Schindler List शिंडलर लिस्ट

दूरस्था: पर्वता: रम्या:,वेश्याः च मुखमण्डने ।
युद्धस्य तु कथा रम्या,त्रीणि रम्याणि दूरतः ॥
अर्थ :- पर्वत,गणिकेचे मुख शृंगार और युद्धाच्या कथा रम्य असतात पण हे सर्व दूर असताना.
खरोखरच या श्लोकाचे तंतोतंत उपययोजना 'शिंडलर लिस्ट' सिनेमा पाहताना समजली.
दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या क्रौर्याने परीसीमा गाठली होती.त्याने चालवलेले ज्यू लोकांचे शिरकाण माणुसकीला काळिमा फासणारे,थरकाप उडवणारे होते.सर्वत्र पसरलेल्या या अंध:कारात शिंडलर इवलासा किरण होता.ज्याच्यामुळे आज हजारो ज्यू वंश या भू तलावर जन्म शकले.शिंडलर हा जर्मन उद्योजक होता.पण त्याचं ह्रदयात माणुसकी होती.ज्यू लोकांना पकडून त्यातले म्हातारे, कामासाठी अयोग्य लोकांना निर्दयपणे मारले जात.तेव्हा शिंडलर हेही लोक कसे कामाचे हे पटवून देत त्यांचा जीव वाचत.
फांदीवर विसावलेल्या पक्ष्यांना जसे शिकारी टिपतो अगदी तसेच कामातून जरा क्षणभर विसावलेल्या ज्यू कामगारांना क्रूर जर्मन सैनिक अधिकारी दुरूनच गोळी मारत टिपत.निरोगी ज्यू बाजूला करताना सर्व स्त्री व पुरुषांना निर्वस्त्र करत मेंढरांसारख्या गर्दीतून वरवर न्याहाळत दोन तीन सेकंदात तो डॉक्टर निरोगी वा रोगी गटात टाकत.पण रोगी गटाला ना ना प्रकारचे त्रास देऊन मारले जात.
असाच एक मोठा गट मेंढरांसारखा एका आगगाडीच्या तीन चार डब्यात कोंबला होता,उन्हाची लाही लाही त्यात गर्दीचा कोंडमारा ज्यूंचा आक्रोश सुरू होता.जर्मन अधिकारी हसत होते .शिंडलर आगुंतकपणे तिथे येतो.तो म्हणतो" यांच्यावर पाण्याचा जोरदार फवारा करायला पाहिजे".अधिकाऱ्यांना शिंडलर टॉर्चरचा प्रकार सुचवत आहे असे वाटते ,ते होकार देतात.शिंडलर पाण्याचा फवारा रेल्वे डब्यात मरतो.अंगाची लाही लाही झालेले ते जीव पाणी अंगावर ,घशात गेल्याने जरा सुखावतात.इतकच नाही तर पाईप अपुरा पडला म्हणून तो घरून अजून मोठा पाईप आणायला लावतो.हे शिंडलर भूयदयेने करतोय हे एका अधिकाऱ्याने ओळखले.जिथे ज्यू स्त्रियांना शिव्यांची लाखोटी वाहिली जाई तिथे शिंडलरने एका ज्यू स्त्रीचे सर्वांसमोर चुंबन घेतले,हेच कारण देत त्याला जेलमध्ये त्या अधिकाऱ्याने टाकले.पण शिंडलरने आपल्या गोड गोड जाळ्यात अनेक मोठे आसामी बांधले असल्याने तो सुटतोच.
पुढे शिंडलर एक मोठे पाऊल उचलतो.तो युद्ध सामुग्री तयार करण्याच्या नवीन कंपनीत कामगार पाहिजे या कारणास्तव त्याच्या विश्वासू अकाऊंटंच्या मदतीने ११०० ज्यूंची यादी तयार करतो.आणि एका भ्रष्ट अधिकाऱ्याकडून यांना भरपूर पैसे देत विकत घेतो.कंपनी काही काळात घाट्यात येते पण तरीही सहा महिने तो या साऱ्या कामगारांना तोट्यातही माणूस या नात्याने सांभाळतो.त्याचा विश्वास असतो ,कधीतरी हे थांबेल आपणच यांना सांभाळून वाचवले पाहिजे.तो दिवस अखेर येतो.
युद्ध समाप्ती होते.हे सर्व ज्यू स्वतंत्र होतात.तेव्हा शिंडलर जे बोलतो ते खरंच माणसाच्या जीवनावर विश्वास असायला हवे हे दाखवते.तो म्हणतो "मी अजून लोकांना वाचवायला पाहिजे होतं,ही कार ही हातातली अंगठी मी का नाही विकली? अजून २-४-१० लोक या बदल्यात वाचवता आले असते."
डोळ्यांतले पाण्याचं खळ संपूर्ण सिनेमा भर आटत नाही,डोळे वाहत राहतात.
शिंडलर लिस्ट(१९९३) सिनेमाचे दिग्दर्शन स्पीलबर्ग यांनी केले.तरयात शिंडलरची भूमिका लियाम नीसन , एसएस अधिकारी अमोन गॉथची भूमिका राल्फ फिएनेस आणिशिंडलरचा ज्यू अकाउंटंट इत्झाक स्टर्नची भूमिका बेन किंग्सली यांनी केली आहे .
या नामवलीतच कलाकृतीच्या महानतेबाबत सारे काही येत आहे.मग ऑस्कर कसे दूर राहू शकेल.
-भक्ती
OTT-Prime
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments