Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • वि 'लीन' करण
  • ब्रेक के बाद..
  • धूम्राक्ष, मानवीय इच्छा पूर्ण करणारा दैत्य
  • अजित दादा पवार…"मैने हमेशा मेरे दिल की सुनी है"
  • दाटलेली हुरहूर.
  • मेंदूच्या विकासातील टप्पे - नवे संशोधन
  • बजेट २०२६
  • चालू घडामोडी: फेब्रुवारी २०२६
  • आंब्याच्या झाडवरचे सरडे
  • "बौद्ध मूर्तीशास्त्र"
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

रझाकार: हैदराबादचा नि:शब्द नरसंहार - सिनेमा समीक्षण

ज
जावा फुल स्टॅक
Tue, 03/26/2024 - 12:56
🗣 6 प्रतिसाद

Razakar : The Silent Genocide Of Hyderabad हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालेला आहे. हैद्राबाद संस्थानातील हिंदू प्रजेवर तेथील राजाने रझाकारांद्वारे केलेले अन्वनित अत्याचार आणि त्यानंतर भारत सरकारने ऑपेरेशन पोलो राबवून हैद्राबादचे केलेले विलीनीकरण यांचे यथार्थ चित्रण करतो.

तेलंगणा, मराठवाडा व कर्नाटकाचा काही भाग हे हैदराबाद संस्थानाच्या अधिपत्याखाली असतो. उर्वरित भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहत असतात पण येथील प्रजेला मात्र शासन प्रणित (state-sponsored) अत्याचारांना तोंड द्यावे लागत असते. सक्तीची धर्मांतरे करविणे, पुरुषांना दिवसाढवळ्या वेदनादायक रीतीने ठार मारणे, स्त्रियांवर बलात्कार करून त्यांचे स्तन कापून टाकणे, तान्ह्या बाळांना तडफडवून ठार मारणे, लोकांना घरात कोंडून घरे जाळणे अश्या घटना वाढतच जातात. प्रतिकार होत असतो पण तो पुरेसा नसतो. अहिंसात्मक लढ्यालाही फारसे काही यश येत नाही. भारत सरकारही बराच काळ काही ठाम निर्णय घेत नाही. शेवटी १९४८ च्या सप्टेंबरमध्ये भारत सरकार ऑपरेशन पोलो द्वारे निझामाला शरणागती पत्करायला लावते आणि हैदराबाद संस्थानाचा स्वतंत्र कारभार संपुष्टात येतो. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा प्रदेश भारतीय प्रजासत्ताकाच्या एक भाग बनतो.

रझाकार सिनेमातील सर्वच कलाकारांचा अभिनय सुरेख आहे. राज अर्जुनने कासिम रिझवीची भूमिका अगदी योग्य वठविली आहे. सिनेमाचे दिग्दर्शन चांगले आहे, कथानक ठीकठाक आहे. चित्रीकरण उत्कृष्ट आहे. तेलुगु सिनेमाचा भडकपणा इथेही प्रकर्षाने दिसतो. एकूण सिनेमा पैसा-वसूल आहे.

रझाकार चित्रपटाचे विकिपान

रझाकार: हैदराबादचा नि:शब्द नरसंहार (२०२४) चे पोस्टर:
रझाकार: हैदराबादचा नि:शब्द नरसंहार


  • Log in or register to post comments
  • 3588 views


वाचनखूण लावा
| 3588 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (6)
म
मुक्त विहारि Tue, 03/26/2024 - 13:14 नवीन
धन्यवाद....
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Tue, 03/26/2024 - 15:25 नवीन
माहितीबद्दल धन्यवाद. अशीच माहिती आणि चित्रपट ४८ च्या ब्राह्मण हत्याकांड आणि ८४ चे शीख हत्याकांडावर यायला हवी.
  • Log in or register to post comments
न
निपा Wed, 03/27/2024 - 19:56 नवीन
https://en.wikipedia.org/wiki/Category:Films_based_on_1984_anti-Sikh_riots आले आहेत ना १९८४ वर सिनेमे. १९४८ चे हत्यकान्द किति होते आनि त्या बद्दल फारच कमि महिति उप्लब्ध आहे.
  • Log in or register to post comments
न
निनाद गुरुवार, 03/28/2024 - 10:44 नवीन
याविषयावर चित्रपट यायला इतका काळ लागावा हे आपले दुर्दैव आहे असे वाटते. रझाकारांनी हिंदूंवर केलेले अत्याचार ही अशा अनेक घटनांपैकी एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. या घटनेतून शिकणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी एकी महत्त्वाची आहे.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि गुरुवार, 03/28/2024 - 15:59 नवीन
अर्थातच... गजवा-ए-हिंद, टाळायचे असेल तर, एकी महत्त्वाची आहे. बऱ्याच लोकांना, "गजवा-ए-हिंद" माहीत नाही आणि काही लोकांना माहिती असली तरी, ते विश्र्वास ठेवत नाही... माझा पण , "गजवा ए हिंद" वर विश्वास न्हावता, पण सौदीत काम करत असताना, एका मुस्लिम मुलाने, "गजवा ए हिंद" बद्दल माहिती दिली...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 03/28/2024 - 19:15 नवीन
एका मुस्लिम मुलाने, "गजवा ए हिंद" बद्दल माहिती दिली... अन लगेच तुम्ही भ्यालात?? कसले कमजोर काळजाचे हिंदू तुम्ही??
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 30 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 42 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 44 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 46 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 50 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: रचस
    नोंदणी: Wed, 05/10/2023 - 10:29
  • सदस्य: Grishma B.
    नोंदणी: Fri, 05/05/2023 - 11:19
  • सदस्य: शितल ताथोड
    नोंदणी: गुरुवार, 05/04/2023 - 06:25
  • सदस्य: आपुलाची वाद आप…
    नोंदणी: गुरुवार, 04/13/2023 - 03:44
  • सदस्य: Shivaji vishva…
    नोंदणी: Tue, 04/11/2023 - 03:07
  • «
  • ‹
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • 12
  • 13
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा