Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'
  • खेळ मांडला...
  • भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक
  • गालावरी लाली नभाची.
  • वेताळ कथा - कोबी सिंह आणि विश्वगुरू प्रदेश
  • राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा
  • इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा
  • पाताळयंत्री चर्चा
  • राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

मराठी अस्मिते साठी : उच्च शिक्षण मराठीत द्या.

व
विवेकपटाईत
Mon, 07/07/2025 - 06:55
💬 14 प्रतिसाद

काही महिन्यांपूर्वी मराठीचिये नगरी पुण्याला गेलो होतो. बाप आपल्या दोन वर्षाच्या मुलीशी आंग्ल भाषेत बोलत होता. दोन्ही उच्च शिक्षित नवरा -बायको ही त्याच भाषेत बोलत होते. दोन दिवस तिथे राहिलो आणि मला आपण "अनपढ़ गंवार" आहोत असा फील येऊ लागला. त्याची लेक बाहेर खेळताना इतर मराठी मुलांशी हिन्दीत मिश्रित आंग्ल भाषेत बोलत होती. बाहेर हिन्दी आणि घरात आंग्ल. लेकीसाठी मराठी भाषा परकी झाली होती. तिच्या वडिलांना ही चूक म्हणू शकत नाही. प्रत्येक पालकला वाटते त्याच्या मुलाने उत्तम दर्जाचे शिक्षण घ्यावे आणि उत्तम पगारची नौकरी त्याला मिळावी. त्या मध्यम वर्गीय हाऊसिंग कॉम्प्लेक्स मध्ये सर्वच पालक मुलांशी आंग्ल भाषेत बोलत होते किंवा बोलण्याचा सराव करत होते. ही स्थिति पुण्याची मुंबईची नव्हे तर थेट मागासलेल्या चंद्रपुर सारख्या शहराची ही आहे. पालकांना वाटते त्यांच्या मुलांना आंग्ल भाषेत महारथ प्राप्त झाली की त्यांना तात्यांच्या गावी स्थायिक होण्यासाठी जाता येईल. त्यासाठी पालक मुलांच्या शिक्षणासाठी कान्वेंट शाळा, तिथे नाही मिळाली तर इतर सीबीएससी शाळा निवडतात. सरकारी शाळांमध्ये तर मराठी शासनाच्या जबरदस्ती मुळे शिकावी लागते. बाकी मराठी असो की हिन्दी दोन्ही विषयांत कमी मार्क्स मिळाले तरी पालकांना काहीही फरक पडत नाही. पण मुलांना आंग्ल भाषेत किमान 75 टक्के पेक्षा जास्त मिळाले पाहिजे, असे मध्यमवर्गीय पालकांची इच्छा असते.

दिल्लीत पूर्वी एक कहावत प्रसिद्ध होती " हाथ कंगन को आरसी क्या? पढे लिखे को फारसी क्या?" फारसी मुगलांच्या आणि नंतर ब्रिटिश काळात रोजगार देणारी भाषा होती. सरकारी दफ्तरात फारसी चालायची. मराठी जर रोजगार देणारी भाषा बनली तर मराठी माणूस सोडा इतर ही भाषिक लोक ही मराठी शिकतील हे अत्यंत सौपे गणित आहे. त्यासाठी मराठी भाषेत उच्च दर्जाचे टेक्निकल शिक्षण देणे गरजेचे. ज्यांना मराठीच्या अस्मितेची चिंता आहे, हिन्दी विरोधाचा ड्रामा सोडून, मराठी भाषेत उच्च शिक्षण देण्यास सरकारला बाध्य करण्यासाठी आंदोलन केले पाहिजे. महाराष्ट्र शासनाने ही उच्च शिक्षण क्षेत्रात, मग चिकित्सा असो की विज्ञानाच्या शाखा उदा. इंजीनियर ते वास्तुविद, किमान 50 टक्के जागा, फक्त मराठी माध्यमात शिक्षण देण्यासाठी आरक्षित केल्या पाहिजे. मराठीत उच्च शिक्षण घेणार्‍यांना महाराष्ट्रांत सरकारी खात्यांत, हॉस्पिटल इत्यादीत किमान 50 टक्के आरक्षण दिले पाहिजे. मग पहा पालक स्वतहून त्यांच्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांत घालू लागतील. बाकी ज्यांच्या मनात तात्यांच्या गावी जाण्याचे स्वप्न आहे ते निश्चित याला विरोध करतील.

देशाला भाषा आणि प्रांत आधारावर तोडण्याचे प्रयत्न गेल्या 70 वर्षांपासून सुरू आहे. महाराष्ट्रात ही राजनेता निवडणूक जिंकण्यासाठी भाषाई अस्मितेचा उपयोग करतात. आजकाल महाराष्ट्रात जे हिन्दी विरोधी आंदोलन सुरू आहे, ते फक्त राजनीतिक आहे. या घटकेला मुंबईत 22 टक्के एक गठ्ठा मते आहेत. मराठी लोकांच्या भावना भडकावून एम+एम गाठजोड करून मुंबईत निवडणूक जिंकता येईल यासाठी हे सर्व सुरू आहे. या शिवाय उर्दूला दुसर्‍या भाषेचा दर्जा देण्याचा इरादा ही आहे. महाराष्ट्र शासनाने हिन्दीला लवकरच महाराष्ट्रची दुसरी राजभाषा घोषित केली पाहिजे नाहीतर भविष्यात हिन्दी एवजी उर्दू दुसरी भाषा घोषित केली जाईल. बाकी हिन्दी भारतात सर्वात जास्त बोलणारी भाषा आहे. हिन्दी भाषेचा रोजगारसाठी निश्चित लाभ होतो. तिसरी भाषा म्हणून हिन्दी अवश्य शिकली पाहिजे. हिंदीची लिपि ही देवनागरी आहे. याशिवाय मराठी मुलांसाठी हिन्दी जड नाही कारण 90 टक्के शब्द एकसारखे आहेत. केंद्र सरकारच्या नौकरीतला अनुभव सांगतो मराठीतील 90 टक्के पत्र अनुवादसाठी जात नाही कारण अधिकान्श बाबूंना पत्रातील समस्या/ विषय कळतो.


  • Log in or register to post comments
  • 2577 views


वाचनखूण लावा
| 2577 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (14)
क
कंजूस Mon, 07/07/2025 - 07:06 नवीन
हा राजकीय जुमला आहे. नेत्यांची मुलं मात्र स्काटिश शाळेत इंग्रजी, हिंदी आणि फ्रेंच भाषा घेऊन शिकली आहेत. दणका मराठी प्रजेला आणि त्यांच्याकडून अमराठी लोकांची दुकाने फोडण्याचा आहे. बाकी मुंबईत मराठी न बोलताही कामकाज करून आयुष्य काढणारे ८५% लोक आहेत.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 07/07/2025 - 11:41 नवीन
हे सर्वानाच माहीत आहे तरीही मिपावर आणी अन्यत्र..... चढा ओढीनं पतंग चढवत होते ...... सदृश्य परिस्थिती आहे. मागे ब्याण्णव मधे हिन्दी बंदी आली होती. कामटी इथे कार्यरत होतो. तीन वर्षानंतर पुन्हा उत्तर भारतात बदली झाली. प्रवेश परिक्षेत हिन्दी मधे मुली नापास झाल्यावर. कसेबसे हेडमास्तर ला पटवले व दाखला मिळवला. ज्याना जे शिकायचे ते शिकू द्या, पालक व शिक्षण संस्थेवर सोडून द्या,राजकारण करू नका. सरकारी व वैयक्तिक संपत्तीचे नुकसान करू नका.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 07/08/2025 - 14:02 नवीन
राज आणि उद्धव एकत्र आल्यामुळे अनेक मराठी पत्रकारांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. "पण मुलांना आंग्ल भाषेत किमान 75 टक्के पेक्षा जास्त मिळाले पाहिजे, असे मध्यमवर्गीय पालकांची इच्छा असते." पण ह्याला जबाबदार आपली व्यवस्थाच ना?सरकारी हिंदी/मराठी शाळेत शिकला आणि भारतिय विदेश सेवेत लागला(आय एफ एस) अशी किती उदाहरणे आहेत? ह्यातले बहुतांशी आपण सेंट स्टीफन्स/श्रीराम कॉलेज/मेयोचे विद्यार्थी आहोत असे अभिमानाने सांगत असतात.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 07/08/2025 - 14:41 नवीन
शाळेत विज्ञान आणि गणित मराठीत शिकलेल्यांचे पुढे बारावीला हाल होतात. इंग्रजीवाले पुढे जातात, स्पर्धा परीक्षा चांगली उत्तीर्ण होतात आणि चांगले अभ्यासक्रम उच्च श्रेणी मिळवून चांगल्या नोकऱ्या पकडतात. तर उच्च शिक्षण मराठीत कोण घेणार????
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 07/08/2025 - 15:06 नवीन
अगदी बरोब्बर. एवढा सोपा मुद्दा आहे. मराठीच नाही तर सर्वच भारतिय भाषांची ही अवस्था झाली आहे.मातृभाषा ही शिकण्यासाठी पदवीपर्यंत पर्याय हवी. भारतिय भाषा/मराठी ज्ञानभाषा झाली पाहिजे असली वाक्ये टाळ्या मिळवायला सोपी आहेत. मराठी प्रकाशकांना सवलती द्याव्यात..सरकारने मराठीत लेखन करण्यासाठी प्रोत्साहन कार्यक्रम करावेत.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Tue, 07/08/2025 - 15:13 नवीन
मला वाटते की हा वाद हिंदी 'पहिलीपासून सक्तीची करावी' ह्या संकल्पनेतून आला आहे. पहिलीतल्या मुलांना जेव्हा त्यांच्या मातृभाषेशी प्रथमच लिखित स्वरूपात तोंडओळख होत असताना हिंदी सक्तीची करावी हे चुकीचेच आहे . माझा जन्म व वास्तव्य मुंबईत झाले, आम्हाला पाचवीपासून इंग्रजी व हिंदी ह्या नवीन दोन भाषा शिकाव्या लागल्या व त्यात त्रास वगैरे फारसा झाला नाही. मुंबईत कित्येक वर्षे आपापसात बोलण्याची भाषा हिंदीच होती, त्यामुळे हिंदी कानावर सतत पडायची. इंग्रजी शिकणे थोडेसे कठीण होते कारण इंग्रजी वृत्तपत्रे सोडल्यास इंग्रजी सर्रास ऐकू यायची नाही, अगदीच नाही म्हणायला रेडियोवरच्या बातम्या हिंदी , इंग्रजीत असायच्या तसेच क्रिकेटची कॉमेंट्री इंग्रजीतच असायची. इंग्रजीत प्राविण्य न मिळविता आल्यामुळे पुढे कॉलेजमध्ये हालच झाले, नोकरीसाठी इंग्रजी बोलता येणे हे अनिवार्यच होते त्यामुळे तेथे देखील त्रास झाला. खरा त्रास कॉलेजमधल्या कॉन्व्हेंट एज्युकेटेड कन्यांशी इंग्रजीत न बोलता आल्यामुळे कितीतरी हातच्या निसटल्या ते दुःख जालीम आहे. (हलकेच घ्या) थोडक्यात आपण जितक्या जास्त भाषा शिकू तितके आपण जीवन संघर्षात टिकून राहू शकतो.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 07/08/2025 - 15:36 नवीन
खरा त्रास कॉलेजमधल्या कॉन्व्हेंट एज्युकेटेड कन्यांशी इंग्रजीत न बोलता आल्यामुळे कितीतरी हातच्या निसटल्या ते दुःख जालीम आहे.
त्यावेळेस ते अगदी जालीम दु:ख वाटले असले तरी त्यावेळी एकदम फ्लुएन्ट इंग्लिश बोलता येत नव्हते याबद्दल आता भगवंताचे आभार मानत असाल :)
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Wed, 07/09/2025 - 12:02 नवीन
मराठीत उच्च शिक्षण द्यावे असे एकाही प्रतिसाद देणाऱ्याची इच्छा नाही असे वाटते.
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Wed, 07/09/2025 - 13:01 नवीन
मराठीमध्ये उच्च शिक्षण देण्याची क्षमता राहीली नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 07/09/2025 - 15:11 नवीन
उच्च शिक्षण म्हणजे काय? अगदी पी.एच.डी नाही तरी डिग्रीचे शिक्षण मराठीतून द्यावे असे तुम्हाला म्हणायचे आहे हे गृहित धरतो. मागे मिपावर अशाच एका धाग्यावर घमासान झाले होते. त्यात दिलेल्या प्रतिसादाचा काही भाग इथे पेस्ट करतो. पूर्ण उच्च शिक्षण मराठीत देणे जाऊ द्या आधी काहीकाही संज्ञांना मराठी शब्द मिळाले तरी खूप होईल. त्या संज्ञा पुढीलप्रमाणे: गणित १. डेरिव्हेटिव्ह २. इंटिग्रेशन ३. पार्शल डेरिव्हेटिव्ह ४. कंटिन्युईटी ५. डेफिनेट इंटिग्रल ६. इन्डेफिनेट इंटिग्रल ७. कॉन्व्हर्जिंग सिरीज ८. डायव्हर्जिंग सिरीज ९. डिटरमिनन्ट १०. मॅट्रिक्स ११. सिंग्युलर मॅट्रिक्स १२. इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स १३. कॉम्प्लेक्स अ‍ॅनॅलिसिस १४. कॉन्फॉर्मल मॅपिंग १५. पीसवाईज कन्टिन्युअस फन्क्शन १६. डिफरिन्शिअल इक्वेशन १७. मेथड ऑफ व्हेरिएशन ऑफ पॅरॅमिटर्स संख्याशास्त्र १. कोरिलेशन २. रिग्रेशन ३. होमोस्केडॅस्टिसिटी ४. बायनॉमिअल डिस्ट्रीब्युशन ५. बूटस्ट्रॅपिंग ६. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ७. हायपोथिसिस टेस्टिंग ८. नल हायपोथिसिस ९. अल्टरनेट हायपोथिसिस १०. डिग्री ऑफ फ्रिडम ११. स्कॅटर प्लॉट १२. अ‍ॅनॅलिसिस ऑफ व्हेरिअन्स १३. मीन स्क्वेअर्ड एरर १४. लेव्हल ऑफ सिग्निफिकन्स १५. कॉन्फिडन्स लेव्हल १६. कॉन्फिडन्स इंटर्व्हल मेकॅनिकल इंजिनिअरींग (मी एक नंबरचा बत्थड मेक्यानिकल विंजिनेर असलो तरी हे सगळे शब्द कधीतरी कुठेतरी ऐकले आहेत) १. एन्ट्रॉपी २. एन्थाल्पी ३. बाऊंडरी लेअर ४. थर्मल कन्डक्टिव्हीटी ५. अ‍ॅनिलिंग ६. इंटर्नल कम्बश्चन इंजिन ७. लॅपिंग ८. होनिंग ९. फाईनाईट एलिमेन्ट १०. बाऊंडरी लेअर सेपरेशन ११. फेराईट १२. आयसोमेट्रिक व्ह्यू १३. आयसोमेट्रिक प्रोजेक्शन १४. बेअरींग १५. पिनिअन १६. जिग १७. फिक्श्चर इत्यादी इत्यादी अशा मला वरवरची माहिती असलेल्या दोनतीन विषयातल्या एकूण संकल्पनांपैकी एखादा टक्का संकल्पनांची नावे इथे लिहिली असतील. सांगायचा मुद्दा म्हणजे उच्च शिक्षणात अशा हजारो वेगवेगळ्या संकल्पना आहेत. त्याची आधी मराठी नावे, मग सगळे उच्च शिक्षण मराठीतून आणि मग त्याचा नोकरीच्या ठिकाणी उपयोग होईल अशी अपेक्षा करायची. लै लांबचा पल्ला आहे की हा. त्यापेक्षा तो गुरू की शुक्र की शनी जास्त जवळ असेल. बरं तंत्रज्ञानात दररोज प्रगती होते आहे त्याचे जवळपास सगळे डॉक्युमेंटेशन इंग्रजी भाषेत आहे. आधी असलेल्या हजारो संकल्पनांचे मराठी शब्द शोधत बसलो तर नवीन होणार्‍या प्रगतीची माहिती करायची कवा अन त्याचा उपयोग कवा करायचा? धाग्यातील बाकी मुद्द्यांविषयी फार जास्त असहमती नक्कीच नसली तरी त्यावरील हा उपाय- मराठीतून उच्च शिक्षण द्या तो काही पटला नाही.
  • Log in or register to post comments
त
तिता Wed, 07/09/2025 - 14:31 नवीन
माझीच भाषा उच्च आणि बाकीच्या तुच्छ असा आविर्भाव दिसतो आहे. मी मराठीत शिकलो दहावी पर्यन्त. Acceleration ला त्वरण हा शब्द आहे. का कोण जाणे. दोन्ही शब्द तितकेच alien त्या वेळी. पण acceleration शब्द शिकणे नंतर जास्त फायद्याचे आहे. अशी अनेक उदाहरणे देऊ शकतो. मला मराठी साहित्य आवडते. पण विद्यान शिकण्यासाठी English जास्त suitable भाषा आहे.
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 07/09/2025 - 14:47 नवीन
उच्च शिक्षण म्हणजे नेमके काय ? अभियांत्रिकी का ? सदर क्षेत्र मराठीपासून सगळ्यात लांबचे वाटते आहे. -गा.पै.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत Sat, 07/12/2025 - 05:29 नवीन
मनात इच्छा असेल तर या वर्षीच उच्च शिक्षणाची शुरुवात मेडिकल फिजियोथैरेपी, जनावरांचे डॉक्टर, डेंटिस्ट, MBBS कोर्स मराठीत सहज सुरू करता येईल. माझे ऑपरेशन ज्या हार्ट सर्जन मी केले होते मी त्याला एकदा विचारले जर तुम्ही हिंदीत मेडिकल केले असते तर ऑपरेशन करू शकले असते का. तो म्हणाला कोणत्याही भाषेत शिकलो असतो तरी काहीही फरक पडले नसता. वास्तू शास्त्राचे शिक्षण मराठी घेणारा काही तिरपी इमारत बांधणार नाही. पण निजी अंग्रेजी शाळा कॉलेज मोठ्या प्रमाणात बंद होतील.त्यात अधिकांश राजनेत्यांच्या आहेत. कोचिंग क्लासेस बंद होतील.
  • Log in or register to post comments
ख
खटपट्या Fri, 09/05/2025 - 22:03 नवीन
रशियन डॉक्टर रशियन भाशेतच वैद्यकीय डीग्री घेतात की.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 19 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 31 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 33 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 35 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 38 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सरगर
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:42
  • सदस्य: yummmtummm
    नोंदणी: Mon, 04/14/2025 - 17:21
  • सदस्य: SavitaGovilkar
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 15:44
  • सदस्य: रमेश माने
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 14:24
  • सदस्य: भूषण सहदेव तांबे
    नोंदणी: Mon, 10/28/2024 - 09:07
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा