घडामोडी डिसेंबर २०२०
डिसेंबर २०२० सुरू झाल्याने नवा धागा काढला आहे.
या महिन्यात रंजक घडामोडी अपेक्षित आहेत.
कॉरोना लस जगाला कुठं घेऊन जाते, बायदन कसे सुरुवात करतात, पाक चीनची भूमिका, आणि इकडे योगी आदित्य नाथ बॉलिवूड मधल्या गुंतवणुकीला किती प्रमाणात आकर्षित करतात, भारत उरलेल्या क्रिकेट मालिकेत जरा सन्मान मिळेल असे खेळतो का, विधान परिषद नियुक्त्या, शिक्षक मतदारसंघ निवडणूका, शेतकरी आंदोलन आणि आरक्षण. कित्येक मुद्दे चर्चेत असतीलच. मग मिपाकर मागे कसे राहतील?
मात्र चर्चा करताना त्रयस्थपणे, वैयक्तिक हल्ले ना करता केली जावी अशी किमान अपेक्षा आपल्या सगळ्यांची असते.
तर चर्चा सुरू राहिलीच पाहिजे....!
🗣 चर्चा
(210)
म
महेंद्रसिंग साथी
गुरुवार, 12/03/2020 - 08:45
नवीन
म्हणूनच शेतमाल देशात कोणालाही कुठेही विकायची सोय उपलब्ध केली आहे म्हणजे नेहेमीचे दलाल सोडून इतर लोकही या व्यापारात येतील आणि कॉम्पिटिशन येईल. म्हणजे कार्टेल करायला कोणालाही वाव कमी होईल.
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 12/03/2020 - 12:46
नवीन
तुम्हाला जळजळ का होतेय? शेतकऱ्यांना झाला तर फायदाच होईल. ? तुम्ही किंवा तुमच्या जवळचे कोणीतरी APMC मध्ये दलाल किंवा अडते असणार बहुतेक.
यामध्ये प्रॉब्लेम काय? राज्यांतर्गत नव्हे तर शेतकऱ्याला त्याचा शेतीमाल कुठेही अगदी जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जाऊन विकण्याची मुभा मिळायला हवी. APMC ची मोनोपॉली संपतेय तर चांगलेच आहे कि.
.
काय प्रॉब्लेम आहे.? सर्वजण ( व्यावसायिक ) माल साठवून बाजारभावाच्या परिस्थितीनुसार तो विक्रीस काढतात.
शेतकऱ्याने जर साठवणूक केली तर फायदाच आहे. तुम्हाला का मळमळ होतेय?
.
प्रॉब्लेम काय?? शेतकरी म्हणजे उल्लू आहे का कि कोणीही कसेही कॉन्ट्रॅक्ट sign करून घेईल आणि लुबाडेल. ? शेतकऱ्यांनी स्वतःचे हिताचे काही पॉईंट्स लिहावेत कॉन्ट्रॅक्ट करताना.
आणि सर्वच शेतकर्यानी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शेती करावी असे थोडीच म्हणतेय सरकार. ज्याला जमेल त्याने करावे. ज्यांना नाही जमणार त्यांनी पारंपरिक पद्धतीने करावी शेती
अत्यंत योग्य निर्णय. उठसुठ निर्यात बंदी आणि बंधने टाकून शेतीव्यवसायावर अन्याय होत होता..
राजेश भाऊ तुम्ही नेमके नवीन कायद्याच्या बाजूने बोलताय कि विरोधात तेच समजेना.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 07:51
नवीन
Msp hi उत्पादन खर्चावर अवलंबून असते.
खूप सारा नफा मिळवा म्हणून msp हवी अशी शेतकऱ्यांची मागणी नाही आणि पहिली पण कधी नव्हती.
पण उत्पादन खर्च 10 रुपये येत असेल तर 14 रुपये तरी msp असावी अशी किरकोळ इच्छा आहे शेतकऱ्यांची.
Msp ही उत्पादन खर्चावर वर आधारित ध्या अशी मागणी करणे चुकीचे आहे असे मला तरी वाटत नाही.
पण सरकार ही दीन वाक्य पण कायद्यात टाकायला तयार नाही.
ह्याचा अर्थ काय.
उत्पादन खर्च पेक्षा कमी खरेदी किँमत शेतकऱ्यांना देवून एक दिवस शेतकरी शेती विकण्यास मजबूर होतील किंवा शेती च विकतील आणि ती शेतजमीन हे लाडके उद्योगपती विकत घेतील .
शेतीच हातात राहणार नाही ही भीती msp न देण्या मुळे निर्माण होवू शकते .
हे समजून पण न समजण्या सारखे सरकार वागत आहे
सरकार च नियत ठीक नाही.
- Log in or register to post comments
म
महेंद्रसिंग साथी
गुरुवार, 12/03/2020 - 08:41
नवीन
Msp ही उत्पादन खर्चावर आधारीत असते की नसते? एकाच प्रतिसादात तुम्ही दोन्ही परस्परविरोधी दावे केले आहेत यावरून एकतर तुम्ही अतिशय गोंधळलेले आहात किंवा अत्यंत खोडसाळ आहात यापैकी एकच शक्यता असू शकते.
बरं तुम्ही पुढे हे पण म्हणत आहात-
पूर्वी एम.एस.पी उत्पादनखर्चावर होती आणि आताच्या सरकारने तो प्रकार बंद केला असे आहे का? बरं २०१८ च्या अर्थसंकल्पात गव्हासाठीची एम.एस.पी उत्पादनखर्चाच्या ५०% जास्त ठेवायची तरतूद होती. https://economictimes.indiatimes.com/news/economy/policy/fm-reveals-formula-for-fixing-msp-50-over-production-cost/articleshow/62855155.cms त्याविषयी काय?
म्हणजे उत्पादनखर्च १० असेल तर सरकार एम.एस.पी १४ नाही तर १५ द्यायला तयार आहे. इतकेच नव्हे तर १७-१८ किंमत देणारी कोणती कंपनी येत असेल तर त्या कंपनीला प्रवेश द्यायला तयार आहे मग नक्की आक्षेप काय? उगीच काहीतरी तक्रारी करत बसायच्या.
कॉम्पिटिशन असेल तर दुसरी कंपनी जास्त चांगला दर घेऊन येईलच आणि मग शेतकरी त्या कंपनीला आपला माल विकतील याविषयी काय म्हणणे आहे?
- Log in or register to post comments
व
वगिश
गुरुवार, 12/03/2020 - 08:01
नवीन
मुक्त अर्थव्यवस्थेची फळे काय मॅन्युफॅक्चरिंग, IT वाल्यांनी खायची काय? शेतकर्यांना ही फायदा होऊ द्या? आंदोलने करून मागास ठेवायचे का त्यांना? आधीच शेतकर्यांना सवलती, सुविधा व कर्जमाफीची गाजर दाखवून त्यांना उपरे बनवून ठेवले आहे, नवीन कायद्याने तरी त्यांचा आर्थिक स्तर उंचावेल ही अपेक्षा.
भविष्यात कुणी तुमच्या जमिनी बळावेल म्हणुन कायदाच होऊ द्यायचा नाही हे किती हास्यास्पद आहे याची कल्पना आहे का? आणि आलेच कुणी जमिनी घ्यायला तर तेव्हा करा ना आंदोलने. अपघात होईल म्हणुन कुणी रस्ता वापरायचे सोडते का?
- Log in or register to post comments
स
साहना
Fri, 12/04/2020 - 06:06
नवीन
१००% सहमत !
नाही तर शेतकऱ्याला जी फळे दिली जातात ती IT वाल्याना सुद्धा द्यावी. जितका कोड लिहितील त्याला कमीत कमी हमी भाव द्यावा. म्हणजे १०० लाईन्स लिहिल्या तर १०० रुपये कमीत कमी मग कोड काहीही असो !
- Log in or register to post comments
व
विजुभाऊ
गुरुवार, 12/03/2020 - 08:36
नवीन
वागिश ही समस्या इतकी साधी नाहिय्ये.
शेतकरी जे पिकवतो ते बहुतेकवेळा त्याच्या उगवण्याच्या खर्चापेक्षाही कमी भावात विकतो
बाजारातून भाव मिळाला नाही तर पीक परत आणण्या साठीचे पैसे ही नसतात. शेतीमाल रस्त्यावर फेकून द्यावा लागतो
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
गुरुवार, 12/03/2020 - 10:24
नवीन
मग आता खरेदीदार जास्त असणार आहेत. माल फेकला जाणार नाही.
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 12/03/2020 - 14:22
नवीन
खाजगी कंपन्यांनी शेतीमाल विकत घेताना कमीत कमी एम एस पीच्या दराने विकत घेतलाच पाहिजे अशी तरतूद हवी.
याला काही आधार? का असंच गॅस मारून?
उत्तम दर्जाचा सिहोर गहू आणि किडका पंजाब पीसी गहू सुद्धा एकाच किमान हमी धावतच विकत घ्या अशी सक्ती सरकार खाजगी आस्थापनास कशी करू शकेल?
प्रत्येक बाबतीत बळीराजाचेच कसे बरोबर हे टाहो फोडून सांगणारे पाहिले कि डोक्यात जाते.
उद्या मी १ कोटी चपलांचे उत्पादन केले तर सरकारने ते खरेदी करायलाच पाहिजे हा आग्रह कसा करता येईल?
उद्योगधंद्यात मागणी पेक्षा उत्पादन जास्त झाले तर सरकार उद्योगांना कोणतेही संरक्षण देत नाही. मोटार गाड्या किंवा दुसरे कोणतेही न विकले गेलेले उत्पादन हे उद्योजकाच्या डोक्यावर बसते.
न विकले गेलेले फ्लॅट सरकारने रेडी रेकनर रेटने विकत घ्यावे असे कोणीही का म्हणत नाही? आज अनेक शहरात फ्लॅटचा भाव सरकारच्या रेडी रेकनर रेट पेक्षा कमी आहे.
बांधकाम क्षेत्रात सुद्धा १ कोटीच्या आसपास मजूर आहेत. पण त्यांची व्होट बँक नाही इतकेच काय बहुसंख्य लोकांकडे कोणताही कागद नाही. कायम भटके आयुष्य असल्यामुळे मुलांचे शिक्षण नाही त्यामुळे मूळ प्रवाहात येत नाहीत. त्यांच्या बद्दल कुणी टाहो फोडताना दिसत नाही.
शेती मध्ये अधिक रोजगार निर्मिती होणे शक्य नाही तेंव्हा आता खरं तर सरकारने उद्योगांकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे.
पंजाब मधील शेतकरी हा सर्वात श्रीमंत आहे आणि या पैशाच्या आणि राजकीय जागृतीच्या बळावर ते सरकारला वेठीस धरू पाहत आहेत. इतर राज्यांमध्ये असे आंदोलन का होत नाही?
इथे बहुसंख्य लोकांना शेतकऱ्यांचा कळवळा नसून श्री मोदी आणि भाजपवर आग पाखडण्यासाठी त्यांना कोणीही विरोध करत असेल तर त्याला पाठिंबा इतकाच अजेंडा आहे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 15:26
नवीन
उत्पादन खर्च पेक्षा थोडी जास्त msp द्यावी एवढीच शेतकऱ्यांची माफक इच्छा आहे.
तुम्ही तर एमआरपी विषयी बोलत आहात.
एमआरपी वर आधारित msp दिली तर सोन्या होवून पिवळे होईल
पण एवढी हाव शेतकय्ांना नाही.
शेतकरी हा असा एकमेव घटक आहे त्याला स्वतःच्या मालाची किंमत ठरवता येत नाही ते दुसरे ठरवत असतात.
कारण शेतकरी असंघटित आणि गरीब आहे.
उद्योग हे संघटित असतात आणि ते स्वतःच्या मालाची किंमत ठरवतात
असा एक पण उद्योग जगात नाही तो उत्पादन खर्च पेक्षा कमी किमतीत त्याचे उत्पादन विकतो .
शेती रोजगार निर्मिती करत नाही हे तुमचे वाक्य मोदी जी ना लाल किल्ल्यावरून बोलायला सांगा .
पुढच्या निवडणुकीत bjp पडेलच पण विरोधक च नाहीत तर त्यांच्याच पक्षातील लोक भर चौकात त्यांचे वस्त्र हरण करतील.
अजुन सुद्धा शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या भारतात खूप आहे हे विसरू नका.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 12/03/2020 - 15:32
नवीन
या वाक्याला (स) माजवादी साहित्यास्वतिरिक्त काही संशोधनात्मक आधार आहे का?
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 16:01
नवीन
शेती मालाची खरेदी कशी केली जाते ह्या अभ्यास करा .
कधी बाहेर जावून मार्केट मध्ये बघा,शेतकऱ्यांना विचार.
तुम्हाला माहित पडेल की
एकमेव उत्पादक ज्याला त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही.
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 12/03/2020 - 16:29
नवीन
जोक ऑफ सेंचुरी..
बाकी राजेश भाऊ तेच तेच रडगाणे ऐकून खरंच कंटाळा आलाय हो.
Plz बस करा आता.
सुधारणेसाठी नवीन कायदा आणला तरी रडारड. असे होईल तसे होईल वगैरे वगैरे.. आणि काही केले नाही तरी रडारड.
ढोलकीसारखं दोन्ही बाजूनी बडवत राहायच.
सॉ कॉल्ड शेतकऱ्यांच्या कैंवार्यांना ज्यांनी मिपावर त्यांच्या नावाचे रडगाणे वाजवण्याचा ठेका घेतलाय त्यांना नम्र आणि शेवटची विनंती.
कोणताही इमोशनल ब्लॅकमेल, अपील न करता एक प्रॅक्टिकल वाटणारा आणि शेतकऱ्यांना मदत होईल असा एखादा लेख लिहावा ही विनंती. लेखात सूचना आणि त्यांची फिसिबिलीटी स्पष्ट करावी. उगाच आम्ही जे काही आणि किती ही पिकवू त्याला आमच्या मागणीप्रमाणे हमीभाव दया अश्या भिकारी type मागण्या नकोत.
प्रॅक्टिकल वाटणाऱ्या आणि इम्प्लिमेंट करता येऊ शकणाऱ्या सूचना / आयडियाज दया. बघुयात तुमच्या कडे डोके आहे कि फक्त भिक मागण्यापर्यंतच सीमित आहे तुमचे टॅलेंट.
- Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी
गुरुवार, 12/03/2020 - 18:44
नवीन
कधी बाहेर जावून मार्केट मध्ये बघा,शेतकऱ्यांना विचार. तुम्हाला माहित पडेल की एकमेव उत्पादक ज्याला त्याच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार नाही
मोठ्या शहरातील रिक्षा, टॅक्सी यांच्या भाड्याचे दर सुद्धा सरकार ठरविते. इतरही काही उत्पादने, सेवा सापडतील ज्यांचे दर सरकार ठरविते.
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Fri, 12/04/2020 - 02:30
नवीन
शेतकरी, शहरी, राजकारणी, मोदी, काँग्रेस... हे विषय न संपणारे आहेत.
तथापि, सदर कायद्याच्या निमित्ताने श्रीगुरुजी हे पुन्हा (नॉन-क्रिकेट विषयांवर) लिहिते झालेत ही चांगली फलनिष्पत्ती म्हणावी लागेल.
- Log in or register to post comments
म
महेंद्रसिंग साथी
गुरुवार, 12/03/2020 - 17:27
नवीन
हो ना. बाटा पन्नास हजारात चपला विकू शकते, सॅमसंग दहा लाखाला मोबाईल फोन विकू शकते, रेमंड दोन लाख रूपये मीटर या किंमतीने कापड विकू शकते, टाटा मोटर्स एक कोटीची एक गाडी विकू शकते, कुरियरवाले एका कुरियरसाठी हजार रूपये लावू शकतात... ही यादी संपता संपत नाही बघा. फक्त शेतकर्यांनाच त्यांच्या मालाची किंमत ठरवता येत नाही.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 16:18
नवीन
कॉन्ट्रॅक्ट farming ह्या कायद्या अंतर्गत जे नियम आणि अटी घातल्या आहेत .
त्या नियम आणि अटीचे उलांघन कंपन्यांनी केले तरी त्या विरूद्ध शेतकरी दिवाणी न्यायालय मध्ये न्याय मागू शकत नाही.
संबंधित शेतकरी च नाही तर त्याच्या साठी बाकी कोणी सुधा दिवाणी न्यायालय न्याय मागू शकणार नाहीत असे कलम च त्या कायद्यात आहे.
न्याय मागायचा असेल तर सरकारी अधिकारी असलेल्या संबंधित अधिकर्या कडे.
सरकारी अधिकारी माय बाप सरकार चे गुलाम असतात ते काय न्याय देणार.
ही गोष्ट पण bjp समर्थक लोकांना आक्षेप घेण्या सारखी वाटत नसेल तर.
त्यांना दिलेली अंध भक्त ही पदवी 110 टक्के खरीच आहे.
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
गुरुवार, 12/03/2020 - 16:40
नवीन
कॉन्ट्रॅक्ट farming करण्यासाठी कोणी जोरजबरदस्ती केलीये का शेतकऱ्यांना? नसेल जमत तर करू नये? कॉन्ट्रॅक्ट अमुक तमुक पद्धतीने च असावे अशी काही गाईडलाईन सरकारने आखून दिलीये का? त्यामधले दोन्ही पार्टीज बद्दलचे मुद्दे आणि अधिकार चेंज करता येणारच नाहीत असे काही आहे का??
जर दिवाणी न्यायालयात जर हे खटले वर्ग केले तर तुम्ही आणि आंदोलन कर्ते शेतकरी शांत होणार का??
दिवाणी न्यायालयात तुम्ही एखादि केस लढवली आहे का?
काही अनुभव आहे का,..?? किमान पायरी तरी चढला आहात का? एक केस कंप्लिट व्हायला किती वेळ लागतो याबाबत काही अनुभव आहे का?
त्या ऐवजी एखादा अधिकारी जो डेडीकेटेडली त्याच कामाकरिता नियुक्त केला असेल तर काय बिघडले? न्याय झाल्याशी मतलब.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
गुरुवार, 12/03/2020 - 16:53
नवीन
बाप्पू बाकी मुद्द्यांशी सहमत आहे, पण न्यायालये काम करत नसतील तर त्यांची कार्यकक्षा कमी करणे हा उपाय होऊ शकत नाही..
मे बी, जलदगती निपताऱ्यासाठी आधी एक अधिकारी, आणि मग उच्च न्यायालय वगैरे अशी उतरंड ठरवू शकतात..
पण न्यायालयच नको, असे असेल तर (आहे का ते मला माहीत नाही) चूक आहे असे मला पण वाटते.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 16:55
नवीन
तुम्ही वैयक्तिक पातळीवर प्रश्न विचारात आहात मी सार्वजनिक समस्या मांडत आहे .
तरी तुमच्या माहिती साठी.
दिवाणी न्यायालय 1 नाही 2 नाही तर 20 वर्ष तालुका पातळी पासून राज्य पातळी वरच्या न्यायालयात दिवाणी जमिनी ची केस लढवली आहे माझ्या वडिलांनी आणि ते सर्व माझ्या समोर घडले आहे.
नुकसान दायक असते .
पण दोन्ही पक्षाला .
कंपनी एकच असेल आणि केस लढवणारे हजार असतील तर दिवाणी न्यायालयात केस लढण्याचा आत बट्ट्या चा व्यवहार कोणतीच कंपनी करणार नाही दबाव मध्ये राहील आणि गैर कृत्य करणार नाही.
हे सरकार ला माहीत आहे .
म्हणून तर दिवाणी न्यायालयात शेतकरी जावू शकत नाही अशी अट घातली आहे ना. सरकार नी.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 16:55
नवीन
तुम्ही वैयक्तिक पातळीवर प्रश्न विचारात आहात मी सार्वजनिक समस्या मांडत आहे .
तरी तुमच्या माहिती साठी.
दिवाणी न्यायालय 1 नाही 2 नाही तर 20 वर्ष तालुका पातळी पासून राज्य पातळी वरच्या न्यायालयात दिवाणी जमिनी ची केस लढवली आहे माझ्या वडिलांनी आणि ते सर्व माझ्या समोर घडले आहे.
नुकसान दायक असते .
पण दोन्ही पक्षाला .
कंपनी एकच असेल आणि केस लढवणारे हजार असतील तर दिवाणी न्यायालयात केस लढण्याचा आत बट्ट्या चा व्यवहार कोणतीच कंपनी करणार नाही दबाव मध्ये राहील आणि गैर कृत्य करणार नाही.
हे सरकार ला माहीत आहे .
म्हणून तर दिवाणी न्यायालयात शेतकरी जावू शकत नाही अशी अट घातली आहे ना. सरकार नी.
- Log in or register to post comments
अ
अर्धवटराव
गुरुवार, 12/03/2020 - 22:45
नवीन
बाकि काथ्याकुट राहु द्या.. पण शेतकर्यांना देशोधडीला लावायला म्हणुन सरकारने मुद्दाम हा कायदा आणला आहे असं म्हणताय का? भांडवलदारांच्या दावणीला शेतकर्यांना बांधुन त्यांचे हाल करावे, असा उद्देश आहे या कायद्यामागे? काय फायदा होईल त्यामुळे सरकारचा, किंवा सरकार चालवणार्यांचा ?
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 12/03/2020 - 18:02
नवीन
एक मिपाकर गंगाधर मुटेजी हे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आहेत. त्यांनीही या आंदोलनाचे समर्थन केलेले नाही, हे दुर्दैवी आहे असे म्हणत आहेत हे विशेष. त्यांच्या मते हे सगळं राजकीय आहे, शेतकर्यांसाठी चाललेच नाहीय. ममो सिंग यांचे अर्थिक सल्लागार कायद्याला चंगले म्हणतात. सिब्बल यांनी पूर्वी त्यांची सत्ता असताना याचे समर्थन केले आहे..
आणि:
तिथे आलेले खलिस्तान समर्थक, आंदोलना आडून देशविरोधी मागणी- जसे अधिवेशन बोलावून हा कायदा रद्दच करा म्हणणे, (पुढे हेच ३७० बाबत होईल हे नक्की, म्हणूनच देशविरोधी) चर्चा नकोच म्हणून अडून बसणे, शाहीन बागेतले आंदोलक आहोत हे कबूल करणारे लोक्स, योगेंद्र यादव यांचा सहभाग, कॅनडाचे आंदोलकांना समर्थन, राहुल गांधी यांनी त्यात सूर मिसळणे, या गोष्टींमुळे आंदोलनाला विरोध आहे. शेतकर्यांचे भले व्हावे हीच इच्छा आहे, पण त्यासाठी देश हिताशी तडजोड नकोच. खरा शेतकरी असा नसतो.
(मी स्वतः शेतकरी (सुद्धा) आहे, पन्नास वर्षे सगळं जवळून पहात आहे! पण असो)
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Fri, 12/04/2020 - 04:16
नवीन
समर्थन केले तर दुकान बंद होईल ना..
समस्या च संपत चालल्या तर दुकानाला टाळ लावून दुसरा काहीतरी उद्योग बघावा लागेल म्हणून सहसा अशी लोक कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे लक्ष देत नाहीत. पण कर्जमाफी, अनुदान, हमीभाव, जाळपोळ, शेतमालाची नासाडी, फेकाफेकी, आर्थिक मदत ( भिक ) मागणे इ इ कार्यात सर्वात पुढे नाचत असतात..
- Log in or register to post comments
श
शा वि कु
Fri, 12/04/2020 - 04:37
नवीन
???
"आंदोलनाचे समर्थन केले नाही" , मग दुकान बंद analogy कशी चालते इथं ?
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 12/04/2020 - 06:17
नवीन
बाप्पू गल्ली चुकली :)
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Fri, 12/04/2020 - 09:49
नवीन
अर्रर्रर्र. माफ करा मी वाचताना पटपट वाचलं त्यामुळे कदाचित चुकीचा अर्थ घेतला. My mistake.
गंगाधर मुटे जी माफ करा. थोडा घोळ झाला माझ्या वाचनात.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 12/04/2020 - 13:48
नवीन
तुमचे हे असे हल्ली वारंवार होत आहे.
बघा चिंतन,मंथन करा.
BJP सुध्धा चिंतन, मंधन करणार आहे असं
न्यूज वर बघितले होते.
आणि हो रागाने परत आमचे शिक्षण नका विचारू.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
गुरुवार, 12/03/2020 - 18:11
नवीन
युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर पुरस्कार आज जाहीर झाला. सात कोटींचा हा पुरस्कार सोलापूरच्या परितेवाडी शाळेतले शिक्षक रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला आहे. लंडनमधील नॅचरल हिस्ट्री म्युझियममध्ये झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेते स्टिफन फ्राय यांनी यासंदर्भातली घोषणा केली. असा पुरस्कार मिळवणारे रणजीतसिंह डिसले हे पहिले भारतीय शिक्षक ठरले आहेत.
जगभरातील १४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनामधून अंतिम विजेता म्हणून डिसले यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. QR कोडेड पुस्तकांच्या माध्यमातून महाराष्ट्राचं नव्हेत तर देशातील शिक्षण क्षेत्रात अभिनव क्रांती केलेल्या कामांची दखल घेत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराच्या एकूण रकमेपैकी ५० टक्के रक्कम अंतिम फेरीतील ९ शिक्षकांना देण्याचे रणजीतसिंह डिसले यांनी जाहीर केलं आहे. यामुळे ९ देशांमधल्या हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिलं जाईल. रणजितसिंह डिसले यांना मिळालेली रक्कम टीचर इनोव्हेशन फंडाकरता वापरणार असून त्यामुळे शिक्षकांमधील नवनवीन प्रयोग करण्यास चालना मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे.
अतिशय अभिमानास्पद आहे त्यांचं यश आणि त्याहून मनाचा मोठेपणा, की अन्य नऊ फायनलिस्ट शिक्षकांना रक्कम वाट ण्याचा निर्णय. असले संस्कार देणारे त्यांचे मातापिता धन्य होत. __/|\__

- Log in or register to post comments
R
Rajesh188
गुरुवार, 12/03/2020 - 18:39
नवीन
राज्याला आणि देशाला अभिमान वाटावे असे महान कार्य त्यांच्या कडून घडले आहे.
अभिनंदन.
- Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर
Fri, 12/04/2020 - 04:42
नवीन
अभिमानास्पद!
महाराष्ट्राच्या ह्या सुपुत्राचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा!
🙏
- Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु
Fri, 12/04/2020 - 07:43
नवीन
संबंधित शिक्षकांचे अभिनंदन.
आडनाव डिसले असे नसुन दिसले असे असायला हवे होते. किमान मराठीत तरी.
- Log in or register to post comments
स
साहना
Fri, 12/04/2020 - 20:41
नवीन
QR कोडेड पुस्तक हे नक्की काय प्रकरण आहे ?
- Log in or register to post comments
P
pspotdar
Sat, 12/05/2020 - 13:31
नवीन
पाठ्यपुस्तकात धड्यानंतर एक QR कोड असतो. Smart Mobile वरुन Scan केल्यानंतर mobile browser मध्ये link उघडते (learning video, question paper etc.).
अच्युत गोडबोलेंच सिंफनी हे पुस्तक वाचुन बघा हे सुचवेल.
- Log in or register to post comments
P
pspotdar
Sun, 12/06/2020 - 15:23
नवीन
सिंफनी पाश्चात्य संगीताची सुरीली सफर
- Log in or register to post comments
क
कंजूस
Fri, 12/04/2020 - 01:53
नवीन
शाळेतले आणि 'कोचिंग' क्लासातले. हे एवढे का लागत होते?
धडे लिहून काढूनही शिकता येतं हे मुलांना कळू लागलं करोना लॉकडॉऊनमुळे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 12/04/2020 - 06:54
नवीन
जागतिक शिक्षक पुरस्कार एका भारतीय शिक्षकाला मिळाला त्याच्या कार्याची दखल जागतिक पातळीवर घेतली गेली.
पण भारतात ही बातमी सर्व मुख्य न्यूज चॅनल महत्वाची वाटली नाही.
मी सर्व चॅनेल आज थोडे थोडे बघितले .
कोणत्याच चॅनेल ही बातमी दिली नाही.
भारतीय मीडिया खरोखर वाहवत जात असून त्यांची भूमिका देश होता पेक्षा त्यांच्या टीआरपी साठी योग्य अशाच बातम्या चेच अवडंबर माजवण्याची आहे.
असे खेदाने म्हणावे लागते आहे.
- Log in or register to post comments
ख
खेडूत
Fri, 12/04/2020 - 07:04
नवीन
सहमत..
शिक्षकांना सन्मान नाहीच, पण दुसऱ्यांनी दिला तरी कौतुक करत नाहीत. फक्त राजकारण कुटत बसतात नाहीतर झैराती...
- Log in or register to post comments
म
मराठी_माणूस
Fri, 12/04/2020 - 07:32
नवीन
मी काल ही बातमी एबीपी माझा वर पाहीली.
- Log in or register to post comments
आ
आनन्दा
Fri, 12/04/2020 - 07:33
नवीन
तुमचाच शब्द आहे ना,
चोथा स्तम्भ?
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Fri, 12/04/2020 - 09:47
नवीन
सहमत राजेश जी.
बातमीला जेवढे फूटेज मिळायला हवे होते तेवढे कोणत्याही चॅनेल ने दिले नाही ( मराठी न्युज वगळता )
तैमूर ने दोनदा डायपर बदलले ही न्यूज त्यांच्या मते जास्त महत्वाची असते. दिवसभर चर्हाट वळत बसतील.
- Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर
Fri, 12/04/2020 - 13:30
नवीन
दिसले ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.
आता आमचे लोकसत्ताचे संपादक खास धाटणीत अग्रलेख लिहितील-
"जे आम्हाला नाही 'दिसले"
वॉट्स-अॅपवर नेहमी प्रमाणे 'त्या रणजीत'चे स्वप्न प्रसिद्ध होइल.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 12/04/2020 - 14:37
नवीन
भारतीय जनता पक्षाने उत्तम कामगिरी केलेली आहे..
2 नंबर च सर्वात जास्त जागा मिळवणारा पक्ष म्हणून bjp चे नाव asel
- Log in or register to post comments
व
वामन देशमुख
Fri, 12/04/2020 - 18:07
नवीन
-
भाजप (मागच्यावेळी ४) पंचवीस ते तीस पर्यंत मजल मारेल असा अंदाज होता पण ती पन्नाशीच्या घरात गेली आहे. तेलंगणा राष्ट्र समिती (मागच्यावेळी ९९) ७५ पर्यंत कमी होतील असा अंदाज होता पण ती ५५ वर आली आहे. मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन च्या जागा तेवढ्याच राहतील (४४) असा अंदाज होता पण त्याही दोनने कमी झाल्या.
मागच्या महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातली विधानसभेची पोटनिवडणूक भाजपने जिंकली.
बहुधा, घराणेशाहीच्या वादाचा फटका तेरासला बसला आहे. तेरासचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (KCR) यांचे तीन वारस आहेत. मुलगा केटीआर, मुलगी कविता आणि पुतण्या हरीश. केसीआर यांना आपल्या मुलाला वारस करायचंय पण जनतेत हरीश सर्वात लोकप्रिय आहेत. पंधरा-वीस वर्षापूर्वीचे राज ठाकरे यांच्याशी त्यांची तुलना करता येईल.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 12/04/2020 - 18:38
नवीन
हे खूप मोठे आहे 4 जागेवरून एवढी मोठी भरारी खरोखर कौतुकास्पद आहे.
30 टक्के मुस्लिम लोकसंख्या असलेल्या शहरात हे यश लगेच उठून दिसत आहे.
पण साध्या महानगर पालिकेच्या निवडणुकी साठी bjp चे अनेक वरिष्ठ नेते तिथे प्रचाराला गेले ह्याचा पण काही तरी अर्थ आहे.
Trs ला मोठं नुकसान झालेले आहे .
Aimi चे जास्त नुकसान झालेले नाही.
Trs ह्या पक्षात असंतोष असावा आणि त्याचा फटका त्यांना बसला असेल आणि त्या असंतोष चा फायदा bjp नी उचलला असावा.
- Log in or register to post comments
क
कपिलमुनी
Fri, 12/04/2020 - 21:10
नवीन
ओवेसी मुळे हैदराबद मध्ये ध्रुवीकरण करणे सोपे आहे
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Fri, 12/04/2020 - 21:49
नवीन
नुकसान झाले trs चे.
त्या पक्षात अस्तीनितील निखारे असतील .
त्याचा फायदा bjp नी घेतला असेल
- Log in or register to post comments
ब
बाप्पू
Sat, 12/05/2020 - 04:02
नवीन
एखाद्याच यश मान्यच करायचं नसते तेव्हा असे प्रतिसाद येतात.
स्वतः चा पोरगा चांगल्या गुणांनी पास झाला कि- त्याने खूप अभ्यास केला होता, कष्ट घेतले होते त्याचेच हे फळ.
आणि दुसऱ्याचा पोरगा चांगल्या गुणांनी पास झाला कि - या वर्षी पेपर फुटला होता.. चेकिंग च नीट झाले नव्हते. पेपर च सोपा आला होता. वगैरे वगैरे.
- Log in or register to post comments
R
Rajesh188
Sat, 12/05/2020 - 04:10
नवीन
आंध्र प्रदेश चे तुकडे करणारा trs आणि त्याला साथ देणारी काँग्रेस ह्या दोन्ही पक्षांची विल्हेवाट च तेलंगणा मध्ये लागली पाहिजे.
राज्य द्रोही कुठले.
आता bjp नी भले पटत नसेल तरी ओवसी बरोबर युती करून trs ल सत्ते मधून बाहेर करावे.
स्वतःच्या राज्या शी द्रोह करणाऱ्या लोकांचा मला भयंकर राग येतो.
त्याचे फलित म्हणूनच महाराष्ट्रात bjp ni maharashtra सरकार वर हल्ला करता करता राज्य पोलिस ,आणि राज्य ह्यांना बदनाम करायला सुरू केले आणि BJP पाठीराखा असून सुद्धा BJP नकोशी vatayala लागली.
- Log in or register to post comments
म
महेंद्रसिंग साथी
Sat, 12/05/2020 - 04:30
नवीन
राज्यद्रोह म्हणजे नक्की काय हा प्रश्न विचारायचा नाही. पण राज्यद्रोहाची जी काही व्याख्या असेल ती असेल पण त्या कारणाने भाजप नकोसा वाटायला लागणार्या अनेकांना तुकडेतुकडे गँगचा कन्हैय्याकुमार मात्र आपला वाटतो. म्हणजे आर्थिक/सामाजिक वगैरे कारणाने एकाच देशात राहून वेगळ्या राज्याची मागणी करणारे वाईट पण भारताचे तुकडेतुकडे व्हावेत असे म्हणणारे चांगले.
लगे रहो. असल्या लोकांनी मोदींना २०१९ मध्ये भरघोस यश मिळवून द्यायला मदत केली आणि असलेच प्रकार चालू ठेवले तर २०२४ ची पण काळजी करायला नको.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- ›
- »