Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

फ्लॅट घेताना काय पहावे?

अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/28/2023 - 11:53
🗣 108 प्रतिसाद
मला एक माहीती/सल्ला हवाय. सध्या मी फ्लॅट पाहतोय पुण्यात (खरंतर पुण्याबाहेर) म्हणजे पुणावळे/कात्रज/रावेत/ चंदनवगर वगैरे भागात. बरीच माहीती घेतल्यावर माझा थोडा गोंधळ ऊडतोय. १)बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत. त्यातही खुप कमी शिल्लक आहेत असे बिल्डर सांगतात. ते खरे की खोटे ते कळून येत नाही. शिल्लक म्हणजे एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का? असतील तर काय? खालच्या मजल्यांवर लोक का फ्लॅट घेत नाहीत? २) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात? ३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये? ४) बिल्डींगची कामाची क्वालीटी कशी चेक करावी? मी सिवील इंजी. नाही. म्हणून मग बोंबाबोंब. ५)स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं? ६)बिल्डींग रोड टच असेल तर रोडटच भागातील फ्लॅट चांगला की मागच्या बाजूचा? ७) कायदेशीर दृष्ट्या कोणत्या गोष्टी जोखाव्यात? ८)म्हाडाच्या लोटरीत घर बघावे असेही काहींनी सांगीतले. पण स्वस्त घराच्या बाजूला तसेच लोक येतात./तसेच कामाची क्वालीटी बोंबलते असेही काहींनी सांगीतले. ९)काहींना सॅंपल फ्लॅट बनवून ठेवलेत काहींनी नाही. त्याचा काही फरक पडतो का? १०) रोडटच बिल्डींग असेल तर भविष्याच्या दृष्टीने काही फायदा असतो का? काही सल्ले असतील तर अवश्य द्यावेत किंवा मी असतो तर असं केलं असतं अश्या स्वरूपात तरी सांगावेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26836 views

🗣 चर्चा (108)
म
मुक्त विहारि Sun, 10/01/2023 - 14:12 नवीन
शतकी धाग्या बद्दल, सर्व मिपाकरांचे अभिनंदन
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 01/27/2024 - 06:59 नवीन
मी बराच तपास करून पुनावळे भागात घर पाहीले होते. तिथे माझ्या बजेट मध्ये घर होते. ५५-६० लाख. पण तिथे कचरा जेपो येणार आहे असे कळाले, काही लोक सांगताहेत रद्द झालाय. काी सांगताहेत होना आहे. नक्की काय ते कळेना. कुणाला माहीतीय का काही??
  • Log in or register to post comments
T
Trump Sat, 01/27/2024 - 08:50 नवीन
पण तिथे कचरा जेपो येणार आहे
कचरा डेपो, मशिद झाली की किमती अगदी कमी होतात.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 01/27/2024 - 09:14 नवीन
मशिद झाली की
…या लल्ला.
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Mon, 01/29/2024 - 09:38 नवीन
सध्याचा स्टेटस माहित नाही पण जनआंदोलनाचे फ्लेक्स पाहिलेत साधारण ६-७ महिने पूर्वी . स्थगित प्रकल्प पुनर्जीवित होतात वा वावड्या उठलेल्या खोट्या ठरतात अशा ठिकाणी जागा घेणे टाळावे. रोकडा पैसे असतील तर गोष्ट वेगळी आहे पण पांढरपेशा माणसाने अशा ठिकाणी "गुंतवणूक" वा "राहते घर" म्हणून जागा घेऊ नये. गोष्टी तापदायक ठरतात. पुनावळेपेक्षा वाकड-रावेत चांगले आहे या बजेटला
  • Log in or register to post comments
क
कंजूस Sat, 01/27/2024 - 08:04 नवीन
पुढे काय होणार हे कुणीच सांगू शकत नाही. नव्या चांगल्या वसाहतीत महागाई फार जाणवते. तिथे mbbs dr. जागा घेऊन दवाखाना टाकणे परवडत नाही. आणि पेशंटनाही त्यांच्या फिया परवडत नाहीत. भाजी मार्केट महागडेच असते. रस्त्यावरची मुख्य दुकाने म्हणजे मॉल्स, मोबाईलवाले, बुटिक कपडे दुकाने, पिझ्झावाले,डी मार्ट.
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Mon, 01/29/2024 - 09:49 नवीन
सध्या तिथ न घेणे उत्तम ! कचरा डेपो नाही तर सॉलिड वेस्ट प्रोसेसिन्ग उभारणार असे कळले आहे. शिवाय सध्या तिथे बस कनेक्शन कमी आहे . रोज ट्राफिक जँम असते. धूळ , प्रदूषण जास्त आहे. ५५-६० ला ताथवडे, रावेत या भागात चांगले पर्यय आहेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 01/29/2024 - 13:35 नवीन
विअर्ड विक्स, कंकाका, मूनिवर खुप खुप आभार. पुनावळे टाळतो.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    19 hours 54 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    20 hours 6 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    20 hours 8 minutes ago
  • सुंदर !!
    20 hours 10 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    20 hours 14 minutes ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा