गर्जा महाराष्ट्र (ऐसी अक्षरे -२६)
#गर्जामहाराष्ट्र
लेखक-सदानंद मोरे

इतिहासाची मांडणी हितसंबंधांच्या दृष्टीने करीत राहिल्याने अनेक दोष त्यात येतात, ती अपूर्ण राहते.
नीरक्षीरविवेक बुद्धीने महाराष्ट्राच्या इतिहासाकडे व सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक इतिहासाची पाने 'गर्जा महाराष्ट्र' या जेष्ठ संशोधक डॉ.सदानंद मोरे यांच्या ग्रंथात दिसतात.
ग्रंथात मराठी भाषेच्या इतिहासात पोवाड्याचे, पाकृत भाषेच्या जडणघडणीचे महत्त्व अधोरेखित केले आहे, यामध्ये संस्कृत विरुद्ध प्राकृत', 'याकडेही लक्ष वेधले आहे.
सातवाहन ,यादव ते शिवछत्रपती ते महाराष्ट्र १ मे १९६० या प्रदीर्घ काळात मराठ्यांचा संघर्ष अवर्णनीय लेखनाने उलगडला आहे.
छ. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाची आगळी, मुत्सद्दी बाजू, वाचायला मिळाली पण याच मराठ्यांना इंग्रजांनी 'लुटारु' अशी,धादांत खोटी ओळख दिली. भारतीयांनी एका प्रेरणास्थापासून दूर जावे म्हणून ही खेळी खेळली. परंतू लोकमान्य, फुले यांनी ती अस्मिता छत्रपती शिवाजींची प्रेरणा पुन्हा जागृत केली .पण महादेव मोरेश्वर कुंटे यांचे 'राजा शिवाजी' मराठ्यांशी संबंधित पहिले (१८६९) महाकाव्य होते हे सध्या विस्मृतीत गेले आहे या विषयी लेखही यात आहे.
मराठी माणसाचे कूळ शोधताना काही इतिहासकारांनी ते शुद्धतेच्या अट्टाहासापायी असे उत्तर भारतात शोधण्याचा श्रेष्ठ कनिष्ठ संकल्पना रुढ करण्याचा प्रयत्न केल्या. परवलीचे वाक्य 'महाराष्ट्र धर्म 'ही संकूषित शब्द पहिल्यांदा न्या. रानडे यांनी नी १८९५ ला व्याख्यानात वापरला होता.या वाक्याचा अर्थ महाराष्ट्र वा धर्मापुरता नसून राष्ट्रीय धर्मा प्रसरण क्षमता या 'महाराष्ट्र राष्ट्रीय शक्ती होण्यात आहे. यावर
'सनातन धर्म हाच महाराष्ट्र धर्म 'या प्रकरणात प्रकाश टाकण्यात आला आहे.
अनेक इतिहासकारकांनी धर्मशास्त्रावर जोर दिला व इतिहास मांडला व तो मांडताना वर्णश्रेष्ठत्वाचा पुरस्कार दिसला हे केल्यामुळे भविष्यात अनेक वादांची नांदी झालीच, अशा प्रकारचे परखड मत देतांना नंतर महाराष्ट्रातील अनेक लोकप्रतिनिधींच्या राजकीय, ऐतिहासिक संघर्षाच्या कधी न वाचलेल्या गोष्टी यात समजल्या. तत्कालीन महाराष्ट्रातील ब्राम्हण व ब्राम्हणेतर तद्नंतर ब्राम्हणेत्तर मराठा चळवळीत मराठे विरूद्ध मराठेत्तर याविषयी साहित्यनिर्मितीचे टप्पे /संदर्भ समजले.
दुर्लक्षित विठ्ठल रामाजी शिंदे यांच्यावरील प्रकरणात शिंदेंसारख्या व्यासंगी संशोधकाने केवळ पुस्तकी नाही तर क्षेत्रीय (Field Study) प्रकारचा अनुभवाधिष्ठित अभ्यास अस्पृश्यांच्या प्रश्नांचा केला हे सांगितले. १९३५ला बडोदा येथे भरलेल्या साहित्य संमेलनाला अध्यक्षीय भाषणाचा समारोप करतांना ते म्हणाले "बाबांनो, तुम्ही आपले पूर्वग्रह पुन्हा सोडून दया आणि तुमच्यासाठी आधीच मिळवलेल्या मिळवून ठेवलेल्या माहितीला तुमच्या स्वतःच्या स्थानिक निर्विकार अनुभवांची जोड देऊन अशी काही नवी दिशा दाखवा, की जेणेकरुन आमचे पूर्वग्रह नाहीसे होतील आणि नवीन आशा उत्पन्न होईल."
लोकहितवादींनी आज्ञापत्राच्या कर्त्याने शिवाजीराजांनी नूतन सृष्टी निर्मिली असे म्हटले आहे. शिवाजी महाराजांनी केलेले कृत्य हे साधे बंड नसून, क्रांती म्हणजे रिव्होल्यूशन असल्याचे प्रतिपादन केले,
बंड- नवीन सत्तेत वरचे मूल्य असतीलच असे नाही
क्रांती - सत्तांतर हे मूल्याधिष्ठित, अगोदरपेक्षा चांगली राज्यव्यवस्था असते.
शेजवलकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधूता या मूल्य त्रयींचा फ्रेंच राज्यक्रांतीत मिळाले अस उल्लेख करत शिवकाळात समता व बंधुतेमुळे मराठे एकवटले व स्वातंत्र्य मिळाले हे अधोरेखित केले.
शेवटच्या लेखांमध्ये औरंगजेबाच्या विरुद्धची मराठ्यांची झुंज सांगतांना त्याच मोगलांना संरक्षणासाठी मराठ्यांवर अवलंबून राहावे लागत. दिल्ली सल्तनत क्रमांक एक वर केवळ नामधारी तर क्रमांक दोनवर मराठ्यांचीच वर्णी सर्वार्थाने राहिली.
यावर शिवाजी लोकांचा राज्यविस्तार हिंदूस्थानचा बंदोबस्त, मराठ्यांचा गनिमी कावा ,अटकेवर फडकवले, तत्वासाठी लढणारे मराठे या लेखांत मराठ्यांचे शौर्य दिसते.
इंग्रजी सत्तादेखील अनेक दशके मराठ्यांनी झुंजत ठेवले, जे कार्य पातशाह्या राजपूत, मोगल कोणीही करू शकले नाही. त्याची दखल न घेता व्यवहार करणे अशक्यप्राय होते. १६७५च्या मे महिन्यात मुंबईच्या वखारीतील इंग्रजांनी राजापूरच्या इंग्रजांना लिहिलेल्या सूचना वजा पत्रातील मजकूर महत्त्वाचा आहे.
"ज्यांच्याशी तुम्हाला वागावयाचे आहे ते लोक (म्हणजे अर्थात मराठे) चतुर व चौकस(searching) आहेत. त्यांच्याशी व्यवहार करताना मर्यादाने व विचाराने वागावे."
मराठ्यांच्या स्वभावाचा व कर्तृत्वाचा उल्लेख कधी कधी सहजगत्या येऊन जातो तेव्हा त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घ्यायला अवसरच राहत नाही'
ज्यावेळी अनेक संस्थानिक ऐषो आरामात ब्रिटीश अंमलाखाली दंग होते. त्यांच्या अनेक सुरस कथा प्रचलित आहेत. या कथांना ठळक आणि सन्माननीय अपवाद मराठी संस्थानिकांमध्ये आढळून येतो. बडोद्याचे सयाजीराव गायकवाड, कोल्हापूरचे शाहू महाराज, औंधचे भवानराव पंतप्रतिनिधी हीज्ञतीन नावे या संदर्भात सहज आठवावीत अशी आहेत.
आपल्या वर्तमानातील लढ्यात ऐतिहासिक पुरुषांच्या नावाने लढण्याच्या आणि त्यासाठी इतिहास लेखनाला रणमैदान बनवण्याच्या प्रवृत्तीविषयी शिद्यांनी नापसंती व्यक्त केलेली आहे. इतिहासात पूर्वजांनी केलेल्या पराक्रमात गुंतून आपल्या वर्तमानातील प्रश्नांकडे व खऱ्या संघर्षाकडे दुर्लक्ष करू नये असे त्यांना सांगावयाचे आहे. त्यांच्या त्या पदातील काही ओळी उद्धृत करणे उचित होईल.
बंधू हा भवाचा किल्ला सर करणे आम्हा सकला ॥धृ॥ सिंहगड तो एकचि नोहे महाराष्ट्रामधला साचा ॥ तान्हाचि नव्हे एकुलता शेलारमामाचा भाचा ॥ श्री शिवाजी होऊनि गेला कधी काळी इतिहासाचा अशी गोष्ट न बोला कधीही ॥ जीवन हे युद्धचि पाही ॥ दिनरात अंतरी बाही ॥
मग काहो स्वस्थसे बसला ॥ बंधुहो...
जग नव्हे मराठ्यांपुरते, पसरे ते अनाद्यनंती राहणीचे जे जे साधे, स्वार्थाबाहिर जे पाहती ॥ सत्याची भूक जयांना, अन्याया जे न सहती ॥ ते सर्वची अस्सल मराठे ॥ कालदेश केव्हा कोठे ॥ सोडा हे विचार झुटा ॥
महाराष्ट्र धर्म हा अपुला ॥ बंधुहो....
'ज्यांची राहणी साधी असते, जे स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे पाहू शकतात व ज्यांना सत्याची चाड आणि अन्यायाची चीड आहे त्यांना अस्सल मराठे म्हणावे' असे शिंदे सांगतात.
महाराष्ट्र सध्या आपल्यापुरतच पाहण्याचा पायंडा पडत आहे, त्यासाठी ऐतिहासिक व्यक्तींना इतिहासाला साधन सहज केले जाते.दुसऱ्यांच्या चुका सांगताना स्वतःतच बदल करण्याला कोणी फारसे उत्सुक नाहीत ही शोकांतिका आहे.
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments