अभिनंदन !!
मिपाकर अतृप्त आत्मा यांचे अभिनंदन !
तिसरा अक्षय्य हिंदू पुरस्कार

गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी विचारांच्या व्यक्तींनी एकत्र येऊन #अक्षय्यहिंदूपुरस्कार सुरू केला. कारण सोशल मीडियावर आपण सगळे देव देश धर्म ह्या विषयावर नित्य बोलतोच, पण प्रत्यक्षातही काहीतरी भरीव केलं पाहिजे. समर्थांच्या शब्दात सांगायचे तर क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे. त्यातूनच मग कल्पना सुचली की हिंदूंनी हिंदू समाजाच्या हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार देऊयात, मग तो परधर्मीय असला तरी.
ह्या विषयावर आपसात विचारमंथन करून, काही गोष्टी एकमताने ठरवल्या त्या म्हणजे १) पुरस्कार केवळ लोकसहभागातून जमा होणाऱ्या निधीतून दयायचे कारण हिंदुत्वाचं काम हे सर्व समाजाचं आहे २) पुरस्कार जमिनीवर कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच द्यायचे आणि तेही तसेच कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांच्याच हस्ते. ३) पुरस्कार देताना १) जनजाती कल्याण २) साहित्य-मीडिया ३) गोसंवर्धन,पालन ४) सामाजिक समरसता ५) धर्म जागरण अशा पाच विभागात द्यायचे. जेणेकरून या विविध क्षेत्रात हिंदू हितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची ओळख समाजाला होईल.५) पुरस्कार देताना शक्यतो पुणे, मुंबई व तत्सम मोठी शहरे टाळून महाराष्ट्र व देशाच्या विविध भागातून व्यक्ती निवडायच्या, निवडलेली व्यक्ती शक्यतो तरुण पहायची जेणेकरून समाजाकडून मिळालेल्या कौतुकामुळे पुढील आयुष्यात अधिक काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.
यावर्षीच्या म्हणजे २०२५ सालच्या तिसऱ्या #अक्षय्यहिंदूपुरस्काराचे स्वरूप अन्यायाविरुद्ध आक्रमण करण्यासाठी सज्ज असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, अकरा हजार रुपये रोख आणि विविध राष्ट्रवादी विचारांच्या लेखकांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संच असे आहे.
यावर्षीच्या विजेत्यांना पुरस्कार देण्यासाठी लाभलेले उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे पद्मश्री पुरस्कार विजेते कार्यकर्ते श्री चैत्राम पवार.
यावर्षीच्या (२०२५ )पुरस्काराचे मानकरी आहेत.
१) जनजाती कल्याण - वर्षाताई परचुरे (मोखाडा)
२) मीडिया-अर्चनाजी तिवारी (उत्तर प्रदेश, दिल्ली)
३) गोसंवर्धन,पालन - अश्विन संपतकुमारन (कर्नाटक)
४) सामाजिक समरसता - पराग दिवेकर गुरुजी (पुणे)
५) धर्म जागरण - अविनाश तायडे (बुलढाणा)
शिरीष महाराज मोरे - मरणोत्तर
यावर्षीचा अक्षय्य हिंदू पुरस्कार सोहळा तारीख ३ मे, शनिवारी सायंकाळी ६ वाजता एस.पी. कॉलेज पुणे येथील लेडी रमाबाई हॉलमध्ये संपन्न होत आहे. आपण या सोहळ्यास जरूर या.
-- अभिराम दिक्षित यांच्या फेसबुक वॉलवरून साभार.
गुरूजी, तुमचे
मनापासून अभिनंदन !