महामानवास अभिवादन!
- Read more about महामानवास अभिवादन!
- Log in or register to post comments
- 287598 views
जतिन साधा माणूस आहे. खूप शांत माणूस आहे.
कुणाच्या अध्यात ना मध्यात.
असं सागरदर्शन हाऊसिंग सोसायटीत राहणारे बरेच लोक म्हणायचे. शांततेचा तळ किती खोल असतो याची जाणीव किंवा पर्वा वर वर पोहणाऱ्यांना नसते.
त्याला एकटा मात्र कोणी म्हणत नव्हते.
राजस्थानच्या ट्रिपचा शेवटचा दिवस उजाडला. आज आमचं संध्याकाळचं विमान होतं.
आम्ही सिटी पॅलेसच्याच भागात मुक्कामी होतो. त्या भागात थोडी पायी भटकंती करून आलो. आधी गणगौर घाटावर गेलो. गणगौर म्हणजे शिव गौरी. हे या घाटाचं नाव आहे, हा एक सणसुद्धा आहे, आणि त्या दिवशी करायचा एक पारंपरिक नृत्यखेळाचा प्रकारसुद्धा आहे.
गॅस साठी आता | धावा दाही दिशा |
आम्हा फिरविली कसा |जगदीशा ||
काय आमची चूक |कसा सत्यनास |
कुणी देता का गॅस | विठू राया ||
झाली इंधन टंचाई | सिलिंडर साठी रांगा |
सुरू करा टांगा | पांडुरंगा ||
ऐका आकाशवाणी| बंद हॉर्मुझ सामुद्रधुनी |
हाताने धुवा धुणी | चक्रपाणी ||
कशी पेटवू चूल |कसे राखू घरपण |
पुन्हा शोधा सरपण |रानोमाळी ||
घ्यावी आंघोळ सुटी |नका मारू बोंब|
पुन्हा पेटवा बंब| मोरी तला||
अहंकारी आणि चक्रम |चालक ट्रम्प तात्या | मालक बुडीत खात्या |देवा धाव ||
"द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
(सदर कथेमध्ये मानवी मनाच्या कल्पनेचा विस्तार केला आहे. सदर कथेमध्ये कोणत्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीचा, देशाचा, संस्थेचा संबंध नाही. तसे आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा. सदर कथा काल्पनिक आहे. वाचकांचे मनोरंजन व्हावे या हेतूने लिखाण केले आहे.)
२१ व्या शतकाच्या मध्यावर जग एका विचित्र टप्प्यावर येऊन ठेपले होते. विज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अवकाश तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली होती; पण मानवाचे जुने स्वभाव सत्ता, भीती आणि वर्चस्व अजूनही तसेच होते. या पार्श्वभूमीवर राण नावाच्या छोट्या पण हट्टी देशाने इतिहासात नोंद होईल अशी लढाई लढली.
✪ १३ योग केंद्रांमध्ये भेट आणि संवाद
✪ “निरामयचा" जानेवारीमध्ये पूर्ण झालेला सायकल यात्रा उपक्रम
✪ बंगलोर- उटी- ईशा आदि योगी- केरळ- कन्याकुमारी- रामेश्वरम- चेन्नै
✪ प्रचंड मोठे घाट, भितीदायक उतार आणि बेटावरचा प्रवास
✪ सुरूवातीला पुण्यातल्या चिन्मय विभूतीमध्ये भेट
✪ १८६१+ किलोमीटर अंतर आणि सायकलने दिलेली साथ
✪ निसर्ग- तीर्थयात्रा आणि अविश्वसनीय भारत
✪ सर्वांबद्दल कृतज्ञता आणि धन्यवादाची भावना
हल्लीची काही मुलं परीक्षेत शतप्रतिशत म्हणजे शंभरपैकी शंभर मार्कस् मिळवतात. काहीजण तर शंभर टक्क्यांपेक्षा जास्त मार्कस् मिळवतात म्हणे.. कसे कोण जाणे..
हे सर्व माझ्यासारख्या आजी, आजोबा झालेल्या व्यक्तीला अचंबित करणारे असलं तरी ते वास्तव आहे.
मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मला कोणत्याही विषयात शत प्रतिशत गुण मिळाले असं फारसं आठवत नाही. तसं म्हटलं तर माझे भाषा विषय उत्तम होते. संस्कृत मध्ये मला दोन, तीन वेळा खरंच शत प्रतिशत गुण मिळालेही होते. पण फक्त आणि फक्त संस्कृतमध्येच..
सैरभैर डायरी - १
सैरभैर डायरी - २
गावाकडच्या गप्पा
बाबा रिटायर झाले आणि गावातल्या सगळ्या रिटायर माणसाच्या पावलावर पाऊल ठेऊन शेतीकडे लक्ष द्यायला लागले. रीतीप्रमाणे भांडवल मालकाचे मेहनत गड्याची त्याचे उत्पन्नाच्या २५ % द्यायचे, वैरण, गवत करेल तसे घेऊन जाईल. परस्पर माल विकायचा नाही वगैरे गोष्टी ठरल्या .
दोन वर्षे सगळे सुरळीत होते. बाळूमामा कष्टाळू होते. थोडासा तळे राखील तो पाणी चाखेल हा प्रकार होताच. पण बाबांना शेतात काहीतरी करतोय हा आनंद मोठा होता.