Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ऑपरेशन सिंदूर - युद्ध की मर्यादित कारवाई?

श
श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 04:29
🗣 120 प्रतिसाद
आज पहाटे भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तान भूमीवर ९ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याच्या काही चित्रफिती पाहिल्या. काही इमारती उद्ध्वस्त झालेल्या दिसल्या त्यात एक मशीद आहे. आपण भारताची ५ लढाऊ विमाने (त्यात एक राफेल) व एक ड्रोन पाडले असा पाकिस्तानने दावा केलाय. सीमेवर दोन्ही बाजूने तोफांचा भडीमार झालाय. ही कारवाई मर्यादित लाहू नये ही अपेक्षा आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26132 views

🗣 चर्चा (120)
म
मारवा Fri, 05/09/2025 - 07:07 नवीन
भारतीय माध्यमांचा धाडसी वार्ताहरांचा जे जीव धोक्यात घालून वार्तांकन करत आहेत. सर्व पत्रकारांचा जे भारतविरोधी misinformation चा uttam रित्या प्रतिकार करत आहेत. पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांची चिरफाड करून त्यातील सत्य बाहेर आणत आहेत. भारतीयांचे सामान्य नागरिकांचे मनोबल जे अशा वेळी अतिशय महत्वाचे असते ते टिकवून ठेवण्यात हातभार लावत आहेत. यावेळेस जेव्हा नागरिकांना आपल्या सैनिकांच्या शौर्याची तसेच आपल्याकडे असलेल्या क्षमतांची जाणीव करून त्यांना आश्वस्त करत आहेत अशा सर्व माध्यम वीरांचे कौतुक आहे. सीमेवरील सैनिक तर लढत आहेच पण त्यांना सहाय्यक अशा त्यांच्या मागे.ठामपणे उभे असलेल्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सर्वच घटकांचे योगदान महत्वाचे आहे. मग ते सैन्यासाठी सहाय्यक भूमिका घेणारे डॉक्टर असोत, आचारी असोत की माध्यमातून काम करणारे आपल्या लोकशाहीच्या मूलभूत चार खांबापैकी एक असोत. सोनियांच्या कणखर नेतृत्वाला माझा सलाम ! आज त्यांनी दाखवलेल्या पाठिंब्यामुळेच हे युद्ध आपण जिंकण्याच्या मार्गावर आहोत.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/09/2025 - 07:20 नवीन
भारतीयांचे सामान्य नागरिकांचे मनोबल जे अशा वेळी अतिशय महत्वाचे असते ते टिकवून ठेवण्यात हातभार लावत आहेत. आता काय बोलू ? भारतीय सैन्यदलाच्या क्षमतेवर आणि शौर्यावर तुम्हा आम्हा सर्वांचा विश्वास आहे. पण पाकिस्तान की राजधानी इस्लामाबादपर कबजा. क्वेटा शहराची वाताहात, पाकिस्तानी राष्ट्रप्रमुख शाहबाझ शरीफ बंकरमध्ये लपून बसले. वगैरे अशा खोट्या बातम्यांनी भाबड्या माणसाला आंनद वाटतो पण सत्य काय ते माहिती होत नाही, असंख्य भारतीय वास्तव बातम्या लिंक्स कुठे मिळतील याचा शोध घेताना दिसत होते. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 05/09/2025 - 07:26 नवीन
या अभिमानाला काळिमा फासणारे तमाशे रात्रभर अनेक चॅनल्सवर चालू आहेत. अफवांनाच तिखटमीठ लावून, मागे साऊंड इफेक्ट देत आरडत ओरडत बातमी म्हणून पेश करणे हा पत्रकारितेत नवीन ट्रेंड दिसतो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/09/2025 - 07:39 नवीन
गोबरयुगात अशा बातम्या मनोबल वाढण्यासाठी आवश्यक असतात. -दिलीप बिरुटे (अवकाळी पावसामुळे गार पडलेला गारवा)
  • Log in or register to post comments
म
महिरावण Fri, 05/09/2025 - 07:46 नवीन
मोदींच्या काळात पाकिस्तानवर यशस्वी हल्ला झाल्यामुळे तुम्हाला काही सुचेनासं झालंय असे दिसते. धड मोदींचे कौतुकही करता येत नाही आणि टीकाही करता येत नाहीये म्हणून तुम्ही खर्गेंप्रमाणेच फक्त सैन्याचे कौतुक करून वेळ मारून नेत आहात.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/09/2025 - 07:59 नवीन
प्रिय छुपे संपादक स.न.वि.वि.
सैन्याचे कौतुक करून वेळ मारून नेत आहात.
सैन्याचं कौतुक नको का करायला ? भक्त आणि परंपरावादी म्हणून तुम्ही प.प्र.मोदीच कौतुक करा आम्ही देशभक्त नागरिक देशाचं रक्षण करणा-या आमच्या बहादूर सैन्यदलाचं कौतुक करू. ;) -दिलीप बिरुटे ( मिपाच्या धोरणात राहणारा ) :)
  • Log in or register to post comments
म
महिरावण Fri, 05/09/2025 - 08:10 नवीन
तुमच्या म्हणण्याप्रमाणे लीडरला काही स्थानच नाही म्हणजे. उगाचच झाले ते नेपोलियन बोनापार्ट, विन्स्टन चर्चिल, आयसेनहोवर, इंदिरा गांधी. सैन्यांचं श्रेय निर्विवाद असतंच पण त्याला योग्य दिशा, मुक्त हस्त देणाऱ्या जबाबदार नेत्यांचीही तितकीच गरज असते.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 05/09/2025 - 16:45 नवीन
सैन्याचं कौतुक नको का करायला. In a shocking disclosure, Air Chief Marshal (Retd) Fali Homi Major has revealed that the Indian Air Force was ready to take revenge for the devastating 2008 Mumbai terror attacks but the then United Progressive Alliance (UPA) government 'blocked' any further action on the surgical strike option that was meant to teach terror-sponsor Pakistan a lesson. I think it was the third or fourth day after the attack that we were called into the Prime Minister's office, the three chiefs, and of course, many others who were involved in this. We were asked as to what kind of options we have to launch a retaliatory strike, a precision strike. And, we gave out our options that we will be ready to undertake the strike, if asked, in the next 18 to 24 hours. That's it." He added that there was no response from the then UPA government though. "Once this was done, when we went back, we kept those plans active. Actually, we did it very quietly on a totally need-to-know basis, and only the people and forces which were involved would get involved in this operation were informed. But we maintained this readiness for quite a long period, for almost about 10-15 days," he said.
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 05/09/2025 - 08:04 नवीन
@ महिरावण तुम्ही माझी चांगलीच पंचाईत केली आहेत. माझे परममित्र प्रा डॉ बिरुटे सर आणि तुमच्या प्रतिसादातील परखड सत्य यांपैकी कोणतीही एक बाजू घेणे हे धर्मसंकट.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/09/2025 - 08:09 नवीन
नाय नाय तुम्ही व्यवस्थेच्या बाजूने राहा. व्यवस्थेच्या बाजूने राहिले की सगळे लाभ घेता येतात.. बाय द वे, 2014 नंतर नुसते पक्षा पक्षात फूट नै पडली, मित्र मित्र राहिलेले नाहीत, हा माझा अनुभव आहे -दिलीप बिरुटे ( आभासी मित्रांवर विश्वास नसलेला )
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 05/09/2025 - 09:37 नवीन
गवि तुमचे तिहेरी कौतुक महिरावण यांच्या वरील प्रतिसादात नेतृत्वाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले ते तुमच्या मते परखड असे सत्य आहे हे तुम्ही मान्य केले यासाठी पहिले कौतुक त्याच बरोबर आपल्या परम मित्राला ते सत्य मान्य नाही दिसत नाही किंवा पचत नाही हे कळते तरीही कसा का असेना शेवटी आपला मित्र आहे त्याची मैत्री सोडवत नाही या मैत्री भावने साठी दुसरे कौतुक आणि मी असा कात्रीत सापडलेलो आहे हे प्रांजळपणे मान्य करणे यासाठी तुमचे तिसरे कौतुक गेल्या काहीं दिवसात मी फार व्यक्तिगत होत चाललेलो आहे फार उथळ आणि इन्स्टंट अशी प्रतिक्रिया माझ्याकडून येणे प्रमाणापेक्षा जास्त वाढलेले आहे. उपहासाचे प्रमाण जास्त होत आहे हे मी सुद्धा तुमच्या सोबत मान्य करून घेतो तुम्हीही माझ्या प्रांजळपणा चे एकदा कौतुक करून टाका मग मी थोडा वरती बिरुटे यांना व्यक्तिगत मारला तसा टोला मारणे बंद करतो आणि थोडा सरळ मुद्दे मांडतो
  • Log in or register to post comments
ग
गवि Fri, 05/09/2025 - 09:44 नवीन
तुमचे कौतुक आहेच. मुद्दा मांडा आता.
  • Log in or register to post comments
स
सोत्रि Fri, 05/09/2025 - 09:24 नवीन
अजिबात परिपक्वता नसलेली पत्रकारिता चालू आहे! - (हताश) सोकाजी
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Fri, 05/09/2025 - 07:38 नवीन
खोट्या बातम्या देऊन फार फार तर क्षणिक आनंद मिळेल. भारतीय माधमे बघायच्या लायकीची नाहीत. सेनेच्या प्रेस ब्रिफींग ची वाट बघावी लागेल.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Fri, 05/09/2025 - 10:45 नवीन
आता युद्ध चालु झाले आहे म्हणून पाकिस्तानी चॅनेल्स बंद झाली आहेत. अन्यथा भारतिय चॅनेल्सच्या तुलनेत पाकिस्तानी चॅनेल्सवर बरीच चांगली चर्चा चालु असते(भारत-पाक मुद्दा वगळता) दुसरा बोलत असताना अडवणे, उथळ शब्द वापरणे, आकांडतांडव करणे. हे प्रकार तिकडे खूप कमी.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 05/09/2025 - 16:27 नवीन
युध्दात पहिला बळी सत्याचा पडतो असे म्हटले जाते. ते किती खरे आहे ते आपल्या आणि पाकिस्तानी चनेलच्या बातम्या पाहून समजते. या सर्व गडबडीत दोन संयमित चर्चा देत आहे. पाकिस्तानी मंत्री व भारताचे निवृत्त सैन्य अधिकारी समोरासमोरः https://youtu.be/anthGq572rE?si=g6kui-zxMnsNw4Vb भारताचे युकेमधील राजदूत विक्रम दोराईस्वामी यांच्याशी झालेली चर्चा: यात पाकिस्तानी सैन्याधिकार्याशी पण चर्चा आहे. https://www.youtube.com/live/BW4k8dB0oL0?si=vhrBNOTVNF0hchgU दोन्ही चर्चा अत्यंत संयमित व सत्य काय आहे याकडे नेणार्‍या वाटल्या.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Fri, 05/09/2025 - 16:32 नवीन
PM Modi meets former service chiefs, veterans amid tension with Pakistan PM Narendra Modi met a group of armed forces veterans today. PM had an extensive interaction with veterans on various issues on the current situation This included former Air Force Chiefs, Army Chiefs, Navy Chiefs and other veterans who have extensively served the country.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sat, 05/10/2025 - 15:10 नवीन
दोन्ही देशांकडुन शस्त्रसंधीची घोषणा.! पाकिस्तानने शस्त्रसंधीची मागणी केली. दोन्ही बाजुनी होणारे हल्ले तात्काळ बंद. India Pakistan Tensions Live Updates: Pakistan initiated call; both nations agreed to stop military action after direct talks, says India https://timesofindia.indiatimes.com/india/india-pakistan-tensions-live-updates-loc-military-bases-border-airstrikes-drone-attacks-jammu-rajasthan-punjab-blackout/liveblog/121015783.cms
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Mon, 05/12/2025 - 09:01 नवीन
युद्धबंदी करण्याची घोषणा परवा झाल्यानंतर आज आता दोन्ही देशांचे DGMO भेटत आहेत. यावर तज्ञ मिपाखरांनी लिहावे ही अपेक्षा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 05/13/2025 - 06:28 नवीन
सगळी माहिती सार्वजनिक न्यासावर उपलब्ध आहे. त्यापेक्षा जास्त माहिती लिहिण्यात/ त्या माहितीचे सोप्या शब्दात विश्लेषण करण्यात आपले कष्ट कशाला कोण वाया घालवेल? असे लिहिल्यावर येथे मूर्ख लोक अशा तर्हेचे प्रतिसाद टाकतात कि आपण लिहिले नसते तर बरे बहुतांश अभ्यासू लोकांना वाटते. एखाद्या उत्तम गायकाने "किरवाणी रागातील एखादी उत्तम चीज" सादर केल्यावर एखादा मूर्ख यापेक्षा "भीमण्णांनी आसावरी जास्त सुंदर सादर केला होता" अशी टिप्पणी करतो. पुढच्या वेळेस अशा मुर्खाला मैफिलीत येण्यास मनाई करावी असे व्यवस्थापनाला वाटत नसेल तर अशा स्थितीत त्या मॆफिलीत त्या गायकाला परत गावेसे वाटेल का?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा