Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद

लोकप्रिय लेख

  • शेवटचा तुकडा..
  • राजस्थानची रोजनिशी : ७ : शेवट
  • गॅस साठी दाही दिशा ....
  • "द जिद्द ऑफ राण" आणि परिणाम
  • दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १: प्रस्तावना
  • शत प्रतिशत अर्थात् सेंट परसेंट..
  • सैरभैर डायरी - ३
  • कुमाऊँमधील रम्य भटकंती भाग ८ (अंतिम): दक्षिणेकडील प्रवासाची सुरूवात...
  • सावित्रीमाई फुले यांच्या शिक्षिका -सिंथिया फरार (ऐसी अक्षरे -४१)
  • मिसळपाववर लेखात कविता कशी द्यावी...
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
जे न देखे रवी...

वेडा वेडा पाऊस..

प — प्राची अश्विनी, Sat, 09/24/2022 - 04:37

वेडा वेडा पाऊस..

वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा पाऊस?
काळ वेळ नाही, नुसती पडायची हौस..

छत्री विसरून निघाले तुझ्याकडे यायला,
होतं असं चुकून, कळावं ना पावसाला?
वेडाच तो, आला धावत, धो धो बरसला.
म्हणून भिजले,
नको ना रे भलता अर्थ लावूस!

भिजून बिजून आलं असं तर चहा कुणी करतोच ना?
बिनसाखर असला तरी गोड आपण म्हणतोच ना?
घोट घोट पिता पिता गप्पा छाटत बसतोच ना?
म्हणून थांबले,
नको की रे भलता अर्थ लावूस!

बरं, पडायचं तर गुपचूप पडावं नं पावसानं?
कशाला त्या विजा बिजा आणि वर गडगडणं?
घाबरेल कुणीही, असलं वेडं याचं वागणं!
म्हणून बिलगले,
नको हो भलता अर्थ लावूस!

तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस..
वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा.... अरे पाऊस!.


  • Log in or register to post comments
  • 5814 views


वाचनखूण लावा
| 5814 वाचन |
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

💬 प्रतिसाद
प
प्रचेतस Sat, 09/24/2022 - 05:24 नवीन
अहाहा, अतीव सुंदर शब्दयोजना.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/24/2022 - 05:37 नवीन
बाकी, तुमच्याकडे पण यायचा का पाऊस असा भिजत भिजत ? -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस Sat, 09/24/2022 - 06:26 नवीन
हो हो, अगदी असेच
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 09/26/2022 - 07:19 नवीन
:))))
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 09/24/2022 - 05:27 नवीन
तूही वेडा, मला म्हणतोस, नको आता जाऊस.. वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा.... अरे पाऊस!. क्लास...! मजा आगया. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ज
ज्ञानोबाचे पैजार Sat, 09/24/2022 - 06:06 नवीन
झकास... आवडली, लैच आवडली पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 09/26/2022 - 07:19 नवीन
अजून विडंबन कसं नाही आलं??
  • Log in or register to post comments
क
कर्नलतपस्वी Sat, 09/24/2022 - 07:14 नवीन
"एक तरी ओवी अनुभवावी". असाच काहीसा अनुभव पावसात भिजण्याचा आणी अचानक कुणी तरी भेटण्याचा. चिंब चिबं निथळत जाताना अचानक कुणीतरी दिसावे दामिनी कडाडताना ओळखीचे सुर कानी पडावे अन्यथा दातावर दात वाजवीत कुडकुडत घरी यावे पडश्याने बेजार होताना मनातले मांडे मनातच खावे मस्तच कवीता आहे.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 09/26/2022 - 07:18 नवीन
खरंय. असा एकतरी पाऊस अनुभवावा.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Mon, 09/26/2022 - 07:20 नवीन
धन्यवाद सर्वांना. तुमच्या प्रोत्साहनामुळे लिहावसं वाटतं. _/\_
  • Log in or register to post comments
प
प्रसाद गोडबोले Mon, 09/26/2022 - 07:50 नवीन
मस्त ! सुंदर ! मुक्तछंद / मुक्तक वगैरे प्रकार फारसे आवडत नाहीत पण वरील कवितेतील रोमॅन्टीक टच एकदम आवडुन गेला! लिहित रहा.
  • Log in or register to post comments
च
चांदणे संदीप Mon, 09/26/2022 - 07:54 नवीन
आवडलीच. सं - दी - प
  • Log in or register to post comments
व
विंजिनेर गुरुवार, 09/29/2022 - 22:34 नवीन
तुमच्या सगळ्या कविता छान असतात. ही खूप आवडली म्हणून आवर्जून लॉगीन होऊन प्रतिसाद द्यावासा वाटला.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 10/01/2022 - 02:45 नवीन
:)_/\_
  • Log in or register to post comments
श
श्रीगणेशा Fri, 09/30/2022 - 12:55 नवीन
वेडा म्हणजे वेडा म्हणजे किती वेडा.... अरे पाऊस!
मनात पाऊस असला की शब्दातही छान उतरतो!
  • Log in or register to post comments
श
श्वेता२४ Fri, 09/30/2022 - 13:45 नवीन
अनुभव देणारी कविता.... अतीशय आवडली.
  • Log in or register to post comments
प
प्राची अश्विनी Sat, 10/01/2022 - 02:45 नवीन
मा.ऑ, चांदणे संदीप, विंजिनेर, श्रीगणेशा, श्वैता ... खूप खूप धन्यवाद!
  • Log in or register to post comments

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    14 hours 28 minutes ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    14 hours 40 minutes ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    14 hours 42 minutes ago
  • सुंदर !!
    14 hours 44 minutes ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    14 hours 48 minutes ago

नवीन सदस्य

  • सदस्य: chetanasvaidya
    नोंदणी: Wed, 12/24/2025 - 07:26
  • सदस्य: अनुचंदन
    नोंदणी: Tue, 11/18/2025 - 05:13
  • सदस्य: सुनील खोडके
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:52
  • सदस्य: सीमा कुलकर्णी
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:49
  • सदस्य: प्रा. रुपेश पोटभरे
    नोंदणी: Sun, 10/19/2025 - 20:45
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • 7
  • 8
  • 9
  • ›
  • »
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा