Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
काथ्याकूट

अतिवृष्टी आणि दुर्घटना २०२३

क
कंजूस
गुरुवार, 07/20/2023 - 07:42
🗣 9 प्रतिसाद

अतिवृष्टी आणि दुर्घटना २०२३
(महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील पावसाच्या दुर्घटनांसाठी चर्चा धागा.)
हल्ली काही वर्षांत पावसाळा सात जूनला सुरू होत नाही आणि मग एक जुलैच्या आसपास मान्सूनचे ढग गोळा होतात. पाऊस एक तर वेळेवर येत नाही आणि मग चिडून आल्यासारखा कोसळतो.
मागच्या आठवड्यापासून हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथे प्रचंड पाऊस अगदी थोड्या तासांत कोसळून पूर आले. तेवढे पाणी जलद नदीमधून वाहून जात नाही आणि शहरांतील सखल भागांत घुसते. तेच झाले आणि दिल्ली यमुनेच्या पाण्यात बुडून आहे. पाणीच पाणी चहूकडे आणि पिण्यासाठी पाणी नाही अशी अवस्था झाली. कारण पाणी शुद्धीकरण संयंत्रे बुडाली आहेत.
महाराष्ट्रात
लोणावळ्याच्या डोंगरात पाऊस झाला की नागोठाणेची अंबा नदी वाहाते. महाबळेश्वर डोंगररांगेत पाऊस झाला की
महाडची सावित्री, खेडची जगबुडी,चिपळूणची वासिष्टी तिकडची शहरे बुडवतात. कोयनेचं बरंच पाणी धरणात साठवलं जातं आणि मोठा धोका टळतो.

इर्शाळवाडीवर दरड कोसळली.

काल (१९-२० जुलैची रात्र साडे अकराची वेळ )मध्यरात्रीच्या सुमारास पनवेल खोपोली रस्त्यावर चौक स्टेशन/मोरबे धरणाजवळ असलेल्या इर्शाळगड नावाच्या डोंगरपायथ्याजवळ असलेल्या इर्शाळवाडीच्या घरांवर बाजुचा मोठा डोंगर कोसळला आणि बरीच घरे (५०+) माती खाली गाडली गेली आहेत. दबलेल्या लोकांस काढायचे काम करण्यासाठी बरीच पथके आली आहेत. मंत्रीही हजर आहेत. जीवितहानी कमी होवो ही अपेक्षा आहे.


  • Log in or register to post comments
  • 3120 views


वाचनखूण लावा
| 3120 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

🗣 चर्चा (9)
ग
गवि गुरुवार, 07/20/2023 - 08:07 नवीन
सकाळपासून इर्शाळवाडी कव्हरेज बघत आहे टिव्हीवर. जे नातेवाईक गावाकडे परतून पायथ्याशी वाट बघत आहेत त्यांची मानसिक अवस्था भयंकर आहे. त्रासदायक. पोलिस / मदत यंत्रणा वर जाऊ देत नाहीत (जे योग्य आहे) आणि वरची परिस्थिती प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता येत नाहीये. उलट सुलट बातम्या नुसत्या येताहेत. असहाय्य अनिश्चित परिस्थिती. गाडले गेलेले अनेक लोक अजून ढिगाऱ्याखालीच आहेत. ढिगारे उकरण्यासाठी अत्यंत मर्यादित उपकरणे आहेत. हातांनी ढिगारे उकरले जात आहेत. एक स्त्री रडत होती की तिची तीन लहान मुले आणि पूर्ण कुटुंब वर आहे. काही खबरबात कळत नाहीये. आम्हाला वर तरी जाऊ द्या.
  • Log in or register to post comments
व
विवेकपटाईत गुरुवार, 07/20/2023 - 08:34 नवीन
दिल्लीचा फक्त एक थोडासा भाग जो लाल किल्ल्याचा मागे आहे आणि डूब क्षेत्रात असलेल्या अवैध कालोनी. बाकी गेल्या दहा वर्षात बहुतेक वजीराबाद आणि आयटीओ मधल्या भागात यमुनाची खुदाई ( वाळू उपसा) झालेली नाही त्याचा परिणाम. बाकी कुठेही पाणी साचलेले नाही.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा गुरुवार, 07/20/2023 - 08:43 नवीन
खुप दुर्दैवी आहे ही घटना. दुर्घटना स्थळी क्रेन जेसीबी जाऊ शकत नाहीत, मदतकार्यात प्रचंड मर्यादा येत आहेत. मा. मुम & उपमुम स्वतः जातीने लक्ष घालत आहेत ही दिलासा देणारी बाब आहे. ज्यांचे नातेवाईक दगावले आहेत त्यांना अर्थिक मानसिक मदत पोहोचणेअ त्यंत गरजेचे आहे आहे.
  • Log in or register to post comments
आ
आलो आलो गुरुवार, 07/20/2023 - 10:43 नवीन
इर्शाळवाडीच्या घरांवर बाजुचा मोठा डोंगर कोसळला आणि बरीच घरे (५०+) माती खाली गाडली गेली आहेत. ईश्वर सर्वांना शक्ती देवो . मृतात्म्यांस भावपूर्ण श्रद्धांजली !
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे गुरुवार, 07/20/2023 - 12:38 नवीन
ईर्शाळला जाताना मोरबे धरणाच्या बाजुने वसलेली ही वाडी वाटेत लागतेच. पण ही काही डोंगर फोडुन झालेली वस्ती नव्हे, पूर्वापार राहणारे आणि नाचणीची शेती (आणि काही प्रमाणात हातभट्टी) करुन राहणारे आदिवासी आहेत. हा डोंगर ईतका ठिसुळ वाटत नाही. दरड कोसळायला काय कारण असावे? लोकांना लवकर मदत मिळो हीच प्रार्थना. दुसरा मुद्दा-- केजरीवाल म्हणतो हरियाणा सरकारने हथनीकुंड बॅरेज मधुन अचानक पाणी सोडले त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. हा निवडणुकीवर डोळा ठेवुन केलेला डाव आहे. वस्तुतः बॅरेजच्या दोन्ही कालव्यांची मिळुन २५ हजार क्युसेक पाणी वाहुन नेण्याची क्षमता आहे, आणि सध्या विसर्ग १ लाख क्युसेक एव्हढा चालु आहे. त्यामुळे पूर येणारच होता. दुसरीकडे नदीपात्रात अतिक्रमण करुन गेल्या दहा वर्षात जे बंगले(त्यात मंत्र्यांचे बंगलेही आले) उभे राहीलेत त्याबद्दल कोणी बोलत नाहीये. सॅटेलाईट इमेजवरुन ते स्पष्ट दिसते आहे. मुंबईतही काही वेगळी स्थिती नाही, केवळ सगळे पाणी वाहुन न्यायला समुद्र आणि खाड्या आहेत म्हणुन चालले आहे. तरीही पाउस आणि भरती एकदम आली की काय होते सर्वांना माहीत आहे. दिल्लीच्या एका मित्राशी बोलत होतो. केजरीवाल सरकारने निवडणुकीच्या मतांवर डोळा ठेवुन बेकायदेशीर रोहिंग्या आणि बांगलादेशी लोकांचे जे फालतू लाड चालवले आहेत, त्याने एक एक परीसर गलिच्छ होतो आहे, जिकडे तिकडे फूटपाथवर टपर्‍या टाकुन उद्योग धंदे सुखैनैव सुरु झाले आहेत. काही काही परीसर तर पाय ठेवण्याच्या लायकीचे राहीले नाहीत. हे लोक मतांपायी देश विकायला निघालेत, आणि लोक त्याची फळे भोगताहेत.
  • Log in or register to post comments
क
कंजूस गुरुवार, 07/20/2023 - 14:16 नवीन
"वस्ती इथे का झाली आणि वाढली."
  • Log in or register to post comments
स
सौंदाळा Fri, 07/21/2023 - 06:56 नवीन
हल्ली कुठल्याही शहरात दोन तीन दिवसाच्या मुसळधार पावसाने पूर येण्याची हीच कारणे आहेत. अतिक्रमण, नद्या, नाल्यांमधले भराव, आणि मुख्य म्हणजे मोकळ्या जमिनीचा अभाव ज्यामुळे पाणी जमिनीत मुरायला जमीनच शिल्लक नाही.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 07/20/2023 - 14:27 नवीन
पूर्वापार मानवाने मर्यादित अंतर ठेवून नदीकाठावर वस्त्या बनवल्या. लोकसंख्येत वाढ झाली मानवाने मर्यादा सोडली. स्वताच नदीपात्रात अतिक्रमण केले व बोबंड्या मारतोय. माध्यमांना बरोबर माहीत आहे. याच कालावधीतल्या मागील वर्षातील बातम्यात हेच सर्व विषय दिसतील. या वर्षांत मुंबई तुबंई असे काही ऐकले नाही. नेमीची येतो मग पावसाळा
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी गुरुवार, 07/20/2023 - 14:47 नवीन
दुःखदायक आहे.मृतात्म्यास शांती लाभो. दुर्घटना स्थळाची छायाचित्रे बघताना, भुसभुशीत मातीचा लोढां अतिवृष्टीमुळे आपली जागा सोडून खाली घसरला. . मातीला पकडून ठेवणारी झाडे,झुडपे अजीबात दिसत नाहीत. वर्षानुवर्ष डोगंराची झिज व पर्यावरणाचा नाश हेच कारण असावे. सह्याद्रीचे मातीच्या ढिगार्यात रुपांतर होत आहे काय? दुर्घटना रात्री झाल्यामुळेच जीवित हानी जास्त झाली. हिमालय तसाच भुसभुशीत आहे. तिथे भुस्खलन फार लवकर व सतत होते. पण मानवी वस्ती त्याच्या चपाट्यात कमी वेळा येताना दिसते.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 41 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 47 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा