ओट्सचा झटपट उत्तपा
ओट्सचा आहारात कसा समावेश करावा हा प्रश्न बर्याचदा सतावतो. ओट्सचे बिस्कीट आवडतात, पण किती वेळा करणार, म्हणून हा एक प्रयोग करुन पाहिला. ओट्सचा डोसा, उत्तपा असे प्रकार ऐकले होते, पण शोधाशोध करण्याइतका वेळ नव्हता. म्हणून नेहमी रव्याचे उत्तपे करते तसेच ओट्सचे करुन पाहिले.
मस्त आणि फस्तही झाले! घाईत हाच फोटो बरा आला.
साहित्यः
२ वाट्या ओट्स (मिक्सरमध्ये बारीक करुन पूड करुन),
१ वाटी रवा,
दीड वाटी दही,
१ हि. मिरची बारीक चिरुन,
पाणी,
तेल,
मीठ,
१/२ टी. स्पून सोडा,
कांदा, कोथिंबीर बारीक चिरून
कृती:
१. ओट्सची पूड, रवा, दही एकत्र करा. उत्तपे, डोसे घालता येतील असे मिश्रण होईल इतपत पाणी घाला.
२. मीठ, मिरची, सोडा घालून एकत्र करुन घ्या. साधारण अर्धा तास झाकून ठेवा.
३. मध्यम आचेवर नॉनस्टीक पॅन गरम करुन तेलाचे ४-५ थेंब टाकून उत्तपा घाला.
४. वरुन कांदा, कोथिंबीर पसरवा (मी कोथिंबीरीऐवजी पालक बारीक चिरुन घातला).
५. २-३ मिनिटांनी उत्तपा उलटून दुसर्या बाजूने थोडासा भाजून घ्या.
गरम-गरम उत्तपा केचप, चटणीबरोबर खायला द्या.
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments