Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

तात्या ,मनोगतावर परतला....!!!

प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 02/24/2008 - 08:27
💬 57 प्रतिसाद

  • Log in or register to post comments
  • 23270 views


वाचनखूण लावा
| 23270 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (57)
व
विसोबा खेचर Sun, 02/24/2008 - 08:49 नवीन
च्यायला बिरुटेशेठ! अत्यंत जोरदार आणि खुसखुशीत लेख... तुम्ही तर सिक्सरच मारलीत तिच्यायला! :)) हार्दिक हार्दिक हार्दिक अभिनंदन........ :) आत्ता जरा नीलकांतासोबत मिपाच्या मुखपृष्ठाच्या गडबडीत आहे, नंतर सवडीने विस्तृत प्रतिसाद टाकतो... बाय द वे, मनो-मिसळ हे नांव क्लासच आहे! :) असो, या आंतरजालीय जगात त्या वेलणकराला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाही आणि मलाही त्याच्याशिवाय दुसरं कुणी नाही हेच बाकी खरं!:) पण घाबरू नका बिरुटेशेठ. आम्ही कुठंही जात नाही. आता आम्हाला पुन्हा मनोगतावर घेणार नाहीत! आणि घेतलं तरी 'कसा नाक मुठीत धरून परत आला फोकलिचा!' असंच सगळे म्हणतील! :) आपला, (मूळचा मनोगतप्रेमी तरीही आता कट्टर मिपाकर!) तात्या.
  • Log in or register to post comments
स
सुधीर कांदळकर Sun, 02/24/2008 - 09:47 नवीन
एक कार्यक्रम होत असे गणेशोत्सवात. त्याची आठवण झाली. त्यात लोकप्रिय व्यक्तींवर विविध आरोप केले जात. त्याची आठवण झाली. खरे म्हणजे मला हा पुर्वेतिहास ठाऊक नाही. पण अंदाज बांधू शकतो. मजा आली.
  • Log in or register to post comments
प
परीचा परा Sun, 02/24/2008 - 10:40 नवीन
येवढे सगळे वाचून शॉकच बसला व्हता... पण शेवटी दिलेल्या गोष्टीने खुलासा झाला... सुचना:- वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने, काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :) नाय तर आम्हाला आगीतून फुफाट्यात पडल्यासारखे वाटत होते... म्हटले आत्ताच आलोय इथे आणि संकेतस्थळ बंद करायच्या भाषा कसल्या चालू झाल्या? डॉक्टरसाहेब आमच्या तोंडचे पाणीच पळवले होते तुम्ही.... (तात्या गेले तर तर मिसळपावाची तर्रर्रीच गेल्यासारखं वाटलं असतं....) नाहीतरी संकेतस्थळ काढून सदस्यांचा विश्वासघात करणारे बरेच आहेत बाजारात.... त्याला मिसळपाव १००% अपवाद आहे ह्याची खात्री पटल्यावरच इथला सदस्य झालो ... डॉक्टरसाहेब बाँब फोडत जा हो... पण तळटीप सगळ्यात आधी लिहित जावा राव... बरं झालं तात्यांनी पहिलाच प्रतिसाद दिला... नाही तर आम्ही इथला गाशा गुंडाळायचंच ठरवलं होतं.....आमच्यासारखे भडक माथ्याचे लोक तळटीप न वाचताच गोंधळास सुरुवात करतील.... :) {परीच्या प्रतिक्षेत} परा ....
  • Log in or register to post comments
ध
धोंडोपंत Sun, 02/24/2008 - 10:52 नवीन
प्राध्यापक साहेब, अप्रतिम खुमासदार लेख. क्या बात है!!!!!! प्रत्येक मिपासदस्याच्या व्यक्तिमत्वाचे पैलू फार सुंदरपणे टिपलेत तुम्ही. वा वा. लेख फार फार आवडला. अतिशय मस्त भट्टी जमली आहे. ती अशीच धगधगत राहू दे. आमचा रविवार तुमच्या लेखाने फार आनंदात गेला. पुढील लेखाच्या प्रतिक्षेत. आपला, (स्नेही) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 02/24/2008 - 11:27 नवीन
व्व्व्वा ! मजा आली तिच्यायला... बर्‍याच दिवसांनी इतके फर्मास आणि चविष्ट लिखाण वाचले. लाजवाब. प्रा. साहेब लगे रहो. त्वाड्डा जवाब नही. बिपिन.
  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 02/24/2008 - 14:27 नवीन

सर, तुम्ही नाss काही तरी घेऊन येता बॉ.......चाल्लाय तर जाऊ दे......तुम्हाला काय त्याचा त्रास होतोय......... सध्या अमेरिकेत घराचे बांधकाम सुरू केलंय....त्याचसाठी 'चित्राचे,गेल्या शतकांतील अमेरिकन घरे - ४ - वाचते आहे, तेव्हा सध्या मला वेळ नाही. प्लीज नंतर बोलते.......!!!"

वरील लेखन काल्पनिक आहे, तसे वाटण्याची शक्यता अधिक आहे. मात्र वरील लेखात आलेली नावे, त्यांच्या तोंडी असलेली विधाने,  काल्पनिक आहेत. ती नावे, विधाने  कोणास आपली वाटत असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा !!! :)

हे काल्पनिक???? :)))))))) आता हे लेखन काल्पनिक नाही हे सांगायला आमच्या गरीब झोपड्याचा फोटू इथे टाकायला हवा!!

आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!

पण माझ्यावरही कोणी गस्त ठेवून असतं याची कल्पना नव्हती बॉ!!!

ह. घ्या.

आणि हो, अद्याप मी चित्राचा लेख वाचलेला नाही. वेळ नाही हो!  घर पाहावे बांधून..... ;-) म्हणूनच तात्याच्या गजालींकडेही लक्ष देत नाही ;-)

बाकी, लेख वाचून मजा आली.

आपली,

(डिटेक्टीव नं १) प्रियाली

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/24/2008 - 14:34 नवीन

आणि अधोरेखित वाक्य तुम्हाला कुठे कुठे मिळालं? ऑर्कुटावर नक्की ;-) कारण तिथे तुम्ही मला भेट देऊन गेलात आणि माझ्या आणि जयश्री अंबासकरांच्या गप्पा वाचून गेलात हेही नक्की!

आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))
--(स्वगत!)

बाय द वे प्रियाली, नव्या घरात सत्यनारायण घालशील तेव्हा जेवायला ह्या तात्याभटालाही बोलाव बरं का! :)

असो,

बिरुटेंच्या ऑर्कुट भटकंती करता शुभेच्छा!

प्रियालीच्या नव्या वास्तूबद्दल शुभेच्छा!

आपला,
(शुभेच्छुक!) तात्या.

  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 02/24/2008 - 14:37 नवीन

सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :)) आणि नाही घातला तरी आमंत्रणाची विशेष गरज नाही, या कधीही.

 

आयला! हा बिरुट्या ऑर्कुटवरही लोकांच्या खरडवह्या वाचत फिरत असतो म्हणायचा! :) मग हा डाक्टरकी आणि प्राध्यापकी तरी केव्हा करतो? :))
--(स्वगत!)

हाहा!! १००% सहमत.

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/24/2008 - 14:47 नवीन

सत्यनारायण यदाकदाचित घातला तर पूजा घालायलाच बोलावते तुम्हाला :))

चालेल! तुझ्या घरच्या सत्यनारायणाला जर हा मच्छीखाऊ भट चालणार असेल तर आपली काय पण हरकत नाय! आपण नक्की येऊ आणि आलटून पालटून अथर्वशीर्ष म्हणू! कारण त्याशिवाय आपल्याला संस्कृतातले दुसरे कोणतेच शिलोक येत नायत! :)

आपला,
(संस्कृत 'ढ'!) तात्या.

  • Log in or register to post comments
व
विकास Sun, 02/24/2008 - 14:34 नवीन

एकदम मस्त लेख सर! ह. ह. पु. वा. 

अजून येउद्यात!

 

फक्त त्यात माझे नाव दिसले तर ४००० शद्बांचा संदर्भ हीन व्य.नि. आपल्याला येइल)आणि तो योगायोग नसेल!

  • Log in or register to post comments
च
चित्रा Sun, 02/24/2008 - 15:18 नवीन

टपल्या चांगल्या जमल्या आहेत!   प्रियालीताईंच्या घराला शुभेच्छा!

  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 02/24/2008 - 15:24 नवीन

डॉ.साहेब,एकदम धमाल लेख! मजा आली वाचताना...
स्वाती

  • Log in or register to post comments
स
सन्जोप राव Sun, 02/24/2008 - 15:50 नवीन

जबरदस्त लिखाण! प्राध्यापक डॉक्टरसाहेब, आपला हा पैलू आम्हाला माहीतच नव्हता! 'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली (ही नावे घेतली नाहीत तर प्रतिक्रिया गंभीरपणे घेतली जात नाही म्हणे!)
मात्र, पुण्याचा एका प्राध्यापकाने आणि त्यांच्या एक शिष्याने हे सर्व घडवून आणल्याचा आमचा संशय आहे.
हे मत तुमचे की सर्किटरावांचे? आणि कोण हो हे प्राध्यापक? जरा त्यांना भेटावे म्हणतो!

सन्जोप राव

  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 02/24/2008 - 18:10 नवीन

'मनोगत' वरील संमेलनाची आणि 'उपक्रम' च्या पहिल्या वाढदिवसाची आठवण झाली

हेच म्हणतो!

चला, या निमित्ताने संजोप रावांनी आपली लेखणी पुन्हा मिसळपावर उमटवली याचा आम्हाला आनंद वाटतो! आता इथून पुढे कुठलेही कडू-गोड अनुभव विसरून जाऊन संजोप रावांनी पुन्हा नव्याने मिपावर नियमित लेखन करावे अशी आमची इच्छा आहे!

आम्ही आत्तापर्यंत संजोप रावांना किमान दहा वेळा तरी पिंजरा या चित्रपटावर मिसळपाववर काहीतरी जोरदार लिहा अशी विनंती केली आहे. त्यातील नऊ विनंत्यांचा अवमान आम्हाला मान्य आहे परंतु दहाव्यांदा तरी संजोप रावांनी आमचा शब्द ठेवावा असे वाटते!

त्यांनी आम्हाला खास कोल्हापुरी साजाची एक चंची सप्रेम भेट म्हणून दिली आहे. जो पर्यंत संजोप राव मिसळपाववर लिहीत नाहीत तो पर्यंत आम्हीही ती चंची वापरणार नाही अशी शपथ खाल्ली आहे. सध्या तरी ती चंची नुसतीच धूळ खात पडून आहे. तरी आम्हाला ती चंची लवकरात लवकर वापरायला मिळावी हीच इच्छा आहे!

पुढे मर्जी संजोपरावांची!

असो..

आपला,
(चंचीप्रेमी) तात्या.

  • Log in or register to post comments
ध
धनंजय Sun, 02/24/2008 - 15:57 नवीन
धनंजय, म्हणाले की "लोकमित्रमंडळाचा उद्देशच आहे, की उत्तमातल्या उत्तम लेखनाची जशी ओळख व्हावी, त्याप्रमाणे.......जालावरील लेखकांचेही आदानप्रदान झाले पाहिजे. "

हे बहुधा काल्पनिक नाही. माझे तुमच्याशी बोलण्यात हे वाक्य नक्की येऊन गेले आहे!

तात्या, मनोगतावर जाताहेत ही चांगली गोष्ट आहे.
त्यामुळे हा विचारही त्या विचाराला जोडून...

येणा-या बाल, तरुण, वयस्कांनी हे मिसळपावचे गोकूळ फुलत जावे. मिसळपाव खाता खाता, मिसळपावचे अभंग गावेत, म्हणावेत. आपली साहित्यकला फुलवावी. वाचकांनी भरभरून दाद द्यावी, कोणत्याही मद्याचे दोन थेंब समाधीवर शिंपडावे......
+१
  • Log in or register to post comments
स
संजय अभ्यंकर Sun, 02/24/2008 - 16:05 नवीन

Image removed.

 

प्रा. डॉ. आल्फ्रेड बिरुटे ( किंवा प्रा.डॉ.  दिलीप हिचकॉक)...

डॉ. साहेब....

आपले धक्कातंत्र पाहून हिचकॉक साहेब आठवले!

संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/

  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 02/24/2008 - 17:15 नवीन

केवळ लेखनावरून व्यक्तीचित्रण छान जमलं आहे.

प्राजु.........."जाणार होतास तर बोलावलेच कशाला.
मनोगतावर, फुले,पाने, गोड गोड बोला.
मिसळपाववर चारोळी, मायबोलीवर आरोळी,
आकाशवाणी, सुखाचे, दुःखाचे दिवस,पुरण पोळी."

 काय पण भारी आशय आहे हो या चारोळीत. बाय द वे.. तात्या मनोगतावर जाणे म्हणजे मुंग्यानी मेरू पर्वत तर गिळला नाही ना.. या प्रकारचे आहे? आणि तात्या जर मनोगतवर गेलेच तर.. आमचा मिसळपाव ला राम राम..!कळ्ळलं का हो  तात्या..?

- (१००% मिसळप्रेमी) प्राजु

  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Sun, 02/24/2008 - 17:46 नवीन

तात्या जर मनोगतवर गेलेच तर.. आमचा मिसळपाव ला राम राम..!कळ्ळलं का हो  तात्या..?

प्राजुशी १००% सहमत!!

-डांबसकाका

  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Sun, 02/24/2008 - 17:16 नवीन

हा हा हा :)) आज सकाळी सकाळीच हा लेख वाचून मजा आली :) मस्त धक्कातंत्र ;) बर्‍याचशा खर्‍या, काहिश्या काल्पनिक प्रसंगांची उत्तम गुंफण :) खूप सह्ही!!!!

सर, एकदम सहि रे सहि!! :)

-ऋषिकेश

 

 

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 02/24/2008 - 20:25 नवीन

धमाल लेखन. रविवारची दणदणीत सुरुवात झाली.

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.

(वाचक)बेसनलाडू

  • Log in or register to post comments
प
प्रियाली Sun, 02/24/2008 - 20:28 नवीन

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत

सहमत आहे. :-) ती टाळूनही लेखन खुमासदारच राहीले असते.

  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sun, 02/24/2008 - 21:37 नवीन

फक्त खाजगीतील बोलणी, संवाद सार्वजनिक व्हायला हरकत. रावसाहेबांच्या कल्पनाविलासात ही तक्रार करण्याची वेळ कधी आली नव्हती. असो.

ऑर्कुटवरील खरडींविषयी ही टिप्पणी असेल तर असहमत. ऑर्कुट मधील खरडी खासगी ठेवायच्या की सार्वजनिक हे सभासदावर अवलंबून असते. प्रियाली ताईंनी त्यांच्या खरडी सार्वजनिक ठेवल्या आहेत. तेव्हा प्रा.डॉ नी खाजगीतील बोलणी सार्वजनिक केली असे वाटत नाहीत.

  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sun, 02/24/2008 - 21:39 नवीन

टिप्पणी ऑर्कुटेतर खाजगी बोलणीबाबत आहे

(ऑर्कुटर)बेसनलाडू

  • Log in or register to post comments
क
कोलबेर Sun, 02/24/2008 - 21:41 नवीन

 लै भारी लेख सर. आमचा अतिशय आवडता लेखन प्रकार तुम्ही मस्त हाताळला आहे

घाटपांडे साहेब, अजून बिट्टू च्या धक्यातून सावरले नसल्यामुळे त्यांनी फार डिटेल्स मध्ये उत्तर दिले नाही. 'ज्योतिषविषयक लेख पुन्हा वाचावा त्यात त्याचे उत्तर आहे' असे त्यांनी कळवले.

हे तर सहीच...

  • Log in or register to post comments
न
नंदन Sun, 02/24/2008 - 22:22 नवीन

धमाल लेख. शेवटचे धक्कातंत्रही मस्त :)

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी http://marathisahitya.blogspot.com/)

  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Mon, 02/25/2008 - 06:31 नवीन
मान गये गुरु !!
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Mon, 02/25/2008 - 17:00 नवीन

तर्रीचा जोरदार भुरका मारला आणि ठसकाच लागला!!

आपली धक्कादायक धक्काबुक्की आवडली!

आपले विद्यार्थी किती धकाधकीचं जिणं जगत असतील ह्याची कल्पना आली (असा कल्पक मास्तर मिळणे विरळाच असते हो! :) (ह्.घ्या);}

चतुरंग

  • Log in or register to post comments
प
प्रमोद देव Mon, 02/25/2008 - 17:42 नवीन
खूपच मार्मिक निरीक्षण आणि तितक्याच ताकदीने ते शब्दात मांडणे ह्या दोन्ही कला आपल्याला अवगत आहेत हे सिद्ध केलेत.
असेच लिहिते रहा! मजा आली.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर गुरुवार, 02/28/2008 - 08:23 नवीन

श्री. डॉ. प्रा. दिलीप बिरूटे,

लेख मस्त जमवला आहे.सुरुवातीला मीही गोंधळात पडलो होतो. पण लवकरच सत्य ओळखले आणि रंगत वाढत गेली.

मस्त लिहीले आहे.

  • Log in or register to post comments
स
सहज Fri, 02/29/2008 - 05:52 नवीन

अप्रतिम कल्पनाविलास.

वाचनखुणामधे साठवला आहे, परत परत वाचायला. :-)

जबरी!!!!

  • Log in or register to post comments
द
दिगम्भा Fri, 02/29/2008 - 06:46 नवीन

छान लेख, बेहद्द आवडला. रावसाहेबांच्या मसालेदार मालिकेत चमचमीत भर टाकलीत.
- दिगम्भा

  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Fri, 02/29/2008 - 07:41 नवीन
जमलं ! जमलं !!!

थोडक्यात काय, तर छानच झालंय !!

(ह्या साहित्यप्रकारातली रावसाहेबांची मोनॉपोली निकालात काढलीत. आता चित्रपट परीक्षण लिहा बघू..)

चालू द्या !! आम्ही वाचतोच आहोत !

- सर्किट
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/01/2008 - 14:11 नवीन
लेखात उल्लेख झालेल्या सर्वच मित्रांनी या लेखास हलकेच घेतले, त्याबद्दल सर्वांचे आभार, जे कोणी रागावले असेल,दुखावले असेल त्याबद्दल दिलगीरी व्यकत करतो. या लेखनावर शुद्धलेखनाचे सर्व संस्कार करुन इथे लेखन टाकण्याचा आग्रह धरला त्याबद्दल एका ' अनामिकाचेही ' विशेष आभार. अनेक मित्रांच्या प्रतिसादाला उपप्रतिसाद लिहायचा होता, पण आता वेळ खूप पुढे गेलेली आहे. तेव्हा लेखनावर प्रेम करणा-या वाचकांचे, प्रतिसाद देणार्‍यांचे सर्वांचे आभार मानतो !!! आपण सर्व आमच्या तोडक्या-मोडक्या लेखनाबद्दल आमची कौतुकाने पाठ थोपटता, म्हणुन आम्हाला लिहिण्याचे बळ येते !!! धन्यवाद !!! अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!!
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/01/2008 - 14:42 नवीन
अवांतर :- तांत्रिक अडचणी दूर केल्याबद्दल सरपंचाचे विशेष आभार !!! बिरुटेशेठ, सध्या गमभनची पुन्हा जुनीच आवृत्ती जोडली आहे. त्याने काही फरक पडतो का ते पाहू. अजूनही काही चाचण्याही सुरू आहेत. एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या. आपलाच, तात्या.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/01/2008 - 15:11 नवीन
एखाद्या संस्थळाच्या उभारणीमध्ये अधनंमधनं अश्या काही तांत्रिक अडचणी येतात परंतु त्यातूनच सुधारणा होत असतात/होतात. कृपया सांभाळून घ्या. आम्ही त्याबद्दल कधी तक्रार केली ? हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते, आणि संस्थळाच्या उभारणीसाठी, वेगवेगळ्या बदलांसाठी आमच्या शुभेच्छा आहेतच !!!! आज ब-याच दिवसानंतर प्रतिसाद लिहिता आला म्हणुन सरपंचाचे विशेष आभार असे म्हणालो, त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
स
सरपंच Sat, 03/01/2008 - 15:19 नवीन
हे तुमचे संस्थळ आहे तसे आम्हालाही आमचे वाटते, तुमचेच आहे! :) आम्ही फक्त ट्रस्टी आहोत! :) त्यातून काही अर्थाचा,अनर्थ निघाला असेल तर त्याबद्दल क्षमस्व !!! अहो त्यात क्षमा कसली? कुठलाही अनर्थ निघालेला नाही. आम्ही या आयडीवरून कुणाला प्रतिसाद देत नाही, तो आज पेश्शल तुम्हाला देत आहोत यातच काय ते समजा! :) आपला, तात्या सरपंच.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Wed, 05/28/2014 - 05:56 नवीन
अरेच्चा हा लेख पाहिलाच नव्हता. ही इतिहासातील एक अज्ञात बखर आहे.
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll Wed, 05/28/2014 - 06:10 नवीन
सध्या तात्या आहे कुठे? बरेच जुने जालकरी हल्ली फक्त चेपुवरच आढळतात.
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Wed, 05/28/2014 - 09:16 नवीन
तात्यांच्या कुठल्याही पोस्टवर 'व्वा तात्या, तुसी छा गये, तुम्ही नशिबवान आहात तात्या,' वगैरे वगैरे शाब्दिक चौर्‍या ढाळणारे अनेक जणं फेसबुकावर तात्यांना सापडले आहेत. तिथे त्यांचे अगदी व्यवस्थित आणि सुखनैव चालू आहे. आणि मिपावर प्रकट होणे त्यांच्यासाठी 'सोयिस्कर' राहिले नसावे.
  • Log in or register to post comments
र
राजेश घासकडवी गुरुवार, 05/29/2014 - 03:50 नवीन
जे सोडून गेलेले आहेत त्यांची नावं घेऊन उगाच कढ का काढावे? (असं मी नाही, प्रा. डॉ. बिरुटेच म्हणतात) लेखात नावं घेतलेल्यांपैकी तात्या, प्रियाली, गुंडोपंत, सहज, धनंजय, मुक्तसुनीत, वाचक्नवी, बेला, राजे, धोंडोपंत ही मंडळी लिहितात का सध्या मिपावर?
  • Log in or register to post comments
ट
टवाळ कार्टा Fri, 05/30/2014 - 14:43 नवीन
टारझन का गेला त्याची स्टोरी कोणी लिहिल का? :)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/30/2014 - 18:37 नवीन
टारझन का गेला, सर्किट का गेला, आमचे धोंडोपंत का गेले, गुंडोपंत का गेले. परा का गेला, प्रमोद देव का गेले, अमुक का गेला आणि धमुक का गेला. अहो, हे येणं जाणंच चालूच असणार आहे. आयडींनी काय लेखन केलं. लेखनाचा किती आनंद मिळाला. आपले आ.जालावर सुखाचे क्षण किती गेले हे महत्त्वाचे. अनेकांना वाटलं आम्ही मिपावरुन गेलो की जगबुडी होऊन जाईल. अनेक थोर थोर आयडी माझ्या पाहण्यात होते. अनेक थोर थोर आयडींनी किरकोळ कारणावरुन स्वसंपादनाचा फायदा घेत लेखन काढून टाकलेत, प्रतिसाद काढून टाकलेत. मिपाचा रंगमंच ओस पडेल असं अनेकांना वाटलं. पण तसं कधीच झालं नाही आणि होणारही नाही. आयडी येतील आणि जातील. प्रत्येक आयडीची एक स्टोरी असेल किंवा नसेल. नवे येतील आणि जसे जमेल ते लिहितील आणि जुन्यांप्रमाणे जातीलही. नव्या-जुन्या लेखनाचा आनंद वाचक घेतील. वाचक वाचतील आणि विसरुनही जातील. कोणताच क्षण कोणासाठी थांबत नाही, तो क्षण येतो आणि जातो. आपणही आज आहोत उद्या नसु.... आपण संकेतस्थळ किती इंजॉय केलं हे महत्वाचं. बाकी, प्रश्न मला तरी कधीच महत्वाचे वाटले नाहीत. मिपा एक चालता बोलता रंगमंच आहे, अनेक आयडी येतील जातील. आज आपण आठवणीत आहोत उद्या लोक विसरुनही जातील.....The Show Must Go On -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 05/30/2014 - 19:10 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 05/31/2014 - 11:46 नवीन
बिरुटे साहेब फार महत्वाचे बोलून गेलेत. ध्यानात राहुद्या.
  • Log in or register to post comments
स
सुहास झेले Fri, 05/30/2014 - 19:31 नवीन
व्वा बिरुटेसर :)
  • Log in or register to post comments
त
तुमचा अभिषेक Fri, 05/30/2014 - 21:09 नवीन
आवडेश :)
  • Log in or register to post comments
स
संजय क्षीरसागर Sat, 05/31/2014 - 10:52 नवीन
ऐशी ची तैशी करुन टाकली.
मिपाचा रंगमंच ओस पडेल असं अनेकांना वाटलं. पण तसं कधीच झालं नाही आणि होणारही नाही....आपण संकेतस्थळ किती इंजॉय केलं हे महत्वाचं. बाकी, प्रश्न मला तरी कधीच महत्वाचे वाटले नाहीत. मिपा एक चालता बोलता रंगमंच आहे, अनेक आयडी येतील जातील. आज आपण आठवणीत आहोत उद्या लोक विसरुनही जातील.....
  • Log in or register to post comments
आ
आत्मशून्य Sat, 05/31/2014 - 14:04 नवीन
पण प्रश्न इतका सोपा असता तर राहुल का नाही पंतप्रधान बनला ? मान्य विचार अवांतर भासेल पण शो चालु राहणे प्रमाणेच कोण चालवतो याला रसिकांच्या दृष्टीने फार महत्व असते हे एक रसिक म्हणुन आपण णाकारनार काय ....?
  • Log in or register to post comments
प
पैसा Fri, 05/30/2014 - 18:52 नवीन
तो गेला नाही. असभ्य वागण्यासाठी तो आणि गोगोल या दोघांना बरोबरच शिक्षा दिली होती.
  • Log in or register to post comments
इ
इरसाल Sat, 05/31/2014 - 11:40 नवीन
सभ्य सभासद मिपा हेच पुर्ण जग या समजातुन मी इथे जिंकलो की सगळ जग जिंकल या अविर्भावात असतात. या नादात कहीतरी करुन बसतात, मग कधी कधी हे* मिळतंया मग हितुन जाव लागतयां. Image removed.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 16 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 28 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 30 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 32 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 35 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा