अॅडलॅब्ज इमॅजिका
गुरूवारच्या टाईम्स मध्ये पानभर जाहीरात बघून उत्सुकता चाळवली गेली असताना ऑफीसमधल्या मित्रांनी रविवारी जाण्याचे नक्की केले.
दहा / साडेदहा वाजता पोहोचण्याचे ठरले असल्याने फारशी गडबड न होता एक्स्प्रेस वे ने सर्वजण मार्गस्थ झालो.
एक्स्प्रेस वे
खालापूर टोल नाक्यानंतर पालीच्या दिशेने जाणार्या रस्त्यावरून तीन किलोमीटर अंतरावर हे पार्क वसलेले आहे.
अचानक चित्रविचित्र आकाराचे लोखंडी सांगाडे व कमानी दिसू लागल्या.. एक भलामोठ्ठा काहीतरी प्रकार घड्याळाच्या लंबकासारखा भयानक रीतीने फिरत होता, त्या राईडमध्ये बसलेल्या लोकांच्या किंकाळ्या दूरपर्यंत ऐकू येत होत्या!
पार्किंग लॉटमधून..
इमॅजिका..
प्रवेशद्वाराच्या ठिकाणी असणारी कडेकोट तपासणी व्यवस्था.
तब्बल १६०० एकर मध्ये पसरलेल्या पार्कमध्ये असलेल्या वेगवेगळ्या राईडस्, खाण्यापिण्याची ठिकाणे, खरेदीसाठी असलेली दुकाने व इतर माहिती असणारा नकाशा तिकीटांसोबत मिळाला.
संपूर्ण पार्क कलात्मकतेने वसवला आहे.
हा जरी पुतळा असला तरी या प्रकारचे एक वाद्य असते.. याचे नाव माहिती आहे का..?
ऊन जाणवू लागल्याने राईड्सचा विचार बाजूला ठेवून आम्ही इनडोअर शो कडे मोर्चा वळवला.
१) आय फॉर इंडीया
या शोमध्ये आपण बसतो ती खुर्ची जमिनीपासून २५ / ३० फुट वर उचलून समोर असलेल्या ९० फुटी भव्य पडद्यावर भारतातील विविधतेची हेलीकॉप्टर सवारी केली जाते.
ताज महाल, सुवर्ण मंदिर, हंपी, राजस्थान, जोग फॉल्स, गंगोत्री, पॅगाँग त्सो लेक, दल सरोवर, गेट वे ऑफ इंडीया, जामा मशीद, राम सेतू, लेक पॅलेस उदयपूर अशा अनेक ठिकाणांची झलक पहावयास मिळते. निव्वळ अप्रतीम!
२) मिस्टर इंडीया
एका प्रचंड मोठ्या सिम्यूलेटरवर आपण बसून ही थरारक राईड अनुभवतो.
(अमरीश पुरी, अनिल कपूर व श्रीदेवी च्या मिस्टर इंडीयामधला मोगॅम्बो पुन्हा जिवंत होतो व पुढे....)
३) प्रिन्स ऑफ द डार्क वॉटर्स
एका प्रचंड मोठ्या डोम स्क्रीन वर हा शो दाखवला जातो..
डोम स्क्रीन
४) राजासॉरस
डायनोसॉरस असलेल्या एका जंगलामधील झर्यातून आपण बोटीने पाच मिनीटे संथ प्रवास करतो व अचानक..
५) अलीबाबा आणि चाळीस चोर
या राईडमध्ये आपण एका कारमध्ये बसून व्हिडीओ गेम प्रमाणे हातात लेसरची बंदूक घेवून गोळीबार करत पॉईंट्स कमवायचे व शक्य झाले तर बक्षीस घेवून जायचे!
संपूर्ण पार्कमध्ये फिरण्यासाठी शटल.
पायी चालण्यासाठी संपूर्ण पार्कमध्ये प्रशस्त रस्ते व जागोजागी तत्पर मार्गदर्शक नेमले आहेत.
रेन डान्स
लहान मुलांसाठी..
वॉटरफ्रंट
पोटपूजेसाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.. जगाच्या विविध भागामध्ये मिळणार्या अन्नपदार्थांसाठी वेगवेगळी चित्तवेधक ठिकाणे तयार केली आहेत.
१) (हे एक रेस्टॉरंट आहे!)
२)
३)
आम्ही जेवलो ते ठिकाण.. येथे दाक्षिण भारतीय व इटालियन पदार्थ मिळत होते. (खालच्या फटूमध्ये तिथली उत्साही मुले कसरतीचे प्रयोग करत होती.
(आम्ही जेवलो तेथे गर्दीमुळे व्यवस्था कोलमडली होती.. कुपन घेण्यासाठी व नंतरही बराच वेळ थांबावे लागले.)
जेवण झाल्यानंतर थोडावेळ टीपी केला, ऊन कलल्यानंतर राईडस ला सुरूवात केली..
या राईडमध्ये आपण एका कपबशीमध्ये बसून गोल गोल फिरतो.. फिरण्याची गती आपण नियंत्रीत करू शकतो.
(थोडासा बालीश प्रकार होता किंवा लहान मुलांसाठी असेल आणि आम्ही घुसखोरी केली असावी ;-))
वाईल्ड वेस्ट काऊंटी गोल्ड रश ही एक रोलर कोस्टर आहे.. वळणावळणाचे साधारण एक किमी अंतर व धडकी भरवणार्या तीन चार जागा आहेत.
सगळ्यात पुढच्या कारमध्ये.. मग मागच्या कारमध्ये, मधल्या कारमध्ये आतील बाजूस, बाहेरील बाजूस अशा वेगवेगळ्या ठिकाणी बसून चार पाच वेळा यातून फेर्या मारल्या. ;-)
या रोलर कोस्टर चा मार्ग..
या D2 लिहीलेल्या टॉवर भोवतीही वाईल्ड वेस्ट काऊंटी रोलर कोस्टर चा मार्ग आहे.
D2 - Dare to Drop यामध्ये वर दिसणार्या १३२ फुटी टॉवरवर आपण क्षणार्धात ७३ किमी च्या गतीने जातो.. व अचानक त्याच वेगाने खाली येतो.. थरारक. उंचीला दृष्टी सरावेपर्यंत आपण पुन्हा त्याच वेगाने खाली येतो.. व थोडे स्थिरस्थावर होईपर्यंत पुन्हा त्याच उंचीवर पोहोचतो!
जाहिराती मध्ये दाखवलेले एक जायंट रोलर कोस्टर (दोन लूप असलेले) अजून सुरू झालेले नाहीये. :-(
स्क्रीम मशीन..
चार पायांवर तोलल्या गेलेल्या या स्ट्रक्चरमधून रवीसारखा दिसणारा भाग लंबका सारखा फिरतो.. भयानक बाब म्हणजे संपूर्ण भाग लंबगतीने फिरत असताना खालचे चक्र स्वत:भोवती गोल फिरते.. प्रचंड वेगाने.
ज ह ब ह रा अनुभव होता.. आपण नक्की कोणत्या दिशेने फिरत आहोत हे लवकर लक्षातच येत नाही.
आणखी काही राईड्स
हे सर्व होईपर्यंत संध्याकाळ झाली होती. भेटवस्तूंची खरेदी आवरून सर्वजण बाहेर पडलो व बॅक टू पुणे.
***************** महत्त्वाची माहिती *****************
१) संपूर्ण पार्कमध्ये फिरताना उन्हापासून संरक्षणासाठी गॉगल व टोपी शक्यतो बाळगावी.
२) शो साठी वेटींग १५ ते २० मिनीटे व मुख्य शो १० ते २५ मिनीटांचा आहे.
३) राईड्स मोकळ्या होत्या.. फारसे वेटींग नव्हते.
४) संपूर्ण पार्क अत्यंत स्वच्छ व नीटनेटके राखलेले आहे.
५) बाहेरचे अन्नपदार्थ आतमध्ये न्यायला बंदी आहे.
६) पुण्यापासून अंतर ९० ते १०० किमी.
***************** खर्च *****************
१) कार पार्किंग रू १००/- व दुचाकी रू ५०/- (कव्हर्ड पार्किंग नाहीये.)
२) प्रवेशाचे तिकीट - रू १५००/- एका व्यक्तीसाठी.
एकदा प्रवेश घेतल्यानंतर सर्व राईड्स व शो साठी कोणताही चार्ज नाही.
३) जेवण चवीच्या दृष्टीने ठीकठाक होते.
दर - इडली ९० रूपये प्लेट, पावभाजी १६० रू प्लेट, बाटलीबंद पाणी ६० रू लिटर हे व असे रेट होते.
***************** *** *****************
फोटो जास्ती मोठे वाटत असतील तर जरूर कळवा.. सवडीने नीट करतो.
नंतर लेखकाने लहान करवून घेतल्याने ती परिस्थिती राहिली नाही.हे मी नाही करवून घेतले.. पण फोटो लहान झाले आहेत. ज्या कुणी अज्ञात संपादकांनी हे काम केले आहे त्यांना माझे शतश: धन्यवाद!नंतर लेखकाने लहान करवून घेतल्याने ती परिस्थिती राहिली नाही.हे मी नाही करवून घेतले.. पण फोटो लहान झाले आहेत. ज्या कुणी अज्ञात संपादकांनी हे काम केले आहे त्यांना माझे शतश: धन्यवाद! :-)तिकीट दर भरघोस आहे. यापेक्षा तिकीट दर कमी करुन काही राइड्स मोफत आणि काही सशुल्क केल्यास जास्त बरे पडेलबहुदा १ मे पासून तिकीट दर साधारण ५०० रू ने वाढवला जाणार आहे. सौजन्य - इमॅजिका कस्टमर केअर.सदर पैशात अक्खी कोकण वारी बाईक वर होईल माझीकोकणवारीच्या तारखा आणि ठिकाण कळव रे.. तुमच्यातलाच ;-) - मोदक.तिकिटाच्या दरात ज्या राईड्स आहेत त्या आपण कितिहि वेळा घेउ शकतो का?हो.. कितीही वेळा कोणतीही राईड..शिवाय सगळ्या मोठ्यांसाठि आहेत कि बच्चे कंपनीला पण वाव आहे?बच्चे कंपनीला वाव आहे. फक्त उंचीचे बंधन आहे - ठरावीक उंचीपेक्षा कमी मुलांना काही राईडमध्ये प्रवेश नाही वगैरे..