नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का?
काही प्रश्न
१. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे?
२. त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यामागे भाजपाची कोणती चाल / अपरिहार्यता असावी? देशातील मुस्लिम समाजाची होणारी प्रतिक्रिया किंवा इतर देशांची प्रतिक्रिया यांचा कितपत संबध असावा?
३. भारत सरकारने आखाती देशापुढे गुढगे का टेकले? तेथील भारतीय हिंदुच्या नोकर्या, येणारे तेल ह्याचा काय संबध आहे का? ते आखाती देश चीनबद्दल ब्र काढत नाहीत, मग भारत सरकार का असे वागत आहे?
४. हि तात्पुरती माघार आहे की मोदी सरकारने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले आहे?
५. हिंदुत्व / हिंदुवादी लोकांची काय भुमिका असेल? ते भाजपाला एक अपरिहार्यता म्हणुन मतदान करणे चालु ठेवतील की पर्यांयाचा विचार करतील?
६. इतर पक्ष कॉंग्रेस, आप इ. कसे ह्याचा लाभ उठवतील?
रच्याक, नुपूर शर्मांच्या वक्तव्याची विडिओ लिंक कुणाला सापडली का?कालपर्यंत ह्या धाग्यावरचीच लिंक एक्टीव होती. तुम्हा पाहीली नाही का क्लिप? युट्युब ला सर्च करून खोदकाम करा. सापडेल.बाकी गोरक्षकांकडून झालेल्या हत्या वगैरेवर शांत असलेले इस्लामिक देश एका वृत्तवाहिनीवरील टुकार चर्चेतील दोन चार वाक्यांनी अचानक जागे झालेत आणि एकमुखाने निषेध वगैरे व्यक्त करु लागलेत हे अनाकलनीय आहे. दाल मे कुछ काला है !!त्या चर्चेत नूपुर शर्मा जे बोलल्या त्याचा कांगावा राहुलसहीत अनेक निधर्माधांनी अगदी आंतरराष्ट्रीय मंचावर सुद्धा केल्याने ते इस्लामिक देशांपर्यंत पोहोचलं. अन्यथा भारतातील एका वाहिनीवरील चर्चेतील दोनचार वाक्यांकडे भारतात सुद्धा कोणी लक्ष देत नाही.मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “It takes a great deal of courage to stand up to your enemies, but even more to stand up to your friends.” – J. K. Rowlingमदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- जेव्हा सूर्य काजव्यांची मन धरणी करू लागतो तेव्हा सौरमंडल सुद्धा त्याच्या बाजूने उभे असत नाही. :- विनायक दामोदर सावरकर