Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०२१ (भाग ४)

च
चंद्रसूर्यकुमार
Tue, 02/16/2021 - 06:27
🗣 267 प्रतिसाद
आधीच्या भागात जवळपास २५० प्रतिसाद झाल्याने फेब्रुवारी २०२१ च्या ताज्या घडामोडींसाठी चौथा भाग काढत आहे. पहिल्या तीन भागातील प्रतिसादांवर काही लिहायचे असेल तरच त्या धाग्यांवर लिहावे अन्यथा या धाग्यावर लिहावे ही विनंती. ग्रेटा थनबर्गच्या तथाकथित टूलकिट प्रकरणात अटक करण्यात आलेली बंगलोरची २१ वर्षीय तरूणी दिशा रवीने ग्रेटाशी टेलिग्रामसारख्या माध्यमातून चर्चा केली होती आणि त्यात असे केल्याने आपल्यावर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकेल असा उल्लेख त्यात होता अशा बातम्या येत आहेत. तसे असेल तरी त्याउपरही हे टूलकिट प्रकरणाचे धाडस केलेल्या कर्माची फळे तिला भोगावीच लागायला हवीत. दिशा व्यतिरिक्त निकिता जेकब आणि शंतनू मुळुक यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला आहे आणि ते फरार आहेत अशाही बातम्या आहेत. तसेच ग्रेटाने चुकून ते टूलकिट जगजाहीर केल्यानंतर दिशाच्या पाचावर धारण बसली होती अशाही बातम्या आहेत. काहीही झाले तरी कायद्याचा धाक असायलाच हवा. या मंडळींनी कायदा मोडला असेल तर त्याची फळे त्यांना भोगायला लावलीच पाहिजेत. नेहमीप्रमाणे मग सरकार २१ वर्षाच्या तरूणीला घाबरले का, ती लहान आहे वगैरे म्हणणे सुरू झाले आहे. तसेच ती प्राणीप्रेमी कशी आहे, ती व्हेगन कशी आहे याचेही कौतुक सुरू झाले आहे. मागे काश्मीरात दहशतवादी बुरहान वाणीला सुरक्षादलांनी ठार मारल्यावर तो शाळाशिक्षकाचा मुलगा कसा होता याचे कौतुक सुरू होते. म्हणजे तिशीपर्यंतच्या कोणी असे अडकल्यास ते वयाने लहान, त्यांचे आईवडिल काबाडकष्ट करून त्यांना वाढवत आहेत हे कौतुक, त्यानंतर ३० ते ६० या वयातील कोणी अडकल्यास ते कसे कुटुंबवत्सल, ते कसे विचारवंत, ते कसे नाकासमोर चालणारे सामान्य लोक याचे कौतुक होते आणि साठीच्या पुढचा कोणी अडकल्यास इतक्या वयाच्या माणसाला कसे पकडले, त्याच्या प्रकृतीचे काय वगैरे कौतुक सुरू केले जाते. एकूणच काय की यांच्या कळपातील कोणावरही कितीही गंभीर आरोप असले आणि वरकरणी त्यांना तुरूंगात टाकण्याइतका पुरावा असला तरी त्यांच्याविरूध्द बोलायचे नसते अशी या विचारवंतांची अपेक्षा असते.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 61996 views

🗣 चर्चा (267)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 02/16/2021 - 14:55 नवीन
तो(करोना) आता ईतक्यात येणार नाही हा विचार मनात आला आणी बेंगळूरुत १०३ जणांना बाधा झाल्याची बातमी आली. https://www.thehindu.com/news/cities/bangalore/103-covid-cases-at-bommanahalli-apartment/article33849384.ece
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 02/16/2021 - 14:59 नवीन
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 02/16/2021 - 15:00 नवीन
Error येते आहे
  • Log in or register to post comments
V
Vichar Manus Tue, 02/16/2021 - 15:01 नवीन
चंद्रसूर्यकुमार क्लिंटन आहेत का
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 02/16/2021 - 15:32 नवीन
चंद्रसूर्यकुमार क्लिंटन आहेत का
तसे वाटत असल्यास तो गैरसमज नाही एवढेच सांगतो.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 02/16/2021 - 17:39 नवीन
योग्य आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 02/16/2021 - 17:41 नवीन
नाव बदलायची गरज का असते. ज्याचे मोबाईल नंबर सारखे बदलतात त्याची कारणे जग जाहीर आहेत. नाव बदलायची कारण पण तीच असतात का
  • Log in or register to post comments
ज
जानु Tue, 02/16/2021 - 18:12 नवीन
अहिंसक आंदोलने काय करतात, त्यांची परिणामकारकता यात पहा.
  • Log in or register to post comments
ज
जानु Tue, 02/16/2021 - 18:14 नवीन
https://youtu.be/YJSehRlU34w वरील लिंक डकवता आली नाही.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 02/16/2021 - 18:22 नवीन
बघावं तेव्हा ह्यांना अती स्वार्थी युरोपियन देशांची उदाहरणे च सापडतात . सर्वात जास्त जगाचे शोषण करणारे हेच देश आहेत. वर्ल्ड ट्रेड सेंटर वर झालेला हा हल्ला हा धार्मिक नव्हताच विकसनशील आणि अविकसित देशांचे आर्थिक शोषण करणाऱ्या युरोपियन राष्ट्रांना दिलेला तो इशारा होता.
  • Log in or register to post comments
भ
भंकस बाबा Wed, 02/17/2021 - 03:15 नवीन
वैयक्तीक टिका करणे मिपाच्या अलिखित धोरणात बसत नाही. पण तुमचे हे असे गर्धभपुराण वाचून मोह आवरत नाही हो? स्वतःची मते असावीत, व्यक्तिस्वातंत्र्य पण असावे, आंतरजालाआवर व्यक्त व्हावे पण ह्याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही काहीही बरळाल. मिपासदस्याना ही विनंती आहे की अशा आयडीवर कारवाई करण्याची मिपासंपादकावर दबाव आणायची. ज्या बातमीचा मी निषेध करत आहे ती नीट वाचली की तुम्हाला कळेल की हे किती घातक आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/17/2021 - 04:13 नवीन
त्या आयडीच्या प्रतिसादांंमधील अत्यल्प माहिती, उथळपणा आणि अज्ञान माहिती झाल्याने मी अशा प्रतिसादांकडे दुर्लक्ष करतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/17/2021 - 05:49 नवीन
सहमत आहे
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 02/17/2021 - 10:59 नवीन
"गाढवापुढे वाचली गीता.."
या उक्तीत केवळ समोरच्या व्यक्तीला गाढव म्हटलेले दिसते. पण खरेतर जो सांगतो तोही गाढव म्हटला पाहिजे. कारण त्याला कळत नाही की, कोणाला काय सांगावे! :-) [ह.घ्या.]
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 02/16/2021 - 18:33 नवीन
https://m.lokmat.com/politics/dr-kiran-bedi-removed-lieutenant-governor-puducherry-a607/ किरण बेदींना पॉंडीचेरी राज्यपाल पदावरून हटवले. राज्यपाल हे पद कायमस्वरूपी बंद करावे हे माझे कायमस्वरूपी मत आहे.
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 02/16/2021 - 18:42 नवीन
राज्यपाल पद गरजेचे आहे की नाही ह्याचा अभ्यास तुमच्या पेक्षा ज्यांनी घटना लिहली त्यांचा किती तरी पटीत जास्त होता . राज्यपाल पद हे असेलच पाहिजे फक्त ते पद राजकीय पक्षाशी संबंधित लोकांना बिलकुल दिले नाही पाहिजे. खूप हुशार,सामाजिक जाण असलेल्या गैर राजकीय व्यक्ती ला ते पद दिले जावे. आणि ते सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ह्यांनी दोघांनी मिळून त्या व्यक्ती ची निवड करावी. फक्त सत्ताधारी पक्षाला राज्यपाल निवडण्याचा अधिकार नसावा. हा बदल ह्या साठी की. घटना लीहली तेव्हा पुढे राजकीय पक्ष एवढे नालायक निघतील ह्याचा अंदाज नव्हता .
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/17/2021 - 05:40 नवीन
भारतात पहिल्यांदाच पेट्रोल काही ठिकाणी 100,रुपये ltr च्या पुढे गेले आहे. भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच घडले आहे. शेवटी करून दखवलच. कोरोणा चे रुग्ण परत भारतात वाढत आहे अगदी जगातील सर्व प्रकारचे corona चे strainभारता मध्ये सापडत आहे. एवढे मोठा फटका बसून सुधा आंतर राष्ट्रीय प्रवासी वाहतूक पूर्ण पने थांबवावी असे सरकार ला वाटत नाही. राहू ध्या ना विमान hanger मध्ये वर्षभर . काही लाख आंतरदेशीय प्रवास करणाऱ्या लोकांमुळे करोडो लोकांचे जीवन धोक्यात येत आहे. अर्थव्यवस्था धोक्यात येत आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 02/17/2021 - 10:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 02/17/2021 - 10:45 नवीन
विचार करण्यास हरकत नाही.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/17/2021 - 09:47 नवीन
https://www.loksatta.com/desh-videsh-news/modi-government-to-privatize-four-heritage-railway-tracks-including-neral-matheran-track-under-public-private-partnership-mode-scsg-91-2402719/ विकास
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/17/2021 - 09:50 नवीन
दरवर्षी या रेल्वे मार्गांच्या देखभालीमध्ये शेकडो कोटी रुपयांचा तोटा रेल्वेला सहन करावा लागत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. असे असेल तर विकणे हा अत्यंत योग्य निर्णय आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/17/2021 - 09:59 नवीन
बरोबर असेल तुमचे.. पण मला दोन प्रश्न पडलेत - मग जे लोक विकत घेत आहेत, ते काय करतील? ते जे करतील तेच सरकार ने केल्यास लोकांचा थोडा का होईना फायदा झाला असता आणि सरकार चा पण. आता जो युक्तिवाद आहे कि देखभाल खर्च जास्त असल्याने तोटा होतो, मग भाडे वाढवून हेच कारण दिल्यावर पण कोणी काही म्हणाले नसतेच.. खाजगी झाल्यावर कोणी तोट्यात चालवणार आहेत म्हणुन विकत घेतील काय? या पेक्षा गंभीर प्रश्न विमानतळे अदानी ला दिले तेंव्हा पडले होते.. ते तर तोट्यात नव्हते ना? असो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/17/2021 - 10:38 नवीन
सरकारचे अतिरिक्त खर्च जास्त असतात. कर्मचाऱ्यांची उत्पादकता कमी असते. कामचुकार कर्मचाऱ्यांना काढून टाकणे शक्य नसते. निर्णयप्रक्रिया संथ असते. लाचखोरी असते. नफा मिळविणे हा उद्देश नसतो. अशा अनेक कारणांमुळे बहुतेक सरकारी उद्योग तोट्यात असतात. खाजगी कंपन्या यातील बऱ्याच गोष्टी सुधारून तोट्यातील उद्योग नफ्यात नेऊ शकतात.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/17/2021 - 10:41 नवीन
Ok
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 02/17/2021 - 10:49 नवीन
पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे अमुलाग्र फरक पडला आहे.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 02/17/2021 - 11:46 नवीन
सहमत, याउलट, आर टी ओ कार्यालयांचे खासगीकरण झालेले नाही हे तिथे गेल्यावर पदोपदी जाणवते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/17/2021 - 14:16 नवीन
स्वतः विकत घेऊ शकत नाही, म्हणून पोट दुखत आहे ... कोल्ह्याला द्राक्षे आंबट ....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/17/2021 - 13:37 नवीन
पासपोर्ट सेवेत खाजगीकरणामुळे अमुलाग्र फरक पडला आहे.
खाजगी करण वाईट नाही.. पण सरसकट खाजगी करण होत जाणे हे हि चांगलेच असे होऊ शकत नाही.. त्याला अनेक कंगोरे असतात .. उदा. मध्यतंरी मुंबई विमानतळ खाजगी लोकांकडे गेले.. त्या नंतर तेथे नोकरी करणारे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने घेतले जाणार कि permanant हे सरकार ठरवणार नाही... मुद्दा सरकारी लोक कामाचूकार असतात कि नसतात असा का बघायचा? मुद्दा असा आहे कि नोकरी confirm नसणार.. कोणालाहि विना कारण काढून टाकता येणार वगैरे.. उदा २. शिवनेरी हि बस ५०० rs मुंबई पुणे आकारते.. कारण ती खाजगी आहे, तसेच एस टी पुर्ण खाजगी केली तर सेवा चांगली देईल, पण कुठे सेवा द्यायची कुठे नाही हे ते ठरवतील...profit आणि लोक हे दोन्ही महत्वाचे हे तत्व त्यांना लागू होणार नाही.. फक्त profit ते बघतीलच. सेवा हा एकच उद्देश असला तरी अस्तित्वात असणाऱ्या देशाच्या संपत्ती ला कसे वाढवायचे हे महत्वाचे आहे.. Bsnl वगैरे काय करत होती हे मला बोलायचे नाही, पण उद्या jio, airtel आणि vi यांनी मिळून rate वाढवला तरी तो बंधनकारक असेलच.. आणि indian oil, bpcl असल्या कंपनी कडून येणारा tax हि महत्वाचा असतोच उद्या पेट्रोलियम कंपन्या खाजगी केल्या तर येणार्या tax वर परिणाम होणारच.. रेल्वे ला लागणारे इंधन हि आता खाजगी कंपनी कडे जातेय.. मग असे खाजगी करण करतच राहिलो तर करोना सारखी परिस्थिती आली तर उद्या फक्त कर ऐवजी कर्ज वाढावायचे का फक्त? हा प्रश्न उपस्तिथ होतो... नुकतेच आलेले राफेल अनिल अंबानी च्या थोड्या दिवस आधी रजिस्टर केलेल्या संस्थेला असेंबल्ड /mainrance साठी दिले गेले, HAL असताना.. हे नक्कीच चांगले नाही.. येथे hal अशी आणि वगैरे बोलायचे नाही पण हे पण योग्य नाही.. मागे हसदेव अरण्य तेथील तीन गावे उठवून ( पण कागदो पत्री मात्र त्यांच्या सह्या घेऊन ) विस्थापित करून पर्यावरण मंत्रालयाने २००९ पासून reject केलेला project अडाणी च्या कंपनी ला दिला गेला.. अख्खा मध्य हिरवा प्रदेश कोळश्याच्या खाणीत रूपांतर झाला हे नक्कीच चांगले द्योतक नाही.. प्रगती असावी.. Private करण असावे पण देश नही बिकणे दूंगा असे म्हणत देश संस्था विकल्यावर कसे भारी आहे हे, असे सांगावे लागत आहे..ते चूक आहे.. माझी मते चूक असतील हि.. इतके सर्व क्षेत्राचे ज्ञान असणे कठीण आहे, परंतु ते १००% चूक नक्कीच नाहीत.. बरं एव्हडे सगळे तोट्यातील विकून, आपले कर्ज कमी होत नाही त्याच्यात भरमसाठ वाढ होतेय.. मग आपण नक्की तेथे लक्ष द्यावे लागेल.. नाहीतर कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला देश परवडत नाही म्हणुन पुन्हा इंग्लंड अमेरिका ला विकावा लागेल असे जर कोणी म्हणाले तर ते अतिशयोक्ती ठरणार नाही.. असो.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/17/2021 - 13:44 नवीन
http://misalpav.com/node/45514 हसदेव अरण्य बद्दल लिहिलेला धागा...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Wed, 02/17/2021 - 13:52 नवीन
तुमचे मत एकदम बरोबर आहे.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 02/17/2021 - 14:23 नवीन
आणि indian oil, bpcl असल्या कंपनी कडून येणारा tax हि महत्वाचा असतोच उद्या पेट्रोलियम कंपन्या खाजगी केल्या तर येणार्या tax वर परिणाम होणारच..
नक्की कोणत्या स्वरूपात?
माझी मते चूक असतील हि.. इतके सर्व क्षेत्राचे ज्ञान असणे कठीण आहे, परंतु ते १००% चूक नक्कीच नाहीत..
तरीही तुम्ही ज्या आत्मविश्वासाने लिहिता त्याचे कौतुक वाटते.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/17/2021 - 16:56 नवीन
आत्मविश्वास आहे कारण ती माझी मते आहेत, कोणत्याही IT CELL च्या दलाला ची उसनी नाहीयेत.. आणि कोणत्याही पक्षाची काही केली तरी री ओढणारी नाहीयेत.. माझी मते चूक असु शकतील हे म्हणणे म्हणजे प्रामाणिक पणे इतर कोणाचे तरी मूर्ख विचार आणि माझे उच्च असा अहम भाव नाही.. आणि १००% चूक नाहीत कारण तो विश्वास आहे... असो..
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 02/17/2021 - 17:01 नवीन
शालजोडीतून मारलीत पण गेंड्याची कातडि आणि शहामृगाची झापडे आणि माकडा सारखी लाल करणार्‍यांना काहीही फरक पडणार नाही
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/17/2021 - 15:57 नवीन
नुकतेच आलेले राफेल अनिल अंबानी च्या थोड्या दिवस आधी रजिस्टर केलेल्या संस्थेला असेंबल्ड /mainrance साठी दिले गेले, HAL असताना.. नक्की? माझ्या माहितीप्रमाणे ऑफसेट काँट्रॅक्ट एकूण ७२ वेगवेगळ्या कंपन्यांना मिळाले होते. त्यात रिलायन्स, HAL अशा अनेक कंपन्या होत्या. एकूण ३०,००० कोटींंपैकी रिलायन्सला अंदाजे ८०० कोटी म्हणजे ३ टक्क्यांहून कमी रकमेचे कंत्राट मिळाले होते. सर्वाधिक माठे कंत्राट HAL ला होते. ही कंत्राटे आणि विमान बनविणे, विमानाचे सुटे भाग बनविणे, विमानांची देखभाल अशा कोणत्याही कामांसाठी नसून पूर्णपणे वेगळ्या कामांसाठी होती.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 02/17/2021 - 17:11 नवीन
सर्वाधिक माठे कंत्राट HAL ला होते. ही कंत्राटे आणि विमान बनविणे, विमानाचे सुटे भाग बनविणे, विमानांची देखभाल अशा कोणत्याही कामांसाठी नसून पूर्णपणे वेगळ्या कामांसाठी होती.
हे सगळ्यात महत्वाचे.
एकूण ३०,००० कोटींंपैकी रिलायन्सला अंदाजे ८०० कोटी म्हणजे ३ टक्क्यांहून कमी रकमेचे कंत्राट मिळाले होते.
बाकी ही कंपनी अनील अंबानी ग्रुपची कशी झाली? या कंपनीची राफेल करार व्हायच्या आधी काही दिवस नोंदणी झाली असे सगळ्यांना वाटते. पण सत्य परिस्थिती तशी नाही. १९९० मध्ये निखिल आणि भावेश गांधी यांनी एस.के.आय.एल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी स्थापन केली होती. या कंपनीची उपकंपनी म्हणून १९९७ मध्ये पिपावाव शिपयार्ड म्हणून कंपनीची नोंदणी झाली. २००५ मध्ये पिपावाव शिपयार्ड कंपनी एस.के.आय.एल इन्फ्रास्ट्रक्चरपासून वेगळी करण्यात आली. २००९ मध्ये ही कंपनी शेअरबाजारात लिस्ट झाली. ही कंपनी १९९७ पासूनच संरक्षणविषयक कंत्राटे घेत होती. २००९ नंतर भारतातील सगळ्या जहाज बांधणी कंपन्यांचे वाईट दिवस आले. एबीजी शिपयार्ड, भारती शिपयार्डला पनवती लागली तशीच या कंपनीलाही लागली. पुढे २०१५ मध्ये पहिल्यांदा या कंपनीचे १७.६६% शेअर्स आणि त्यानंतर आणखी काही टक्के शेअर ओपन ऑफरमधून अनील अंबानी ग्रुपच्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेतले आणि आता रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे या कंपनीचे ३६.५% शेअर्स आले. त्यानंतर २०१६ मध्ये या कंपनीचे नाव रिलायन्स डिफेन्स अ‍ॅन्ड इंजिनिअरींग हे आणि २०१७ मध्ये रिलायन्स नेव्हल अ‍ॅन्ड इंजिनिअरींग हे बदलण्यात आले. जी तथाकथित राफेल कंत्राट झाल्यानंतरची कंपनी होती ती रिलायन्स एरोस्पेस म्हणून याच कंपनीची उपकंपनी होती. अशा कंत्राटांसाठी उपकंपनी स्थापन करणे हे प्रकार सर्रास चालतात. मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ३०० पेक्षा जास्त उपकंपन्या आहेत तर टाटा मोटर्सच्या १०० पेक्षा जास्त उपकंपन्या आहेत. तेव्हा अचानक स्थापन झालेल्या कंपनीला ३० हजार कोटींचे कंत्राट मिळाले या आरोपात कितपत तथ्य आहे हे वाचकांनी ठरवावे. दुसरे म्हणजे फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलँड यांनी आपल्याला सांगितले की मोदींनी अनील अंबानींच्या कंपनीला कंत्राट द्यायचा दबाव त्यांच्यावर आणला होता हा राहुल गांधींचा दावा म्हणजे माकडचाळ्यांच्या मालिकेतील आणखी एक भाग होता. स्वतः ओलँड यांनी असे काही सांगितल्याचे खंडन केले तरी मोदींनी अनील अंबानींच्या खिशात ३० हजार कोटी रूपये टाकले हा आरोप चालूच राहिला. असो.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/17/2021 - 17:29 नवीन
फ्रान्सकडून पूर्ण तयार फुल्ली लोडेड ३६ राफाल विमाने मिळणार आहेत. ज्या ७२ कंपन्यांना एकूण ३०,००० कोटी रूपयांची ऑफसेट कंत्राटे (म्हणजे भारत खरेदी करीत असलेल्या विमानखरेदीच्या निम्म्या किंमतीच्या वस्तू भारत फ्रान्सला विकणार) मिळाली आहेत, त्या कंपन्या ३०,००० कोटी रूपये किंमतीच्या वस्तू फ्रान्सला निर्यात करणार ज्यात तयार कपडे, दागिने, औषधे असे काहीही असू शकते. परंतु राहुल व कॉंग्रेसींनी असे पसरविले की विमान बनविण्याचा शून्य अनुभव असलेल्या अनिल अंबानीच्या कंपनीला राफाल भारतात बनविण्याचे कंत्राट मोदींनी मिळवून देऊन ३०,००० कोटी रूपये अनिल अंबानीच्या खिशात घातले. वास्तविक पाहता अनिल अंबानीला ३०,००० कोटींपैकी फक्त ८०० कोटींचे कंत्राट मिळाले आहे व ते काही वस्तू फ्रान्सला निर्यात करण्यासाठी आहे. सुदैवाने बहुसंख्य भारतीय जनता राहुलला गांभिर्याने घूत नाही.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Wed, 02/17/2021 - 17:47 नवीन
सामान्य माणसे भले करण्याचे निर्णय घेत नाहीत... बियर बार आणि हाॅटेल्स उघडली, ह्यातच यांचा रस समजतो. आरेची वृक्षतोड थांबवून, इतर ठिकाणी वृक्षतोड झालीच की, कर नाही तर डर कशाला? असे म्हणतात आणि CBI चौकशीला विरोध करतात ..... ही वस्तुस्थिति, अडाणी माणसांना समजते, पण शिकलेल्या माणसांना समजत नाही ....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/17/2021 - 18:39 नवीन
मुवि, अडाणी माणसांना समजते, पण शिकलेल्या माणसांना समजत नाही .... मुवि, तुमच्या सारख्या समजदार माणसाला सारखे, दुसर्यांना मूर्ख, कमी लेखू नका असे सांगणे योग्य वाटत नाही.. Reapect others.. हि सोशल मीडिया वरची साधी गोष्ट आहे.. तुम्हाला वाटते काँग्रेस चांगले निर्णय घेत नाहीत, इतरांना वाटते मोदी नाही घेत.. असो पण म्हणुन दुसरे ते मूर्ख न समजदार असे प्रत्येक वेळेस का? नक्कीच हि अपेक्षा नव्हती.. असो.. वयक्तिक राग नसावा
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/17/2021 - 18:40 नवीन
Respect* others असे वाचावे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 02/18/2021 - 04:01 नवीन
कारण, तो प्रतिसाद तुम्हाला नाहीच आहे ....
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/17/2021 - 18:32 नवीन
श्री गुरुजी आणि चंद्र सूर्य कुमार.. Ok धन्यवाद.. मी आता बऱ्याच लिंक्स शोधत होतो पण मिळाल्या नाहीत याच्या. सो तुम्ही म्हणता तसे मानु.. हरकत नाही.. माझा मुद्दा मात्र हा होता.. सरसकट खाजगी करण केले तर..त्याचे असंख्य कंगोरे आहेत.. त्यामुळे कंत्राटीपद्धत चे रोजगार, पुंजीवाद वाढणे.. निसर्ग-देश संपत्ती काही कारणासाठी भांडवल दारांच्या हातात जाणे असे असंख्य इतर परिणाम होतात.. अंबानी चे नाव घेतल्याने तुम्ही लिहिले धन्यवाद, राहुल गांधी ला कोणी माणू नये मानावे हे वेगळे पण राफेल च्या प्रश्नावर संसदेत सीतारामन यांनी जे उत्तरे दिली ती ही तुमच्या एव्हडी नीट नव्हती.. त्यात हे प्रश्न सोडून वेगळेच बोलणे होते... असो जर hal बद्दल लिहिले, मग हसदेव अरण्य चे काय, त्याचे मी स्वतः डिटेल्स तेंव्हा लिहिलेले होते... आता तेही सापडणार नाहीत.. रेल्वे हि gov ची पण इंधन मात्र RIL चे.. काही असो किती तरी OIL लागते RAILWAY ला.. मग सरकारी OIL कंपनी कडून का नाही हा प्रश्न मला पडतो.. मग ते मोदी असो वा काँग्रेस मला फरक नाही पडत.. असो.. माझे आधीचे उत्तर हे खाजगी करण या विषयावर होते, काही उदा. नसेल पटत पण त्यांचा अर्थ हा कि असे तोटे भविष्यात हि संभावू शकतात..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 02/17/2021 - 18:40 नवीन
खाजगीकरण सरसकट १०० टक्के फायदेशीर असते असे मी मानत नाही. परंतु खाजगीकरणाचे फायदे तोट्यांच्या तुलनेत जास्त आहेत. एका उत्पादनासाठी/सेवेसाठी अनेक खाजगी कंपन्या असल्यास ग्राहकांचा अनेकदा फायदाच होतो. काही वेळा एकाधिकारशाहीमुळे त्रासही होतो. आपल्याकडे बरेचसे कायदे, नियम अजूनही संदिग्ध, कालबाह्य, ग्राहकांच्या बाजूने नसल्याने खाजगी असो वा सरकारी, त्रास ग्राहकांनाच होतो.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/17/2021 - 18:54 नवीन
बरोबर. आपण सेवा क्षेत्र या अनुसरण बोलल्यावर बरोबर. पण production, वाहतूक, अर्थ -बँक (म्हणजे finance कंपनी ला बँकेचा दर्जा देणे )या मध्ये जर खाजगी करण झाले तर याचे दुष्परिणाम दीर्घाकालिन असतील... असो थांबतो.. Good night
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 02/17/2021 - 20:05 नवीन
गणेशा, नमस्कार. आपली मागील काही धाग्यांवरची मते वाचतोय. त्यावरून तुमचा काही लपलेला अजेंडा वाटत नाही. त्यामुळेच काही गोष्टी बोलाव्याशा वाटल्यात. चूभूद्याघ्या. - तुम्हाला ज्या शंका येतात आणि तुम्ही मांडता, ते चूक कोण म्हणणार. ते रास्तच आहे. मलाही पडतात प्रश्न. पण त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला माहित नसतील किंवा त्यात काही चूक असू शकेल असे आपल्यास वाटत असले, तर हाती असलेल्या माहितीच्या आधारे एकदम टोकाचे मत बनवणे योग्य नाही असे मला वाटते. आणि अगदी संपूर्ण माहिती आहे असे जरी वाटले, तरी कोणी मांडलेला एखादा प्रामाणिक मुद्दा आपले विचार खंडीत करू शकतो हेही तेवढेच खरे; आपण त्यासाठी तयार राहिले पाहिजे. - मोदींची सर्व मते / पद्धती बरोबरच आहेत आणि त्यात काही चूक असूच शकत नाही असे स्वतः मोदी देखील म्हणणार नाहीत. बाकी कोणत्याही पार्टीचे मेम्बर्स स्वत:च्या / पार्टीच्या फायद्यासाठी काहीही बोलतील त्याकडे तेवढे लक्ष देण्याची गरज नाही. - पार्टी कोणतीही असू देत, जे काही ते बोलतात आणि ज्याबद्दल काहीही बोलत नाहीत, त्यामागील अंतःस्थ हेतू ध्यानात घेण्यासाठी अ‍ॅनालिसिस करणे हेच जास्त योग्य. जसं: ...समजा, चीन सोबत आम्हाला चांगले संबंध ठेवायचे आहेत आणि त्यांनी परस्पर सामंजस्यानं / चर्चेनं गुंता सोडवण्यासाठी पुढे यावं असं सरकार म्हणतं. याचा अंतःस्थ हेतू काय असेल? ते कसे समजणार? ....... यासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घडामोडींवर नजर ठेवावी लागेल. त्यातून कोणाचा काय फायदा हे ध्यानात घ्यावे लागेल. ....... जर चीन लडाख मधून माघार घेतोय तर का घेतोय हे बघावं लागेल. कुठपर्यंत घेतोय तेही बघावं लागेल. ....... आपली आणि त्यांची मुखपत्र काय, कधी आणि किती बोलतात.. अचानक विरुद्ध बोलतात का हेही बघावं लागेल. ....... मागील साधारण २ वर्षात झालेले परराष्ट्र करार, चर्चा, दावे, अ‍ॅक्शन्स सगळं विचारात घ्यावं लागेल. पुढील वर्षभरात काही होणारे करार असतील तर तेही बघावे लागतील. ....... भारत आणि चीनच्या आपपल्या बजेट नुसार पुढील योजना काय असतील याचाही अदमास घ्यायला लागेल. ....... राजकारणात कधीही एकच बाजू असत नाही, कमीत कमी २ आणि जास्तीत जास्त कितीही बाजू असू शकतील हे सतत ध्यानात असू द्यावं लागेल. ....... सध्या कोणत्या महत्त्वाच्या राष्ट्रात काय घडतंय, त्यातून आपल्या आणि चीनच्या आपापल्या हितसंबंधांवर काय परिणाम होतोय तेही ध्यानात घ्यावं लागेल. ह्या आणि अशा अनेक गोष्टींची नीट मांडणी केल्यास एक संगतवार घडामोड दिसून येईल ज्याचे अनेक दूरगामी परिणाम असू शकतील. - कोणताही राष्ट्रनेता हा स्वतः कितीही आव आणला तरीही, [व्हीजन देण्याशिवाय] एकटा काहीही करू शकत नाही. हे अगदी सहज समजण्यासारखं आणि स्वच्छ असतं. मग हा अतिशय चांगला, तो अतिशय खराब असे आरोप का होतात? त्याला सपोर्ट करणार्‍या बातम्या, व्हिडीओ अचानक कशा बाहेर येतात? अंतःस्थ हेतू ही एक फार मोठी अन् महत्त्वाची बाब आहे. तिला कोणत्याही परिस्थितीत नजरेआड होऊ देणे योग्य नाही. नाहीतर नि:ष्पक्ष विचार आपण करूच शकणार नाही. - जर या राजकारण्याच्या अनुषंगानं आपली प्राथमिकता आपण राष्ट्र ठेवली, सतत, तर कोणतीही घडामोड ही राष्ट्रासाठी योग्य किंवा अयोग्य ते आपण ठरवू शकतो. त्यासाठी दुसर्‍याचे मत ऐकणे गरजेचे नाही. पण अर्थात् अशा कोणत्याही घडामोडीचा आधी आपला सखोल अभ्यास होणं महत्त्वाचं. अभ्यास कसा त्याचं उदाहरण वर दिलेलंच आहे. माझ्या मते तुम्ही जेव्हा प्रश्न विचारता, तेव्हा त्याचा दृष्टीकोन हा जिज्ञासा म्हणूनच असावा. तक्रारवजा सूर लागला की आपले प्रश्न बाजूला पडतात आणि वादंगच होतो हा स्वानुभव आहे. :-)
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/18/2021 - 04:32 नवीन
तुम्ही लिहिलेले बरोबर आहे.. धन्यवाद.. अगदी माझे हि हे मत आहे, कोणत्याही सरकारचे मग ते काँग्रेस असो वा मोदी यांचे सर्व निर्णय बरोबर असतात असे नाही.. आणि सर्व निर्णय चूक असतात असे हि नाही... परराष्ट्र नीती मोदींच्या काळात सुधारत आहे हे मी मान्य करत होतो पण काँग्रेस काळात हि ती तितकीच चांगली राहिलेली होती असे माझे मत आहे. परंतु अलीकडच्या काळात मला ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्यावरून आपल्या देशाची प्रतिमा झपाट्याने बदलतेय असे वाटत आहे.. काळ बदलतोय तसे सरकारला काही पावले उचलायला लागतात, त्यावरून त्याचे पडसाद नंतर उमटलेले दिसतीलच...असे दीर्घ कालीन पडसाद असलेल्या गोष्टींवर टोकाचे मत नक्कीच नसावे.. फक्त माझे मत असे आहे कि.. प्रश्न हे पडलेच पाहिजेत, ती तक्रार वाटत असेल वा ज़िज्ञासा, पण ते प्रश्न आपण निवडून दिलेल्या नेत्यावर, पार्टीवर पण पडले पाहिजे.. आजकाल असे होताना दिसत नाही.. पार्टी, नेते पाहून मतं बदलतात, किंवा बदलली जातात... दुर्दैवाने काँग्रेस काळात मी सोशल मीडियावर कमी होतो, पण काँग्रेस च्या अनेक गोष्टींवर पण नाराजी होतीच..माझ्या सारखे बरेच असतील अशी तक्रार असणारे, त्यात महत्वाचे खास करून भ्रष्टाचार, महागाई, देशाची परिस्थिती, कर्जे याबाबत प्रखर मते होती. जर तेथे तक्रार नसती तर सत्तापालट झालीच नसती... मला चांगले आठवते, ज्यांना मत दिली त्यांच्या चुकीच्या कामाला हि तितक्याच जोरकस पणे ताशेरे ओढलेले होते... आरे वरून, वृक्ष तोड दुसरी कडे होते त्यावर का गप्प हा प्रश्नच चुकीचा आहे.. कारण लवासा झाले त्यावेळेस तेथे करण्यात आलेले आदिवासी लोकांचे विस्थापन हि मला मान्य नव्हते, त्याचे तितकाच कडक विरोधी मत माझे होते भले मी राष्ट्रवादी ला वोट दिले होते. आणि आरे वेळेस हि तितकाच विरोध होता.. हसदेव बद्दल हि तितकाच.. अशी असंख्य उदाहरणे आहेत.. मग तेथे फडणवीस किंवा उद्धव किंवा पवार यापैकी कोणीही असते माझे प्रश्न त्या नुसार का बदलली पाहिजेत? ती तीतकीच प्रखर आणि तक्रारी चीच राहतील. आणि याचे पडसाद येणार्या निवडणुकीना पडतात म्हणजे पडतात. पण २०१४ नंतर सोशल मीडिया.. Itcell यांचे प्रमाण वाढले.. आपण कसा विचार करावा यानुसार त्यात मते पसरवू जावू लागली आहेत, हे उलटे मला brain wash करण्या सारखे वाटते... म्हणजे प्रत्येक गोष्टीं मध्ये सरकार ने काही तरी योजून हे केले हेच बिंबवले जातेय.. पण जे चूक ते चूक तेथे मोदी असो वा पवार वा काँग्रेस आपले मत का बदलेले पाहिजे? बाकी माझ्यासाठी लिहिलेल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद राघव जी.. तुमची जवळ जवळ सगळी मते पटत आहेत..
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा गुरुवार, 02/18/2021 - 05:06 नवीन
बाकी कशावर बोलत नाही, फक्त या एका मुद्द्यावर बोलतो - >>>>परंतु अलीकडच्या काळात मला ज्या पद्धतीने राजकारण चालू आहे त्यावरून आपल्या देशाची प्रतिमा झपाट्याने बदलतेय असे वाटत आहे.. हे तुमचे मत नेमके कशाच्या आधारावर बनलेले आहे? मीडिया, सोशल मीडिया की घडामोडी? मला राघव यांच्याइतके कळत नाही, मला फक्त इतकेच कळते, जगात सत्ता सर्वश्रेष्ठ आहे, मग ती आर्थिक असेल, धार्मिक असेल किंवा राजकीय असेल. सर्वासामान्यपणे सगळ्या गोष्टीत दोन्ही बाजू प्रोपौगंडा चालवत असतात, त्यातही ज्याच्या खिशात विचारजंत जास्त, त्याचा प्रोपौगंडा मोठा, काही वेळा दुसरी बाजू झाकोळून टाकण्याची ऐपत असलेला. पण दुसरी बाजू असतेच. कोणतीही बाजू बघण्यापेक्षा प्रत्येक गोष्टीला अनेक कंगोरे असतात इतके लक्ष्यात ठेवले तरी खूप झाले. दुसरी गोष्ट - जगात फुकट काही मिळत नाही, अगदी समाधान सुद्धा. प्रत्येक गोष्टीची किंमत असते, आणि ती आपण चुकवावी लागते. तुम्ही मोदींच्या एखाद्या गोष्टीमुळे देशाची बदनामी झाली असे म्हणालात तर मी ममोंच्या 10 गोष्टी दाखवून देईन. उदा , ममो अमेरिकेत असताना कसा राहुलने त्यांचा अध्यादेश फाडला होता वगैरे.. फक्त आपली मेमरी कमी असते, आणि आपल्याला लांबचे आठवत नाही, आणि म्हणूनच लोकशाहीत राज्यकर्ते अनंतकाळ राज्य करू शकत नाहीत. हे पेट्रोल चे उदाहरण घ्या, 5 वर्षात पेट्रोल चे भाव वाढले नाहीत , पण जनरल महागाई वाढली आहे, दरडोई उत्पन्न पण वाढले आहे, अश्या प्राइस्थितीत सरकारने दरडोई उत्पन्न आणि पेट्रोलच्या दराचे काही गणित मांडलेले असणार आहे, आपल्याला किती कर मिळाला पाहिजे वगैरे, त्या मर्यादेपर्यंत सरकार दार वाढू देणार, आणि मग कर कपात करणार. जग ग्रे आहे, ब्लॅक अँड व्हाइट वाला चष्मा काढलात की तुम्हाला सगळे खरे स्पष्ट दिसायला लागेल.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा गुरुवार, 02/18/2021 - 05:25 नवीन
नमस्कार आनंदा, मत संध्याकाळी लिहितो.. पण कृपया हा प्रतिसाद पुन्हा शेवटी टाकल्यास बरे होईल, वाचताना मोबाईल वर जमत नाहीये... Have a nice day ahead..
  • Log in or register to post comments
ब
बाप्पू Wed, 02/17/2021 - 17:44 नवीन
सरकारी कर्मचारी निष्ठावंत/ प्रामाणिक नसतात. जॉब जाण्याचे भाय नसल्याने कोणतीही प्रॉडक्टिव्हिटी नाही. काम न करता देखील सरसकट अप्रेजल मिळत असल्याने कोणतीही अंतर्गत स्पर्धा नाही. सेवा वापरणारे सामान्य लोकं असल्याने कोणतीही आदरपूर्वक वागणूक नाही. सरकारी सिस्टीम असल्याने लोकं त्यांना मिळालेल्या वस्तु, सेवा आपल्या बापाचा माल असल्यासारखे वापरतात. सरकारी हस्तक्षेप असल्याने मतांच्या राजकारणासाठी काही सेवा फुकट / सवलतीत दिल्या जातात त्यामुळे विनाकारण सरकारी बोजा वाढून सामान्य टॅक्स पेयर चा पैसा फुकट जातो. लोकांमध्ये फुकटचंबू पणा वाढतो. राजकारणी, VIP यांचा अनावश्यक हस्तक्षेप. एस्केलेशन मॅट्रिक्स/प्रोसेस काम करत नाही. या आणि अश्या असंख्य कारणामुळे सरकारी कार्यालयात /सेवा घेण्यास मला रस नाही. शक्य तितके टाळतो. त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे तिथे खाजगीकरण करावे. अर्थातच सरसकट खाजगीकरणाला विरोध आहे. पण सेवा क्षेत्रात खाजगीकरण होणे आवश्यक आहे.
  • Log in or register to post comments
ग
गणेशा Wed, 02/17/2021 - 18:50 नवीन
तरीही करोना काळात, या सरकारी नर्स, डॉक्टर आणि असंख्य लोकांना आपण योद्धा म्हणालोय.. त्यांच्यावर फुले वाहिलीत, टाळ्या वाजवल्यात.. Private doc आणि कर्मचाऱ्यांवर नाराजी नाहीये माझी, पण कर्तव्य मात्र दोन्ही हि बजावत होते... सरकारी लोक काम नसेल करत, प्रामाणिक नसतील तर त्यांवर गुन्हा दाखल केला जावू शकतो.. कि ते प्रामाणिक नाही मग कंपणीच विका हे उत्तर आहे काय? आणि सरकारी लोक प्रामाणिक नसतात हे विधानच किती अन्याय कारक आहे.. असो.. उद्या या खाजगी करणात सरसकट कंत्राटी पद्धत रूढ झाल्यावर याचे परिणाम दिसू शकतील..
  • Log in or register to post comments
ब
बेकार तरुण गुरुवार, 02/18/2021 - 07:59 नवीन
गणेशा... खाजगीकरणावर खूप काही लिहिता येईल दोन्ही बाजुने... गेले अनेक वर्ष खाजगीकरणाचे मनसुबे रचले जात आहे पी एस यु जायंट्स विकण्यासाठी.... लिहितो वेळ मिळाला की सविस्तर...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 17 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 17 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 17 hours ago
  • सुंदर !!
    1 day 18 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा