कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
- Read more about कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
- Log in or register to post comments
- 92 views
✪ होमसिक झाल्याची भावना!
✪ रामगंगेच्या किनार्याने घाट वाटेचा प्रवास
✪ विवेकानंदांचं अलमोडा आणि नीम करोली बाबांचं कैंची धाम!
✪ तीन बाजूंने पर्वत आणि दूरवर सपाट जमीन
✪ काठगोदाम- लाकडं नेण्यासाठी ब्रिटीशांनी बांधलेलं स्टेशन
✪ दक्षिण भारत सायकल प्रवासाची उत्सुकता
११ डिसेंबरच्या पहाटे सत्गड़वरून निघालो! ठीक साडेपाच वाजता जीप आली. भर अंधारात प्रवास सुरू झाला! सत्गड़ला नातेवाईकांसोबत दिवस छान गेले. छान भेटी झाल्या. हिमालय, तिथली गावं आणि लोक! आणि अर्थातच तिथलं ट्रेकिंग आणि आकाश दर्शन! पण आता निघायची वेळ झाली. निघताना फाssर होमसिक वाटतंय!