Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

फ्लॅट घेताना काय पहावे?

अ
अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/28/2023 - 11:53
🗣 108 प्रतिसाद
मला एक माहीती/सल्ला हवाय. सध्या मी फ्लॅट पाहतोय पुण्यात (खरंतर पुण्याबाहेर) म्हणजे पुणावळे/कात्रज/रावेत/ चंदनवगर वगैरे भागात. बरीच माहीती घेतल्यावर माझा थोडा गोंधळ ऊडतोय. १)बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत. त्यातही खुप कमी शिल्लक आहेत असे बिल्डर सांगतात. ते खरे की खोटे ते कळून येत नाही. शिल्लक म्हणजे एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का? असतील तर काय? खालच्या मजल्यांवर लोक का फ्लॅट घेत नाहीत? २) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात? ३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये? ४) बिल्डींगची कामाची क्वालीटी कशी चेक करावी? मी सिवील इंजी. नाही. म्हणून मग बोंबाबोंब. ५)स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं? ६)बिल्डींग रोड टच असेल तर रोडटच भागातील फ्लॅट चांगला की मागच्या बाजूचा? ७) कायदेशीर दृष्ट्या कोणत्या गोष्टी जोखाव्यात? ८)म्हाडाच्या लोटरीत घर बघावे असेही काहींनी सांगीतले. पण स्वस्त घराच्या बाजूला तसेच लोक येतात./तसेच कामाची क्वालीटी बोंबलते असेही काहींनी सांगीतले. ९)काहींना सॅंपल फ्लॅट बनवून ठेवलेत काहींनी नाही. त्याचा काही फरक पडतो का? १०) रोडटच बिल्डींग असेल तर भविष्याच्या दृष्टीने काही फायदा असतो का? काही सल्ले असतील तर अवश्य द्यावेत किंवा मी असतो तर असं केलं असतं अश्या स्वरूपात तरी सांगावेत.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 26836 views

🗣 चर्चा (108)
स
सुबोध खरे Tue, 09/05/2023 - 06:12 नवीन
यात दोन हजार "जास्त" कशाचे हे त्यांनी काहीच लिहिलेले नाही याशिवाय ४५ दिवसपर्यंत निल बॅलन्स पत्र देण्यासाठी लागणार. हे पत्र सिबिल मध्ये पाठवल्यावर त्यावर ते कार्यवाही करण्यास पुढची तिमाही उजाडणार म्हणजेच आपला सिबिल स्कोअर किमान सहा महिने सुधारणार नाही. आणि पुढची काही वर्षे तुम्हाला हे पत्र प्रत्येक वेळेस तुम्ही पैसे भरले आहेत आणि निल बॅलन्स आहे याचा पुरावा म्हणून दाखवत राहावे लागणार अर्थात तुमच्या कडे पर्याय काय आहे?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 09/05/2023 - 06:55 नवीन
अर्थात तुमच्या कडे पर्याय काय आहे?>> तेच तर. पण देन हजार जास्तीचे भृबन जर सिबील वाढला. नी मला फ्लॅट घ्यायचा असेल तर ७.७५ टक्के पासून कर्ज सुरू होतेय. सिहील खराब असेल तर ९.५ टक्के ने देतय बॅंक.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 09/05/2023 - 06:56 नवीन
अर्थात तुमच्या कडे पर्याय काय आहे?>> तेच तर. पण दोन हजार जास्तीचे भरून जर सिबील वाढला नी मला फ्लॅट घ्यायचा असेल तर ७.७५ टक्के पासून कर्ज सुरू होतेय. सिबील खराब असेल तर ९.५ टक्के ने देतेय बॅंक.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 01/29/2024 - 14:54 नवीन
कळवण्यास अत्यंत आनंदं होतोय की १६००० रूपये एक्सीस बॅकेच्या थोबाडावर मारल्यानंतर त्यांनी माझा क्रेडीट स्कोर बर्यापैकी सुधारून दिलाय, इतका की ९०० ला भिडत आलाय. मला इतर बॅंकाचे फोन येताहेत की आम्ही तुम्हाला क्रेडीट कार्ड देतो, त्यांना सांगीतलं की “तुमचा बॅंक ना तुमचं क्रेडीट कार्ड दोन्ही चूलीत जाऊद्या.” क्रेडीट स्कोर फार लवकर सुधारलां :) नंतर एक्सीस बॅंकेचं अकाऊंट बंदं करायला बॅंकेत तरफडलो ते बंदं करायला त्यांना बराच त्रास दिला १२०० रूपये मागत होते, त्यांच्या रिजनल मॅनेजर ला मेल वगैरे ठोकले तर सगेच ३४ रूपये भरून बंदं केले. शेवटी जाताना ब्रांच ला हात जोडले. साक्षात बाहुबलीला जेरीस आणले हरा**रांनी.
  • Log in or register to post comments
अ
अनन्त अवधुत गुरुवार, 08/31/2023 - 19:47 नवीन
१)बरेच फ्लॅट हे दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत. त्यातही खुप कमी शिल्लक आहेत असे बिल्डर सांगतात. ते खरे की खोटे ते कळून येत नाही. शिल्लक म्हणजे एकतर सर्वात वरचे दोन मजले किंवा पहील्या दोन मजल्यांवर. ह्या दोन्ही मजल्यांत काही तोटे असतात का? असतील तर काय? खालच्या मजल्यांवर लोक का फ्लॅट घेत नाहीत? =>हाय राईज इमारतीच्या सर्वात वरच्या १-२ मजल्यांना पावसाचा फार त्रास होतो, शिवाय लिफ्ट बंद असली तर जीन्याचा वापर त्रासदायक ठरू शकतो. अर्थात सगळ्यात वरच्या मजल्यांवरून दिसणारा नजारा मात्र जोरदार असतो. पहिला मजला नको. पार्किंग मधल्या गाड्यांचा त्रास, धूळीचा त्रास, फार काय इमारतीचे ड्रेनेज तुंबून, पहिल्या मजल्यावरील न्हाणीघर खराब झालेले पाहिले आहे. पहिल्या मजल्यावर हॉटेल, दुकाने नसतील तर २,३,वा ४ पैकी एका मजल्यावर घर घ्यावे. पहिल्या मजल्यावर हॉटेल, दुकाने असतील तर शक्यतोवर तीथे फ्लॅट घेऊ नका. ५ ते ८ मध्ये घर घेण्यात फार हशील नाही, फ्लोअर राईज मुळे किंमत वाढते, बाकी विशेष असा काही फायदा नाही. 'दोन ते तीन वर्ष पूढे ताब्यात मिळनारेत' हा रिस्क फॅक्टर आहे. अंदाज घेऊन ऊडी मारा. बिल्डर कसा आहे, ज्या सोसायटी मध्ये इमारत आहे तिथे ऑलरेडी इतर इमारती तयार आहेत का असे काही निकष लावू शकता. रेडी पझेशन वा नीअर पझेशन हे योग्य. २) रोडटच फ्लॅट नी थोडे आतले फ्लॅट ह्यात काय फायदे तोटे असतात? =>थोडे आतले फ्लॅट बरे. हमरस्ता ते फ्लॅट ह्यात एखादे तरी डेली नीड्स चे दुकान असते जे आपली दूध, भाजी वगैरे आपात्कालीन गरज भागवू शकते. ३) फ्लॅट घेताना काय काय पहायला हवे जेणेकरून फसवणूक होऊ नये? => रेरा नोंदणी, एस्बीआयचे कर्ज , आणि वकिलाचा सल्ला कागदपत्रांसाठी. ४) बिल्डींगची कामाची क्वालीटी कशी चेक करावी? मी सिवील इंजी. नाही. म्हणून मग बोंबाबोंब. =>रेडी पझेशन घर असेल तर इतर रहीवाशांकडून माहीती मिळू शकेल. ५)स्वतः जागा मालक डेवलपर असेल तर फ्लॅट घेऊ नये कारण सोसायटी फोर्म होताना प्रोब्लेम येतो असा एकाने सल्ला दिला. ते कितपत खरं? =>माहीती नाही. ६)बिल्डींग रोड टच असेल तर रोडटच भागातील फ्लॅट चांगला की मागच्या बाजूचा? =>रोडटच भागातील फ्लॅटमध्ये राहणारे व्यवस्थीत नसतील, तर घरातला सगळा गचाळपणा रस्त्यावरून दिसतो. ७) कायदेशीर दृष्ट्या कोणत्या गोष्टी जोखाव्यात? => जाणकार वकील हेच योग्य ठरतील.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत गुरुवार, 08/31/2023 - 21:27 नवीन
फक्त ऐपत पहावी बाकीचे विचार करत बसु नये , आपल्याला आवडला कि नाही हे पटकन कळते, क्लिक होते !
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/31/2023 - 23:28 नवीन
सर रेडी फ्लॅट असेल तर नक्कीच पण अंडर कन्स्ट्रक्शन कसा कळनार?
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Fri, 09/01/2023 - 09:43 नवीन
च म्हणतोय
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/04/2023 - 23:08 नवीन
बाकीचे विचार करत बसु नये , आपल्याला आवडला कि नाही हे पटकन कळते, क्लिक होते !
-- हे बूट, रुमाल, साडी, टेबल वगैरे वस्तू घेतानाच्या बाबतीत ठीक असले तरी घर घेताना अनेक बाबी विचारत घेणे अतिशय आवश्यक असते. रक्कम खूप मोठी असते, वर्षानुवर्षे कर्जाचे हप्ते भरणे हा जन्मभराचा मामला असतो, कुटुंबातील सर्वांचीच सोय, सुरक्षितता, हवा-उजेड-पाणी, बांधकामाचा दर्जा अश्या अनेक गोष्टींखेरीज कोणत्याही प्रकारे फसवणूक तर होत नाही ना, याची खात्री करून घेणे गरजेचे असते. या धाग्यावर अनेक जाणकारांनी उत्तम प्रतिसाद दिलेले आहेत, ते यासाठीच.
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Mon, 09/04/2023 - 23:54 नवीन
तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्या माहीत नसतात का आपल्याला ऑलरेडी? विचार करायची गरज आहे का त्या बाबतीत? लग्न करताना विचार करण्यासारखी गोष्ट झाली ही!
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 09/05/2023 - 02:28 नवीन
'क्लिक' होणे येवढेच पुरेसे आहे का ?
तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्यात त्या माहीत नसतात का आपल्याला ऑलरेडी?
'ऑलरेडी' म्हणजे व्यवस्थित चवकशी केल्यावर, गरज पडल्यास वकिलाचा सल्ला घेतल्यावर ना ? की ते आपल्याला 'क्लिक' होताना आपोआपच समजते ?
  • Log in or register to post comments
उ
उन्मेष दिक्षीत Tue, 09/05/2023 - 08:41 नवीन
तेव्हढेच पुरेसे आहे. मी एका प्रोजेक्ट मधे फ्लॅट घेता घेता चेक द्यायच्या वेळी प्लॅन कॅन्सल केला. आणि दुसर्या मधे एकंदर सगळं बघुन जास्त विचार न करता लगेच घेतला. इन्स्टिंक्ट्स फार महत्वाचे असतात बघा. वकील वगैरे काय भानगड नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/31/2023 - 23:27 नवीन
गवि, तूका, अवधूत साहेब माहीतीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
च
चावटमेला Mon, 09/04/2023 - 15:13 नवीन
रेडी पझेशनच घ्या, कितीही नावजलेला बिल्डर असला तरी, कधी कुठे माशी शिंकेल आणि प्रोजेक्ट रखडेल ह्याचा नेम नाही. मनःशांती महत्वाची. बांधकाम व्यवसायात बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल हाच नियम बाळगावा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/05/2023 - 06:17 नवीन
रेडी पझेशनच घ्या, कितीही नावजलेला बिल्डर असला तरी, बाडीस
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 09/04/2023 - 17:23 नवीन
खूप रहदारी असलेला फ्लॅट नको मंदिर आणि शाळा जवळ असलेला फ्लॅट नको सार्वजनिक गणपती किंवा नवरात्र उत्सव साजरा करणारे जवळपास नको सभा भरवणारे मैदान जवळपास नको पाण्याची बोंबाबोंब असलेला फ्लॅट नको शेजारी भांडकूदळ नको लहान मुलांचे हाॅस्पीटल समोर किंवा बाजूला नको आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, राजकीय पक्षाचे कार्यालय जवळपास नको ..... ध्वनी प्रदूषण, हे सगळेच जण करतात... -------
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 09/04/2023 - 18:18 नवीन
व्वाह. ह्या बाबतीत विचारच केला नव्हता. एकंदरीत मिपाकरांच्या सल्ल्याने मी आता बारीक बारीक गोष्टींचे निरीक्षण करतोय.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Mon, 09/04/2023 - 18:39 नवीन
मंगल कार्यालय, जवळ असलेला फ्लॅट नको समोर, चहाची टपरी असलेला किंवा पानाची गादी असलेला फ्लॅट नको .... ..... शक्यतो, दोन ते तीन वर्षे, भाड्याने घर बदलत रहा योग्य तो फ्लॅट नक्कीच मिळेल ------ बाकी, घर कुठेही घ्या पण, ते घर साऊंड प्रूफ करून घ्या.... निरव शांतता, ही एक परी कल्पना आहे
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 09/05/2023 - 06:15 नवीन
खिडकी साऊँडप्रूफ करणे यासाठी खर्च अवाढव्य आहे. दोन खोल्यांचा तीन लाख पर्यंत
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 09/08/2023 - 17:00 नवीन
पण, 50-60 लाख जर घरातच जाणार असतील तर, ही रक्कम 5%च आहे
  • Log in or register to post comments
क
कंजूस Mon, 09/04/2023 - 18:10 नवीन
मी फ्लॅट घेण्यासाठी एका वकिलाकडे सल्ल्यासाठी गेलो होतो. ते दोघे होते आणि जोडीने त्यांनी वकिली सुरू केली होती. माझ्याच वयाचे तिशीचे होते. योगायोगाने ते चांगले निघाले. चांगले म्हणजे सल्ला देण्यास उत्सुक. वकील लोक स्वतः काही धंदा ठरवून घेतात. कुणी फौजदारी,सिविल,मालक_भाडेकरू,सोसायट्या,जमीन फ्लॅट खरेदी करार,व्यापारी करार, कॉपीराइट, आर्थिक दावे,कंपनी-कामगार,मृत्युपत्रे,टॅक्स आणि जीएसटी खटले ,वारसाहक्क आणि वाटण्या इत्यादी. तर सांगायचे म्हणजे खटला केस घेणे वेगळं आणि वकिली सल्ला आगावू देणं वेगळं काम असतं. जमीन फ्लॅट खरेदी यासाठी कागदपत्रे पाहून सल्ला देण्याची फी ०.५% चेकने घेतात. त्यांनी सांगितले की तुझ्या बजेट प्रमाणे चार पाच फ्लॅट पाहून ये आणि मग त्यात कोणता बरा वाटेल आम्हाला तिथं येऊन त्यांची फाईल पाहून घेणे/न घेणे/त्रुटी/धोके सांगेन. त्याप्रमाणे केले. काही जमीन मालकी किंवा नवीन बिल्डर झालेले असे असल्यास त्यांनाही कळून जाते आपल्यात काय दोष आहेत. तसेच झाले. आमच्या बिल्डर भागीदारांत शेवटचे पंधरा टक्के काम बाकी असता भांडणे झाली. मी वकिलाला ही माहिती सांगितली. त्याने लगेच सल्ला दिला की त्यांच्याकडे जाऊन "मला कराराप्रमाणे पैसे मिळाले आहेत,ताबा देत आहे असे सही शिक्क्याने लिहून घ्या" मग भांडत बसा पैशाचा हिशोब करत. ती सूचना बिल्डर भागीदारांना पटली व त्यांनी तसे लिहून दिले. आम्ही सर्व मेंबर कागदोपत्री मुक्त झालो व राहिलेले काम करवून घेतले. सोसायटीही करून टाकली. एक सावधानता - ज्या इमारतींमध्ये केवळ 'सेकंड होम गुंतवणूक' करणारे अधिक असतील त्यांची सोसायटी पुढे चालवणे फार त्रासदायक होते . वसुली,मिटींगा होत नाहीत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Mon, 09/04/2023 - 18:19 नवीन
खुप बहूमूल्य सल्ला कंकाका. _/\_
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/04/2023 - 23:18 नवीन
प्लॉट हुडकण्या/घेण्यासाठी विविध प्रयत्न-खटाटोप करणे, घरासाठी अनेक नकाशे स्वतः बनवून त्यानुसार घर बांधणे, त्याची निगा, दुरुस्ती, विविध सरकारी भानगडी हे सगळे करून मग तीस वर्षांनंतर ते विकणे वगैरे सगळ्या अवस्थांमधून पार झाल्यावर आता या विषयात लक्ष घालण्याची गरज राहिलेली नसली, तरी अजून ते सगळे रोचक वाटते, आणि नवनवीन माहिती मिळत राहिली तर चांगलेच वाटते.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 09/05/2023 - 01:40 नवीन
नवनवीन माहिती म्हणजे असं की नवनवीन फसवाफसवीचे प्रकार वाढले आहेत. मोठ्या बिल्डरांकडे त्यांचे वकील असतात ते त्यांना उपयोगाचा करार बनवतात. पण प्रत्येक मेंबर एक एकटा तो करार वाचून समजून घेत नाही. एकदा का तो करार सह्या करून नोंद (registered) झाला की पुढे सोसायटी झाल्यावर सगळी कलमे डोक्यावर बसतात. सर्व मेंबर एकत्र फसलेले असतात. १)गच्ची बिल्डरने स्वतः कडे ठेवलेली असते. तिथे मोबाईलची अंटेना लावून त्यांचे उत्पन्न तो खातो. ---- जिम,लाइब्री, स्विमिंग टँक या सोयी जोपर्यंत बिल्डरकडे ताबा असतो तोपर्यंत छान एकहाती राखल्या जातात. पुढे सोसायटी झाली की सर्वच राजे. मग काय देखरेख,स्विमिंग टँकची परवानगी नियम पाळणे यात हेळसांड सुरू होते. पुस्तके गायब. जिम उपकरणे मोडतात. परदेशी राहणाऱ्या तरुण मुलांनी पालकांसाठी इथे जागा घेतली असेल तर साठ+ वयाचे असे मेंबर या सोयी वापरत नाहीत. मेंटेनन्स मात्र वाढीव भरतात. सुरक्षा रक्षक असलेल्या, मोठे आवार, मुलांसाठी बाग असणाऱ्या मोठ्या सोसायट्या चांगल्या परंतू खर्च वाढतो आणि चोऱ्याही होतात. चोरही सुधारले आहेत. वीस,चाळीस मेंबरांच्या मिटिंगा आटोक्यात पार पडतात परंतू शंभर ते तिनशे सभासदांचे हेच काम म्हणजे अगडबंब आणि राजकारण.
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Tue, 09/05/2023 - 06:25 नवीन
तुमच्या एकंदर प्रतिसादावरून तुमचा गोंधळ जास्त दिसतोय , पुढील मुद्दे लक्षात घ्या १. निर्णय पक्का असेल तर सिबिल ने फरक पडणार नाही , NBFC व सहकारी बँकेत जा अर्धा टक्का च्या फरक पडेल पण काम होईल २. गुंतवणुकीसाठी नि राहावयास घर वेगळया संकल्पना आहेत , गुंतवणुकीसाठी घर घेणार असाल तर भाडे उत्पन्न हवे का भविष्यातील किंमत वाढ यावरून पण फरक पडतो ३. लोन घेऊन गुंतवणूक करण्याआधी होम लोन विरुद्व भाडे वा होम लोन घेऊन गुंतवणूक का करू नये याचे अनेक विडिओ व लेख मिळतील, ते अभ्यासा . तुमचे घर एक खांबी तंबू आहे ( सिंगल इन्कम असे प्रतिसादातून कळते ). या स्थितीत नोकरी बदल व प्रमोशन झाल्यावर अचानक झालेल्या पगार वाढीने असे विचार मनी येतात असा माझा स्वानुभव आहे . मोह टाळा. मी स्वतः या स्थितीतून गेलो आहे म्हणून आगाऊ सल्ला .
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 09/05/2023 - 07:30 नवीन
तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पण घरात “स्वतःचं” घर असावं असा फोर्स सुरूय.
  • Log in or register to post comments
व
विअर्ड विक्स Tue, 09/05/2023 - 13:45 नवीन
माझ्या सध्याचा नोकरीचे काही खरे नाही, नोकरी बदलली कि सहा महिने तरी बँक लोन देत नाही वा कंपनीची स्थिती चांगली नाही, जागतिक मंदी अशी एक ना एक अनेक कारणे देणे शेवटी काय बालहट्ट , राजहट्ट नि ..... यापुढे कोणाचे चालत नाही
  • Log in or register to post comments
क
कंजूस Tue, 09/05/2023 - 15:50 नवीन
Rera असूनही गटांगळ्या. Radius चा चेंबूर प्रोजेक्ट गडबडला. २२मजली आठ मनोरे काम ठप्प. लोकांचे पैसे अडकले. DHFL गुंतागुंत. नशीब दुसरं काय? कोणाचे चालत नाही.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Wed, 09/06/2023 - 05:35 नवीन
घ्यावा का नाही? तुमचा निर्णय पक्का झालेला दिसतोय. तरीही माझ्या मते तुम्ही पुन्हा एकदा निर्णय तपासून पाहावा. घरचे लोक याबाबतीत अत्यंत शॉर्ट साईटेड विचार करतात असा माझा स्वानुभव आहे. डोक्यावर छत नाही वगैरे फार फालतुचा इमोशन अत्याचार असतो. बायको अर्थसाक्षर असेल तर मात्र हा फोर्स दिसत नाही. माझे आणि माझ्या मित्राचे असेच आहे. माझ्या मित्राची पत्नी बर्‍यापैकी अर्थसाक्षर आहे. त्यामुळे माझ्या बायकोसारखी ती 'माझ्या डोक्यावर छतच नाही' वगैरे बंडल इमोशनल अत्याचार करत नाही. (डोक्यावर छत असणे म्हणजे मेट्रोसिटीत फ्लॅट असणे. घर हवे म्हणून घर घेणे नव्हे, तर 'राहत्या' घराला सिक्युरिटी किंवा गुंतवणूक म्हणून पाहून घर घेणे असा खूप वरवरचा विचार असतो. राहते घर कधीही गुंतवणूक नसते हे लक्षात घ्या) तुम्ही आधी तुमच्या उत्तरार्धाचे प्लॅनिंग करा. म्हणजे तुम्ही पुण्यातच आयुष्य काढणार आहात काय? ते तुम्हाला परवडणार आहे काय? इत्यादी.. त्यानुसार 'राहते' घर कुठे घ्यायचे हे ठरवा. राहते घर आणि गुंतवणुकीचे घर हे मिसळू नये असे मला वाटते. तुम्हाला जर तुमचा फ्लॅट ही एक चांगली गुंतवणूक वाटत असेल तर एकदा सुस टेकडीवर जाऊन सभोवताली नजर टाका. माझ्या मते कोल्हापूर, नाशिक, सांगली-मिरज, सातारा, कराड, नगर, इस्लामपूर, वाई, बेळगाव अशी पश्चिम महाराष्ट्रातली सुपीक भागातील शहरे चांगली. (त्यातल्यात्यात राहणीमान स्वस्त, परंतु चांगले दवाखाने आणि आरोग्य सुविधा ) पुणे-पिं.चिंचवड आणि मेट्रो सर्वार्थाने वगळावेत अशा अवस्थेला आहेत. पुण्याच्या बाह्य भागांत तर सुविधा नगण्य पण दर अव्वाच्या सव्वा आणि प्रदूषण अव्वाच्या सव्वा असे अशी परिस्थिती आहे. घराचे कर्ज परतफेड करताना टॅक्स मध्ये काही सवलत मिळत असली तरी ऑपॉर्चुनिटी कॉस्ट ही काढावी लागते. माझ्या मते तुमच्या गावाकडे जमीन वगैरे गुंतवणूक म्हणून घ्या. पुढे मागे घर बांधता येईल किंवा विकता येईल. कारण फ्लॅट पेक्षा जमीन जास्त परतावा देते हा स्वानुभव आहे. व्यक्तिशः मी पुण्यात बाणेर जवळ घेतलेला फ्लॅट नुकसानीत विकावा लागला म्हणून घर विकत घेण्याच्या सख्त विरूद्ध आहे. स्त्रीहट्ट मला खूप महागात पडला आहे. मी हौसेने फ्लॅट घेतला खरा, पण सोसायटीने नीट कारभार हाकला नाही. शिवाय पाण्याची गंभीर समस्या उभी राहिली. चार वर्षात लोन फटाफट फेडले. त्यामुळे मला दसादशे ४ टक्के इतका इफेक्टिव्ह इंटरेस्ट पडला. तुम्हाला नीट समजावे म्हणून मी प्रत्यक्ष आकडे देतो. २०१६ => ११ लाख रोख, उर्वरीत ४२ लाखांचे लोन दसादशे सरासरी ८ टक्के दराने, एकूण किंमत = साधारणतः ५४ लाख २०१८ => ताबा २०१९ => ६ लाखांचे सामान २०२९ अर्धे ते अर्धे २०२२ = दरमहा २५०० मेंटेनन्स २०२० => कर्ज परतफेड ( आलेला बहुतांश पगार मुद्दल फेडण्यात घालवला ). एकूण रक्कम दिली = ५२ लाख. फ्लॅटवर झालेला एकुण खर्च = ११ + ५२ + ६ + १ = ७० लाख. २०२२ शेवट विक्री => ६४ लाख. बघा हा नुकसानीचा प्रकार. स्त्रीहट्ट. ५४ ला घेऊन ६४ ला विकला असं मनात येतं. पण प्रत्यक्षात आकडे तपासून पाहिले तर मी घाट्यात आहे. मी सगळा व्यवहार जिने हट्ट केला तिलाच पाहायला लावला. तेव्हा कुठे तिच्या थोडेफार डोक्यात शिरले. आता हाती आलेली रक्कम मी योग्य ठिकाणी गुंतवली आहे. तरीही हा द्राविडी प्राणायाम करताना मी अनुभवलेल्या गोष्टी सांगतो - सोसायटीबद्दल: १. अतिशय उत्तम दर्जाचे पाण्याचे मीटर प्रत्येक घराला बसवून घ्यावेत. सोलार वॉटरला सुद्धा स्वतंत्र मीटर बसवावेत. सोसायटी ताब्यात आल्यावर या गोष्टी होतात - पुण्यात पश्चिम भागात पाणी कमी पडते. टॅकर लावावे लागतात. लहान असेल तर सोसायटीला लोकल टँकर माफिया त्रास देतात. २. सोसायटी वॉचमन परवडण्याइतपत मोठी असावी. ३. सोसायटीत वॉट्सप थेरडे नसावेत. ४. त्यामुळे शक्यतो नामांकित बिल्डरांच्या मोठ्या सोसायट्या पाहाव्यात. गोदरेज वगैरे. कंस्ट्र्क्शन बद्दलः १. फ्लॅटमध्ये पश्चिम-नैऋत्य दिशेकडून इशान्येकडे वारे वाहते राहील अशी व्यवस्था असावी. म्हणजे २. डक्टमध्ये खिडकी असणारे किचन घेऊ नये. किचनची खिडकी बाहेर मोकळी ओपन व्हावी. ३. एक युरोपियन पद्धतीचे बाथरूम असावे, एका बाथरूममध्ये भारतीय पद्धतीचे संडास बसवून घ्यावे. जिथे भारतीय संडास आहे तिथे ते फक्त संडासच असावे. भारतीय संडास आणि आंघोळीची जागा एकत्र जात नाहीत. मलातरी किळस येते. अर्थात मला युरोपियन बाथरूम्सच आवडतात. कोरडे आणि सुटसुटीत. ४. ईंटेरियरवर जास्त खर्च करू नये. पीओपी वगैरे स्वतः करू नये. खरेतर इंटेरियर तीन ते चार वर्षांनी करावे. पुन्हा, युरोपियन किंवा जपानी रुचीचे इंटेरियर असावे. भडक, फॉल्स सिलींग, एलईडी वगैरे गणपती मंडप डेकोरेशन करून शोभा घालवू नये. ५. सगळीकडे वीजेचे पाँईट असावेत. कोणताही अपूर्ण फ्लॅट घेताना हे आवर्जून पाहावे. ६. गॅलरीतून हॉल मध्ये किंवा इतर कोणत्याही रूममध्ये मोकळ्या पाइप टाकून ठेवाव्यात. खूपदा इंटरेट, डिश टीव्ही वगैरे यांच्या वायर्स बाहेरून आत घेताना खिडकीतून, दरवाज्यांच्या फटीतून वगैरे घेतल्या जातात. मोठे ड्रिल पाडल्यास गळती होण्याची शक्यता असते. त्याऐवजी, एसी आणि इतर वायर्स एका रूम मधून दुसर्या रूममध्ये किंवा आतबाहेर करता यावेत म्हणून बारीक लोखंडी पाइप्स टाकून छताजवळ होल्स आधीच करून घ्यावेत. बिल्डरने ज्या कस्न्सील्ड वायर्स वापरलेल्या असतात त्या एका वर्षातच मान टाकतात. ७. उत्तम दर्जाच्या जाळ्या बसवाव्यात. दरवाज्यांनाही. विशेषतः गॅलरीच्या दरवाज्यांनासुद्धा. स्लाईडिंग जाळ्या बसवताना दर्जात अजिबात तडजोड करू नये. बिल्डरकडून बसवता आल्यातर उत्तमच! ८. बाथरूमध्ये सूर्यप्रकाश येत असेल तर उत्तमच! ९. मोठ्या उंच इमारतीत खालचा व सर्वात वरचा मजला टाळावा. १०. शक्यतो तयार रेडी पझेशन फ्लॅट घ्यावा. तो जर मनासारखा मिळाला नाहीतर सरळ रिसेल वाला फ्लॅट घ्यावा. तुम्हाला चांगले लोकेशन आणि स्वस्तःत फ्लॅट मिळेल. स्पेसचा अंदाज अपूर्ण फ्लॅटमध्ये येत नाही.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 09/06/2023 - 06:48 नवीन
खुप खुप धन्यवाद. खरंतर मीच हे महीना ४०-५० हजाराचं २० वर्षासाठीचं जोखड मानेवर लादून घेण्याच्या विरोधात आहे. पण नातेवाईक सूसाट घरं घेत सूटलेत, त्यामूळे इकडे चलबिचल होते. घर नाही म्हणजे आपली प्रगती होत नाहीये असा गैरसमज पसरतोय. तरी मी २ वर्षे चालढकल करतोय. पण हट्ट दिवसेंदिवस जोर धरतोय. बर्याच लोकांचे फ्लॅट बाबतीत असेच अनूभव आहेत. बरं फ्लॅट पहावे तर मनात भरत नाहीत. शहरांपासून प्रचंड लांब. पण मी एक पक्के केलेय की घेणार तर रीसेलच. कारण तो मध्यवर्ती भागात त्याच किमतीत पडेल जी पुण्याबाहेर नव्यासाठी पडतेय. शिवाय भाडेही जास्त आहे मध्यवर्ती भागात. मला कुणी हे गणीत सांगेल का? समजा मी ४० लाखाचं लोन केलं २० वर्षासाठी, ९ टक्के हा भरमसाठ व्याजदर धरला तरी मला ३६ हजाराचा हफ्ता पडेल. समजा भाडे सोसायटी मेंटेनन्स नी लाईटबील भाडेकरूने भरून २० हजार भाडे मिळाले तर फक्त १६ हजार भरून फ्लॅट माझा होतोय. हे परवडेबल आहे ना? (इतके भाडे मध्यवर्ती भागात आहेत)
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Wed, 09/06/2023 - 13:04 नवीन
माझ्या मते नवीन फ्लॅट घेण्यापे़क्षा चांगला रिसेल प्लॅट घेतलेला केव्हाही उत्तम. पाणी असलेली सोसायटी, पूराचा धोका नसलेली सोसायटी पाहा. शिवाय अनेक कारणे देऊन किंमत पाडून घेता येते.
मला कुणी हे गणीत सांगेल का
https://fi.money/calculators/rent-vs-buy-calculator हा कॅल्क्युलेटर पाहा ट्राय करून.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Wed, 09/06/2023 - 07:48 नवीन
स्वतःचे राहायचे घर ही रूढ अर्थाने* गुंतवणूक नाही. स्वतःच्या मालकीचे रहायचे घर असावे. भविष्यात स्वतःच्या उत्पन्नावर अनिष्ट परिणाम झाले तरी किमान स्वतःचे राहते घर तरी शिल्लक राहते. अर्थात त्या घरात आपल्या उत्पन्नाच्या ५०%हुन अधिक खर्च करू नये. --- भाड्याने द्यायचा विचार असेल तर निवासी मालमत्तेत गुंतवणूक करण्यापेक्षा व्यावसायिक मालमत्तेत गुंतवणूक केलेली चांगली. परतावा आणि किमतीतील वाढ यांत बराच फरक दिसून येईल. बाकी, मूळ धाग्यातील प्रश्नांबद्धल मिपाकरांनी आधीच उत्तरे दिली आहेत. --- *खरंतर हीही गुंतवणूक आहेच. स्वतःच्या कौशल्यविकासासाठी खर्च, अपत्यांच्या शिक्षणाचा खर्च, धंद्याच्या विपणनाच्या खर्च हीदेखील गुंतवणूक नव्हे का?
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/06/2023 - 10:33 नवीन
निर्णय आता तुम्ही प्रतिसाद वाचून बजेटप्रमाणे आवाक्यातील घर घेऊन टाका किंवा नोंदणी करा. . . पण कुणाला सांगू नका. . . कारण त्या निर्णयावर प्रतिकूल मत देणारे पुढे पाच वर्षांनी कौतूक करू लागतील. नशीब फिरते. जो भाग /घर नकोसा म्हणून स्वस्त होता आणि बजेटात होतंय म्हणून घेतले ते काही अचानक चमत्कार होऊन मालामाल झालेले आहेत. त्या भागाची मागणी वाढली. परिस्थितीला जो शरण जातो त्याचे भाग्य उजाडते हा नियम आहे.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Wed, 09/06/2023 - 15:34 नवीन
परिस्थितीला जो शरण जातो त्याचे भाग्य उजाडते हा नियम आहे.
सुटाबुटातला, विशिष्ट अविर्भाव, चर्येवर खोटे हसू आणि बळेच आणलेला आत्मविश्वास असलेला स्वतःचा फोटो कव्हरावर छापून हमखास यशस्वी कसे व्हावे याचा खात्रीलयक गुरुमंत्र देणारे जे महाभाग असतात, त्यांच्या सगळ्या फॉर्म्युलांना सुरुंग लावणारा हा नियम प्रचंड आवडल्या गेला आहे. (आपापल्या सोयीनुसार वाटल्यास 'परिस्थिती' ऐवजी कुणी 'बायको' लिहीले तरी चालेल) https://www.youtube.com/watch?v=sRnz15t-JJc वद जाऊ कुणाला शरण (संगीत सौभद्र): पदः अण्णासाहेब किर्लोस्कर गायकः आनंद भाटे.
  • Log in or register to post comments
क
कंजूस Wed, 09/06/2023 - 16:34 नवीन
अशी बरीच उदाहरणे सापडतात. लेखी म्हणजे शिकार कथा लिहिणाऱ्या केनेथ अँडरसेनचे. डाक बंगला उर्फ सरकारी गेस्ट हाऊसच्या नियमांचा बडगा( तो नियम अजूनही तसाच आहे) खाल्ल्यावर त्याने तीन घरे विकत घेतली होती. भारत सोडताना त्या घरांचे चांगले पैसे मिळाले त्याला.
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त गुरुवार, 09/07/2023 - 16:50 नवीन
मी अगदी सुरुवातीलाच घरची पार्श्वभूमी काय आहे ते विचारणार होतो, पण ते अशिष्टपणाचे दिसले असते आणि बहुतेकांना तसे विचारलेले आवडतही नाही. इथे कुणी प्रतिसादकानेही विचारले नव्हते. -- आता सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत तर सध्या नाहक या भानगडीत न पडता तुमच्या करियरच्या दृष्टीने जिथे योग्य असेल तिथे भाड्याच्या घरात रहा. वय तीसच असल्याने अजून अनेक संधी समोर येतील, त्यातून हळूहळू निवड करत चाळीशीत ठरवा नक्की कुठे स्थायिक व्हायचे ते. कॅनडा ऑस्ट्रेलिया न्यूझिलंड वगैरेसाठी पण बघा. तसे हल्ली पुष्कळजण आयटी कंपन्यांतर्फे विदेशात जातात तेही उत्तम. -- इथे उगाच लचांड - तेही कर्ज घेऊन - वाढवू नका. ती कायमची डोकेदुखी होईल. असे अनेकांचे झालेले आहे. गृहकर्जावर जितके टक्के व्याज द्यावे लागते, तेवढी दर वर्षी फ्लॅटची किंमत आता वाढत नाही. सुरुवातीची अनेक वर्षे हप्ता भरूनही मूळ मुद्दल अगदी कमी फेडले गेलेले असते. रोख पैसा देणे घेणे हे वेगळेच प्रकरण. बँकेतून काढून रोख रक्कम देणे म्हणजे मेहनतीचा पांढरा पैसा स्वतःच काळा करणे. कर्जात अडकला तर धोबी का कुत्ता व्हावे लागते. ज्यांना स्वतःला रहाण्यासाठी घेऊन त्या घरात वर्षानुवर्षे रहायचे असते, सरकारी वगैरे कायमची त्याच गावात नोकरी असते, त्यांची गोष्ट वेगळी. -- परदेशात वा भारतातच अन्य शहरात रहाणारा घरमालक असला तर भाडेती भाडे देणे बंद करून शेवटी लाखो रुपये दिल्यावरच घर सोडतात अशी अनेक उदाहरणे असतात. मनस्ताप आणि नुकसान वेगळे. या सगळ्या गोष्टी अर्धांगिनीला समजवून सांगा. परदेशी गेलेल्या तरुणांचे फोरम वरून उपयोगी माहिती मिळते. परदेशात जाऊनही भरपूर मित्र लाभतात. सगळे सणवार करता येतात, भारताएवढेच उत्तम - वा काही बाबतीत आणखी सरस जीवन जगता येते. -- इथे अन्य प्रतिसादकांनी मोलाचे सल्ले दिलेले आहेतच. एकदा शांतपणे विचार-चर्चा करून योग्य तो निर्णाय घ्यावा असे म्हणावेसे वाटते.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 09/08/2023 - 16:55 नवीन
प्रतिसाद आवडला
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sat, 09/09/2023 - 05:11 नवीन
धन्यवाद काका. नक्कीच विचारत करतो.
  • Log in or register to post comments
क
कौशी Fri, 09/08/2023 - 16:51 नवीन
कळवा ठाणे मधे आशर अराइज प्रोजेक्ट बद्द्ल कोणी सान्गु शकेल....
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Fri, 09/08/2023 - 16:57 नवीन
तितक्याच पैशांत, कोपर, (डोंबिवली) येथे घर घेता येईल
  • Log in or register to post comments
र
राणि Mon, 09/11/2023 - 08:49 नवीन
नेरुळ, नवी मुंबई मध्ये घर घेण्याबद्द्ल काही मार्गदर्शन करु शकाल का?
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Mon, 09/11/2023 - 12:38 नवीन
नेरुळ, नवी मुंबई मध्ये घर घेण्याबद्द्ल काही मार्गदर्शन करु शकाल का?
--- सदर धाग्याच्या बाबतीत जसे झाले, तसेच सगळे पुन्हा होण्यापेक्षा ज्यांना घर हवे आहे त्यांची कौटुंबिक, आर्थिक माहिती, गरज, कोणत्या प्रकारचे, किती किंमतीचे, नवीन की जुने, किती जणांसाठी, काय हेतूने घर हवे आहे वगैरे माहिती आधी इथे दिल्यास प्रतिसाद नेमके आणि उपयोगी देता येतील, अन्यथा सगळेच मुसळ केरात असे होऊ शकते.
  • Log in or register to post comments
र
राणि Mon, 09/11/2023 - 13:30 नवीन
आर्थिक माहिती - पती पत्नी नोकरदार, गरज - स्वत: राहण्यासाठी, कोणत्या प्रकारचे - १ BHK, शाळा जवळपास असणारे, किती किंमतीचे - माहिती घेतली असता किंमत ६०-६५ पासुन सुरु होते असे कळले, नवीन की जुने - जुने ( तुलनेने किंमत व Maintenance कमी असेल असे वाटते म्हणून) , किती जणांसाठी - ५
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 09/11/2023 - 17:05 नवीन
हा विषय प्रतिसादात ३-४ ठिकाणी आला म्हणुन हे लिहितोय. युरोप- सध्या युक्रेन युद्ध आणि ईतर परीस्थितीमुळे युरोपमध्ये महागाईचा भडका उडालेला आहे. भारतीयांना वार्षिक ७ टक्के माहागाई वाढीची सवय असते तशी तिकडे नाही. १०-१५ वर्षानंतर अचानक वस्तूंचे भाव वाढल्याने लोकांना चटके बसताहेत. अगदी जर्मनी/फ्रान्स सारख्या अग्रणी देशातही हीच परीस्थिती आहे. एकाच्या पगारात भागणे अंमळ कठीणच. आणि दोघे नोकरी करत असाल, तर मुलाला पाळणाघरात ठेवणेही भयानक महाग. (एक मित्र जर्मनीत आणि दुसरा इंग्लंड मधे आहे) कॅनडा- पेट्रोलचे भाव २-३ वर्षात दुप्पट झाले आहेत. टोरोंटो सारख्या ठिकाणी घरांचे भाडेही दुप्पट झाले आहे. विकत घ्यावे तर बिडिंग करुन जो जास्त बोली लावेल तो जिंकतो. २००१० साली जे ड्युप्लेक्स २.५ ते ३ लाखाला मिळत होते ते आता ७-८ पर्यंत गेले आहे. २०१० साली वार्षिक ८५,००० डॉलर्स मध्ये ४ जणांचे कुटुंब मजेत राहु शकत होते ते आता १,३०,०००/- शिवाय जमत नाही.(एक मित्र टोरोंटो मधे आहे) ऑस्ट्रेलिया- फारशी माहीती नाही. पण मिपाकर देउ शकतील. तेव्हा जर नवरा-बायको भारतातच राहुन महिना १.५ ते २ लाख कमवत असतील तर कुठेही जाउ नये. गड्या आपुला गाव बरा.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 09/12/2023 - 01:19 नवीन
ऑस्ट्रेलिया- फारशी माहीती नाही. पण मिपाकर देउ शकतील. महागाई येथेही वाढली आहे , पेट्रोल १ डॉलर ३० सेंट चाय आसपास ते २. १० / २५ पर्यंत गेले आहे घरे अशीच खुप महाग झाली आहेत आयकर तर काही कमी होत नाही आणि पगार हि फारसा वाढत नाही भांडीही वादळी आहेत २०-३०% सर्वात चटका देणारे म्हणजे विक्रमी प्रमाणात बेस इंटरेस्ट रेट ०.२५ पासून ते ४% पर्यंत गेला आहे त्यामुळे सर्व कर्जे महाग झाली आहेत मग सका रात्मक काय? तर अश्या देशातील स्थलांतर हे लांब पल्यासाठी असते - शिक्षण जवळ जवळ फुकट आणि जागतिक दर्जचे - त्यामानाने पगारातील तफावत कमी ( रिटेल स्टोर मॅनेजर काय किंवा प्लम्बर / इलेकट्रिशिअन काय ) - मुख्य आणि तातडीची वैद्यकीय सेवा फक्त उत्पन्नाचं १.८% कर द्यवा लागतो ) - अनेक सरकारी मदत ( उदा कोविद काळात प्रत्येक माणशी $ ३००० महिना सरकारने दिले ) - मेरिट वर चालते ! - खरा सर्वधर्म समभाव ( त्यात खोलात जात नाही ) अर्थात ऑस्ट्रेल्या चे इतर फायदे तोटे पण आहेत कि जे युरोप आणि उत्तर अमेरिके पेकशा वेगळे असणार तेवहा स्थलांतर हे केवळ महिना किती कमवतो आणि वाचवतो यावर अवलम्बुन नसते
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Tue, 09/12/2023 - 03:16 नवीन
जीवनमान सुधारण्यासाठी स्थलांतर हा मुद्दा बरोबर(शिक्षण्,वैद्यकीय मदत वगैरे). पण सामाजिक जीवन, मित्र, नातेवाईक यांचा बळी देउन? आणि ज्याला सामाजिक जीवनाची गरज भासत नसेल तर तो भारतातही "बेटावर" राहील्याप्रमाणे अलिप्त राहु शकतोच की(असे अनेकजण पाहण्यात आहेत)
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 09/12/2023 - 01:21 नवीन
भांडीही वादळी आहेत २०-३०% परत एकदा मुद्रराक्षसाचा विनोद केला " भाडीही वाढली आहेत" असे वाचावे
  • Log in or register to post comments
प
प्रदीप गुरुवार, 09/28/2023 - 19:50 नवीन
अतिशय उपयुक्त माहिती येथे जमा होत आहे, म्हणून वाचनखूण करून ती साठवली आहे. ह्या धग्याबद्दल अ. बांचे आभार. इथे अनेकांनी रेराच्या साईटीवरून, प्रोजेक्टबद्दल  बरीच उपयुक्त माहिती मिळते असे लिहीले आहे. भारतांत, प्रॉपर्टी घेतांना, एखादी विश्वासार्ह साईट असावी, तर ती रेराची ह्या समजूतीने, मी एक उदाहरण म्हणून येथे 'सर्च' केला. त्यांत, 'असा काही रेकॉर्ड अस्तित्वांत नाही' असे आले. म्हणजे असे: Image removed. मग, गूगल मॅपवरून, शहराच्या त्या भागांत सर्च केल्यावर काहीतरी अजबच दिसू लागले. Image removed. इथे मी शोधतोय ती साईट मुंबई गोरेगांव पश्चिम येथे आहे. पण एका साईटीवर माऊसने हॉव्हर केले असता, औरंगाबादमधल्या कुठल्यातरी साईटीची माहिती येत आहे, ह्यांत माझे काही चुकते आहे, का प्रॉब्लेम अन्यत्र आहे?
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Fri, 09/29/2023 - 03:40 नवीन
Sunteck City असं स्पेस सहित सर्च करा. दोन रिझल्ट्स येतील. Sunteck City Avenue 1 Sunteck City Avenue 2 यातील पहिला तुम्हाला हवा असलेला आहे. किंवा फक्त रेरा क्रमांक P51800001281 सर्च करा. Sunteck City Avenue 1 हा एकच रिझल्ट येईल. प्रोजेक्ट नाव, प्रमोटर नाव आणि रेरा क्रमांक सगळं टाकायची आवश्यकता नाही. कोणतीही एक माहिती टाकल्यास रिझल्ट येतो. खूप रिझल्ट्स आल्यास दोन किंवा तीन माहिती दिल्यास जास्त अचूक रिझल्ट येतात. गुगल मॅप मध्ये Sunteck City एवढंच सर्च केलं तर डायरेक्ट गोरेगाव येथे नेलं. दोन तीन ठिकाणे दिसली आजूबाजूला. हे त्यातील Avenue 1
  • Log in or register to post comments
प
प्रदीप Fri, 09/29/2023 - 04:02 नवीन
तुषार, ही प्रोसेस इथे सविस्तर टाकल्याबद्दल.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    18 hours 36 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    18 hours 48 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    18 hours ago
  • सुंदर !!
    18 hours 52 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    18 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा