Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

फ्लॅट घेताना काय पहावे?

अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/28/2023 - 11:53
🗣 108 प्रतिसाद
मला एक माहीती/सल्ला हवाय. सध्या मी फ्लॅट पाहतोय पुण्यात (खरंतर पुण्याबाहेर) म्हणजे पुणावळे/कात्रज/रावेत/ चंदनवगर वगैरे भागात. बरीच माहीती घेतल्यावर माझा थोडा गोंधळ ऊडतोय. १)बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत. त्यातही खुप कमी शिल्लक आहेत असे बिल्डर सांगतात. ते खरे की खोटे ते कळून येत नाही. शिल्लक म्हणजे एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का? असतील तर काय? खालच्या मजल्यांवर लोक का फ्लॅट घेत नाहीत? २) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात? ३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये? ४) बिल्डींगची कामाची क्वालीटी कशी चेक करावी? मी सिवील इंजी. नाही. म्हणून मग बोंबाबोंब. ५)स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं? ६)बिल्डींग रोड टच असेल तर रोडटच भागातील फ्लॅट चांगला की मागच्या बाजूचा? ७) कायदेशीर दृष्ट्या कोणत्या गोष्टी जोखाव्यात? ८)म्हाडाच्या लोटरीत घर बघावे असेही काहींनी सांगीतले. पण स्वस्त घराच्या बाजूला तसेच लोक येतात./तसेच कामाची क्वालीटी बोंबलते असेही काहींनी सांगीतले. ९)काहींना सॅंपल फ्लॅट बनवून ठेवलेत काहींनी नाही. त्याचा काही फरक पडतो का? १०) रोडटच बिल्डींग असेल तर भविष्याच्या दृष्टीने काही फायदा असतो का? काही सल्ले असतील तर अवश्य द्यावेत किंवा मी असतो तर असं केलं असतं अश्या स्वरूपात तरी सांगावेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26836 views

🗣 चर्चा (108)
क
कंजूस Mon, 08/28/2023 - 12:09 नवीन
बरेच मुद्दे काढलेत हो. File दाखवतात का? मंजूरीची तारीख,सर्वे नंबर, किती महीन्यात काम करायचे आहे या गोष्टी पाहा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 08/28/2023 - 12:27 नवीन
हो. रेरा डेट ओफ पसेशन दाखवतात.
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Mon, 08/28/2023 - 13:42 नवीन
महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लान चेक करा (ओनलाईन मिळेल). बिल्डर बरेच सांगतात असे होईल तसे होईल पण हा प्लान बघितल्यावर खूप गोष्टी क्लिअर होतील. ( मुद्दे २, ६, १०) बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत : शक्यतो रेडी पझेशन, क्लोज टू कम्प्लिशन घ्या. दुर्दैवाने काही कारणाने रखडला आणि २-३ ची ६-७ वर्षे झाली तर प्रोब्लेम होईल. रेरा वगैरे असुनसुद्धा असे विलंब होत आहेत. स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं? असे काही नाही, मोठ्या बिल्डरनी पण सोसायटी फोर्म करताना भरपूर लोचे केलेली खूप उदाहरणे माहिती आहेत. एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का? स्रर्वात वरच्या मजल्यावर पावसामुळे लिकेज, गरम होणे असे प्रोब्लेम होतात. पहिला, दुसर्‍या मजल्यावर रोडटच असेल तर धूळ, आवाज, किंवा सोसायटीचे क्लब हाऊस, गार्डन फेसिंग असेल तर सारखा आवाज वगैरे असतो. एसबीआयचे गृहकर्ज काढले तर डोक्याला थोडा ताप झाला तरी मुद्दा क्र. ७ निकालात निघेल. बिल्डरकडून पण भरपूर डोक्युमेंटशन, वकिलाकडून जागेची कायदेशीरता वगैरे गोष्टी बँक काटेकोरपणे बघते. सँपल फ्लॅट फक्त खोल्यांचा लेआउट बघण्यापुरताच कामाचा. माझे मत रोडटच घेण्यापेक्षा मुख्य रस्त्यापासून ५०/१००/२०० मीटर आत घेतला तर उत्तम.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 09/05/2023 - 18:50 नवीन
शक्यतो रेडी पझेशन, क्लोज टू कम्प्लिशन घ्या. दुर्दैवाने काही कारणाने रखडला आणि २-३ ची ६-७ वर्षे झाली तर प्रोब्लेम होईल. रेरा वगैरे असुनसुद्धा असे विलंब होत आहेत.
याला प्रचंड अनुमोदन. यामुळे खुप खस्ता खाल्ल्यात. कंन्सुमर कोर्टाच्या खुप चकरा माराव्या लागल्या, त्यानंतर मोठ्या मुश्किलीने पैसे परत मिळवण्यात यशस्वी झालोय. त्यात ३ वर्षे गेली, अनेक आर्थीक अडचणींना तोंड द्यावे लागले, मनस्ताप झाला तो वेगळा. आणखिन एक महत्वाचा मुद्दा: बिल्डर जर राज्कारणी असेल (नगरसेवक, आमदार, वगैरे) तर अजिबात तिकडे फिरकू नका.
  • Log in or register to post comments
म
मिसळलेला काव्यप्रेमी Tue, 09/05/2023 - 18:53 नवीन
हो आणि आजकाल कंस्ट्रकशन संबधित तक्रारी कंन्झुमर कोर्ट घेत नाहीत. रेरा कडेच जावे लागते आणि रेरा ला कोर्टा इतके आधिकार नाही त्यामुळे रेरा कोर्टासारखे रिलीफ देउ शकत नाही.
  • Log in or register to post comments
र
राघव Mon, 08/28/2023 - 13:57 नवीन
ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का?
फार खालचे फ्लॅट्स असतील तर उजेड आणि हवा/वारं पुरेसं येईलच असं नाही. खूप वरचे फ्लॅट्समधे ( इमर्जन्सीत ) लिफ्ट्स शिवाय जाणं त्रासदायक राहतं, पाण्याचा फोर्स कमी असतो, घरं जास्त तापतात.
२) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात?
रहदारी फार असेल तर आवाजाचा त्रास होऊ शकतो एवढंच.
३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये?
- एसबीआयचं लोन मिळू शकेल काय? नाही म्हटलं किंवा घोळवलं तर बहुतेक वेळा स्कीममधे प्रॉब्लेम असू शकतो. - आधी किती स्कीम्स झाल्यात? अप्रुवल किती फ्लोअर्सचं आहे? मेंटेनन्स किती राहील? बिल्डर २ वर्षांचं मेंटेनन्स घेतात, पझेशन देण्यापर्यंत म्हणून. पण उरलेलं ते सोसायटी फॉर्म केल्यावर बरेचदा देत नाहीत. सोसायटी सेटअप बिल्डरनं करून द्यायचा असतो. - स्कीमच्या प्लॅन मधे पुढे काही बदल होणार आहेत काय? कधी कधी होतो, जर फेज मधे काम करणार असतील तर. - पार्कींगचं ब्लू प्रिंट बरेचदा नसतं, तेही बघू शकता. - काही कमर्शीयल सेटअप्स असणारेत काय? याचा खूप त्रास होतो, कारण कोण कशाचं दुकान उघडेल काही सांगता येत नाही. - सेलडीड मिळणार काय? हा भाग जरा गुंतागुंतीचा आहे कारण कन्वेयन्स झाल्याशिवाय सेलडीड बिल्डर करत नाही. पण पार्शियल कम्प्लीशन देतात.. त्याशिवाय सोसायटी स्थापन होत नाही. जागा मालक जमीनीची मालकी सोसायटीला ट्रान्सफर करत नाहीत लवकर, त्यामुळं कम्प्लीशन आणि कन्वेयन्स व्हायला वेळ लागतो. पण महारेरा मधे आल्यापासून बरेच बिल्डर सरळ व्यवहार करतात. - स्कीमची जागा आधी कशासाठी वापरली जायची याची माहिती मिळाली तर उत्तम. माझ्यामते सध्या नवीन फ्लॅट्स फारच छोटे व्हायला लागलेत. त्यापेक्षा जर रिसेलचा, फार जुना नसलेला फ्लॅट घेतला तर जवळपास त्याच किंमतीत बराच मोठा फ्लॅट मिळू शकेल.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 08/28/2023 - 15:06 नवीन
काय विचार करावा.... नवीन का रि सेल रेडी पझेशन का अंडर कन्स्ट्रक्शन का रि डेव्हलपमेंट स्वताचे,कुटुंबातील इतर व्यकतींचे वय. बजेट त्वरीत हवा की थांबायची तयारी आहे. होमलोन की स्वतःच्या पायावर. कशा करता ... गुंतवणूक की स्वताच राहाण्यासाठी. कुटुंबातील सदस्य संख्या. मुलांचे शिक्षण, स्वताची, बायकोची कामाची जागा. वैद्यकीय सोयी दळणवळणाची साधने. लोकसंख्या व दररोजच्या अवश्यकतेच्या सुखसोई. काय बघावे.... बिल्डर रेप्युटेशन. त्याचे पुर्व प्रोजेक्ट. साईट व साईज ऑफ प्रोजेक्ट कुठली बॅक लोन देत आहे रेरा रजिस्ट्रेशन कागदपत्रे, विवीध परवानगी. बांधकाम चालू असेल तर प्रोग्रेस सोसायटी का अपार्टमेंट असोसिएशन अमेनिटीज बर्याच प्रमाणात शंकानिरसन होतील.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 08/28/2023 - 16:07 नवीन
माझे वय ३०, बायको २७ नी एक वर्षाचा मूलगा. तिघेच. बजेट ५०-५५ कर्ज काढून. होमलोन वर सध्या तरी गुंतवणूक, रहायला जायची लगेच घाई नाही. कादाचीत दोनेक वर्षांनी रहायला जाईन. बॅंक लोन मिळेलच.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 09/06/2023 - 11:17 नवीन
अरे वाह! छोट्या बाहुबलीसाठी अभिनंदन! चांगली चर्चा, बायकांना घर पाहिजेच असतं, तेव्हा घेतल्यास चांगलेच होईल.फक्त इन्कम वाढत राहील याची तरतूद करत राहा.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 09/06/2023 - 12:33 नवीन
धन्यवाद. :) फार त्रासदायक असतो स्त्रीहट्ट. घ्यावच लागनार.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 09/06/2023 - 15:27 नवीन
राहते घर अगदी लहान असले तरी स्वतःचेच असावे या निर्णयावर आलो आहे. गेली ७ वर्षे माझे छोटे घर भाड्याने देऊन मी मोठ्या घरात भाड्याने राहत होतो. या अगोदर लष्करात असताना १२ वर्षे सरकारी घरात रहात होतो भाड्याच्या घराला स्वतः;च्या घराची सर कधीही येत नाही. त्यातील रंग, फरशा, फर्निचर, स्वयंपाकघराची रचना यातील तुम्हाला काहीही स्वतःच्या निवडीचे असत नाही. याशिवाय या घराबद्दल कधीही आपलेपणा वाटत नाही. सोसायटीतील लोक तुम्हाला परकाच आणि तात्पुरता समजतात. मग तुम्ही कितीही चांगले असा. उत्तम दर्जाची टॅक्सीबद्दल तुम्हाला कधीही ममत्व वाटत नाही. हि वस्तू परक्याची आहे हि जाणीव आपल्या मनातून कधीही जात नाही. आणि हि जाणीव स्त्रियांची अतिशय पक्की असते. यामुळेच भाड्याच्या महालापेक्षा अगदी छोटे का होईना स्त्रियांना स्वतःचे हक्काचे घरच हवे असते. बायकाना भाड्याचा हिऱ्या माणकांचाचा मोठा रत्नहार असल्यापेक्षा छोटा का होईना पण स्वतःचा (नेकलेस) हारच आवडतो शेवटी तुमच्या बँकेत पैसे किती आहेत यापेक्षा तुम्ही किती समाधानाने आयुष्य जगताय हे फार महत्त्वाचे असते. या समाधानाची किंमत कधीही करता येणार नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 09/06/2023 - 15:41 नवीन
सहमत. स्त्री मनाची बाजू ऊत्तम मांडलीत.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 09/06/2023 - 13:21 नवीन
कर्नल तपस्वी यांनी लिहीलेले प्रश्न मी पण विचारणारच होतो. आणखी काही प्रश्न (ज्याची उत्तरे इथे दिली नाहीत तरी चालेल, पण स्वतः लक्षात घेण्यासारख्या गोष्टी) १. गावाकडे घर, शेती वगैरेत वाटा आहे का? (हेच बायकोच्या बाबतीतही) गरज भासल्यास तिकडून काही रक्कम मिळू शकते का? २. नोकरी बदलून अन्यत्र (स्वदेशात वा परदेशात) जाण्याची इच्छा/ शक्यता कितपत ? सध्या एवढेच. आणखी पण आहेत, ते नंतर.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 09/06/2023 - 15:52 नवीन
गावाकडे घर आहे अगदी चांगल्या किमतीचे आहे. त्या घरामूळेच मी गंडलो. मी १५ लाख माझे स्वतचे लावून ते घर बांधले. तीन मजले काढले नी दोन दुकाने काढले. पाच लाख कर्ज ऊचललं त्या साठी. दहा स्वतचे कमावलेले टाकले. पण वडील दुकान भाड्याने जाऊ देत नाहीयेत. मला पैसा नको म्हणून, लोक १५ हजार भाडे द्यायला जागेवर तयार आहेत पण घरातूनच त्रास देणं सुरूय. लहान भावाने अर्धा कर्जाचा हफ्ता भरायला नकार दिलाय. घरातूनच अशी भयंकर मोठी आर्थीक फसवणूक झालीय. कुटूंब, आई- बाप, प्रेम वगैरेंवरून माझा विश्वास ऊडालाय. तिकडून भीक नको पण कूत्रं आवर अशी अवस्था झालीय. बायकोच्या माहेरून पुढील वीस- तीस वर्षे काही येणार नाहीये, एकंदरीत दोन्हीकडून बोॅब आहे. २ ) तोच विचार चाललाय, भरभक्कम पैसा मिळनार असेल तर विदेशात जायचा विचार सुरूय. मूल लहान आहे तेव्हाच. जर्मनी, ओस्ट्रेलीया, कॅनडा स्थलांतरावर विचारही केला. पण खुप तयारी करावी लागनारेय. दिल्ली अजून बरीच दूर आहे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/06/2023 - 16:27 नवीन
गावाकडच्या सामायिक मालकीच्या घरात (शहरातील श्रीमंत भावाने ) 'लक्ष ' घालून चांगलं ठेवावं हे तिथे गावी राहणाऱ्यांकडून मनावर बिंबवण्यात मोठमोठ्या लेखकांना जमणार नाही अशी भावनात्मक मराठी बोलली जाते. ती नंतर (शहलवाल्याने घाम आणि पयशे घातल्यानंतर )कधीच ऐकू येत नाही. ती भाषा हीच खरी मराठी भाषा. मग उरतात फक्त हिश्श्याचे कागद. बरं ही वृत्ती केवळ महाराष्ट्रातच (कोकण अथवा देशावर)नसून सर्व राज्यांत आहे.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 09/06/2023 - 16:37 नवीन
असा किती पैसा मुंबईतून "गावाकडच्या " कृष्णविवरात जात असतो हे कित्येक वर्षे पाहत आलो. आणि कोव्हीड च्या वेळेस याच गावच्या लोकांनी मुंबईच्या लोकांना गावात प्रवेश बंद केल्याचे असंख्य उदाहरणे पाहिली आहेत. गावचे लोक साधे सरळ आणि भोळे असतात यासारखी दुसरी अंधश्रद्धा नसेल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 09/06/2023 - 17:24 नवीन
खरं आहे कंकाका, नी डाॅ. साहेब, वडीलांची असंख्य कर्ज मी फेडली, एक नातेवाईक ऊरला नाही ज्याची ऊधारी नसेन. असा हीशेब लावला तर मी बराच कफल्लक झालोय. हे न भरून निघनारे कृष्णविवर आहे. आता मी एक रूपया हा देत नाही. काय होवे ते होवो तिकडे. हफ्ते भरायच्या वेळेस कुणीही येत नाही मदतीला घरातले.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 09/07/2023 - 06:05 नवीन
हे न भरून निघनारे कृष्णविवर आहे असं नाही. फाटक्या खिशातून गळून गेलेले पैसे सोडून द्या. आता खिसा नीट शिवून, जपून ठेवा तिसाव्या वर्षी अतिशय महत्त्वाचा धडा शिकलात हे काय कमी आहे? यापुढे पैसे कमवायच्या असंख्य संधी येतील. पैसे मिळत राहतो आयुष्यात. पैसे गेल्याबद्दल पश्चात्ताप करत राहू नका. माणसं ओळखायला शिकलात तर आयुष्यात खूप प्रगती करता येईल.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 09/07/2023 - 06:59 नवीन
_/\_
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख गुरुवार, 09/07/2023 - 07:16 नवीन
अतिशय आवडले.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… गुरुवार, 09/07/2023 - 16:44 नवीन
तुमच्या या अनुभवाला मी तर 100 टक्के रिलेट करतो. शहरातील सुशिक्षित लहान कुटुंबांमध्ये काही लोक क्लिअर सेपरेशन ऑफ अससेट्स अगदी सुरुवातीलाच करून ठेवतात. म्हणजे पुण्यातले वडील योग्य वय येताच मुलांना त्यांचे स्वतः चे घर घ्यायला लावतात किंवा कुणाला काय द्यायचे याचा स्पष्ट आराखडा त्यांच्या मनात तयार असतो. गावाकडची एकत्र कुटुंब मात्र जमेल तितके एकत्र राहण्याचा प्रयत्न करतात आणि त्यात मात्र कुचंबणा होऊन प्रचंड कडाक्याची भांडणे होऊन खूप मोठ्या भेगा पडतात. जेव्हा मूले जन्माला घालायची तेव्हाच असेट्स ची आखणी करून ठेवावी या मताचा मी आहे. शिवाय कोणत्याही सामायिक आर्थिक गोष्टी करत असताना कितीही वाईट वाटले तरी एम ओ यु केल्याशिवाय कोणतीही आर्थिक मदत करू नये. घरचे लोक सोयीस्कर रित्या आर्थिक मदती विसरून जातात. आम्ही आमचे गावचे घर रिनोव्हेंट केले तेव्हा सर्व भावंडांनी स्पष्टपणे काय मदत करणार हे लिहून सह्या केल्या. त्यामध्ये कोण लेबर किती देणार उदा. भिंतीवर पाणी मारणार, हेही नोंदवून ठेवले होते. दुसरे म्हणजे कोणालाही किरकोळ रक्कम सोडल्यास कॅश मध्ये मदत करू नये. विशेषतः भावंडं, आईवडील, इतर कुटुंबीय. रेकॉर्ड मध्ये पर्पज स्पष्टपणे नोंदवल्याशिवाय मदत करू नये. घरखर्चाला घरी पैसे पाठवण्यापेक्षा थेट गोष्टी पाठवाव्यात किंवा बिले भरावीत. खूपदा लोक पैसे इतरत्र खर्च करतात, चैनी करतात. ते करण्याला मज्जाव नसला तरी पैसे मागताना लोक अटीतटीची परिस्थिती आहे असं सांगतात ते खटकते. शिवाय काय खर्च केला हे विचारायला गेल्यावर "आता तू आम्हाला हिशेब मागणार काय म्हणून" अजून संबंध खराब होतात. त्यापेक्ष्या थेट बिले भरली म्हणजे वाण्याला थेट पैसे देणे इत्यादि गोष्टी केल्या तर थोडी अकौंटे बिलिटी राहते. बाकी "जोडीनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी" हे खरे असले तरी उदास विचार म्हणजे नुसतीच चॅरिटी नव्हे हेही खरे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Fri, 09/08/2023 - 05:20 नवीन
ओस्ट्रेलीया, कॅनडा स्थलांतरावर विचारही केला. पण खुप तयारी करावी लागनारेय. दिल्ली अजून बरीच दूर आहे. अमरेंद्र करणार असाल तर वेळेवर करा कारण अश्या स्थलांतराच्या अर्जात वय हा सुद्धा एक महत्वाचा विचार असतो असं ऐकलंय कि त्यातल्या त्यातल्या त्यात Canada जास्त सोप्पे आहे
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 09/08/2023 - 15:01 नवीन
नक्कीच.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 08/28/2023 - 15:48 नवीन
बँक लोन बद्दल सांगायचे तर एचडीएफसी वगैरे बँका कर्ज द्यायला तयारच बसलेल्या असतात (बहुधा 'कर्जवसुली' करून घेण्यासाठी ते कोणतेही उपाय करू शकत असावेत) मात्र स्टेट बँक काटकोर तपासणी करूनच कर्ज देते याचा मला स्वतःला अनुभव आहे (आमचे घर विकताना ग्राहकाला एचडीएफसीचे सहज मिळत होते पण स्टेट बेंकेने नकार दिला- खोलात जाऊन बघता जे कारण समजले ते प्रॉपर्टी डीलरांनाही ठाऊक नव्हते) या धाग्यावर जाणकार मिपाकर जे सल्ले देत आहेत, ते सर्वांच्याच कामास येतील. (वा.खू. साठवण्यालायक धागा) या फ्लॅट खरेदीत बिल्डरकडून पांढरा-काळा पैसा किती वगैरेही काही मुद्दे आहेत का ?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 08/28/2023 - 16:08 नवीन
हो काळा पांढरा मूद्दा आहे. बहुतेक ४५ लाखाच्या खाली जीएस टी कमी लागतो.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 08/28/2023 - 16:35 नवीन
सर्वात वरच्या मजल्यावर उन्हाने तापलेल्या टेरेसमुळे फ्लॅट मधील वाढणारी उष्णता तसेच पावसाच्या पाण्यामुळे टेरेसमधून होणारे लिकेज हे दोन त्रास असतातच. खालील किमान तीन मजल्यांपर्यंत आजूबाजूचा आवाज किंवा गोंगाट तसेच धूळ याचा त्रास होतो. आतल्या बाजूला फ्लॅट घेतल्यास जर दुसरी इमारत शंभर फुटांपेक्षा कमी अंतरावर असेल तर प्रायव्हसी जपली जाईलच असे नाही. बाहेरच्या बाजूला फ्लॅट घेतल्यास समोरील दुसरी इमारत जास्त अंतरावर जर असेल तर ते प्रायव्हसीच्या दृष्टीने जास्त फायदेशीर ठरते. मात्र ही बाहेरची बाजू जर रस्त्यावर असेल आणि पाचव्या पेक्षा कमी मजल्यावर फ्लॅट असेल, तर रहदारी, प्रदूषण, धूळ, गोंगाट, आवाज यांचा सतत त्रास होऊ शकतो. बिल्डर केवळ खालच्या दोन-तीन मजल्यावर आणि वरच्या दोन-तीन मजल्यावरच फ्लॅट शिल्लक आहेत असे सांगतात, कारण त्यांना सर्वात कमी मागणी असते. आणि ते त्यांना लवकर विकायचे असतात. मधल्या मजल्यावरचे फ्लॅट तसेही विकले जातातच. तेव्हा मला अमुक मजल्यावर अमूक दिशेलाच फ्लॅट असेल तर हवा आहे असे सांगितल्यास आणि खरोखर शिल्लक असल्यास बिल्डर तो उपलब्ध करून देऊ शकतो. बऱ्याचशा प्रोजेक्टमध्ये साधारण 30 टक्के फ्लॅट जमीनमालकाचे असतात. (जॉइंट वेंचर). एवढे सगळे फ्लॅट जमीन मालक स्वतः वापरू शकत नाही किंवा सगळे स्वतः भाड्याने देऊ शकत नाही. त्याला ते विकावे लागतात. मग ते एकतर बिल्डरकरवी किंवा एजंट करवी विकावे लागतात. बिल्डर आधी स्वतःचे फ्लॅट विकतो आणि त्यानंतर असे जॉईंट वेंचरचे फ्लॅट विकतो. त्यामुळे आपल्याला हव्या असणाऱ्या मजल्यावर आणि दिशेला एखादा फ्लॅट शिल्लक असेल तरीही बिल्डर तो आपल्याला दाखवेलच असे नाही. रहिवासी इमारत आणि व्यावसायिक बांधकाम शक्यतो स्वतंत्र असावे. रहिवासी इमारतीच्याच तळमजल्यावर दुकाने, गाळे, व्यवसाय इत्यादी असल्यास त्याचा त्रास केवळ खालील मजल्यावरच नाही, तर अगदी शेवटच्या मजल्यापर्यंत ही होऊ शकतो. कायदेशीर गोष्टींच्या बाबतीत जर बिल्डर नावाजलेला असेल आणि तज्ञ वकिलाने अशा गोष्टींचा निर्वाळा दिला, तर इतर गृह कर्ज देणाऱ्या संस्थांचाही विचार करता येऊ शकतो. विशेषतः जर त्या प्रकल्पाचा tie-up एसबीआय सोबत असेल, तर बाय डिफॉल्ट कायदेशीर सर्व गोष्टी व्यवस्थित आहेत असे धरून चालायला हरकत नाही. व्याजदर ०.५% पर्यंत कमी असू शकतो ज्याचा दीर्घकालीन आर्थिक फायदा खूप होतो. हडपसरच्या पूर्वेला शापूर्जी पालनजी चा जॉयविल नावाचा प्रकल्प आहे. तेथील २bhk चे चटई क्षेत्र ५५० स्क्वे फूट पासून सुरू होते. किंमत तीन वर्षांच्या मेंटेनन्ससहित ५७-६० लाख. त्याच्याच अलीकडे ५-१० वर्षे जुने ७००-७५० स्क्वे फूट चटई क्षेत्र असणारे २bhk फ्लॅट्स ५० लाखात येतात. पण अशावेळी नवा की जुना, साधी सोसायटी की मोठी टाऊनशिप असे निर्णय घेताना व्यवहार विरुद्ध हौस असे द्वंद्व नेहमीच असते. मुलांची शाळा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पाच-दहा-पंधरा किलोमीटर वरील भारी शाळेपेक्षा चालत जाण्याच्या अंतरावर असलेली बरी किंवा चांगली शाळा हा जास्त चांगला पर्याय आहे. हे अर्थातच वैयक्तिक मत. आपण आपल्या नोकरी व्यवसायासाठी दोन चार पाच किलोमीटरचा प्रवास अधिक करू शकतो परंतु शाळकरी मुलांना तो प्रवास रोजच्या रोज करणे थकवणारे असते.
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 08/28/2023 - 18:48 नवीन
तज्ञ लोकांनी वर अनेक मुद्दे कव्हर केलेच आहेत, पण माझ्या मते १. रेराचे फायदे असले तरी त्यामध्ये फ्लॅटचे क्षेत्र वॉल टू वॉल धरले जाते, त्यामुळे फ्लॅट छोटे वाटतात उदा. नवीन ५०० चौ.फू मधील बेडरूम ही १०-१५ वर्षे जुन्या ५०० चौ.फू. फ्लॅट पेक्षा लहान वाटते/असते. २. रेरामुळे बराचसा वचक आलेला असला तरी बिल्डर आर्थिक अडचणीत आल्यास पझेशन लांबणे होउ शकते. ३. नवीन फ्लॅटचा मेंटेनन्स सहसा जास्त असतो, त्यतही गार्डन्/जिम/पूल वगैरे असेल तर अजुन जास्त. वरील बाबी विचारात घेता १०-१५ वर्षे जुना रेडी पझेशन- फ्लॅट बघावा. वकीलाकडुन ३० वर्षाचा सर्च रिपोर्ट काढुन घ्यावा (टायटल क्लिअर आहे ना बघावे.) शक्यतो ५ मजल्यापासुन १० मजल्यापर्यंत घ्यावा. मेन रोड ला लागुन नको. खाली दुकाने नकोत. टाउनशिप असेल तर सुरक्षेच्या दृष्टीने बरे राहील. पण मोठी ५०-७० फ्लॅटची बिल्डिंग असेल तरी चालेल. मुख्य पाणी २४ तास आहे ना बघावे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/29/2023 - 06:11 नवीन
सौंदाळा, राघव, कर्नल साहेब, चित्रगूप्त, तुका सर, राजेंद्रजी आपल्या सर्वांच्या बहुमूल्य प्रतिसादाबद्दल धन्यवाद. बर्याच गोष्टी क्लिअर झाल्यात. खुप खुप आभार.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 08/29/2023 - 08:32 नवीन
माझ्या एका मित्राच्या सोसायटीत ;समोरच्या बिल्डींगमधे करीना कपूरने फ्लॅट घेतला आहे या कारणास्तव फ्लॅटच्या दरामधे वाढ झाली होती. एजंट लोक करीना कपूर हा मुद्दा हायलाईट करून प्रत्येकाला सांगायचा.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 08/29/2023 - 09:10 नवीन
छान ! करीना चे कपडे गॅलरीत सुकताना पाहायला मिळतील अशी अपेक्षा ठेवली असेल लोकांनी कदाचित . मी लक्षांत ठेवलेले मुद्दे : १. फ्लॅट कधीही टॉप फ्लोर वर घेऊ नये , पावसांत गळू शकतो. २. जास्त खाली सुद्धा नको, मच्छर वगैरे येतात. ३. लिफ्ट किती मोठी आहे ती पाहावी जरुरी पेक्षा छोटी वाटली तर घेऊ नये. ४. आग दुर्घटनेच्या दृष्टिकोनातून बिल्डर ने काय काळजी घेतली आहे ते पाहावे, तिथे कमी काळजी घेतली असेल तर इतर ठिकाणी सुद्धा विविध कॉर्नर्स कट केले असतील असे समजावे. ५. बरोबर एक चेंडू नेवून बाथरूम मध्ये ठेवावा. तो घरंगळत ड्रेनेज कडे गेला पाहिजे. ६. तुम्ही AC वगैरे वापरणार नसाल तरी पॉईंट ठेवला आहे कि नाही ते पाहावे. ७. बिल्डिंग मधील इतर लोकांची नावे पाहावीत, जात धर्म वगैरे लक्षांत घ्यावा. बहुतेक लोक एकाच समुदायांतले असले आणि आपण त्यातील नसाल तर त्रास होऊ शकतो. एक तर आपला समुदाय पाहिजे नाहीतर डायव्हर्सिटी असली पाहिजे. ८. बिल्डिंगमधील लोक तरुण असली तर चांगले, म्हातारी मंडळी चोंबडेपणा फार करतात. ९. आजूबाजूला शाळा कॉलेज काय आहेत हे आधीच पाहावे. तुम्हाला गार नसली तरी भविष्यांत भांड्याला देताना फायदेशीर ठरू शकतो. १०. बिल्डिंग मधील कॉमन एरिया किती चांगली आहे ह्यावरून कॉलोनीची एकूण संस्कृती कळते. ११. शक्य असेल तर लोकांना इलेट्रीसिटी बिल किती येते असे विचारा. कचरा व्यवस्थापन सुद्धा महत्वाचे आहे. १२. टाईल्स किती चांगले बसवले आहे हे पाहण्यासाठी अनवाणी चालून पहा. विशेषतः कॉर्नर्स कडे पहा. स्कार्र्टिंग कडे लक्ष द्या. बांधकामाचा एक प्रिन्सिपल आहे. समजा बिल्डर ने एक ठिकाणी कॉर्नर कट केला असेल तर तो अनेक ठिकाणी सुद्धा केला असेल. प्लम्बिंग खराब आहे तर इलेक्रीटीक काम सुद्धा खराब असू शकते.
  • Log in or register to post comments
ग
गवि Tue, 08/29/2023 - 09:19 नवीन
छान ! करीना चे कपडे गॅलरीत सुकताना पाहायला मिळतील अशी अपेक्षा ठेवली असेल लोकांनी कदाचित .
इतकी(च) साधी अपेक्षा असेल असे प्रथमदर्शनी वाटत नाही. :-))
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 08/29/2023 - 10:47 नवीन
चेंडू ऐवजी १ ग्लास पाणी ओतले तर? कदाचित चेंडू ला वेग मिळेल ईतका उतार नसेल, पण पाण्याल वेग मिळु शकेल. बाकी करीनाच्या मुद्द्यावर गविंशी सहमत!!
  • Log in or register to post comments
स
साहना गुरुवार, 08/31/2023 - 07:22 नवीन
पाणी बरोबर नेणे जास्त अवघड आहे, बाथरूम सोडून इतर ठिकाणी उदा किचन काऊंटर, गॅलरी, वॉशिंग मशीन एरिया इत्यादी ठिकाणे पाणी ओतणे कदाचित विकणाऱ्याला आवडणार नाही. मी नेहमी गोल्फ बॉल वापरते. https://www.apartmenttherapy.com/bring-golf-ball-to-open-house-36994080
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 09/04/2023 - 14:11 नवीन
उतार तपासण्यासाठी बॉलची आयडिया भारी आहे.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 09/04/2023 - 14:12 नवीन
८. बिल्डिंगमधील लोक तरुण असली तर चांगले, म्हातारी मंडळी चोंबडेपणा फार करतात.
वादग्रस्त मुद्दा वाटतोय ! या वर वेगळा धागा काढावा ही मैत्रीपुर्ण सुचवणी !
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/04/2023 - 22:49 नवीन
बिल्डिंगमधील लोक तरुण असली तर चांगले, म्हातारी मंडळी चोंबडेपणा फार करतात. -- वादग्रस्त मुद्दा वाटतोय ! या वर वेगळा धागा काढावा ही मैत्रीपुर्ण सुचवणी !
-- मलाही हे जरा विचित्र वाटले होते. फक्त म्हातारेच जिथे रहातात अशी वसाहत म्हणजे वृद्धाश्रम. तिथे फ्लॅट घेण्याचा प्रश्नच नाही. बाकी जनरल वसाहतींमधे म्हातारे लोक, लहान मुले वगैरे असणे चांगलेच असते. रिटायर म्हातार्‍या लोकांचे वसाहतीत काही गैर प्रकार तर होत नाही ना यावर लक्ष असते. त्यांच्यासाठी लहान मुले बागडत आहेत, सणावाराला स्त्रिया पैठण्या वगैरे घालून मिरवत आहेत ... वगैरे बघणे खूपच दिलासादायक असते. अजून तरी भारतात अमेरिकेसारखे झालेले नाही हे चांगलेच आहे. बाकी ज्या तरुणांना फ्लॅट घ्यायचे असतील त्यांनी आई-वडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करून मग स्वतःसाठी तरूण लोकांच्या सोसायटीत रहायला जावे, असा याचा अर्थ असेल तर ते दुर्दैवी आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Fri, 09/01/2023 - 00:46 नवीन
समोरच्या बिल्डींगमधे करीना कपूरने फ्लॅट घेतला आहे या कारणास्तव फ्लॅटच्या दरामधे वाढ झाली होती.
हे वाचून "कुणाला कशाचं तर रंडकीला केसांचं" ही म्हण आठवली.
  • Log in or register to post comments
ध
धर्मराजमुटके Tue, 08/29/2023 - 18:24 नवीन
देवा ! म्हातार्‍या-कोतार्‍यांचे कपडे पाहताना काय लोकांना आनंद होतो कोणास ठाऊक ?
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 08/30/2023 - 03:11 नवीन
इमारतीचा विमा ? या याबद्दल कोणीच काही उल्लेखित नाही ?
  • Log in or register to post comments
स
सर टोबी Wed, 08/30/2023 - 05:57 नवीन
शाळेत जाणारं मूल घरात असेल तर चालत जाता येईल इतकी शाळा जवळ असण्यासारखं सुख नसतं. मुलं सहसा कोणत्या न कोणत्या कारणाने रात्री उशिरा झोपतात. अशा वेळेस सकाळी त्यांना उठविणे हा खरेच एक दुःखद प्रकार असतो. शाळा लवकरात लवकर केव्हा उघडावी याचा बहुदा मुलांच्या दृष्टिकोनातून विचारच केलेला नसतो. मन आणि आरोग्य संवर्धनासाठी प्रातःकाल चांगला या विचाराचं जोखड जेव्हा उतरेल तो सुदिन. असो. तर अशी हि, गरज असू पर्यंत चांगली वाटणारी संस्था कायमस्वरूपी मात्र कटकट वाटू शकते. शाळेजवळ असणारी व्हॅन्सची गर्दी, मुलांना शाळेत सोडणाऱ्या पालकांकडून होणार उपद्रव, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तयारीचा गोंगाट, कला आणि खेळ यांच्या क्लासेसचा उशिरापर्यंत चालणारा सराव या सर्वांचा त्रास आपण शिक्षण म्हणजे उदात्त कार्य या नावाखाली सहन करीत असतो.
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Wed, 08/30/2023 - 07:01 नवीन
बरेचदा वाचनमात्र असतो पण जिव्हाळ्याचा विषय असल्याने सविस्तर प्रतिसाद देतोय १)बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत. त्यातही खुप कमी शिल्लक आहेत असे बिल्डर सांगतात. ते खरे की खोटे ते कळून येत नाही. शिल्लक म्हणजे एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का? असतील तर काय? खालच्या मजल्यांवर लोक का फ्लॅट घेत नाहीत? फ्ललोर राईस हि संकल्पना माहित असल्यास हि शंका येणार नाही . वरच्या माळ्यावरून परिसर दृश्य (View ) चांगला मिळतो , पण हे बिल्डिंग कोणत्या परिसरात आहे यावर अवलंबून आहे. पहिले दोन माळे हे मोठ्या टॉवरमध्ये सहसा कोणी घेत नाही वरील सबबीमुळं. शक्यतो फ्लॅट हा माझ्या हिशेबाने ४-७ माळ्यापर्यंत घ्यावा , अडीअडचणीच्या काळी पायऱ्या उतरू शकता. आजकाल मुंबईत पहिले दोन मजले हे वाहनतळ असतात त्यामुळे ३-४ था माळा असा उल्लेख केला. पहिले दोन माळे हे व्यावसायिक कारणासाठी भाड्याने जात असल्याने शेजार बघून निर्णय घ्यावा. जास्त उंचावर गेलात तर हवेचा प्रॉब्लेम होतो . जबरदस्ती खिडक्या बंद ठेवाव्या लागू शकतात. २) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात? व्यक्तिशः मला रोड टच आवडतो , पण धूळ व आवाजाचा प्रॉब्लेम येतो , फ्लोअर कितीही वरचा असला तरी आवाजाची तीव्रता कमी होत नाही . ३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये? रेरा नि संबंधित शासकीय संस्थेची मंजुरी . लोन घेणार असाल तर sbi वा hdfc चे त्या बिल्डिंग मध्ये कोणाचे लोन झाले असल्यास चौकशी करावी. शक्यतो फ्लॅट ज्याचे इंटिरिअरचे काम चालू आहे म्हणजे पझेशन जवळ चा घ्यावा . थोडा महाग वाटलं तरी चालेल पण जे दिसेल ते खरेदी करावे सॅम्पल फ्लॅट नि बिल्डर रेप्युटेशन वर भरवसा ठेवू नये . गोदरेज नावाचा फायदा घेउन प्रीमियम घेतो पण प्रोजेक्ट उशीर ला ब्रँड कामी येत नाही . बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल हा हिशेब ठेवावा ४) बिल्डींगची कामाची क्वालीटी कशी चेक करावी? मी सिवील इंजी. नाही. म्हणून मग बोंबाबोंब. आजकाल अनेक agency हे काम करून देतात. ५-१० हजार ५० लाखाच्या फ्लॅटसाठी खर्च करण्यास हरकत नसावी . पण बिल्डरकडून घेताना खरेदीपत्र हे त्याच्या बाजूने असते त्यामुळे जे पदरी पडेल ते गोड मानणे . यासाठी फ्लॅट पैंटिंग वा लाद्या बसवण्याच्या स्टेज ला घ्यावा . ५)स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं? हे जागा मालकावर अवलंबून आहे तो पांढरपेशा असल्यास हरकत नसावी पण गळ्यात चार चेन नि gunman घेऊन फिरणाऱ्या माणसाकडून काय प्रॉब्लेम होऊ शकतो हे अनुभवानेच कळेल . ६)बिल्डींग रोड टच असेल तर रोडटच भागातील फ्लॅट चांगला की मागच्या बाजूचा? मी पर्यावरण अभियंता आहे त्यामुळे पाऊस पाणी उन वाऱ्याचा त्रास पाहून निर्णय घेतो, तुम्ही पण तो पाहून घ्यावा.हा निर्णय अंडर construction स्टेज ला सोपा नाही , तो अनुभवानेच घेता येतो. वास्तुशास्त्र मानत असल्यास त्याप्रमाणे सल्ला घ्या . ७) कायदेशीर दृष्ट्या कोणत्या गोष्टी जोखाव्यात? लोन घेत असल्यास लगेच लोन मिळते पण कुठल्याही बँकेतून लोन घेऊ नका . sbi वा hdfc are गुड. OC ni CC असल्यास निर्धास्त व्हा . पण हा निर्धास्तपणा फार कमी लोकांच्या वाट्याला येतो कारण बिल्डर चा मेन बिझिनेस हा टोपी लावणे नि काळ्याचे पांढरे करणे हा असतो , घराला घरपण देणे वगेरे बाता असतात . title चेक वकिलाकडून ५-१० हजारात केल्यास जमिनीची संपूर्ण माहिती मिळते . जर लोन घेणार नसाल तरी ३-४ बँक मध्ये चौकशी करा , कारण प्रत्येक ठिकाणच्या अडीअडचणी वेगळ्या स्वरूपाच्या असतात. अनधिकृत बांधकाम, OC नसणं , गावठाण वा ग्राम पंचायतीची जागा हजार भानगडी असतात . ८)म्हाडाच्या लोटरीत घर बघावे असेही काहींनी सांगीतले. पण स्वस्त घराच्या बाजूला तसेच लोक येतात./तसेच कामाची क्वालीटी बोंबलते असेही काहींनी सांगीतले. तुम्ही गुंतवणुकीसाठी घर घेत असाल तर म्हाडा वा सिडको लॉटरी बेस्ट . कायदेशीर बाबी बाबत चिंता नसते कारण सरकारी प्रकल्प . लोडींग कमी सोयी सुविधा हे तुम्ही कुठल्या लोटरिला apply करता यावर असते . म्हाडा चा उच्च उत्त्पन्न गटातील फ्लॅट मुंबईत ७. ५ करोडचा होता ९)काहींना सॅंपल फ्लॅट बनवून ठेवलेत काहींनी नाही. त्याचा काही फरक पडतो का? सॅम्पल फ्लॅटवरून जागेचा अंदाज घ्या निर्णय नाही . सोयी सुविधा पाहून लोक भुलतात १०) रोडटच बिल्डींग असेल तर भविष्याच्या दृष्टीने काही फायदा असतो का? मेन रोड ला लागून असेल तर होऊ शकतो . रोड प्रत्यक्षात आल्याशिवाय व दृष्टीपथात असल्याशिवाय फायदा तोटा ठरवा . राजकारणी हिशेबाने अँप्रोव्हड प्लॅन बदलतात , पस्तावण्यापेक्षा थोडा चढ रेट द्यावा गुंतवणुकीसाठी फ्लॅट बिलकुल घेऊ नये या मताचा मी आहे , आपल्याकडे रोख रक्कम असेल तर ठीक अन्यथा होम लोन घेऊन गुंतवणूक करणे हे सुज्ञाचे लक्षण नाही या मताचा मी आहे . २००४-१०१३ सारखे प्रॉपर्टी रेट आता वाढणे अशक्य आहे , मी स्वतः covid चा फायदा उचलत मोठा फ्लॅट घेतला राहण्यासाठी , गुंतवणुकीसाठी नाही. तत्सम संधी मिळाल्यास गुंतवणूक करा अन्यथा मोह टाळा .
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/31/2023 - 14:52 नवीन
माझा एक जांगडगूत्ता झालाय. माझी चूकी नसूनही एक्सीस बॅंकेने माझा सीबील स्कोर डॅमेज केलाय. ३ चे १३ हजार झालेत लेट फी वगैरे धरून. आता होमलोन वाल्या बॅंक सीबील स्कोर ६७० चा पाहून काहीबाही टक्के लोन सांगताहेत. काय करावे ह्या चक्रव्यूहातून बाहेर पडायला?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 08/31/2023 - 16:11 नवीन
किमान दोन बुडीत अथवा थकीत कर्जे (कर्ज किंवा क्रेडिट कार्ड) असतील तर इतका वाईट स्कोर होतो. ६७० ला महाग का होईना गृहकर्ज मिळतंय हीच मोठी गोष्ट आहे! व्याजदर किमान ९.५ असेल. कदाचित १०.५ ते ११ ही असू शकतो. आणि क्रेडिट स्कोअर फार पटकन कमी होतो आणि फार सावकाश वाढतो. ६७४ वरून ७४९ वर यायला मला आठ वर्षे लागली होती. वाढवण्याचे पर्याय - सिबिल रिपोर्ट मध्ये जर काही थकीत कर्जे दिसत असतील तर ती फेडून बंद करणे. बँकेकडून तसे रीतसर लिहून घेणे. ते सिबीलला दिल्यास ते ऋण गुण धन होतात आणि स्कोअर सुधारतो. आधीच बंद केली असल्यास, बँकेशी इमेल अथवा पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून कंफर्मेशन घ्यायचे आणि ते सिबीलला कळवयचे. याने काही महिन्यांत ७००-७२५ दरम्यान स्कोअर जाईल. पण याला ६-९ महिने लागू शकतात. त्यानंतर ९.५% व्याजदर मिळू शकतो. महाग कर्ज घेऊन नंतर क्रेडिट स्कोअर सुधारल्यास बँका कर्जदर कमी करतात.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/31/2023 - 16:39 नवीन
एकच होतं क्रेडीट कार्ड बील. तेही तीन साडे तीन हजार होतं. एक्सीस बॅंकेच्या सर्वर डाऊन मूळे जानेवारी २२ चं पेमेंट झालं नव्हतं. त्यानी मलाच लेट फी लावली. मग मी त्यांचे पूढील महाने थकवले.
  • Log in or register to post comments
ग
गवि गुरुवार, 08/31/2023 - 17:06 नवीन
जानेवारी बावीस ते आतापर्यंत क्रेडिट कार्ड बिल थकवून तरीही स्कोअर बराच उरला आहे असे म्हणावे लागेल. आपण असे पेमेंट थकवून बँकेला कोणताही धडा मिळत नसतो. उलट आपल्याच स्कोअर वर अत्यंत विपरीत परिणाम होतो. आपल्याला कधीही कर्ज लागण्याची शक्यता असेल तर पत दर्शक स्कोअर सांभाळणे आवश्यक आहेच. हरकत नाही. अनेकदा आपल्याला दीर्घकालीन परिणाम दिसत नाहीत. आता लक्षात आले आहे तर पूर्ण रक्कम विना तडजोड भरून टाका. (अधली मधली तडजोड रक्कम भरून कार्ड बंद करून टाकणे हा मार्ग नव्हे. तो अधिक नुकसानीचा या बाबतीत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 09/04/2023 - 10:49 नवीन
एक्सीस बॅंक थकबाकीवर दोन हजार जास्त घेऊन म्हणजे १६००० घेऊन सीबील स्कोर सुधारून देईन म्हणतेय. काय करावे? भरून टाकावेत का?
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 09/04/2023 - 14:16 नवीन
परवडणार असेल तर करायला हरकत नाही ,,, पण हे करण्यापुर्वी दोन तीन केस स्टडी करुनच हा मार्ग निवडा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Mon, 09/04/2023 - 16:20 नवीन
सिबिल स्कोअर सहज सहजी सुधारत नाही. निदान तीन महिने तरी लागतातच. माझी कोणतीही मागणी नसताना एन के जी एस बी बँकेने मला कर्जाचा मोरॅटोरियम दिला. आणि मी दोन हप्ते आगाऊ भरूनही माझा हप्ता थकल्याची नोटीस पाठवली ज्यामुळे माझा सिबिल स्कोअर फुकटचा ८२५ वरून ८१० आला. मी बँक मॅनेजरची चांगलीच खरडपट्टी काढली यानंतर याबद्दल बँकेने मला माफीचे पत्र देऊन त्याची कॉपी सिबिल कडे पाठवूनही सिबिल स्कोअर सुधारण्यासाठी तीन महिने लागले. ऍक्सिस बँकेतून जो कोण माणूस २ हजार रुपये अतिरिक्त भरून सिबिल स्कोअर सुधारण्याची हमी देतो आहे त्याच्या कडून ते लिहून घ्या किंवा तसा नियम असल्यास स्वतः वाचून खात्री करून घ्या. बहुधा हा तुम्हाला शेंडी लावत असण्याची शक्यता जास्त आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 09/04/2023 - 18:17 नवीन
हो डोक्टर साहेब. त्यांनी तसं लिहून दिलंय. हे पहा पत्र. https://ibb.co/WpGPqW9
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत Mon, 09/04/2023 - 21:08 नवीन
तुम्ही पैसे भरल्यावर तसे पण ते कार्ड नॉर्मल रिपोर्टिंग होऊन तुमचा सिबील स्कोअर वाढेल, त्यात काही शंका नाही. पण कार्ड क्लोज केल्यावर ते कार्ड पुढचे तीन वर्षे तरी ते लेट पेमेंट/ नो पेमेंट तुमच्या सिबील रिपोर्ट वर दिसत राहील. त्यामुळे स्कोअर वाढला तरी, प्रत्येक वेळेस सिबील रीपोर्टचे तुम्हाला स्पष्टीकरण द्यावे लागेल. तुम्हाला जे पत्र आलय त्यात सिबील स्कोअर मधे लेट पेमेंट्स दिसणार नाहीत असे काही आहे का? वा त्या अनुषंगाने क्रेडिट ब्युरोकडे काही करता येते का ते पहा. माझा अनुभव: मी २००६ साली एसबीआयचे कार्ड काढले. कार्ड घेताना ते लाईफटाईम फ्री असेल असे सांगीतले होते,पण नंतर त्यांनी वार्षीक फी आकारली म्हणून ते कार्ड २००८ साली बंद केले. लाँग स्टोरी शॉर्ट, २००८ ते २०२२ माझ्याकडे माझा भारतातला फोन नंबर नव्हता. २०२२ मध्ये मला माझा भारतातला नंबर मिळाला. एका महिन्यात मला एसबीआयचे पेमेंट बाकी असल्याचे मेसेज आले. कस्टमर केअरला फोन लावण्याचे निष्फळ प्रयत्न केले. त्यादरम्यान माझा बजाज फायनांस कार्डाचा अर्ज कमी सिबील स्कोअर मुळे नाकारला. एसबीआयची एकंदरीत थकबाकी ३ आकडी असल्याने ती रक्कम मे २०२२ मध्ये भरली. अकाऊंट सेटल झाल्याने स्कोअर वाढला. पण सिबील रिपोर्ट मध्ये एसबीआयचे गेल्या तीन वर्षातले मे २०२२ पर्यंतचे सगळे पेमेंट्स मिसींग दाखवत आहे. त्यामुळे मे २०२५ पर्यंत हे मिसींग पेमेंट्सचे रीमार्क, माझ्या सिबील स्कोअरला धक्का देत राहणार.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा