लक्ष्मणपूर, एक पडाव.....
"अन्नासाठी दाहीदिशा", या व्यंकटेश स्त्रोतातील श्लोका प्रमाणे जगदीशाने आम्हाला उचलले आणी जेथे भाग्योदय होणार होता (देवा घरचे ज्ञात कुणाला ) आशा गावी आणून सोडलं. तब्बल चौदाशे कि. मी. दूर, कोवळ्या वयातला मी, कधी आपली गल्ली सोडून दुसर्या गल्लीत खेळायला सुद्धा गेलो नव्हतो (मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही ) आसा स्वभाव होता.
गोविंदाग्रजांची ( राम गणेश गडकरी),
‘एखाद्याचे नशीब’ नावाच्या अर्थपूर्ण कविते मधल्या शेवटच्या ओळी सारखे आम्ही त्या मुळे "बुडत्याला काडीचा आधार" , म्हणून " आलिया भोगासी ".
" झाडें जोडुनी पत्रयुग्म फुटले मेघांप्रती याचती,
स्वच्छंदें जलबिंदु तोंच सगळया पानांवरी नाचती;
सारी पालवती, फुलें विहरती, शोभा वरी लोळते,
एखाद्यावर मात्र वीज पडुनी त्या जाळते पोळते !".
पहिल्यांदा आगगाडीत बसलो तेव्हां कुदंन लाल सैगल यांची "बाबूल मोरा नैहर छुटो ही जाय" , वाली "फिलींग",आली. स्वर्गातून नरकात आल्या सारखे वाटत होते. आपण क्षणभर थट्टा बाजूला ठेवूयात पण आजचा लेख लिहीण्याचा उद्देश काही वेगळाच आहे.
मित्रांनो मी स्वतःला भाग्यवान समजतो. भारत सरकारने असेतुहिमाचल दर्शन घडवले. मी आयुष्यातील जवळ जवळ एक तप लखनौ या अनोळखी शहरात राहीलो, वाढलो ,घडलो आणी माझ्या आयुष्यातल्या बऱ्याच महत्वाच्या गोष्टींशीं या शहराचा जवळचा संबंध आहे. म्हणूनच ते मला खूप आपलेसे वाटते. आज या शहरा बद्दल चार शब्द लिहून थोडे उतराई व्हावे म्हणतो.
त्रेतायुग ते आजतागायत हे शहर आपले अस्तित्व नुसते टिकवून आहे असे नाही तर त्याची आपली एक स्वतंत्र ओळख आहे. ५००० ख्रिस्तपुर्व , त्रेता युगात याचे नाव लक्ष्मणपूर होते. असे म्हटले जाते की लक्ष्मणाने या नगरीची स्थापना केली व नगरीच्या सुरक्षेच्या दृष्टीने इथे एक किल्ला बांधला होता़. एवढेच काय रामपुत्र कुश याने बसवलेले कुशावत, कुशीनगर म्हणजेच गोरखपूर येथून काही तासावरच आहे.
हे शहर गोमती नदीच्या काठावर, इथेच प्रभू श्रीरामांनी अश्वमेध यज्ञ केला. प्रभू रामचंद्र पुत्रद्वयीनीं इथेच रामकथा गायली आशी मान्यता आहे. गोमती नदी ही वसिष्ठ ऋषींची मुलगी आसा प्राचीन ग्रंथा मधे उल्लेख आहे. पिलीभीत या उत्तर प्रदेशातील शहरा जवळील "गोमत ताल बनाम फुल्लारी झील" मधून या नदीचा उगम झाला असून ती पुढे लखनौ, सीतापुर, जौनपुर वरून सहाशे मैलाचा प्रवास करत गंगे मधे समाविष्ट होते.
जवळच प्रभू श्रीरामांची अयोध्या नगरी आहे. अवध बिहारी हे प्रभू श्रीरामांचे दुसरे नाव. या प्रदेशातील बोली भाषा "अवधी ", म्हणूनही प्रभू रामचंद्र यानां अवध बिहारी या नावाने येथील लोक प्रेमाने संबोधतात. याला प्रमाण काय म्हणून विचारले तर मला सागंता येणार नाही.
दुसरी प्राचिनतम ओळख म्हणजे नैमिष्यारंण्य जिथे ८८००० ऋषींनी तप केले आणी ज्याचा प्राचीन ग्रंथात उल्लेख मीळतो ते स्थान सुद्धा गोमती नदीच्या काठावर. लखनौ पासुन ९० कि मी वर आहे. चक्रतीर्थ , व्यास गद्दी , हनुमानगढी सारखी अनेक तीर्थस्थळे तेथे आहेत.
महाभारत काळात व बौद्ध काळातही याचे अस्तित्व होते. लुम्बिनी, सारनाथ, कपिलवस्तू ही प्रसिद्ध बौद्ध तिर्थक्षेत्रे याच्या आसपासच आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर हे शहराला खुपच प्राचीन इतिहास आहे.
आजही 'लक्ष्मण टिला', नावाची एक छोटीशी टेकडीनुमा जागा आहे.इथेच श्री लक्षुमणाचे मंदिर होते ते मोगलांनी तोडून तेथे मशीद बांधली असे म्हणतात. "टिले वाली मस्जिद",या नावाने ती इथे बघावयास मिळते. लक्षुमण टिला आणी टिलेवाली मस्जिद मी बघितली आहे.
पठाण शासक हिंदुस्तानात आले आणि लुटमार करुन निघुन गेले परंतु मुघलिया सलत्नत, बाबर आणी त्याचे उत्तराधिकारी इथेच स्थिरावले व त्यांनी आपले साम्राज्य पसरले. अधिकारीक माहिती प्रमाणे, साधारणपणे १४००-१५०० इ. स. च्या दरम्यान मोहम्मद गझनी ने हिंदुस्तान वर आक्रमण केले तेव्हा त्याचा भाचा सय्यद सिलार " लक्ष्मणपूर", येथे आला व त्याने लक्ष्मण टिल्या (टेकडी) ' जवळ "लिकना किल्ला", बांधला व या शहराला लखनौ असे नाव पडले.
मोगलांना आपल्या राज्याचे छोटे भाग म्हणजे सुबे निर्माण करून त्यावर एक सुभेदार शासक नेमला. 'नवाब -वझिर' आसा खिताब देण्यात आला. लखनौ, फैजाबाद, बाराबंकी सर्व परिसर अवध प्रांत/सुबा (Oudh) या नावाने ओळखला जातो. मुघलीया सल्तनतचा एक सुबा ज्याचा प्रमुख सुभेदार परंतू ही नेमणूक वंशपरंपरागत नव्हती. पुढे मुघलीया सल्तनत रसातळाला जाऊ लागली तेव्हा इथले नबाब ताकदवर झाले. शुजा उदौला हा लखनौचा नवाब याने पानिपतच्या युद्धात मराठ्यांना मदत करू नये म्हणून नजिबखान रोहील्याने आकाश पाताळ एक केले. नबाबाने अब्दालीला मदत केली व मराठी साम्राज्याला एक वेगळेच वळण देण्यास कारणीभूत ठरला.
असफौद्दौला,चौथा नवाब याने प्रातांची राजधानी फैजाबाद इथे होती ती नंतर लखनौला आणली. या शहराचा खरा विकास नवाब असफौद्दौला याच्या काळात झाला. तो एक कुशल शासक व दयाळू होता. त्याच्या बद्दल म्हटले जाते की,
"जिसको न दे मौला, उसको दे असफौद्दौला".
त्याच्याच कारकिर्दीत बडा इमामबाडा ,रुमी दरवाजा ,दौलत खाना, चार बाग,मुसाबाग आशा कलात्मक आणी स्थापत्यकलेचा अदभुत ,आश्चर्य कारक इमारतीं आणी सुंदर बागा निर्माण झाल्या.
जेव्हां दुष्काळ पडला होता तेव्हा इमामबाडा बाधांयला सुरवात केली. दिवसा बांधकाम करायचे आणी रात्रभर ते तोडायचे कारण लोकांना काम मीळावे म्हणून ,खैरात , अनुदान देण्यास नबाब राजी नव्हता आशीही एक किवंदती.स्थानिक लोक लखनौला 'नखलवू' म्हणतात. इंग्रज याला 'लकनवू "(Lucknow) म्हणायचे.
येथील प्रत्येक वास्तूवर एक वेगळा धागा लिहीता येईल. येथील प्रत्येक इमारत आपली एक वेगळी ओळख जपून आहे, मग ती नबाबांनी, ब्रिटीशांनी कीवां स्वातंत्र्या नंतर बाधंलेली आसो. छतर मझिंल, सिकंदर बाग, दिलकुशा कोठी, रेजिडेन्सी,सतखंडा, बारादरी,बटलर पँलेस, जनरल पोस्ट आँफिस , ला मार्टिनियर स्कुल ( Claude Martin, French m Major General who fought for the British; established La Martiniere Schools at Lucknow on 1 Oct 1857. हि एक प्रख्यात स्कुल गोमती नदीकाठी आहे.) आगदी चार बाग रेल्वे स्थानक आणी विधानसभा सुद्धा प्रेक्षणीय आहे. सन सतराशे आणी त्यानंतर बाधलेल्या इमारती आता पडक्या ,जीर्ण झालेल्या आसल्या तरी त्यांचा गत वैभवशाली इतिहास सहज लक्षात येतो.
खंडहर की हर ईंट गवाह है
वीराने के पहले बहार हुआ करती थी
टुटे हुये छज्जे और मेहराब
बयाँ करते है
इमारते बुलंद और हस्तीयाँ
कितनी उचीं हुआ करती थी।
-कसरत
आताचे लखनौ जुन्या इमारती, मुस्लिम, नबाबी , फिरंगी संस्कृती च्या खुणा व नवीन गगनचुंबी इमारती, उड्डाणपूल, मेट्रो, बोट्यानिकल गार्डन तथा आंबेडकर पार्क सारख्या आधुनीक सुखसोयी याचा सुरेख संगम आहे. आमचे मीत्र सांगतात की शहरातील रौनक अजूनच वाढली आहे.
खुपच मोठा इतिहास व सांस्कृतिक वारसा असणारे हे शहर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ही आग्रणी होते. बेगम हजरत महल, उदो देवी सारख्या वीरांगनानीं स्वातंत्र्य वीरांच्या खाद्यांला खादां देत ब्रिटीश सरकारच्या तोंडचे पाणी पळवले होते.
Darogha Ubbas Alli in his book " The Lucknow Album " , या १८७४ च्या पुस्तकात फिरंग्याची स्तुती करताना स्वातंत्र्य वीरानां "Fanatic and barbarous foe ", म्हणले आहे.
इंग्रज कवी आल्फरेड लाँर्ड टेनिसन (Alfred Lord Tennyson ), यांनी लखनौच्या रणधुमाळीत फिरंगी कीती गलितगात्र झाले होते याचे वर्णन आपल्या , "The Defence Of Lucknow", पोवाड्यात (Ballad) केले आहे.
"we were every day fewer and fewer.
There was a whisper among us, but only a whisper that past ‘Children and wives
if the tigers leap into the fold unawares
Every man die at his post and the foe may outlive us at last
Better to fall by the hands that they love, than to fall into theirs!"
वरील ओळीत " feeling of impending doom " चे भाव आणी तत्कालीन फिरंग्याचे नैराश्य स्पष्ट दिसून येते.
Lucknow (The capital of Oudh),
An illustrated guide to places of interest with history and Map, by
Lt Col H A Newell, यांनी स्वातंत्र्ययुद्धा नंतर लिहीलेले पुस्तक तत्कालीन शहराचे यथार्थ चित्रण करते. आताचे शहर तो वारसा अजूनही जपून आहे.
१८५७ चा स्वातंत्र्यलढा, याच शहरा जवळ चिनहट येथे झालेला पहिला स्वातंत्र्य संग्राम , रेजिडेन्सी मधे स्वतंत्रता सेनानी नी केलेल्या इग्रंजाचा दारूण पराभव, तब्बल सत्त्याऐशीं दिवस फिरंग्याना सळो की पळो करून सोडले होते, एक ना अनेक घटना प्रत्येक देशवासीयांना अभिमानास्पद आणी प्रेरणादायी आहेत.
"बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें
मोरा अपना बेग़ाना छूटो जाए |
बाबुल मोरा ...
अंगना तो पर्बत भयाssss और देहरी भयी बिदेस
जाए बाबुल घर आपनो मैं चली पिया के देस | बाबुल मोरा "
ही ठुमरी आपण कित्येकदा ऐकली असेल. गायक कुंदन लाल सैगल. बरेच जण यांच्या आवाजाचे चाहते असाल. ही ठुमरी शेवटचे नबाब वाजिद अली शाह नी लिहीली आहे.
इ स १८५७ चा स्वातंत्र्य संग्राम जवळ जवळ संपत आला होता. अवधचा शेवटचा नवाब वाजिद अली शाह यांना ब्रिटिश फौजा पकडुन कलकत्त्याला घेऊन चालले होते त्यांना इतके दुःख झाले आणी त्यावेळी ही बंदिश त्यांनी बांधली. १७० वर्षानंतरही अजूनही तेवढीच पसंत केली जाते. नबाब वाजिद अली शहा एक बहुचर्चित बदनसिब नवाब होता. ३०० बायका, ऐय्याश वेगैरे. परंतू ठुमरी कथ्थक नृत्य ,अवधी खान पान याच्याच काळात नावारूपाला आले. "मोती बिर्याणी ", हे शाही पकवान याच बदनसीब नबाबाने लखनौला दिले. केसरबाग , बारादरी आणी आलम बाग या गोष्टी त्याच्याच काळातील. त्याला बुद्धिबळ, संगीत आणि नृत्य यात विषेश रुची. लखनौ घराणा हा तीन प्रमुख कथ्थक घराण्यात एक. कथ्थक आणी ठुमरी यांची सागंड घालण्याचे प्रयोग याच नबाबांनी केले. तो एक धर्मनिरपेक्ष नवाब होता. त्यानी भगवान श्रीकृष्ण करता लिहिलेली ठुमरी आज सुद्धा होळीच्या दिवशी गायली जाते,
" मोरे कान्हा जो आए पलट के,
अब के होली मैं खेलूंगी डट के..."
जेव्हा इंग्रज नबाबाला पकडायला आले तेव्हा तो आपल्या महालात होता. त्यावेळेस पायात जुती(चप्पला) चढवण्या करता कोणीही सेवक नसल्यामुळे तो पकडला गेला ( हमारे पैरोंमे जुतीया चढानेवाला हमारा खिदमतगार नही था, वरना फिरंगीयोमे कहाँ इतनी हिम्मत की जो हमे पकडने की जु़र्रत करते।) . याला काही इतिहासकारांनी दुजोरा दिला. "इसको बोलते है नबाब"।
जेव्हां लखनऊ वर इंग्रजांनी कब्जा केला तेव्हा नबाबाचा मुख्य प्रधान ओक्साबोक्शी रडू लागला तेव्हां नवाब वाजिद अली शाह म्हणाले " सिर्फ शायरी और मौसीक़ी (संगीत) ही मर्द की आँखो में आँसू ला सकते हैं"। ज्यावेळेस इंग्रज नबाबाला घेऊन चालले होते त्या वेळी ते बिलकुल शांत होते. "शतरंज के खिलाडी ", सत्यजित रे यांची एक फिल्म सुद्धा लखनऊ च्या नबाबा वर आहे ,सर्वानी पाहिलीच असेल. नबाबाचा मुख्य प्रधान याने पकडले जाण्याची कुणकुण लागताच राज्याचा खजीना शाही बावली (विहिर) मधे लपवला. इंग्रजानी जंग जंग पछाडले पण तो खजीना त्यांच्या हाती लागला नाही. शाही बावली स्थापत्यकलेचा कुटनिती व सुऱक्षे करता उत्तम उपयोग बडा इमामबाडा आणी शाही बावली मधे केलाय.
प्रसिद्ध," काकोरी कांड",ते रेल्वे स्थानक जवळच आहे. इथेच क्रांतीकारक पं रामप्रसाद बिस्मिल्ल, आणी साथीदारांनी फिरंग्याचे खजीना हस्तगत केला. फिरंगी इतिहासकार याला लुटला म्हणतात. लखनौ येथील " रींग थिएटर ",(आताचे जनरल पोस्ट आँफिस ) मधेच क्रांतीकारकां वर खटला चालवण्यात आला व फाशी आणी कठोर कारावासाची शिक्षा दिली गेली. खिलाफत मूव्हमेंट, काँग्रेस अधिवेशन आशा अनेक महत्त्वाच्या घटना इथे घडल्या.
हे शहर नज़ाकत,तहजिब ', टुंडे कबाब, पान की गिलोरिया, इक्का (टांगा), चिकनकारी, दशेहरी आम, वास्तु व स्थापत्यकला " याकरता जगभरात प्रसिद्ध आहे व देशी विदेशी प्रवाश्यांना आपल्याकडे आकर्षित करते.
“ तहजीब “, म्हणजे सभ्यता, शिष्टचार, एकमेकां बरोबर आदराने वागणे. इथे प्रत्येक जण स्वताःला किवां दुसर्याला “आप” असे आदरार्थी संबोधन वापरतात. जर एखाद्या व्यक्तीला “ तुम “ आसे संबोधित केले तर नक्कीच भांडण होणार म्हणून समजायचे. भाषा गोड आहे आणी कमालीची आदब येथील लोकांमधे दिसुन येते.
शोहरत,नजा़कत ,तहजी़ब,खानपान व लखनौ चे अस्तित्व हे नबाबां मुळे. येथील बहुतांशी गोष्टींचा उल्लेख त्या त्या काळातील नबाबा शिवाय होऊच शकत नाही. मग त्या प्रसिद्ध इमारती असो किंवा संगीत, नृत्य ,खान पान अथवा स्वतंत्रता संग्राम
येथील आंबा महोत्सव, वेगवेगळ्या महिन्यातील फुलांची जसे गुलाब, शेवंती(गुलदाऊदी), डेलिया, ग्लाडिओलस इ. ची प्रदर्शने तर नँशनल बोटॅनिकल गार्डन मधील विविध प्रकारच्या निवडुंगाच्या प्रजातीचे ग्रीन हाऊस एक ना दोन मंत्रमुग्ध करणारी स्थळे वर्षभर याचे नाविन्य टिकून राहण्यासाठी मदत करतात. इथला आंबा महोत्सव एक लाइफ टाइम अनुभव आहे.
आशी एक किवंदती, जेव्हां पानिपतच्या युद्धात मराठ्यांना अपयशाचा सामना करावा लागला त्याची बातमी लखनौमध्ये मराठ्यांच्या छोट्याशा छावणीत आली तेव्हां सर्व म्हणत होते "गडबड झाली, गडबड झाली " .जेथे ही छावणी होती त्या जागेला आजही "गडबड झाला ", या नावाने ओळखले जाते , खरे खोटे माहीत नाही
या शहरात मराठी समाज आपली ओळख जपून आहे. गणेशोत्सव, कोजागिरी, दिवाळी, संक्रांत या सारखे सणवार आणी वार्षिक स्नेहसंमेलन उतम रीतीने साजरे होतात. या प्रसंगी महाराष्ट्रातील नाटय संस्था, प्रसिद्ध व्यक्तीनां बोलावले जाते. स्थानिक मराठी उत्साही कलाप्रेमी नट नाटकांचे मचंन करतात. सर्वश्री व पू काळे व लक्ष्मण देशपांडे याच्याशी व्यक्तीगत भेट इथेच झाली.
सदर बझार , तोफखाना, काली पलटन ,गोरी पलटन आशा नावाची ठिकाणे आजही बरेच शहरात बघावयास मीळतात. लखनौच्या सदर बाजारा जवळ एक देवधर आजी आजोबा व त्यांचा परीवार त्यांच्या मोठ्या विश्रामबागवाडा सदृश महालनुमा कोठी मधे राहात होते. तेथेच छपरी पंलग म्हणजे काय असतो बघायला मिळाला. पेशवाईतले त्यांचे पुर्वज इथे मुलुखगिरी वर आले ते इथेच स्थाईक झाले. त्यांच्या घरी दिवाळी अंक घेण्यासाठी गेलो आसताना आजींनी आमच्या सौं ची ओटी भरली, सागंण्याचा उद्देश जरी या लोकांनी महाराष्ट्र जरी पाहीला नाही तरी चालीरीती पाळून आहेत.
प्रसिद्ध भातखंडे संगीत महाविद्यालय,लखनौ(earstwhile United Province) ,संगीत शिरोमणी पंडीत विष्णू नारायण भातखंडे यांनी राय उमानाथ बली व तत्कालीन शिक्षण मंत्री राय राजेश्वर बली यांच्या बरोबर १९२६ मधे प्रस्थापित केले. पं सी आर व्यास,, अनुप जलोटा,तलत महमूद सारख्या मोठ्या हस्ती या विश्वविद्यालयातूनच शिकल्या. द टाईम्स ऑफ इंडिया चा १५० व्या वर्धापनदिनानिमित्त पं राजन साजन, गिरीजादेवी यांच्या अवीट सुरावटीचा आनंद दिलकुशा कोठी मधील आयोजनात मीळाला.
मोहम्मद तकी, तखल्लुस मीर तकी मीर (१७२३-१८१०) इथलेच ज्यांची गझल गेली तीनशे वर्ष सगीतप्रेमीच्या कानात विराजमान आहे.
" दिखाई दिए यूँ कि बे-ख़ुद किया
हमें आप से भी जुदा कर चले",
विविध क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी केली आशा अलीकडच्या काळातील प्रसिद्ध व्यक्ती ज्यांना कुठल्याही प्रकारची ओळख करून देण्याची गरज नाही त्यां पैकी काही व्यक्ती म्हणजे जां निसार अखतर , नौशाद, अमृतलाल नागर, के पी सक्सेना(हास्य कवी) , श्री लाल शुक्ल (राग दरबारी) आणी आशा आनेक मान्यवरांची नावे सांगता येतील.
ऐतिहासिक स्थळाचे वर्णन म्हटंले की ओघाने वास्तूंचे फोटो अपेक्षीत पण त्या काळात क्लिक थ्री आणी आग्फा आयसोलीचे काढलेले फोटो सुद्धा इतीहासजमा झालेत. आतंरजालावर भरपूर फोटो आहेत. काँ पे मधे मजा नाही.
बरेच काही लिहिता येईल पण कंटाळवाणा होण्या आगोदर इथेच थाबंलेले बरे.
काही माहीती वाचण्यात आली , स्थानिक पुरातत्त्व वास्तूनां भेट दिल्यानंतर किंवा लोकांकडून ऐकायला मिळाली आणी सध्या अतंरजाला वर सुद्धा उपलब्ध आहे.
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments
- Log in or register to post comments