ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग २
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.
गोव्यातील पोरी (Poriem) मतदारसंघातून २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंविरूध्द निवडणुक लढवून पराभूत झालेले भाजपचे विश्वजीत राणे यांनी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापसिंग राणेंच्या चिरंजीवांचे नावही विश्वजीतच आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नामसाधर्म्यामुळे सुरवातीला वाटले होते की त्यांनीच आपमध्ये प्रवेश केला की काय. पण दुसर्या विश्वजीत राणेंनी पक्ष सोडला आहे.
एकंदरीत गोव्यात भाजपचे तितके सोपे दिसत नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मान्द्रेमधून काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांनी दणदणीत पराभव केला होता. २०१९ मध्ये जे काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाले त्यात हे दयानंद सोपटे होते. आता मान्द्रेमधून आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री दयानंद सोपटेंना आहे तर लक्ष्मीकांत पार्सेकर सुध्दा आपला दावा सोडायला तयार नाहीत असे दिसते. एकेकाळी याच पार्सेकरांनी रमाकांत खलप यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा मान्द्रेमधून एकदा नाही तर दोनदा पराभव केला होता. पण त्यांचा २०१७ मध्ये दयानंद सोपटेंनी तब्बल २५% मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे दोघेही आपला दावा सोडायला तयार दिसत नाहीत. इतक्या घाऊक प्रमाणात काँग्रेसमधून आमदार आयात केल्यानंतर ही डोकेदुखी भाजपला नक्कीच होणार होती.
त्याचप्रमाणे विधानसभेचे माजी अध्यक्ष अनंत शेट यांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यांचे बंधू प्रेमेन्द्र शेट यांनी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात प्रवेश केला आहे. अनंत शेट उत्तर गोव्यातील मये मतदारसंघातून निवडून यायचे. त्याचप्रमाणे उत्तर गोव्यातील कळंगूटचे आमदार मायकेल लोबो यांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर गोव्यातीलच म्हापसा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा अगदी आरामात निवडून येत असत. ते मनोहर पर्रिकरांचे मित्र होते आणि पर्रिकरांच्या आग्रहावरूनच ते भाजपमध्ये आले होते. मनोहर पर्रिकरांचे निधन झाले त्यापूर्वी दीड-दोन महिने या फ्रान्सिस डिसूझांचेही कर्करोगानेच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जॉशुआ अगदी थोडक्यात जिंकला होता. त्यावेळी भाजपने पर्रिकरांची विधानसभा जागा- पणजी पण गमावली होती. पणजी हा १९९४ पासून भाजपचा बालेकिल्ला होता आणि मनोहर पर्रिकरांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यातच झालेल्या पोटनिवडणुकीत देशात प्रचंड मोदी लाट असतानाही ती जागा भाजपने गमावली होती.
तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या उत्तर गोव्यात भाजप बळकट होता तिथेच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये अशाप्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या पडझडीला पर्रिकरांच्या शेवटच्या टर्ममध्येच सुरवात झाली होती हे पणजीतील पराभवावरून समजतेच. त्यातही जर बाबूश मोन्सेराटसारख्या फालतू आणि घाणेरड्या माणसाला भाजपने घरी घेतले असेल तर they deserve to lose. पण विरोधी पक्ष तितका प्रबळ राहिलेला नाही त्या कारणानेच भाजपला विजय मिळाला तर मिळू शकेल. अन्यथा गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे कठिण आहे.
मला स्वतःला गोवा हे राज्य प्रचंड आवडते त्यामुळे या निवडणुकांमध्ये मी खूप जास्त रस घेत आहे. जशाजशा नवीन घडामोडी होतील त्याप्रमाणे इथे लिहिनच.
🗣 चर्चा
(256)
क
कॉमी
गुरुवार, 12/02/2021 - 06:07
नवीन
शाहरुख म्हणले कि वाईटात वाईट इंटरप्रिटेशन करायचं ?
अच्छा, म्हणजे "तुझा मुलगा लाडावलेला आहे का?" या प्रश्नावर "हो माझा मुलगा तीन वर्षांचा झाला की त्याला ड्रग्ज करण्याची आणि सेक्स करण्याची परवानगी देणार आहे" असे विनोदाने उत्तर शाहरुखने दिले. हा १५-१६ वर्षांपूर्वीचा इंटरव्ह्यू आर्यन खानने इतर तरुण मुलांनी पाहिला आणि ते प्रोत्साहित झाले ? ख्या ख्या ख्या.
(ओपिइंडिया कचरापट्टी हे नेहमीचे आहेच. गौरी खान बर्लिन ऐरपोर्ट वर पकडली गेल्याचा क्लेम तपासण्यायोग्यच नाहीये. मूळ घटनेचा न्यूज रिपोर्ट कुठेही सापडत नाही. तरी ओपी वाल्यानी alleged शब्द सुद्धा न वापरता त्यांना खात्री असल्यासारखे सांगितले आहे.ऑप वाल्यानी ज्या इंडिया टाईम्सचा सोर्स दिलाय- ती फेक न्यूज देणारी साईट आहे.)
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 12/02/2021 - 06:16
नवीन
शाहरुखचा सेन्स ऑफ ह्युमर आणि सर्काझम हा उच्च कोटीचा असतो. तो समजण्यासाठी मुळात शाहरुख काय चीज आहे हे समजण्यासाठी तपस्या करावी लागते. त्याची एखादी मुलाखत किंवा त्याचे एखादे वाक्य ऐकून अजिबात मत बनवू नये. पूर्वग्रहाने तर नाहीच नाही.
- Log in or register to post comments
क
कॉमी
गुरुवार, 12/02/2021 - 06:45
नवीन
ह्युमर/उपहास समजत नाही अशातला भाग नाही. लिटरल अर्थ आणि वे ऑफ स्पिकिंग व्यवस्थित समजतो त्यांना.
१५ लाखाचा जुमला नाही काय त्यांना व्यवस्थित समजला :) तिथे अर्थांमधले आणि काँटेक्स्ट मधले बारीक फरक व्यवस्थित समजलेले :)
गुगलवर "सुबोध खरे पंधरा लाख मिसळपाव मोदी" किवर्ड ने लगेच रिझल्ट आला
😂
- Log in or register to post comments
स
सुबोध खरे
गुरुवार, 12/02/2021 - 07:42
नवीन
मी वरच म्हटलंय कि ते तो विनोदाने बोलला परंतु असे वक्तव्य पत्रकार कसे विचित्रपणे सादर करतात.
यासाठी आपण कुठे काय बोलतो आहोत यायचे तारतम्य असावे लागते.
बाकी तुम्ही प्रतिसादातील माझे इतर मुद्दे दुर्लक्षित करणार याबद्दल मला संदेह नव्हताच. ते तुमच्या विचारसरणीला धरून होतेच.
परंतु बॉलिवूड मध्ये किंवा व्यसनमुक्ती केंद्रात काम केले असते तर तुम्हाला या उदात्तीकरणाचे भयानक परिणाम समोर आले असते.
सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढताना सांगितले कि गेल्या दशकात ६० लाख किलो अमली पदार्थ पकडले होते त्यापैकी १६ लाख किलो नष्ट केले आणि बाकीचा हिशेब लागत नाही.एकंदर किंमत किमान १५ हजार कोटी ते कमल काही शे अब्ज रुपये यात कुठेतरी आहे.
"ड्रग्स घेणे" यात तेथे वैषम्य वाटण्याच्या ऐवजी हे लोक त्याचे निर्लज्ज समर्थन करता आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त करून देतात याबद्दल आक्षेप आहे.
आजही काही नट आडमार्गाने तंबाखू किंवा गुटख्याच्या जाहिराती करत आहेत. ( अजय देवगण आणि शाहरुख खान) उदा बोलो जुबां केसरी हि जाहिरात क्रिकेट मॅच मध्ये सारखी सारखी दाखवली जाते आहे. यात केवळ तंबाखू मिश्रित केल्यास गुटखा तयार होतो हि साधी गोष्ट लोकांना माहिती आहे पण कायद्यातील त्रुटींचा वापर करून केवळ त्यात तंबाखू नाही म्हणून त्यावर बंदी घालता येत नाही.
आपण पैशासाठी कित्येक तरुणांना व्यसनी बनवतो आहे याची त्यांना ना लाज ना खंत आहे.
Amitabh Bachchan had announced his withdrawal from the Kamla Pasand campaign in October after a national anti-tobacco organisation requested him to refrain from endorsing a pan masala brand to help prevent youngsters from getting addicted to tobacco.
https://indianexpress.com/article/entertainment/bollywood/amitabh-bachchan-sends-legal-notice-to-pan-masala-brand-as-ads-continue-to-air-despite-contract-termination-7633125/
It is learnt that a national anti-tobacco organisation, supported by doctors from the cancer hub Tata MemoriaHospital, had reached out to the actor to ask him to stop promoting pan masala as it is carcinogenic
Read more at:
http://timesofindia.indiatimes.com/articleshow/86949662.cms?utm_source=contentofinterest&utm_medium=text&utm_campaign=cppstsupp ..
- Log in or register to post comments
आ
आग्या१९९०
गुरुवार, 12/02/2021 - 08:21
नवीन
पत्रकारांना फाट्यावर मारण्याइतकी उंची शाहरुखने केव्हाच गाठली आहे. सरकारने तंबाखू किंवा मद्य ह्यांच्या जाहिरातीवर बंदी घालण्यापेक्षा त्यांच्या उत्पादनांवर बंदी आणावी. कलाकारांना शिकवत बसू नये.
- Log in or register to post comments
ज
जेम्स वांड
गुरुवार, 12/02/2021 - 08:05
नवीन
शाहरुख खान असे जरी विनोदाने बोलला असला तरी तो कुठे बोलतोय आणि त्यातून (त्याच्या आणि इतरांच्या) तरुण मुलांना मुलाला काय संदेश गेला आहे ते पहा.
तरीही साहेब स्वारींनी शाहरुख विनोदात बोलला होता म्हणल्याबद्दल शाहरुखने आज गोडधोड करून खायला पाहिजे असे वाटते.
- Log in or register to post comments
- «
- ‹
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6