कृष्णाच्या गोष्टी-८
*धर्मराज्य स्थापना
देशात धर्मसाम्राज्य निर्माण व्हावे सांस्कृतिक जीवन मूल्यांची प्रतिस्थापना व्हावी. राजमंडळाने लोककरंजनात् राजा ही त्याग पूर्ण निस्वार्थ भूमिका मान्य करून राज्य करावे ,हे कृष्ण जीवनाचे ध्येय होते. ते साध्य करण्यासाठी देशातील राज्यसंस्थांचे शुद्धीकरण हाच उपाय आहे हे कृष्ण जाणत होता. हे शुद्धीकरण दोन प्रकारांनी होण्यासारखे होते.
एकतर भ्रष्ट राज्यसंस्थेत शिरून आपल्या आदर्श वागणुकीने तिला पुन्हा नियंत्रित व धर्मन्मुख करणे किंवा संपूर्ण तयारी शुद्ध तत्वावर आधारलेली धर्माधिष्ठित नवी राज्यसंस्था निर्माण करणे. कृष्णाच्या वेळी अनियंत्रित भ्रष्ट अधिकार व सुखभोग यांच्या अधीन झालेल्या राजसंस्थेला पुन्हा नियंत्रित आणि धर्मन्मुख करणे. हे केवळ अशक्यप्राय होते अशा स्थितीत विशुद्ध तत्वावर विश्वास असणारी नवीन राज्यसंस्था निर्माण करणे हा एकच मार्ग शिल्लक होता. कोणाला हाताशी धरून आपल्या अभिप्रेत असलेली विशुद्ध राज्य संस्थान निर्माण करता येईल याचा विचार करीत असता कृष्णाचे पांडवांकडे लक्ष गेले. त्यांच्यावर अन्याय होत होता. तरीही धर्माधिष्ठित मार्ग सोडायला हे संघटित नेतृत्व तयार नव्हते. त्यांच्याजवळ सामर्थ्य होते. अत्यंत कष्ट करण्याची तयारी होती. अपार सत्यनिष्ठा होती व धर्माचे नियंत्रण मानण्याची स्वाभाविक प्रवृत्ती होती. राज्यावरील स्वतःचे न्याय हक्कांपासून वंचित केले जात असल्यास यांच्या नेतृत्वाला सिंहासनस्थ करणे हा एकच धर्म संस्थापनेचा उपाय आहे हे कृष्णाने ओळखले आणि आपल्या कार्याचे साधन म्हणून पांडवांचा उपयोग करून घेण्याचे ठरवले.
*द्रौपदी स्वयंवर

पांडव आणि आपली आत्या कोणती लाक्षागृहाच्या दाहातून खरोखरच जळून मेली असतील असे कृष्णाला वाटत नव्हते त्यांनी गुप्तपणे पांडवांचा शोध चालविला होता.आपल्या हेरांकडून कृष्णाला पांडव कुंतीसह लाक्षागृहातून निसटून गेल्याची वार्ता समजली होती. पांडव असतील तेथून स्वयंवरासाठी कांपिल्य नगरीत उपस्थित होतील याची अटकळ त्याला होती. म्हणूनच बरोबरच्या सर्व यादवांना द्वारका सोडण्यापूर्वी कृष्णाने आपण या स्वरांवरात फक्त प्रेक्षक म्हणून जात आहोत 'पण' जिंकून द्रौपदी मिळवण्यासाठी जात नाही हे स्पष्ट केले. भारत वर्षातील जवळजवळ सर्व राज्यांनी द्रौपदी स्वयंवर स्थळी गर्दी केली होती. छताशी फिरणाऱ्या लाकडी माशाचा पाच बाणात डोळा फोडण्याची अट द्रौपदीला जिंकण्यासाठी ठेवली होती. शिशुपाल, जरासंध, दुर्योधन, कर्ण सगळ्यांचे प्रयत्न विफल झाले. यादवांपैकी कोणी उठणारच नव्हते.
कृष्णाने ब्राह्मण वेशातील पांडवांना चटकन ओळखले त्यात अलौकिक दैवी वगैरे असा काही भाग नव्हता. सर्वसाधारण माणसापेक्षा कृष्णाची बुद्धी दृष्टी कितीतरी तीक्ष्ण होती ,आधुनिक भाषेत त्याचा 'बुद्ध्यांक' कितीतरी जास्त होता. जमलेले ख्यातमान धनुर्धर राजे 'पण' जिंकण्यात हतप्रभ ठरल्यानंतर ब्राह्मण वृंदातून एक तरुण उभा राहिला आणि त्याने युवराज दुष्टदुम्नजवळ मत्स्य यंत्र भेदण्याची अनुज्ञा घेतली. त्यांना असे उद्गार काढले की "ती परीक्षा कौशल्याची होती. त्यामुळे 'पण' जिंकण्याचा प्रयत्न कोणी केला अगदी ब्राह्मण काय वैश्य काय शूद्रानेही केला आणि पण जिंकला तरी आपली बहीण त्याला माला घालेल हे आव्हान विलक्षण होते.
तिथे ठेवलेल्या धनुष्याला सहज त्याने प्रत्यांच्या जोडली आणि मन एकाग्र करून पहिल्याच बाणाने त्यांने भेद घेतला. उपस्थित सभाजनांना याचा आनंद वाटण्याऐवजी त्यांना त्यांचा अपमान वाटला. राजमंडळाने रागाने द्रुपद आणि दृष्टधुम्न यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण पांचाल आणि त्यांच्या बाजूने उभे राहिलेले राजे तो ब्राह्मण कुमार यांनी आपल्या सामर्थ्याने त्या सर्वांचा पराभव केला.या उभ्या राहिलेल्या लढाईत त्या तरुण ब्राह्मण कुमाराच्या बाजूने आणखी चौघे ब्राह्मण कुमार उभे ठाकलेले पाहून रामकृष्णांची ती पांडव असल्याबद्दलची खात्रीच पटली.
कृष्ण पांडव राहत असलेल्या त्यांच्या मागेमागे जात घरात शिरून युधिष्ठिराला वंदन केले. आणि मी कृष्ण आहे असे सांगून तिथे जवळच बसलेल्या आत्याला कुंतीलाही वंदन केले. तुम्ही सारे लाक्षागृहातून वाचलात हीच सौभाग्याची गोष्ट आहे .पांचाली मुळे पांचाल आता तुमच्या पाठीशी उभे राहतीलच. पण बलाढ्य धनसंपन्न यादवीही तुमचे पाठीराखे आहेत हे सांगायला मी येथे आलो आहे. तुम्ही येथे भेटाल याची मला अटकळ होती. द्रौपदीचे पाची पांडवांशी लग्न लावून द्यायला त्याने द्रपदालाही राजी केले. यादव बल पांडवां मागे उभे राहिले तरीही विपत्तीच्या काळात नवे राज्य उभा राहण्यासाठी सर्वात अधिक धनाची आवश्यकता लागेल हे ओळखून आहेराच्या रूपाने कृष्णाने अमाप धनसंपत्ती पांडवांना दिली.पांचालाचा आणि यादवांच्या या जोरदार पाठिंबामुळे दुर्बल आणि अगदी निर्धन झालेले पांडव सबल झाले.
ही बातमी हस्तिनापुरात पोहोचतात दुर्योधनाच्या विरोधालाही न जुमानता कुरुवृद्ध पितामह भीष्म आणि महामंत्री विदूर यांच्या सल्ल्याने राजा धृतराष्ट्राने महामंत्री विदुराला कांपिल्य नगरीला पाठवून पांडवाना त्यांच्या करवी हस्तिनापूरी बोलवून घेतले. कांपिल्य नगरी द्रौपदी स्वयंवराला पांचालावर हल्ला करण्यात दुर्योधन कौरवांचा पुढाकार होता तरी ही गोष्टी ध्यानी घेऊन पांडवांच्या रक्षणार्थ कृष्ण त्यांच्याबरोबर स्वतः हस्तिनापुरी गेला. खांडवप्रस्थचे राज्य आपण युवराज युधिष्ठिरला बहाल करीत असल्याचे धृतराष्ट्रने घोषित केले.
यावर कृष्ण हसला त्याने युद्धिष्ठिराला राजाचे हे राज्य मान्य करण्याचे सूचना दिली. खांडवप्रस्थ पूर्वीच्या काळी कुरुंची राजधानी होती . वर्षानुवर्षे शेती ओसाड पडली होती ,सारा प्रदेश घनदाट जंगलाने व्यापलेला होता. तरी हे ओसाड गाव राज्य युधिष्ठिराला घ्यायला कृष्णाने अनुभूती दिली. कारण अविकसित प्रदेशाचा योजनाबद्ध रीतीने विकास करता येतो. "तुझ्या चुलत्याने उदार मनाने दिलेल्या या तुझ्या अर्ध्या राज्याकडे पहा. अंधराजाने हा अन्याय करावा आणि भीष्मा सारख्या कुरुवृद्धाने त्याला संमती द्यावी?. केले त्याची फळे ते भोगतीलच म्हणा !पण निराश व्हायचे कारण नाही या भकास भागाचा विकास करून त्या अंध राजाला आपण वेगळाच धडा शिकवू."
विश्वकर्माला मग द्वारका उभारणार्या स्थापत्यशास्त्रज्ञाला त्वरित निमंत्रण दिले गेले. खांडवप्रस्थाची ओसाड राजधानी नव्या योजनेप्रमाणे पुन्हा उभारण्याचे काम झपाट्याने सुरू झाले. राजधानी उभारण्याच्या कामावर स्वतः कृष्णाची देखील देखरेख होती. काही दिवसातच त्या वैराण ओसाड भूमीवर उभारलेल्या नव्याने राजधानीतील उंच उंच इमारतींनी आकाश रेषा भेदून टाकल्या. कृष्णाने त्या सुंदर राजधानीचे नाव बदलून इंद्रप्रस्थ असे ठेवले. दीर्घ कालावधीत पांडवांशी त्याचे खूपच सख्य निर्माण झाले आणि विशेषतः अर्जुन त्याचा जिवाभावाचा सखा झाला. कृष्णाच्या रूपात पांचालीला एक निर्मळ प्रेमळ भाऊ मिळाला. रक्ताच्या नात्यापेक्षाही नातेपुढे अधिक सुदृढ झाली.

*सुभद्रा हरण

-राजा रविवर्मा यांचे अर्जुन आणि सुभद्रा यांचे एक चित्र
इंद्रप्रस्थ राहणाऱ्या पांडवांनी आपल्या सामायिक पत्नीशी वर्तनाचे नियम ठरवले होते.एकदा अर्जुनाने चोरांनी पळवलेल्या ब्राह्मणांच्या गाईंचे रक्षण करण्याच्या घाईत युधिष्ठिर आणि द्रौपदी यांच्या एकांताचा भंग केला. ठरल्याप्रमाणे अर्जुनाने तीर्थयात्रेला जायचे ठरवले. युधिष्ठिर नको नको म्हणत असतानाही त्याने आपला निर्णय बदलला नाही. या काळात आपल्या भारतभराच्या भ्रमणामध्ये त्यांनी नागकन्या उलुपी त्यानंतर चित्रांगदा यांच्याशी विवाह केला. परतीच्या प्रवासात द्वारके जवळच्या प्रभासपट्टण तिर्थावर तो आला. तिथे त्याला विशेषत्वाने सुभेद्रेची आठवण झाली. सुभद्राच्या सौंदर्याबद्दल द्रोणाचार्यांकडे धनुर्विद्या शिकत असता भेटलेल्या गद नामक सुभद्रा आणि कृष्णाच्या धाकट्या भावाकडून त्यांनी खूप ऐकले होते. अर्जुन वेष बदलून प्रभास तिर्थावर प्रवेशकर्ता झाला. तरी त्याच्या आगमनाची बित्तम बातमी कृष्णाला त्याच्या हिराकडून कळली कृष्णाच्या सांगण्यावरून अर्जून रैवतक पर्वतावर जाऊन राहिला. तिथे त्याने तपाचे सोंग मांडले. एक दिवस सुभद्राही दर्शनासाठी आली आणि अर्जुनाच्या डोळ्याचे पारणे फिटले. रामाने हा कोण विचारणा करता?हा यती चातुर्मासाचे चार महिने रैवतक पर्वतावर काढणार असल्याचे त्याला समजले. यतीच्या व्यक्तिमत्त्वाचा बलरामाच्या मनावर विलक्षण परिणाम झाला. पावसाळ्याचे चार महिने डोंगरावर काढण्याऐवजी यतीने ते द्वारकेत व्यतीत करावे अशी विनंती त्यांनी याला केली. यतीने आढेवेढे घेत का होईना ती मान्य केली. बलरामाने लगेच कृष्णाला यतीची सोय द्वारकेत सुभद्रेच्या महाला शेजारी बागेत करण्याचे आज्ञा केली. चातुर्मासात सुभद्रेने अशा तपस्वीची सेवा केल्यास तिला पुण्य लाभेल व तिचे पुढचे आयुष्य सुखाचे जाईल अशी बलरामाची धारणा होती. कृष्णाने मात्र या कल्पनेला कडाडून विरोध केला होता पण किंबहुना त्यामुळे संतापलेल्या बलराम याने आपला हट्ट पुरा केला आणि पुढील चार महिने येतील द्वारकेत सुभद्रा महाला शेजारच्या बागेत प्रस्थापित केले.
स्त्रियांना आपला भाऊ मुलगा किंवा पती अर्जुनासारखा असावा असे वाटत होते सुभद्राही त्याला अपवाद नव्हती. अर्जुनाला न पाहताही ती त्याच्यावर प्रेम करत होती. एक दिवस त्याने आपणच पार्थ असल्याचे सांगून आपलेही तिच्यावर प्रेम आहे असे सांगितले. संधी मिळता सुभद्रेला घेऊन इंद्रप्रस्थि प्रयाण करण्याचे अर्जुनाने निश्चित केले. आणि राजकन्येलाही ते सांगितले. कृष्णाने पुरवलेल्या रथात सुभद्रेला घेऊन अर्जुनाने आपला रथ इंद्रप्रस्थाकडे दौडविला.यतीने सुभद्राचे हरण केले ही बातमी द्वारकेत पसरली. धोक्याची घंटा घणाघणा वाजू लागली. बलरामाला क्रोध अनावर झाला होता. त्याच्या मनात सुभद्रा आपला शिष्य दुर्योधन याला द्यायची होती. अर्जुनाने तिला पळवली यामागे कृष्णाचा हात असावा असा त्याचा संशय. पण कृष्णाने साफ कानावर हात ठेवले. सुभद्रा हरण इतकी नाजूक आणि हृदयस्पर्शी गोष्ट होती की या प्रश्नावरून यादव आणि पांडव यांचे कायमचे वैर उत्पन्न होण्याचा संभव होता. कृष्णाने रागवलेल्या बलराम दादाला आणि सभेतील यादवांना आपल्या नम्र आणि मृदुल वाणीने शांत केले.त्यांच्या पराक्रमाविषयी स्तुती केली आणि आपल्या मुद्देसूद युक्तीवादाने यादवांना पटवून दिले की "अर्जुनासारखं शूरवीर पती सुभद्रेला शोधूनही मिळाला नसता. क्षत्रियाला अनुरूप अशा पद्धतीने त्याने तिचे हरण केले आहे. यात यादवांचा अवमान नसून सन्मान आहे. तेव्हा अर्जुनाशी व पांडवांशी युद्ध करण्याची भाषा या दोघांनी न करता इंद्रप्रस्थी जाऊन सुभद्रेचे अर्जुनाशी यादवांना शोभेल असे थाटामाटात लग्न लावून द्यावे. भडकलेला संघर्षही शांत झाला यादवांनीही विवेक केला आणि सुभद्राचा अर्जुनाशी मोठ्या धुमधडाक्याने विवाह झाला.

*खांडव वनदाह

कृष्णा अर्जुनाने या अरण्यास सपत्नीक सहलीसाठी जाणे. तेथे अग्नी भेटणे, आपली भूक शमवण्यासाठी त्यांनी खांडववनाचा ग्रास मागणे. तो देण्याची कृष्णा अर्जुन यांनी तयारी दाखवणे या बदल्यात अग्नीने अर्जुनाला गांडीव धनुष्य ,दोन अक्षय भाते कपिल ध्वज असलेला रथ, गतीमध्ये वाऱ्याशी स्पर्धा करणारे चार पांढरे घोडे आणि कृष्णाला कौमोदकी गदा, सुदर्शन चक्र देणे. कृष्णा अर्जुन आणि पाऊस पडत असतानाही वन जाळून भस्म करणे. त्या तक्षकाचे सारे कूळ पूर्ण नष्ट होणे. मग शरण आल्यामुळे अर्जुन आणि त्याला जीवनदान देणे. मृत्युपकार म्हणून मया सारखा जळास्तूशिल्पज्ञाने कृष्णाच्या सूचनेवरून मयासारखे अलौकिक सभागृह पांडवांना बांधून देणे. सभागृहाच्या बांधणीत विविध रंगी खड्यांचा वापर करून अनेक प्रकारच्या दृष्टीभ्रम निर्माण करणे .पाणी वाटावे तेथे फरशी असणे फरशी वाटावे तेथे पाणी असणे. भिंत वाटावी तेथे दार असणे. दार वाटावे तेथे भिंत असणे.अशा गोष्टी घडल्या.
*राजसूय यज्ञ
महाभारतात युधिष्ठिराला देवर्षी नारदाने तू राजसूय यज्ञ कर असे सांगून. त्यांच्या मनात आपण सम्राट व्हावे ही इच्छा निर्माण केली असा उल्लेख आहे. सर्वदृष्ट राजसत्तांची जरासंधाच्या नेतृत्वाखाली झालेली कोंडी फोडून त्या सर्व राजसत्तांना एकाच धर्म नियंत्रित साम्राज्याखाली आणण्यासाठी ही संधी फार योग्य आहे असे मनाशी ठरवून कृष्णाने युधिष्ठिराची राजसूयाची कल्पना उचलून धरली. धर्म संस्थापनासाठी जरासंध वध जीवनाचे ध्येय मानणाऱ्या कृष्णाचा यामागे उद्देश थोडा स्वार्थी म्हटला म्हणता आला. तरी तो बराचसा पांडवांना हितकारी होता आणि त्याहून अधिक देशातील जरासंधाच्या अत्याचारामुळे पीडित अशा अखिल राजमंडळाच्या हिताचा तो प्रश्न होता. सर्वसाधारण जनतेच्या हिताचा असाही तो प्रश्न होता.
*जरासंध वध

ब्राह्मणांच्या वेशात कृष्ण भीमार्जुना सह गिरीनगरात दाखल झाला आणि मध्यरात्री जेव्हा यज्ञ शाळेत जरासंधाची भेट घेतली. तेव्हा कृष्णाने आपणा तिघांची ओळख करून देऊन. जरासंधाच्या दुकृत्यांचा पाढा वाचून त्याच्या जवळच बंदीत असलेल्या ८६ राजांच्या मुक्ततेची मागणी केली. यापेक्षा आमच्यापैकी कोणाही एकाला द्वैयुद्धासाठी असे आव्हान दे हे सांगितले .द्वंद्वासाठी भीमाला निवडण्याआधी जरासंधाने केलेली दर्पोक्ती यासंदर्भात खूप बोलकी आहे जरासंध म्हणाला "मी बंदी केलेल्या राजांपैकी प्रत्येकाला युद्धात जिंकले आहे. जेता या नात्याने मी जितांचा जीवनाचा धनी आहे. त्या पराजित जीवनाचे काय करायचं आहे ते मी माझे ठरवेल. त्यात कोणीही लुडबुड करण्याचे कारण नाही. मी तुमचे युद्धाचे आव्हान स्वीकारतो हवे तर आपण सैन्य लढू तुमची इच्छा असेल, जर तिघांची एकाच वेळी लढण्यास मी तयारी आहे किंवा एक एकट्याशी युद्ध करण्याला माझी ना नाही. जरासंध आणि भीमसेन या दोघांचे युद्ध मला युद्ध अहोरात्र असे १४ दिवस चालले चौदाव्या दिवशी रात्री जरासंध थकलेला दिसला असता. कृष्ण भीमाला म्हणाला, भीमा तू वायुपुत्र आहेस आपले संपूर्ण दैवी बल खर्चून जरासंध्याला मारण्याची हीच ती वेळ आहे.कृष्णाच्या उद्गगाराने भीमाचा उत्साहात वेगळाच झाला व त्याने जरासंध्यावर जोराचे आक्रमण केले. त्याला खाली पाडले. हाताचं बल देऊन शिवणीतून चिरून टाकले. त्याच्या शरीराची दोन शकले आखाड्यात टाकून दिली (जरासंध्याच्या जन्माच्या वेळी दोन शकले जन्मास आली आणि जरा नावाच्या राक्षसीने सांधल्यावर ती एकसंध होऊन तो जिवंत झाला होता ).त्यानंतर कृष्णाने जरासंधाच्या मुलाचा सहदेवाचा मगधाच्या सिंहासनावर राज्याभिषेक केला. आणखी एक नवा आदर्श निर्माण करून मग राजाला पांडवांची सत्ता मान्य करायला लावून कृष्णाने अशा प्रकारे अधार्मिक राजसत्तांचा संघ फोडून टाकला.जरासंध वधामुळे राजमंडलावर इतका विलक्षण दरारा निर्माण झाला होता की पांडव बंधूंच्या नुसत्या आगमनानेच बहुतेक ठिकाणी नव्या धर्म सत्तेला मांडलिकत्वाचे करभार मिळाले.
विष्णूचा अवतार असो वा नसो कृष्णाच्या चारित्राचे मर्म मनुष्यत्व असून देवत्व नाही. ही गोष्ट तशी स्वतःसिद्ध असूनही महाभारताच्या पुढील विस्तारात कृष्णाच्या विष्णू रूपाचा पुन्हा पुन्हा उल्लेख येतो? उदाहरणार्थ जरासंधाच्या वधानंतर जरासंधाच्या रथात बसून कृष्ण भीम अर्जुन इंद्रप्रस्थ जायला निघाले तेव्हा आवश्यकता नसतानाही कृष्णाने गरुडाचे स्मरण केले आणि गरुड त्याच्या रथाच्या ध्वजस्थानी येऊन बसला, असा उल्लेख आहे .त्यातच दुसऱ्या प्रसंगामध्ये आम्हा तिघांपैकी कोणाशी युद्ध ला तयार हो असे जरासंध त्यांना आव्हान दिले तेव्हाही कृष्णाला म्हणे जरासंध यादवाकडून अवध्य आहे हा ब्रह्मदेवाचा आदेश आठवला. तो जरासंधाच्या वधाला प्रवृत्त झाला नाही येथेही कृष्णाच्या दैवी करण्याचा प्रयत्न आहे. जरासंध्याच्या बंदीतून कृष्णाने मुक्त केलेल्या ८६ राजांनी कृष्णाला धन्यवाद देण्याकरता काही कारण नसताना त्याला 'हे विष्णो' असे म्हणत पुकारले.

-अत्यंत बारकाव्यासह चित्र रेखाटले आहे, कोणाकडे कोणते काम दिले आहे,या खालील वर्णनाशी पूर्ण मेळ बसत आहे
सूर्यवंशाच्या सर्व राजकुलांचा पाठिंबा मिळवून युधिष्ठिराला राजसूय यज्ञ करण्यासाठी तयार झाला. देश देशांतरीच्या राजांना निमंत्रण गेले ऋषिगण पाचारिले ,देशोदेशीचे विविध वर्गातील लोक राजसूय यज्ञ पाहण्यासाठी राजधानीत हजर झाले. यादव,पांचाल मित्र होते हस्तिनापुराचे धृतराष्ट्र दुर्योधनाधिक कौरव प्राप्त होते. या यज्ञ समारंभात निरनिराळ्या मंडळींकडे वेगवेगळी कामे वाटून दिली होती. भोजन व्यवस्था दु:शासनकडे होती, ब्राह्मणांचा सन्मान अश्वत्थामाकडे होता, येणाऱ्या राजांचे आदरितिथ्य संजयने करायचे होते. भीष्म , द्रोणाचार्य धर्मकृत्यावर देखरेख करायची होती, रत्न पारख दक्षिणा वाटप दान इत्यादीवर कृपाचार्य लक्ष ठेवणार होते, खर्चाचा हिशोब विदुराने ठेवायचा होता, तर येणारे नजराणे दुर्योधनाने स्वीकारायचे होते .पण यज्ञात कृष्णाने स्वतःकडे ब्राह्मणांचे पाय धुवायचे काम घेतले होते. असे म्हणतात कृष्ण आदर्श पुरुष होता म्हणून विनयाचा आदर्श प्रस्थापित करण्याकरता म्हणून त्याने हे दासाचे कार्य अंगीकारले?
वैदिक मंत्रांच्या गजरात युधिष्ठिर आणि द्रौपदी यांच्यावर सप्तसरिता व सप्तसिंधू यांच्या जलाने पांजजन्याद्वारे स्वतः कृष्णाने अभिषेक केला. भारत वर्षाचा सम्राट म्हणून युधिष्ठिराला घोषित केले.
*शिशुपाल वध

प्रथेप्रमाणे पाहुण्यांपैकी एकाची प्रमुख अतिथी म्हणून निवड करून पहिल्याने अर्घ्य देऊन त्यांची पूजा करण्याची पद्धत होती. अग्र पूजेचा मान कोणाला द्यावा म्हणून व पितामह भीष्मांना विचारले असता भीष्माने कृष्णाचे नाव सुचवले. युधिष्ठिरलाही आनंद झाला चेदिराज शिशुपालाला मात्र राज मंडळाचा हा अपमान सहन झाला नाही. त्यांनी छद्मीपणाने मोठ्याने हसून शांतेत विघ्न आणले. अग्र पूजेचा मान एका गवळ्याला देणाऱ्या युधिष्ठिराची आणि पितामह भीष्मांची त्याने टिंगल उडवली. नातेसंबंधातील वरिष्ठतेचा विचार करता तो मन द्रुपदला मिळाला हवा होता. विद्वत्ता निकष धरला असता द्रोणाचार्य कृपाचार्य गुरुपुत्र अश्वत्थामा यांचा अधिकार डावलता आला नसता. तप सामर्थ्याचा विचार केला तर म्हणावे प्रत्यक्ष कृष्णद्वैपायन व्यास सभेत हजर होते. उत्कृष्ट धनुर्धारी म्हणून कृष्णाची निवड झाली म्हणावी तर सभेत निशाद राज एकलव्य आणि अंगराज राधेय हजर होते. कुण्या राजाला हा बहुमान द्यायचा असतात अग्र पूजेसाठी भगदत्त कलिंग विराट शल्य शाल्व,कांबोज विंध अनुविंध यांची नावे सहज नाकारता कशी आली असती?पण भीष्मांनी युधिष्ठिराने निवड केली ती एका गवळ्याची? शिशुपाल्याच्या म्हणण्याप्रमाणे युधिष्ठराचा हा वेडेपणा होता आणि यज्ञाला जमलेल्या सर्व पाहुण्यांचा तो अपमान होता.
शिशुपालाने आता आपला मोर्चा कृष्णाकडे वळवला त्याच्या दृष्टीने कंसवध,जरासंधवध घडून आणण्यात कृष्णाचा जो पराक्रम दिसला तो फक्त कपटनीतीचा. त्याला पहिल्याने अर्ध देणे म्हणजे एक एखाद्याने आपली मुलगी छक्क्याला देण्यासारखी होते. युधिष्ठिराने शिशुपालला शांत करण्याचा प्रयत्न केला पण भीष्माने त्याला म्हटले "शिशुपालला काय भुंकायचे ते भुंकू दे" त्यामुळे शिशुपाल कुरुवृद्ध भीष्मावर भयंकर चिडला. त्यांनी अगदी घाणेरड्या शब्दात त्यांची निर्भर्त्सना केली त्यांच्या प्रतिज्ञाची चेष्टा केली. षंढ असल्यामुळे त्यावर पांघरून घालण्यासाठी त्यांनी लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली असे तो म्हणाला. भीष्माला तो नदीपुत्रही म्हणाला .भीम शिशुपालला ठार मारण्यासाठी निघाला पण भीष्माने सावरले. कृष्णाला युद्धाचे आव्हान दिले. म्हणाला "कृष्णा हे युद्धाचे आवाहन आहे कुणाची वागदत्त वधू लढाई न करता पळून नेण्याइतके हे सोपे नाही. गोपींची वस्त्रे पळवणे अगर त्यांना प्रेमात भुलवित ठेवण्यात इतकेही सोपे नाही.
कृष्णाने शिशुपालाच्या आजवरच्या अपराधांचा पाढा वाचला म्हणाला "मी नरकासुराशी युद्ध करीत असताना द्वारकेवर हल्ला करून जी जाळणाऱ्या शिशुपालने ,वृद्ध उग्रसेनाला सतावणाऱ्या शिशुपालने ,प्रत्यक्ष आपल्या मामाचा वसुदेवाचा अश्वमेध यज्ञाचा घोडा पकडून ठेवणाऱ्या शिशुपालने, आणि दुसऱ्यांच्या बायका पळून नेणाऱ्या शिशुपालने आपल्या शौर्याच्या व पराक्रमाच्या गप्पा मारू नये." अलौकिक कथेप्रमाणे युद्ध उभे राहिले तेव्हा कृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राचे स्मरण केले आणि शिशुपालावर ते सोडले क्षणात शिशुपालाचे शीर धडापासून वेगळे झाले.
याच प्रसंगी कृष्णाचे नाव अग्रपूजेसाठी सुचवितांना पितामहा भीष्म त्याचा 'जगदीश्वर' म्हणून उल्लेख करतात. कृष्ण सर्वश्रेष्ठ बलवंत क्षत्रिय आहे. पण कृष्णासारखा वेद वेदांगाचे ज्ञान असणारा पुरुष विराळाच असेही ते म्हणाले.पण युधिष्ठिराच्या धर्मराज संस्थापना घोषित करणाऱ्या राजसूय यज्ञात जेव्हा शिशुपाल विघ्न निघाला तेव्हा एका दृष्टीने आपल्या सामाजिक बांधिलकी म्हणून शिशुपालाला त्वरित ठार करण्याचे धर्म संस्थापनेतील तो अडसर कृष्णाने दूर केला होता. कृष्ण नेत्याच्या करवी निर्माण केलेले धर्म राज्याचे स्वरूप काय होते.ते वर्णन महाभारतातील सभापर्वातील ३३ व्या अध्यायात आले आहे.

संदर्भ -शोध कृष्णाचा प्रवासी पूर्णत्वाचा
लेखक- प्रा डॉ राम बिवलकर
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments