Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जनातलं, मनातलं

हिंदी सक्ती - मुख्यमत्र्यांना खुले पत्र

य
युयुत्सु
Sun, 04/20/2025 - 05:44
💬 6 प्रतिसाद

श्री० देवेन्द्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
महाराष्ट्र

स० न० वि० वि०

सध्या हिंदी १ली पासून शिकवली या मुद्द्यावरून बरेच चर्वितचर्वण चालू आहे. यात होणारा विरोध हा भावनिक आणि राजकीय अंगाने होत आहे असे वाटते. याशिवाय आणखी एका अंगाचा विचार व्हायला हवा, तो म्ह० चेताविज्ञान म्ह० न्युरोसायन्स.

मी चेताविज्ञानातील प्रशिक्षित तज्ज्ञ नसलो तरी याविषयातील ताजे संशोधन भरपूर वाचत असल्याने काही मुद्दे पुढे ठेवावेसे वाटतात. या मुद्द्यांचा प्रशिक्षित तज्ज्ञ साक्षेपाने विचार करतील याची खात्री आहे -

० शालेय विद्यार्थ्यांवरील ताण आता पराकोटीला पोचला आहे. त्यात कुपोषण आणि प्रदुषण भर घालून गंभीर समस्या निर्माण करत आहेत. याचा परिणाम म्ह० शालेय विद्यार्थ्यांमध्ये दिसणारे मधुमेह, हृदयरोगासारखे आजार. मेंदूच्या क्षमतेवर होणार्‍या परिणामावर मी नोव्हे० २४ मध्ये म०टा०मध्ये लेख लिहीला होता.

० निसर्ग सर्वाना समान ग्रहणक्षमता देत नाही. त्यात वर उल्लेख केलेले घटक अधिक भर टाकतात आणि समस्या अधिक वाढतात.

० हिंदीचे मराठीवर आक्रमण झाल्याने मराठी समृद्ध किती झाली याचा वस्तूनिष्ठ विचार/मूल्यमापन होणे आवश्यक आहे.

० पुरेशी ग्रहण क्षमता नसलेले मानवी मेंदू ’लर्निंग कॊन्फ्लिक्ट’च्या ताणामुळे मराठीभाषेच्या वाढीला पूरक ठरतील की मारक याचे उत्तर फारसे उत्साहवर्धक नसेल असे मराठीची सद्यस्थिती बघून वाटते.

राजकीय हेतूने प्रेरित धोरणे वैज्ञानिक सत्याचा आदर करतील असे वाटत नाही.

-राजीव उपाध्ये


  • Log in or register to post comments
  • 1533 views


वाचनखूण लावा
| 1533 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद (6)
म
माईसाहेब कुरसूंदीकर Sun, 04/20/2025 - 19:49 नवीन
योग्य मुद्दा आहे. पहिलीपासुन तीन भाषा शिकवणे मूर्खपणा आहे.मुंबई-पुण्यातील तुमच्या ते सी बी एस ई/आय सी ए सीमधील मुले शिकतील पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे काय? दोन-तीन् वेळा खासदार झालेले एक मराठी पुढारी संसदेत "अभी पांडेजी ने जो मुद्दे मांडे है" किंवा हे भयानक विनोदी हिंदी- "शनी के चौथरे वरती जो महिला चढणे चाहती है,वो हमके...." https://www.youtube.com/watch?v=l9Z7M-PWGMI कशासाठी हा अट्टाहास करत आहे सरकार ?
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 04/21/2025 - 02:55 नवीन
सहमतीदर्शक प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
  • Log in or register to post comments
य
युयुत्सु Mon, 04/21/2025 - 08:00 नवीन
फडणविसांनी लोकांना हिंदीचे प्रेम वाटत नाही याबद्दल खेद व्यक्त केला आहे. ज्या कौशल्यानी टिकून राहण्याच्या (सर्व्हायवल) संधी वाढतात, ती शिकण्याकडे लोकांचा कल असणार. हा कॉमनसेन्स फडणवीस हे आडनाव मिरवणार्‍या व्यक्तीकडून अपेक्षित होता. पण यांची विज्ञान संबंधी विधाने (सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे! इ० इ० ) वाचून मी नि:शब्द झालो.
  • Log in or register to post comments
म
मूकवाचक Mon, 04/21/2025 - 11:14 नवीन
उदा: अवास्तव खर्च करणे आणि बडेजाव मिरवणे माझ्या डीएनए मधेच नाही, उत्तम गुणवत्ता राखणे आमच्या कंपनीच्या डीएनए मधेच आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 04/21/2025 - 14:41 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
अ
अथांग आकाश Mon, 04/21/2025 - 14:53 नवीन
तुमच्यापेक्षा संक्षी परवडले! Image removed.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 22 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 34 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 36 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 38 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 42 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा