Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
भटकंती

अ‍ॅडलॅब्ज इमॅजिका

म
मोदक
Mon, 04/22/2013 - 23:41
💬 66
. गुरूवारच्या टाईम्स मध्ये पानभर जाहीरात बघून उत्सुकता चाळवली गेली असताना ऑफीसमधल्या मित्रांनी रविवारी जाण्याचे नक्की केले. दहा / साडेदहा वाजता पोहोचण्याचे ठरले असल्याने फारशी गडबड न होता एक्स्प्रेस वे ने सर्वजण मार्गस्थ झालो. एक्स्प्रेस वे . खालापूर टोल नाक्यानंतर पालीच्या दिशेने जाणार्‍या रस्त्यावरून तीन किलोमीटर अंतरावर हे पार्क वसलेले आहे. अचानक चित्रविचित्र आकाराचे लोखंडी सांगाडे व कमानी दिसू लागल्या.. एक भलामोठ्ठा काहीतरी प्रकार घड्याळाच्या लंबकासारखा भयानक रीतीने फिरत होता, त्या राईडमध्ये बसलेल्या लोकांच्या किंकाळ्या दूरपर्यंत ऐकू येत होत्या! पार्किंग लॉटमधून.. . इमॅजिका.. . प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असणारी कडेकोट तपासणी व्यवस्था. . तब्बल १६०० एकर मध्ये पसरलेल्या पार्कमध्ये असलेल्या वेगवेगळ्या राईडस्, खाण्यापिण्याची ठिकाणे, खरेदीसाठी असलेली दुकाने व इतर माहिती असणारा नकाशा तिकीटांसोबत मिळाला. संपूर्ण पार्क कलात्मकतेने वसवला आहे. . . हा जरी पुतळा असला तरी या प्रकारचे एक वाद्य असते.. याचे नाव माहिती आहे का..? . ऊन जाणवू लागल्याने राईड्सचा विचार बाजूला ठेवून आम्ही इनडोअर शो कडे मोर्चा वळवला. १) आय फॉर इंडीया . या शोमध्ये आपण बसतो ती खुर्ची जमिनीपासून २५ / ३० फुट वर उचलून समोर असलेल्या ९० फुटी भव्य पडद्यावर भारतातील विविधतेची हेलीकॉप्टर सवारी केली जाते. ताज महाल, सुवर्ण मंदिर, हंपी, राजस्थान, जोग फॉल्स, गंगोत्री, पॅगाँग त्सो लेक, दल सरोवर, गेट वे ऑफ इंडीया, जामा मशीद, राम सेतू, लेक पॅलेस उदयपूर अशा अनेक ठिकाणांची झलक पहावयास मिळते. निव्वळ अप्रतीम! २) मिस्टर इंडीया . एका प्रचंड मोठ्या सिम्यूलेटरवर आपण बसून ही थरारक राईड अनुभवतो. (अमरीश पुरी, अनिल कपूर व श्रीदेवी च्या मिस्टर इंडीयामधला मोगॅम्बो पुन्हा जिवंत होतो व पुढे....) ३) प्रिन्स ऑफ द डार्क वॉटर्स . एका प्रचंड मोठ्या डोम स्क्रीन वर हा शो दाखवला जातो.. डोम स्क्रीन . ४) राजासॉरस . डायनोसॉरस असलेल्या एका जंगलामधील झर्‍यातून आपण बोटीने पाच मिनीटे संथ प्रवास करतो व अचानक.. . ५) अलीबाबा आणि चाळीस चोर . या राईडमध्ये आपण एका कारमध्ये बसून व्हिडीओ गेम प्रमाणे हातात लेसरची बंदूक घेवून गोळीबार करत पॉईंट्स कमवायचे व शक्य झाले तर बक्षीस घेवून जायचे! संपूर्ण पार्कमध्ये फिरण्यासाठी शटल. . पायी चालण्यासाठी संपूर्ण पार्कमध्ये प्रशस्त रस्ते व जागोजागी तत्पर मार्गदर्शक नेमले आहेत. . रेन डान्स . लहान मुलांसाठी.. . . वॉटरफ्रंट . पोटपूजेसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.. जगाच्या विविध भागामध्ये मिळणार्‍या अन्नपदार्थांसाठी वेगवेगळी चित्तवेधक ठिकाणे तयार केली आहेत. १) (हे एक रेस्टॉरंट आहे!) . २) . ३) आम्ही जेवलो ते ठिकाण.. येथे दाक्षिण भारतीय व इटालियन पदार्थ मिळत होते. (खालच्या फटूमध्ये तिथली उत्साही मुले कसरतीचे प्रयोग करत होती. . (आम्ही जेवलो तेथे गर्दीमुळे व्यवस्था कोलमडली होती.. कुपन घेण्यासाठी व नंतरही बराच वेळ थांबावे लागले.) जेवण झाल्यानंतर थोडावेळ टीपी केला, ऊन कलल्यानंतर राईडस ला सुरूवात केली.. . या राईडमध्ये आपण एका कपबशीमध्ये बसून गोल गोल फिरतो.. फिरण्याची गती आपण नियंत्रीत करू शकतो. (थोडासा बालीश प्रकार होता किंवा लहान मुलांसाठी असेल आणि आम्ही घुसखोरी केली असावी ;-)) . वाईल्ड वेस्ट काऊंटी गोल्ड रश ही एक रोलर कोस्टर आहे.. वळणावळणाचे साधारण एक किमी अंतर व धडकी भरवणार्‍या तीन चार जागा आहेत. सगळ्यात पुढच्या कारमध्ये.. मग मागच्या कारमध्ये, मधल्या कारमध्ये आतील बाजूस, बाहेरील बाजूस अशा वेगवेगळ्या ठिकाणी बसून चार पाच वेळा यातून फेर्‍या मारल्या. ;-) या रोलर कोस्टर चा मार्ग.. . या D2 लिहीलेल्या टॉवर भोवतीही वाईल्ड वेस्ट काऊंटी रोलर कोस्टर चा मार्ग आहे. . D2 - Dare to Drop यामध्ये वर दिसणार्‍या १३२ फुटी टॉवरवर आपण क्षणार्धात ७३ किमी च्या गतीने जातो.. व अचानक त्याच वेगाने खाली येतो.. थरारक. उंचीला दृष्टी सरावेपर्यंत आपण पुन्हा त्याच वेगाने खाली येतो.. व थोडे स्थिरस्थावर होईपर्यंत पुन्हा त्याच उंचीवर पोहोचतो! जाहिराती मध्ये दाखवलेले एक जायंट रोलर कोस्टर (दोन लूप असलेले) अजून सुरू झालेले नाहीये. :-( स्क्रीम मशीन.. . चार पायांवर तोलल्या गेलेल्या या स्ट्रक्चरमधून रवीसारखा दिसणारा भाग लंबका सारखा फिरतो.. भयानक बाब म्हणजे संपूर्ण भाग लंबगतीने फिरत असताना खालचे चक्र स्वत:भोवती गोल फिरते.. प्रचंड वेगाने. . ज ह ब ह रा अनुभव होता.. आपण नक्की कोणत्या दिशेने फिरत आहोत हे लवकर लक्षातच येत नाही. आणखी काही राईड्स . . हे सर्व होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. भेटवस्तूंची खरेदी आवरून सर्वजण बाहेर पडलो व बॅक टू पुणे. ***************** महत्त्वाची माहिती ***************** १) संपूर्ण पार्कमध्ये फिरताना उन्हापासून संरक्षणासाठी गॉगल व टोपी शक्यतो बाळगावी. २) शो साठी वेटींग १५ ते २० मिनीटे व मुख्य शो १० ते २५ मिनीटांचा आहे. ३) राईड्स मोकळ्या होत्या.. फारसे वेटींग नव्हते. ४) संपूर्ण पार्क अत्यंत स्वच्छ व नीटनेटके राखलेले आहे. ५) बाहेरचे अन्नपदार्थ आतमध्ये न्यायला बंदी आहे. ६) पुण्यापासून अंतर ९० ते १०० किमी. ***************** खर्च ***************** १) कार पार्किंग रू १००/- व दुचाकी रू ५०/- (कव्हर्ड पार्किंग नाहीये.) २) प्रवेशाचे तिकीट - रू १५००/- एका व्यक्तीसाठी. एकदा प्रवेश घेतल्यानंतर सर्व राईड्स व शो साठी कोणताही चार्ज नाही. ३) जेवण चवीच्या दृष्टीने ठीकठाक होते. दर - इडली ९० रूपये प्लेट, पावभाजी १६० रू प्लेट, बाटलीबंद पाणी ६० रू लिटर हे व असे रेट होते. ***************** *** ***************** फोटो जास्ती मोठे वाटत असतील तर जरूर कळवा.. सवडीने नीट करतो.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 19707 views

💬 प्रतिसाद
ग
गणामास्तर Tue, 04/23/2013 - 16:40 नवीन
हुच्चभ्रु मोदक चा हुच्चभ्रु धागा.. ;) बघू पुढे कधी तरी पर्सनल लोन काढून जाईन म्हणतो.. :)
  • Log in or register to post comments
म
मोदक Tue, 04/23/2013 - 17:50 नवीन
गपा की लेको.. बाजार उठवता का..? :-D खल्लास अ‍ॅनॅलिसीसबद्दल सर्वांचे आभार. दोन लूपवाले जायंट रोलर कोस्टर सुरू झाल्यानंतर आणखी एकदा इमॅजिकाला नक्की भेट देण्याचे ठरविणारा - मोदक.
  • Log in or register to post comments
र
रेवती Tue, 04/23/2013 - 23:39 नवीन
हेच ते पयशे वाया घालवणं म्हणते मी! जायंट सुरु झाल्यावर जाणार, हिरवळ लावली की जाणार, तळे तयार झाले की जाणार. अरे लेका, तुझ्यासारख्यांसाठीच तर बांधलय नव्हे का!
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 04/23/2013 - 17:31 नवीन
तिकिटाचे दर वाचले आणि न जाण्याचे ठरवले आहे..
  • Log in or register to post comments
स
सूड Wed, 04/24/2013 - 18:14 नवीन
>>प्रवेशाचे तिकीट - रू १५००/- एका व्यक्तीसाठी. एकदा प्रवेश घेतल्यानंतर सर्व राईड्स व शो साठी कोणताही चार्ज नाही. ३) जेवण चवीच्या दृष्टीने ठीकठाक होते. दर - इडली ९० रूपये प्लेट, पावभाजी १६० रू प्लेट, बाटलीबंद पाणी ६० रू लिटर हे व असे रेट होते हे जरा जास्तच वाटतंय.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 11/22/2013 - 20:53 नवीन
आजच आणखी एकदा इमॅजिकाला भेट दिली.. ३६० डिग्रीचे दोन लूप आणि असेच २ / ३ भन्नाट ट्विस्ट असलेले NITRO नावाचे जायंट रोलर कोस्टर आणि बाकी सर्व राईड्स व शो सुरू झाले आहेत. Image removed.
  • Log in or register to post comments
ड
डॉ सुहास म्हात्रे Fri, 11/22/2013 - 22:49 नवीन
मस्त पार्क आहे. हा धागा अगोदर कसा नजरेतून सुटला ? सुट्टीत एकदा जायला पाहिजे. मात्र अजून झाडे लावायला पाहिजेत हे खरे. या नविन फोटोत याबाबतीत सुधार दिसतोय.
  • Log in or register to post comments
प
पियू परी गुरुवार, 02/06/2014 - 18:35 नवीन
रोलर कोस्टरचा अपघात झाला ते हेच का?
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 02/07/2014 - 01:21 नवीन
हो हेच. Bandits of robin hood नावाची राईड.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 02/07/2014 - 10:34 नवीन
बरीच लोकं मारून पण साधी कुठे बातमी आलेली नाही
बात्मी दाबायला पत्रकार लोक बर्‍यापैकी घेतात. महिन्या दोन महिन्यांपूर्वी, मुकेश अंबानीच्या मुलाने पेडर रोडवर आपली अ‍ॅस्टन मार्टिन गाडी दोन गाड्यांवर आपटवली व दोन्ही गाड्यांचा जवळपास सत्यानाश केला.त्याचीही बातमी वा चर्चा चॅनेलवर नाही.एक व्हिडियो उपलब्ध आहे त्याचा. एरवी अरेरावी करणारे पोलिस व्हिडियोत मान खाली घालून काम करताना दिसतात. टाईम्सवाल्यांनी बातमीत 'रिलायन्स्'चा उल्लेख 'एक मोठी कंपनी' असा केला होता.काही दिवसांनी ती बातमीच काढून टाकण्यात आली.गाडी चालवत होता मुकेश पुत्र पण शेवटी रिलायन्सच्या बन्सीलाल जोशी(वय ५५) नावाच्या ड्रायवरला पुढे करण्यात आले व केस निकालात काढली. मुंबई पोलिस नेहमीप्रमाणे शोध घेत आहेत.
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 02/07/2014 - 13:14 नवीन
ही बातमी अगदी युद्धपातळीवर दाबली गेली. ज्या दोन गाड्यांना रिलायन्सची गाडी धडकली त्या मालकांना त्यांच्या गाड्या पूर्ण दुरूस्त करून दिल्या + त्याच मेक मॉडेलच्या आणखी एक एक नव्या कोर्‍या गाड्या दिल्यानंतर त्यांनी अपघाताच्या तक्रारी मागे घेतल्या (किंवा तक्रारींमध्ये "गाडी कोण चालवत होते पाहिले नाही" टाईप्स फाटे फोडले.)
  • Log in or register to post comments
आ
आनंदराव Fri, 02/07/2014 - 14:10 नवीन
शिवाय पन्नास पन्नास लाख रुपये दिले ते वेगळे
  • Log in or register to post comments
म
मोदक Fri, 02/07/2014 - 14:31 नवीन
पन्नास लाख..??? =O हे माहिती नव्हते.
  • Log in or register to post comments
च
चिरोटा Fri, 02/07/2014 - 16:22 नवीन
मोडलेल्या गाड्या दुरुस्त करून दिल्या व वर एक गाडी बक्षिस दिली(तोंड बंद ठेवायला) हे वाचले होते.
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 02/07/2014 - 20:56 नवीन
या... अपघाताचे फोटु व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहेत. यापुढे सोशल नेटवर्कची ताकद अजुन वाढणार आहे,कारण रेकॉर्ड अ‍ॅड शेअर ची प्रोसेस फास्ट झाली आहे. अवांतर:- सध्या मी व्हॉट्सअ‍ॅप वरुन टेलिग्रामवर स्विच होण्याचा विचार करत आहे,कारण :- १)एंड टु एंड एनक्रिप्शन { हा पर्याय फक्त सिक्रेट चॅट मधेच आहे बहुतेक} २) स्पीड ३) २०० लोकांचा ग्रुप करता येण शक्य. कोणी हे वापरुन पाहिले आहे का ? असल्यास परफोर्मन्स कसा वाटला ? यावर कोणी वेगळा धागा काढला तरी उत्तम !
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Fri, 02/07/2014 - 20:59 नवीन
अपघाताचे फोटु व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहेत अपघाताचे म्हणजे रोलर कोस्टरच्या ! नाहीतर उगाच अंबानी पुत्राच्या पराक्रमाचे फोटो माझ्याकडे कसे आले असा प्रश्न निर्माण व्हायचा ! ;)
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा