सुरीला दारूडा,..
संध्याकाळचे सात-साडेसातला कुकरची शिट्टी होऊ लागली, की
तिच्या सूऊऊऊ आवाजाच्यानंतर ,कधी आधी
"चंदनाची चोळी अंग अंग जाळी... बाई ठिपक्यांची.. ठिपक्यांची.."
असा तालामुरातला खडा आवाजान गाणारा बेवडा ऐकू यायचा.
घरासमोरच्या मुख्य हमरस्ता कायम वाहता असतो.फाटक्या शर्टमधला तो मळका दारूडा झिंगत रस्त्याहून धीमेपणाने घरी जायचा .
बर नुसता झिंगायचा नाही तर वरच्या पट्टीत गात चालायचा. "चंदनाची चोळी अंगजाळी, बाई ठिपक्यांची हे त्याचे विशेष गाणं होत.
"बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची ..."
हे तो इतकं अप्रतिम गायचा. वरच्या आवाजात बाई ठिपक्यांची गात हळू हळू आवाज करत, बाई ठिपक्यांची... बाई ठिपक्यांची.. म्हणत सूर लावायचा.दारूड्याला हेच गाणं का गावं वाटतं.कोण्या बाईने त्याला नादावलं,आणि तो दारूडा झाला असेल का?? परत प्रश्न पडायचा.
ज्यांनी पहिल्यांदा हे ऐकलं ते बाहेर डोकावून पाहत. पण आता त्याची सवय झाली होती, तो झिंगत गात रस्त्यावरून जायचा तेव्हा त्याच्या तालात घरातच माना डोलायच्या.वाटायचं,काय भारी आवाज जरा नशीबवान असता तर याने मैफिली जमवल्या असत्या.बेवडा नाही केवड्याच्या सुंगधासारखा दरवळला असता.
त्याचं दुसरं गाण असायचं..
" जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर"
त्यात तो" जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर "
हे अगदी बेंबीच्या देठापासून वरच्या पट्टीत गायचा.
"जैसे ज्याचे कर्म?"
बेवड्याला नक्की स्वतःचे तरी कर्म समजत आहे का? मूळात व कर्म ,त्याचे फळ उमगल? जर हो तर का तो दारु पित असावा?
पण दारूड्याला ईश्वर नक्की मान्य असणार??
पांढरपेशा मला प्रश्न पडायचे?
आता दारूडा दिसत नाही, म्हणजेच ऐकू येत नाही. कुठल्या प्रवासात गेला काय माहिती?..
-भक्ती
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments