Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ४)

च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/16/2021 - 06:27
🗣 267 प्रतिसाद
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी चौथा भाग काढत आहे. पहिल्या तीन भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. ग्रेटा थनबर्गच्या तथाकथित टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेली बंगलोरची २१ वर्षीय तरूणी दिशा रवीने ग्रेटाशी टेलिग्रामसारख्या माध्यमातून चर्चा केली होती आणि त्यात असे केल्याने आपल्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकेल असा उल्लेख त्यात होता अशा बातम्या येत आहेत. तसे असेल तरी त्याउपरही हे टूलकिट प्रकरणाचे धाडस केलेल्या कर्माची फळे तिला भोगावीच लागायला हवीत. दिशा व्यतिरिक्त निकिता जेकब आणि शंतनू मुळुक यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे आणि ते फरार आहेत अशाही बातम्या आहेत. तसेच ग्रेटाने चुकून ते टूलकिट जगजाहीर केल्यानंतर दिशाच्या पाचावर धारण बसली होती अशाही बातम्या आहेत. काहीही झाले तरी कायद्याचा धाक असायलाच हवा. या मंडळींनी कायदा मोडला असेल तर त्याची फळे त्यांना भोगायला लावलीच पाहिजेत. नेहमीप्रमाणे मग सरकार २१ वर्षाच्या तरूणीला घाबरले का, ती लहान आहे वगैरे म्हणणे सुरू झाले आहे. तसेच ती प्राणीप्रेमी कशी आहे, ती व्हेगन कशी आहे याचेही कौतुक सुरू झाले आहे. मागे काश्मीरात दहशतवादी बुरहान वाणीला सुरक्षादलांनी ठार मारल्यावर तो शाळाशिक्षकाचा मुलगा कसा होता याचे कौतुक सुरू होते. म्हणजे तिशीपर्यंतच्या कोणी असे अडकल्यास ते वयाने लहान, त्यांचे आईवडिल काबाडकष्ट करून त्यांना वाढवत आहेत हे कौतुक, त्यानंतर ३० ते ६० या वयातील कोणी अडकल्यास ते कसे कुटुंबवत्सल, ते कसे विचारवंत, ते कसे नाकासमोर चालणारे सामान्य लोक याचे कौतुक होते आणि साठीच्या पुढचा कोणी अडकल्यास इतक्या वयाच्या माणसाला कसे पकडले, त्याच्या प्रकृतीचे काय वगैरे कौतुक सुरू केले जाते. एकूणच काय की यांच्या कळपातील कोणावरही कितीही गंभीर आरोप असले आणि वरकरणी त्यांना तुरूंगात टाकण्याइतका पुरावा असला तरी त्यांच्याविरूध्द बोलायचे नसते अशी या विचारवंतांची अपेक्षा असते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61996 views

🗣 चर्चा (267)
स
साहना Tue, 02/16/2021 - 06:42 नवीन
दिशा रवी सारख्या लोकांच्या मानसिकेतला माझा काडीचाही पाठिंबा नाही आणि प्रचंड विरोध आहे तरी सुद्धा भारतीय कायदे आणि भारत सरकारचे ते वापरण्याचे प्रमाण ह्यांच्यांत तारतम्य नाही असेच मला वाटते. दिशाला तुरुंगात टाकून काहीही सिद्ध होणार नाही पण आता बाहेर येताच जिग्नेश, कँन्हय्या इत्यादी प्रमाणे हि सुद्धा आपण एक व्हिक्टीम असल्याप्रमाणे मिरवणार आहे. प्याद्यांच्या विरोधांत आपला दुरूगोळा खर्च केला तर राणीच्या विरोधांत काय ? दिशा रवी काही दिवसांत बाहेर येईल, मग मुलाखती वगैरे देईल, विदेशांत वगैरे जाऊन भाषणे देईल आणि उपयुक्तता संपल्यावर डावी मंडळी हिला बाहेर फेकून देतील. माझ्या मते २१ वर्षांची एक बुद्धिवान आणि सुशिक्षित युवती ग्रेटा सारख्या थोतांडाना बळी तर पडतेच पण वरील शक्तींच्या हातातील बाहुले बनते हि समाज म्हणून थोडी चिंतेची बाब आहे. हे कसे शक्य झाले ह्यावर मी ह्यापूर्वी बरेच लिहिले आहे. सरकारी ताब्यांतील एकूण शिक्षणव्यवस्था पण ख्रिस्ती/इस्लामिक शाळांना दिलेले अनिर्बंध स्वातंत्र्य, आणि हिंदूंना शाळा चालविण्यावर घातलेली बंदी हे माझ्या मते ह्या एकूण प्रकारचे कारण आहे. दिशा माऊंट कार्मेल ची विद्यार्थिनी आहे. आमचीच मुले आमच्याच शत्रू साठी कॅनन फोद्दर बनत आहेत. आज नर्सरी मधल्या मुलांकडून चित्रे काढून घेतली जातात. पृथ्वी जळत आहे, वाहनांनी धूर फेकून पृथीवला गुदमरवाले आहे, फॅक्टरी धूर औकात आहे इत्यादी. अश्या प्रकारे ब्रेनवॉश झालेली मुले मग पुढे मोठी होऊन दिशा रवी बनतात. टीप: वातावरण बदल, ग्लोबल वॉर्मिंग इत्यादी गोष्टी थोतांड असून डाव्या लोकांच्या खेळ्या आहेत असे मी ह्या आधी लिहिले असताना लोकांनी हे कसे बरे अशी विचारणा केली. दिशा हि "climate activist" आहे म्हणे. स्वतःला climate activist म्हणवणारी हि व्यक्ती अयोग्य पद्धतीची शेती, गवात जाळून प्रदूषण करणारी शेती पद्धती, गरज नसलेले अन्न पिकवून नैसर्गिक सुविधांची नासाडी करणारी शेती आणि ह्या सर्वांवर गलेलठ्ठ झालेले दलाल ह्यांचे समर्थन करत आहे हे लक्षांत घ्यावे.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 02/16/2021 - 07:54 नवीन
सहना जी.. सहमत. मी देखील हेच टायपायला आलो होतो.
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 02/16/2021 - 08:20 नवीन
दिशा रवी ला फाशी दिली तरी मला चालेल. पण ग्लोबल वॉर्मिंग हे थोतांड कसे? तुमचे आधीचे प्रतिसाद वाचले नाहीयेत. पण माझ्या मते पृथ्वी खरंच गरम होत आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 02/16/2021 - 09:11 नवीन
प्याद्यांच्या विरोधांत आपला दुरूगोळा खर्च केला तर राणीच्या विरोधांत काय ?
पण प्यादी पण महत्वाची असतात. प्यादी मैदानात नसतील तर राण्यांना त्यांचे मनसुबे अंमलात आणता येत नाहीत. तसेच दिशा रवी ही काही अगदी हार्डकोर प्रोफेशनल गुन्हेगार नसावी, तिने कोणत्यातरी फुकाच्या आदर्शामागे धावत जाऊन हा गुन्हा केला असावा असे वाटते. त्यामुळे थोडा धाक दाखवताच ती पोपटासारखं बोलायला लागेल आणि त्यातून तिच्यामागे नक्की मोठा कट आहे का, असल्यास किती मोठा आणि किती गंभीर यापर्यंत जाता येईल. तसेच कोणत्याही मोठ्या कटांच्या सूत्रधारांना अशी प्यादी लागतातच आणि ती प्यादी त्यांच्या नकळत महत्वाची भूमिका पण बजावत असतात. दिशा हे असेच एक प्यादे आहे म्हणून सोडून दिले तर भविष्यात इतर कटांसाठी अशी प्यादी मोठ्या प्रमाणावर कशावरून येणार नाहीत? कारण त्यांना वाटेल की भारत सरकार एकदम सॉफ्ट आहे आणि कोणीही टपलीत मारून गेलेले चालते. त्यामुळे दिशा हे एक प्यादे असले तरी तिच्याविरूध्द कडक भूमिका घेणे गरजेचे आहे. थोडक्यात म्हातारी मेल्याचं दु:ख नाही पण काळ सोकावायला नको.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 02/16/2021 - 18:55 नवीन
1)कारखाने आणि शहरांचे सांडपाणी नदीत सोडल्या मुळे पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या नद्या ,नाले ह्यांचे गटार झाले आहे हे थोतांड आहे. २) कीटक नाशक ,रासायनिक खत वापरल्या मुळे आरोग्यास हानिकारक असे घटक अन्न मध्ये ,वातावरणात, पाण्या मध्ये,पसरले आहेत आणि ते मानवी शरीरात जात आहेत हे थोतांड आहे. ३) पृथ्वी चे तापमान वर्षांवर्ष वाढत आहे हे थोतांड आहे ४) पृथ्वी वरील antartica खंडातील बर्भ वितळत आहे हे थोतांड आहे ५)हिवाळा ,पावसाळा,उन्हाळा हे वेळेवर सुरू होत नाहीत हे थोतांड आहे ६) पावसाचे प्रमाण कमी झाले आहे हे थोतांड आहे. ७) हवेत विविध विषारी घटकांचे प्रमाण वाढले आहे हे थोतांड आहे ८) ३० वर्षाच्या आत च मधुमेह,उच्च रक्तदाब,कॅन्सर हे रोग होण्याचे प्रमाण वाढले आहे हे थोतांड आहे. सर्वांनी लक्षात घ्या हे सर्व थोतांड आहे
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन गुरुवार, 02/18/2021 - 03:53 नवीन
वा साहनाताई! मानलं तुम्हाला. जगातील बहुसंख्य शास्त्रज्ञ म्हणतात त्याला थोतांड म्हणायला एकतर प्रचंड बौद्धिक बळ हवे किंवा त्याचा प्रचंड अभाव तरी. मानलं!!
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 02/16/2021 - 06:42 नवीन
अतिशय सहमत. देशापुढे मोठे काहीही आणि कुणीही नाही हे सर्व आघाड्यांवर स्पष्टपणे दाखवून देण्याची गरज आहे. अन्यथा अश्या लोकांचे समर्थन करण्याची कुबेरीवृत्ती बोकाळू शकते. आजचा लोकसत्ता अग्रलेख ' ही दिशा कोणती' ( !?) याच विषयावर आहे आणि बकवास आहे हे वेगळे म्हणायला नको... तिथे प्रतिक्रिया देण्याची सोय बंद आहे.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/16/2021 - 07:10 नवीन
लोकसत्तामधे एकूणच सर्व comments बंद केल्या गेल्या आहेत बर्याच काळापासून असं दिसतं. जेव्हा त्या उपलब्ध होत्या तेव्हा बहुतांश पब्लिक कॉमेंट्स या कुबेर आणि एकूण सम्पादकीय लेखांच्या विरोधात असायच्या. त्यात असंख्य ट्रोल होते हे तर आहेच. त्या कॉमेंट्सवर कारवाई व्हावी किंवा त्या बंद कराव्यात असे त्या वृत्तपत्राला वाटणे स्वाभाविक होते. त्यांची स्वत:ची वेबसाईट असल्याने त्यांना तो रास्त हक्कही होता / आहे. त्या हेतूने तसे करुन मान्य केल्यास उत्तम. पण मग उगीच "जनतेच्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्या"बद्दल वेळोवेळी जोरदार लिहिणारया लोकसत्तेला या कॉमेंट्सची इतकी काय पर्वा पडली होती की ती सोयच बळेच डिसेबल करुन या कॉमेंट्स शांत करुन टाकाव्यात? मुस्कटदाबी किंवा कसे म्हणायचे? कोण जाणे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/16/2021 - 10:15 नवीन
>>> लोकसत्तामधे एकूणच सर्व comments बंद केल्या गेल्या आहेत बर्याच काळापासून असं दिसतं. जेव्हा त्या उपलब्ध होत्या तेव्हा बहुतांश पब्लिक कॉमेंट्स या कुबेर आणि एकूण सम्पादकीय लेखांच्या विरोधात असायच्या. त्यात असंख्य ट्रोल होते हे तर आहेच. त्या कॉमेंट्सवर कारवाई व्हावी किंवा त्या बंद कराव्यात असे त्या वृत्तपत्राला वाटणे स्वाभाविक होते. >>> लोकसत्तावाले सर्व प्रतिसाद छापत नव्हते. काही प्रतिसाद न छापता मॉडरेटरकडे जायचे, पण ते प्रतिसाद कधीच छापत नव्हते. सकाळवाले पूर्वी कोणताही प्रतिसाद लगेच न छापता मॉडरेटरकडे पाठवून ३-४ तासांनी छापायचे. पण आलेले सर्व प्रतिसाद न गाळता छापायचे. आता ते अगदी एखादाच प्रतिसाद छापतात (तो सुद्धा सबमिट केल्यानंतर २-३ दिवसांनी).
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 02/16/2021 - 11:07 नवीन
लोकसत्तावाले सर्व प्रतिसाद छापत नव्हते. काही प्रतिसाद न छापता मॉडरेटरकडे जायचे, पण ते प्रतिसाद कधीच छापत नव्हते.
याचा अनुभव मला आहे. मागे म्हणजे सप्टेंबर २०१८ मध्ये कुबेरकाकांनी 'तर्काच्या खुंटीवरून निसटलेला रूपया' म्हणून एक अतिशय विनोदी लेख लिहून निवडणुकीला सहा-आठ महिने राहिलेले असताना रूपयाचे अवमूल्यन होते आणि ते का होते याचा अजब तर्क देऊन नवे कुबेरियन इंटरनॅशनल फायन्सान्स प्रसिध्द केले होते. त्याची ऐसी की तैसी करणारी मी प्रतिक्रिया मी लिहिली होती. ती छापण्यात आली नव्हती हे वेगळे सांगायला नकोच.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 02/16/2021 - 11:10 नवीन
ती प्रतिक्रिया जमल्यास इथे लिहाल का?
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 02/16/2021 - 11:21 नवीन
प्रतिक्रिया कुमार केतकरांनी लोकसत्ता सोडून काही वर्षे झाली असली तरी सुमार पत्रकारीतेचा केतकरी वारसा आता कुबेर चालवत आहेत हे नक्कीच. या लेखातील एकेका मुद्द्यांचा समाचार घेतो. त्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करतो की रूपया घसरला म्हणजे फार वाईट झाले आणि रूपया वधारला म्हणजे वा वा छान झाले असल्या खुळचट कल्पनांना मी थारा देत नाही. आताही नाही आणि २०१४ पूर्वीही देत नव्हतो. माझ्यातील अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणतो की कधीनाकधी भारताने पूर्णपणे फ्लोटिंग चलन ठेवावे. कुबेर म्हणतात की निवडणुक वर्षात रूपयाचे अवमूल्यन झाले आहे. बरं मग?दोन गोष्टी एकत्र घडल्या म्हणजे एक गोष्ट दुसरी घडवून आणते हे म्हणायचा मोह भल्याभल्यांना आवरत नाही. त्याला कुबेरही कसा अपवाद असणार? Correlation is not causation. समजा वानुआटूमध्ये पूर येणे आणि मणिपूरमधील विधानसभा निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाचा पराभव होणे या घटना एकाच वेळी घडत असल्या तर वानूआटूमध्ये पूर आल्यामुळे मणिपूरमध्ये सत्तापालट झाला असे म्हणता येईल का? १९९८-९९ या काळात रूपयाचे ८.४% ने अवमूल्यन झाले. पण त्या काळात नक्की कोणत्या घटना घडल्या होत्या म्हणून रूपयाचे अवमूल्यन झाले हे कुबेरमहाशय बघणार की नाही? सप्टेंबर १९९७ मध्ये पूर्व आशियात (थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया) आर्थिक संकट आले. त्या देशांमध्ये फुल कॅपिटल अकाऊंट कन्व्हर्टिबिलिटी आणि फिक्स्ड एक्स्चेंज रेट असल्यामुळे अमेरिकन डॉलर भराभर देशाबाहेर जायला लागल्यानंतर त्या देशांच्या चलनांचे अवमूल्यन होणे क्रमप्राप्त होते. अशावेळी इतर देशांमधूनही परकीय वित्तसंस्था आपले डॉलर काढून सर्वात सुरक्षित अशा अमेरिकन सरकारच्या बाँडमध्ये गुंतवतात. याला फ्लाईट टू क्वालिटी म्हणतात. तोच प्रकार भारतातही झाला. २५ ते २८ नोव्हेंबर १९९७ या काळात डॉलर ३५ वरून ३८ वर गेला होता. मला त्यावेळी वाटले होते की जैन कमिशनच्या मुद्द्यावरून सीताराम केसरी गुजराल सरकारचा पाठिंबा काढून घेत होते म्हणून रूपया कोसळला. पण मुख्य कारण ते नव्हते. त्यानंतर मे १९९८ मध्ये पोखरण अणुचाचण्या झाल्या आणि अमेरिकेने भारतावर कडक निर्बंध घातले. मे-जून-जुलै १९९९ मध्ये कारगील युध्द झाले. या सगळ्या घडामोडींचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला. म्हणून त्या काळात भारतीय रूपया घसरला. कुबेर महाशय या सगळ्याचा संबंध निवडणुकांशी जोडतील पण निवडणुका आल्या म्हणून रूपया घसरला असे कसे म्हणता येईल? २००३-०४ मध्ये प्रथमच भारताचे करंट अकाऊंट सरप्लस होते. म्हणजे भारताची निर्यात आयातीपेक्षा जास्त होती. भारतात कॅपिटल अकाऊंट सरप्ल्स (म्हणजे भारतात गुंतवणुकीसाठी येणारे डॉलर हे बाहेर जाणाऱ्या डॉलरपेक्षा जास्त असणे) नेहमीच असते. त्यातून झाले असे की भारताकडील परकीय चलनाची गंगाजळी वाढली. मग रूपया वधारला यात काही आश्चर्य वाटण्यासारखे आहे का? तर कुबेर याला २००४ मध्ये वाजपेयी परत निवडणुक जिंकणार अशी सगळ्यांना खात्री होती म्हणून असे झाले असे म्हणतात. चालायचेच. असते समज एकेकाची. कुबेरांच्या कल्पनाशक्तीच्या भराऱ्या अजूनही चालूच आहेत. २००८-०९ मध्ये रूपया बराच कोसळला ही गोष्ट बरोबर आहे. पण २००४ ते २००७ पर्यंत रूपया सशक्त होत होता याकडे ते सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत.त्याचे कारण काय होते? वाजपेयी सरकारने महागाई आणि फिस्कल डेफिसिट या दोन्ही गोष्टी नियंत्रणात ठेवली होत्या तसेच जागतिक अर्थसंस्थांना भारतात गुंतवणुक करायला पोषक निर्णय घेतले होते. त्यातून २००३ ते २००७ या काळात भारतात मोठ्या प्रमाणावर डॉलर गुंतवणुकीसाठी आले.त्यातून रूपया वधारला. २००७ मध्ये एक डॉलरला ३७.१६ रूपये इतक्या प्रमाणावर वधारला होता. पण २००८ मध्ये अमेरिकेत सबप्राईम संकटात लेहमन ब्रदर्स बुडीत गेली. त्यानंतर परत एकदा फ्लाईट टू क्वालिटी या अंतर्गत भारतातून मोठ्या प्रमाणावर डॉलर अमेरिकेत परत गेले आणि त्यांची गुंतवणुक अमेरिकन सरकारच्या बाँडमध्ये झाली. त्यातून रूपया कोसळला आणि मार्च २००९ पर्यंत एका डॉलरला ५२ रूपयांपर्यंत गेला. आता याचा २००९ च्या लोकसभा निवडणुकांशी कितपत संबंध आहे हे वाचकांनीच ठरवावे. जून-जुलै २००९ ते २०११ या काळात रूपया परत वाढत होता. त्याचे काय कारण होते? क्वांटिटेटिव्ह ईजिंग अंतर्गत अमेरिकन फेडने दीर्घ मुदतीचे बाँड विकत घेतले आणि अमेरिकन बाजारात डॉलर मुबलक प्रमाणात पसरवले. तसे करायचे उद्दिष्ट हे की जास्त डॉलर उपलब्ध असतील तर अमेरिकेत अधिक प्रमाणावर कर्जे दिली जातील आणि थंडावलेल्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला परत उभारी येईल. पण अमेरिकेतील वित्तीय संस्थांनाच अमेरिकन अर्थव्यवस्था इतक्या लगेच सावरेल अशी खात्री नव्हती म्हणून आपल्याकडील डॉलर त्यांनी भारतासारख्या देशात गुंतवणुकीसाठी वळवले. त्यातून भारतात मोठ्या प्रमाणावर डॉलर आले आणि भारतीय रूपया वधारला. पण नंतरच्या काळात अमेरिकेत क्वांटिटेटिव्ह ईजिंग हा कार्यक्रम आवरता घेतला जायला सुरवात झाली आणि भारतात येणारे डॉलर घटले म्हणून रूपया परत कमजोर झाला. २०१३ मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्था परत एकदा सुधारायला लागली तेव्हा अमेरिकेतील संस्थांनी सरकारी बाँडमध्ये गुंतवलेले डॉलर काढून विविध कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवायला सुरवात केली. त्यामुळे अमेरिकन बाँडच्या किंमती कमी झाल्या आणि परतावा वाढला. भारतासारख्या देशात बाँड मार्केटमध्ये गुंतवणुक करायची असेल तर जागतिक संस्थांना अमेरिकेत बाँडवर मिळेल त्यापेक्षा जास्त परतावा हवा असतो. हा 'प्रिमिअम' अमेरिकेत बाँडवरील परतावा वाढला म्हणून कमी झाला त्यामुळे ऑगस्ट २०१३ मध्ये परत एकदा डॉलर भारतातून मोठ्या प्रमाणावर बाहेर गेले आणि रूपया अजून कोसळला. एक वेळ आली होती की एका डॉलरसाठी जवळपास ६८ रूपये मोजायला लागत होते. आता या सगळ्याचे कारण कुबेर महाशयांच्या मते भारतातील निवडणुका. पण ते कारण होते का याचा निवाडा वाचकांवर सोडतो. नंतरच्या काळात रघुराम राजन यांनी कोसळता रूपया सावरायला आंतरराष्ट्रीय बाजारातून २५ बिलिअन डॉलर तीन वर्षांसाठी उभे केले. त्यातून रूपया तात्पुरता सावरला. हे २५ बिलिअन डॉलर नोव्हेंबर २०१६ मध्ये परत करायचे होते. यालाच सुब्रमण्यम स्वामींनी 'राजन यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत पेरलेला टाईमबॉम्ब' असे म्हटले होते. अर्थात तो टाईमबॉम्ब नेहमीप्रमाणे फुसका बारच ठरला. आता रूपया परत इतका का पडत आहे? त्याचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेले ट्रेड वॉर. गेली ३०-३५ वर्षे अमेरिका इतर देशांकडून मोठ्या प्रमाणावर आयात करत आहे. त्यातून अमेरिकन उद्योगांना हानी पोहोचते असे ट्रम्प यांचे म्हणणे. म्हणून त्यांनी अमेरिकेत आयात केल्या जाणाऱ्या अनेक गोष्टींवर सीमाशुल्क (टॅरीफ) वाढवले. टर्कीमधील मेटलवरही असे टॅरीफ वाढवले. त्यातून टर्कीच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान होईल या शंकेने टर्कीमधून डॉलर बाहेर पडले त्यातून टर्कीचे चलन (लीरा) कोसळले. ट्रम्पनी चीनमधून केल्या जाणाऱ्या आयातीवरही असे बरेच निर्बंध घातले आहेत. त्याला चीनने आपल्या पध्दतीने प्रत्युत्तर दिले. त्यातून झाले असे की अमेरिका सोडून इतर देशांमध्ये आपल्याला पाहिजे तितका परतावा मिळणार नाही या शंकेने जागतिक वित्तसंस्थांनी आपले डॉलर काढून अमेरिकेत गुंतवणुकीसाठी परत नेले. याचा परिणाम भारतावरही झाला. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की चलनात असे चढउतार विविध कारणांनी होत असतात. त्याचा संबंध निवडणुकांशी जोडणे हे अत्यंत बालिशपणाचे लक्षण झाले. एकेकाळी कुबेरमहाशय खूप अभ्यासू वगैरे आहेत असे वाटायचे पण गेल्या ३-४ वर्षात त्यांनी अशी एकामागोमाग एक अज्ञानमूलक विधाने केल्यामुळे आता तो गैरसमज अजिबात राहिलेला नाही. स्पष्टीकरणः १. २००७ मध्ये डॉलर ३७.१६ नाही तर ३९.१६ पर्यंत गेला होता. मुळातल्या प्रतिक्रियेत चुकून ३७.१६ लिहिले होते. तरीही रूपया बराच वधारला होता. २. रघुराम राजन यांनी काही चांगल्या गोष्टी नक्कीच केल्या. एकेकाळी मी राजन यांचा चाहता होतो. पण आता नाही. तरीही २०१३ मध्ये आर.बी.आय गव्हर्नर म्हणून राजनपुढे वर उल्लेख केलेले पाऊल उचलण्याव्यतिरिक्त दुसरा काही पर्याय होता असे वाटत नाही. ते त्यांनी केले त्याबद्दल देय श्रेय त्यांना द्यायलाच हवे. तसेच सुब्रमण्यम स्वामी या चक्रम माणसाविषयीही मत तेव्हा आणि आजही फारसे चांगले नाहीच. तरीही त्याच सुब्रमण्यम स्वामींनी राजन कार्ती चिदंबरमच्या खात्यांची माहिती कसे दडवून होते हे पण जगजाहीर केले होतेच हे पण विसरता कामा नये.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 02/16/2021 - 11:55 नवीन
मस्तच तासली होती. इतके वाभाडे काढलेली प्रतिक्रिया प्रकाशीत झाली असती तरच नवल.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 02/16/2021 - 19:04 नवीन
देशातील प्रशासन ९९ टक्के भ्रष्ट आहे. देशातील ९९ टक्के नागरिक रोज एक तरी कायदा मोडतात त्यांना देशाविषयी कोणतेच प्रेम नाही. रस्त्यावर थंकतील तरी,तिकीट न घेता प्रवास तरी करतील,ट्रॅफिक चे नियम मोडतील ,लाच तरी घेतील च,लोकांना फसवतील,कोणत्या ना कोणत्या प्रकारे देशाचे नुकसान करतील च . ह्या अशा लोकांनी देशप्रेम,देश निष्ठा असे शब्द वापरुन त्या शब्दांची किंमत कमी करू नये.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Tue, 02/16/2021 - 06:50 नवीन
इतकाच पुरावा असूनही अर्णवचे काय केले सरकारने ?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 02/16/2021 - 12:44 नवीन
तुमच्या आयडीला शांती लाभो :) मिपा व्यवस्थापन/संपादक, धन्यवाद
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/16/2021 - 13:21 नवीन
चांगलं झालं. पण नवीन आयडी घेऊन कागलकर परत येणार हे नक्की.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 02/16/2021 - 16:04 नवीन
पुढचा आयडी कोणत्या नावाने घेणार याबाबत उत्सुकता आहे. Gk सर टोबी मोगा तर्राट जोकर कागलकर ब्लॅक कॅट काळे मांजर चंपा एवढे आयडी झाले.. एखादा दुसरा अजून एक असेल पण मला एवढेच आठवतायत. राजेशजींना एकटं एकटं वाटेल आता..
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 02/16/2021 - 07:18 नवीन
नंतर हे लबाड सरकार जनताच बदलून टाकणार आहे परत कधीच सत्तेवर न येण्यासाठी.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 02/16/2021 - 07:25 नवीन
नंतर हे लबाड सरकार जनताच बदलून टाकणार आहे परत कधीच सत्तेवर न येण्यासाठी.>> समजा हेच सरकार २०१९ सारखे परत आले तर काय? EVM खराब का?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 02/16/2021 - 07:41 नवीन
EVM खराब का?
लोकशाहीची हत्याही होईल (न जाणे कितव्या वेळेस)..
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 02/16/2021 - 08:22 नवीन
या दोघांना प्रतिसाद कशासाठी द्यायचा? उगीच चर्चेला दुसरीकडे घेऊन जाऊन शिव्या खातात.
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Tue, 02/16/2021 - 07:55 नवीन
नंतर हे लबाड सरकार जनताच बदलून टाकणार आहे परत कधीच सत्तेवर न येण्यासाठी
. स्वप्ने फारच सिरीयसली घेता राव..
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 02/16/2021 - 07:21 नवीन
चंद्रसूर्यकुमार यांची मांडणी उत्तम आहे. हिंसात्मक मार्ग अनुसरावे अशी थेट किंवा सूचक भाषा त्या टूलकिट किंवा जे काही डॉक्युमेंट आहे त्यात नसेल आणि केवळ आंदोलनात कुठे कुठे मोर्चा, धरणे धरावे किंवा काय मागण्या कराव्यात याबद्दलच उल्लेख असतील तर अटक कदाचित जास्त तीव्र कारवाई ठरू शकते. पण अजून तरी कोणापुढे नेमके काय ते आलेले नाही. म्हणून उगीच पोलीस आणि सरकारवर टीका करण्यात काही हशील नाही. .. नेमके काय आक्षेपार्ह होते ते बघून ते फारच भयंकर असावे आणि त्यामागे फार दूरगामी धागेदोरे असावेत असे काही पुरावे हाती लागल्यानेच ही कारवाई झाली असावी हा विश्वास एक नागरिक म्हणून माझ्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर ठेवलाच पाहिजे. ही व्यवस्था सरकारला सामील, ती व्यवस्थाही विकली गेलीय असे सतत संशय आणि अविश्वास दाखवून अराजक माजेल. पूर्ण माहिती बाहेर येईपर्यंत कोणाही एका बाजूबद्दल छातीठोक विधाने करु नयेत हे उत्तम.
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/16/2021 - 08:16 नवीन
हे टूलकिट म्हणजे काय असते? आणि ते कसे वापरले जाते? पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
पिनाक Tue, 02/16/2021 - 08:25 नवीन
याबाबतीत एक वैश्विक कट असून त्याची सूत्रे अप्रत्यक्षरीत्या चीनकडे असावीत असे मानायला जागा आहे. मी या वरचे जे पाहिलेले आहे (जे रशियाची method होती) ते सध्याच्या परिस्थितीला लागू पडते. कुणीतरी हे मुद्दाम करतंय आणि नामानिराळे राहतेय. काँग्रेस हे फक्त एक मूर्ख खेळणं आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 02/16/2021 - 08:41 नवीन
Toolkit म्हणजे काय? दिशा रवी नी नक्की काय गुन्हा केलेला आहे ? ती देशासाठी धोकादायक कशी आहे? चीन चा हात ह्या पाठीमागे आहे हे तुम्ही कशावरून म्हणता? जरा सर्व detail madhye सांगा. तुम्हाला कळलं असेल तर आम्हाला पण कळेल.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 02/16/2021 - 09:20 नवीन
हिंसात्मक मार्ग अनुसरावे अशी थेट किंवा सूचक भाषा त्या टूलकिट किंवा जे काही डॉक्युमेंट आहे त्यात नसेल आणि केवळ आंदोलनात कुठे कुठे मोर्चा, धरणे धरावे किंवा काय मागण्या कराव्यात याबद्दलच उल्लेख असतील तर अटक कदाचित जास्त तीव्र कारवाई ठरू शकते.
या सगळ्या प्रकारामागे नक्कीच मोठा कट आहे हे म्हणायला जागा आहे. अमेरिकेत सुपरबॉलच्या अंतिम फेरीत काही सेकंदांच्या जाहिरातीसाठी काही मिलियन डॉलर्स किंवा कोट्यावधी रूपये मोजावे लागतात तिथे या शेतकरी आंदोलनात भारतातले गोरगरीब शेतकरी वगैरे नक्कीच नाहीत हे म्हणायला हरकत नसावी. तसेच शांततामय मार्गाने निदर्शने करायला किंवा मोर्चे काढायला कायद्याची परवानगी आहे हे नक्कीच. पण त्याचाच गैरफायदा घेऊन २६ जानेवारीचा प्रकार घडला हे कसे विसरून चालेल? आणि स्वतः दिशा आपल्याविरूध्द UAPA लागू शकेल ही शक्यता आहे हे म्हणत असेल तर आपण करतोय तो प्रकार किरकोळ नसून गंभीर आहे हे तिला पण माहित होते. त्यामुळे या सगळ्या प्रकाराच्या खोलाशी जायला, चौकशी करायला दिशा, शंतनू आणि कोणी दुसरी निकिता यांना सुरवातीला अटक करण्यात आली असली तरी ती केली नसती तर यामागे आणखी कोण आहे हे समजले जायला अडचणी आल्या असत्या. भुरट्या चोराला कुलूप तोडले म्हणून पकडले पण त्याने सांगितलेल्या माहितीवरून प्रत्यक्ष दरोडा घालणारे दरोडेखोर पकडले गेले असे कशावरून होणार नाही?
नेमके काय आक्षेपार्ह होते ते बघून ते फारच भयंकर असावे आणि त्यामागे फार दूरगामी धागेदोरे असावेत असे काही पुरावे हाती लागल्यानेच ही कारवाई झाली असावी हा विश्वास एक नागरिक म्हणून माझ्या देशाच्या सुरक्षा यंत्रणेवर ठेवलाच पाहिजे. ही व्यवस्था सरकारला सामील, ती व्यवस्थाही विकली गेलीय असे सतत संशय आणि अविश्वास दाखवून अराजक माजेल.
सहमत.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Tue, 02/16/2021 - 08:33 नवीन
हे टूलकिट म्हणजे काय असते? आणि ते कसे वापरले जाते? टुलकिट म्हणजे एखाद प्रोजेक्ट किंवा एखाद काम किंवा एखादा पदार्थ बनवण्या साठी जशी साधी सोपी प्रक्रिया, आराखडा किंवा रेसिपी बनवलेली असते. ज्याच्याबरहुकुम काम करायचे असते ज्यात कसे कुठे केव्हा काय करायचे असे त्यातले महत्त्वाचे मुख्य मुद्दे मांडलेले असतात.
  • Log in or register to post comments
क
काळे मांजर Tue, 02/16/2021 - 10:06 नवीन
The 30-second advertisement began with a quote from Martin Luther King Jr. and termed the ongoing farmers' protest as the "largest protest in history", but it was not a part of the actual Super Bowl event. It was funded by Valley Sikh Community as a pre-Super Bowl Ad raising awareness about India's farmers' protest in the local channels. Even though it wasn't aired at the Super Bowl event, singer Jazzy B put out a video claiming that it was. "World is watching! Farmers add played at #SuperBowl #FarmerProtest #NoFarmersNoFood," wrote Jazzy B. https://www.indiatoday.in/india/story/farmers-protest-ad-during-super-bowl-well-yes-and-no-1767023-2021-02-08
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 02/16/2021 - 10:48 नवीन
डू नॉट डिस्टर्ब लिस्टमध्ये असतानाही येत असणार्‍या स्पॅम आणि मार्केटींग कॉल्सना आळा घालण्यासाठी सरकार अजून कठोर पावले उचलत आहे... या प्रयत्नांना यश मिळावे!! लिंक या तरतुदींनुसार, ही यंत्रणा कार्यान्वित झाल्यावर असे कॉल करणार्‍यांचे फक्त सीम ब्लॉक केले जाणार नाही, तर मोबाईल हँडसेटही ब्लॉक केला जाईल. वर दंडाचीही तरतूद आहेच.
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Tue, 02/16/2021 - 10:53 नवीन
हे वाचलं आणि बरं वाटलं. HDFC, LIC, ICICI यांचा फारच त्रास होत होता.. बिचाऱ्या कॉलर लोकांना काहीं बोलायला नको वाटतं..पण काळवेळ काही राहिली नाहीय त्यांच्या फोनला.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 02/16/2021 - 11:01 नवीन
ट्रुकॉलर यासाठीच बरं वाटतं...स्पॅम कॉल दिसला की उचलायचाच नाही..फोन सायलेंट वर टाकायचा आणि आपलं काम करत राहायचं. नंतर नंबर ब्लॉक करायचा...परत कॉल येत नाही. इतर देशात हा प्रॉब्लेम कशा प्रकारे सोडवला गेलाय किंवा कसे याविषयी कोणीतरी लिहीले असल्यास वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 02/16/2021 - 10:59 नवीन
चांगली माहिती. धन्यवाद. :-)
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 02/16/2021 - 11:49 नवीन
स्पॅम आणि मार्केटींग कॉल्सना आळा घालण्यासाठी
सरकारने केवळ दंड वसूल करून भागणार नाही. तक्रारदारांना देखील मानसिक त्रासाची / वेळेच्या अपव्ययाची भरपाई म्हणून रक्कम मिळायला हवी.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Tue, 02/16/2021 - 17:28 नवीन
डू नॉट डिस्टर्ब लिस्टमध्ये असतानाही येत असणार्‍या स्पॅम आणि मार्केटींग कॉल्सना आळा घालण्यासाठी सरकार अजून कठोर पावले उचलत आहे. ही बातमी वाचली आणि फार आनंद झाला ! मेसेजेस आणि कॉल्स ने लैच त्रास होतो. माझा अनुभव :- काही काळा पूर्वी मी असाच या प्रकाराने फार त्रस्त झालो होतो. [ डीएनडी एनेबल असुन देखील. ] मग या लोकांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. मग जालावर बरीच शोधा-शोध केल्यावर मला हे [ TRAI DND 2.0(Do Not Disturb) ] मिळाले.मग मी मला येणार्‍या एसएम आणि कॉल्सची तक्रार मी हे अ‍ॅप वापरुन करु लागलो. मला येणार्‍या कॉल्स आणि मेसेजेस ची संख्या घटली, पण यात एक गोष्ट झाली ज्याने मला बराच ताप झाला. हल्ली जवळपास अनेक कंपन्यांत पोर्टल बेस्ड लॉगिन हे एसएमएस पासकोड वापरुन प्रवेश करण्यासाठी सेट केलेले असते. कंपन्यांनी बहुतेक ही सेवा कोणत्यातरी क्ष कंपनीला आउट सोर्स केलेली असते आणि अर्थातच त्या कंपन्यांकडे त्या कंपनीतील लोकांचा ज्यांनी एसएमएस बेस्ड लॉगिन रजिस्टर केलेले असते त्यांच्या फोन नंबर्सचा डेटा असतो. कंपनी या क्ष कंपनीला पैसे देउन सेवा घेत असते आणि सेवा देणार्‍या कंपनीने फोन नंबर्स हे प्रायव्हेट ठेवायला हवे पण बहुधा असे होताना दिसत नाही. मी तक्रार केल्यामुळे ज्या ऑपरेटरची बुच लागली त्यांनी त्यांच्या डेटाबेस मध्ये माझा नंबर ब्लॉक केला पण यामुळे मला माझ्याच कंपनीच्या पोर्टलवर लॉगिन करता येणे शक्य होइनासे झाले. यावर असे का होते आहे हे शोधुन काढण्यात बराच वेळ गेला पण बरीच मेलामेली केल्यावर माझा इश्यु सॉल्व्ह झाला. माझ्याकडे त्यावेळी कामाच्या व्यस्ततेमुळे अधिक वेळ नव्हता नाहीतर त्या ऑपरेटरची चांगली सोलकढी केली असती ! असो... तर हे ऑपरेटर कसे मोकाट आहेत आणि सगळ्या नियमांना सातत्याने फाट्यावर मारत आले आहेत हे लक्षात येइल. मंत्र्यांनी जाहिर केल्या प्रमाणे त्याची काटेकोर अमंलबजावणी झाल्यास अत्यंत आनंद होइल.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Kuch Mere Dilne Kaha... :- Tere Mere Sapne
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 02/16/2021 - 18:53 नवीन
हाच प्रॉब्लेम मलाही आला होता, urbanclap ला लॉगिन करताना. DND करावे तरीही प्रॉब्लेम, न करावे तरीही प्रॉब्लेम...
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 02/16/2021 - 13:39 नवीन
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 02/16/2021 - 13:40 नवीन
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 02/16/2021 - 13:40 नवीन
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 02/16/2021 - 13:43 नवीन
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 02/16/2021 - 13:42 नवीन
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Tue, 02/16/2021 - 13:49 नवीन
हरलो बुबा... सांगून टाका सिक्रेट... लवकर वाक्य पूर्ण करा आता नाही रहावत आहे पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 02/16/2021 - 13:50 नवीन
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सेनेचे मंत्री राठोड यांचा राजीनामा
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/16/2021 - 14:16 नवीन
अफवा आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 02/16/2021 - 14:38 नवीन
नक्की का? बऱ्याच लिंकवर दिसतंय राजीनामा मातोश्रीवर पाठवला आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/16/2021 - 15:12 नवीन
मंत्र्याने राज्यपालांकडे राजीनामा दिला तरच तो अधिकृत असतो. मातोश्रीवर राजीनामा पाठविणे म्हणजे नोकरीचा राजीनामा बायकोकडे देण्यासारखे आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Tue, 02/16/2021 - 15:15 नवीन
खी खी खी ते तर आहेच, उधोजीनी राजीनामा स्विकरला तर पुढे राज्यपालांकडे जाणार. समजेलच एक दोन दिवसात नाटक आहे का काय ते.
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 02/16/2021 - 14:01 नवीन
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Tue, 02/16/2021 - 14:49 नवीन
एव्हढा विचार कसला करताय :P
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 18 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 18 hours ago
  • सुंदर !!
    1 day 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा