गालावरी लाली नभाची.

गालावरी लाली नभाची ओठावरी मधाळ शब्द
या काजळी केसात तुझिया माझे गुंतले प्रारब्ध.

घेती चुंबन सागर लाटा वाळूवरच्या पाऊल खुणा
स्पर्श करण्या पिसाट वारा हा येई धावत पुन्हा पुन्हा
पाहून तुजला या नभाचे तारे अता हे झाले बेधुंद.

तू असता बघ बहर फुलांना तू नसताना विराण जसे
माझ्या क्षणा क्षणा वरती आता तुझे उमटले ठसे
वाटे मला आता तुझीया सहवासात अपार आनंद.

काचवटी ही तुझी कंकणे खणखण करुनी गाती गाणे
शुध्द रुपेरी तुझी पैंजणे सूर छेडूनी करी दिवाणे
येथे तुला मी पाहुनी आता का होतोसे निशब्द.

https://youtu.be/W8HVgfbmvvU