Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का?

T
Trump
Mon, 06/06/2022 - 09:54
🗣 155 प्रतिसाद
काही प्रश्न १. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे? २. त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यामागे भाजपाची कोणती चाल / अपरिहार्यता असावी? देशातील मुस्लिम समाजाची होणारी प्रतिक्रिया किंवा इतर देशांची प्रतिक्रिया यांचा कितपत संबध असावा? ३. भारत सरकारने आखाती देशापुढे गुढगे का टेकले? तेथील भारतीय हिंदुच्या नोकर्‍या, येणारे तेल ह्याचा काय संबध आहे का? ते आखाती देश चीनबद्दल ब्र काढत नाहीत, मग भारत सरकार का असे वागत आहे? ४. हि तात्पुरती माघार आहे की मोदी सरकारने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले आहे? ५. हिंदुत्व / हिंदुवादी लोकांची काय भुमिका असेल? ते भाजपाला एक अपरिहार्यता म्हणुन मतदान करणे चालु ठेवतील की पर्यांयाचा विचार करतील? ६. इतर पक्ष कॉंग्रेस, आप इ. कसे ह्याचा लाभ उठवतील?

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • 37450 views

🗣 चर्चा (155)
S
sunil kachure Tue, 06/07/2022 - 11:37 नवीन
हिंसा करणे हे दोघांचे ध्येय.. योजना आखणे दोघे ही करतात. पण योजना आखली जाते तेव्हा अनेक घटक सहभागी असतात एक सू नियंत्रित यंत्रणा असते मुंबई पोलीस नी ह्या गुंडांना असेच संपवले थोडी मोकळीक दिली तर पोलिस देशाला गुंड मुक्त करतील. इतके गुंड कच्चे आहेत. पण अतिरेकी हे फौजेला भारी पडतात. ह्याचा अर्थ सरळ आहे ..योग्य ,शास्त्रीय प्रशिक्षण,शिस्त,आणि नियोजन. Support system, ह्या सर्व सुविधा असतात आणि हे फक्त लष्करात च शक्य आहे. काश्मीर मध्ये पाकिस्तानी सेना च हिंसाचार करत आहे. ह्या वर मी तरी ठाम आहे किरकोळ गुंड,अतिरेकी लोकांना ते शक्य नाहीं.
S
sunil kachure Mon, 06/06/2022 - 19:10 नवीन
बेजबाबदार सत्ता धारी bjp पक्षा मुळे भारत एकाकी पडेल. जे देश आज पर्यंत भारताला पाठिंबा देत होते ते बेजबाबदार वागण्या मुळे भारताच्या विरुद्ध गेले. अमेरिका,चीन,पाश्चिमात्य राष्ट्र भारताचे कधीच समर्थन करणार नाहीत. एक नंबर चे स्वार्थी देश आहेत ते. सत्ता धारी आहात विचारपूर्वक वागले पाहिजे. मध्ये जपान नी पण भारत सरकार वर टीका केली होती. बुलेट ट्रेन साठी पैसे त्यांचे आणि त्यांच्याच अधिकाऱ्यानं इन्कम टॅक्स. ह्या भारताच्या धोरण वर. अधिकारी काय करत आहेत सरकार चे नियंत्रण हवे.
S
sunil kachure Mon, 06/06/2022 - 19:45 नवीन
कोणत्या टीवी चॅनेल वरील debate मध्ये मुक्ताफळं उधळली होती. त्या टीव्ही चॅनल च नाव गुप्त का ठेवण्यात आले आहे. बातम्या मध्ये पण त्या न्यूज चॅनल च नाव घेतले जात नाही. सरकार प्रस्तुत रिपब्लिक तर नाही ना?
क
कॉमी Mon, 06/06/2022 - 19:46 नवीन
टाइम्स नाऊ, नाविका कुमार.
S
sunil kachure Mon, 06/06/2022 - 21:17 नवीन
Bjp शी जवळीक असलेली पत्रकार आहे. सम्राट पृथ्वीराज ह्या सिनेमा च्या प्रीमिअम लं ही हजर होती .आणि भारताचे सूचना प्रसारण मंत्री पण हजर होते. ही bjp चीच आहे. सरकार नी टाइम्स now ह्या चॅनेल वर कारवाई करून त्याला टाळा लावला असता तर . भारताला आखाती देशांची माफी मागावी लागली नसती. आणि आपल्या प्रवक्त्या वर कारवाई करण्याची पण गरज पडली नसती
स
सुखीमाणूस Tue, 06/07/2022 - 01:25 नवीन
तेव्हा नाही झाला बहिष्कार घालण्याचा प्रकार. पण मुस्लिम देशात उमटलेल्या प्रतिक्रिया https://en.wikipedia.org/wiki/Demolition_of_the_Babri_Masjid#International_reactions तेव्हा केन्द्रा मध्ये कौन्ग्रेस् सरकार होते. त्यामुळे सरकारला अर्थात डाव्यान्ची सहानुभुती असल्यामुळे आन्तरराष्ट्रिय प्रतिक्रिया ही भारत सरकारला त्यासाठी जबाबदार धरणारी नव्हती. शिवाय तेव्हा social media नव्हते त्यामुळे घटनाक्रम आणि प्रतिक्रिया यान्चा वेग थोडा कमी होता. भारतात भाजपा सोडुन सगळे पक्श यासाठीच मुस्लीम धर्म आणि लोकान्शी पन्गा घेत नाहीत (आठवा सम्भाजी महाराजान्वरची दूरदर्शन मालिका किती दाखवली गेली आणि कधी बन्द झाली.) शिवसेनेने देखिल काळाची पावले ओळखुन secular होण्याकडे वाटचाल सुरु केली आहे, ती मराठी हिन्दु मत यापुढे पुरेशी पडणार नाहीत म्हणुनच. भाजपा मधुन काढलेल्या या दोघाना सध्याची शिवसेना शिवबन्धन बान्धण्याचे आमन्त्रण देइल काय? माझ्यासारख्याना असे प्रकार झाले की हिन्दु धर्मिय हतबल आहेत ही बाब परत अधोरे़खित होते आणि लोकसन्ख्या नियन्त्रण आणि समान नागरी कायदा लवकर् यावा असे वाटते. हिन्दु धर्मिय बाजु बरोबर असली तरी सेक्युलर कधीच त्यासाठी आवाज उठवणार नाहीत यावर शिक्कामोर्तब होते.
S
sunil kachure Tue, 06/07/2022 - 05:04 नवीन
आता जे काही घडले आणि भारत सरकार आणि मुस्लिम देश ह्या घटनेवर ज्या प्रकारे react झाले त्या वरून हिंदू हतबल झाले असा निष्कर्ष काढता येत नाही. पाहिले तर भारतीय न्यूज चॅनल ल सरकार नी काही सूचना करणे गरजेचे आहे. न्यूज चॅनेल जास्त करून हिंदी चॅनेल ह्यांना पत्रकारिता म्हणजे काय हेच माहित नसावे. रशिया,युक्रेन युद्धात पण चुकीच्या बातम्या दाखवण्या मुळे,चुकीची माहिती प्रसारित केल्या मुळे रशिया नी नाराजी व्यक्त केली होती. त्या निवेदिका,अशा काही उच्च स्वरात बोलत असतात की त्यांचा आवाज एक मिनिट पण ऐकून घेणे मोठ्या कष्टाचे वाटते.. त्या मध्ये ह्यांचे debate. म्हणजे महाभयंकर शो.ते मोठमोठ्याने ओरडणे ,फालतू विषयावर चर्चा. भारताची चुकीची प्रतिमा जागतिक स्तरावर निर्माण होण्यास हे न्यूज चॅनेल जास्त जबाबदार आहेत. योगी चे लाल करण्याच्या नादात मुस्लिम गुन्हेगारांना दिलेली वागणूक ह्याच्या बडबडीत कहाण्या हेच चॅनेल रोज प्रसारित करत होते. त्याचा एकत्रित परिणाम पण आता जसे मुस्लिम राष्ट्र react झाले त्या मागे आहे लता मंगेशकर गेल्या तेव्हा पाकिस्तान सारख्या देशाच्या न्यूज चॅनल किती मस्त तो प्रसंग कव्हर केला होता.
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 06/07/2022 - 07:20 नवीन
१. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे? भावना दुखावणे. भारत्,पाकिस्तान सारख्या देशांमध्ये भावनेचे राजकारण चालु असते रे ट्रम्पा.किंबहुना आता जगभरात अनेक देशांमध्ये भावनेचेच राजकारण चालु आहे.
स
साहना Tue, 06/07/2022 - 09:05 नवीन
* भाजप आपल्या प्रवक्त्यांना किंवा सभासदांना कश्या प्रकारे वागवतो हा त्यांचा आंतरिक मामला आहे. त्यामुळे नुपूर शर्मा ह्यांची हकालपट्टी हि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत नाही. नुपूर आता आपल्या खाजगी पातळीवर त्याच गोष्टी बोलू शकतात. आता नुपूर ह्यांना धमक्या वगैरे मिळत आहेत तेंव्हा त्यांचे संपूर्ण संरक्षण करणे सरकारची जबाबदारी आहे. त्यांत सरकार अपयशी ठरल्यास ती स्वातंत्र्याची गळचेपी ठरेल. नुपूर ह्या काहीही खोटे बोलल्या नाहीत. त्यांनी फक्त हदीत मध्ये लिहिले आहे तेच सांगितले होते. * भारत सरकारचे कतार पुढील सपशेल लोटांगण त्यांच्या घाबरट स्वभावाचे द्योतक असण्यापेक्षा बोलबच्चन बाबू मंडळींच्या अकार्यक्षम पणाचे उत्तर उदाहरण आहे. नुपूर शर्मा भारतीय नागरिक आहे, भारत एक लोकशाही आणि (किमान कागदावर) मुक्त समाज असल्याने कुठल्याही देवदूत वगैरेवर टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे आणि हा अधिकार वापराने "fringe" वगैरे ठरत नाही. त्यामुळे भारत सरकारचे कतार ला पाठविलेले पत्र अतिशय ढिसाळ आणि कमजोरपणाचे वाटते. भाषा पाहू : > “In line with our civilisational heritage and strong cultural traditions of unity in diversity, Government of India accords the highest respect to all religions. Strong action has already been taken against those who made the derogatory remarks,” नुपूर विरुद्ध कुठलीही ऍक्शन घेण्याचा अधिकार भारत सरकारला नाही. कारण मुळांत त्या काहीही खोटे बोलल्या नाहीत. कुठल्याही भारतीय कायद्याचा त्यांनी भंग केला नाही, केला असेल तर कोर्टांत जाऊन ते सिद्ध करावे लागेल. माझ्या मते कोर्टांत कुणी जाणार नाही कारण कोर्टांत त्या नक्की काय बोलल्या, ते सत्य होते कि नाही इत्यादी विषय वर येतील. आणि नंतर काय होते ते पाहण्यासाठी जाणकारांनी "कोलकाता कुराण पिटिशन" वाचावे. >"These are the views of fringe elements," नुपूर ह्यांना भाजपने आपला प्रवक्ता नेमले होते. हा पक्ष बहुसंख्य भारतीयांचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांना "fringe" म्हणणे चुकीचे तर आहेच पण भारतीय नागरिक fringe असला तरी जो पर्यंत प्रत्यक्षांत त्याने कायदा भंग केला नाही त्याला इतर देशांपुढे हेटाळणे बरोबर ठरत नाही. **अरब - भारत संबंध** भारताला ह्यांच्या सोबत चांगले संबंध पाहिजे ह्यांत चुकीचे काहीही नाही. त्यांचा धर्म जुनाट आणि बुरसटलेला असला तरी ती भारताची समस्या नाही. त्याच वेळी भारतांत काय होते ह्यांच्याशी त्यांना देणे घेणे नाही. ज्या पद्धतीने ह्या देशांनी आपल्या देशांत ब्लास्फेमी कायदे केले आहेत तसे कायदे भारतांत नाहीत त्यामुळे कुठल्याही तथाकथित देवदूतावार टीका करणे भारतांत १००% ग्राह्य आहे. हे भारतीयांचे अत्यंत महत्वाचे स्वातंत्र्य असून हे योग्य भाषेंत सौम्य पणे समजावून सांगणे आवश्यक होते. भारत लोकशाही असल्याने लोकांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पण ह्याचा अर्थ कुठल्याही भारतीयचे मत हे भारतीय सरकारचे मत नाही ह्या व्यतिरिक्त कतार किंवा कुठल्याही देशाला आणखीन काही ठोस तक्रार असेल तर भारत याचा पाठपुरावा करेल इतके उत्तर दिले असते तरी पुरेसे असते. ** घरचे भेदी ** शांतताप्रिय समाजाने आपली नांगी आता वर काढली आहे. नुपूर ह्यांना ठार मारण्याची आणि बलात्कार करण्याची धमकी मिळाली आहे. कमलेश तिवारी ह्यांच्या उदाहरणावरून ह्या धमक्या किती खऱ्या ठरू शकतात ह्याची कल्पना आम्ही करू शकतो. त्याशिवाय भारताला लोटांगण घालवले लागले म्हणून काँग्रेसी जनता आणि शिळी सेना इत्यादींनी सुद्धा प्रचंड आनंद दाखवला. धिम्मी मुबई पोलिसांनी तर नुपूर ह्यांना तुरुंगांत डांबण्याची तयारी केली आहे. थोडक्यांत कठीण काळांत "वयं पंच शतम" म्हणून भारत देशाच्या सन्मानासाठी उभे न थकता विविध शत्रूंनी ह्या संधीचा फायदा उठवला आहे. राणा अयुब, अरिफ alt news इत्यादींनी ह्यांत भरपूर हात धुवून घेतले आहेत. काही मंडळी तर तथाकथित देवदूताचा अपमान करणाऱ्या प्रत्येक हिंदूंचे नाव गोळा करवून कतार इत्यादी देशांना पाठवत आहेत. ** पुढे काय ** भाजप/ संघ धिम्मी आहे आहे आधीपासून मला ठाऊक आहे. आता नुपूर ह्यांची हकालपट्टी करून त्यांनी त्यावर अगदी औपचारिक शिक्का सुद्धा मारला आहे. तथाकथित देवदूत ह्यांनी नक्की काय दिवे लावले हे सत्य सुद्धा सांगणार्यांना भाजपांत नेते म्हणून सोडा पण सदस्य म्हणून सुद्धा जागा नाही हे आता स्पष्ट झाले आहे. इथून शांतता प्रिय समाज फक्त escalate करेल. मूर्तिपूजा हि सुद्धा इस्लामचा अपमान आहे हे पुढची स्टेप असेल. भाजपने आपली कितीही लाज काढून घ्यावी मला फरक पडत नाही पण "देश झुकने नही दूंगा" म्हणता म्हणता महाशयांनी अक्षरशः कतार सारख्या टूच्च देशापुढे लोळण घेतली. सीताराम गोयल ह्यांनी आधीच लिहिले होते कि काँग्रेस हि आधुनिक मुस्लिम लीग तर भाजप आधुनिक काँग्रेस पार्टी बनेल. ते भाकीत खरे ठरत आहे. मोदी ह्यांची IT सेल आणि बुद्धी गहाण ठेवलेली मंडळी आता मोदी ह्यांची शरणागती हि प्रत्यक्षांत कसा मोठा मास्टरस्ट्रोक आहे, गनिमी कावा आहे, मोदी एक मोठ्ठाला निर्णय लवकरच घेणार आहेत, फक्त अरबांचा बुद्धी भ्रम करण्यासाठी कशी हि छोटीशी खेळी आहे इत्यादी इत्यादी जबर थेयर्या काढणार आहेत. हे copium (आत्मभ्रम निर्माण करणारे रसायन) मोठ्या प्रमाणात whatsapp वरून वाटणार आहेत. पण आम्हाला त्याचे काय ? इथे मुख्य मुद्दा असा आहे कि भारत देशांत देवदूतावार टीकाच काय पण काहीही निगेटिव्ह बोलण्यावर बंदी आहे हेच भारताने अरब प्रदेशाला सांगितले आहे. आणि ह्या भानगडीत मालदीव पासून अफगाण पर्यंत आणि इंडोनेशिया पासून यूएई पर्यंत सर्वानी भारताला "जलील" केले आहे. ** सहिष्णुता ** सहिष्णू असणे चांगली गोष्ट आहे, पण असहिष्णू लोकांपुढे झुकणे चुकीची गोष्ट आहे. ** सामान्य हिंदू काय करू शकतो ** नुपूर ह्यांनी जी तथ्ये सांगितली ती प्रकाशीत करावी आणि सगळीकडे शेयर करावीत. त्यांत सर्व अरब राष्ट्रे आणि त्यांचे दूतावास तसेच भारतीय भेदी ह्यांना टॅग करावे. देवदूताच्या अब्रूची लक्तरे करून सर्वत्र टांगली गेली कि पुन्हा हि मंडळी डोके वर काढणार नाहीत.
ग
गामा पैलवान Tue, 06/07/2022 - 10:37 नवीन
साहना, तुमच्या या संदेशाशी नव्व्याण्णव टक्के सहमत आहे. एक टक्का असहमती मोदींसाठी. त्यांना बरीच व्यवधानं पाळायची असतात. आखाती देश अमेरिकेचे बटीक आहेत. मोदी बटक्यांना त्यांची जागा दाखवून देतील. मला असं वाटतं ही हे प्रकरण हिंदूंची एकी किती हे तपासायला उकरून काढलेलं आहे. म्हणून मी नुपूर शर्मांना माझा पूर्ण पाठिंबा व्यक्त करतो. आ.न., -गा.पै.
क
काड्यासारू आगलावे Tue, 06/07/2022 - 10:48 नवीन
गामाजी, ७०० शेतकर्यांना मरू देनार्या, कोरोना काळात लाखो लोक मरू देनार्या, नी कश्मिरी हिंदू पळून येताहेत त्यांचीही फिकीर न करनार्या मोदींना आखातातील भारतींयांची पर्वा असेल हे समजने भोळेपनाचे आहे. बाकी नुपूर शर्मांना मी देखील पाठींबा जाहीर करतो. नी तियांना पकिषातून हकलनार्या भाजपचा नी भाजपेयी प्रवृत्तींचा निषेध करतो.
S
sunil kachure Tue, 06/07/2022 - 11:06 नवीन
ह्यांना देश आणि देशाचे नागरिक ह्यांच्या शी काही देणे घेणे नाही. मित्र भिकारी बनू शकतात ह्या भीती मुळे कुवेत सारख्या फालतू देश समोर साष्टांग नमस्कार.
आ
आग्या१९९० Tue, 06/07/2022 - 11:35 नवीन
बकरीचे शेपूट माशाही वारीना व लाजही राखीना.
स
साहना Tue, 06/07/2022 - 18:22 नवीन
सर्व हिंदूनी नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल ह्यांचा मागे कणखर पणे उभे राहायची गरज आहे. ज्या वक्तव्याने शांतताप्रिय समाजाला मिरच्या झोंबल्या आहेत तीच वक्तव्ये आता सर्वत्र उगाळली जात आहेत ह्यांतच शांतता प्रिय समाजाचा ह्रास आहे.
T
Trump Wed, 06/08/2022 - 19:48 नवीन
श्री साहना, धन्यवाद.
S
sunil kachure Tue, 06/07/2022 - 10:03 नवीन
१) भारतीय न्यूज चॅनल आणि बाकी मीडिया ह्यांनी राजकीय पक्षांना बांधून घेतले आहे. राज्यसभा सदस्य पासून बाकी लाभ मीडिया किंग लोकांना राजकीय पक्ष देत अस्तात. म्हणजे मीडिया,राजकीय पक्ष ह्यांचे व्याव्यारिक नात आहे. त्या मुळे निःपक्ष,समतोल,विचारी, विषयाचा अभ्यास करून नंतर समतोल विचार मांडणारी पत्रकारिता भारतात आज तरी अस्तित्वात नाही. २) नुपूर शर्मा नी नक्की कोणत्या विषयावरील चर्चे दरम्यान ही कॉमेंट केली? तिथे अजून कोण कोण आमंत्रित होते. ही माहिती दिली जात नाही. अगदी कोणत्या चॅनेल वर ही चर्चा झाली हे पण आता लपवले जात आहे. ३) नुपूर चे वक्तव्य योग्य आहे की अयोग्य हा विषय नाही.सत्ताधारी पक्षाची प्रवक्ते म्हणून तसे वक्तव्य करणे योग्य की अयोग्य हा वादाचा मुद्धा आहे. नवीन जिंदाल आणि नुपूर ह्यांनी अनेक वेळा अशी वृत्ती दाखवली आहे. सामान्य माणूस म्हणून तिने वक्तव्य केले असते तर कोणत्याच देशाने हरकत घेतली नसती. ४) मिळत धार्मिक debate मध्ये राजकीय लोकांचे काय काम?धार्मिक debate मध्ये धार्मिक प्रतिनिधी च हवा. ५) काही तरी हिंदू मुस्लिम वाद काढून त्या वर debate ठेवायचे आणि हिंदू चे प्रतिनिधी म्हणून bjp चे प्रवक्ते भाग घेणार. असे खूप कार्यक्रम होत असतात चॅनेल चा आवडाता उद्योग आहे हा. पण bjp हिंदू ची प्रतिनिधी आहे हे चॅनेल वाल्यांनी कशावर ठरवले. राजकीय फायदा त्याच पक्षाला मिळावा हा हेतू .
S
sunil kachure Tue, 06/07/2022 - 10:22 नवीन
असे कोणी टाईप केले की खूप हसायला येते.ते हसणे थांबत च नाही. कायदा आणि कायद्याचे राज्य ते पण भारतात. एक उत्तम उदाहरण फुलंन देवी .गुन्हे असंख्य. तरी दोन वेळा लोकसभेत निवडून गेली. समाजवादी पक्षाने सर्व गुन्हे मागे घेतले . जे खरेच घडले होते. कोणता कायदा. उद्या दाऊद पण लोकसभेत गेला तर आश्चर्य वाटून घेवू नका.
व
वामन देशमुख Tue, 06/07/2022 - 11:39 नवीन
नुपूर शर्मा यांचे संरक्षण करण्याऐवजी त्यांची हकालपट्टी करणे ही श्री नरेंद्र मोदींची आजवरची सर्वात कणाहीन कृती आहे. आठ वर्षे झालीत, बघू पुढच्या दोन वर्षांत अजून काय काय होतंय ते.
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 06/07/2022 - 12:34 नवीन
+१
क
कॉमी Tue, 06/07/2022 - 16:17 नवीन
रिअलपॉलिटीक आणि नैतिक विचार हे वेगवेगळे व्हावेत. पण दोन्ही होणे गरजेचे आहे. आपल्या कोणत्या तत्वासाठी किती मोठ्ठा आर्थिक आणि राजनैतिक फटका बसणार हे पाहणे गरजेचे आहे. कोणत्या तत्वाची किती प्रमाणात आणि कश्या प्रकारे पायमल्ली होते- आणि त्या पायमल्लीचा विरोध करून काय गमवावे लागणार आहे असा विचार होत असतो. आणि जर तत्व समर्थनामुळे टाळले जाणारे नुकसान मोजायला लागणाऱ्या किमतीपेक्षा जास्त असेल तरच कणखर भूमिका घेतली जाते. त्यामुळे मोदींच्या समर्थकांनी सुद्धा कणाहीन वैगेरे शब्द वापरणे माझ्यासाठी तरी आश्चर्यकारक आहे. असल्या चिंटूपिंटू गोष्टीत कशाला कणा बिणा दाखवायचा आहे ?
श
श्रीगुरुजी Tue, 06/07/2022 - 17:31 नवीन
+ १ आंतरराष्ट्रीय राजकारण, देशाचे हितसंबंध, कूटनीति, पोलिटिकली करेक्ट विधाने व पोलिटिकली करेक्ट निर्णय हे विषय ज्यांना अजिबात समजत नाहीत त्यांनाच मोदी कणाहीन, गुडघे टेकणारे वगैरे असल्याचे भ्रम होतात. IC814 मधील १७० प्रवाशांना सोडविण्यासाठी कोणताही पर्याय शिल्लक नव्हता व त्यामुळे ३ अतिरेकी नाईलाजाने सोडावे लागले तेव्हा सुद्धा वाजपेयी कणाहीन, गुडघे टेकणारे आहेत असाच दुष्प्रचार या अज्ञान्यांनी केला होता.
S
sunil kachure Tue, 06/07/2022 - 17:55 नवीन
दोन प्रवक्ते हटविले म्हणजे प्रकरण संपले असे होत नाही. दीर्घ कालीन त्याचे परिणाम होत असतात. गहू अजून फिरत च आहे. कच्चे तेल भारताला चढ्या किमतीत विकले जाईल. सहकार्य आता पहिल्या सारखे केले जाणार नाही. परिणाम तर दीर्घ कालीन होणारच. व्हिसा कायदे भारतीय लोकांसाठी प्रतिकूल केले जातील.
आ
आनन्दा Tue, 06/07/2022 - 18:21 नवीन
हे सगळं झालं म्हणजे मग इथे एक धागा काढून आम्हाला सांगा. त्यावेळेस मान्य करू. ओपेकची मस्ती कमी करायची असेल तर दीर्घकालीन योजना कराव्या लागतील. त्या परिस्थितीत जर एखादे पाऊल मागे घ्यावे लागले तर तुमच्यासारख्याना आनंदाच्या उकळ्या फुटणे साहजिक आहे. पण थोडी शक्ती 2024 साठी शिल्लक ठेवा..
स
सुक्या Tue, 06/07/2022 - 22:41 नवीन
खिक्क !!!
आ
आनन्दा Wed, 06/08/2022 - 04:43 नवीन
असो, पण या निमित्ताने समान नागरी कायदा आल्यावर काय काय होऊ शकते याची एक झलक पाहायला मिळाली.. आता सरकार काय काय करते हे बघणे रोचक ठरेल. कायदा येईल तेव्हा येईल, पण त्यावेळेस समर्थकांनी बोलताना किती सावध राहिले पाहिजे याचा धडा या निमित्ताने सर्वांना मिळाला आहे.
श
श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 06:12 नवीन
नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? सत्यं ब्रूयात् प्रियं ब्रूयात् , न ब्रूयात् सत्यम् अप्रियम् । प्रियं च नानृतम् ब्रूयात् , एष धर्मः सनातन: ॥
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 06/08/2022 - 06:55 नवीन
सावत्र आईचे ऐकणारे आणि पत्नीला वनवासात घेउन जाणारे प्रभु श्रीराम शहाणे नव्हते असे विधान ओवेसीनी केले तर नुपुर शर्मा/जिंदाल ऐकुन घेणार का? की भावना दुखावतील?
श
श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 07:46 नवीन
असे अनेक हिंदू निधर्मांध सुद्धा म्हणतात. त्यांना आजवर कोणी काही केलंय का?
स
सुबोध खरे Wed, 06/08/2022 - 09:04 नवीन
श्री कलबुर्गी यांनी गणेश मूर्तीवर मूत्र विसर्जन केले होते त्या बद्दल कुठे मोर्चे किंवा दंगली झाल्या होत्या का?
श
श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 09:51 नवीन
थोडी सुधारणा. यू आर अनंतमूर्ती यांनी एका हिंदू मूर्तीवर (गणेश मूर्ती नाही) मूत्रविसर्जन केले होते व तसे आत्मचरित्रात लिहिले आहे. कलबुर्गींनी एका भाषणात त्याचा संदर्भ देऊन त्या प्रकारचे समर्थन केले होते.
S
sunil kachure Mon, 06/13/2022 - 10:52 नवीन
दाभोलकर,कलबर्गी आणि त्या लिस्ट मधील बाकी गुलाम.. हे तज्ञ,किंवा हुशार नव्हतेच. हे राजकीय पक्षांचं गुलाम होते ह्यांना पैसा नक्कीच कोणी तरी हिंदू विरोधी पुरवत होता. दाभोलकर ची मुलाकात बघितली. तेव्हा त्याने एक मत व्यक्त केले .बालवाडी पासूनच च हिंदू धर्म,संस्कार,निती,हे शिक्षण पद्धती मधून काढून टाकायचे . म्हणजे हा गुलामच होता ह्यांचे हेतू च साफ नव्हते . संत गाडगे महाराज,संत नामदेव महाराज ह्यांनी हिंदू धर्मातील चुकीच्या कर्मकांड विरुद्ध अतिशय कठोर शब्दात टीका केली आहे . तरी ते आम्हाला प्रेरणा देणारे,आदरणीय च आहेत. कोणताच हिंदू त्यांचा द्वेष करत नाही..कारण त्यांचा हेतू अतिशय पवित्र होता . हिंदू नी नेहमी लवचिकता दाखवली आहे.. म्हणून हिंदू म्हणून मला हिंदू धर्माचा खूप अभिमान आहे.
अ
अनन्त अवधुत Wed, 06/08/2022 - 22:49 नवीन
असली वक्तव्ये करायला ओवेसीची गरज नाही, कितीतरी हिंदुच असले अपमानास्पद बोलतात. ती वक्तव्ये कानाआड केल्या गेली. पण यापुढे, तसे होणार नाही.
स
साहना Wed, 06/08/2022 - 08:35 नवीन
कायच्या काही ! नुपूर ह्यांची बडतर्फी त्यांनी अप्रिय भाष्य केले म्हणून नाही विदेशी शक्तींनी मागणी केल्याने हकालपट्टी केली गेली आहे. नाहीतर कतार च्या पत्राची वाट पाहायला भाजप अध्यक्ष बसले नसते. जो पर्यंत कतार ने आक्षेप व्यक्त केला नव्हता तो पर्यंत ह्याच पक्षाचे नेते अतिशय हिरीरीने हे "सत्य" शेर करत होते. बरे हे "सत्यम ब्रूयात" वगैरे मनुस्मृतीतील तत्वे भाजपाची नाहीत आणि भारत सरकारची नाहीत. नाहीतर येव्हाना अर्धा भाजपा बडतर्फ झाला असता कारण बहुतेक मंडळी एक तर धांदात खोटे किंवा अत्यंत अप्रिय अश्याच गोष्टी बोलत असतात. आणि मनुस्मृतीत तत्वे आचरणात आणायचीच असतील तर सर्वच आणावीत. म्लेंछ लोकांच्या संदर्भांत मनुस्मृती काय म्हणते हे भारत सरकारने १९४७ मध्येच गांभीर्याने घेतले असते तर आजची वेळच अली नसती. दुसरी गोष्ट म्हणजे उगाच आपल्या चाटूगिरीला सोयीस्कर असे सुभाषित उचलायचे आणि त्यालाच जणू काही आपले तत्व म्हणून ठोकून द्यायचे आणि विद्वत्तेचा आव आणायचा. म्हणजे आपल्याला घाई आहे तेंव्हा "कल करे सो आज" हा कबीर ह्यांचा दोहा. ठोकून द्यायचा आणि आळस वाटत असेल तर "धीरे धीरे रे मना, " हा कबीर ह्यांचाच दोहा ठोकून द्यायचा. मनुस्मृतीतील सदर सुभाषितावर अत्यंत सविस्तर टीका विविध विद्वानांनी केली आहे. सनातन धर्मातील तत्वे (उदा क्षमा इत्यादी) जेंव्हा म्लेंच्छना लागू केली तेंव्हा म्लेंच्छानी त्याचा येथेच्छ फायदा घेऊन हिंदूंनाच धूळ चारली. कुठले तत्व कुठे लावावे ह्याला सुद्धा तारतम्य असायला पाहिजे. नुपूर ह्यांनी असत्य किंवा अप्रिय असे काहीही बोलले नव्हते त्यांचा प्रत्येक शब्द सरळ हदिथ मधूनच उचललेला आहे.
आ
आग्या१९९० Wed, 06/08/2022 - 07:57 नवीन
डॉ. नरेंद्र दाभोलकर हिंदू धर्म बुडवायला निघाले होते असे हिंदूच म्हणत होते. त्यांचे मारेकरी कोणत्या धर्माचे असतील?
श
श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 08:03 नवीन
असे म्हणणारे मूठभर धर्मांध असतील. त्यांचे मारेकरी कोणत्याही धर्माचे असू शकतील कारण मारेकरी कोण होते, त्यांना मारण्यामागील हेतू काय हे अजून स्पष्ट नाही. मारण्यात वापरली गेलेली शस्त्रे, वाहने इ. पुरावे अजूनही सापडलेले नाहीत. अनेक वेगवेगळ्या लोकांवर संशय घेऊन अनेकांना अटक करून चौकशी करूनही कोणतेही सबळ पुरावे मिळाले नाहीत. मुळात त्यांना धार्मिक कारणावरून मारले की त्यामागे अन्य कारणे होती हेच अजून सांगता येत नाही.
आ
आग्या१९९० Wed, 06/08/2022 - 08:19 नवीन
मूर्तीपूजेला विरोध करणाऱ्या कलबुर्गींना कोणी मारले?
श
श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 08:26 नवीन
कोणालाच माहिती नाही.
आ
आग्या१९९० Wed, 06/08/2022 - 09:21 नवीन
गौरी लंकेश ह्यांचे संशयित मारेकरी सगळे हिंदूच.
श
श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 09:45 नवीन
संशयित आणि आरोप सिद्ध झालेले आरोपी यातील फरक समजत असावा आशी आशा आहे.
श
श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 09:46 नवीन
दाभोळकर, कलबुर्गीवरून गौरी लंकेशकडे वळण घेतले. मधले पानसरे राहिले की.
आ
आग्या१९९० Wed, 06/08/2022 - 10:17 नवीन
सगळ्यांचे मारेकरी हिंदूच संघटना असणार हे आज ना उद्या उघड होईलच. तपास यंत्रणांची संशयाची सुई हिंदू संघटनांकडेच कशी वळते?
श
श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 10:25 नवीन
कारण गुन्हे घडले त्या काळात महाराष्ट्रात व कर्नाटकात हिंदूविरोधी सरकार सत्तेत होते. २००८ मध्ये मालेगाव स्फोटानंतर पवारांनी व २०१३ मध्ये दाभोळकर हत्येनंतर पृथ्वीराज चव्हाणांनी संशयाची व तपासाची दिशा जाणूनबुजून हिंदू संघटनांकडे वळविली होती. इतक्या वर्षांनंतर आजतागायत काहीही पुरावे मिळाले नाहीत व काहीही सिद्ध झाले नाही.
S
sunil kachure Wed, 06/08/2022 - 09:40 नवीन
इस्लामी देशात अशा गुन्ह्याला फाशी हीच शिक्षा आहे आणि ती योग्यच आहे. कोणाचा तरी एकाचा किडा वळवळा करतो आणि तो करोडो लोकांचे श्रद्धा स्थान असणाऱ्या देव देवतांच्या वर गल्लीच्छ टीका करतो. हा गुन्हाच.ईश निंदा हा कायदा भारतात पण हिंदू आणि मुस्लिम ह्या धर्माच्या देव देवता विषयी लागू झाला पाहिजे. हिंदूंच्या देव देवता वर पण काही अती शहने नीच शब्दात कॉमेंट करत असतात. पण हिंदू मुस्लिम लोकांसारखे हिंसक प्रतिक्रिया देत नाहीत त्याचा फायदा उचलला जातो हे खरेच आहे. ईश निंदा कायदा असता तर कितीतरी पुरोगामी कायद्याच्या चापात अडकले असते आणि तो प्रकार बंद झाला असता. Bjp कडे पूर्ण बहुमत आहे हिदू हिताचा कायदा bjp नी परित करावा.
व
वामन देशमुख Wed, 06/08/2022 - 12:05 नवीन
Bjp कडे पूर्ण बहुमत आहे हिदू हिताचा कायदा bjp नी परित करावा.
BJP तसं काहीही करणार नाही. --- आठ वर्षे झाली. हिंदुत्वाच्या नावाने, हिंदूंच्या मतावर बहुमत मिळवलेल्या सरकारने - १. हिंदूंच्या फायद्याचा एकतरी नवीन कायदा आणि त्याची अंमलबजावणी केला आहे का? २. हिंदूंचे नुकसान थांबेल असा एकतरी जुना कायदा रद्द केला आहे का? माझ्या माहितीनुसार आणि समजुतीनुसार एकही नाही. --- केवळ सत्ता प्राप्त करून चालत नाही, आपली व्यक्त-अव्यक्त उद्दिष्टे साध्य करण्याची इच्छाशक्ती, धमक असावी लागते. सध्याच्या तथाकथित हिंदूहितवादी सरकारात ती धमक कधीही दिसली नाही. याउलट, पूर्वीच्या मुस्लिमहितवादी सरकारात, "या देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला हक्क मुस्लिमांचा आहे" हे ठणकावून सांगण्याची आणि तशी प्रत्यक्ष कृती करण्याची धमक होती. --- "पाठ्यपुस्तकांतून शिकवला जाणारा इतिहास खोटा आहे, तो बदलण्याची गरज आहे" असे पांचजन्य / ऑर्गनाइझर मधून नुसते सांगायचे पण हाती सत्ता असुनही प्रत्यक्षात मात्र काहीही करायचे नाही. उलट आम्ही चार वर्षांत पाठ्यपुस्तकांचे एकही प्रकरण बदलले नाही असे सांगणाऱ्या बुळ्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवणार? --- प्रश्न केवळ नुपूर शर्मांच्या बडतर्फीचा नाही; आठ वर्षांत प्रचंड बहुमत असूनही या सरकारने हिंदूंच्या हिताचे काहीही केले नाही, ही निराशा, सल, खदखद मनात आहे. --- अवांतरः मरतुकड्या सौभाग्यापेक्षा ढळढळीत वैधव्य बरे अशी हिंदूंची मनोधारणा होत चालली आहे आणि २०२४ च्या निवडणुकीत ती प्रतिबिंबित होणार आहे.
आ
आग्या१९९० Wed, 06/08/2022 - 13:17 नवीन
हिंदूंकडून सतत होणारी समान नागरी कायद्याची मागणी पूर्ण करू शकते हे सरकार परंतु किती हिंदू पाठींबा देतील ह्या कायद्याला ? कारण "हिंदू अविभक्त कुटुंब कायद्याचे" फायदे हिंदूंना मिळणार नाहीत.
श
श्रीगुरुजी Wed, 06/08/2022 - 13:28 नवीन
हिंदूहित किंवा हिंदूंचा फायदा होण्यासाठी कोणते कायदे करावै लागतील?
आ
आग्या१९९० Wed, 06/08/2022 - 13:44 नवीन
माहीत नाही. परंतु हिंदूंची समान नागरी कायद्याची मागणी हिंदू हितापेक्षा दुसऱ्या धर्मातील नागरिकांना धार्मिक सवलती मिळू नये ह्याबद्दल असते.
क
कॉमी Wed, 06/08/2022 - 15:59 नवीन
मी चुकत नसल्यास अहिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्यात यावे अशी वामनजींची इच्छा आहे. चुभुद्याघ्या.
श
शलभ Wed, 06/08/2022 - 16:32 नवीन
असहमत. मला अजिबात नाही वाटत असे. एक कायदा RTE संदर्भात असू शकतो. सर्व शाळांना लागू केला जावा. मुघलांशी संबधीत अभ्यासक्रम बदलला जावा. ते अजुन त्यांची लिस्ट देतीलच.
व
वामन देशमुख Wed, 06/08/2022 - 16:32 नवीन
मी चुकत नसल्यास अहिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवण्यात यावे अशी वामनजींची इच्छा आहे. चुभुद्याघ्या.
नाही हो, असे नाही. आधीच भारतात हिंदू हे दुय्यम दर्जाचे नागरिक आहेत त्यांना किमान समान अधिकार तरी मिळावेत अशी माझी इच्छा आहे. मागे एका चर्चेत मी "हिंदूंनी खरेतर हिंदूंना झुकते माप देणारा असमान नागरी कायदा करावा यासाठी प्रयत्न करावेत" असे म्हटले होते पण ते एका वेगळ्या संदर्भात होते. (हिंदूंनी भारतात हिंदू म्हणून रहावे + अहिंदूंनी हिंदू व्हावे यासाठी काय इन्सेन्टिव्ह आहेत असा तो संदर्भ होता.) प्रस्तुत चर्चा वेगळी आहे.
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा