फरक पडत नाही , कारण चर्चा , फॅक्ट्स त्यांना सांगतात , ज्यंच्याकडे ती स्विकारण्याची कॅपॅसिटी असते , दृष्टिकोन असतो , माझ्या मते तुम्ही तसे नाही आहात .
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/18/2021 - 03:12 नवीन
मोदींना शिव्या देणे हा आणि हाच एकमेव मूळ मुद्दा होता व त्यालाच उत्तर दिलंय. असं उत्तर दिलंय की समोरचा निरूत्तर झालाय. बाकी मी कसा आहे, माझा दृष्टिकोन कसा आहे याचा सखोल विचार केल्याबद्दल मन:पूर्वक आभार! बाकी चालू द्या. ते व्हिडीओ वगैरे टाका.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 02/18/2021 - 03:49 नवीन
प्रतिसादाची वेळ मध्यरात्री १:३९! मी फक्त वस्तुस्थिती सांगितली. त्यामुळे झोप उडाली असेल तर क्षमस्व! _/\_
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/18/2021 - 04:06 नवीन
कुठल्याही राष्ट्राचा घातच करतात ....
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 02/18/2021 - 03:16 नवीन
बिप्लब देब नामक मुख्यमंत्र्यांनी श्री अमित शहा यांचे श्रीलंका व नेपाळ ताब्यात घेण्याचे मनसुबे उघड करून हिंदूराष्ट्राभिमान्यांना सुखद धक्का दिला आहे. श्रीलंका व नेपाळने नेहमीप्रमाणे रडारड सुरु केली आहे आणि ते चीनला आणखी बिलगायला जातीलच; पण आता गुजराती हिंदू बनियांच्या क्षात्रतेजापासून ते वाचू शकत नाहीत हे त्यांना कळून चुकल्याशिवाय राहणार नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/18/2021 - 05:25 नवीन
घराणेशाही असेल तरी चालेल उत्तम चरित्र असलेला नेता आहे तो लबाड आणि पाताळयंत्री नक्कीच नाही. महागाई वाढली तरी त्याचे समर्थन. पेट्रोल चे भाव वाढले तरी त्याचे समर्थन. फायद्यात चालणाऱ्या सरकारी कंपन्या विकल्या तरी त्याचे समर्थन. लोकांच्या नोकऱ्या गेल्या लाखो लोक बेरोजगार झाली,प्रत्येकाचे आर्थिक उत्पादन कमी झाले हे सर्व अनुभवत आहेत तरी अर्थव्यवस्था कशी जोमात आहे हे सांगणे चालू आहे. असा सर्व आंधळा कारभार चालू आहे. पण जनता डोळस आहे. पंजाब मध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत फटका बसलाय आहे आता बंगाल मध्ये पण पंजाब सारखीच अवस्था होणार आहे. उतरती कळा लागली आहे. कर्तृत्व च तेवढे महान आहे. आता हिंदू कार्ड,चीन,आणि बाकी नेहमीचेच मुध्दे चालणार नाहीत.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/18/2021 - 05:33 नवीन
घराणेशाही असेल तरी चालेल उत्तम चरित्र असलेला नेता आहे तो लबाड आणि पाताळयंत्री नक्कीच नाही. बाय द वे, आपल्या मते असे कोण आहेत?
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 गुरुवार, 02/18/2021 - 06:06 नवीन
राहुल जी विषयी माझी ती कमेंट आहे. लबाड,आणि पाताळयंत्री नक्कीच नाहीत ते. असे पण प्रतेक राज्यात फक्त काँग्रेस विरोधी BJP अशी लढत होणार नाही. Bjp नी सर्व मित्र गमावले आहेत. काही मोठी राज्य बघितली तर उत्तर प्रदेश मध्ये BJP विरोधात . Bsp,sp, काँग्रेस हे पक्ष आहेत. महाराष्ट्रात Bjp विरोधात. सेना ,काँग्रेस,राष्ट्रवादी, हे महत्वाचे पक्ष आहेत. आंध्र प्रदेश,बिहार,तामिळनाडू सर्वच महत्वाच्या राज्यात सर्व पक्ष विरूद्ध bjp अशीच लढत होईल. अहंकार मुळे एक पण मित्र पक्ष नाही. नाही अहंकार मुळे एक पण शेजारी राष्ट्र मित्र नाही. हा अहंकार च पराभव दाखवेल.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 02/18/2021 - 06:16 नवीन
https://www.loksatta.com/mumbai-news/how-many-more-years-of-toll-collection-on-mumbai-pune-expressway-abn-97-2403247/ खर्च वसुली झाल्यावरही किती दिवस टोल चालु ठेवणार असा प्रश्न केला आहे ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/18/2021 - 06:28 नवीन
पण, कायदेशीर रित्या, जो काही निर्णय घेतला जाईल, तो मान्य करावा लागेल...
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 02/18/2021 - 06:39 नवीन
सगळ्यांनी मिळुन हा प्रश्न लावुन धरला तर , ह्या जाचातुन सुटका होउ शकते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/18/2021 - 06:48 नवीन
आपली तितकी सामाजिक एकजूट होणार नाही .... सामान्य माणसाच्या मनांत आणि त्यामुळे एकमेकांत, राजकीय, धार्मिक, जातीय आणि आर्थिक भिंती, दिवसेंदिवस जाड होत चालल्या आहेत .... फुट पडली असल्याने, स्वतःच्या हितासाठी, एकत्र येणे, सामान्य माणसाला सध्या तरी शक्य नाही आणि वेळीच काळजी घेतली नाही तर, नंतर ते अशक्य होईल...
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस गुरुवार, 02/18/2021 - 08:02 नवीन
अगदी खरे आहे. स्वतःच्या हितासाठी एकत्र येणे हे खुप गरजेचे आहे. राजकारणी लोक फक्त स्वतःच्या हीताचे पहातात आणि कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांना काही अडचण येत नाही. अडचणींचा सामना फक्त सामान्य लोकांना करावा लागतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/18/2021 - 06:26 नवीन
लबाड आणि पाताळयंत्री नक्कीच नाहीत ते. आपल्या राजकीय विचारसरणी बद्दल आदर होताच..... तो अजून वाढला..... चला आता, परत एकदा, सामना बघायची वेळ आली....
  • Log in or register to post comments
स
सॅगी गुरुवार, 02/18/2021 - 10:09 नवीन
सामना फक्त बघा...वाचू नका...
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/18/2021 - 07:12 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/why-china-is-ready-for-disengagement-what-happened-behind-back-channel-dmp-82-2399343/lite/?utm_source=Taboola_Recirculation&utm_medium=RC&utm_campaign=LS
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 02/18/2021 - 08:42 नवीन
कोकण रेल्वे, दिल्ली मेट्रो वगैरे मोठ्या प्रकल्पांचे मुख्य अधिकारी ई.श्रीधरन भाजपात सामील होत आहेत. देशासाठी खरोखरच मोठे योगदान दिलेल्या महत्वाच्या लोकांपैकी बरेच मोदींच्या नेतृत्वामुळे प्रभावित होऊन भाजपात सामील झाले तर आश्चर्य वाटू नये. बाकी फुकाचे अभिव्यक्तीस्वातंतत्र्याचे बुडबुडे सोडणारे लोक मात्र विरोधात आहेत. https://timesofindia.indiatimes.com/city/kochi/metro-man-e-sreedharan-to-join-bjp/articleshow/81084672.cms
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Fri, 02/19/2021 - 05:44 नवीन
ते ८८ वर्षांचे आहेत. त्यामुळे भाजपला फारसा फायदा नाही.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 16 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 16 hours ago
  • सुंदर !!
    1 day 17 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 17 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा