नुपुर शर्माचे यांचे काय चुकले? भारत सरकारची अशी प्रक्रिया अशी का?
काही प्रश्न
१. त्यांनी कुराण आणि हदीथ यांचा संदर्भ दिला. त्यामुळे त्यांनी खोटे बोलल्याचे सिध्द होत नाही. नक्की त्यांच्या वक्तव्यामध्ये आक्षेपार्ह काय आहे? कोणत्या कायद्यांचा भंग होत आहे?
२. त्यांना पक्षातुन काढुन टाकण्यामागे भाजपाची कोणती चाल / अपरिहार्यता असावी? देशातील मुस्लिम समाजाची होणारी प्रतिक्रिया किंवा इतर देशांची प्रतिक्रिया यांचा कितपत संबध असावा?
३. भारत सरकारने आखाती देशापुढे गुढगे का टेकले? तेथील भारतीय हिंदुच्या नोकर्या, येणारे तेल ह्याचा काय संबध आहे का? ते आखाती देश चीनबद्दल ब्र काढत नाहीत, मग भारत सरकार का असे वागत आहे?
४. हि तात्पुरती माघार आहे की मोदी सरकारने मुस्लिम लांगुलचालन सुरु केले आहे?
५. हिंदुत्व / हिंदुवादी लोकांची काय भुमिका असेल? ते भाजपाला एक अपरिहार्यता म्हणुन मतदान करणे चालु ठेवतील की पर्यांयाचा विचार करतील?
६. इतर पक्ष कॉंग्रेस, आप इ. कसे ह्याचा लाभ उठवतील?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- धर्म एव हतो हन्ति धर्मो रक्षति रक्षितः।त्यांचे वक्तव्य चुकीचे नाही. पण प्रवक्त्या म्हणून बेजबाबदारीचे आहे.कसेकाय?? तुम्हाला वाटते म्हणून का त्यामागे काही लाॅजीक देखील आहे?प्रवक्त्यांनी इतर देशांसोबत संबंध बिघडवू शकणाऱ्या गोष्टी बोलायच्या नसतातका? प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन तर अनेकांच्या प्रत्यक्ष नांग्या ठेचतोय. चिनला भिती वाटते का संबंध बिघडायची?आपल्या देशाच्या डिप्लोमाटिक इंट्रेस्ट वर दुष्परिणाम होईल अशा गोष्टी बोलायच्या नसतात. खऱ्या असल्या तरी.मग सरकारी अधिकारी, मंत्री संत्रा काय फक्त विमानाचं पेट्रोल जाळायला ना फोटो काढायला परदेशात जाता का?? डिप्लोम्टीक ईंट्रेस्ट भाजप पक्ष प्रवक्त्याने सांभाळावा? सलाम तुमच्या बुध्दीमत्तेला.प्रवक्ता तर फक्त बोलली. चिन तर अनेकांच्या प्रत्यक्ष नांग्या ठेचतोय. चिनला भिती वाटते का संबंध बिघडायची?चीन कडे भारतापेक्षा जास्त बार्गेनिंग पॉवर असावी. त्यामुळे चीन मुस्लिमांवर अत्याचार करत असून सुद्धा त्यांच्यासोबत जास्त खळखळ करता येत नाही. डिप्लोमॅट ने तर सांभाळायचा असतोच. पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे सुद्धा आंतराष्ट्रीय पातळीवर गंभीरपणे घेतले जाणारच.पण पक्ष प्रवक्त्यांचे बोलणे सुद्धा आंतराष्ट्रीय पातळीवर गंभीरपणे घेतले जाणारच.तालीबान प्रवक्त्यांना कोण सिरीयस घेतं? मुस्लिम ब्रदरहूडचा प्रवक्ता काय बोलला हे भारत सरकार पर्यंत तरी पोहोचतं का?जगाला दाखविण्यासाठी नूपुर शर्मा व नवीन जिंदाल यांच्यावर तोंडदेखली कारवाई केलेली दिसते.हिंदू धर्माचा कुणीही अपमान केला तर चालेल पण ईतर धर्माचा तुम्हा अपमान केला तर कारवाई होईल हा संदेश भाजपने दिलाय.नुपुर शर्माचे यांचे काय चुकले?त्यांचे हे तुकले की आपण कोणत्या पक्षाच्या प्रवक्ता आहोत हे त्या विसरल्या. -आपल्या पक्षाचं काम हिंदूत्वाच्य् नावाने निवडणूका जिंकणं आहे ना की हिंदूंचा हक्कांसाठी लढणं. - मागे कमलेश तिवारी ह्या हिंदूत्वावाद्याची हत्या तथाकथीत हिंदूत्ववादी योगीच्या राज्यात दिवसाढवळ्या झाली. आपल्या मुलाच्या हत्येला योगी जबाबदार आहे हे त्याच्या मात्यापितांनी सांगीतले. - ऊद्या नूपूर शर्मांचेही तेच होनार. ना भाजप्याना फरक पडनार ना ढोंगी हिंदूत्ववाद्यांना.भारत पडला नरम देश. म्हणून निषेध होतो. चालायचंच!गामाजी दुरूस्ती सुचवतो. भारत पडला नरम नेत्याचा देश. म्हणून निषेध होतो. चालायचंच! (ईंदीरा गांधींचा काळ पहा)