Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
भटकंती

अ‍ॅडलॅब्ज इमॅजिका

म
मोदक
Mon, 04/22/2013 - 23:41
💬 66

.

गुरूवारच्या टाईम्स मध्ये पानभर जाहीरात बघून उत्सुकता चाळवली गेली असताना ऑफीसमधल्या मित्रांनी रविवारी जाण्याचे नक्की केले.

दहा / साडेदहा वाजता पोहोचण्याचे ठरले असल्याने फारशी गडबड न होता एक्स्प्रेस वे ने सर्वजण मार्गस्थ झालो.

एक्स्प्रेस वे

.

खालापूर टोल नाक्यानंतर पालीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरून तीन किलोमीटर अंतरावर हे पार्क वसलेले आहे.

अचानक चित्रविचित्र आकाराचे लोखंडी सांगाडे व कमानी दिसू लागल्या.. एक भलामोठ्ठा काहीतरी प्रकार घड्याळाच्या लंबकासारखा भयानक रीतीने फिरत होता, त्या राईडमध्ये बसलेल्या लोकांच्या किंकाळ्या दूरपर्यंत ऐकू येत होत्या!

पार्किंग लॉटमधून..

.

इमॅजिका..

.

प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असणारी कडेकोट तपासणी व्यवस्था.

.

तब्बल १६०० एकर मध्ये पसरलेल्या पार्कमध्ये असलेल्या वेगवेगळ्या राईडस्, खाण्यापिण्याची ठिकाणे, खरेदीसाठी असलेली दुकाने व इतर माहिती असणारा नकाशा तिकीटांसोबत मिळाला.

संपूर्ण पार्क कलात्मकतेने वसवला आहे.

.

.

हा जरी पुतळा असला तरी या प्रकारचे एक वाद्य असते.. याचे नाव माहिती आहे का..?

.

ऊन जाणवू लागल्याने राईड्सचा विचार बाजूला ठेवून आम्ही इनडोअर शो कडे मोर्चा वळवला.

१) आय फॉर इंडीया

.

या शोमध्ये आपण बसतो ती खुर्ची जमिनीपासून २५ / ३० फुट वर उचलून समोर असलेल्या ९० फुटी भव्य पडद्यावर भारतातील विविधतेची हेलीकॉप्टर सवारी केली जाते.
ताज महाल, सुवर्ण मंदिर, हंपी, राजस्थान, जोग फॉल्स, गंगोत्री, पॅगाँग त्सो लेक, दल सरोवर, गेट वे ऑफ इंडीया, जामा मशीद, राम सेतू, लेक पॅलेस उदयपूर अशा अनेक ठिकाणांची झलक पहावयास मिळते. निव्वळ अप्रतीम!

२) मिस्टर इंडीया

.

एका प्रचंड मोठ्या सिम्यूलेटरवर आपण बसून ही थरारक राईड अनुभवतो.

(अमरीश पुरी, अनिल कपूर व श्रीदेवी च्या मिस्टर इंडीयामधला मोगॅम्बो पुन्हा जिवंत होतो व पुढे....)

३) प्रिन्स ऑफ द डार्क वॉटर्स

.

एका प्रचंड मोठ्या डोम स्क्रीन वर हा शो दाखवला जातो..

डोम स्क्रीन

.

४) राजासॉरस

.

डायनोसॉरस असलेल्या एका जंगलामधील झर्‍यातून आपण बोटीने पाच मिनीटे संथ प्रवास करतो व अचानक..

.

५) अलीबाबा आणि चाळीस चोर

.

या राईडमध्ये आपण एका कारमध्ये बसून व्हिडीओ गेम प्रमाणे हातात लेसरची बंदूक घेवून गोळीबार करत पॉईंट्स कमवायचे व शक्य झाले तर बक्षीस घेवून जायचे!

संपूर्ण पार्कमध्ये फिरण्यासाठी शटल.

.

पायी चालण्यासाठी संपूर्ण पार्कमध्ये प्रशस्त रस्ते व जागोजागी तत्पर मार्गदर्शक नेमले आहेत.

.

रेन डान्स

.

लहान मुलांसाठी..

.

.

वॉटरफ्रंट

.

पोटपूजेसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.. जगाच्या विविध भागामध्ये मिळणार्‍या अन्नपदार्थांसाठी वेगवेगळी चित्तवेधक ठिकाणे तयार केली आहेत.

१) (हे एक रेस्टॉरंट आहे!)

.

२)

.

३)

आम्ही जेवलो ते ठिकाण.. येथे दाक्षिण भारतीय व इटालियन पदार्थ मिळत होते. (खालच्या फटूमध्ये तिथली उत्साही मुले कसरतीचे प्रयोग करत होती.

.

(आम्ही जेवलो तेथे गर्दीमुळे व्यवस्था कोलमडली होती.. कुपन घेण्यासाठी व नंतरही बराच वेळ थांबावे लागले.)

जेवण झाल्यानंतर थोडावेळ टीपी केला, ऊन कलल्यानंतर राईडस ला सुरूवात केली..

.

या राईडमध्ये आपण एका कपबशीमध्ये बसून गोल गोल फिरतो.. फिरण्याची गती आपण नियंत्रीत करू शकतो.
(थोडासा बालीश प्रकार होता किंवा लहान मुलांसाठी असेल आणि आम्ही घुसखोरी केली असावी ;-))

.

वाईल्ड वेस्ट काऊंटी गोल्ड रश ही एक रोलर कोस्टर आहे.. वळणावळणाचे साधारण एक किमी अंतर व धडकी भरवणार्‍या तीन चार जागा आहेत.

सगळ्यात पुढच्या कारमध्ये.. मग मागच्या कारमध्ये, मधल्या कारमध्ये आतील बाजूस, बाहेरील बाजूस अशा वेगवेगळ्या ठिकाणी बसून चार पाच वेळा यातून फेर्‍या मारल्या. ;-)

या रोलर कोस्टर चा मार्ग..

.

या D2 लिहीलेल्या टॉवर भोवतीही वाईल्ड वेस्ट काऊंटी रोलर कोस्टर चा मार्ग आहे.

.

D2 - Dare to Drop यामध्ये वर दिसणार्‍या १३२ फुटी टॉवरवर आपण क्षणार्धात ७३ किमी च्या गतीने जातो.. व अचानक त्याच वेगाने खाली येतो.. थरारक. उंचीला दृष्टी सरावेपर्यंत आपण पुन्हा त्याच वेगाने खाली येतो.. व थोडे स्थिरस्थावर होईपर्यंत पुन्हा त्याच उंचीवर पोहोचतो!

जाहिराती मध्ये दाखवलेले एक जायंट रोलर कोस्टर (दोन लूप असलेले) अजून सुरू झालेले नाहीये. :-(

स्क्रीम मशीन..

.

चार पायांवर तोलल्या गेलेल्या या स्ट्रक्चरमधून रवीसारखा दिसणारा भाग लंबका सारखा फिरतो.. भयानक बाब म्हणजे संपूर्ण भाग लंबगतीने फिरत असताना खालचे चक्र स्वत:भोवती गोल फिरते.. प्रचंड वेगाने.

.

ज ह ब ह रा अनुभव होता.. आपण नक्की कोणत्या दिशेने फिरत आहोत हे लवकर लक्षातच येत नाही.

आणखी काही राईड्स

.

.

हे सर्व होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. भेटवस्तूंची खरेदी आवरून सर्वजण बाहेर पडलो व बॅक टू पुणे.

***************** महत्त्वाची माहिती *****************

१) संपूर्ण पार्कमध्ये फिरताना उन्हापासून संरक्षणासाठी गॉगल व टोपी शक्यतो बाळगावी.
२) शो साठी वेटींग १५ ते २० मिनीटे व मुख्य शो १० ते २५ मिनीटांचा आहे.
३) राईड्स मोकळ्या होत्या.. फारसे वेटींग नव्हते.
४) संपूर्ण पार्क अत्यंत स्वच्छ व नीटनेटके राखलेले आहे.
५) बाहेरचे अन्नपदार्थ आतमध्ये न्यायला बंदी आहे.
६) पुण्यापासून अंतर ९० ते १०० किमी.

***************** खर्च *****************

१) कार पार्किंग रू १००/- व दुचाकी रू ५०/- (कव्हर्ड पार्किंग नाहीये.)

२) प्रवेशाचे तिकीट - रू १५००/- एका व्यक्तीसाठी.
एकदा प्रवेश घेतल्यानंतर सर्व राईड्स व शो साठी कोणताही चार्ज नाही.

३) जेवण चवीच्या दृष्टीने ठीकठाक होते.
दर - इडली ९० रूपये प्लेट, पावभाजी १६० रू प्लेट, बाटलीबंद पाणी ६० रू लिटर हे व असे रेट होते.

***************** *** *****************

फोटो जास्ती मोठे वाटत असतील तर जरूर कळवा.. सवडीने नीट करतो.


  • Log in or register to post comments
  • 19707 views


वाचनखूण लावा
| 19707 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
श
श्रीरंग_जोशी Mon, 04/22/2013 - 23:56 नवीन
गरिबांचे डिझ्नीलँड (उपरोध नाहीये प्रेमाने म्हणतोय) रोचक वाटत आहे. बर्‍याच सजावटी / रचना कल्पक आहेत. शेवटी दिलेली माहितीबद्दल विशेष धन्यवाद. हो चित्रे प्रमाणापेक्षा मोठी झाली आहेत. लांबी रूंदीचे गुणोत्तर न बदलता लहान करावीत ही विनंती.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 04/23/2013 - 00:06 नवीन
चालेल.. चित्रे लहान करतो उद्या परवा. सद्यस्थितीला ब्राऊजरचा झूम छोटा करून चित्रे बघावीत! ;-)
  • Log in or register to post comments
J
jaypal Tue, 04/23/2013 - 06:07 नवीन
फोटो,वर्णन आणि माहिती आवडली. फोटोची साईझ मला तरी बरोबर वाटते आहे, (लहान केल्यास राईड्सची भव्यता टिपण्याच्या किंवा दाखव्ण्याच्या प्रयत्नास बाधक ठरेल असे वाटते)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 04/23/2013 - 14:15 नवीन
लेखन पहिल्यांदा प्रकाशित झाले तेव्हा त्यातले फोटोज फारच मोठे होते. उजव्या बाजूच्या घोषणा, दुवे यांनाही पार्श्वभूमी मिळाली होती. नंतर लेखकाने लहान करवून घेतल्याने ती परिस्थिती राहिली नाही. बाकी सद्यपरिस्थितीमध्ये (दुष्काळ) या पार्कने पाण्याचा जपून वापर केल्याने हिरवळ नसेल तर ती स्पृहणीय बाब आहे.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 04/23/2013 - 21:33 नवीन
नंतर लेखकाने लहान करवून घेतल्याने ती परिस्थिती राहिली नाही. हे मी नाही करवून घेतले.. पण फोटो लहान झाले आहेत. ज्या कुणी अज्ञात संपादकांनी हे काम केले आहे त्यांना माझे शतश: धन्यवाद!
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 04/23/2013 - 21:36 नवीन
नंतर लेखकाने लहान करवून घेतल्याने ती परिस्थिती राहिली नाही. हे मी नाही करवून घेतले.. पण फोटो लहान झाले आहेत. ज्या कुणी अज्ञात संपादकांनी हे काम केले आहे त्यांना माझे शतश: धन्यवाद! :-)
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Tue, 04/23/2013 - 22:21 नवीन
अज्ञात संपादकांच्या ज्ञात सत्कॄतीबद्दल धन्यवाद. आशा आहे मोदक पुढल्या वेळी संपादकांना अतिरिक्त कष्ट करायला लावणार नाही.
  • Log in or register to post comments
ग
गणपा Tue, 04/23/2013 - 00:05 नवीन
हा जरी पुतळा असला तरी या प्रकारचे एक वाद्य असते.. याचे नाव माहिती आहे का..?
त्याचे हार्प ऐसे नाव. बाकी अम्युझमेंट पार्क आवडले. आपल्याकडेही अशी पार्क तयार होऊ लागल्याचे पाहुन बरे वाटले.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 04/23/2013 - 00:34 नवीन
च्यामारी .. एकदम फ्लोरीडाच्या डीझनीवर्ल्ड मध्ये फीरुन आल्यागत वाटलं ... मस्त आहे एकदम !!!!
  • Log in or register to post comments
स
स्पंदना Tue, 04/23/2013 - 01:40 नवीन
पुण्यापासुन ९० १०० किमी. ठिक्केय. मस्त वाटले फोटो पण असल्या पार्कमध्ये मी फकत फिरत असते, एकही राइड मला जमत नाही. जीव कंठाशी येउन तो तोंडावटे बाहेर पडतो की काय अस होतं मला. मी आपली खाउन पिउन मस्त जमिनीवरुन फिरत राहेन.
  • Log in or register to post comments
न
नंदन Tue, 04/23/2013 - 03:10 नवीन
बराचसा युनिव्हर्सल स्टुडिओजचा प्रभाव जाणवला (हिरवा माज :))
  • Log in or register to post comments
व
वेल्लाभट Tue, 04/23/2013 - 03:17 नवीन
व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग ! मजा येते बाबा थीम पार्क्स मधे. माहितीबद्दल आभार!
  • Log in or register to post comments
स
स्मिता चौगुले Tue, 04/23/2013 - 05:11 नवीन
फोटो दिसत नाहीत
  • Log in or register to post comments
न
नगरीनिरंजन Tue, 04/23/2013 - 05:22 नवीन
छान आहे; पण जरा जास्त झाडं का लावत नाहीत तिथे? सगळं ओसाड दिसतंय.
  • Log in or register to post comments
ल
लॉरी टांगटूंगकर Tue, 04/23/2013 - 07:45 नवीन
मज्जा करा राव,!!!!!!!!मी पावसाळ्यात जावुन बघावे अशा वि४रात आहे.
  • Log in or register to post comments
म
मृत्युन्जय Tue, 04/23/2013 - 06:00 नवीन
सगळा रखरखाट वाटतो आहे. कृत्रिम वाटले खुप. पुरेश्या नियोजनाअभावी पार्क सुरु केले आहे असे वाटले. एवढी मोठी उपकरणे यंत्रे बसवली आहेत तर बराच वेळ गेला असणार. एवढ्या वेळात हिरवळ तयार करणे, झाडे लावणे अशक्य नव्हते. अंतर्गत रस्त्यांवर रखरखाट जाणवतो आहे. पुरेसे आडोसे, कमानी, छप्परं, सावलीची झाडे आदी तयार करुन हा त्रास कमी करता आला असता. जपानी / मुघल शैलीची उद्याने करुन जरा नेत्रसुखद आभास निर्माण करता आला असता. या सर्व गोष्टींमध्ये हे उद्यान मार खाते. शिवाय तिकीट दर भरघोस आहे. यापेक्षा तिकीट दर कमी करुन काही राइड्स मोफत आणि काही सशुल्क केल्यास जास्त बरे पडेल. असो. या सगळ्यामागेही बराच खर्च आला असणार आणि सध्यातरी हे उद्यान प्रचंड तोट्यात असणार त्यामुळे प्रवेशशुल्काबाबत जास्त बोलत नाही. नैसर्गिक संरचनेबद्दल मात्र आक्षेप आहेच.
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 04/23/2013 - 06:04 नवीन
तिकीट दर भरघोस आहे. यापेक्षा तिकीट दर कमी करुन काही राइड्स मोफत आणि काही सशुल्क केल्यास जास्त बरे पडेल बहुदा १ मे पासून तिकीट दर साधारण ५०० रू ने वाढवला जाणार आहे. सौजन्य - इमॅजिका कस्टमर केअर.
  • Log in or register to post comments
म
मराठी_माणूस Tue, 04/23/2013 - 17:15 नवीन
सगळा रखरखाट वाटतो आहे. तुमच्या प्रतिसादाने माझे टंकण्याचे कष्ट वाचले. फोटो पाहून माझेही तसेच मत झाले.
  • Log in or register to post comments
ज
जेनी... Tue, 04/23/2013 - 23:12 नवीन
चल्ता हय यार .... रखरखित असेनाका ... राइड्स मध्ये मज्जा येते न. ... मग झालं तर ! अ‍ॅपकॉट असचे ... रखरखित .... तरी मज्जा आली होती .... :D
  • Log in or register to post comments
श
श्रीरंग_जोशी Wed, 04/24/2013 - 01:16 नवीन
सी वर्ल्ड अन युनिवर्सल अन ६ झेंडे पण असेच, तरी मज्जा आली होती :-).
  • Log in or register to post comments
अ
अक्षया Tue, 04/23/2013 - 06:17 नवीन
वा छान. माहीती बद्दल धन्यवाद. :)
  • Log in or register to post comments
त
तर्री Tue, 04/23/2013 - 06:42 नवीन
उपयुक्त मस्त माहिती ! एकदम पसंत ! सुट्टीत पोरांना /भाच्यांना// पुतण्यांना सैर घडवतो येथे आणि काका / मामा म्हणून कॉलर कडक करून घेतो म्हटले - मनोमन आभार ! हल्ली "मेनू कार्डवर " आणि "मिपा" वर "मोदक" दिसला की अती आनंद होतो.
  • Log in or register to post comments
क
कोमल Tue, 04/23/2013 - 06:51 नवीन
बाप्रे.. फोटु बघुनच भिती वाटली.. सॉलिड एक्सिप्री असणार.. पण नक्कि जाउन येणार आहे.. बंगळूरुच्या "वंडर ला"ची हटकून आठवण झाली.. :)
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/23/2013 - 07:41 नवीन
झकास थीम पार्क दिसतेय. पण लैच महाग आहे राव. परवडणार नाय आपल्याला. :(
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 04/23/2013 - 07:50 नवीन
लैच हुच्च ओसाड गाव वाटतंय.. रेट बघून तरराईड मध्ये न बसताच भोवळ आली, इडलीचे दर बघून पोट तुडुंब भरलं ओसाड गावाला भरपूर शुभेच्छा सदर पैशात अक्खी कोकण वारी बाईक वर होईल माझी - मध्यमवर्गीय इस्पा
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 04/23/2013 - 08:19 नवीन
सदर पैशात अक्खी कोकण वारी बाईक वर होईल माझी कोकणवारीच्या तारखा आणि ठिकाण कळव रे.. तुमच्यातलाच ;-) - मोदक.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Tue, 04/23/2013 - 10:00 नवीन
झकास थीम पार्क दिसतेय. पण लैच महाग आहे राव. परवडणार नाय आपल्याला.
कॅनोन DSLR, सुम्संग ची हायएंड मोडेल आणि परदेशी किंडल वापरणार्यांनी असे प्रतिसाद दिल्याने ड्वोले पाणावले…हल्ली दुष्काळ असल्याने डोळेहि पाणावत नाईत (हे अजितदादांच्या टोन मध्ये वाचावे) :P
  • Log in or register to post comments
स
स्पा Tue, 04/23/2013 - 10:42 नवीन
कॅनोन DSLR, सुम्संग ची हायएंड मोडेल आणि परदेशी किंडल वापरणार्यांनी असे प्रतिसाद दिल्याने ड्वोले पाणावले…हल्ली दुष्काळ असल्याने डोळेहि पाणावत नाईत (हे अजितदादांच्या टोन मध्ये वाचावे)
अरारारा =))
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Tue, 04/23/2013 - 11:03 नवीन
मारता काय राजे आता. =)) =)) =)) अहो त्या गोष्टी हौसेपैकी आहेत तर थीम पार्क ही चैन आहे. :)
  • Log in or register to post comments
स
सूड Tue, 04/23/2013 - 12:18 नवीन
कॅनोन DSLR, सुम्संग ची हायएंड मोडेल आणि परदेशी किंडल वापरणार्यांनी असे प्रतिसाद दिल्याने ड्वोले पाणावले…
अगदी अगदी!!
  • Log in or register to post comments
द
दिपक.कुवेत Tue, 04/23/2013 - 07:44 नवीन
एस्सेल वर्ल्डला पर्याय निघाला. एक शंका...तिकिटाच्या दरात ज्या राईड्स आहेत त्या आपण कितिहि वेळा घेउ शकतो का? शिवाय सगळ्या मोठ्यांसाठि आहेत कि बच्चे कंपनीला पण वाव आहे?
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 04/23/2013 - 07:53 नवीन
तिकिटाच्या दरात ज्या राईड्स आहेत त्या आपण कितिहि वेळा घेउ शकतो का? हो.. कितीही वेळा कोणतीही राईड.. शिवाय सगळ्या मोठ्यांसाठि आहेत कि बच्चे कंपनीला पण वाव आहे? बच्चे कंपनीला वाव आहे. फक्त उंचीचे बंधन आहे - ठरावीक उंचीपेक्षा कमी मुलांना काही राईडमध्ये प्रवेश नाही वगैरे..
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Tue, 04/23/2013 - 07:48 नवीन
हम्म्म्म.... भारी आहे :)
  • Log in or register to post comments
म
मन१ Tue, 04/23/2013 - 08:06 नवीन
फटु दिसत नाहियेत हापिसात. एस्सेल वर्ल्ड मुंबै ला पाचशे रुपयात गेलो होतो. त्याची आठवण झाली. हे त्याहून भारी आहे का?
  • Log in or register to post comments
ल
लाल टोपी Tue, 04/23/2013 - 08:16 नवीन
जवळच आहे!! छान माहिती.
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 04/23/2013 - 08:19 नवीन
पण मी वॉटर पार्क, मुंबई ला गेले होते, ते मला जास्त छान वाटलं. पाणी असल्याने थंड, स्वच्छ, भरपुर झाडे असल्याने सावली होती.. ऊन लागले नाही.. (इथे थोडा रखरखाट वाटतोय..) शिवाय तिकीटही ६००/- होते. मला तरी पार्क पैसा वसुल वाटले. आतले जेवणाचे रेट्स पण अत्यंत साधारण होते. चवही ठिक होती. इथे जेवणही महाग वाटत आहे. एस्सेल वर्ल्ड पहीलेले नाही त्यामुळे खर तर त्याची आणि ह्याची तुलना जस्त योग्य ठरली असती..पण करु शकत नाही.. पण पुण्याच्या जवळ हा प्लस पॉईंट आहे इमॅजिकाचा..
  • Log in or register to post comments
प
पिलीयन रायडर Tue, 04/23/2013 - 08:21 नवीन
वॉटर पार्क नाही तर वॉटर किंगडम...
  • Log in or register to post comments
त
तिमा Tue, 04/23/2013 - 09:37 नवीन
आमी, सा पोरं आन दोगं धरुन आट! १५०० परमानं किती व्हतात हो आट शीटांचे ? न्हाय बा न्हाय परवडनार !
  • Log in or register to post comments
प
प्यारे१ Tue, 04/23/2013 - 10:54 नवीन
तरी सा घरी ठिवनार न्हवं? ;) आमाला पन नाय परवड्नार ब्वा! - रायडी बघूनच प्राण कंठाशी आलेला प्यारे
  • Log in or register to post comments
अ
अजया Tue, 04/23/2013 - 10:30 नवीन
घराजवळच आहे माझ्या हे पार्क. रखरखाट पाहुन सध्या जायची इच्छा नाही. खरेच त्याहून एस्सेल वर्ल्ड बरे वाटले!
  • Log in or register to post comments
प
पैसा Tue, 04/23/2013 - 10:44 नवीन
१५०० रुपयांत सगळ्या राईड्स आणि शो हे तसे महाग नाही. पण १२ रुपयाची पाण्याची बाटली ६०/- आणि इडली ९०/- हे कै च्या कै आहे.
  • Log in or register to post comments
M
Mrunalini Tue, 04/23/2013 - 11:53 नवीन
पार्क ठिक वाटले. एवढे नाही आवडले. म्हणजे राइड्स चांगल्या आहेत पण खुप ओसाड वाटते आहे पार्क.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 04/23/2013 - 13:08 नवीन
सहमत. ओसाडपणा आधी डोळ्यात भरतो. नुसते फोटो पाहतानाच प्रचंड उष्णता असेल असं जाणवतं. राईड्स , फूड जॉईंट्स वगैरे सर्व उत्तम असूनही ओसाडपणामुळे ठिकाण एकदम नीरस होऊन जातं. आर्थिक गणित करुनच हा पार्क बांधला गेला असेल पण, तरीही एक अंदाज असा आहे की हे दीर्घकाळ सांभाळण्यासाठी फार मोठं आणि व्यापाचं ठिकाण आहे. व्यावसायिकदृष्ट्या फायद्याच्या दृष्टीने यात दीर्घकालीन क्षमता दिसत नाही. ठिकाण मुख्य शहरांपासून फारच दूर आहे. सुखाने जायचे तर दृतगती महामार्गाला पर्याय नाही. म्हणजे टू व्हीलरवाल्या कुटुंबवत्सल गटाला तर हे आवाक्याबाहेरच आहे. (प्रवास आणि तिकीट दोन्हीदृष्ट्या) फोर व्हीलर असली तरी अंतर, वेळ अन जातायेता एक्स्प्रेसवे टोल आलाच. त्यामुळे रिपीट ग्राहक मिळणे कठीण. (जो एस्सेलवर्ल्ड / वॉटरकिंगडमला असतो) १६०० कोटींचा प्रोजेक्ट आहे असं आंजावर असलेल्या माहितीतून दिसतं. अशा वेळी प्रचंड आकर्षक (सुखद, कंफर्टेबल अशा अर्थाने आणि दरही आकर्षक) असल्याखेरीज फार काळ टिकणे कठीण. केवळ जमीन स्वस्तात पडली म्हणून कितीकाळ तग धरणार? त्यांच्या वेबसाईटवरही फार आकर्षक असं काही नाही. नियमच फार आहेत. इत्यादि शुभ बोल संपवतो.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Tue, 04/23/2013 - 12:14 नवीन
मोदका पार्क नादखुळा आहे, पार्क च्या नकाश्यात दाखवल्यात त्याप्रमाणे सगळ्या राईड्स,इमारती (Splash Ahoy,Curse of Salimgadh,Wrath of God,Imagica capital वगैरे ) चालू झाल्या आहेत का? नसल्यास कधी होतील माहित आहे का?
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 04/23/2013 - 17:59 नवीन
चार ते सहा महिन्यात चालू होतील असा (तिथल्या गाईडचा) अंदाज आहे.
  • Log in or register to post comments
म
मालोजीराव Wed, 04/24/2013 - 08:08 नवीन
मोदका 'हि' हिरवळ नव्हती म्हणून फटू रखरखीत वाटतायत, पण जरा 'ती' हिरवळ कॅमेरात टिपली असतीस तर 'बर्याच' सदस्यांनी रखरखीतपणाबद्दल जास्त आक्षेप नोंदवला नसता असं अनुमान आहे
  • Log in or register to post comments
म
मोदक Wed, 04/24/2013 - 08:12 नवीन
हे मृत्यूंजयाला उद्देशून आहे का..? :D
  • Log in or register to post comments
न
नाखु Tue, 04/23/2013 - 13:25 नवीन
धन्यवाद आप्ल्या सारख्या "मिपा श्रेष्ठींबरोबर " आम्हा वाचकांचे नाव आले.(मालोजी राव कुर्निसात)
  • Log in or register to post comments
अ
अत्रुप्त आत्मा Tue, 04/23/2013 - 14:03 नवीन
@अ‍ॅडलॅब्ज इमॅजिका>>> Image removed. @अ‍ॅडलॅब्ज इमॅजिका>>> अ‍ॅडलॅब्ज इमेजि----------------का???...!!!Image removed.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 04/23/2013 - 15:58 नवीन
हामेरिकन पार्कांच्या धर्तीवर तयार केले दिसते. मला तश्याही त्या राईडस भीतीदायक वाटतात. एकदा गेले होते आणि पुन्हा जाणार नाही हे ठरवून बाहेर पडले. लोक रोलर कोस्टर राईड घेताना हात सोडून कसे हसू शकतात हे समजत नाही (माझा नवरा व मुलगाही). तिकीट बरेच आहे, त्यामानाने अजून सोयी असायला हव्यात. लेखन व चित्रे तरीही आवडली.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 15 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 27 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 29 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 31 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 34 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा