Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • !!!नोकरीतून शिकलेली दुनियादारी !!!
  • वेड्या आईची वेडी माया
  • अभंग
  • भारत-म्यानमार फाळणी
  • पकडले हाथ रंगे
  • जरा आगळे आज वाटते.
  • भारतीयांची वैचारिक बैठक- भोगातून त्यागाकडे .....
  • श्री रामदास स्वामी स्थापित पिंपळे गुरव ते ११ मारुती दर्शन सोलो सायकल राईड
  • डिझाईन इकॉनॉमीची आह्वाने
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

पडघम

अ — अनन्त्_यात्री, Tue, 11/22/2022 - 17:06

अनाम तार्‍याच्या गर्भीचे
ऊर्जा वादळ लवथवणारे
उधळून देते विस्फोटातून
विकीरणांचे पिसाट वारे

दुबळी दुर्बिण अधांतरातून
अनंतात डोकावून बघते
सर्वव्यापी, निर्लेप, अनादि
स्थळकाळाचे चित्र रेखिते

आतशबाजी अवकाशातील
निरभ्रातुनी मला खुणविते
भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी
अबोध नाते अधोरेखिते

अज्ञाताचा अदम्य रेटा
परतविण्याचे प्रयत्न माझे
थिटेच ठरती, रोमरोमी मग
कुतूहलाचा पडघम वाजे


  • Log in or register to post comments
  • 1522 views


वाचनखूण लावा
| 1522 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
च
चौथा कोनाडा Sat, 11/26/2022 - 15:57 नवीन
दुबळी दुर्बिण अधांतरातून अनंतात डोकावून बघते सर्वव्यापी, निर्लेप, अनादि स्थळकाळाचे चित्र रेखिते व्वा, क्या बात है... सुंदर आतशबाजी अवकाशातील निरभ्रातुनी मला खुणविते भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी अबोध नाते अधोरेखिते एक नंबर! बहोत खूब! ही भव्य दिव्य कविता आवडली,
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 11/26/2022 - 16:17 नवीन
कधी कधी वाटतंच अनंताच्या आपण एक ठिपका आहोत.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sun, 11/27/2022 - 11:41 नवीन
वाह! भव्यत्वाचे क्षुद्रत्वाशी अबोध नाते अधोरेखिते... क्या बात!
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 12/03/2022 - 03:59 नवीन
भव्यदिव्य नादमय कविता आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    16 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    16 hours 14 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    16 hours 16 minutes ago
  • सुंदर !!
    16 hours 18 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    16 hours 22 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: अण्णा माटे
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 10:55
  • सदस्य: उत्तम सर
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:34
  • सदस्य: विंचु Scorpio
    नोंदणी: Sun, 05/21/2023 - 06:11
  • सदस्य: गौरी खरे
    नोंदणी: Sat, 05/20/2023 - 14:08
  • सदस्य: Anil fadnavis
    नोंदणी: Wed, 05/17/2023 - 17:52
  • «
  • ‹
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • 10
  • 11
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा