Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

घडामोडी डिसेंबर २०२०

ख
खेडूत
Tue, 12/01/2020 - 05:54
🗣 210 प्रतिसाद
डिसेंबर २०२० सुरू झाल्याने नवा धागा काढला आहे. या महिन्यात रंजक घडामोडी अपेक्षित आहेत. कॉरोना लस जगाला कुठं घेऊन जाते, बायदन कसे सुरुवात करतात, पाक चीनची भूमिका, आणि इकडे योगी आदित्य नाथ बॉलिवूड मधल्या गुंतवणुकीला किती प्रमाणात आकर्षित करतात, भारत उरलेल्या क्रिकेट मालिकेत जरा सन्मान मिळेल असे खेळतो का, विधान परिषद नियुक्त्या, शिक्षक मतदारसंघ निवडणूका, शेतकरी आंदोलन आणि आरक्षण. कित्येक मुद्दे चर्चेत असतीलच. मग मिपाकर मागे कसे राहतील? मात्र चर्चा करताना त्रयस्थपणे, वैयक्तिक हल्ले ना करता केली जावी अशी किमान अपेक्षा आपल्या सगळ्यांची असते. तर चर्चा सुरू राहिलीच पाहिजे....!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 64759 views

🗣 चर्चा (210)
ग
गामा पैलवान Sat, 12/26/2020 - 22:11 नवीन
Rajesh188, १.
आणि भारतात परत कधीच बहु मतातील सरकार बिलकुल नको.
का बरं नको? १९८९ नंतर २५ एक वर्षं आघाडी सरकारंच होती. शेतकऱ्यांसाठी काय एव्हढे दिवे लावले त्यांनी? २.
उद्योग पती बहु matatil ल सरकारं ला बैल बनवून त्यांना हवे तसेच काम करवून घेतात
आज निदान बैलाचा मोबदला तरी मिळतोय. म्हणजेच आघाडी सरकारला हेच उद्योगपती बैलाइतकाही मोबदला देणार नाहीत. नुसतं फुकट राबवून घेतील. कारण की आघाडी सरकार जात्याच अस्थिर असल्याने तग धरण्यासाठी थैलीशहांवर अवलंबून असेल. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments
क
कळस Mon, 12/28/2020 - 09:38 नवीन
सध्या ज्या प्रकारे केंद्रातील सरकार मनमानी करत आहे, त्यावरून येथून पुढे एवढे बहुमत कोणत्याच पक्षाला नको, हेच अधोरेखित होत आहे.. केंद्रीय सरकार उघडपणे सूड बुद्धीने वागत आहे, असे खरेच दिसते आहे १.राज्यपाल पदाचा सर्वाधिक राजकीय वापर, बिगर भाजप सरकार असलेल्या राज्यात दुसरे सत्ताकेंद्र बनवण्याचा प्रयत्न..राज्यपाल सरळसरळ BJP चे असल्यासारखे वागत आहेत 2. BJP विरोधात जाणाऱ्यांच्या मागे ed, cid लावणे.. त्यांच्यावर निर्लज्जपणे राष्ट्र द्रोही असल्याचे आरोप करणे 3.कंगना, अर्णब यांच्या सारख्यांच्या मागे आपल्या राजकीय फायद्यासाठी आपली पूर्ण यंत्रणा उभी करणे, यातून सरकार काय संदेश देऊ इच्छितो ? 4.महाराष्ट्रातील BJP नेत्यांना तर जणू काही प्रत्येक ठिकाणी विरोधासाठी विरोध करा, तुटून पडा असा जणू वरून आदेश आलाय..काय बरोबर काय चूक ह्याचेही त्यांना भान उरले नाही हे मंदिर उघडणे, कंगना /अर्णब प्रकारात प्रामुख्याने जाणवले.. 5.सर्वात धोकादायक बाब म्हणजे आज धर्मावरुन लोकांच्या भावना प्रचंड भडकावण्यात आल्या आहेत..अशा मुळे लोकांची सारासार विवेक बुद्धी चालणे बंद होते..आजची धार्मिक विभागणी उद्या जाती जातीत सुध्दा फूट पाडणार हे नक्की..आपण 20 व्या शतकात खरे तर जाती धर्माच्या बाहेर यायला हवे, येथे आपण दुर्दैवाने मागे चाललो आहोत.. 6.शेतकरी आंदोलन बरोबर की चूक हे आता उठसुठ कोणीही बाह्या सरसावून सांगतोय..याचाच अर्थ राजकीय पक्षांच्या विशिष्ट विचारधारेला आपण बळी पडलोय..कोणत्याही आंदोलनात काही बरोबर, काही चूक असू शकते हे समजण्याची पात्रता आपण हरवून बसलोय.. 7.फडणवीस, पवार यांच्याबद्दल social मीडिया मध्ये ज्या प्रकारे विखारी शब्दप्रयोग केला जातोय यावरून लोकांमध्ये आपापसात प्रचंड द्वेष निर्माण झालेला उघड दिसतोय.. एकंदरीत असेच चालू राहिले तर लोकांमधील आपापसातील खुन्नस , द्वेषभावना वाढत जाऊन भविष्यात अगदी टोकाची परिणीती म्हणजे यादवी युद्धसुद्धा होऊ शकते, हे इतर देशातील उदाहरणांवरून आपल्याला माहिती आहे.. कोणी काहीही व्यक्त झाला की लगेच त्याला BJP किंवा काँगेसी आहे असे लेबल लावणे हाही एक उद्वेग आणणारा प्रकार आजकाल चालू आहे..
  • Log in or register to post comments
ख
खेडूत Sun, 12/27/2020 - 16:17 नवीन
या आंदोलक शेतकर्‍यांनी डावे पक्ष, खलिस्तानी, शाहीन बागी आणि राजकारणी बाहेर ठेवले असते, तर काहीशी सहानुभूती खरोखर वाटली असती लोकांना. कॅनडाचा निषेध जोरदार व्हायला हवा होता. सर्व देशभर आंदोलन पसरले नाही, यातच सगळे आले. माझ्या रोजच्या परिचयातील सहासात शेतकर्‍यांचा या कायद्याला विरोध नाही. मी हौशी शेतकरी आहे म्हणून माझं मत महत्वाचं नाही समजा, पण गावातले बालपणीचे बहुतेक सगळे वर्गमित्र शेतकरी आहेत, त्यांना फरक पडला नाहीय. तर ते असो. अजून नहिन्याभरात हे प्रकरण संपेल अशी आशा आहे. रजनी अण्णा आजारी पडले होते, आजच डिस्चार्ज मिळालाय. त्यामुळे त्यांचा पक्ष सध्या एक जानेवारीला निघेल असे वाटत नाही. तिथल्या निवडणुकीस कमी वेळ उरल्याने कुणाला तरी पाठिंबा देतात की काय करतात बघू.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 12/28/2020 - 04:47 नवीन
>>>>आंदोलक शेतकर्‍यांनी डावे पक्ष, खलिस्तानी, शाहीन बागी आणि राजकारणी बाहेर ठेवले असते, तर काहीशी सहानुभूती खरोखर वाटली असती लोकांना. अहो, ते चीन आणि पाकिस्तानचा सुद्धा सपोर्ट असल्यामुळेही लोकांची सहानुभूती मिळत नै ये. आमच्या भक्तांच्या सूत्रानुसार बांग्लादेश आणि नेपाळचा या आंदोलनात हात असावा. =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सॅगी Mon, 12/28/2020 - 07:04 नवीन
या आंदोलक शेतकर्‍यांनी डावे पक्ष, खलिस्तानी, शाहीन बागी आणि राजकारणी बाहेर ठेवले असते, तर काहीशी सहानुभूती खरोखर वाटली असती लोकांना.
हे सर्व बाहेर ठेवले असते तर आंदोलन झालेच नसते, असे आमच्या चमच्यांच्या सुत्रांकडुन कळते :)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Sun, 12/27/2020 - 17:00 नवीन
सरकार वर विश्वास नाही हे 1 कारण विरोध होण्या पाठी मागे आहे. विश्वास नाही कारण अनुभव नी आलेलं शहाणपण . 1) corona काळात कर्ज वसुली करणार नाही आणि व्याज लावणार नाही - सरकार सर्रास कर्ज वसुली चालू आहे ,ओला प्रवासात प्रतेक ड्रायव्हर हेच सांगत असतो. 2) कोणाच्या नोकऱ्या जाणार नाहीत ,कामगार ना काढता येणार नाही,घरी बसून पगार दिला जाईल - सरकार. सर्रास लोकांच्या नोकऱ्या गेल्या,लोकांचे पगार कमी झाले,घरी बसून पगार दिला गेला नाही. 3) शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करू - सरकार. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट झालेच नाही. 4), महागाई कमी करू - सरकार. पेट्रोल च दर 90 दी पार गेला. 5), नोट बंदी मुळे काळा पैसा बाहेर येईल - सरकार. बातमी अगोदर च उद्योगपती कडे होती.सर्व जुन्या नोटा उद्योग पती नी नोट बंदी अगोदर च बदलून घेतल्या किंवा बँकांनी घरपोच उद्योग पती ना नवीन नोटा पोचल्या मोठ्या नोटा भ्रष्टाचार वाढवतात - सरकार 1000 ची नोट बंद करून 2000 हजाराची नोट चलनात आणली. ह्या असल्या सरकार वर लोकांनी विश्वास का ठेवावा.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 12/29/2020 - 05:04 नवीन
शेतक-यांशी उद्या चर्चा. सरकारचं निमंत्रण. नव्या कृषी कायद्यांसह अन्य मुद्यांवर चर्चा करण्याच्या शेतकरी संघटनांच्या प्रस्तावाला प्रतिसाद देत, केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांना उद्या दुपारी दोन वाजता बैठकीला बोलावले आहे. मात्र पंतप्रधानांवर दबावतंत्रांचा परिणाम होणार नाही, असे कृषीमंत्री म्हणाले. दुसरीकडे, बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याची रणनीती शेतकरी संघटनांनी आखली आहे. शेतक-यांच्या थाळी वादनाच्या आंदोलनानंतर ३० डिसेंबरला ट्रॅक्टर मोर्चा निघणार आहे असे वृत्तपत्रीय बातम्यांमधून दिसते. एकंदरी उद्या तोडघा निघून आंदोलन संपावे असे वाटते. शेतक-यांचे अधिक हाल होऊ नये असे वाटते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Tue, 12/29/2020 - 07:51 नवीन
हे 'तथाकथित' शेतकरी पंजाबमधे रिलायंसच्या जियो चे टॉवर का बरे तोडत आहेत ? कृषी कायद्याचा व जियोच्या टॉवर्सचा नक्की संबध काय आहे ? की किसान मोर्च्यात जे कम्युनिस्ट घुसलेत ते चीनच्या आदेशावरुन, रिलायंस पुढील वर्षी जियो ५जी सेवा देशात पुरवणार आहे, ती बंद पडावी म्हणून टॉवरची मोडतोड करत आहेत.
  • Log in or register to post comments
ड
डॅनी ओशन Tue, 12/29/2020 - 10:24 नवीन
"हे 'तथाकथित' शेतकरी पंजाबमधे" या शब्दसंग्रहांच्या 'तथाकथित' या शब्दावर स्वतःला डॅनी ओशन म्हणून घेणाऱ्या प्राण्यास एक शंका आली, ती हा तथाकथित डॅनी, अर्थात मी, मांडतो. शेतकऱ्यांचा सातबार्याचा उतारा अर्थात मी पहिला नाहीये. त्यामुळे, त्यांचे शेतकरी असणे, तथाकथित, अर्थात as told आहे. पण प्रसाद-१९८2 यांचा जन्मदाखला सुद्धा तथाकथित डॅनीने पहिला नाहीये. १९८२ला फिलर समजून बाजूला ठेऊ. प्रसाद चे काय ? तथाकथित प्रसाद_१९८२ यांनी हलक्यात घ्यावे हि ईनंती. -(स्वयंघोषित) डॅनी ओशन.
  • Log in or register to post comments
ग
गोंधळी Wed, 12/30/2020 - 08:20 नवीन
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 19 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 19 hours ago
  • सुंदर !!
    1 day 20 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 20 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा