Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

सिनेमे

क
कॉमी
Fri, 03/25/2022 - 17:35
🗣 193 प्रतिसाद
(मी भरपूर सिनेमे पाहतो. नवे सिनेमे क्वचित पाहतो, मुख्यत्वे बॅकलॉग भरण्यावर भर असतो. इथे त्यांची नोंद ठेवणार.) गुड टाईम (२०१७) कथा- दोन भाऊ- कॉनी आणि निक, निक (धाकटा) मेंटली चॅलेंज्ड असतो. निकचे समुपदेशन चालू असताना कॉनी येऊन समुपदेशकांना खवचट कुजकट बोलत निकला घेऊन जातो- आणि त्याला घेऊन तो एक बँक लुटतो. त्याचा लुटीचा प्लॅन बऱ्यापैकी यशस्वी झाला असतो पण काही अडचणी येऊन ओम फस होते. लुटीचे बरेचसे पैसे वापरण्यायोग्य रहात नाहीत आणि , दुर्दैवाने निकला अटक होते. त्यानंतर कॉनी आपल्या भावाला सोडवण्यासाठी काय काय प्रयत्न करतो याचे सिनेमात चित्रण आहे. या कथारेखेवरून कॉनी बद्दलजे चित्र उभे राहते तसा कॉनी आजिबात नाही. तो अत्यंत धूर्त, लीलया आणि निर्विकारपणे खोटे बोलणारा, आपल्या साध्यांसाठी समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतील हे आजिबात न पाहणारा सायकोपॅथ दाखवला आहे. रॉबर्ट पॅटिन्सनची ट्विलाईट प्रतिमा झणक्यात पुसून टाकेल अशी कॉनीची व्यक्तिरेखा आहे. रॉबर्ट पॅटिन्सनच्या कॉनीला पाहताना संताप संताप झाल्याशिवाय राहणार नाही. खराखुरा वेगळ्या धाटणीचा सिनेमा. थ्रिलर अवडणाऱ्यांना नक्की आवडेल. रॉबर्ट पॅटिन्सन आवडत असेल तर सिनेमा मेजवानी आहे- त्याचा पाहिलेला सर्वोत्कृष्ट अभिनय. (प्रौढ प्रेक्षकांसाठीच !) ८/१०

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 57571 views

🗣 चर्चा (193)
क
कॉमी गुरुवार, 02/08/2024 - 12:58 नवीन
सॉल्व असे होणार नव्हतेच ना. जे मागे लागले आहे ते पुन्हा कधी ना कधी येणार हेच तर खरी भीती आहे. जे काही सोल्यूषन आहे ते तात्पुरते आहे. ती अनामिक गूढ शक्ती आहे ती तुम्ही कितीही जागा बदलल्या तरी अविरतपणे पाठलाग करत राहील.
  • Log in or register to post comments
र
राघव गुरुवार, 02/08/2024 - 10:23 नवीन
हॉरर, सायको थ्रिलर, साय-फाय यांच्या वाटेला मी सहसा जात नाही. मला साध्या हल्क्या-फुलक्या, कॉमेडी, सामाजिक ड्रामा किंवा बायोग्राफिकल मूवीज जास्त आवडतात. माझ्या all time favourite movies (before 2000) It Happened One Night (1934) Casablanca (1942) It's a Wonderful Life (1946) Lean on Me (1989) My Cousin Vinny (1992) A Few Good Men (1992) Groundhog Day (1993) The Shawshank Redemption (1994) Courage Under Fire (1996) Life Is Beautiful (1997) You've Got Mail (1998)
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 02/08/2024 - 13:02 नवीन
तुमच्या यादितले जे मी पाहिले आहेत ते सगळे आवडलेले सिनेमे आहेत.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 02/21/2024 - 17:30 नवीन
District 9 साऊथ आफ्रिकेत जोहानसबर्ग वर एके दिवस एक अवाढव्य स्पेसशिप येते. ते काही वर्ष तसेच राहते, त्याची दारे उघडत नाहीत. शेवटी माणसच वर शिपपर्यंत जाऊन दार फोडून आत जातात. तिथे लक्षावधी खंगलेले एलियन असतात. त्यांना खाली आणले जाते. तिथे त्यांना quarantine करण्यात येते. काही वर्षांत तिथे एलियन्सचा घेट्टो तयार होतो - डिस्ट्रिक्ट ९. वीस वर्षे जातात, आणि आता लोकल लोकं आणि प्रॉन्स असे नाव पडलेले एलियन, ह्यांच्यात भांडणं चालू झाली असतात. त्यामुळे सरकार एलियनना जबरदस्तीने स्थलांतरित करण्याच्या प्रयत्नात असते. त्यासाठी सर्व्हे करायला एक टीम डिस्ट्रिक्ट ९ मध्ये गेली असते. तिथे त्यातल्या एका माणसाचा योगायोगाने महत्त्वाच्या एलियन टेक्नॉलॉजीशी संबंध येतो, आणि त्या माणसाचे आयुष्य बदलते. उत्तम ॲक्शन पट. चांगली करमणूक झाली. Hulu वर आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 02/21/2024 - 17:33 नवीन
डब्ड आहे का??
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 02/21/2024 - 17:45 नवीन
हुलू वर दिसला नाही, पण चक्क युट्यूबवर कोणीतरी हिंदीत टाकलेला दिसतोय. गुगल केल्यावर सापडेल.
  • Log in or register to post comments
त
तुषार काळभोर गुरुवार, 02/22/2024 - 02:16 नवीन
+१ अतिशय मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत इस्क्वेअर मध्ये पाहिला होता. तेव्हा सायन्स फिक्शन पाहण्याच्या उद्देश्याने गेलो होतो. टाईमपास आहेच, पण दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदाची कहाणी या स्वरूपात पाहायला मिळते. विचार करायला लावणारा पिक्चर. २०१० च्या दशकात फाउंड फुटेज प्रकारे चित्रित केलेल्या चित्रपटांची लाट आली होती.
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 02/22/2024 - 04:46 नवीन
टाईमपास आहेच, पण दक्षिण आफ्रिकेतील वंशभेदाची कहाणी या स्वरूपात पाहायला मिळते. विचार करायला लावणारा पिक्चर.
अगदी. अपार्टहेडचे स्पष्ट रूपक आहे. अमेरिकेच्या मिलिटरी इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स वर पण टिप्पणी आहे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 03/03/2024 - 17:46 नवीन
ड्यून २ ड्यून २ बघितला. सिनेमॅटिक मास्टरपीस. खरेतर ड्यून कादंबरी पडद्यासाठी अवघड आहे. पाहिला सिनेमा किंचित धिमा होता, कारण पहिल्या पुस्तकातले सगळे मटेरियल कव्हर करायला दोन सिनेमे लागणार होते. पहिल्या सिनेमात पार्श्वभूमी तयार केली गेली. ह्या सिनेमात मिथक सुरू होते. ड्यून मालिकेची प्रमुख थीम आहे - संपूर्ण लोकसंख्येला पेटवू शकणारा नेता खूप हानिकारक ठरू शकतो. ही कल्पना विस्ताराने मांडण्यासाठी इस्लामशी समांतर असा काल्पनिक धर्म आणि त्या धर्माचा मसिहा पॉल अर्टेडीस उर्फ मु'आदीब आणि त्याच्या वंशजांची जीवनकथा ह्या मालिकेत येते. अतिशय थरारक सिनेमा. पहिला बघितला नसेल तर पहिला बघून मग हा आवर्जून बघणे सुद्धा वर्थ इट आहे हेमावैम. आता ड्यून मसायाची वाट बघणे आले. (पुढचा भाग.)
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Wed, 03/06/2024 - 08:17 नवीन
सध्या "शोगुन" ही मध्य युगीन जपानच्या काल्पनिक धर्तीवर आधारित मालिका बघतोय... ३ रा एपिसोड आलाय ... ३ ऱ्या एपिसोड मध्ये तर छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनातील (आग्र्याहून सुटका, पन्हाळगडचा वेढा ) याच्याशी कमालीचे साम्य असलेले, प्रसंग आढळले ...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 03/06/2024 - 15:30 नवीन
हिंदी डब आहे का??
  • Log in or register to post comments
क
कॉमी गुरुवार, 03/07/2024 - 12:18 नवीन
पहिला एपिसोड बघितला.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 05/13/2024 - 05:54 नवीन
गॉडझिला-मायनस वन बघितला. जबरी आहे. Toho ही जापनीज कंपनी गॉडझिला, काँग इत्यादी पात्रांची मालक आहे. त्यांनी हॉलिवूडला (मॉनस्टरव्हर्स साठी) सिनेमांची परवानगी दिली आहे तरी त्यांचे स्वतःचे सिनेमे सुद्धा येत असतात. शिन गॉडझिला आणि २०२३ चा गॉडझिला मायनस वन हे टोहोचे मॉडर्न गॉडझिला सिनेमे आहेत. हॉलिवूडच्या सिनेमांपेक्षा कथेवर जास्त भर देणारे सिनेमे आहेत. मायनस वन - दुसऱ्या विश्वयुद्धातल्या पराभवानंतर जपान अनेक बाबीत देशाच्या इतिहासातील सर्वात खालील पातळीवर होता - शून्य पातळीवर. ह्याच परिस्थितीत गॉडझिला टोकियो वर चालून येतो - म्हणून गॉडझिला मायनस वन. शिकिशिमा हा एक तरुण कामिकाझे पायलट असतो - शत्रूच्या जहाजावर धडकून विस्फोटात ठार होणे ही त्याची ऑफिशियल जबाबदारी असते. तो शेवटच्या क्षणी मागे फिरून एका बेटावर उतरतो. तिथे असलेले जपानी सैन्य कर्मचारी त्याच्याकडे आपले कर्तव्य चुकवणारा म्हणून बघत असतात. खोल समुद्रात राहणारे मासे मृतावस्थेत मोठ्या प्रमाणावर त्या बेटाच्या आसपास तरंगू लागतात आणि ह्या कॉलिंग कार्डच्या पाठोपाठ खुद्द गॉडझिला अवतरतो. मोक्याच्या वेळेस गॉडझिलाकडे बघून विमानातला शिकिशिमा स्तब्ध होतो, आणि त्याच्यासमोर बेटावरील जवळपास सगळे गॉडझिलाकडून मारले जातात. युद्ध संपते. शिकिशिमा बॉम्बिंग मध्ये उद्ध्वस्त टोकियोत परत येतो. घर, आई वडील - काही शिल्लक नसते. "सरव्हायव्हर्स गिल्ट"ने त्याची मनस्थिती विदीर्ण असते. आपण ड्युटी चुकवणारे कामिकाझे पायलट आहोत, आपल्या मुळे अनेक लोकं गॉडझिलाकडून मारली गेली हे विचार त्याला पोखरत असतात. निव्वळ योगायोगाने त्याला एका परिवाराची जबाबदारी मिळते, आणि तो युद्धात अमेरिका आणि जपानने समुद्रात पेरलेल्या अगणित सुरुंगांना शोधून निष्फळ करण्याची धोकादायक नोकरी घेतो. नवीन कामात आणि घरात थोडी स्थिरता येत असते तोच त्याचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा खोल समुद्रात गॉडझिलाशी संपर्क होतो. गॉडझिला टोकियो वर चालून येणार हे समजल्यावर शिकिशिमाचा भूतकाळ परत त्याला छळू लागतो. व्हिज्युअल इफेक्टचा ऑस्कर मिळालेला. खरेतर व्हिज्युअली सिनेमाचे कमी बजेट जाणवते पण कुठेही वावगे वाटत नाही. कथेतली पात्रं मस्त लिहिली आहेत. पाहण्यासारखा सिनेमा. (बघण्यासाठी दोन पर्याय - अमेझॉन प्राईम vpn करून जपान. किंवा पायरसी. तिसरा पर्याय सध्या उपलब्ध नाही.)
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/15/2024 - 14:49 नवीन
लोकसभा निवडणुकीच्या शारिरीक मानसिक थकवणा-या काळानंतर निवांतपणे नेटफ्लिक्सवर 'लापता लेडीज' सुंदर सिनेमा बघितला. चित्रपट मनोरंजन करतो आणि एक चांगला संदेशही देतो. अभिनेत्यांचा अभिनय, कथा, छायाचित्रण सुरेख. आवडला सिनेमा. नेटफ्लिक्सवर 'हिरामंडी' चा भाग एक संपवला. भव्य दिव्य सेट, छायाचित्रण, नृत्य, आणि स्वातंत्र्य संग्रामाची कथेचा पाया रचणारी सुरुवात उत्सकता लागली आहे. दुस-या भागाला सुरुवात केली आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
ग
गवि Wed, 05/15/2024 - 15:08 नवीन
खूप कष्टाचे पण अभिमानास्पद आणि सन्मानयुक्त असे पद, त्याची जबाबदारी तुम्ही अत्यंत सक्षमरित्या पार पाडलीत. देशाच्या वतीने धन्यवाद..
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/15/2024 - 15:34 नवीन
कौतुकाबद्दल धन्यवाद काका. ;) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 05/15/2024 - 16:44 नवीन
लापता लेडीज बघायचा प्लॅन आहे.
  • Log in or register to post comments
अ
अहिरावण Wed, 05/15/2024 - 16:45 नवीन
>>>खूप कष्टाचे पण अभिमानास्पद आणि सन्मानयुक्त असे पद, त्याची जबाबदारी तुम्ही अत्यंत सक्षमरित्या पार पाडलीत. देशाच्या वतीने धन्यवाद.. सहमत आहे. एकदा निकाल लागला की या काळातील अनुभवाविषयी आवश्यक ती काळजी घेत लेख लिहावा अशी विनंती.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 05/15/2024 - 15:54 नवीन
छान बिरुटे सर
  • Log in or register to post comments
B
Bhakti Wed, 05/15/2024 - 15:57 नवीन
+१
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Fri, 05/17/2024 - 17:24 नवीन
हिरामंडीच्या तिस-या भागापर्यंत पोहचलो. सालं कंटाळा येऊ लागलाय. बघतो अजून पुढे काय होतं ते...... -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
च
चित्रगुप्त Tue, 05/21/2024 - 03:57 नवीन
एकादे जबाबदारीचे आणि कष्टाचे काम व्यवस्थितपणे पार पाडणे ही मोठीच समाधानाची बाब असते. त्याबद्दल अभिनंदन. या अनुभवावर नक्की लिहावे ही विनंती. तुमचे लेख बरेच दिवसात वाचायला मिळालेले नाहीत.
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Tue, 05/28/2024 - 14:36 नवीन
या अनुभवावर नक्की लिहावे ही विनंती.
१०१ /- सहमत !
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Wed, 05/15/2024 - 16:13 नवीन
भक्ती आणि अबा धन्स. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/18/2024 - 13:04 नवीन
'सोसायटी ऑफ द स्नो' रग्बी संघातील खेळाडू आणि मित्राचं विमान निर्जन बर्फाळ उंचपर्वत रांगात कोसळतं महिन्या-दोन महिन्यातील भावना आणि जगण्याचा संघर्ष सुरु होतो. अडकले आणि शेवटी सुटले असे सिनेमे आवडतात सिनेमा मधे संथ वाटतो, कंटाळा येतो. पण सूटका होईपर्यन्त पर्यन्त पाहावे लागते. :/ -दिलीप
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 05/21/2024 - 09:19 नवीन
सध्या मार्वल स्टुडिओचे सिनेमे पाहतोय. म्हणजे आधी सगळे असे काही पहिले नव्हते. एक-दोनच पहिले होते. आणि अपत्ये, भाचरे-भाचऱ्या, पुतणे-पुतण्या वगैरे लोक त्याबद्धल जी चर्चा करतात त्यात मला पुरेशी माहिती नसल्यामुळे काहीसे बाजूला पडल्यासारखे होत होते. हवे तर FOMO म्हणा! पण सध्या थोडा वेळ आहे म्हणून पंधरा दिवसांपासून जसा वेळ मिळेल तसे पाहतोय. पाच-सात पाहून झालेत. त्यांतली मला सर्वात आवडलेली व्यक्तिरेखा म्हणजे टोनी स्टार्क. रच्याक, ते सिनेमे पाहण्याचा हा क्रम बरोबर आहे का? Chronological as per Story Lines
  1. Captain America: The First Avenger (1940s)
  2. Captain Marvel (1990s) (Mid-credit scene takes place after Avengers: Infinity War)
  3. Iron Man (2008)
  4. Iron Man 2 (2010)
  5. The Incredible Hulk (2010)
  6. Thor (2011)
  7. The Avengers (2012)
  8. Iron Man 3 (2012)
  9. Thor: The Dark World (2013)
  10. Captain America: The Winter Soldier (2014)
  11. Guardians of the Galaxy (2014)
  12. Guardians of the Galaxy Vol. 2 (2014)
  13. Avengers: Age of Ultron (2015)
  14. Ant-Man (2015)
  15. Captain America: Civil War (2016)
  16. Black Widow (2023) (Events take place after Captain America: Civil War)
  17. Black Panther (2016)
  18. Spider-Man: Homecoming (2016)
  19. Doctor Strange (2016-2017)
  20. Thor: Ragnarok (2017)
  21. Ant-Man and The Wasp (2017) (Post-credit scene occurs during Avengers: Infinity War)
  22. Avengers: Infinity War (2018)
  23. Avengers: Endgame (2018-2023)
  24. Spider-Man: Far From Home (2024)
क्रम चुकलेला असल्यास किंवा काही राहून गेलेले असल्यास सुधारणा करून द्यावी ही विनंती.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 05/21/2024 - 16:00 नवीन
ह्या क्रमात नका बघू. Published order म्हणजे जसे रिलीज झाले त्या क्रमाने बघणे सर्वोत्तम.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 05/25/2024 - 15:36 नवीन
'लंपन' सोनी लीव् वर आठ भागातली मराठी मालिका. 'लंपन' माझ्या पिढीला माहिती नाहीच. 'वनवास, शारदा, पंखा आणि झुंबर हे चारही कथासंग्रह अभ्यासक्रमात शिकवायला नव्हते म्हणून वाचले नव्हते. प्रकाश नारायण संत यांनी लिहिलेल्या 'लंपनच्या गोष्टी' छोट्या पडद्यावर आल्या आहेत. लंपन बघायला सुरुवात केली आणि 'म्याड' झाल्यासारखा हसत बसलो. आपलं हे वाचायचं राहून गेलं. सध्या पुस्तक वाचायची सवय राहिली नाही, हे शाळेतील दप्तरात भरलेल्या 'शहात्तर गोष्टी' सारखं पुन्हा पुन्हा स्वत:शी बोलत राहिलो. 'लंपन' प्रकाश नारायण संत यांचा मानसपुत्र, आई-वडिलांचे घर सोडून बेळगावाकडील रम्य निसर्ग परिसरात आजी-आजोबाकडे शिकायला आलेला. आजोबा पुरातत्त्व विभागाचे संशोधक. काठी घेऊन तड-तड़ करीत नातवामागे एकशे बेचाळीस वेळा धावणारी प्रेमळ आजी. मोठाले आणि काण्या डोळ्याचा भयंकर वाटणारा पण प्रेमळ नोकर बाबूराव. शाळा, संगीत, शाळेतील दोस्त आणि सुमी-त्रा त्याचे म्हणून पाहिले तरी हजार वेळा तो प्रसंग आपलाच घडतोय असे वाटणारे आपल्यातला लंपन. 'लंपनचं' भावविश्व, त्याचं मनोगत,त्याचा निरागसपणा, आई-वडिलांच्या आठवणी- प्रेम, नदी, फुलपाखरू, कौलारु घर, कंदील आणि निरागस नदीकाठावर बसलेला दात बाहेर आलेला दहा-बारा वर्षाचा स्वत:शी बडबड करणारा लंपन. 'सोनी लीव' वर दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी लंपनचं भावविश्व आतिशय सुदंर उभं केलं आहे आपण 'म्याड' झाल्यासारखे सारखं सलग पाहात राहतो. लंपनची भूमिका करणा-या मिहीर गोडबोले आपलं मन 'एकोणतीस हजार' वेळा जिंकून घेतो. मालिका संपता-संपता लंपनच्या मैत्रिणीसारखे आपण 'हजारवेळा' व्याकुळ होतो. प्रकाश संत यांचा 'लंपन' एकदा जरी बघितला तरी, पुस्तक न वाचताही 'शंभर वेळे'चा आनंद नक्की मिळतो. लंपन नक्की पाहा. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 05/26/2024 - 18:30 नवीन
खुपचं सुंदर रसग्रहण केले आहे! आज पाहिली ही सिरीज.. #लंपन मनातल्या निरागस बडबडीची साखळी बांधणारा प्रकाश नारायण संत यांचा मानसपुत्र.आईपासून दूर आल्यामुळे किंचित हिरमुसलेला पण आजी,आजोबा,सुमि-त्रा ,ढीगभर दांडगे मित्र,गावतले चार दोन घरोबा यात आपल्यासाठी आनंदाच्या गोष्टी साकारत राहतो. अगदी पहिल्याच भागात मार्जार अवतार हे बोक्याच्या खुसखुशीत वर्णन ऐकून मेंदूची प्लास्टिसिटी खाडकन जोडली गेली आणि वनवास कादंबरी फार पूर्वी वाचली होती हे आठवलं. कारवारी मराठी भाषेतला गोडवा,पोषाखतला जुनसर दिखामदारपणा, बारवेत फुललेली कमळे गुंडेमठाचा घनदाट रस्ता, शाळेतला घंटेच्या तालावरचा दंगा सारं काही मनाला गारवा देणारा आहे.लंपनच्या निमित्ताने घरात २१२२१ वेळा फिसकन,गडबडा हसलो आहोत. अगदीच 'म्याड' झाल्यानंतर नववारीतली आजीची आठवण येऊन गावकडे जायचा बैलगाडीचा प्रवास पुन्हा डोळ्यासमोरून तराळून गेला.तुम्हांला खोटं वाटेल पण माझी लेक (वय ९) यातल्या मधूर गीतांनीही भुरळून गेली आणि "काय सुंदर गाणं आहे" अशी दाद सहज देऊन गेली.लेकीला असं काहीतरी ओरग्यानिक देण्याची सतत धडपड असते. मालगुडी डेज कधीही लावून ते मी करत असते.आता लंपनही गवसला आहे.पुढच्या सीजनच्या प्रतिक्षेत... -भक्ती
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 06/03/2024 - 18:03 नवीन
रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा पाहायला सुरुवात केली तेव्हा चकचकीत उडता पंजाबी हिरो ,मिष्टी सुंदर हिरोईन,मध्येच त्यांच्या आजी आजोबांची जुनी अधुरी प्रेम कहाणी, दोन्ही कुटुंबांचा हिरो हिरोईनच्या प्रेमाला विरोध टिपीकल प्लोट वाटला.यावर चांगली जिलेबी टाकणार होते रिव्ह्यूचा. पण जेव्हा हिरोईन हिरो एकमेकांच्या घरी राहून एक प्रयोग करायचा ठरवतात.तेव्हा खुप इंटरेस्टिंग होतो सिनेमा.एकदम फ्रेश स्टोरी एक पुरुष म्हणून तो नृत्य करू शकत नाही? पुरूष स्त्रीयांना बायको' tag मधून मोकळीक कधी देणार?असे आणि खुप प्रश्नांची उत्तरे मिळवण्यात सिनेमा पुढे सरकत जातो.मस्त होत जातो सिनेमा,करण जोहर खरंच कधी अफलातूनपणे विचारात पाडतो. अरजित सिंगच्या वे कमलेया गाण्याने ह्रदयात जागा मिळवली आहे. वे कमलेया, मेरे नादान दिल दो नैनों के पेचीदा सौ गलियाँ रे इनमें खो कर तू मिलता है कहाँ तुझको अम्बर से पिंजरे ज़्यादा प्यारे उड़जा केहने से सुनता भी तू है कहाँ गल सुणले आ..
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 06/03/2024 - 18:13 नवीन
ता क.अभिमानाची गोष्ट ही की ,यातल्या कथक गाण्यातले काही नृत्य भाग माझ्या मैत्रिणीच्या बहिणीने जास्वंदीने तिच्या गुरूसह बसवले आहेत :)
  • Log in or register to post comments
आ
आंद्रे वडापाव Tue, 06/04/2024 - 15:58 नवीन
जास्वदीं यांच्या "गुरूने" गाण्यातले काही नृत्य भाग बसवले आहेत (जास्वदीं च्या मदतीने ) ?
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 06/04/2024 - 17:53 नवीन
हो बरोबर.
  • Log in or register to post comments
स
सावि गुरुवार, 06/06/2024 - 17:36 नवीन
लापता लेडीज किरण राव दिग्दर्शिका आहे, म्हणून बघावा कि नाही या संभ्रमात होतो, पण दुसरा कुठला पर्याय न सुचल्याने, - लापता लेडीज चित्रपट बघितला. २००१ च्या काळातील २ स्त्रियांची कथा, चुकामुक होऊन वेगळ्या ठिकाणी पोचल्या मुळे तयार झालेली परिस्थिती अतिशय सुंदर प्रकारे दाखवली आहे. २ वेगवेगळे रुपातले पुरुष आणि त्यांचे विचार, वेगळ्या प्रकारचे वुमन एम्पावरमेंट, चांगले आणि वाईट मिळणारे लोक आणि अनुभव, संशयास्पद हालचालीतून होणारे छोटेसे रहस्य, आणि त्या रहस्याचा मन प्रफुल्लित करणारा उलगडा ! रवी किशन आणि छाया कदम हे दोनच ओळखीचे कलाकार, आणि बाकीच्यांनी सुद्धा छान वास्तविक अभिनय केला. एक शांत सुंदर हळू हळू हसवत, मध्ये मध्ये मनाला डिवचत असा आवडलेला चित्रपट.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Sat, 08/03/2024 - 15:34 नवीन
मस्त टीपी झाला पाहिजे. -दिलीप बिरुटॅ
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 08/12/2024 - 07:14 नवीन
दोन दिवसांपूर्वी ओटीटीवर मराठी ’चुंबक’ सिनेमा बघितला. साहील जाधव, संग्राम देसाई आणि स्वानंद किरकिरे या तिघांचा हा सिनेमा. कथानक साधंसं. स्वानंदचा ’प्रसन्न”चा अभिनय नंबर एक. लॉटरी, फसवा फसवी, प्रामाणिकपणा, भन्नाट जमलंय सर्व. सिनेमा आवडला. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 08/18/2024 - 17:13 नवीन
दोन f1 रेसिंगवरचे सिनेमे पाहिले. पहिला फोर्ड वि फरारी. केन माईल्स आणि कॅरोल शेलबी ह्या जोडीची गोष्ट आहे. ह्या दोघांनी फोर्डच्या गाडीवर काम करून फरारीस नमवण्याचा कसा प्रयत्न केला ह्यावर सिनेमा आहे. ह्यात मग माईल्सचा विचित्र स्वभाव, फोर्ड मधले ब्युरोक्राटीक अडथळे वैगेरे वैगेरे गोष्टी येतात. ख्रिश्चन बेल आणि मॅट डिमन असून सुद्धा सिनेमा ठीक ठीक वाटला. उगाच खेचला आहे असे काही ठिकाणी वाटले. रश हा दुसरा सिनेमा. ह्यात निकी लौडा म्हणून ऑस्ट्रीयन रेसर आणि जॅक हंट ह्या ब्रिटिश रेसर मधली चुरस दाखवली आहे. अत्यंत calculating असणारा निकी आणि आतातायी जेम्स हंट ह्यांची पात्रे छान रंगवली आहेत. सिनेमा खूप आवडला. एकमेकांविरुद्ध स्पर्धा करताना स्वतःचे प्राण अधिकाधिक धोक्यात घालणाऱ्या हया रेसर्सच्या खऱ्या कथेत ड्रामा ओतप्रोत भरला आहे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Sun, 08/18/2024 - 17:54 नवीन
कॉमी तुम्ही दिलेला गृहपाठ पूर्ण केलाय. अमरेंद्र बाहुबली, हे बघितले नसतील तर नक्की बघा - 1. The departed- हिंदीत मिळाला नाही. इंग्रजीत मूवी एक्सप्लेशन पाहिलं आवडलं. मला लिओनार्डो दी कार्पिओ आणी मॅट डेमन ह्याच्यातला फरकच कळत नव्हता त्यामुळे सिनेमा समजत नव्हता. 2. Gone girl- हिंदीत मिळाला नाही. इंग्रजी एक्सप्लेशन शोधतोय युट्यूबवर. आज संपवेन. 3. Memento- हा आपला गजनी असल्याचे पहिल्या काही मिनिटातच समजल्याने बंद केला. 4. 12 angry men- हा डालो करून ठेवलाय. 5. Doctor Strangelove (or how I learned to stop worrying and love the bomb)- हिंदीत मिळाला नाही यूट्यूब एक्सपेलनेशन पाहिलं हिंदीत. छान होता. 6. Prisoner- हया नावाचे बरेच सिनेमे होते. २०१३ चा पाहिला लहान मुलीच्या किडनापिंग चा. आवडला. 7. Nightcrawler- डालो केलाय 8. Django unchained- डालो केलाय. 9. The Thing- मस्त सायफाय. आवडला. 10. Rosemary's baby- मस्त मस्त आणी मस्तच. भारी भयपट. हया व्यतिरिक्त द सायलेंस of द लांब्स पाहिला. आवडला.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 08/18/2024 - 20:00 नवीन
तुम्हाला सिनेमे आवडले हे ऐकून आनंद झाला. गझनी मेमेंटो वरून बेतला असला तरी memento ची गोष्ट पूर्णपणे वेगळी आहे. वरवरची संकल्पना सोडल्यास दोन्ही सिनेमे पूर्ण वेगळेच आहेत. आणखी काही recommendation - The big short Eyes wide shut Spotlight The princess bride The Witch
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 08/18/2024 - 19:33 नवीन
Fantastic Beasts हा हॅरी पॉटर मालिकेचा प्रीक्वल आहे. १.Fantastic Beasts and Where to Find Them २.Fantastic Beasts: The Crimes of Grindelwald हे दोन भाग पाहिले.तिसरा भाग उद्या पाहते. ३.Fantastic Beasts: The Secrets of Dumbledore आणि मग हॅरी पॉटरचे पारायण करावे लागेल का ,😀 या संस्थळावर सगळी टाईमलाईन सांगितली आहे. https://edrawmind.wondershare.com/movie-tips/fantastic-beasts-timeline.html#:~:text=As%20said%20earlier%2C%20Fantastic%20Beasts,Fantastic%20Beasts%20before%20Harry%20Potter.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Sun, 08/18/2024 - 20:12 नवीन
हॅरी पॉटरचे सिनेमे खरच भारी आहेत, तितके हे जमले नाहीत असे वाटले. तरी ह्यातला पहिला सिनेमा छान आहे. पण पुढे मात्र ग्रीन्डलवाल्ड आणि डम्बलडोर ह्यांच्या युद्धाची गोष्ट हया फ्रंचाईज मध्ये उगाच घुसवली असे वाटते. हॅरी पॉटर पुस्तकांत त्यांच्या युद्धाबद्दल काही संदर्भ आहेत त्यानुसार हि लढत अगदी ग्रँड असते. त्यावर सिनेमा काढायचा असता तर सरळ डम्बलडोरना मुख्य पात्र बनवून काढायला हवा होता. तर त्याऐवजी न्यूट हया फँटॅस्टिक बिस्ट मधल्या हिरोवर फोकस ठेऊन डम्बलडोर- ग्रीन्डलवाल्ड युद्धाची गोष्ट सांगण्याचा प्रयत्न फसला आहे असे वाटले. तिसरा सिनेमा तर अगदीच कसातरी होता.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 08/19/2024 - 08:03 नवीन
हो हॅरी पॉटर अधिक सरस आहे,पण मला हेही सिनेमे आवडले!
  • Log in or register to post comments
र
राघव Wed, 09/25/2024 - 15:36 नवीन
हॅरी पॉटरचे सिनेमे बघण्याआधी एकदा तरी पुस्तकं वाचून काढावीत. सिनेमे ग्राफिक्स म्हणून चांगलेच आहेत.. वादातीत.. पण पुस्तकातील अनेक गोष्टी त्यात नाहीत/गाळलेल्या आहेत. त्यामुळे अगोदर पुस्तकं वाचणं चांगलं.
  • Log in or register to post comments
B
Bhakti Mon, 08/19/2024 - 08:09 नवीन
बार्बी' पण पाहिला.खरच कमाल झाला आहे सिनेमा.मलाही असंच वाटायचं बार्बी ही स्त्रियांनी कसं सुंदर,रेखीव असावं याचं सिम्बॉल आहे.कधीतरी रागच यायचा.पण जर मुलींच्या आयुष्यातून बार्बी वगळून टाकली,आता स्त्री जशी आहे तशी सोशिक,पेट्रीआर्चीत अडकलेली अशीच दाखवली तर खूप काही गमावलेलं असेल.बार्बीचं स्थान स्त्रीयांसाठी अढळ आहे,एक स्वतंत्र व्यक्तीमत्व? 😇
  • Log in or register to post comments
क
कॉमी Mon, 09/02/2024 - 05:37 नवीन
छान सिनेमा आहे.
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Mon, 09/02/2024 - 07:40 नवीन
कंदाहार विमान अपहरण प्रकरणावर असलेली IC814 ही सहाभागांची मालिका नेटफ्लिक्सवर आहे. अपहरण झालेले प्रवासी, विमानातील पायलट, राजकारण, रॉ च्या घडामोडी आणि प्रवाशांचा जीवघेणा कोंडमारा. नातेवाईकांचा संताप, सरकारने, प्रवाशांच्या सुखरुपतेसाठी पत्करलेली शरणागती. मालिकेची ष्टोरी माहिती असल्यामुळे कधी एकदा शेवटाकडे जाऊ असे मालिका पाहतांना मधे मधे व्हायला लागते. :/ सर्वच घडामोडी मालिकेत दिसत नसल्या तरी, विमानातल्या महिला ष्टाफ. पायलट आणि शेवटी विमानातून उतरतांना उडालेला पायलटचा भावनेचा कल्लोळ कंठ दाटून आणतो. पंकज कपूर, नसीरुद्दीन शाह, मनोज पाहवा, यशपाल शर्मा, कुमुद मिश्रा, अरविंद स्वामी, दिव्येंदू भट्टाचार्य मजबूत अभिनय. विजय वर्माने साकारलेला विमानाचा पायलत तर अहाहा..! क्या कहने. IC814 ही एकदा बघायला हरकत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
B
Bhakti Tue, 09/03/2024 - 11:50 नवीन
नन आणि मुंजा हे दोन्ही सोकॉल्ड भूतांचे पिक्चर पाहिले.अजिबात भीती वाटली नाही;) मुंजा पाहताना तर खूप हसू येते . तसाच कोरियन डब्बड 'मून' चित्रपट पाहिला.यांची प्रेरणा बॉलीवूडच असावा,१०१ योगायोगात वेळेत हिरो चक्क वाचतो आणि जिवंत पृथ्वीवर येतो ;)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 09/03/2024 - 16:25 नवीन
हाणामाऱ्या समूह ऊर्फ फाईट क्लब पाहिला. क्लास आहे. मस्तच.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 09/04/2024 - 02:19 नवीन
१) मायकेल डग्लस आणि शॉन पेन यांच्या मुख्य भूमिका असलेला "द गेम " कुठे मिळण्यास नक्की पाहावा, म्हणाल तर भयपट म्हणलं तर वास्तव २) " नाईन क्वीन्स " हा यूरोपीय चित्रपट भाषा आठवत नाही " हैस्ट" ( झोल. गंडवणे इत्यादी) या पद्धतीत पण ऍक्शन वली हैस्ट नाही ( जशी द इइटालियन जॉब मध्ये होती तशी ) ३) "बीइंग जॉन मॉलकोविच" , एडवर्ड नॉर्टन ची मुख्य भूमिका, "विचित्र पट "
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Wed, 09/25/2024 - 17:09 नवीन
कौन (१९९९) उर्मिला मातोंडकर अभिनीत सिनेमा तूनळी वर पाहिला. अतिशय रोचक होता. प्रेक्षकांच्या मानसिकतेबरोबर ही हा सिनेमा खेळतो. उर्मिलाची एक्टिंग तर अप्रतिम. फक्त ३ ऍक्टर्स आहेत. अतिशय सुंदर. नक्की पहावा असा.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 9 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 9 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 9 hours ago
  • सुंदर !!
    1 day 9 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 9 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा