Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ऑपरेशन सिंदूर - युद्ध की मर्यादित कारवाई?

श
श्रीगुरुजी
Wed, 05/07/2025 - 04:29
🗣 120 प्रतिसाद
आज पहाटे भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तान भूमीवर ९ ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ला केला. त्याच्या काही चित्रफिती पाहिल्या. काही इमारती उद्ध्वस्त झालेल्या दिसल्या त्यात एक मशीद आहे. आपण भारताची ५ लढाऊ विमाने (त्यात एक राफेल) व एक ड्रोन पाडले असा पाकिस्तानने दावा केलाय. सीमेवर दोन्ही बाजूने तोफांचा भडीमार झालाय. ही कारवाई मर्यादित लाहू नये ही अपेक्षा आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26132 views

🗣 चर्चा (120)
म
मारवा Wed, 05/07/2025 - 08:15 नवीन
यावेळेस भारतीय सैन्याने हल्ला केलेला आहे ही बाब फार म्हणजे फारच उतावळेपणाने मान्य केली जात आहे. किमान संध्याकाळ पर्यंत तरी थांबण्यास हवे होते खातरजमा केली असती कारण एकदा हे मान्य केले की भारतीय सैन्याने खरच हल्ला केलेला आहे ते सुद्धा सीमेपेक्षा इतक्या आत पर्यंत जाऊन तर मग नाईलाजाने मग पुढील मुद्दे सुद्धा चर्चेत घ्यावे लागतील. कारण मग ते अधिकच अडचणीचे आणि क्लिष्ट असे मुद्दे आहेत. ही घाई चुकते असे माझे मत आहे. हे फार भावनिक होत आहे याला कुठेतरी आळा घातला पाहिजे. पण ज्यांच्याकडून अपेक्षा आहे तेच इतके भावनिक होत आहेत आणि अभिनंदन करत आहेत की याला आता काय म्हणावे ? किमान संध्याकाळ पर्यंत तरी...
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 05/07/2025 - 08:18 नवीन
संध्याकाळपर्यंत थांबणे खूपच घाईचे ठरेल. अजून १० वर्षे थांबावे.
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 05/07/2025 - 08:42 नवीन
तुम्ही इतकी दीर्घ अपेक्षा करत आहात ?
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 05/07/2025 - 08:26 नवीन
पाकिस्तान ने पण मान्य केलंय. अजून दहा वीस वर्ष तरी वाट बघायला हवी होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 05/07/2025 - 08:17 नवीन
१९९९ - भारतीय सैन्याने सीमा न ओलांडता सैन्य, तोफा व विमानातून बॉम्बिंग करून घुसखोरांना हाकलून लावले. २०१६ - भारतीय सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई केली. २०१९ - भारतीय विमानदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन बॉम्बिंग करून अतिरेकी तळ उद्धव केले. २०२५ - भारतीय विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये व पाकिस्तानमध्ये जाऊन क्षेपणास्त्रे सोडून इस्लामी अतिरेक्यांचे तळ उद्धव केले. प्रत्येक वेळी भारत एक पाऊल पुढे जातोय.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Wed, 05/07/2025 - 08:27 नवीन
पाकिस्तानमध्ये जाऊन क्षेपणास्त्रे सोडून इस्लामी अतिरेक्यांचे तळ उद्धव केले.
ही चूक चुकून झाली की जाणूनबुजून केली? :) :)
२०१९ - भारतीय विमानदलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन बॉम्बिंग करून अतिरेकी तळ उद्धव केले.
२०१९ मध्ये बालाकोट येथे खैबर पख्तुनवामध्ये (वायव्य सरहद्द प्रांतात) म्हणजे पाकिस्तानातच जाऊन बॉम्बिंग केले होते. पीओकेमध्ये नाही. महाराजा रणजितसिंगाने खैबरखिंडीच्या आजूबाजूचा प्रदेश जिंकला आणि खैबरखिंडही ओलांडून अफगाणिस्तान त्याच्या साम्राज्यात जोडून घेतले होते. त्यानंतर जवळपास २०० वर्षांनंतर खैबरखिंडीच्या प्रदेशात आपल्या बाजूने प्रथमच हल्ला झाला होता.
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 05/07/2025 - 08:25 नवीन
चला ठीक आहे आता सर्वांनीच मान्य केलेले आहे की भारताने खरोखर हल्ला केलेला आहे तर पुढचा मुद्दा घ्या आपल्या मते पुढील कोणते प्रश्न आता उपस्थिती झालेले आहेत ? उदा. या हल्ल्याचे श्रेय कोणाचे आहे ?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/07/2025 - 14:14 नवीन
यशस्वीपणे (म्हणजे, आपल्या सैनिकांची जीवितहानी न होऊ देता) ऑपरेशन झाले. सरकारी व्यवस्था, सैन्यदल अधिकारी, इंटेंलीजन्स जाळे ह्यांच्यात समन्वय असल्यामुळे झाले. सर्वांचेच अभिनंदन.
  • Log in or register to post comments
म
मारवा Wed, 05/07/2025 - 08:33 नवीन
या हल्ल्याचे श्रेय आता कुणाला द्यावे ? मोदी यांच्या political will ला आणि नेतृत्वाला ? डोभाल यांच्या strategy ला ? जयशंकर यांच्या परराष्ट्र नीतीला ? की शरद पवार यांनी दिलेल्या अनुभवी मार्गदर्शनाला ? की विरोधकांनी केलेल्या सहकार्याला ? आपणं याचे श्रेय देऊ शकतो का ? कारण मी अगोदरच म्हणालो की हल्ला केला हे जर मान्य केले तर पुढील प्रश्न अधिक क्लिष्ट आहेत.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Wed, 05/07/2025 - 11:55 नवीन
सोप्पे आहे. हल्ला होत नाही तोपर्यंत मोदींना शिव्या द्यायच्या आणि हल्ला झाला की लष्कराचे अभिनंदन करायचे.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 05/07/2025 - 08:54 नवीन
पंप्र मोदींचे आभार.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 05/07/2025 - 09:11 नवीन
आरती गाऊया……
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 05/07/2025 - 17:01 नवीन
कालच स्काय न्यूजच्या याल्दा हकीम यांनी पाकिस्तानचे संपर्क मंत्री तरार यांची मुलाखत घेतली. त्यात त्यांनी वारंवार पाकिस्तान दहशतवादाला थारा देत नसल्याचा दावा केला. परंतु हकीम यांनी तरार यांचा दावा फेटाळून लावला. तसेच आठ दिवसांपूर्वी पाकच्या संरक्षण मंत्र्याने दहशतवादाला थारा दिला होता असे मान्य केला असल्याचेही सांगितले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील वार्तांकनात, भारताची बाजू मजबूत असल्याचे दिसत आहे. ही निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. https://youtu.be/FAwfLd-Iqao?si=Ubn2b-UAPKaR93u_
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Wed, 05/07/2025 - 17:05 नवीन
पाक संरक्षण मंत्री दहशतवादाला पाठींबा दिल्याची कबुली देताना: https://www.youtube.com/shorts/lkO8fR4vlgA
  • Log in or register to post comments
स
सुक्या Wed, 05/07/2025 - 19:17 नवीन
स्काय न्युज जर्नलिस्ट कडुन भारतातील तमाम न्युज चॅनल च्या आक्रस्ताळ्या अ‍ॅंकर ना खुप काही शिकण्यासारखे आहे. गळ्यात माईक चे बोंडुक असताना उच्च आवाजात बोलण्यात तसेच कुत्रा मागे लागल्याप्रमाणे बातम्या देण्यात काय हशील आहे? एकच गोष्ट पुन्हा पुन्हा बोलुन समोरच्याला डोकेदुखी होते. तसेच प्रत्येक न्युज ही ब्रेकिंग न्युज असते. शांतपणे बोलुन आपल्याला हवा तो मुद्दा कसा मांडावा हे भारतातल्या अ‍ॅंकर ला शिकवायची नितांत गरज आहे.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य Wed, 05/07/2025 - 19:48 नवीन
ह्या त्यांच्या आक्रस्ताळी ओरडण्यामुळेच मी अश्या बातम्या बघायचे बंद केले .
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 05/08/2025 - 07:25 नवीन
काल मी जवळपास ५ वर्षांनी हिंदी न्यूज चॅनल दिवसभर पाहिला.अस्स डोकं दुखायला लागलं संध्याकाळी,की डोकेदुखीची गोळी घेऊन आठ वाजताच निद्रिस्त झाले.कसं काय लोकं दिवसभर‌ न्यूज चॅनेल पाहतात??मी पाच वर्षांपासून टीव्ही पाहणेच सोडून दिलं आहे.खरोखर टीव्ही म्हणजे इडियट बॉक्सच आहे...
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म गुरुवार, 05/08/2025 - 11:29 नवीन
स्काय न्यूजच्या बातम्या व चर्चा ऐकल्या की आपल्या चनेलवरील चर्चांचा दर्जा किती कमी आहे याची जाणीव होते. मला तर या निवेदकांच्या ओरडण्यामुळे दूरदर्शनच्या बातम्या पहायला आवडायचे. पण त्या अगदीच सरकारी जी आर वाचून दाखवल्याप्रमाणे असतात.
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 05/08/2025 - 12:00 नवीन
फक्त निवेदकच ओरडत नाहीत तर आपल्या चॅनेल्स चे गेस्ट पण असेच ओरडणारे असतात. किंवा ओरडणाऱ्या लोकांनाच ते बोलवत असावेत.
  • Log in or register to post comments
स
सौन्दर्य गुरुवार, 05/08/2025 - 19:29 नवीन
सरकारी बातम्या - ९०% प्रोपोगंडा, १०% बातम्या
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 05/08/2025 - 12:49 नवीन
भारतीय सेनेला विनंती पाकिस्तानवर हल्ला करताना इथल्या न्यूज चॅनलच्या कार्यालयावरही बॉम्ब टाकून देश वाचवावा
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 05/08/2025 - 15:36 नवीन
भारतीयांची माथी भडकावण्याचं आणि वास्तवतेपासून दूर वार्तांकनाचे त्यांना पैसे मिळतात म्हणून इतका कै च्या कै बातम्या ठोकत असतात त्या पेक्षा वृत्तपत्र वाचलेले बरे आणि युट्यूबवरील सामान्य लोकांनी टाकलेले व्हीडीयो बरे असे वाटायला लागते. मिडिया बदनाम झालं आहे. काही विलाज नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रमोद देर्देकर Wed, 05/07/2025 - 18:04 नवीन
मोदी होते म्हणून प्रतिहल्ला तरी झाला. इतर पक्षाचा दुसरा कोणी नेता असता तर "हमे देखना है, हमे हटाना है! म्हणण्यात ७५ वर्ष तरी नक्कीच गेली असती. असो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/07/2025 - 19:25 नवीन
श्रीगुरूजी गेले वाटतं चारिधाम यात्रेला. हे राम...! =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले गुरुवार, 05/08/2025 - 07:13 नवीन
वाह वाह , ही अशी स्पष्टपणे ध्याग्याच्या लेखनाच्या विषयाशी असंबध्द आणि वैयक्तिक टिप्पण्णी मिसळ्पव संपादक मंडळ खपवुन घेते अन इतरांचे लेखन प्रतिसाद आयडी संपादित करते ह्यावरुनच त्यांचा पक्षपाती पणा सिध्द होतो .
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 05/08/2025 - 08:49 नवीन
श्रीगुरूजीचा ID उडवायाच काही कारण वाटत होत असं वाटत नाही.
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/08/2025 - 09:49 नवीन
सहमत. अमरेंद्र बाहुबली एकामागोमाग एक अज्ञानमूलक विधाने करत होते आणि ही गोष्ट आजची नाही तर अनेक महिन्यांपासून चालू होती. कितीही दुर्लक्ष करायचे ठरविले तरी तेच तेच शेकडो वेळा व्हायला लागले की मग संयम सुटला असेल हे समजता येते- माझेही तसे झाले होते, कदाचित आयडी उडायच्या थ्रेशोल्ड्पेक्षा कमी म्हणून माझा आयडी वाचला पण श्रीगुरूजींचा आयडी गेला. अनेक जण अमरेंद्र बाहुबलींच्या एकामागोमाग एक अज्ञानमूलक प्रतिसादांवर तक्रार करत असताना आयडी उडविला नाही तरी जर त्यांना निदान समज दिली गेली असती तर आज ही वेळ आली नसती. आता हे लिहून काहीच उपयोग नाही. आता त्यांचा आयडी परत आणला तरी श्रीगुरूजी परत मिपावर एक शब्दही लिहितील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित गुरुवार, 05/08/2025 - 12:02 नवीन
ह्या वेळी अज्ञान ची पराकाष्ठा केली ,वर प्रति उतर पण तसेच
  • Log in or register to post comments
स
सुक्या गुरुवार, 05/08/2025 - 19:42 नवीन
संयमाला पण सीमा असते. श्रीगुरुजी हे मिपा वर मुद्देसुद व माहीतीपुर्ण प्रतिसाद देणार्या मोजक्या लोकांपैकी एक आहेत. कोरड्यासोबत ओले जळते हे मात्र खरे!
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 05/08/2025 - 19:51 नवीन
असे आभासू ID बाराळणाऱ्या ID मुळे उडाणार असतील तर अवघड आहे. बाहुबली वर योग्य वेळी कारवाई केली असती तर गुरुजींचा ID उडाला नसता.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/08/2025 - 05:18 नवीन
शरद पवारांनी 'मार्गदर्शन' केले म्हणजे नक्की काय केले हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.जून १९९१ ते मार्च १९९३ ह्या काळात पवार संऱक्षणमंत्री होते. म्हणजे त्यालाही आता तीन दशके होउन गेली.ऊस, कापूस्,भुईमुग, साखर कारखाने,शि़क्षणसंस्था, जमीनींचे व्यवहार.. हे समजू शकतो पण युद्धनीती,शस्त्रास्त्रे, राफेल्,मीग हे पण?
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/08/2025 - 12:53 नवीन
"Indian Military Destroys Pakistan's Air Defence System At Lahore: Govt अभिनंदन. ऑपरेशन सिंदूर सुरु होउन ३६ तास उलटले आहेत. एरवी दिवसाला दोन-दोन व्हिडियो यु-ट्युबवर टाकणारे कुठे गायब झाले आहेत? उ.दा. ध्रुव राठी, निरंजन टकले.. हे गेले दोन दिवस गायब आहेत. लोकसत्ता संपादक आले आणि अभिनंदन करण्यापेक्षा पाकिस्तानच्या मूर्खपणांमुळे हे कसे झाले , ह्यावर चर्चा करत बसले. कुमार केतकरही गायबले आहेत. https://www.msn.com/en-in/news/india/indian-military-destroys-pakistan-s-air-defence-system-at-lahore-govt/ar-AA1Eo7Wb?ocid=msedgntp&pc=HCTS&cvid=1bce25f522e048178f1a121275a96e8c&ei=11
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/08/2025 - 13:06 नवीन
ध्रुव राठी हे वेगळेच पाणी आहे. काय समजलात माई?
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 05/08/2025 - 14:08 नवीन
1 मला एक नोटीस आलेली आहे वर्तणुकी.संदर्भात अशी नोटीस मला.एकट्याला.आलेली आहे का ? मी सर्वांना अशी सूचना देणारी नोटीस पाठवलेली आहे ? तसेच श्रीगुरुजी आणि अमरेंद्र बाहुबली या दोन आय डी वर तुम्ही बंदी घातलेली आहे का ? माझ्या सहित अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे आपण खुलासा करावा ही नम्र विनंती
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 05/08/2025 - 14:08 नवीन
मला एक नोटीस आलेली आहे वर्तणुकी.संदर्भात अशी नोटीस मला.एकट्याला.आलेली आहे का ? मी सर्वांना अशी सूचना देणारी नोटीस पाठवलेली आहे ? तसेच श्रीगुरुजी आणि अमरेंद्र बाहुबली या दोन आय डी वर तुम्ही बंदी घातलेली आहे का ? माझ्या सहित अनेकांना हा प्रश्न पडलेला आहे आपण खुलासा करावा ही नम्र विनंती
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 05/08/2025 - 14:16 नवीन
मी अशी नेमकी कोणती शिवीगाळ किंवा पक्षीय अजेंडा अशी नेमकी कोणती चूक माझ्या प्रतिसादांमध्ये किंवा लेखा मध्ये आहे ? म्हणजे गुन्हा कळणे महत्वाचे आहे नाही तर हे kafka च्या trial सारखं होईल. कारवाई जरूर करा पण नेमकं चुकीचं काय केलं? म्हणजे चुकलेला प्रतिसाद किंवा चुकीचा लेख किंवा चुकलेली ओळ तरी किमान दाखवा तर सुधारणा तरी करता येईल
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार गुरुवार, 05/08/2025 - 14:30 नवीन
ती नोटीस मुख्य पेजवर आहे म्हणजे सगळ्यांनाच दिसत असावी. निदान मला तरी दिसत आहे. तेव्हा ती नोटीस फक्त तुम्हालाच पाठवली आहे असे वाटत नाही. व्यक्तिगत निरोपात अशी नोटीस किंवा इशारा आला असेल तर गोष्ट वेगळी.
  • Log in or register to post comments
स
स्वधर्म Fri, 05/09/2025 - 12:28 नवीन
मलाही अशी नोटीस दिसते आहे प्रत्येक पानावर. जर कुठे असे लेखन झाले असेल, तर जरुर दाखवून द्यावे, म्हणजे काय टाळावे ते तरी कळेल असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/09/2025 - 12:45 नवीन
मिपावर वावरणा-या प्रत्येकास अशी सुचना दिसते. व्यक्तिगत अशी कोणासही ती सूचना नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
म
मारवा गुरुवार, 05/08/2025 - 15:28 नवीन
धन्यवाद माहितीसाठी तसेच श्रीगुरुजी आणि अमरेंद्र बाहुबली हे दोन आय डी संपादकांनी कारवाई करून बंद केले आहेत का ? याचा कुठे खुलासा केलेला आहे का ? कृपया माहिती असल्यास द्यावी
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर गुरुवार, 05/08/2025 - 16:04 नवीन
नविन आय.डी. घेउन ते अवतरतील. श्रीबाहुबली आणि अमरेंद्र गुरुजी.
  • Log in or register to post comments
स
स्वरुपसुमित Fri, 05/09/2025 - 02:43 नवीन
नवीन आयडी बंद केल आहे मिपावर
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे गुरुवार, 05/08/2025 - 19:45 नवीन
भारताच्या तीन्ही सेनेचा एकाच वेळी पाकिस्तान वर हल्ला चालू आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा गुरुवार, 05/08/2025 - 20:05 नवीन
कराची बंदरावर भारतीय नौसेनेचा हल्ला https://youtube.com/shorts/y_gg_oY3PVk?si=pF0Qqdedl4Q_FrUM
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Fri, 05/09/2025 - 07:16 नवीन
आपल्या मिडियाने किंवा युट्यूबवाल्यांनी टीआरपी आणि/किंवा क्लिक्स आणि त्यातून मिळणारे पैसे यासाठी असल्या बातम्या प्रसारीत केल्या आहेत असे दिसते. जोपर्यंत आपल्या सरकार आणि सैन्याकडून अधिकृत काही येत नाही तोपर्यंत असल्या कोणत्याही बातमीवर विश्वास ठेऊ नये. काल काय काय दाखवत होते- कराची बंदर उध्वस्त, लाहोर, इस्लामाबाद, मुलतान, सरगोधा आणि कुठे कुठे हल्ले वगैरे वगैरे. काल रात्री १ च्या सुमारास असे वाटत होते की आज सकाळी उठल्यावर पाकिस्तान असेल की नाही. तसे काही झालेले वाटत नाही. एकूणच आपल्या माध्यमांची विश्वासार्हता पूर्ण लयाला गेली आहे.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 05/09/2025 - 14:35 नवीन
हो, ही खोटी बातमी होती हे आज सकाळी समजले. काल रात्री इतक्या विविध आश्चर्यकारक बातम्या येत होत्या. कराची बंदर उडवले, शहाबाझ शरीफच्या घराजवळ स्फोट आणि तो बंकरमधे लपलाय, मुनीरला अटक केली आहे. २ जेएफ १७ आणि १ एफ १६ विमान पाडले, जैसलमेरमधे एक पायलट जिवंत पकडला आहे.
एकूणच आपल्या माध्यमांची विश्वासार्हता पूर्ण लयाला गेली आहे.
अतीतीव्र सहमत त्यातल्या त्यात खर्‍या बातम्या कोठे मिळतील? न्युज चॅनल, एक्स हँडल, ब्लोग काही पण चालेल.
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 05/09/2025 - 05:48 नवीन
श्रीगुरुजी या आय डी वर जर कारवाई झाली असेल तर ते चुकीचे आहे असे माझे मत आहे. आता कारवाई झाली की ते स्वतः हून लिहायचे थांबले हे मला अजून स्पष्टपणे कळलेले नाही. पण मी गेले काही दिवसापासून सक्रीय आहे त्यात तरी मला श्रीगुरुजी यांच्या प्रतिसादात कुठेही पातळी सोडून काही लिहिलेले आढळून आले नाही. आणि त्यांच्या लेखनात जितका आक्षेपार्ह विधानाचा भाग असेल तर त्याहून जास्त आक्षेपार्ह विधान असलेले आय डी अजून सक्रीय आहेत. शेवटी संपादक मंडळाचा कारवाई करण्याचा अधिकार मान्य आहेच मात्र नेमक्या कुठल्या विधानावर कारवाई झाली हे कळले तर इतराना एक आपली वर्तणूक कशी असावी,कशी विधाने वापरू नयेत, कुठल्या गोष्टी संपादकांना मान्य नाहीत हेबुदहरणासहित कळते. हे चूक दाखवून देणे उदाहरणासहीत आवश्यक आहे कोणत्या कारणास्तव नेमकी कारवाई झाली हे कळायला हवे. बाकी असो
  • Log in or register to post comments
म
महिरावण Fri, 05/09/2025 - 07:32 नवीन
असं काही होणार असं आम्हाला वाटलंच होतं म्हणून आम्ही आधीच दूरदर्शीपणाने त्यांचे प्रतिसाद नोंदवून करून ठेवले होते. बाहुबलीचे प्रतिसाद कितीही मूर्खपणाचे, बालिशपणाचे, अक्कलशून्य, तद्दन फालतू, उचकवणारे, उगाच विरोधाला विरोध करून टीका करणारे, प्रत्येक प्रतिसादावर पचकणारे जरी असले तरी ते कधीही वैयक्तिक नव्हते. श्रीगुरुजींनी मात्र तीव्र वैयक्तिक पातळीवरचे प्रतिसाद देऊनही बाहुबली वैयक्तिक प्रत्युत्तर न देता त्यांचा मोदीविरोधी अजेंडा फक्त राबवत राहिले. दुसऱ्याला मनुवादी म्हणून हिणवत राहिले, त्यामुळे दोघांच्याही समिधा यज्ञकुंडात पडलेल्या दिसत आहेत. नमुन्यादाखल आम्ही नोंदवून ठेवलेले श्रीगुरुजींचे काही वैयक्तिक प्रतिसाद बघा. 7 May 2025 | श्रीगुरुजी या गाढवाच्या मूर्खपणाची किळस येत आहे. प्रतिसाद द्या अमरेंद्र बाहुबली's picture खरं बोलणाऱ्याची किळस येणारच! 7 May 2025 - 9:25 am | अमरेंद्र बाहुबली खरं बोलणाऱ्याची किळस येणारच! आम्हाला गाढव म्हणा, मूर्ख म्हणा, आमची किळस येऊद्या! एक देशभक्त ह्या नात्याने मी सरकारला जाब विचारणारच, मी देशभक्त आहे अंधभक्त नाही! काही दुर्गंधीयुक्त किळसवाणी 7 May 2025 - 9:41 am | श्रीगुरुजी काही दुर्गंधीयुक्त किळसवाणी गाढवे हल्ला झालाच नाही असे बरळताहेत. विषय कोणताही असो, ही गाढवे तेथे जाऊन पो टाकून त्यात थयाथया नाचतातच. श्रीगुरुजी — 7 May 2025 - 07:37 उर्वरीत गाढवे कोठे आहेत? छे, मिपावरील हिरवे पाकिस्तानी 7 May 2025 - 11:50 am | श्रीगुरुजी छे, मिपावरील हिरवे पाकिस्तानी उंदीर वेगाने बिळातून बाहेर आलेत आणि भारताला शिव्या घालताहेत. श्रीगुरुजी — 7 May 2025 - 07:09 मिपावरील महामुर्खांना पुन्हा एकदा सणसणीत थोबाडीत बसली. कोणतीही अक्कल नाही, शून्य माहिती . . . परंतु गाढवासारखे रेकणे सुरू होते. आता शेपटीला लवंगीचा सर बांधून पेटवलाय
  • Log in or register to post comments
म
मारवा Fri, 05/09/2025 - 10:13 नवीन
तुमचे म्हणणे बरोबर आहे मान्य आहे. श्रीगुरुजी यांच्या वरील प्रतिसादातील भाषा निश्चितच मर्यादेबाहेर गेलेली आहे. त्याच बरोबर त्यांना तसे नेमके दाखवून देऊन warning सारखे केले असते.तर बरे आले असते. त्यांना सुधारणा करता आली असती तसेच अमरेंद्र बाहुबली यांना देखील warning दिली असती तर त्यांना देखील सुधारणा करता आली असती आता हे सर्व अगोदरच वरील दोघं बाबत करून झालेलं आहे का याची मला माहिती नाही. कारण दीर्घ कालावधीनंतर मी मिपावर सक्रीय झालो असल्याने अर्ध्या सिनेमात येऊन बसलेल्या सारखा मी तितका अपडेटेड नाहीय. आणि मी जिथे थांबलो होतो तेव्हा इतकी विद्वेषजन्य परिस्थिती नवती.एकदम सत्ययुग होते आणि सात्विकांची भरती होती असेही नाही. पण आजच्या एवढी कठीण परीस्थिती नक्कीच नवती. मी स्वतः मध्ये सुद्धा बदल अनुभवत आहे बाकी एकूण असो.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/09/2025 - 06:32 नवीन
काल सायंकाळी सुरू झालेल भारताच्या पाकिस्तानवरील प्रतिहल्ल्याने भानावर नसलेल्या मीडियाने तर युद्ध जिंकले. सायरन ते आवाज, ती आरडा-ओरड....भारतापेक्षा भारतीय मिडियाने केलेले हल्ले वार्तांकन भयंकर होते. माध्यमाद्वारे, पाकिस्तानला गर्भगळीत करायचं असेल आणि तसा तो होत असेल तर चांगलं आहे, पण मीडियाने तर हे युद्ध सकाळी सकाळी जिंकू असे चित्र उभे केले. वास्तवात ड्रोन हल्ले, मिसाईल मारा यामुळे पाकिस्तानचं अधिकाधिक नुकसान करणे, त्याची खोड जिरवणे हाच हेतू भारतीय सैन्याचा दिसतो आहे आणि भारतीय सैन्याने तिन्ही दलाच्या एकत्रीत हल्ल्याने तो दबदबा निर्माण केला आहे. एक जागतिक संदेश भारतीय सैन्याने दिला आहे, देत आहे असे दिसते. आजच्या काळात कोणत्याही देशातील एकमेकांचे युद्ध असं एका दिवसात एका रात्रीत संपत नसतं. युद्धात कमी अधिक प्रत्येकाचे नुकसान होत असते, अपरिमित हानी होत असते. पाकिस्तानची तशी आर्थिक आणि इतरही हानी करायची आहे, खोड मोडायची आहे, युद्धामुळे जरब निर्माण होते. भारत सरंक्षण आणि संरक्षण क्षेत्रातील सर्व तंत्रात अग्रेसर आणि तेही जगाच्या पुढे आहे, हेही दाखवून द्यायचं आहे. भारतीय सैन्याचा आणि भारतीय असल्याचा अभिमान आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    17 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    17 hours ago
  • सुंदर !!
    17 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    17 hours 13 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा