Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
पाककृती

ओट्सचा झटपट उत्तपा

र
रुपी
Sat, 05/27/2017 - 01:44
. ओट्सचा आहारात कसा समावेश करावा हा प्रश्न बर्‍याचदा सतावतो. ओट्सचे बिस्कीट आवडतात, पण किती वेळा करणार, म्हणून हा एक प्रयोग करुन पाहिला. ओट्सचा डोसा, उत्तपा असे प्रकार ऐकले होते, पण शोधाशोध करण्याइतका वेळ नव्हता. म्हणून नेहमी रव्याचे उत्तपे करते तसेच ओट्सचे करुन पाहिले. मस्त आणि फस्तही झाले! घाईत हाच फोटो बरा आला. साहित्यः २ वाट्या ओट्स (मिक्सरमध्ये बारीक करुन पूड करुन), १ वाटी रवा, दीड वाटी दही, १ हि. मिरची बारीक चिरुन, पाणी, तेल, मीठ, १/२ टी. स्पून सोडा, कांदा, कोथिंबीर बारीक चिरून कृती: १. ओट्सची पूड, रवा, दही एकत्र करा. उत्तपे, डोसे घालता येतील असे मिश्रण होईल इतपत पाणी घाला. २. मीठ, मिरची, सोडा घालून एकत्र करुन घ्या. साधारण अर्धा तास झाकून ठेवा. ३. मध्यम आचेवर नॉनस्टीक पॅन गरम करुन तेलाचे ४-५ थेंब टाकून उत्तपा घाला. ४. वरुन कांदा, कोथिंबीर पसरवा (मी कोथिंबीरीऐवजी पालक बारीक चिरुन घातला). ५. २-३ मिनिटांनी उत्तपा उलटून दुसर्‍या बाजूने थोडासा भाजून घ्या. गरम-गरम उत्तपा केचप, चटणीबरोबर खायला द्या.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 8659 views

💬 प्रतिसाद
र
रुपी Sat, 05/27/2017 - 03:43 नवीन
Image removed. फोटो दिसेना.. प्लीज अ‍ॅड करा
  • Log in or register to post comments
र
राघवेंद्र Sat, 05/27/2017 - 06:10 नवीन
मस्त एकदम!!!
  • Log in or register to post comments
प
पद्मावति Sat, 05/27/2017 - 07:05 नवीन
मस्तच.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/27/2017 - 07:40 नवीन
लै भारी. अजून येवू द्या. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
र
रुपी Sat, 05/27/2017 - 23:01 नवीन
धन्यवाद :)
  • Log in or register to post comments
क
कौशी Sun, 05/28/2017 - 05:11 नवीन
फोटो खुप मस्त... आवडला.
  • Log in or register to post comments
ए
एस Sun, 05/28/2017 - 15:01 नवीन
भारीच. खाली काय आहे ते? तुम्हीच बनवलं आहे का?
  • Log in or register to post comments
द
दशानन Sun, 05/28/2017 - 15:11 नवीन
एकदम बालिश प्रश्न वाटेल पण "ओट्स" म्हणजे काय?
  • Log in or register to post comments
स
सविता००१ Sun, 05/28/2017 - 19:14 नवीन
मस्तच ग
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 05/29/2017 - 00:47 नवीन
धन्यवाद! @एस भाऊ - नाही हो. माझ्यात इतकी कला कुठली? :) माझ्याकडे एक मॅट आहे ते चित्र असलेलं, त्यावर डीश ठेवून फोटो काढला. @दशानन - ओट्स हे एक तृणधान्य आहे. मी वापरलेले ओट्सचा हा अ‍ॅमेझॉनवरुन फोटो. त्याची पूड करुन यात वापरलीये. Image removed.
  • Log in or register to post comments
द
दशानन Mon, 05/29/2017 - 04:36 नवीन
हे हुग्गीचे गहू आहेत का? म्हणजे हे चपटे केले आहेत की असेच असतात?
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 05/29/2017 - 23:13 नवीन
"हुग्गीचे" म्हणजे काय? हे गहू नाहीत. ओट्स (Oats) हे वेगळे धान्य आहे. हे फोटोमधले चपटे केलेले आहेत. त्यांना Rolled Oats म्हणतात.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Mon, 05/29/2017 - 16:38 नवीन
केले आजच. रव्या ऐवजी इडली रवा वापरला. ओट्स जास्त घेतले गेले बहुदा म्हणुन मिश्रण खुप चिकट झालं पण उत्तम झाले. Image removed.
  • Log in or register to post comments
र
रुपी Mon, 05/29/2017 - 23:14 नवीन
वा. मस्तच जाळी पडली आहे.
  • Log in or register to post comments
अ
अजया Mon, 05/29/2017 - 18:19 नवीन
छान पाकृ रुपी :)
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    21 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    21 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    21 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    21 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    21 hours 35 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा