Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • जागतिक महिला दिन विशेष कविता: 'अक्षरांचे पंख'
  • खेळ मांडला...
  • भाग ३ - !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ७: नितांत सुंदर ध्वज मंदिर ट्रेक
  • गालावरी लाली नभाची.
  • वेताळ कथा - कोबी सिंह आणि विश्वगुरू प्रदेश
  • राजस्थानची रोजनिशी : ६ : हल्दी घाटी, नाथद्वारा
  • इजराईल इराण युद्ध : स्वतंत्र धागा
  • पाताळयंत्री चर्चा
  • राजस्थानची रोजनिशी : ५ : चित्तोडगड, उदयपूर सिटी पॅलेस
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

हा उन्हाचा गाव आहे.

D — Deepak Pawar, Sun, 01/22/2023 - 08:08

हा उन्हाचा गाव आहे, रापलेली माणसे

का अशी ही श्रावणाने शापलेली माणसे?

पाहतो तो हर घडीला चेहरा वाटे नवा

चेहऱ्याला रंग फसवे फासलेली माणसे.

शेत कसवी तोच येथे, का उपाशी राहतो?

का इथे ही भाकरीने ग्रासलेली माणसे?

जात धर्माच्या इथेही पेटता या दंगली

पाहिली मी माणसाने छाटलेली माणसे.

लाच घेऊनी अता विकती इमान आपुले

जी कधी मज सभ्य तेव्हा वाटलेली माणसे.

हो भले अथवा बुरे, ना काळजी येथे कुणा

का मनाने येथली ही गोठलेली माणसे?


  • Log in or register to post comments
  • 4641 views


वाचनखूण लावा
| 4641 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
स
सागरसाथी Sun, 01/22/2023 - 09:52 नवीन
सुरेख
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Sun, 01/22/2023 - 11:27 नवीन
अतिशय समर्थपणे मांडलेली वस्तुस्थिती. अनेक आभार.
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Sun, 01/22/2023 - 14:45 नवीन
सागरसाथी सर, चित्रगुप्त सर आपले मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कानडाऊ योगेशु Sun, 01/22/2023 - 15:20 नवीन
गझल आवडली.
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Mon, 01/23/2023 - 06:43 नवीन
कानडाऊ योगेशु सर मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Mon, 01/23/2023 - 08:18 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Mon, 01/23/2023 - 10:52 नवीन
कर्नलतपस्वी सर मनःपूर्वक धन्यवाद
  • Log in or register to post comments
र
राजेंद्र मेहेंदळे Mon, 01/23/2023 - 11:16 नवीन
खुप दिवसांनी छंदाला धरुन लिहिलेली कविता वाचायला मिळाली. फक्त एक सुचवु का? "लाच घेऊनी अता विकती इमान आपुले" ही ओळ "लाच घेऊनी अता विकती इमाने आपुली" अशी पाहीजे, म्हणजे नीट जुळेल.
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Mon, 01/23/2023 - 15:49 नवीन
राजेंद्र मेहेंदळे सर आपले मनःपूर्वक आभार. मिपावर बहुतेक एडिट चा पर्याय नाही किंवा मला तरी माहीत नाही, परंतु आपण सांगितल्या प्रमाणे इतर ठिकाणी पोस्ट करताना बदल करतो. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
भ
भागो Tue, 01/24/2023 - 04:09 नवीन
छान. आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Tue, 01/24/2023 - 06:39 नवीन
वाह! ब-याच दिवसांनंतर इथे आले आणि छान कविता वाचायला मिळाली.
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Tue, 01/24/2023 - 09:52 नवीन
भागो सर, प्राची मॅडम आपले मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
र
राघव Tue, 01/24/2023 - 21:07 नवीन
मस्त जमलीये.. रचना खूप भावली! "उन्हाचा गाव" ही कल्पनाच खास!
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Tue, 01/24/2023 - 22:35 नवीन
रापली ही माणसे, हा उन्हाचा गाव आहे! आणि मेघांनी नभाचा सोडला की ठाव आहे! धावती ही माणसे, सावलीच्या वेगे मिषे, पालवीचा तरुंवर येथल्या अभाव आहे. नद्याही आटल्या अन आटली सरोवरे, आवंढाही घशातच, सुकविण्याचा डाव आहे! उष्माघात म्हणूनि नेले मला इस्पितळी, अन सलाईनचा बाटलीतल्या थांबलेला स्त्राव आहे.
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Wed, 01/25/2023 - 07:40 नवीन
भारी गझलेला तेव्हढाच सुंदर प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/29/2023 - 15:17 नवीन
मस्तय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Wed, 01/25/2023 - 07:44 नवीन
राघव सर मनःपूर्वक धन्यवाद. हणमंत सर सुंदर कविता. धन्यवाद.
  • Log in or register to post comments
स
स्मिताके Wed, 01/25/2023 - 15:38 नवीन
सुरेख. आवडली.
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Wed, 01/25/2023 - 18:42 नवीन
स्मिताके मॅडम आपले मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sun, 01/29/2023 - 15:17 नवीन
आवडली गझल.लिहिते राहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
D
Deepak Pawar Sun, 01/29/2023 - 17:10 नवीन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे सर मनःपूर्वक धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    15 hours 27 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    15 hours 39 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    15 hours 41 minutes ago
  • सुंदर !!
    15 hours 43 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    15 hours 47 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: सरगर
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:42
  • सदस्य: yummmtummm
    नोंदणी: Mon, 04/14/2025 - 17:21
  • सदस्य: SavitaGovilkar
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 15:44
  • सदस्य: रमेश माने
    नोंदणी: Mon, 01/06/2025 - 14:24
  • सदस्य: भूषण सहदेव तांबे
    नोंदणी: Mon, 10/28/2024 - 09:07
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा