Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सिनेमे

क
कॉमी
Fri, 03/25/2022 - 17:35
🗣 193 प्रतिसाद
(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.) गुड टाईम (२०१७) कथा- दोन भाऊ- कॉनी आणि निक, निक (धाकटा) मेंटली चॅलेंज्ड असतो. निकचे समुपदेशन चालू असताना कॉनी येऊन समुपदेशकांना खवचट कुजकट बोलत निकला घेऊन जातो- आणि त्याला घेऊन तो एक बँक लुटतो. त्याचा लुटीचा प्लॅन बऱ्यापैकी यशस्वी झाला असतो पण काही अडचणी येऊन ओम फस होते. लुटीचे बरेचसे पैसे वापरण्यायोग्य रहात नाहीत आणि , दुर्दैवाने निकला अटक होते. त्यानंतर कॉनी आपल्या भावाला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो याचे सिनेमात चित्रण आहे. या कथारेखेवरून कॉनी बद्दलजे चित्र उभे राहते तसा कॉनी आजिबात नाही. तो अत्यंत धूर्त, लीलया आणि निर्विकारपणे खोटे बोलणारा, आपल्या साध्यांसाठी समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतील हे आजिबात न पाहणारा सायकोपॅथ दाखवला आहे. रॉबर्ट पॅटिन्सनची ट्विलाईट प्रतिमा झणक्यात पुसून टाकेल अशी कॉनीची व्यक्तिरेखा आहे. रॉबर्ट पॅटिन्सनच्या कॉनीला पाहताना संताप संताप झाल्याशिवाय राहणार नाही. खराखुरा वेगळ्या धाटणीचा सिनेमा. थ्रिलर अवडणाऱ्यांना नक्की आवडेल. रॉबर्ट पॅटिन्सन आवडत असेल तर सिनेमा मेजवानी आहे- त्याचा पाहिलेला सर्वोत्कृष्ट अभिनय. (प्रौढ प्रेक्षकांसाठीच !) ८/१०

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 57571 views

🗣 चर्चा (193)
ह
हेमंतकुमार Sat, 03/26/2022 - 08:11 नवीन
छान. मी वाईल्ड टेल्स हा स्पॅनिश चित्रपट प्राइमवर पाहिला आणि त्यावर स्वतंत्र लेख इथे लिहिला आहे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 03/26/2022 - 08:31 नवीन
धन्स. सिनेमाची ओळख आवडली. नक्की पाहीन. आभार. सध्या मराठीतला 'पांघरुन' शोधतोय. पावनखिंड -कंम्पलीट. दुःखाचे श्वापद- डन. झुंड-बाकी. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 03/26/2022 - 10:54 नवीन
या धाग्यावर उल्लेख असलेला आणि तुम्ही माहिती दिलेला ड्यून-१ प्राईमवर पाहिला.दुसर्या भागाची प्रतिक्षा.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sat, 03/26/2022 - 10:56 नवीन
ड्यून
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 03/30/2022 - 15:11 नवीन
मलहॉलंड ड्राइव्ह (२००१) अभिनयक्षेत्रात चमकण्यासाठी बेटी ही तरुण मुलगी हॉलिवूड मध्ये आपल्या काकूच्या घरी आली असते. काकू सध्या घरीं नसतेच- काकू सुद्धा अभिनेत्रीच असते. घरामध्ये बेटी येते तेव्हा घरी आधीच एक तरुण मुलगी असते. ती तिच्या काकूपासून लपून घरी घुसली असते. प्रेक्षकांना आधी दाखवण्यात आले असते की ती मुलगी एका अपघातात सापडली असते, आणि त्याआधी तिला मारण्याचा प्रयत्नसुद्धा झाला असतो. पण आत्ता त्या मुलीला काहीही आठवत नसते, स्वतःचे नाव सुद्धा आठवत नसते. ती पोस्टरवरचे नाव बघून स्वतःचे नाव रिटा आहे असं बेटीला सांगते. मग बेटी आणि रिटा रिटाच्या ओळखीचा तपास करतात- असे सुरुवातीचे कथानक आहे. दोघी प्रमुख अभिनेत्या खूप सुंदर आहेत- आणि त्यांनी त्यांचे काम पण मस्त केलंय. खासकरून नाओमी वॉट्स ने साकारलेले बेटीचे पात्र. बेटी इतकी सद्गुणी आणि दयाळू का आहे ह्याची उकल शेवटी छान केली आहे. वरकरणी सरधोपट वाटणारी गोष्ट असली तरी शेवट अत्यंत उलथापालथ करणारा आहे. शेवटामुळे सिनेमा सर्वसाधारण क्राईम ड्रामा न राहता वेगळ्याच सिनेप्रकारात जातो. हा सिनेमा पूर्ण समजण्यासाठी आणि सगळ्या बाजू नीट समजण्यासाठी शेवट माहीत असल्यावर सिनेमा परत एकदा पाहावा लागेल. तोपर्यंत काही प्रसंग असंबंधीत वाटू शकतात
  • Log in or register to post comments
म
मनिष Sat, 04/02/2022 - 07:50 नवीन
कुठे पाहता येईल?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 04/02/2022 - 08:25 नवीन
अमेझॉन प्राईम https://www.primevideo.com/detail/Mulholland-Drive/0TELXY4U7KWI2OFSCRUEUF6RA9
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 04/03/2022 - 20:41 नवीन
मी वसंतराव आज बघितला. सिनेमॅटोग्राफी एकदम सुरेख आहे. पुणे, नागपूर, उत्तरपूर्व सीमा आणि विशेष म्हणजे लाहोरचे वातावरण अगदी सुरेख दर्शवले आहे. कालसुसंगत दारे, कुलपें हे सुद्धा आवडले (तुंबाड फिल्स). संवाद लिखाण चांगले आहे. पण ह्या जॉनरामधल्या सिनेमांमध्ये जाणवतो (उदा- काशिनाथ घाणेकर, बालगंधर्व) तसा कृत्रिमपणा इथे अधेमध्ये जाणवतो. अमेय वाघच्या दीनानाथ मंगेशकरांचे सुरवातीचे काही संवाद ऐकल्यावर ट्रेलरमध्ये काय काय घालता येईल असा विचार करूनच सगळं लिहिलंय काय असं वाटलं, पण पुढे खरंच छान प्रसंग लिहिलाय, ज्याने अमेय वाघचे पात्र सगळ्यात जास्त स्मरणीय वाटले (त्याचे आणि वसंताच्या आईचेपण.) काही ठिकाणी संवाद जास्तच ड्रामॅटिक झाल्यावर हसू आले- उदा. वसंताच्या पहिल्याच कार्यक्रमानंतर काही क्रिटीक येऊन म्हणतात- तुमच्या गायनाला आम्ही कधीच समाजमान्यता मिळू देणार नाही (!). कदाचित तो काळ वेगळा असेल- पण आज हे अत्यंत अनाकलनीय वाटलं. त्यानंतरच थोड्या वेळात शाळेत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम असतो- तिथे मुलं खुश होऊन टाळ्या वाजवतात. मग तिथे असा काहीतरी डायलॉग आहे की संगीत तज्ञांपेक्षा पेक्षा मुलांना आवडणे हे जास्त महत्वाचे. तिथेही हसू आले. पण तरीही बराच संयम राखला आहे. संगीत सौभद्रच्या प्रयोगादरम्यानचा एक जोक लिहिला आहे तो मात्र अफलातून. भरपूर हसू आले. बेगम अख्तर, वसंताचे मामा यांची पात्रं चांगली लिहिलीयेत. काही मिनिटांसाठीच लावणी गाणाऱ्या एका बाईंचे पात्र आहे- ते अतिशय सुंदर वाटले, खूप छान प्रसंग लिहिलाय. पुलंच्या पात्राचा एका पॉईंट नंतर कंटाळा आला. पुलंचे पात्र सिनेमात बर्याच वेळ जरी असले तरी ते 'क्लिकबेट' म्हणून लिहिलेय का अशी शंका आली. वसंताच्या आईचे पात्र सर्वोत्तम रंगवले आहे. पटकथा चांगलीये- म्हणजे एका अख्ख्या आयुष्यातून तीन तासाचा आर्क/व्यक्तिप्रवास काढणे आजिबात सोपे नसणार. पण त्यातूनही कथानक छान काढले आहे. संसार वि. गायन संघर्ष कमीत कमी रडारडीत चांगले रंगवले आहे. अभिनय- सर्वांनी perfectly adequate अभिनय केला आहे. अधे मध्ये गाताना लीप सिंक गडबडले आहे असे काही क्षणांना वाटले. अमेय वाघचे काम आवडलेच- हा तसा अनपेक्षित बोनस म्हणायचा. राहुल देशपांडेंचे काम सुद्धा छानच आहे. एक ट्विस्ट टाईप काहीतरी सिनेमाच्या शेवटाला आहे ते अगदीच बोगस वाटले. शाळेत निबंध लिहायचो तसं वाटलं- "...आणि झाड बोलू लागले" टाईप. यापुढे काही लिहीत नाही, स्पॉयलर होईल. संगीत- शेवटी या संगीताचा टार्गेट आडियन्स मी नाही, तरी काही ठिकाणी संगीत चांगलं भिडलं. लावणी तर खूपच सुंदर. एकूण चांगला सिनेमा आहे. Worth a watch.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Mon, 04/04/2022 - 09:17 नवीन
+१
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Tue, 04/05/2022 - 14:23 नवीन
मी "कौन प्रवीण तांबे ?" बघितला हॉटस्टारवर .. मस्तये ... प्रवीण तांबेचा संघर्ष पाहून, स्वतःचीच शरम वाटते (म्हणजे त्याच्या जागी आपण असतो थिओरिटिकली , तर आता पर्यंत १००० वेळा क्वीट केलं असतं मी ) राहुल द्रविडचे पात्र १-२ मिनिटाचेच , पण नो नॉन्सेन्स गाय ... आणि जात वैगरे आकस न ठेवता , सरळ अंगीभूत गुणामुळे चान्स देणे, हे द्रविडचे गुण भावून जातात ..
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 04/05/2022 - 16:55 नवीन
बघायचा आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Wed, 04/06/2022 - 09:40 नवीन
या प्रतिसादानिमित्ताने माहिती वाचली. प्रेरणादायी म्हणावं की दुर्दैवी, ते कळेना.
  • Log in or register to post comments
त
तर्कवादी Tue, 04/05/2022 - 15:48 नवीन
गुड टाईम (२०१७)
कुठे बघता येईल ? हिंदीत उपलब्ध आहे का ?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 04/05/2022 - 16:55 नवीन
सिनेमा हिंदीमध्ये नाही मिळायचा. सिनेमा फक्त यूएस मध्येच रिलीज केला होता असे विकिपीडिया वर समजते. सिनेमा नेटफ्लिक्स वर आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 04/10/2022 - 05:26 नवीन
गुड टाईम भलताच आवडला, आणि कुठंतरी वाचलं कि गुड टाईमचे वितरक- A24चे वितरक नेहमी व्यवसायासाठी अतिशय उत्तम सिनेमेच निवडतात. सिनेमे नेहमीच हटके असतात, आणि बऱ्याचदा खूप मोठी स्टार कास्ट किंवा सुपरीचीत नावे जोडले नसलेले सिनेमे असतात. (Indie films- इंडिपेंडन्ट सिनेमाचे लघुरूप) त्यांच्या सिनेमांची यादी पाहता, फक्त काहीच सिनेमे मी पाहिले होते- गुड टाईम, हेरेडिटरी, द रूम, द विच, द लाईटहाऊस. ह्यातले कोणतेही सिनेमे भंकस वाटले नव्हते- सगळे नाविन्यपूर्णच होते. हेरेडिटरी, गुड टाइम्स तर खूपच आवडलेले. द विच, द लाईटहाऊस आणि हेरेडीटरी तिन्ही भयपट आहेत. भयपट पाहायला आवडतात, आणि चांगल्या भयपटांचा कायम दुष्काळ जाणवत असतो, म्हणून भयपट म्हणून दर्शवलेला मिडसोमर बघितला. Image removed. कथेचा सेटप असा आहे- डॅनी नावाची तरुणी नुकत्याच एका धक्क्यातून गेली असते- तिची बहीण, आई आणि वडील एकदमच काही कारणाने निर्वतले असतात. त्यामुळे ती उध्वस्त झाली असते. तिचा बॉयफ्रेंड, ख्रिश्चन- हा द्विधा मनस्थितीत असतो. डॅनीची बहीण बायपोलर असते. त्यामुळे डॅनीला पूर्वीही तिची सतत काळजी वाटत असते आणि ती ख्रिश्चनचा आधार घेत असते. ख्रिश्चनच्या मित्रांना हे चुकीचे वाटत असते, आणि डॅनीने ख्रिश्चनवर असे ओझे टाकू नये असे वाटत असते. (ते दोघे तीन वर्षांपासून एकत्र असतात, तरीही !) आणि डॅनीला सुद्धा हे जाणवत असते आणि अपराधीपणाची टोचणी लागत असते. कुटुंबाच्या मृत्यूनंतर तिला कोणीतरी आधार देण्याची गरज वाटतच असते, पण ख्रिश्चनकडें आधार घेण्यास अपराधीपणा वाटत असतो. ख्रिश्चनचा मित्र जॉश स्वीडनमध्ये त्याचा थिसिस पूर्ण करायला जाणार असतो. त्यांचा पेले नावाचा स्वीडिश मित्र असतो- त्याच्या हार्गा नावाच्या गावी जाऊन त्याची पॅगन (नॉर्स देवतांची आराधना करणारी) कम्युनिटी पाहून त्यावर थिसिसचा एक भाग लिहायचा असा त्याचा प्लॅन असतो- सोबत ख्रिश्चन आणि मार्क नावाचा आणखी एक मित्र सुद्धा जाणार असतात. हि खूप दिवसांपासून प्लॅन केलेली ट्रिप असते तरी ख्रि. ने डॅनीला काहीच कल्पना दिली नसते. आणि मग अपराधी वाटून तो तिला यायचे आमंत्रण देतो (मित्रांना न विचारताच!)- आणि डॅनी स्वीकारते. यापुढील संपूर्ण सिनेमा स्वीडन मध्ये- हार्गा या कम्युनिटपाशी होतो. हि खूप जुनी कम्युनिटी असते. आणि ९० वर्षांतून एकदा होणारा, देवांना धान्य आणि मांस देण्यासाठी आभार मानायचा कार्यक्रम त्यावर्षी होणार असतो. त्यानंतर हार्गा बद्दल काही डिस्टर्बिंग गोष्टी हळूहळू अमेरिकन गटाच्या समोर येतात. हा भाग हॉरर म्हणून गणला जाऊ शकतो- पण माझ्यादृष्टीने ह्या सिनेमातला सायकॉलॉजिकल थ्रिलर भाग अतिशय कसबीचा आहे. एक शोकमग्न मुलगी आणि तिचा performative बॉयफ्रेंड यांच्या नात्यामधले awkward tension अगदी सुरेख पकडले आहे. सिनेमा दिसायला आणि ऐकायला अतीव सुंदर आहे. स्वीडनचे निसर्गसौन्दर्य अतिशय मस्त पकडले आहे. सोबतीचे संगीत सुद्धा सिनेमाच्या एक एक टप्प्याला अनुकूल आहे. हा सिनेमा नेहमीचा भयपट नाही, काहींना भयपट वाटणार सुद्धा नाही. पण मला नक्कीच भयपट वाटला. जम्प स्केअर एखाद्या दुसऱ्या वेळेसच वापरले आहेत. ८/१० (हेरेडीटरी च्या दिग्दर्शिकाचाच सिनेमा आहे.) (अमेझॉन प्राईम वर पाहू शकता.)
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 04/16/2022 - 05:16 नवीन
Image removed. एका देवभक्त ख्रिश्चन परीचारिकेचा एका मरणासन्न बाईशी संबंध येतो. हि बाई देवावर विश्वास ठेवत नसते, नर्सच्या दृष्टीत काही "पापकर्म" करत असते. नर्स स्वतःला देवाने बाईंचा स्पिरिच्युअल उद्धार करायला पाठवले आहे असे समजत असते. मग तिच्या व्यक्तिगत आयुष्यात वैगेरे ढवळाढवळ करायला सुरु करते. शेवट एकदम झकास जमलाय-अपेक्षित तोच असला तरी सुरेख घेतलाय. सिनेमा म्हणावा तर धार्मिक विचारांचा पगडा या विषयावर आहे किंवा म्हणलं तर मानसिकरित्या अस्थिर व्यक्तीवर आहे. नेटफ्लिक्स वर पाहू शकता.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 04/25/2022 - 05:43 नवीन
द बाबाडूक हा ऑस्ट्रेलियन सिनेमा पाहिला. एकटी आई आणि तिचा लहान मुलगा - बाबाडूक नावाच्या भूत/राक्षसाची गोष्ट वाचतात. हळूहळू त्यातल्या गोष्टी त्यांच्या घरात जाणवू लागतात... If it's in a word, or if it's in a book you can't get rid of the Babadook. A rumbling sound and three sharp knocks ba Ba ba... Dook Dook Dook That's when you'll know that he's around. Image removed. सिनेमा भयपट असला तरी काही मस्त रूपकं आहेत. पूर्ण सिनेमा बाबाडूकच्या ऐवजी अप्रिय आठवणींपासून सुटका मिळवण्यासाठी आहे असे म्हणता येऊ शकते :) I'll wager with you. I'll make you a bet. The more you deny the stronger I get. You start to change when I get in, the Babadook growing right under your skin सिनेमा आवडला- नेटफ्लिक्स वर आहे.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 04/25/2022 - 14:03 नवीन
Image removed. शनिवार-रविवार सेव्हिंग प्रायवेट रायन पाहिला. पहिल्यांदाच. सेव्हिंग प्रायवेट रायन विषयी नेहमीच ऐकत आलो होतो. पण इतकी वर्षे मी फक्त सुरुवातीची काही मिनिटे (नॉर्मंडी किनार्‍यावर उतरताना होणारी लढाई) पाहत होतो. शनिवारी ठरवून पाहायला सुरुवात केली. सुमारे पावणेतीन तासांचा चित्रपट असल्याने, शेवटचा तास जो जास्त उत्कंठावर्धक आहे, तो रविवारी सकाळी पाहिला. टॉम हॅन्क्स आहेच. पण त्यावेळी नवे असणारे आणि नंतर मोठे झालेले इतरही चेहरे आहेत. मुख्य म्हणजे मॅट डेमन. शिवाय विन डिजल आहे. xxx आणि F&F मालिकेआधीसुद्धा तो राउडीच होता. युद्धाचं चित्रीकरण भयानक आहे. ते वास्तवाला धरून असल्याचं वाचलंय. बाय द वे, सन्नीचा* हा सीन सेव्हिंग प्रायवेट रायनच्या शेवटच्या भागावरून प्रेरित असल्याचं जाणवलं :)
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 04/25/2022 - 16:05 नवीन
मस्त सिनेमा आहे. १९१७ हा सुद्धा आवडलेला युद्धपट आहे. पूर्ण सिनेमा वन शॉट आहे- विचार करून थक्क झालेलो. नंतर समजले की दिसताना वन शॉट असला तरी वेगवेगळे चित्रीकरण एकत्र जोडलेले आहेत.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर Mon, 04/25/2022 - 17:50 नवीन
आधी अवांतर : वन शॉट ही ट्रिक असली तरी आपण ट्रिक चा विचार न करता वन शॉट चा आनंद घ्यायचा. १९१७ भारीच पिक्चर आहे. दिग्दर्शक Sam Mendes. त्याचे स्कायफॉल, स्पेक्टर आणि १९१७ आवडलेले आहेत. पण त्याचा पहिला पिक्चर अमेरिकन ब्युटी अजूनही पाहिला नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/28/2022 - 13:57 नवीन
ईट फॉलोज खतरनाक सिनेमा. आवडला! जे नावाची टिनेज मुलगी तिच्या नवीन बॉयफ्रेंड सोबत सेक्स करते- आणि त्यानंतर तिला त्याच्याकडून समजते, कि त्याच्याकडून एक शाप आता तिच्याकडे ट्रान्सफर झाला असतो. एक बहुरूपी मारेकरी तिच्या मागे लागणार असतो- जो फक्त तिलाच दिसेल, आणि कोणत्याही रुपात येऊ शकेल. तिचा प्राण घेतल्यावर तो मारेकरी पुढील व्यक्तीकडे- म्हणजे त्या बॉयफ्रेंड कडे वळेल- असेच पुढे पुढे. त्या बॉयफ्रेंडला सुद्धा असाच कोणाकडून तरी प्रसाद मिळाला असतो. तो मारेकरी अगदी हळू असतो- पण सातत्यपूर्ण असतो. त्याची लक्ष्याकडे वाटचाल २४*७ चालू असते. त्याला मारणे किंवा नष्ट करणे शक्य नसते. जे कडे पर्याय आहेत- पळत राहणे, किंवा शाप ट्रान्सफर करणे- आणि ट्रान्सफर्ड व्यक्ती जास्तीत जास्त वेळ जगेल अशी अपेक्षा करणे. हॉरर, थ्रिलर- चांगले कॉकटेल आहे. नेटफ्लिक्स वर आहे- पण जिओ ब्लॉकड आहे भारतात. VPN वापरा किंवा पेशन्स असेल तर 123movies वापरा.
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर गुरुवार, 04/28/2022 - 15:24 नवीन
मिपाकरांसाठी आणखीन एक अभिमानास्पद घटना! ह्याच आठवड्याच्या सुरुवातीला अ.भा. मराठी साहित्य संमेलनात मिपाकर प्रा.डॉ. दिलीप बिरुटे ह्यांचे अभ्यासपूर्ण भाषण झाले, तर काल दिनांक 27 एप्रिल 2022 रोजी मिपाकर ज्योती अळवणी ह्यांची पहिली वहिली हॉरर वेब फिल्म 'Epilouge' (एपिलॉग) च्या मुहूर्ताचा कार्यक्रम पार पडला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि नव्या उपक्रमास हार्दीक शुभेच्छा! Image removed.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 04/28/2022 - 15:34 नवीन
ज्योती अळवणी यांचे अभिनंदन! कुठे पाहता येईल ?
  • Log in or register to post comments
ट
टर्मीनेटर Sat, 08/20/2022 - 08:09 नवीन
माफ करा कॉमी, मी विसरून गेलो होतो. ३ आठवड्यापूर्वी सहनिर्मात्यांनी त्यांच्या YouTube चॅनलवर पण ही वेबफिल्म अपलोड केली आहे. ही त्याची लिंक - https://youtu.be/s-663jmnfbo
  • Log in or register to post comments
ॲ
ॲबसेंट माइंडेड… गुरुवार, 04/28/2022 - 15:42 नवीन
ज्योतीताईंचे अभिनंदन.
  • Log in or register to post comments
B
Bhakti गुरुवार, 04/28/2022 - 16:13 नवीन
ज्योतीताईंचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 04/29/2022 - 12:08 नवीन
अभिनंदन ज्योतीताई.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/06/2022 - 18:50 नवीन
अभिनंद्न...! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/04/2022 - 13:08 नवीन
इट कम्स ऍट नाईट (२०१७) A24 सिनेमा. प्लॅटफॉर्म- नेटफ्लिक्स Image removed.

मुख्य संकल्पना आहे- एक लहानसे कुटुंब- नवरा बायको आणि त्यांचा टिनेज मुलगा- त्यांच्या आजोबांना रोग झाला म्हणून जड मनाने मारून टाकतात. बाहेर पॅन्डेमिक चालू असतो. नक्की काय रोग आहे आणि बाहेरच्या जगाची काय परिस्थिती आहे हे कळत नाही. केवळ रोगाची लक्षणे दिसतात. हा रोग वाढू दिला तर माणूस मरतो, का झोंबी होतो- आपल्याला काही कळत नाही. पण रुग्णाला जगू द्यायचे नाही आणि ताबडतोब संपवायचे अशी पॉलिसी या कुटुंबाची तरी असते. आणि ते सुद्धा बाहेरच्या जगाबद्दल भीती बाळगून राहत असतात. कारण बाहेर जरी इतर लोक असले, तरी कुटुंबाकडे असलेल्या अन्न आणि पाण्याच्या साठ्यासाठी ते हल्ला करतील अशी भीती असते. जेव्हा कधी कुटुंबातले लोक बाहेर जातात तेव्हा दिसते की सगळी जागा जंगला सारखी असते- यावरून समजते कि हा रोग सुरु होऊन काही वर्षे तरी झालीयेत. पण काही दिवसांनी त्यांच्या आयुष्यात आणखी एक कुटुंब येते- आणि त्यांच्यासोबत रहायला लागते. दोन कुटुंबांमधला एकमेकांवरचा विश्वास अगदी पातळ दोऱ्याने बांधला असतो. एकेमकांचे रिसोर्स वापरणे हा एकच कॉमन उद्देश असतो. त्यांच्या नात्यामधले वाढत जाणारे टेन्शन आणि त्याची परिणीती- असा सिनेमाचा प्रवास आहे. सिनेमा चांगला आहे. एका प्रकारे प्रेडिक्टेबल असला तरी प्रभावकारक मांडणी असल्यामुळे कुठेही कंटाळवाणे होत नाही. शेवट अगदी ओपन एंडेड आहे- बऱ्याच प्रकारे झालेल्या घटनांचे स्पष्टीकरण मिळू शकते. काही स्पष्टीकरणांमध्ये सिनेमाच्या नावाचे सुद्धा महत्व आहे. सायकोलॉजिकल थ्रिलर म्हणता येईल. जॉर्डन पिलचा (गेट आउटचा दिगदर्शक) Us म्हणून सिनेमा सुद्धा पहिला, इतका खास वाटला नाही. पिलचा नोप म्हणून सिनेमा येत आहे- थेटर मध्ये पाहायचे ठरवले आहे. पिलचा गेट आउट भारी सिनेमा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रचेतस गुरुवार, 05/05/2022 - 03:43 नवीन
मस्त परिचय. भारतामध्ये हा सिनेमा प्राईमव्हिडीओवर बघता येईल. एकंदरीत तुम्हाला भयपटांचे आकर्षण आहे असे म्हणता यावे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/05/2022 - 05:11 नवीन
भयपट खूप आवडतात. पण आता काँज्युरिंग टाईप सिनेमांनी इतकी भीती वाटत नाहीये, जरा हटके असेल तर मजा येते.
  • Log in or register to post comments
ह
हणमंतअण्णा शंक… Fri, 05/06/2022 - 23:48 नवीन
तुम्ही यातले काही सिनेमे पाहिले असतील तरीही इतरांना उपयोगी होयील म्हणून लिस्ट देतो.. १. The Witch (2015) उत्तम छायाचित्रण, साटल्य. २. It Follows (२०१४) एखादे मल्टीलेवल मार्केटिंग असावे तसे पसरत आणि झिरपत जाणारे भयतत्त्व. अत्यंत वेगेळे आणि उत्तम छायाचित्रण. यातले 'ईट' म्हणजे नेमके कशाला संबोधित करते यावर खूप मतमतांतरे आहेत. काही म्हणतात की इट म्हणजे 'ते' ग्लोबल वार्मिंग, लैंगिक रोग असल्या गोष्टींचे प्रतीक आहे. बाकी यावर दिग्दर्शक म्हणतो - मला 'ते' म्हणजे काय आहे आणि ते कुठुन येते यात अजिबात स्वारस्य नाही. हे स्वप्नातलं लॉजिक आहे. आणि जेव्हा तुम्ही भयस्वप्नात असता तेव्हा तुम्ही भयस्वप्न तर्काने उकलू शकत नाही. जरी तुम्ही उकलायचा मुद्दामहून प्रयत्न केला तरी. "I'm not personally that interested in where 'it' comes from. To me, it's dream logic in the sense that they're in a nightmare, and when you're in a nightmare there's no solving the nightmare. Even if you try to solve it.". ३. The Lighthouse (२०१९) विच नंतरची एगर्स ची हॉरर/अनोळखी विधा फिल्म. पुन्हा जबरदस्त छायाचित्रण. एगर्स हा खूप पुढे जाणार दिग्दर्शक म्हणून. ४. Tetsuo: The Iron Man बॉडी-हॉरर प्रकारल्या वेडगळ सिनेमांची सिरीजच आहे Tetsuo. ही फिल्म म्हणजे वेडगळपणाचा कळस आहे. ५. House (1977): माझी अजून एक आवडती जपानी फिल्म. फिल्म चा ट्रेलर.. थोडक्यात - जपानी लोकांना जॉज या स्पीलबर्गच्या सिनेमाला तोडीस तोड उत्तर देण्याची खुमखुमी आली. एका जाहिरात दिग्दर्शकाने फिल्मचा कोणताही अनुभव नसताना ही फिल्म बनवली. कथा त्याच्या लहान मुलीची. असली सगळी भट्टी जमून आल्यावर जे काही रसायन तयार झालं ते एकाच वेळी विनोदी, भितीदायक आणि बिझार. सर्वार्थाने भयंकर तरीही न विसरता येण्याजोगी फिल्म. ६. Hereditary (२०१८) ७. The Thing (1982). ही खूप दुर्लक्षिली जाणारी फिल्म आहे. परंतु ती आता कल्ट झालेली आहे. ८. Human Centipede (आगाउ सूचना: शक्यतो वाट्याला जाऊ नका) माणसं एकमेकांना तोंड ते गांड अशी जोडून गोमेसारखी शतपाद एंटिटी तयार करण्याविषयी ही फिल्म सिरीज आहे. खूप अजून फिल्म आहेत परंतु मला कंटाळा आलेला आहे म्हणून शेवटची एक देऊन थांबतो. ९. ही फिल्म. भयंकर हा एकच शब्द पुरेसा आहे. कथावस्तू, आणि फिल्म स्वतः देखील.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/07/2022 - 04:52 नवीन
Tetsuo, House आणि Human Centipede नाही पाहिले. पण यादीतले बाकीचे सगळे सिनेमे भन्नाट आहेत, त्यामुळे हे नक्कीच पाहणार. शेवटचा सिनेमा मात्र फार भयंकर आहे. तो एकदा प्रयत्न करून सोडून दिला, पुन्हा काय धाडस होणार नाही.
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम गुरुवार, 05/05/2022 - 17:37 नवीन
मग तुम्ही वेलकम होम बघितला असेलच.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 05/05/2022 - 18:33 नवीन
नाही पाहिला अजून.
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Fri, 05/06/2022 - 03:13 नवीन
आतापर्यन्तचा सगळ्यात जास्त भयपट म्हणताहेत लोक. तेही एकही विद्रुप मुखवटा आणि उगाचंच भयभीत करणारे पार्श्वसांगित न वापरता. फक्त्त पुढे काय होईल या उत्कंठेपाई लोक जाम घाबरतात.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Fri, 05/06/2022 - 11:33 नवीन
कुठला ईंग्रजी की हिंदी? युच्युबवर दोन दिसताहेत.
  • Log in or register to post comments
प
पॉपकॉर्न Sat, 05/07/2022 - 08:56 नवीन
कोणत्या भयपटाबद्दल आहे हे?
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Fri, 05/06/2022 - 13:15 नवीन
परिचय छान चालू आहेत. आवडले
  • Log in or register to post comments
स
सुरसंगम Fri, 05/06/2022 - 17:50 नवीन
हिंदी जो मुळात तेलगूचा डब झालाय.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 05/07/2022 - 01:59 नवीन
डॉक्युमेंट्रीज बद्दल लिहिलेले चालेल का हो कॉमी ?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 05/07/2022 - 04:53 नवीन
लिहा कि वाण्ड भाऊ.
  • Log in or register to post comments
ज
जेम्स वांड Sat, 05/07/2022 - 05:28 नवीन
हे फक्त डॉक्युमेंट्रीजला वाहिलेले ओटीटी चॅनल सुरू होण्याच्या आधी एपिक चॅनल वर त्यांचे कैक कार्यक्रम प्रक्षेपित केले जात होते, त्यात डॉक्युमेंट्री चे विषय बघूनच मजा आली होती जवळपास ३ डॉक्युमेंट्री मी बघितल्या होत्या १. टुरिंग टॉकीज व्यवसायावर असलेली :- टुरिंग टॉकीज व्यवसाय कसा सुरू झाला, कसा भरभराटीला आला अन कसा लयाला जातोय ह्यावर अप्रतिम चित्रण असलेली डॉक्युमेंट्री होती, विशेष म्हणजे पूर्ण भारतात टुरिंग टॉकीज घेऊन फिरणाऱ्या पार्टी ह्या बहुसंख्य सातारा जिल्ह्यातीलच असतात त्यांचे कुटुंब अन गावनिहाय भारतात फिरण्याचे प्रांत, रिल्स डिस्ट्रीब्युटर्स इत्यादी सगळे फिक्स असे. त्यांचे ट्रक पण मजेदार असत, सहसा सोलापूर किंवा सातारा, सांगली बाजूला असणारे दहा चाकी पुढे श्री ज्योतिर्लिंग प्रसन्न वगैरे लिहिलेले ट्रक, सॅटेलाईट प्रोजेक्शन टेक्नॉलॉजीमुळे / इंटरनेट/ मोबाईल क्रांतीमुळे धंद्याला आलेले मरण, नवीन पिढीचा निरुत्साह (धंदा करण्याच्या बाबतीत) अन जुन्या दिवसांच्या आठवणीत रमलेली भावुक जुनी खोडे असा मानवी भावनांचा मेळा वाटली होती ती डॉक्युमेंट्री २. कटीयाबाज - उत्तर प्रदेशात विजेचे आकडे टाकणारे, ती वीज वापरणारे आणि तिची मागणी ह्या समांतर अर्थव्यवस्थेवर असलेली डॉक्युमेंट्री, कटियाबाज म्हणजे स्वैर मराठीत आकडीबहाद्दर, कोणाच्या घरी लग्न आहे मौतमाती तेरावे चौदावे आहे पाहुणे गोळा होणार आहेत अश्या प्रसंगी कटियाबाजला बोलवले जाणार, तो मोठा बांबू घेऊन अवतरणार आणि जीवावर खेळून आकडे टाकून वीज पुरवठा जोडून देणार, त्याचे पैसे घेणार, त्यात काही वीज विभाग कर्मचारी पण हात ओले करून घेणार. सरकारी पातळीवरून कटियाबाज लोकांना आवरण्याचे आवाहन, त्यात असणारी स्थानिक समीकरणे, करायला काही नाही, शिक्षण नाही, नोकऱ्या नाहीत म्हणून कटियाबाजीला लागलेल्या पोरांची व्हर्जन्स, काही चिकटून मेलेल्या पोरांच्या कथा इत्यादी आहे त्यात, करुण रसाला चिकटून असलेली पण एक संवेदनशील डॉक्युमेंट्री. ३. वेटलँड्स ऑफ मुंबई - भांडुप उदंचन केंद्र अन कांदळवन, हिरानंदानी गार्डन्स, पोवई लेक, नवी मुंबई, मिठी नदी इत्यादी दलदली क्षेत्रे, तिथे येणारे परदेशी पक्षी पाहुणे, त्यांचे मुंबईच्या इकोलॉजीवर पडणारे प्रभाव, तापमानात होणाऱ्या वाढीमुळे त्यांच्यावर पडणारे असर, संवर्धनाचे प्रयत्न, स्थानिक कोळी-आगरी गट आणि वेगवेगळ्या एनजीओज मिळून करत असलेले काम, असे एक सकारात्मक उत्तम चित्रण होते त्या डॉक्युमेंट्रीमध्ये त्या बाबतीत आत्ता इतकेच आठवते खरे.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 09/04/2024 - 02:30 नवीन
टुरिंग टॉकीज , मराठी चित्रपट पण होता , गजेंद्र अहिरे दिग्दर्शित एक "प्रायोगिक / वास्तववादी " निर्माता आपला चित्रपट लोंकांपर्यंत पोचावा म्हणून अश्या टुरिंग टाकीज ची साथ घेतो असे काहीसे कथानक , कलाकार सुबोध भावे, किशोर कदम
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 09/04/2024 - 02:42 नवीन
आर्थिक झोल / घोळ यावरील माहितीपट/ शोध पत्रकारिता गोल्ड माफिया ,https://www.youtube.com/watch?v=evWEuVR1XIs स्टार्ट अप मध्ये एलिझाबेथ होम्स आणि रमेश बलवान या जोडीने नुसताच आर्थिक घोळ घातला नाही तर व्यद्यकीय उपकरणांचं बाबतीत हा घोळ असल्यामुळे लोकांचं जीवा वर पण बेतले https://www.youtube.com/watch?v=to2GSibbrv0 या शिवाय ६० मिनिट मध्ये पण यावर प्रकाश टाकण्यात आला आहे दुबई गँगस्टर पॅरॅडिस ??? https://www.youtube.com/watch?v=i823AhR8zKQ&t=19s
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 08/15/2022 - 17:25 नवीन
२०१८ मध्ये थायलंडची १२ मुलं आणि त्यांचा तरुण कोच थाम लुआंग नामक लांबलचक गुहेत गेलेले, आणि मान्सूनच्या अचानक आगमनामुळे गुहेत झपाट्याने पाणी जमा झाले आणि त्यांचे बाहेर पडणे अशक्य झाले. गुहेमध्ये काही ठिकाणी पूर्ण छतापर्यंत पाणी होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी नेव्ही सिल्स, थायलँडची जनता तसेच इतर अनेक देशातले स्वयंसेवक दिवसरात्र झटू लागले. सर्व जगाचे लक्ष मुलांच्या रक्षणावर होते. त्यांच्या रेस्क्यू मिशनची चित्तथरारक सत्यकथा सिनेमात घेतली आहे. कुठेही अतिरिक्त नाट्यकरण केले नाहीये, संयत पणे घटना उलगडली आहे. अगदी पाहण्यासारखा सिनेमा ! अमेझॉन प्राईम वर आहे.
  • Log in or register to post comments
प
पर्णिका Wed, 08/17/2022 - 00:52 नवीन
ही चित्तथरारक स्टोरी मी फॉलो करत होते... मुले आणि कोच सुरक्षित बाहेर आल्यावर खरंच आनंद झाला होता. नक्की पाहीन ही मुव्ही !
  • Log in or register to post comments
ह
हेमंतकुमार Sat, 09/03/2022 - 15:23 नवीन
अगदी पाहण्यासारखा सिनेमा !
>>>> +१११११ सुन्दर !
  • Log in or register to post comments
प
पर्णिका Wed, 08/17/2022 - 00:55 नवीन
(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.)
Chris Evans ची Gifted (2017) बघितली नसेल तर नक्की पहा. मला आवडली होती ही मुव्ही. :D
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sat, 08/20/2022 - 07:39 नवीन
नक्की बघेन. रोचक वाटतोय सिनेमा.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 7 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 8 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 8 hours ago
  • सुंदर !!
    1 day 8 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 8 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा