Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
पाककृती

झटपट पुरण पोळी

क
किर्ति
Tue, 09/30/2008 - 18:42

  • Log in or register to post comments
  • 10032 views


वाचनखूण लावा
| 10032 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सागर Tue, 09/30/2008 - 19:07 नवीन
दाळव म्हणजे पुरण का?
  • Log in or register to post comments
अ
अनामिक Tue, 09/30/2008 - 23:30 नवीन
नाही..... दाळवं = डाळे/डाळं (साल नसलेले फुटाणे) - विदर्भात दाळवं म्हणतात... (तसेच वेलचीला विदर्भात विलायची म्हणतात... मी विलायची म्हणायचो तेव्हा माझे मित्र मला भरपूर हसायचे) झटपट पुरण पोळीची आयडीया मस्तच!
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 09/30/2008 - 19:47 नवीन
करून बघते. डाळे (साल नसलेले फुटाणे) म्हणजे चणा डाळ च ना? आणि डाळ भिजवायची नाही का आधी? चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 09/30/2008 - 20:18 नवीन
चकली ताई, अगं डाळं गं.. ते चिवड्यात घालतात ते. त्याला हिंदीत फूटा चना म्हणतात बहुतेक. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
च
चकली Tue, 09/30/2008 - 20:39 नवीन
ओके...दाळवं काय ते कळले.. thanks प्राजु चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 10/01/2008 - 03:35 नवीन
किर्ति, सोपी आणि पटकन होणार्‍या पोळ्यांची कृती सांगितल्या बद्दल धन्यवाद !
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Wed, 10/01/2008 - 04:22 नवीन
पाकृ नामंजूर...! क्षमस्व... उत्तम गाणं आणि उत्तम खाणं ह्यात कधीही काहीही झटपट, इन्स्टंट नसतं असा आमचा ठाम विश्वास आहे!` हां, चार चुरमुर्‍यात शेव-चणे-दाणे घालून कुणी झटपट सुकी भेळ केली तर एक वेळ समजण्यासारखे आहे. परंतु झटपट पुरणपोळी?? केवळ अशक्य आहे! हे म्हणजे 'झटपट भीमपलास' असं म्हणण्यासारखं आहे. उत्तम पुरणपोळी अन् उत्तम भीमपलास प्रसन्न होण्याकरता जन्मभराची तपस्या लागते असा आमचा ठाम विश्वास आहे! ती झटपट येणारी कामं नव्हेत! आपला, (पारंपारिक पद्धतीने केलेली पुरणपोळी आवडणारा!) तात्या.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 10/01/2008 - 05:02 नवीन
मला वाटलं, तू सुद्धा "वा, काय झकास रेसेपी !",म्हणतोस की काय! असं म्हटलं असतंस तर तुझी "खवय्या" ही पदवी अस्वीकार (मराठीत "क्यान्सल!!") करायचं ठरवलं होतं.......:) पुरणपोळी ही इन्स्टंट करायची गोष्टच नाही....... ती मुलींनी आपल्या आईकडून (अगदी खरं सांगायचं तर आजीकडून) शिकायची पाककॄती आहे...... माफ करा, पण फुटाण्याच्या डाळीची पुरणपोळी? बाकी पुरणपोळी ही कधीच नुसती पुरणपोळी नसते.... तेलपोळी की पीठपोळी हे जास्त महत्वाचं..... पीठ्पोळी बहुतेक कोणालाही माहीती आहे, पण जर तुम्ही तेलपोळी खाल्ली नसेल तर तुम्ही खरी पुरणपोळी खाल्लेलीच नाही असे मी म्हणेन...... खर्‍या पुरणपोळीसाठी चपातीचं किंवा पोळ्यांच्या पिठाचं प्रमाण वापरत नाहीत, त्या पिठाला एक विशिष्ठ चिकणाई लागते! त्याशिवाय पुरण भरल्यावर पातळ आणि नितळ पोळी लाटली जात नाही!!! त्या पिठाची योग्य चिकणाई जमवण्यासाठी स्पेशल कुशलता लागते..... आणि अशी तेलपोळी जेंव्हा काकू करते (कटाच्या आमटीसकट!!) तेंव्हा हा काका मरून स्वर्गलोकी जाण्यास आनंदाने तयार असतो..... होळीची वाट पहाणारा, डांबिसकाका
  • Log in or register to post comments
भ
भाग्यश्री Wed, 10/01/2008 - 05:09 नवीन
अरेवा, काका.. तुम्हाला माहीती आहे की!! तुम्ही करून पाहीली की काय पुपो? मला पुरणपोळी करताना आईने हेच सांगितलं, की कणिक सैल मळून अर्धा तास ठेव.. आणि नंतर भरपूर तेल घालून मळून, कणीक पूर्ण बुडेल इतक्या तेलात ठेव.. मी अवाक झाले होते! पण तसं करून पाहीलं, आणि अमेझिंग होते पोळी! :) ह्म्म, बाकी, पाककृती आहे छान.. पण पुरणपोळीमधे तडजोड नको वाटते.. इतकं खपून पुपो केली की काय मजा येते खायला!?
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Wed, 10/01/2008 - 05:16 नवीन
अरेवा, काका.. तुम्हाला माहीती आहे की!! तुम्ही करून पाहीली की काय पुपो? मी स्वतः कशाला करायला पाहिजे? मी तर अशी झक्कास पुरणपोळी करणारी पोरगी पटवली आहे की!!! :) (पेढा करण्याचे कसब असण्यापेक्षा हलवायाची मैत्री जास्त महत्वाची!!!!)
  • Log in or register to post comments
श
शुभान्गी Fri, 10/10/2008 - 23:26 नवीन
करुन बघायला पाहिजे........ रेसेपि सोपि आहे.... चव कशी असेल .... उत्सुकता आहे....
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा