किवी आणि कांगारूंच्या देशांत १५ : कुरांडा - निसर्गरम्य रेल्वे, वर्षारण्य (rainforest) आणि रज्जूमार्ग (skyrail)
Book traversal links for किवी आणि कांगारूंच्या देशांत १५ : कुरांडा - निसर्गरम्य रेल्वे, वर्षारण्य (rainforest) आणि रज्जूमार्ग (skyrail)
===================================================================
किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)
===================================================================
...या कार्यक्रमाने दिवसभरच्या धावपळीमुळे आलेला थकवा आणि अव्यवस्थापनामुळे झालेली चिडाचीड विसरायला लावली आणि सर्वजण खुशीत गप्पा मारत हॉटेलवर परतलो.
आजचा पूर्ण दिवस प्रत्येक प्रवाशाच्या आवडीच्या गोष्टी करायला सोडलेला होता. पर्याय होते संपूर्ण दिवस आरामात लोळणे आणि केर्न्समघे भटकणे किंवा डेंट्री वर्षारण्याची सफारी अथवा कुरांडा वर्षारण्याची सफारी. पहिला पर्याय माझ्या स्वभावात बसणारा नव्हता. इतर दोन मधली कुरांडाची सफारी तिच्यातल्या वैविध्यामुळे (रेल्वे + पायी + केबलकार) जास्त आवडली होती म्हणून तीच निवडली.
साडेसात वाजता आमची बस निघाली. केर्न्स हे उष्णकटीबंधात आहे. त्यामुळे तेथे भरपूर पाऊस पडतो आणि सर्व परिसर हिरवागार आहे. केर्न्सच्या रम्य उपनगरांतून प्रवास करताना घेतलेले हे काही फोटो...
.
.
.
बसने आम्हाला केर्न्सच्या बाहेरच्या एका "फ्रेशवॉटर" नावाच्या रेल्वे स्टेशनवर सोडले. कुरांडा माथेरानसारखे हिरव्यागार वनामधल्या एका झाडीने भरलेल्या डोंगरावर वसले आहे. केर्न्सहून तेथे जाण्यासाठी माथेरानसारखीच रेल्वे आहे. मात्र ही माथेरानसारखी छोटी नसून मोठ्या आकाराची रेल्वे आहे.
थोडा वेळ इकडे तिकडे करत आणि कुरांडा रेल्वेसंबद्धिचे एक छोटे संग्रहालय बघण्यात वेळ घालवल्यावर गाडीचे आगमन झाले आणि आम्ही निघालो...
शहर मागे पडले...
आणि चक्क उसाची शेती सुरू झाली...
नंतरचा सगळा प्रवास निसर्गरम्य हिरव्यागार वनराईतून होता...
कधी कधी कोंकणाची आठवण यावी असा परिसर दिसत होता...
थोड्याच वेळात डोंगराळ भाग सुरू झाला आणि वळणावळणाचा चढा मार्ग सुरू झाला...
.
.
.
दूरवरून दिसणारे केर्न्स आणि दूर क्षितिजाजवळ दिसणारा कोरल समुद्रकिनारा...
स्टोनी क्रीक धबधबा...
या ३७ किलोमीटर लांब रेल्वेमार्गावर एकूण ३७ पूल आणि १५ बोगदे आहेत. त्यातला शेवटचा बोगदा ४९० मीटर लांब आहे. हे सगळे काम झाले त्या काळात (१८८२ -१८९१) आजच्या सारखी प्रगत उपकरणे नव्हती आणि सगळे काम मनुष्यबळ वापरून केलेले आहे.
हा अवघड लोहमार्ग प्रतिकूल परिस्थितीत बांधणार्या रॉब नावाच्या स्थापत्यशात्रविषारदाचे नाव दिलेला एक नैसर्गिक स्तंभ... रॉब्ज मॉन्युमेंट... वाटेत लागतो...
बॅरन धबधबा... हा समुद्रसपाटीपासून ३२९ मीटर उंच आहे आणि त्याच्या पाण्याच्या धारेची उंची २६५ मीटर आहे. याच्या पाण्याच्या शक्तीवर १९३२ सालापासून वीजनिर्मिती केली जात आहे...
आजूबाजूचे सृष्टीसौंदर्य पाहता पाहता कुरांडाला केव्हा पोचलो ते कळलेच नाही...
.
कुरांडा गाव आणि त्याचा परिसर त्यांचे "उष्णकटिबंधीय नंदनवन (Tropical paradise)" हे नाव खरंच सार्थ करतात. गावात आणि आजूबाजूच्या जंगलात (खरं म्हणजे गावच जंगलात वसलेले आहे) फिरण्यासाठी अडीच-तीन तास दिलेले होते. प्रवासी आपापल्या आवडीप्रमाणे छोटे समूह बनवून गावाची सफर करायला निघाले...
.
.
डोंगरावरचे छोटेसे गाव असले तरी पोटोबासाठी आणि प्रवाशांच्या खरेदीसाठी भरपूर व्यवस्था होती...
.
गावाच्या आजूबाजूला अनेक उत्तम निगा ठेवलेल्या आणि मार्गदर्शक पाट्या असलेल्या निसर्गरम्य पायवाटा (walking tracks) आहेत. बहुतेक जणांना फक्त गावाच्या रस्त्यांवरून फिरून पोटोबा करणे (इथेही होकी-पोकी होतेच !) आणि खरेदी करणे जास्त पसंत दिसले. त्यामुळे पोटोबा झाल्यावर एकटाच वर्षारण्यात भटकायला निघालो...
.
.
.
......
.
.
वाटेत ही (बहुतेक जंगली टर्की) भेटली. तेव्हा तिला हॅलो म्हणायला गेलो तर लगेच पळून गेली...
पाच-साडेपाच किमीच्या पदभ्रमणानंतर परत गावाकडे परतलो...
.
.
आता पुढचा टप्पा होता रज्जूमार्ग (skyrail) वापरून डोंगर उतरायचा...
.
हा साडेसात किमी लांबीचा रज्जूमार्ग उंच वृक्षांनी भरलेल्या घनदाट जंगलावरून जातो. वाटेत दोन थांबे आहेत. तेथे उतरून आपल्याला मोक्याच्या ठिकाणांवरून जंगलाच्या सौंदर्याचा आस्वाद घेता येतो.
सुरुवातीला हा मार्ग बॅरन नदीवरून जातो...
थोड्याच वेळात आपण उंच जात जात उंच वृक्षांच्या वरच्या टोकांच्याही वर पोहोचतो...
.
आणि मग सगळे जंगल आपल्या पायतळीच नाही तर पायतळीच्या वीस तीस मीटर खाली असते...
नजरेच्या टप्प्यापर्यंत चारीबाजूला पसरलेल्या उंचच उंच आणि घनदाट जंगलावरून तरंगत जातानाचा अनुभव काही वेगळाच !...
वेगवेगळ्या प्रकारची गर्द वनराई आणि त्यातली काही अनोळखी मोहराने भरलेली झाडे बघताना भान हरखून जाते...
.
साधारण दहा पंधरा मिनिटाचा वेळ कधी संपला ते कुरांडा पासून १.७ किमी वर असलेले बॅरन फॉल स्टेशन आले तेव्हाच कळले...
येथे येथे काही काळ थांबून बॅरन धबधब्याचे आणि त्याच्या परिसराचे मोक्याच्या जागांवरून दर्शन करता येते...
.
उताराचा प्रवास परत सुरू केला की हा हा म्हणता आपण परत वृक्षराजीच्या शेंड्यांच्या वर पोहोचतो...
.
.
.
रज्जूमार्गाचा दुसरा थांबा आहे रेड पीक स्टेशन. हे येथील सर्वात उंच ठिकाण समुद्रसपाटीपासून ५४५ मीटर उंच आहे. येथे एक १७५ मीटर लांबीचा जंगलातील पदपथ आहे. त्याच्या बाजूला काही भलेमोठे वृक्षराज आहेत...
या स्टेशनवरून शेवटचा टप्पा केर्न्सकडे घेऊन जातो...
.
.
हॉटेलवर परतेपर्यंत तीन वाजत आले होते. मस्तपैकी शॉवर घेऊन दीड तास ताणून दिली. जाग आली तेव्हा बाहेर अंधार पडला होता. पोटात कावळे ओरडू लागले होते. गाईडकडून रॉयल इंडिया नावाच्या भारतीय रेस्तरॉचा पत्ता काढलेला होताच. ते जवळच दोन चौक सोडून समुद्रकिनार्यावर होते. रमत गमत त्याचा शोध काढत गेलो आणि त्याला राजाश्रय दिला. जेवण झाल्यावर समुद्रावर रपेट मारायला बाहेर पडलो. रात्रीच्या प्रकाशात केर्न्स मोहनगरीच वाटली...
खाण्यापिण्याची दुकाने गिर्हाईकांच्या गर्दीने गजबजली होती...
समुद्रकिनार्यावरच्या तलावांत दिव्यांच्या प्रकाशात अजूनही काही लोक जलक्रीडा करत होते...
आणि बहुतेक 'हे अजून का घरी जात नाहीत?' असाच विचार करत एक लाईफ गार्ड त्याच्या उच्चस्थानी बसलेला होता...
ही सगळी गंमत पाहत समुद्र किनार्यावरून फिरत फिरत हॉटेलवर परतलो.
(क्रमशः )
===================================================================
किवी आणि कांगारूंच्या देशांत : ०१... ०२... ०३... ०४... ०५... ०६... ०७... ०८... ०९... १०... ११... १२... १३... १४... १५... १६... १७... १८... (समाप्त)
===================================================================
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments