घडामोडी डिसेंबर २०२०
डिसेंबर २०२० सुरू झाल्याने नवा धागा काढला आहे.
या महिन्यात रंजक घडामोडी अपेक्षित आहेत.
कॉरोना लस जगाला कुठं घेऊन जाते, बायदन कसे सुरुवात करतात, पाक चीनची भूमिका, आणि इकडे योगी आदित्य नाथ बॉलिवूड मधल्या गुंतवणुकीला किती प्रमाणात आकर्षित करतात, भारत उरलेल्या क्रिकेट मालिकेत जरा सन्मान मिळेल असे खेळतो का, विधान परिषद नियुक्त्या, शिक्षक मतदारसंघ निवडणूका, शेतकरी आंदोलन आणि आरक्षण. कित्येक मुद्दे चर्चेत असतीलच. मग मिपाकर मागे कसे राहतील?
मात्र चर्चा करताना त्रयस्थपणे, वैयक्तिक हल्ले ना करता केली जावी अशी किमान अपेक्षा आपल्या सगळ्यांची असते.
तर चर्चा सुरू राहिलीच पाहिजे....!
देशात जी आंदोलने चालू आहेत , प्रश्न आहेत ते सोडवावे.-- मोदी-शहाना शेतकरी आंदोलन कसे हाताळायचे याचे अजिबात ज्ञान नाही. काय तर म्हणे शेतकर्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवू. याशिवाय या दोघांनी पोलीसांना बळाचा वापर करायचा नाही असा देखील आदेश दिलाय. हॅट याला आंदोलन हाताळणे म्हणतात ? खरे तर शेतकरी आंदोलन कसे हाताळायचे याचे ज्ञान, मोदी-शहांनी शरद पवारांकडून शिकायला पाहीजे, मावळ मधे कसे हाताळले होते शेतकरी आंदोलन, पोलीसांमार्फत डायरेक्ट गोळीबार करुन, शेतकर्यांना थेट ढगात पाठवून शरद पवारांनी त्यांच्याबरोबर न्याय केला होता. याला म्हणतात किसान आंदोलन हाताळणेदर्शनाचा आणि नौटंकीचा अर्थ शोधायचा झाल्यास मोदीसेठ एका थंडीच्या सकाळी उठून दिल्लीच्या गुरुद्वारेत दर्शनाला का गेलेत ? ते दर महिन्याला नियमित जातात का ? दर डिसेंबरात जातात का ?-- यालाच अंधद्वेश म्हणतात. प्रतिसाद लिहियाच्या आधी निदान माहिती तरी घ्यायची की पंतप्रधान मोदींनी नेमके त्याच दिवशी रकाबगंज गुरुद्वार्याला भेट का दिली होती ती. कारण त्या दिवशी गुरु तेगबहादूर यांचा शहिद दिन होता. आणि तुमच्या माहितीसाठी त्यांनी गेल्या डिसेंबर मधे देखील इथे जाऊन दर्शन घेतले होते.