Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
जनातलं, मनातलं

पूर्णब्रह्माचा अपमान!!

आ
आनन्दा
Sun, 08/19/2018 - 18:45
💬 194 प्रतिसाद
बरेच दिवस पुण्यात एका नवीन हॉटेलची जाहिरात चालू होती.. त्या हॉटेलच्या मालकीण बाईंचा एक विडिओ पण बराच व्हाट्स अप वर देखील फिरत होता. विमानात veg food मिळालं नाही म्हणून तिने थेट रेस्टॉरंट टाकलं वगैरे. त्या प्रसिद्ध हॉटेलची फ्रेंचैझी पुण्यात चालू झाली होती, आणि बटाटेवड्यापासून पुरणपोळी आईस्क्रीमपर्यंत सगळं आहे असे कळलं. मग त्याचा आस्वाद घ्यायचा प्लॅन केला. अनायासे आज बिबवेवाडीत गेलो होतो. हॉटेल ला जायचं ठरवलं, पण रस्ता माहीत नव्हता, त्यामुळे गूगल मॅप वर सर्च केलं. आणि तिथूनच नाट लागायला सुरुवात झाली. मॅपवर 2 लोकेशन दिसली, एकाच भागात, त्यातलं एक निवडलं, आणि निघालो, तिथे पोचलो तर कळलं की हे हॉटेल या गल्लीत नाहीच, शेजारच्या गल्लीत आहे.. बरं शेजारची गल्ली म्हणजे कशी, तर सातारा रोड वर बाहेर यायचं, रांका पासून मार्केट यार्ड पर्यंत जायचं, आणि U टर्न मारून परत यायचं. आणि मग शोधत शोधत जायचं, रस्त्यावर बोर्ड नाही, एक बोर्ड होता तो झाडात लपलेला, कसाबसा तो मिळाला, आणि आम्ही आत गाडी टाकली. गाडी लावणे म्हणजे मोठे दिव्य होते. झाडांच्या मधून जागा शोधून गाडी लावायची, नो पार्किंग असिस्टंट. तिथे एक बाई होती ती आम्हाला बघून आत निघून गेली. बाहेर मेनू लावलेला होता पालकाची भाजी, लाल भोपळा, पुरणपोळी, कढी वगैरे. मेनू बघून आत जाऊ की नको असा प्रश्न पडला होता, पण केव्हातरी जायचेच आहे तर आताच जाऊया म्हणून गेलो. आत गेल्यावर पुणेरी पद्धतीने थंड स्वागत झालं, फक्त इतकंच कळलं की यांच्याकडे थाळी आणि इतर मराठी पदार्थ पण आहेत. एकंदर वातावरण बघून बायको तर परत जाऊया म्हणत होती, पण तिला थांबवलं. आणि मेनुकार्ड मागवलं. एका इंजिनीरिंग च्या पुस्तकाएव्हढं मेनूकार्ड होतं.. साधारण चाळल्या वर इतकं कळलं की आज 350 रु वाली महालक्ष्मी थाळी आहे. *लिमिटेड थाळी - 3 पोळ्या, एक पुरणपोळी, भोपळा, पालक, कढी, वरण, भात, लोणचे, चटणी, भजी, साबुदाणा वडा, पापड इत्यादी. थाळी लिमिटेड, किंमत 350 रु* . खरे तर शहाण्या माणसाने इथेच मागे फिरायला हवे होते, पण विनाशकाले विपरीत बुद्धी. आम्ही 2 थाळ्या ऑर्डर केल्या आणि बसलो. जेवण आलं, आता आपण लिमिटेड पदार्थांचा आस्वाद घेऊ. *साबुदाणा वडा -* मोठ्या पेढ्याइतक्या आकाराचे 2 वडे. टेस्ट ओके. काकडीची कोशिंबीर - फ्रीजमध्ये साठवलेल्या काकडीची कोशिंबीर असावी बहुतेक. ठीक म्हणावी इतपत. *पुरणपोळी 1 नग -* 100 टक्के फ्रोझन पोळी गरम करून दिली असणार. आम्ही त्याला एक फुलकाच समजत होतो, पण तो थोडा गोड होता, म्हणून त्याला पुरणपोळी म्हणणे भाग होते. जाड पापुद्रा, पुरणाचा अभाव, आणि खात जावे तशी चामट होत जाणारी. ज्यांनी अमेरिकेत मिळणारी फ्रोझन पोळी खाल्ली असेल त्यांना नक्की कळेल. पुण्यात त्या पदार्थाला पुरणपोळी म्हणण्याची हिंमत मी करु शकत नाही. *साधी चपाती -* 3 चपात्या, थोड्या जास्त भाजलेल्या, आणि गार होतील तश्या चामट होत जाणाऱ्या. या पण फ्रोझन असाव्यात. तिसरी चपाती, जी गार झाली ती चावतच नव्हती. एक गोष्ट सांगायची राहिलीच, पहिली चपाती अर्धी खाऊन झाल्यावर त्यांनी *वेलकम ड्रिंक* आणून दिले, guess what? एक कटिंग चहा इतके ताक!! म्हणे वेलकम ड्रिंक. हे वेलकम ड्रिंक बघून अक्षरशः डोळे पाणावले. फोटो काढायचा मोह कटाक्षानं आवरला. हं, तर पुढचे पदार्थ *भजी* - सुपारीच्या आकाराची 3 भजी. मीठ वाढतो तितकी शेंगदाण्याची चटणी आणि मेतकूट. *भोपळ्याची भाजी -* सालीसकट केलेली लाल भोपळ्याची भाजी, जी अर्धी मी बटाट्याचा रस्सा समजून खाल्ली, अर्ध्यात बायकोने आठवण करून दिली की तो भोपळा आहे! *पालक रसभाजी* - दाणे, खोबरं आणि मसाला घातला की काहीही खपतं असा त्यांचा बहुधा गैरसमज असावा. त्यात पालक शोधावाच लागत होता, पण त्यातल्या त्यात तीच चांगली लागत होती . *कढी -* आंबट दही तसेच घट्ट घुसळून त्याची कढी केलेली. ना आपण घरी करतो तशी मिरचीची फोडणी वगैरे असलेली होती, किंवा ना कढी खिचडी सारखी. मेस मध्ये असते तशी चव साधारण होती. आणि खारट! *वरण* - खारट! *आणि भात!!* तो सुंदर असणार, कारण त्यांनी तो दिलाच नाही. आम्ही पण मागायला गेलो नाही! इतकं सुंदर जेवण जेऊन पोट भरलं होतं!! आपण अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो, पण साडेतीनशे रुपयात असले जेवण विकणे हा त्या पूर्णब्रह्माचा अपमान आहे! परदेशात चालेल हे असले जेवण, पण पुण्यात तर नाहीच नाही! आता सर्विस बद्दल बोलूया - *अत्यंत मितभाषी स्टाफ* असणार! कारण *आम्हाला जेवण दिल्यावर कोणी ढुंकून सुद्धा बघितलं नाही* . हवं नको वगैरे फारच लांब राहिलं!! जेवण झाल्यावर बिलाचे पैसे द्यायची वेळ आली, बिलात 350 रु ची थाळी आणि वरती सर्विस टॅक्स बघून माझी सटकलीच होती.. *जी एस टी सकट 735 रु फक्त!* *बिल देताना विचारले, की आजच्या थाळीत भात होता का? तर फक्त सौजन्याने त्यांनी विचारले, तुम्हाला मिळाला नाही का? (सॉरी वगैरे जाऊदे, पण पुढे बोलणे पण नाही, किमान आतल्या माणसाला काय झाले आहे ते विचारावे इतकीच अपेक्षा होती)* केवळ मला भांडायची इच्छा नव्हती, त्यामुळे शांतपणे मी पैसे देऊन बाहेर निघालो होतो, पण तेव्हढ्यात त्यांनी कळ काढली!! मला त्या बाई पुढच्या वेळेस आलात तर डिस्काउंट कूपन देते म्हणून सांगू लागल्या!! मग मात्र माझी सहनशक्ती संपली. शांतपणे मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, मी परत येणार नाही!!

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 84946 views

💬 प्रतिसाद (194)
ज
जेम्स वांड Fri, 08/24/2018 - 18:05 नवीन
भिकारला भिकार म्हणलं तर दुसऱ्या गावांना हीन लेखत "आनंदला बुद्धिबळ, देवाला धर्म " वगैरे वाचून म्हणलं बोवा विचारावं पुण्याचं व्हर्जिनल खाणं काय ते, तुम्ही फारच लावून घेतलेलं दिसतंय. काही वैयक्तिक घेतलं का काय तुम्ही, घेतलं तर घ्या, आम्हाला फरक पडत नाही. बाकी बोलायला बहुत आहे नाखु जी, पण त्यासाठी तुमच्या तुसडेपणाशी स्पर्धा लावावी लागेल. म्हणून थांबतो. (सातारला जन्मलेला अन पुण्याने पोसलेला जातिवंत तिरसट) वांडो.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sat, 08/25/2018 - 20:01 नवीन
मिसळ हा पदार्थ बहुधा पुण्यात प्रथम तयार केला असावा असे उपलब्ध माहितीवरून तरी दिसते. बाकी कशाबद्दल हे विधान करता येईल हे मला माहिती नाही.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 08/26/2018 - 02:17 नवीन
मिसळ हा उसळीपासून उत्क्रांत होत गेलेला पदार्थ. कडधान्याची उसळ ही आपल्याकडे पारंपरीक. तीत चिवडा घालून (मिसळून) मिसळ बनवली गेली (कुणी/केव्हा?). पुढे गुजराथी समाजाशी संपर्क आल्यावर चिवड्याची जागा फरसाणीने घेतली. आणि पुढे तीत तर्रीचे प्रमाण वाढ्वून ती पावासोबत खाऊ जाऊ लागली!
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 08/25/2018 - 06:06 नवीन
तर काय!! किती दुत्त हो नाखुचाचा तुम्ही! चक्क मुद्द्याच्या पाईंट मांडता! आता हे पाप फेडण्यासाठी अजुन कोणत्याही चार पाच धाग्यांवर जा आणि संबंध नसला तरी तिथे पुण्याचा विषय काढून पुण्यात हे कसं वाईट आणि ते कसं बेक्कार वगैरे लिहून या. समजलं? ओक्के मग.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 08/25/2018 - 06:54 नवीन
पापक्षालन करण्यासाठी तत्काळ कामाला लागतो. सध्या खालील धाग्यांवर प्रक्षोपण प्रतिसाद देणार आहे राहुल गांधीं, कार्यशैली आणि विरोधी पक्षनेता म्हणून पुढील संधी, आव्हाने आणि मर्यादा छायाचित्रण कलेचा आस्वाद अनवट किल्ले ३८ : वेताळवाडी गड (Vetalwadi gad आपण दिलेल्या शटी अर्ती नुसार धागे निवडले आहेत पापक्षालन क्षमाप्रर्थी नाखु
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 08/25/2018 - 07:14 नवीन
अहो परत परत तेच ते काय बोलताय ताई. पुणे पूर्ण रद्दी भंगार अन टाकाऊ वगैरे मी बोललोच नाहीये, फक्त पुणे इतर गावांसारखंच एक गाव आहे अश्या बेताने प्रतिसाद दिलेत. असो, तुम्हाला किंवा नाखुजींना काही फारच वाकडे लागले असेल तर हात जोडून माफी मागतो बस. _/\_
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 08/25/2018 - 07:21 नवीन
दादा, मी तुम्हाला काहीच म्हणल नाही की. उगाच स्वतःवर का ओढून घेताय, समजले नाही. आणि वाकडे लावण्याबाबत म्हणाल तर पुणेकरांना सवय झालीय. फारसे लक्ष देऊ नये हे लक्षात आले आहे आता, थोडीशी गंमत करून घेऊन सोडून देतात, झालं.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 08/25/2018 - 09:01 नवीन
सोडून दिल्याचा मनाचा मोठेपणा दाखवल्याबद्दल आभार! रच्याकने पुण्याला पूर्णच वाईट म्हणणाऱ्या काही मेम्बरांना इथेच मिपावर उत्तरेही मीच दिलीयेत, इतकं नमूद करून रजा घेतो.
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sat, 08/25/2018 - 08:48 नवीन
थोडेसे अवांतर: एक ज्येष्ठ मिपाकए पुण्याचा विषय निघाला की पुण्याला नावे ठेवण्यात आघाडीवर असातात. या धाग्यावर दिसत नाहीत ते. मला नेहमी वाटायचे की त्यांना एखाद्या पुणेरी कन्येने नकार दिला असणार किंवा आधी होकार देऊन नंतर कोलले असणार त्याशिवाय एखाद्या शहराविषयीईतकी मनस्वी चीड असू शकत नाही. आता मुख्य मुद्दा: धागा एका भोजनालयाच्या दर्जाबद्दल असताना पुण्याच्या खाद्यसंस्कृतीवर कसा काय घसरला?
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 08/25/2018 - 09:03 नवीन
आता मुख्य मुद्दा: धागा एका भोजनालयाच्या दर्जाबद्दल असताना पुण्याच्या खाद्यसंस्कृतीवर कसा काय घसरला? मृत्युंजय जी अन अभ्याश्री जाणोत.
  • Log in or register to post comments
न
नाखु Sat, 08/25/2018 - 10:09 नवीन
गमतीत असतय त्ये!!! तुम्ही त्या कळपात नाहीत हे मलाही माहित होतं पण थोडी गम्मत आपली पण!! जगन्मित्र वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 08/25/2018 - 11:32 नवीन
मला वाटलं नाखुजी खरंच तापले की काय, मग मीही माफक पसरलो, त्याबद्दल जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. लहान समजून माफ करून टाका काही उणेअधिक बोललो असेल मी तर प्रतिसाद प्रपंचात. _/\_
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 08/25/2018 - 10:20 नवीन
कोण हो ते?
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 08/25/2018 - 15:12 नवीन
आज पुणे इट औट्स वर एकदम पॉझिटिव्ह रिव्ह्यू आलाय! गुरू सावंत हे सुद्धा हॉटेल मालक आहेत, त्यांचा रिव्ह्यू.. #पुर्णब्रह्म सोशल मिडियावर या हॉटेलशी ओळख झाली. मराठी वडापाव ते महाराष्ट्रीयन थाळी पर्यंत उत्तम दर्जा आणि चव देणारी अनेक हॉटेल्स आणि खानावळी पुण्यात आहेत एखादा अपवाद वगळला तर जवळजवळ सगळ्याच ठिकाणी अनेकदा जेवण झालय. महाराष्ट्रीयन जेवण त्यात शाकाहार म्हटल काही नावाजलेली जूनी हॉटेल्स जी खरोखरच अत्यंत चिकाटीने आणि प्रामाणिकपणे पुणेकराना सेवा देत आहेत. पुर्णब्रह्म म्हणजे पुण्याबाहेर लोकप्रिय झालेला ब्रांड आता या स्पर्धेत आलाय. नावाजलेल मराठी अन्नपदार्थाच हॉटेल,चिकाटीने मेहनत करून आणि प्रस्थापितांच्या स्पर्धेत स्वताच्या ब्रांडची ओळख निर्माण करून देणारी सेलिब्रिटी मालकीण ☺या सुरुवातीला समोर दिसणाऱ्या दोन जमेच्या बाजू पहाता एक लंच तो बनता हे मनात अगदी पकक होत परंतु खरा योग मात्र काल आला. काही कामा निमित्त सातारा रोडवर गेलो आणि समोरच पूर्णब्रम्ह दिसल म्हटल आलोच आहोत तर पान टाकूनच जाऊत ☺ म्हणून हॉटेलात शिरलो. शाकाहारी खास करून कोकणस्थ पद्धतीच जेवण म्हणजे माझी दुखरी नस ....कदीही आणि कितीही खाऊ शकतो पण हल्ली प्रस्थापित मराठी हॉटेलात अळूच फ़दफद/बिरडयाची उसळ या नावाखाली वाढल्या जाणाऱ्या भाज्या मेनुकार्डात वाचूनच अंगावर काटा येतो. सुदैवाने पुर्णब्रह्मच्या बोर्डावर अस धक्कादायक काहीही लिहीलेल नव्हतं. त्यामुळे ऑर्डर प्लेस करायची हिंमत सुद्धा केलीच. आता चव आणि हॉटेलबद्दल अगदी थोडक्यात ☺ साधारण पणे वीस ते पंचवीस कार पार्क करता येतील इतक पार्किंग/दर्जेदार मराठी ऍमबियन्स(लग्नाच्या पंगतीत बसल्यासारखा सरळ नाही) / खुप आउटस्टैंडिंग म्हणता येणार नाही पण एखाद्या अमराठी व्यक्तीला सुद्धा सहज रुचेल इतकी छान चव/ कल्पकतेने नवीन जनरेशनला भावेल असा डिजाइन्ड मेनू (रॉ मटेरियल क्वालिटी आणि क्वांटिटी)/अत्यंत डिसेंट सोनाराच्या दुकानात असतो तसा स्टाफ़ आणि बैकग्राउंडला छान मराठी अभंग. यापेक्षा जास्त माझ्या अपेक्षा नसल्यामुळे शाकाहारी थाळीत पुर्णब्रह्म कायमच झाल ☺ पुण्यातील इतर शाकाहारी थाळी मिळणाऱ्या ठिकाणापेक्षा काही गोष्टी इथे सम्पूर्ण वेगळ्या आहेत ज्याची चर्चा होण आवश्यक वाटत म्हणून त्याचा उल्लेख करण आवश्यक आहे. १) इथे वाढदिवसाच्या दिवशी ग्राहकाच औक्षण केल जात. उत्सवमूर्तीच्या पानात अगदी स्टैंडर्ड साईझची पूरणपोळी भेट म्हणून वाढली जाते शिवाय बिलावर ५ टक्के सूट सुद्धा दिली जाते. २) दररोज मेनू संपूर्ण बदलला जातो (न्यु रिजन न्यु मेनू) ही थीम चालवली जाते. ३) लहान मुले/गरोदर महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकरीता अत्यंत वेगळा मेनू आणि गरज वाटल्यास खास सर्विस दिली जाते. आपली मराठी संस्कृती आणि खाद्यपरंपरा याची सांगड घालण्याचा पुरेपुर प्रयत्न हॉटेल व्यवस्थापनाने केला आहे. त्यामुळे थाळीच्या नावाचा उल्लेख करण सुद्धा गरजेचे वाटते. (नावाप्रमाणे बदलणारा मेनू) सोमवार - श्री शिव थाळी मंगळवार - श्री स्वामी समर्थ थाळी बुधवार - श्री विठाई थाळी गुरुवार - श्री दत्तगुरु थाळी शुक्रवार - श्री बालाजी थाळी शनिवार - श्री गजानन महाराज थाळी रविवार - श्री महालक्ष्मी थाळी एकूण क़ाय तर मराठी अन्नपदार्थाना सातासमुद्रापार घेऊन जायचे ब्रॉड माइंडेड मराठी हॉटेल मालकीणीचे स्वप्न अपूरे राहण्याच एकही कारण मला तरी दिसल नाही. त्यामुळे पुर्णब्रह्म तिमला खुप साऱ्या शुभेच्छा ☺ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपुरे फायदा घेऊन लिहिलेली तळटीप ☺- मराठी थाळी खायला गेल्यावर साइड डिश म्हणून ताटात फाफड़ा,मिर्च्या चटण्या आणि ढोकळा न वाढल्याबद्दल कौतुक ☺ वर्षानु वर्षाच तेच फदफद / बिरडयाची उसळ लग्नाच्या पंगतीत बसून जेवण केल्याच फील देणाऱ्या रिजिड संकल्पनेला फाट्यावर मारणारी पुर्णब्रह्म टिमचा मेनू छान वाटला शिवाय आवडला सुद्धा ☺ मराठी अन्नपदार्थ इतक्या कल्पकतेने आणि आदराने वाढल्यामुळे प्रस्थापित व्यावसायिकापेक्षा जास्त आकारलेले ३० ते ४० रुपये जिव्हारी लागणारे वाटले नाहीत ☺ गुरु सावंत
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sat, 08/25/2018 - 15:20 नवीन
असेल बाबा एखादेवेळेस चांगलेपन हॉटेल. आपल्या आनंदरावांचाच मूड नसावा कदाचित त्यादिवशी. किंवा अजुन कैतरी. . ह्या गुरु रिव्ह्यु बाबतीत : सेम धंद्यात सहसा उघडौघड वाकडेपणा घेत नाहीत म्हणतात, छानछान करायचे असते बोथ साईडनी ते पण म्युच्यली आणि प्लानिंगने. तसे असले तर मात्र अवघड आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Sat, 08/25/2018 - 15:38 नवीन
तसेच दिसतेय रिव्ह्यू पाहता. तिथेही प्रतिसाद देताना लोक फारसे सकारात्मक वाटत नाहीयेत.
  • Log in or register to post comments
आ
आनन्दा Sun, 08/26/2018 - 09:41 नवीन
खूप लिहावेसे वाटतेय, बऱ्याच गोष्टींचे संदर्भही लागतायत. पण असो. कस्टमर सक्सेस हा कोणत्याही व्यवसायाचा पाया असतो, आणि त्याकडे चालकांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना दिसत आहे. कारणे काहीही असतील, पण एक व्यवसाय म्हणून हे नक्कीच चांगले नाही असे नमूद करावेसे वाटते. चुकीचा रस्ता धरलाय त्यांनी. देव त्यांना शक्ती देवो.
  • Log in or register to post comments
ग
गवि Sun, 08/26/2018 - 10:17 नवीन
वरील रिव्ह्यू हा आनन्दा यांच्या रिव्ह्यूतले काही पॉईंट घेऊन त्यांवर पॉझिटिव्ह लिहिल्यासारखा भासला. तसं नसूही शकेल.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sat, 08/25/2018 - 16:17 नवीन
मला हा वरचा रिव्ह्यू जरा जास्तच गुडी गुडी वाटला. आणि हटकून लिहिल्या सारखा. इतरही लोकांनी जेवण वाईट होतं असं लिहिलं आहेच त्यामुळे मला तर आनंद ह्यांचा रिव्ह्यू जास्त प्रामाणिक वाटला. तसंही 350 + टॅक्स देऊन लिमिटेड थाळी हा प्रकारच आपल्याला पटलेला नाही! कुणी काहीही म्हणो. सिंहासनावर बसवून बाजूला कुणी स्वहस्ते पंख्याने हवा जरी घातली तरी लाल भोपळ्याची भाजी खायला मी हॉटेलात जाणार नाहीच :)
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Sat, 08/25/2018 - 17:24 नवीन
सिंहासनावर बसवून बाजूला कुणी स्वहस्ते पंख्याने हवा जरी घातली तरी लाल भोपळ्याची भाजी खायला मी हॉटेलात जाणार नाहीच :) =)) =)) =)) सिंहासनावर बसवून बाजूला कुणी स्वहस्ते पंख्याने हवा घातली तर तो राजेशाही अनुभव घ्यायला मी हॉटेलात नक्की जाईन. नाहीतर इतके पारंपारिक कौतुक रु३५०+ मध्ये दुसरीकडे कुठे मिळणार आहे ?! मात्र, लाल भोपळ्याची भाजी नक्की खाणार नाही... इतर काय बरे खाण्याजोगे आहे ते खाईन ! :) (हघ्याहेवेसांन)
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 08/26/2018 - 12:18 नवीन
इतर काय बरे खाण्याजोगे आहे ते खाईन ! बाकी पंख्याने वारा बिरा असले लाड असले तर कुणाला नको असतात? बरेचसे सलून्स न पार्लर्स न बार ह्या तर एका युएसपीवर दणकून चालतात. पर्सनल अटेन्शन महत्त्वाचे हो. पण खाण्याचा विचार करता बहुतेक हेच लॉजिक असते थाळीचे. नुसत्या डिश सिस्टमनुसार दोन डिश मागवल्या आणि त्या आवडल्या नाहीत तर पैसे वेस्ट जातात. पुण्यात तर २५० च्या खाली डिश दिसतच नाही. थाळीत एखादी भाजी आवडली नाही तर दुसरे तीन चार तरी पर्याय असतात. गुजराती वगैरे टाईपच्या थाळीत गुळचट भाज्यात एखादी तरी टेस्टी तिखी मिळुन जाते. बाकी भात वगैरे नॉर्मल आयटमला चवीपेक्षा टेक्श्चर, गरमपणा आदि भाग बघितले जातील पन दाळ किंवा रस्सा भाजीसोबत तोही खपून जातो. पापड, चटण्या, लोणची असे पदार्थ चार्जेस न भरता ताटात असतात त्यामुळे थाळी हा बराचसा सेफ मार्ग असतो हॉटेलात जेवायचा. पुण्यात दुर्वांकुर, सुकांता आदि मान्यवर थाळी हॉटेलात खाल्ले, इतरही ठिकाणी ट्राय केले पण फारसे नावीन्य अथवा एक्सलन्स जाणवला नाही. टिपिकल वाटीतल्या भाज्या, चपाती किंवा फुलके आणि स्वीट हे तर सोलापुरातही मिळते. किंबहुना अजिंक्य, निसर्ग, मंत्रालय, अंगराज अशा हॉटेलातल्या थाळ्या दुर्वांकुर, सुकांतापेक्षा कीतीतरी दर्जेदार आहेत. शिवाय चटणी, ठेचा, भाकरी, धपाटे, घट्ट दही असे स्पे. सोलापुरी पदार्थ ऑप्शनला असतातच. बरे ह्या थाळ्यांची किंमत कुठेच १००-११० च्या वर नाही. बाकी इतर डिशच्या बाबतीत बोलायलाच नको, कुठल्याही चित्रविचित्र नावाने डब्बू मिर्ची, पनीर, कांदे फ्राय करुन ग्रेव्हीत देणे किंवा कोफ्ते करुन देणे म्हणजे मेन कोर्सला पैसे मोजणे मला झेपत नाही. काही स्पेशालिटी जसे इटालिअन, लेबनीज, चायनीज अशांच्या बाबतीत मात्र मी अडाणी आहे आणि त्यातले शहाणपण शिकायची इच्छा आहे.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Sun, 08/26/2018 - 16:23 नवीन
मला औरंगाबादच्या थाळ्या सरस वाटतात पुण्यापेक्षा.. चव फार छान असते. मला आत्ता नाव आठवत नाहीये पण सव्वा दोनशे मध्ये फारच टेस्टी जेवण होतं.
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 08/26/2018 - 18:59 नवीन
खरे तर आताशा मला मराठी थाळीपेक्षा आंध्र थाळीच जास्त भारी वाटू लागली आहे. भाजी वेगवेगळी, नावापुरत्या दोनतीन पोळ्या, दालपालक, सांबार, रसम, दही आणि अर्थातच भाताचे अनलिमिटेड डोंगर. शिवाय चटणी आणि फ्राईड व्हेजिटेबल्स आणि बॉबी. यापैकी पोळी सोडून बाकी सब कुछ अनलिमिटेड. बर इतकं सगळं आहे तर किंमतही दणकून असेल? नाही लोक्स. तिथे जाऊन खाल्ले तर १००-११०/- फक्त. आणि हे आहे कुठं? हैदराबादेत? तिथे तर आहेच पण पुण्यातही अनेक आहेत. मगरपट्टा, डीसी इथे एक सोडून दोन आंध्रा मेशी आहेत तिथे १००-११०/- हाच चार्ज आहे. ११०/- में अगर इतना मिले, तो कोई ये (मराठी) क्यूं ले? (आंध्रा सुपर)
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 08/26/2018 - 19:02 नवीन
नुसती क्वांटिटि नव्हे तर क्वालिटीही अप्रतिम असते. माझे वडील खाण्याच्या बाबतीत एकदम कट्टर मराठी आहेत. विशिष्ट म्हणजे विशिष्ट पद्धतीचंच जेवण लागतं. इतकं असून त्यांनाही तिथलं जेवण आवडलं. माझी तर काय गोष्टच सोडून सोडा, मी खाद्यसंस्कृतीनिहाय पाहिले असता अण्णा आहे, भाऊ किंवा भैया नाही. सांगायचा मुद्दा असा की अशीही काही हॉटेले अस्तित्वात आहेत तीही पुण्यात. शिवाय दुसर्‍या तिसर्‍यांदा भात/भाजी/सांबार/रसम देताना आजिबात इरिटेट होत नाहीत.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 08/27/2018 - 05:39 नवीन
हिंजवडीत दोन तीन आहेत. पोळ्यांसकट अमर्यादित. जबरी आहेत. ८० रु. फक्त.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 08/27/2018 - 09:07 नवीन
नाव आणि पत्ता द्या.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Mon, 08/27/2018 - 09:31 नवीन
महेश आणि दुसरी बहुधा पॅराडाइज. पर्सिस्टंटच्या मागच्या गल्लीत. शिवाजी चौकातून फेज १ च्या इंफोसिस सर्कलच्या दिशेने आत आल्यावर दुकानांचा पट्टा संपल्यावर पहिल्याच गल्लीत डावीकडे.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Mon, 08/27/2018 - 09:12 नवीन
तांदूळ तसा स्वस्त असतो. त्यामुळे भाताचं जेवण अनलिमिटेड द्यायला परवडत असावं. मी हैद्राबादेत असताना अनलिमिटेड भाताचं जेवण २० रुपयात खाललेलं आहे (१९९६ साली) बाकी सांबाराची छोटी बादली समोर आणून ठेवत असत. अनलिमिटेड लोणचं. यातच मटण चिकनचा रस्सा ओतला की, अहाहा ! किमान तीन तास झोप नक्की. मी शनिवार रविवार दुपारी हे जेवण जेउन ताणून देत असे... गेले ते दीन गेले.
  • Log in or register to post comments
अ
अभ्या.. Sun, 08/26/2018 - 19:05 नवीन
अगदी अगदी. बाकी ते बॉबी म्हणजे मुरकुल काय? पुंगळ्या? का कुरड्या?
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 08/26/2018 - 21:18 नवीन
पुंगळ्या बे पुंगळ्या. चटणीला लावून खाल्लो की कळायचं बंदच.
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Mon, 08/27/2018 - 15:05 नवीन
खरे तर आताशा मला मराठी थाळीपेक्षा आंध्र थाळीच जास्त भारी वाटू लागली आहे अगदी अगदी, मलाही आवडते आंध्र थाळी /जेवण. चटण्या तर अप्रतिम असतात. दोडकी, वांगी, गवार कुठल्याही भाज्यांच्या इतक्या छान चटण्या बनवणे तिकडचे लोकंच बनवू जाणेत. कस्टमर सर्व्हिस पण उत्तम. खचाखच हॉटेल भरलं असून सुद्धा एखाद्या ग्राहकाची आवड लक्षात ठेवून ऑर्डर करण्याच्या आधीच टेबल वर 'गारे' ( मेदू वड्यांचं चटपटीत व्हर्जन) आवर्जून आणून देणाऱ्या लोकांचं खरंच कौतुक वाटतं. बाकी मराठी रेस्टॉरंट्सचा तर मला फारसा अनुभव नाही पण एकूण मराठी ग्राहकसेवेचा अनुभव माझा तरी फारसा बरा नाही. प्रामाणिकपणा असतो. उदाहरणार्थ एखाद्या पदार्थाची ऑर्डर दिली की प्रामाणिकपणे सांगतात की हा पदार्थ तुम्ही सांगितलेल्या दिवसापर्यंत आम्ही देऊ शकत नाही किंवा हा पदार्थ आम्ही बनवतच नाही. ते खरोखर चांगलंय पण बोलण्याची पद्धत चांगली नसते. म्हणजे आपल्याला ऑर्डर दिल्याबद्दलअल्मोस्ट गिल्टी वाटायला लागतं :) याउलट अमराठी दुकानांमध्ये. बिनधास्त हो म्हणतात मग भलेही गोंधळ घालतील.
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ गुरुवार, 08/30/2018 - 13:38 नवीन
मुंबईत कुठेशी मिळतात या आंध्र थाळ्या कुणी सांगावे
  • Log in or register to post comments
ग
गणामास्तर Sun, 08/26/2018 - 07:21 नवीन
पुण्याची खाद्यसंस्कृती कशी का असेना किंवा पहिली मिसळ कुठं का बनवेनात , आपल्याला चांगली मिसळ खायला मिळाल्याशी मतलब. बाकी, पुण्यात जितक्या प्रकारच्या किंवा चवीच्या मिसळ मिळतात तितक्या खचितच दुसऱ्या कुठल्या शहरात मिळत असतील. बेडेकरच्या 'गुळचट' पासून रामनाथच्या 'जहाल' आणि 'अतिजहाल' पर्यंत. कुठल्या शहरात काय खावं याच भान असलेलं कायम बरं. अवांतर : राहण्यासाठी मुंबई एकदम भिकार.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sun, 08/26/2018 - 07:27 नवीन
अवांतर : राहण्यासाठी मुंबई एकदम भिकार.
शतप्रतिशत सहमत.
  • Log in or register to post comments
स
सुनील Sun, 08/26/2018 - 07:48 नवीन
राहण्यासाठी मुंबई एकदम भिकार
सातपट सहमत!
  • Log in or register to post comments
स
सतिश गावडे Sun, 08/26/2018 - 08:27 नवीन
पुणेकर म्हणत आहेतः आली रे आली आता मुंबईची बारी आली ;)
  • Log in or register to post comments
न
नाखु Sun, 08/26/2018 - 09:53 नवीन
धागा पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न म्हणतील पण आपण लक्ष्य देवू नये गोलमाल चे नाही का तीन चार भाग आलै
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Sun, 08/26/2018 - 13:19 नवीन
पुण्यात दुसऱ्या बाजीरावाने श्रीखंड प्रथम बनवले असे ऐकले आहे. तो पुण्याचा आद्य पदार्थ मानायचा का
  • Log in or register to post comments
ब
बॅटमॅन Sun, 08/26/2018 - 19:03 नवीन
मराठी थाळी वगैरे सब झूठ आहे. आंध्र थाळीच काय ती खरी. ;)
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Mon, 08/27/2018 - 09:58 नवीन
आमच्या मुंबईला भिकारी म्हँताव थांबा तुमची विमानं उद्याची बंदच करतो. आख्या देशची आर्थिक राजधानी अनं म्हने मुंबई भिकारी
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 08/27/2018 - 10:12 नवीन
'मुंबईत भयंकर गर्दीये' ही तक्रार मुंबईकराखेरीज इतरच लोक जास्त करत असतात. मुंबईतली हवा,गर्दी,डास असल्या गोष्टींना कोणीही कितीही नावं ठेवली तरी त्याला ती खुशाल ठेऊ द्यावीत. कारण मुंबईचा अभिमान बाळगलाच पाहिजे अशी काही अट नाहीये.म्हणजे मुंबईकर व्हायला ही अट लागतच नाही. ती पुण्याला, तिथे अभिमान पाहिजे. उलट मुंबईला कोणी जर 'एक भिकार' म्हणत असेल तर आपण 'सात भिकार' असं सांगून मोकळं व्हावं.
- पु.ल.देशपांडे हा गुरुमंत्र फार प्रभावी आहे :)
  • Log in or register to post comments
स
सुनील Mon, 08/27/2018 - 10:23 नवीन
उलट मुंबईला कोणी जर 'एक भिकार' म्हणत असेल तर आपण 'सात भिकार' असं सांगून मोकळं व्हावं.
तेच तर केलय इथे!! (सध्याचा ठाणेकर. जन्माने मुंबईकर)
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Mon, 08/27/2018 - 10:32 नवीन
:)
  • Log in or register to post comments
आ
आदिजोशी Mon, 08/27/2018 - 17:08 नवीन
पुणेकरांनी आणि इतरांनी कितीही काहीही गाजावाजा केला, निरांजन ओवाळून घेतले तरी जगातला सर्वोत्तम शाकाहारी खाद्यपदार्थ 'आस्वादची मिसळ' आहे. त्यामुळे चालू द्या तुमचं...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    6 days 18 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    6 days 19 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    6 days 19 hours ago
  • सुंदर !!
    6 days 19 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    6 days 19 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा