Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

ताज्या घडामोडी नोव्हेंबर २०२१- भाग २

च
चंद्रसूर्यकुमार
Wed, 11/17/2021 - 16:02
🗣 256 प्रतिसाद
आधीच्या भागात १५० प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे. गोव्यातील पोरी (Poriem) मतदारसंघातून २०१७ मध्ये माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणेंविरूध्द निवडणुक लढवून पराभूत झालेले भाजपचे विश्वजीत राणे यांनी भाजप सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. प्रतापसिंग राणेंच्या चिरंजीवांचे नावही विश्वजीतच आहे. ते भाजपमध्ये आहेत आणि राज्य सरकारमध्ये मंत्रीही आहेत. नामसाधर्म्यामुळे सुरवातीला वाटले होते की त्यांनीच आपमध्ये प्रवेश केला की काय. पण दुसर्‍या विश्वजीत राणेंनी पक्ष सोडला आहे. एकंदरीत गोव्यात भाजपचे तितके सोपे दिसत नाही. माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा मान्द्रेमधून काँग्रेसच्या दयानंद सोपटे यांनी दणदणीत पराभव केला होता. २०१९ मध्ये जे काँग्रेसचे १० आमदार भाजपमध्ये सामील झाले त्यात हे दयानंद सोपटे होते. आता मान्द्रेमधून आपल्याला उमेदवारी मिळेल याची खात्री दयानंद सोपटेंना आहे तर लक्ष्मीकांत पार्सेकर सुध्दा आपला दावा सोडायला तयार नाहीत असे दिसते. एकेकाळी याच पार्सेकरांनी रमाकांत खलप यांच्यासारख्या मातब्बर नेत्याचा मान्द्रेमधून एकदा नाही तर दोनदा पराभव केला होता. पण त्यांचा २०१७ मध्ये दयानंद सोपटेंनी तब्बल २५% मताधिक्याने पराभव केला. त्यामुळे दोघेही आपला दावा सोडायला तयार दिसत नाहीत. इतक्या घाऊक प्रमाणात काँग्रेसमधून आमदार आयात केल्यानंतर ही डोकेदुखी भाजपला नक्कीच होणार होती. त्याचप्रमाणे विधानसभेचे माजी अध्यक्ष अनंत शेट यांचे मागच्या वर्षी निधन झाले. त्यांचे बंधू प्रेमेन्द्र शेट यांनी महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षात प्रवेश केला आहे. अनंत शेट उत्तर गोव्यातील मये मतदारसंघातून निवडून यायचे. त्याचप्रमाणे उत्तर गोव्यातील कळंगूटचे आमदार मायकेल लोबो यांनीही भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. उत्तर गोव्यातीलच म्हापसा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून माजी उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसूझा अगदी आरामात निवडून येत असत. ते मनोहर पर्रिकरांचे मित्र होते आणि पर्रिकरांच्या आग्रहावरूनच ते भाजपमध्ये आले होते. मनोहर पर्रिकरांचे निधन झाले त्यापूर्वी दीड-दोन महिने या फ्रान्सिस डिसूझांचेही कर्करोगानेच निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा जॉशुआ अगदी थोडक्यात जिंकला होता. त्यावेळी भाजपने पर्रिकरांची विधानसभा जागा- पणजी पण गमावली होती. पणजी हा १९९४ पासून भाजपचा बालेकिल्ला होता आणि मनोहर पर्रिकरांचे निधन झाल्यानंतर दोन महिन्यातच झालेल्या पोटनिवडणुकीत देशात प्रचंड मोदी लाट असतानाही ती जागा भाजपने गमावली होती. तेव्हा सांगायचा मुद्दा हा की ज्या उत्तर गोव्यात भाजप बळकट होता तिथेच वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये अशाप्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. या पडझडीला पर्रिकरांच्या शेवटच्या टर्ममध्येच सुरवात झाली होती हे पणजीतील पराभवावरून समजतेच. त्यातही जर बाबूश मोन्सेराटसारख्या फालतू आणि घाणेरड्या माणसाला भाजपने घरी घेतले असेल तर they deserve to lose. पण विरोधी पक्ष तितका प्रबळ राहिलेला नाही त्या कारणानेच भाजपला विजय मिळाला तर मिळू शकेल. अन्यथा गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाचे कठिण आहे. मला स्वतःला गोवा हे राज्य प्रचंड आवडते त्यामुळे या निवडणुकांमध्ये मी खूप जास्त रस घेत आहे. जशाजशा नवीन घडामोडी होतील त्याप्रमाणे इथे लिहिनच.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 56662 views

🗣 चर्चा (256)
क
कॉमी Wed, 11/24/2021 - 06:18 नवीन
तुमचा व्ह्यू पॉईंट समजण्यासारखा आहे, पण विरुद्धपक्षाचाही समजण्यासारखाच आहे. नवाब मालिकांचा एक आरोपच मुळी खंडणीसाठी वानखेडे विविध लोकांना खोट्या प्रकरणात अडकवतो असा आहे. त्यामुळे, त्यांची जात धर्म ह्याचा ड्रग आरोप्यांच्या दोषी निर्दोशी असण्यावर फरक पडत नसला, तरी खंडणीच्या आरोपाचे नक्कीच पडु शकतो.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 11/24/2021 - 06:28 नवीन
खंडणीच्या आरोपाचे नक्कीच पडु शकतो. असले आरोप करण्यापेक्षा सरळ एफ आय आर का नाही दाखल करत? सगळी यंत्रणा कामाला लावून केवळ वानखेडे मुसलमान आहेत का कि त्यांच्या नावावर बार आहे का असली माहिती कसली बाहेर काढत बसले आहेत? अरे सरकार कुणाचं आहे? आणि हे मंत्री आहेत का संत्री? सगळी पोलीस यंत्रणा हातात असून पत्रकार परिषद घेऊन आरोप कसले करत आहेत? कोणताही ठोस पुरावा नसेल यांच्याकडे त्यामुळे नुसते भुंकत आहेत. केवळ हलकटपणा
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Wed, 11/24/2021 - 06:35 नवीन
वानखेडे यांचे वडील, त्यांची बहीण, त्यांची बायको पोलिसात केस दाखाल करतात आणि सरकारात मंत्री असून याना एक गुन्हा दाखल करता येत नाही का? NCB zonal director Sameer Wankhede’s wife on Wednesday said that an FIR has been registered against Maharashtra minister Nawab Malik for allegedly making personal attacks on her husband https://www.financialexpress.com/india-news/sameer-wankhedes-wife-says-fir-lodged-against-nawab-malik-ncb-officers-father-calls-minister-raavan/2357785/ Sameer Wankhede's sister files police complaint against Maharashtra Minister Nawab Malik https://www.thehindu.com/news/national/other-states/sameer-wankhedes-sister-files-police-complaint-against-maharashtra-minister-nawab-malik/article37206303.ece Sameer Wankhede’s father files police complaint against Maharashtra minister Nawab Malik https://indianexpress.com/article/cities/mumbai/sameer-wankhede-father-police-complaint-maharashtra-minister-nawab-malik-7614228/ Sameer Wankhede’s father files ₹1.25 crore defamation suit against Nawab Malik https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/sameer-wankhede-s-father-files-1-25-crore-defamation-suit-against-nawab-malik-101636291727641.html सरकारात मंत्री असून यांच्या पार्श्वभागात दम नाही अन उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घेऊ पाहताहेत उगाच फुकट फोका मारून राहिले ना
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 11/24/2021 - 08:50 नवीन
नवाब मलिक वान्खेडेला त्याच्याच भाषेत उत्तर देत आहेत. रिया चर्क्रवर्तीच्यावेळी किती आचरटपणा चालला होता? एन सी बी ने कोणत्या अभिनेत्रीला कोणते प्रश्न विचारले/कोणाला किती वाजता बोलावणार आहेत ही माहिती वानखेडेच मिडियाला देत होता.(एका पत्रकाराला विचारुन खात्री केली आहे). आणि मग "सारा अली खानला एन सी बी ने विचारले हे १३ प्रश्न" "दीपिका पडुकोन उद्या येणार ९.३० वाजता एन सी बी च्या ऑफिसात" असल्या बातम्या. ही बदनामीच होती नाहीतर काय होते ? ह्यातले किती लोक जेलमध्ये गेले? कुणी मीडियात माहितिचा पत्रकार असेल तर खात्री करून घ्या. पैसे उकळण्यापलिकडे हा सद्ग्रुहस्थ वानखेडे काहीही करत नव्हता.गोसावी/सुनिल पाटील्/सॅम डिसुझा ह्या लोकांच्या मदतीने पैसे उकळाय्चे . त्यातले काही पैसे दिल्लीत वरिष्ठांना जायचे. वानखेडेच्या जागी दुसरा कुणी असता तर केव्हाच हकालपट्टी झाली असती. ह्या वानखेडे घराण्याला 'फर्जीवाडा' हा शब्द तंतोतंत लागु पडतो. कथित चाणक्य अडचणीत येतील म्हणून वानखेडेला सर्व प्रकारची मदत देऊन वाचवायचा प्रयत्न चालु आहे हे उघड आहे.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 11/24/2021 - 09:21 नवीन
इतरांचे चॅट मीडियाला वाटणाऱ्या, मुद्दामून ऱ्हिया चक्रवर्तीचे राक्षसीकरण करायला खतपाणी घालणाऱ्या संस्थेच्या अधिकाऱ्यांवर तश्शीच वेळ आली तर कर्माचे फळ म्हणीन. हल्ली SSRचे न्यायदाते गप्पगप्प आहेत खरं. अधून मधून ट्विटरवर कायतरी पाद्री हॅशटॅग ट्रेंडिंग असते, पण तेव्हढच. सुप्रीम कोर्टातले वकील विभोर आनंद ह्यांचे काहीतरी बिग ब्रेकिंग यावे म्हणून अधूनमधून ट्विटर पाहतो त्यांचे. पण कुठले काय. :`( विभोर आनंद आणि तत्सम युट्यूबर्सचे माहितीचे स्रोत: Image removed.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/24/2021 - 09:47 नवीन
रोज सामनाची पारायणे केल्याने जळी स्थळी काष्टी पाषाणी कसे कारस्थान दिसते आणि बिनबुडाचे आरोप कसे सुरू होतात, हे समजण्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 11/24/2021 - 12:39 नवीन
त्यांची जात धर्म ह्याचा ड्रग आरोप्यांच्या दोषी निर्दोशी असण्यावर फरक पडत नसला, तरी खंडणीच्या आरोपाचे नक्कीच पडु शकतो. खंडणीच्या आरोपात वानखेडे यांचं धर्माचा काय संबंध ! सविस्तर सांगा कृपया ? अगदी असे धरले कि खंडणी चा आरोप खरा आहे तर त्याबद्दल सरळ अधिकृत तक्रार करता आली असती ना मलिक यांना या शिवाय ते स्वतः मंत्री असल्यामुळे त्यांना सामान्य माणसापेक्षा जास्त गोष्टींची माहिती काढत येते ! मग मिडिआत जायला कशाला पाहिजे ? दुसरे असे कि समजा वानखेडे यांनी धर्म बदलला आणि ते मुस्लिम होते ते हिंदू बनले .. ठीक पण त्यांना ( किंवा कोणालाही ) हिंदू बनताना "पाहिजे ती " जात मिळू शकते? असे असेल तर मुस्लिम आरक्षणाची वेगळी गरजच नाही... ज्या मुसलमानांना आरक्षण पाहिजे त्यांनी कागदो पत्री हिंदू व्हायायचे आणि होताना हिंदू मागासवर्गीय म्हणून जात निवडायची झाला काम... ओवेसी ऐकताय का? मी काय म्हणतोय ते !
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 11/24/2021 - 12:51 नवीन
नीट वाचा प्रतिसाद म्हणजे समजेल.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 11/24/2021 - 13:03 नवीन
नहि समजल समजल सान्गा क्रुपया
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 11/24/2021 - 13:27 नवीन
जाती आणि धर्माचा आर्यन खान दोषी निर्दोशी याशी संबंध नाही असेच मी लिहिले आहे. On the other hand, खंडणी साठी अटक करणे याचा असू शकतो.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 11/24/2021 - 12:52 नवीन
त्याला आरक्षण जिहाद आणि लव्ह जिहाद म्हणायला मोकळे मग. वानखेडे भाजपवाल्यांना उपयोगी होते म्हणून बरं, नाहूतर आत्तापर्यंत ते अट्टल जिहादी म्हणून डिक्लेअर झाले असते.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/24/2021 - 13:41 नवीन
वानखेडे भाजपला कसे उपयोगी होते?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 11/24/2021 - 13:51 नवीन
फ्रेसिंग चुकले. भाजप्समर्थकांना नावडणाऱ्या समूहामागे लागलेले (बॉलिवूड.).
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/24/2021 - 13:57 नवीन
फ्रेसिंग? काय म्हणायचं ते समजलं नाही.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 11/24/2021 - 14:05 नवीन
फ्रेजिंग, माझे शब्दांकन चुकले- असे म्हणत होतो.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/23/2021 - 03:43 नवीन
https://www.loksatta.com/mumbai/maharashtra-government-seeks-intervention-in-probe-against-anil-deshmukh-says-cbi-zws-70-2689388/ ------- पुरग्रस्तांना निधी मिळाला का?
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 11/23/2021 - 07:09 नवीन
या बाबतीत न्यायालयाने याचिका तर फेटाळावीच, पण महाराष्ट्र सरकारवर दंडात्मक कारवाई सुद्धा करायला हवी. अर्थात त्यामुळे फावड्याला आणि तोतऱ्याला काही वाटण्याची शक्यता नाहीच, पण महाराष्ट्राच्या जनतेच्या पैशातून असले धंदे करायचे उद्योग बंद व्हायला हवेत. आणि त्यासाठी पैशाचा नव्हे तर या तथाकथित नेत्यांवर कोर्टाच्या कारवाईचा दंड व्हायला हवा.
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे Tue, 11/23/2021 - 07:17 नवीन
राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला सीबीआयकडून समन्स बजावण्यात आल्याने संपूर्ण पोलीस दलाचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळेच सरकारने त्याविरोधात उच्च न्यायालयात येणे न्याय्य असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला होता. अल्पवयीन, अपंग आणि दाद मागण्याच्या स्थितीत नसलेल्यांचे नातेवाईक वा मित्र त्यांच्या वतीने न्यायालयात धाव घेऊन दाद मागण्याच्या कायदेशीर तरतुदीचा आधारही सरकारने त्यासाठी घेतल्याचे सांगण्यात आले होते. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलीस महासंचालक संजय पांडे हे अ

ल्पवयीन किंवा अपंग किंवा दाद मागण्याच्या स्थितीत नसलेले

आहेत हे महाराष्ट्र शासनाने स्वतःच उच्च न्यायालयात कबुल केलेले आहे हे वाचून प्रथम हसू मग रडू मग हसता हसता रडू आणि नंतर रडता रडता हसू आले. अरे राज्य शासन आहे कि खेळ खंडोबा? असे शपथपत्र सादर करणारे कायदा( विधी) खात्यातील लोक इतके निर्लज्ज, नालायक, निर्ढावलेले आणि बेदरकार असतील असे वाटले नव्हते
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/23/2021 - 03:49 नवीन
https://www.loksatta.com/mumbai/anil-deshmukh-son-hrishikesh-actively-involved-in-laundering-money-zws-70-2689538/ ------- कायद्याचे राज्य असल्याने, योग्य तो निर्णय नक्कीच घेतील..
  • Log in or register to post comments
स
सुखीमाणूस Tue, 11/23/2021 - 09:00 नवीन
पेशवा--->हिन्दु महासभा---->भाजपा असा एकन्दर सम्बन्ध कौन्ग्रेस् समर्थक्/भटजी,शेटजी विरोध करणारे जोडत असतात महार रेजिमेन्ट ने इन्ग्रज फौजेला मदत करुन पेशव्याना हरवले तर ते योग्य...(भीमा कोरेगाव लढाइ) (कारण सत्तेवर यायची झेप घेण्याची आणि कौन्ग्रेस मधील विविध स्तरावर असलेली घराणेशाही सम्पवण्याची सुतराम भीती नाही. ती तर हक्कच असलेली, भीती घालुन मिळवायची, आरक्षण देउन गुलाम केलेली एक गठ्ठा मतपेटी आहे) मधे अजुन एक विचारधारा वाचली की स्वातन्त्र्य लढ्यात ब्राम्हण लोकान्चा जास्त सहभाग होता कारण त्यान्च्या हितसम्बन्धाना बाधा आली. त्यात त्यान्चे देशप्रेम नव्हते!! मग हिन्दु महसभा का बर सहभागी झाली नसेल भारत छोडो आन्दोलनात? https://en.wikipedia.org/wiki/Quit_India_Movement Vinayak Damodar Savarkar, the president of the Hindu Mahasabha at that time, even went to the extent of writing a letter titled "Stick to your Posts", in which he instructed Hindu Sabhaites who happened to be "members of municipalities, local bodies, legislatures or those serving in the army... to stick to their posts" across the country, and not to join the Quit India Movement at any cost. But later after requests and persuasions and realizing the importance of the bigger role of Indian independence he chose to join the Indian independence movement.[9] याचा अर्थ असा होतो की कदाचित हिन्दु महासभेला सुरुवतिच्या काळात ब्रिटिशानी राज्यावर असणे हे सुरक्शिततेचे वाटले असेल. स्वातन्त्र्य व फाळणी झाल्यावर उसळलेला हिन्साचार किती वाइट होता हे आपण वाचतोच. राजकारण करण्यात नेहरु सर्वात हुशार ठरले आणि इतिहास विजेत्याच्या लेखणीने लिहिला जातो त्यामुळे बाकी सगळे नेते निष्प्रभ ठरले. एकप्रकारे नेहरुनी समाजवादी सरन्जामशाहीच आणली. स्वातन्त्र्य आमच्यामुळे मिळाले याच्या बाहेर कौन्ग्रेस्स ने पडायला हवे आणि भाजपा ने मान्य करायला हवे की आज ते सत्तेवर आहेत तो गाडा कौन्ग्रेस् ने चालवला आहे जो चालवणे सोपे नव्हते. खरतर फक्त नेहरु किवा गान्धीन्मुळे स्वातन्त्र्य मिळाले म्हणुन आता त्यान्च्या पुढच्या पिढ्या कायम्स्वरुपी राज्यावर हक्क सान्गु शकतात ही गुलाम मानसिकता आहे. आणि भारताला २०१४ ला स्वातन्त्र्य मिळाले असे म्हणणे म्हणजे ज्या स्वातन्त्र्य सैनिकानी आपले जीव घालवले त्याना दुर्लक्शित करणे आहे...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 11/23/2021 - 10:41 नवीन
ती कंगना एक वेडसर आहे हे मान्य पण विक्रम गोखले? ह्यांनी खरा ईतिहास वाचला आहे अशी अपेक्षा होती. पण वॉट्स-अ‍ॅप आल्यापासुन कोणाचा काहीच भरवसा नाही.पत्रकार परिषद घेतली तेव्हा हे काहीतरी मुद्देसूद बोलतील ही अपेक्षा होती. पण ते नेहमीचेच प्रश्न-"लोक फाशी गेले तेव्हा तुम्ही काय करत होतात ? तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न नाही केलात" कोणाला फाशी दिले आणि कोणी प्रयत्न केला नाही ह्यावर मौन.
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 11/23/2021 - 13:13 नवीन
माई सहमत.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Tue, 11/23/2021 - 13:03 नवीन
एकप्रकारे नेहरुनी समाजवादी सरन्जामशाहीच आणली. स्वातन्त्र्य आमच्यामुळे मिळाले याच्या बाहेर कौन्ग्रेस्स ने पडायला हवे आणि भाजपा ने मान्य करायला हवे की आज ते सत्तेवर आहेत तो गाडा कौन्ग्रेस् ने चालवला आहे जो चालवणे सोपे नव्हते. खरतर फक्त नेहरु किवा गान्धीन्मुळे स्वातन्त्र्य मिळाले म्हणुन आता त्यान्च्या पुढच्या पिढ्या कायम्स्वरुपी राज्यावर हक्क सान्गु शकतात ही गुलाम मानसिकता आहे. मान्य
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/23/2021 - 13:58 नवीन
+1
  • Log in or register to post comments
T
Trump Tue, 11/23/2021 - 15:29 नवीन
एकप्रकारे जातियवाद. जन्माने ब्राम्हण असलेल्याने ब्राम्हण रहावे. जन्माने चांभार असल्याने चांभारच राहावे इत्यादी.
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/23/2021 - 12:54 नवीन
भारत इस्लामिक देश आहे का? बीसीसीआयच्या ‘त्या’ निर्णयावरून नेटिझन्स भडकले. https://www.loksatta.com/krida/netizens-slam-bcci-making-halal-meat-compulsory-indian-cricket-team-new-diet-plan-abn-97-2690396/ कुणी काय खावं आणि काय नाही? हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्र्न आहे...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Tue, 11/23/2021 - 14:04 नवीन
"Halal is considered healthier because after slaughter, blood is drained from the animal's arteries, ejecting most toxins because the heart continues to pump for a few seconds after slaughter." https://timesofindia.indiatimes.com/science-of-meat/articleshow/11672654.cms#:~:text=%E2%80%9CHalal%20is%20considered%20healthier%20because,a%20few%20seconds%20after%20slaughter. हलाल मांस अधिक चांगले असे दिसतेय. पोर्क्/बीफ खाण्यास मनाई केली आहे त्यामुळे आनंद होण्यास हरकत नसावी.
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 11/23/2021 - 14:34 नवीन
ही बातमी खरी असेल तर मोदींसारखा हिंदूंचा म्हणवला जाणारा नेता पंतप्रधान असताना बीसीसीआयची हलाल मांस promote करण्याची हिम्मत होते यावरून मोदींची शक्ती कितपत आहे हे कळून येते. खरंतर हलालची सद्दी संपून एव्हाना झटका मांस हेच भारतात मांसाहारींसाठी प्रमाणित अन्न (standard food) व्ह्यायला हवे होते. हिंदूंची मते मिळवून जे पूर्ण बहुमताने सत्तेत आले आहेत त्यांना, हिंदूंच्या हितरक्षणासाठी मागच्या सुमारे आठेक वर्षांत फार काही करता आले नाहीए हेच अजून एकदा सिद्ध झाले आहे. सवांतर: झटक्याच्या मांसाच्या तुलनेत हलाल मांसाचे काही फायदे असतात असे वाटणाऱ्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. अवांतर: एका माणसाला कुणीतरी विचारलं, "अहो चार वर्षे झाली लग्नाला, काही गोड बातमी आहे की नाही?". तर तो म्हणतो, "अहो, गोड बातमी जाऊ द्या, चार वर्षांत मी माझ्या बायकोला एकदाही हातही लावलेला नाही!"
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 11/23/2021 - 14:51 नवीन
एव्हढे मिनिष्टर होऊन एकही सामूहिक बुकबर्निंग टाईप सोहळा सुद्धा अजून घेतला नाहीये. मग कसला उपयोग आहे ब्रे ?
  • Log in or register to post comments
व
वामन देशमुख Tue, 11/23/2021 - 15:01 नवीन
मग कसला उपयोग आहे ब्रे ?
बाकी तुमचं बुकबर्निंग वगैरे जाऊ द्या, पण तुमच्या वरील विधानाशी मी शतशः सहमत आहे. स्वतः पूर्ण बहुमताने सत्तेत असताना, पटापट हवी ती कामे करून घेण्याऐवजी ही मंडळी पोपटपंची करत राहतात. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्ता कशी सक्षमपणे राबवावी हे काँग्रेसकडून कधी ही मंडळी शिकतील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 11/24/2021 - 02:34 नवीन
माईसाहेबांना नम्र विनंती कि हलाल इकॉनॉमी यावर जरा त्यांनी आंतरजालावर माहिती घावी आणि "हलाल विरोध म्हणजे कट्टर हिंदुत्व " हे तुणतुणे वाजवू नये यातील मुख्य मुद्दे हे आहेत - हलाल पद्धतीचे मास अगदी शास्त्रीय दृष्ट्या सेवनास जास्त योग्य असेल है पण हरकत हि त्याबद्दल नाहीये तर आक्षेप या गोष्टींना आहे १) हलाल सर्टिफिकेशन मधून जो पैस जातो तो कुठं जातो? तयाचा आणि धर्मप्रसाराच संबंध असावा का? २) हलाल हि जनावर मारण्याची फक्त पद्धत असती तर त्यावर आक्षेप घेतला नस्ता त्याचा संबंध दाहरमाशी आहे आणि फक्त मुस्लिम खाटीकच ते करू शकतो .. हे म्हणजे "योगासन फक्त हिंदू शिकउ शकतो " असे म्हणण्यासारखे आहे किंवा "योग शिक्व्ययाचा असेल तर आधी हिंदू धार्मिक सर्टिफिकेट घेतलेच पाहिजे " अशे सक्ती करण्यासारखे आहे ! दुसरया शब्दात सांगतले तर हालचाल ची प्रोसेस / एस ओ पी इतर धर्मीय खाटीक वापरू शकत असेल तर मग हलाल वलय मुसलमान बोर्डाची काय अवयश्यकता ? ३) हलाल चा "आग्रह" मुस्लिम बहुल नसलेलया देशात धरणे म्हणजे अंडर द रडार आशय चाणक्य पद्धतीने धर्मप्रसार आहे याचाच परिणाम पाश्चिमात्य देशात दिसत आह आता बोलूयात भारतात बीफ आणि पोर्क बंदी योग्य आहे का? हा प्रश्न नाजूक आहे आणि सरळ पद्धतीने सोडवणे अवघड आहे एक विचार असा येतो कि लोकशान्क्ये प्रमाणे करता येईल का जसे गोव्यात बीफ वॉर बंदी नाहीये पण फक्त हिंदूंनी बीफ वर बंदी ची मागणी कुठे केली तर ते फॅसिष्ट हा दुटप्पी पण सर्व "उदारमतवादी लोकांनी बंद करावा लोकशाही आणि दःर्मनिरपेक्षत हि सगळ्या बाजूनी लागू होते फक्त हिंदूंना नाही आणि हो मुस्लिम एवढेच काय ज सुद्धा परोक्ष चाय जवळपास हि जात नाहीत ( हे सर्व "इस्लामोफोबिया " म्हणून धुडकावून द्याल यात शंका नाहीच )
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 11/23/2021 - 14:46 नवीन
कुणी काय खावे हे फक्त हलाल सक्ती केल्यावरच सुचते. गुजरात मध्ये रस्त्यावर मांसयुक्त खाद्यपदार्थ विकायला बंदी घातली तर चलती, बीफ बॅन केला तर चालतो, हलाल म्हणलं कि लगेच खाण्याचे स्वातंत्र्य आठवते. किती हिपोक्रसी. बाकी BCCI ने जर कोणत्याही आरोग्य विषयक फायद्यांशीवायच हलाल कम्पल्सरी केलं असेल तर चुकीचे आहे. आरोग्य फायदे असले तरी असे कम्पलशन कितपत बरोबर शंकास्पद आहे.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 11/23/2021 - 16:06 नवीन
शंकास्पद आहे? नक्की काय करावं की शंका रहाणार नाही? पुढचं गुजरात झाल्यावर मिटेल?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Tue, 11/23/2021 - 16:33 नवीन
तुम्हाला माझे म्हणणे समजले नाही असे दिसते. शंकास्पद म्हणजे काही कन्स्पायरसी थियरी आहे असे सूचित करत नव्हतो. शंकास्पद म्हणजे आरोग्य कारण देऊन हलाल बंधनकारक करणे कितपत योग्य, जर हलाल खरंच मर्जीनली शारीरिक वेल बिइंग साठी चांगला आहे, याबद्दल. पुढचं गुजरात म्हणजे काय म्हणायचे आहे ? दंगलीबद्दल बोलत आहात काय ? त्याने शंका का मिटेल बुवा ?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/23/2021 - 13:57 नवीन
…तर आर्यन खान प्रकरणातील NCB चा प्रत्येक अधिकारी गजाआड व्हायलाच हवा : शिवसेना https://www.loksatta.com/desh-videsh/shivsena-slams-ncb-and-central-government-after-court-orders-on-aryan-khan-drugs-case-scsg-91-2687980/ ------- ST कामगार आणि शेतकरी, ह्यांच्या पेक्षा, हे प्रकरण मोठे आहे का?
  • Log in or register to post comments
म
मुक्त विहारि Tue, 11/23/2021 - 14:09 नवीन
चलो मुंबई! मुस्लीम आरक्षणासाठी MIM आक्रमक; शिवसेना सेक्युलर नसल्याचा ओवेसींचा आरोप.... https://www.loksatta.com/maharashtra/muslim-reservation-asaduddin-owaisi-and-imtiaz-jalil-warn-of-agitation-in-mumbai-vsk-98-2690518/ आता हा मुद्दा, केंद्रावर ढकलण्याची शक्यता जास्त आहे....
  • Log in or register to post comments
च
चौकस२१२ Wed, 11/24/2021 - 03:05 नवीन
शिवसेना सेक्युलर नसल्याचा ओवेसींचा आरोप.... हा हा पूवा ... ओवेसींचे म्हणे खरे ठरो हीच प्रार्थना अल्लाह चे चरणी
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 11/23/2021 - 16:07 नवीन
https://youtu.be/ZCRlTYm0WpI सरकार कसं चाललं आहे: सुशील कुलकर्णी
  • Log in or register to post comments
क
कपिलमुनी Wed, 11/24/2021 - 08:58 नवीन
निलेश साबळेने पाया पडून मागितली नारायण राणेंची माफी ! अर्थात भाजप्ये असल्याने अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा सन्कोच होत नाही.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 11/24/2021 - 09:13 नवीन
हेच राणे राष्ट्रवादीत्/शिवसेनेत असते तर "कुठे चालले आहे हे राज्य?" म्हणत अनय जोगळेकर/भाउ तोरसेकर्/सुशील कुलकर्णीने व्हिडियोही बनवले असते.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 11/24/2021 - 09:17 नवीन
हे भाजपच्या बाबतीत आहे म्हणून खच्चून शिव्या घालायच्या... बाकी नौसैनिकाला मारहाण, बंगल्यावर नेऊन मारहाण असे प्रकार झाले की मुग गिळून गप्प राहायचे, कारण काय द्या चे राज्य आहे ना...
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 11/24/2021 - 10:23 नवीन
माजी नौसैनिकाला मारहाण झाली होती तेव्हा देशभरच्या मीडियाने खच्चुन शिव्या घातल्या होत्या. आणि ती टीका योग्यच होती. https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/mumbai-retired-naval-officer-beaten-up-over-forwarding-cartoon-featuring-cm-uddhav-thackeray/articleshow/78063604.cms एन डी टी.व्हि- https://www.youtube.com/watch?v=bQJQJ9mV-Gw ईन्डिया टूडे- https://www.youtube.com/watch?v=TF5XLb8vMrI शिवसेना की गुंडसेना- https://www.youtube.com/watch?v=g__qcjlvRew मूग गिळून कोण गप्प बसले होते?
  • Log in or register to post comments
क
कॉमी Wed, 11/24/2021 - 10:27 नवीन
कडक !
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/24/2021 - 10:54 नवीन
आणि कुरमेसेला घरी उचलून आणून बेदम चोपला होता तेव्हा?
  • Log in or register to post comments
स
सॅगी Wed, 11/24/2021 - 10:57 नवीन
आणि ती टीका योग्यच होती.
तेव्हाच्या मारहाणीवर टीका करत असाल तर चांगलेच आहे. बाकी, मारहाण करणार्‍यांविरोधात काही कारवाई झाली नव्हती, तेव्हाही आणि बंगल्यावरील मारहाण प्रकरणातही..हे ही तेवढेच खरे. आणि आताच्या वेळेस तर मारहाणीचा म देखील नाही, हाही मोठा फरक..
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Wed, 11/24/2021 - 11:13 नवीन
निलेश साबळे ला धमक्या देऊन माफी मागायला लावले असेल तर ते चूकच आहे. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्रीच सचिन वाझे सारख्या खुन्याची पाठराखण करत होते तर नारायण राण्यांच्या ऑफिसवर ज्या गुंडांनी दगडफेक केली त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खास वेळ देऊन फोटोसेशन करत असतील तर राणे कडून काय अपेक्षा ठेवायची. राणेंचा भाजपला फायदा होण्याऐवजी नुकसानच होत आहे.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/24/2021 - 11:13 नवीन
माजी नौसैनिकाला मारहाण झाली होती तेव्हा देशभरच्या मीडियाने खच्चुन शिव्या घातल्या होत्या. आणि ती टीका योग्यच होती. मी टाईम्सची लिंक बघितली आणि एनडीटीव्हीची चित्रफीतही बघितली. या दोन्ही वृत्तसंस्थांनी ही घटना अत्यंत स्थितप्रज्ञ वृत्तीने फक्त एक बातमी/ घडलेली घटना या स्वरूपात सांगितली आहे. सांगताना कोठेही कोणावरही टीका केलेली नाही. खच्चून शिव्या तर लांब राहिल्या, टीकेचा एक शब्दसुद्धा उच्चारलेला नाही. ही बातमी अशाच स्वरूपात अजून १०० वृत्तसंस्थांनी सांगितली असेल. "आपल्या" सरकारचे हे कृत्य असल्याने त्यांनी तोंडाला कुलुप लावले असणार. निलेश साबळेची घटना अशीच स्थितप्रज्ञपणे सांगतील का सांगताना भाजपवर कडाडून टीका करतील हे कळेल लवकरच.
  • Log in or register to post comments
म
माईसाहेब कुरसूंदीकर Wed, 11/24/2021 - 16:07 नवीन
'नावड्त्या' राजदीप देसाईंनी ईंडिया टूडेवर चर्चा घेतली होती. शिवाय 'हिंदू'/इंडियन एक्सप्रेस वगैरे 'भाजपा विरोधी' वर्तमानपत्रांनीही ठळक बातमी दिली होती. https://www.youtube.com/watch?v=64DTxzt1J24 बातम्या/चर्चा अर्नब गोस्वामी स्टाईलमध्ये सांगायच्या की कशा हा ज्या त्या चॅनेलचा प्रश्न आहे. कंगनाने मुंबईला 'पाकव्याप्त कश्मीर म्हंटले त्याचीही बातमी देशभरच्या चॅनेल्सनी सांगितली. किरीट सोमय्या ह्यांनी राज्य सरकारविरोधात जी आघाडी उघडली होती त्याच्या बातम्या रोज प्रत्येक चॅनेल दाखवत होता. एन डी टी व्हि,प्रिंट पासुन ते ए बी पी,झी पर्यंत! आता नवाब मलिकांना जसे फूटेज मिळत आहे तसेच सोमैय्या ह्यांना तेव्हा मिळत होते. यू-ट्युबवर पाहु शकता.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/24/2021 - 16:33 नवीन
याच राजदीप सरदेसाईने २६ जानेवारीला पोलिस गोळीबारात एक शेतकरी मेला अशी धडधडीत खोटी बातमी दिल्याने त्याला आज तकने २ आडवड्यांसाठी निलंबित केले होते. बाकी नानांनी वर दिलेल्या दोन लिंकमध्ये शिवसेनेला एकही शिवी दिलेली नाही ना शिवसेनेवर टीका आहे. नुसती स्थितप्रज्ञपणे नुसती बातमी देणे आणि त्यावर टीका किंवा स्तुतीसुमने उधळणे यात खूप फरक आहे. "आपल्या" आवडीचे सरकार असल्यावर सरकारच्या चुकीच्या गोष्टी सुद्धा साखरेत घोळवून सांगितल्या जातात हे नौसैनिक मारहाण प्रकरणावरून समजतं. कुरमेसेला केलेल्या मारहाणीची तर बहुतेक माध्यमांनी बातमी सुद्धा दिली नसणार कारण ती मारहाण "आपल्या" माणसाने केली होती.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Wed, 11/24/2021 - 09:43 नवीन
मविआतील नेते अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते असल्याने ते माफी वगैरे मागायला लावत नाहीत. ते अशांना थेट उचलून घरी आणतात आणि मरेस्तोवर बेदम मारहाण करतात.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 10 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 10 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 10 hours ago
  • सुंदर !!
    1 day 10 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 10 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा