Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

फोटो ओळखा 2

ख
खंडेराव
गुरुवार, 03/14/2019 - 15:29
💬 263
संदर्भ - Photo Olkha 1 नमस्कार. मिपाकर भरपुर फिरतात, फोटोही काढतात. असा एक धागा असावा का, जिथे आपण फोटो टाकु आणि इतरान्नी ते ओळखावेत? थोडा डोक्याचा व्यायामही होईल, आणि नवीन जागा बघायला मिळतील. काही सोपे नियम - एका वेळेस एकच फोटो उत्तर मिळाल्यावर फोटो टाकनार्याने नक्की करावे बरोबर आहे कि नाही. फोटो ओळखुन झाल्यावर पुढचा फोटो टाकावा. फोटो असे असावेत कि जागेचा अंदाज येइल.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 125271 views

💬 प्रतिसाद
च
चौकटराजा गुरुवार, 03/28/2019 - 17:12 नवीन
ही आहे प्रॉपर रोहतांग पास
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/28/2019 - 19:32 नवीन
मी गेलो त्यावेळेस त्यावेळेस, खूप बर्फवृष्टी झाली असल्याने मे महिन्याचा शेवटच्या आठवडा असूनही रोहतांग पास बंद होता... त्याच्या अलिकडे १२ किमीवरून परतावे लागले. पण, परतीच्या जागेअगोदरच्या किमान ८-१० किमीवर अगदी असाच नजारा होता.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/28/2019 - 05:42 नवीन
हिमाचल प्रदेशात, मनालीकडून "शोलंग नाला"कडे जाताना, मे महिन्यात सैन्याने बर्फ तोडून साफ केलेला असा रस्ता पाहिला होता.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/28/2019 - 09:25 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 03/28/2019 - 10:27 नवीन
चेन्नकेशव सोमनाथपूर, कर्णाटक.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/28/2019 - 14:10 नवीन
अगदी बराबर !
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे गुरुवार, 03/28/2019 - 16:37 नवीन
एखादा दगड आणून समोर ठेवला तरी प्रचेतस तो कोणत्या ठिकाणचा आहे हे नक्की सांगणार ! ;) :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/29/2019 - 03:57 नवीन
बरीचशी ठिकाणे माहीत असल्याने काही फोटो ओळखता आले.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा गुरुवार, 03/28/2019 - 17:43 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/29/2019 - 03:57 नवीन
फोटोच दिसत नाहीये. :)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 03/29/2019 - 08:29 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/29/2019 - 09:27 नवीन
मार्तंड सूर्य मंदिर, काश्मिर. ह्या मंदिरावरील लघुपट मागे कुठल्याश्या चॅनेलवर पाहिला होता.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 03/29/2019 - 10:47 नवीन
विराट कोहली आउट ! )))))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/29/2019 - 10:51 नवीन
मग शंकराचार्य मंदिर? पण ते लहानसं आहे खूप
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 03/29/2019 - 11:05 नवीन
नारानाग मंदिर आहे का हे?
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Fri, 03/29/2019 - 11:05 नवीन
नारानाग मंदिर आहे का हे?
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Fri, 03/29/2019 - 11:12 नवीन
अवंतीपुर, काश्मीर. कारगिल युद्धाच्या वेळी मी येथेच होते. सुदैवाने कुठेही न अडकता सहल सुखरूप पार पडली होती. Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Fri, 03/29/2019 - 17:18 नवीन
यास सर !
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/29/2019 - 03:59 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 03/29/2019 - 04:17 नवीन
पाताळेश्वर?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Fri, 03/29/2019 - 04:27 नवीन
नाही :)
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Sun, 03/31/2019 - 19:09 नवीन
काय उत्तर?
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 03/31/2019 - 19:16 नवीन
बाणेरची बाणेश्वर लेणी. अगदी भर पुण्यात बाणेरला हे अश्ममंदिर आहे. आवारात काही वीरगळ आणि बळीशिळा आहेत.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Mon, 04/01/2019 - 09:33 नवीन
बघून येईल.. इथून जवळच सोमेश्वर वाडी चे मंदिर आहे, ते हि अगदी छान आहे..
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 04/01/2019 - 12:18 नवीन
सोमेश्वराच्या मंदिराच्या आवारात दोन वीरगळ आहेत त्यापैकी एक वीरगळ गाणपत्य संप्रदायातील वीराचा आहे कारण त्या शिळेवर शिवपिंडीऐवजी गणेशमूर्ती कोरली आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Fri, 03/29/2019 - 08:21 नवीन
आता पुढचा "फोटो ओळखा" टाकेन तेव्हा "सदरच्या स्पर्धेत टाईम्स ऑफ इंडियाचे कर्मचारी, मिसळपाव संपादक मंडळाचे सदस्य आणि वल्ली प्रचेतस यांना भाग घेता येणार नाही" अशी फूटनोट टाकणार :-)
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 03/30/2019 - 15:14 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Sat, 03/30/2019 - 16:17 नवीन
सलीम सिंग की हवेली, जेसलमेर. जैसलमेर भेटीत पटवो की हवेली पाहिली पण वेळेअभावी ही मात्र नाही पाहिली.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 03/30/2019 - 17:27 नवीन
बरोबर आहे !
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sat, 03/30/2019 - 17:54 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Sun, 03/31/2019 - 05:02 नवीन
@चौकटराजा मी पाहिलेही एकदा सांगितले होते कि प्रश्नातच उत्तर आहे म्हणून. फोटो टाकताना फोटोचे नाव बदलण्याची काळजी घ्या. जसे कि आता "बेलूर" आहे.
  • Log in or register to post comments
च
चौकटराजा Sun, 03/31/2019 - 05:08 नवीन
फोटोत बेलूर असा उल्लेख आहे ?
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Sun, 03/31/2019 - 05:39 नवीन
फोटोवर उजवी टिचकी मारून फोटो "Save as" करायला गेलो की फाईलच्या मूळ नावानेच फोटो सेव्ह करायचा का विचारले जाते. मलाही नाही कळत या गोष्टी. पण मुलगी सांगते कधी कधी समजावून. फोटो अपलोड करायला तिनेच शिकवले. बाकी जाणकार सांगतीलच व्यवस्थित.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Sun, 03/31/2019 - 08:20 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sun, 03/31/2019 - 11:01 नवीन
मातृमंदिर, अरोव्हिले, पॉण्डिचेरी. लैच फेमस लँडमार्क, हा फोटो बराच सुप्रसिद्ध आहे. (सोपा प्रश्न दिल्याबद्दल थॅन्क यू, पैलवान ) मातृमंदिरच्या काही रोचक गोष्टी: १. अरबिंदो आश्रमाच्या माता मिररा अल्फास्सा (फ्रेंच भारतीय) यांच्या अध्यात्मिक अनुभूतीतून साकार २. बांधावयला ३७ वर्षे लागली ३. सूर्यप्रकाश परावर्तित करणाऱ्या १२ सोनेरी पाकळ्या ४. जीओ डेसिक या प्रकारातील भौमितीक गोलाकार ५. प्रकाशीय दृष्ट्या परिपूर्ण अशी खुप मोठी काच या गोलाच्या वार बसवलेली आहे ज्यामुळे गोलाच्या अंतर्भागात विशेष असे अध्यात्मिक क्षेत्र तयार होते. या क्षेत्रात जर ध्यान धारणा करायची असेल तर बरीच फी आहे आणि वेटिंग देखील चिकार. आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. जाणकार जास्त प्रकाश टाकू शकतील.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Sun, 03/31/2019 - 19:08 नवीन
फक्त पाचवा पॉईंट चुकीचा आहे. मी मागील वर्षी जवळ जवळ 2 तास आत होतो, कुठेही एक रुपयाही लागला नाही. तुम्हाला एक दिवस आधी येऊन नोंदणी करावी लागते आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही येऊन अंतर्भागात जाऊ शकता. त्या बारा पाकळ्या मधेही ध्यानाच्या खोल्या आहेत..बाकी आत जायचा अनुभव एकदा घ्यायलाच हवा..
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 04/01/2019 - 10:25 नवीन
अचूक माहितीसाठी धन्यवाद , खंडेराव ! मी त्या आधी एक वर्ष गेलो होतो. चेन्नईअच्या सहकार्‍यानं असं सांगितलं होतं, त्यामुळे आणि हाताशी वेळ कमी असल्यामुळं बाकी चौकशी करण्याच्या भानगडीत पडलो नव्हतो बाकी पाकळ्याच्या आतला अनुभव भारी असणार. त्या बद्दल आणखी वाचायला आवडेल. ध्यानधारणा गृहाचा हा असला प्रकार आपल्या संस्कृतीत वाचल्याचं मलातरी आठवत नाही.
  • Log in or register to post comments
ख
खंडेराव Mon, 04/01/2019 - 12:18 नवीन
त्यांच्या अधिकृत साईट वरून माहिती घेऊन गेलो होतो. https://www.auroville.org/contents/252 २ दिवस सलग जावे लागले पण आत जायचा अनुभव अगदी अप्रतिम होता. एखाद्या साय फाय सिनेमा मध्ये प्रवेश केला असे वाटते. आतला भाग हा पूर्ण स्वच्छ पांढरा आहे आणि तुम्हाला त्यांनी दिलेले पांढरे मोजे घालूनच जावे लागते. आत मध्ये पायऱ्या आहेत आणि त्यांनी वरच्या इंनेर चेंबर मध्ये आपण पोहोचतो, तिथे पांढऱ्या रंगाच्या कुशन वर ध्यान लावता येते. जर पॉण्ड्यचेरी मध्ये २-३ दिवस मिळत असतील तर हे केलेच पाहिजे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 04/02/2019 - 09:27 नवीन
वाह, भारी महिती खंडेराव. त्यांची साईट पहिली. उत्तम माहिती आहे. वनाराजीतून प्रवास करत मातृमंदिर व्ह्यूऊजिंग पॉईंट इथून मातृमंदिर बाहेरून पाहण्याचा अनुभव देखील खूप सुंदर होता. अश्या वातावरणात दोन तीन दिवस काढणे काय सुंदर अनुभव असेल !
  • Log in or register to post comments
ग
गॉडजिला Tue, 04/27/2021 - 19:10 नवीन
हे अरोव्हिले एकदम इनोवेटीव प्रकरण आहे. तुम्हाला हवे ते काम तुम्ही करु शकता फक्त पगार तेव्हडा सर्वाना समान जेमतेम १२ की १५ हजार... अर्थात तरीही तुम्हाला ईथे खायला प्यायला रहायला एकदम उत्क्रुश्ट मिळेलच. इथे ध्यान सोडुन कसलेही देवपुजन नाही, नो गॉड, नो रिलीजन, नो पोलिटिक्स. अत्यंत इंटरेस्टींग प्रकरण आहे. आम्ही वेटींगवरच होतो पण कोवीड सुरु झाला.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Sat, 05/01/2021 - 10:09 नवीन
गॉडजिला साहेब, येईल की योग आगामी काळात ! अनुभव लिहायला विसरु नकात.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद_१९८२ Sun, 03/31/2019 - 11:15 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 03/31/2019 - 11:48 नवीन
मलंगगड
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Mon, 04/01/2019 - 19:34 नवीन
हा ओळखा Image removed.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/02/2019 - 05:39 नवीन
शैली उत्तरेकडील मंदिरांशी मिळतीजुळती आहे. बहुधा हिमाचल प्रदेश किंवा उत्तराखंड.
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Tue, 04/02/2019 - 06:54 नवीन
व्वा! शैलीहून बांधलेला अंदाज बरोबरच. दोन्हीपैकी एक राज्य निश्चित .
  • Log in or register to post comments
अ
अनिंद्य Tue, 04/02/2019 - 10:42 नवीन
बहुतेक चंबा - हिमाचल
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Tue, 04/02/2019 - 11:23 नवीन
नाही
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Tue, 04/02/2019 - 11:56 नवीन
सूर्यमंदिर, कातरमल/कटरमल
  • Log in or register to post comments
ग
गोरगावलेकर Tue, 04/02/2019 - 12:42 नवीन
अगदी बरोबर. सूर्य मंदिर, कटारमल, अलमोरा, उत्तराखंड मुख्य मंदिर व आजूबाजूने 44 मंदिरे असा समूह आहे.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा