आरक्षण,हिंदू मुस्लिम वर,जाती जाती मध्ये वाद,अजुन बेसिक सुविधा पण कित्येक करोड लोकांस उपलब्ध नाहीत.
अजुन किती करोड जनता एक वेळ च जेवण करते.
नेते सर्व अती श्रीमंत आणि ते ज्या जनतेचे प्रतिनिधी आहेत ती जनता अत्यंत गरीब.
ब्रिटिश खरे च बोलले होते भारतीय राज्य करण्याच्या लायकीचे नाहीत.
अतिशय हताश होवून खूप लोक आज पण बोलतात ब्रिटिश काळी काठी ला सोने लावून फिरले तरी भीती नव्हती.
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्या पार्थिवावर तिरंगा आच्छादला होता
तिरंगा आच्छादला असताना त्यावर पक्षाचा झेंडा ठेवणे किती योग्य ? , असे करणे गरजेचे होते का ?
15 ऑगस्ट ला राष्ट्र गीताची 1 ओळ पण तेथील प्रसिद्ध राजकीय पक्षाच्या झेंडा वंदन कार्यक्रमात गाता आली नाही.
पण योगी म्हणजे ह्यांचे तारणहार,मालक,शेठ .
त्या राज्यातील कोणत्या ही घटना ह्याव पवित्र च असतात असे bjp मधील लाचार नेत्यांना शिकवले गेले आहे
विरोधीपक्ष म्हणून bjp नी आज पर्यंत एक तरी आंदोलन केले आहे का जे जनतेच्या अडचणी शी संबंधित आहे.
विरोधी पक्षाचे काम काय आहे सरकार ची धोरण जनतेच्या हिताची कशी राहतील ह्या वर नियंत्रण ठेवणे.
Bjp चे काय चालू आहे.
पाहिले सुशांत प्रकरण राज्याच्या हिताशी काहीच संबंध नाही.
नंतर ती नटी कंगना तिचे समर्थन करायला पूर्ण bjp सक्रिय.
राज्याच्या हिता शी काही संबंध नाही.
कधी पाकिस्तान,कधी मुस्लिम,कधी अफगाणिस्तान .
ह्यांचा राज्य शी काय संबंध.
त्या मुळे ह्या पक्षा विषयी नाराजी आहे.
म्हणजे या ह-याना-याच्या जोडीला शालजोडीतला आहेर आणि नारळ द्यावा असं म्हणायचंय का?
यातल्या एकाला २-३ महिन्यांपूर्वीच एकदा नारळ मिळाला होता आणि शालजोडीतला आहेर समजणे या दोघांच्याही आवाक्याबाहेर आहे.
त्यामुळे काहीतरी वेगळा आहेर सुचवा.
आणि हे छापून आलय लोकसत्ता मध्ये. कालच गिरीश कुबेरानी एका विडिओ द्वारे राण्यांची वागणूक कशी चुकीची आहे हे सांगितले होत. राजकिय पक्षाचं एक वेळ ठीक आहे पण आपला मीडिया सुद्धा ठाकरी शैली म्हणून शिवसेनेच्या शिवराळ भाषेचं पहिल्या पासून समर्थन करत आला आहे.
याकूब मेमन फाशीप्रकरणानंतर गिकुंनी जे काही तारे तोडले होते त्यानंतर ते पूर्णपणे मनातून उतरले. स्वतःला अगदी नि:पक्षपाती म्हणवत पी.चिदंबरमसारख्या अटकपूर्व जामीनावर असलेल्या आरोपीकडून लेखमाला लिहून आणायचा शाहजोगपणा त्यांच्याकडे होता. अॅन्ड्र्यु लिलिको म्हणून ब्रिटिश व्यक्तीच्या ब्लॉगवरील लेख भाषांतरीत करून स्वतःचा म्हणून खपवायचा घाणेरडा प्रयत्न गिकुंनी केला होता. अशी चोरी करणे हे अॅकॅडेमिक सर्कलमध्ये अगदी अक्षम्य गुन्हा समजला जातो. कोणी अशी चोरी करून पी.एच.डी मिळवली आणि ते नंतर उघडकीस आले तर पूर्वलक्षी प्रभावाने पी.एच.डी रद्द होऊ शकते. निदान जगातील चांगली विद्यापीठे ते करतात. चिदंबरमसारख्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणार्या अशा चोराकडून काय अपेक्षा करणार?
दोन्ही अग्रलेख वाचले. सामना तर हिणकस भाषेचा नमुना म्हणून प्रसिद्धच होता तेव्हा त्यात गलिच्छ शब्दच फार आणि मुद्दे कमी. तो पूर्ण वाचवला नाही. पण लोकसत्ता ची अधोगती बघून आश्चर्य वाटलं.
खरे तर राणे यांच्या वक्तव्यामुळे सेनेचा खरा प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपच्या चिंतन शिबिरास जास्त हादरा बसला असणार. श्रावणी सोमवारचा पवित्र उपवास सोडायच्या आशेने ताटावर बसावे तर यजमानाने पातेल्यातून एकदम नळीच वाढावी असे भाजपवासीयांस झाले असेल.
असली वाक्ये स्थानिक वृत्तपत्रांच्या वार्ताहराना शोभा देतात, लोकसत्तेला नव्हे.
भारतीय मतदारांत एक लोकोत्तर कौशल्य आहे. स्वत:च्या गंडापोटी कोणास धडा शिकवण्याची भाषा करत रणमैदानात फुशारक्या मारणाऱ्या कित्येक नेत्यांवर नंतर टाचा घासत बसायची वेळ आली आहे, हे राजकीय इतिहासाकडे वरवर पाहणाऱ्यासही कळेल. येथे मतदारांस गृहीत धरून चालत नाही. तसे गृहीत धरल्यास काय होते याचे मार्गदर्शन राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जरूर घ्यावे.
मतदारांनी फडणाविसना नाकारलेले नाही. त्यांच्याकडे अजूनही सर्वात जास्त मते आणि 'शिटा' आहेत हे गिकु विसरलेले दिसतात.
अग्रलेख तसेही फार कमीच वाचले जातात पण बऱ्याच दिवसांनी वाचलेला लोकसत्ताचा अग्रलेख पहाता मटा बरा म्हणायची वेळ आली.
कोणे एके काळी मटा हा संपादकीय लेखनाचा मापदंड होता. त्यानंतर बहुधा सकाळ (जेव्हा तो पवार कुटुंबियांच्या मालकीचा नव्हता तेव्हा) आणि मग लोकसत्ता. पुढारी, केसरी, तरुण भारत आणि नंतर आलेले लोकमत हे त्या नंतर. नवाकाळ आणि तत्सम पेपर कधी वाचले नाहीत. सामना तर साहित्य या सदरात येत नसल्याने त्यात जे लिहिले जाते ते कायम संध्यानंद च्या कॅटेगरी मधले वाटत आले. लोकसत्ता चा दर्जा खालावत जातोय हे जाणवत आल्यानंतर मी रविवारची पुरवणी आणणे बंद केले. रेग्युलर मटा आणि रविवारचा सकाळ हे दोनच सध्या त्यातल्या त्यात ओके आहेत असे वाटतंय.
मटा वाईट, सामना वाईट, लोकमत वाईट, लोकसत्ता वाईट. (मोदी, फडणवीसांची स्तुती करत नाही म्हणजे काय?) पत्रकारिता म्हणजे भाऊ तोसरेकर आणी त्यांचे तुनळी व्हिडीओ. (फक्त प्रभू के गुण गाओ)
सगळ्या पेपरांनी कोथळा, मावळा, कावळा, खंजीर असे शब्द असलेल्या मुखपत्राचेच गुणगान गायले पाहीजे आणि त्याच पक्षाची स्तुती केली पाहिजे (बाकी राज्यात काही काशी का करेनात...), किंवा तसे हग्रलेख लिहीले पाहीजेत...तिच खरी पत्रकारीता...
बोला आवाज कुणाचा???
मावळा, खंजीर कोथळा हे ऐतिहासिक शब्द आहेत. आणी ते महाराष्ट्रातील लोक आणी शिवसैनिकांना आवडतात.
मावळा कावळा बोलून तुम्ही मावळा शब्दाचा अपमान करत आहात. आणि वापरले ते शब्द तर काय बिघडले. शिवरायांच्या मावळ्यांच्या करामती मुळे आज भारत हिंदुस्थान आहे. शिवसेना त्यांच्या कार्यकत्यांना मावळा संबोधित असतील तर तुमच्या पोटात दुखायचे कारण काय??
तुम्ही देखील स्वतःला गुज्जू लढवय्या किंवा गुजराती बाणा वगैरे विशेषण लावून घ्या ;)
वापरण्याचा आपल्याला कितपत अधिकार आहे आणि आपण नेमके असे काय काम करतो ज्यामुळे ते शब्द स्वतःसाठी वापरावेत हे आधी ज्याचे त्याने तपासून पाहावे.
नावात शिवरायांचा वापर करायचा आणि सत्तेसाठी कोणाच्याही समोर लोटांगण घालायचे अशी कामे करून शिवसेना शिवरायांचे नाव बदनाम करत आहे हे तुम्हाला दिसत नसले तरी उभ्या महाराष्ट्राला चांगलेच दिसते.
बाकी गुज्जू लोकांना शिव्या घालताना "...उध्दव ठाकरे आपडा.." विसरू नका... ;)
वापरण्याचा आपल्याला कितपत अधिकार आहे >>>>
कोण देतं अधिकार?? की तुम्हाला विचारून वापरावे??
नावात शिवरायांचा वापर करायचा आणि सत्तेसाठी कोणाच्याही समोर लोटांगण घालायचे अशी कामे करून शिवसेना शिवरायांचे नाव बदनाम करत आहे >>>>
कधी लोटांगन घातले?? कोणी घातले??
पक्षाच्या नावात भारतीय शब्द वापरून मातोश्री समोर युती साठी लोटांगन घालनार्यांबद्दल काय मत?? तसेच सत्तेसाठी महेबूबासमोर लोटांगन घालनारे, कंधार वेळी अतिकयरेक्यांसमोर गुडघे टेकनारे भाजपेया भारतीय ह्या शब्दाचा अपमान करत नाहीत का?? ऊभ्या महाराष्ट्राने पाहील सत्तेसाठी रात्री दोन वाजता राष्ट्रपती राजवट ऊठवून पहाटे घातलेलं लाोटांगन.
बाकी गुज्जू लोकांना शिव्या घालताना "...उध्दव ठाकरे आपडा.." विसरू नका... ;) >>>>
गुज्जू लोकाना कोण शिव्या घालतंय?? पण ज्याना मावळा शब्दाने पोटशूळ ऊठतो त्याना स्वतला गुज्जू योध्दा किंवा मोशा योध्दा (कर्तृत्व नसले तरी) घोषीत करावे ;)
सर्वाना माहीत आहे, तुम्हाला माहित नसेल तर तुमचा अभ्यास कमी पडतोय...
अगणित घोटाळे करून वर "भारतीय" म्हणवणार्या राष्ट्रीय काँग्रेस भारतीय ह्या शब्दाचा अपमान करत नाहीत का??
त्याच काँग्रेस समोर लोटांगण घालुन सत्तेत आलेले लोक मावळा शब्द वापरतात तेव्हा त्यांचा काय हारतुरे घालुन सन्मान करायचा काय?
@सॅगी
एकदम बरोबर.. ह्यान्ची चापलूसी करा.. म्हणजे खरी पत्रकारिता का काय..
जोकसत्ता वाल्यान्ना राज्यसभेच आश्वासन आहे म्हणे.. म्हणून एवढी तोन्ड फाटेस्तोवर स्तुती चालली असते..
+१
लोकसत्ता वाईठ, सकाळ वाईट, सामना वाईट, मटा वाईट, नवाकाळ वाईट, लोकमत वाईट, टीवा नाईन वाईट, एबीपा माझा वाईट, झी २४ तास वाईट. खरी पत्रकारिता म्हणजे भाऊ तोसरेकर आणी त्यांचे युट्युब विडीओ. (फक्त प्रभू के गुण गाओ) ;)
त्यांना ते सगळे तुमच्या पेक्षा वाईट वाटत असावेत तुमच्या लिखाणाची सर त्या पेप्राना नाहीं इतकाच त्यांचा प्रॉब्लेम आहे अन् तूम्ही त्यांनाच विरोधक समजतात... कमोन बी स्पोर्ट तुमचे कौतुक करणार्याना असे बोल लावू नका हो
तुम्हीं स्वताला असे कमी लेखू नका आम्हला तूम्ही जास्त चांगले वाटता... तोरसेकरांना जो तूम्ही मान देताय हा तुमचा विनम्रपणा समजायचा की काय तेच कळत नाहीये थोडे स्पष्ट कराल का
१२२ वरून १०५ वर येणे तेही दणादण क्लीनचीट वाटत नि भरमसाठ भ्रष्ट लोक भाजपात भरूनही. म्हणजे फडणवीसना नाकारलेच आहे जनतेने. तसेच शिवसेनेला त्यांनी अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हे आश्वासन दिले असावे त्यांचा इतिहास पाहता.
वेगळा विदर्भ झाल्या शिवाय लग्न करणार नाही अशी शपथ त्यांनी खाल्ली होती तरी लग्न केले
राष्ट्रवादीशी युती नाही नाही नाही, आपद धर्म नाही शाश्वत धर्म नाही अशी ते एक चॅनल वर ओरडून सांगत होते पण पहाटे तमाशा घातला.
त्यामुळे फडणवीस ठाकरेंना आश्वासन देऊन नंतर गंडवू पाहत होते हे उभ्या महाराष्ट्र ला माहितीय.
पुढल्या निवडणुकीत ह्याचे परिणाम दिसतील.
येथे मतदारांस गृहीत धरून चालत नाही. तसे गृहीत धरल्यास काय होते याचे मार्गदर्शन राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जरूर घ्यावे.
या वाक्यांशी सहमत आहे.
राखीव जागा दिल्याने व इतर सवलतींचा वर्षाव केल्याने आपल्याला बाय डिफॉल्ट मराठे डोळे झाकून मते देतील हे फडणवीसांचे गृहितक फोल ठरले.
प्रगत मराठ्यांना मागास दाखवून राखीव जागा देताना आपण ब्राह्मणांवर अन्याय केला तरी ब्राह्मण आपल्यालाच मते देतील हे गृहितक सुद्धा चुकीचे ठरले.
इतर मागासवर्गीय नेत्यांना कारस्थाने करून संपविले तरी इतर मागासवर्गीय मतदार डोळे झाकून भाजपलाच मत देतील हे गृहीतक सुद्धा फोल ठरले.
देशात सर्वत्र भाजपला अनुकूल वातावरण असूनही महाराष्ट्रात २०१४ व २०१९ च्या तुलनेत मते कमी झाली व जागाही कमी झाल्या याचे कारण मतदारांना गृहीत धरणे.
एवढे करूनही १०५ शिटा आल्या याचे कारण आयारामांची खोगीरभरती व सेनेशी युती. २०५ पैकी २ मित्रपक्षांचे आहेत व १७-१८ जण आयाराम आहेत. सेनेशी युती नसती तर ६० चा सुद्धा आकडा गाठला नसता.
त्यामुळे कुबेर म्हणतात त्यात तथ्य आहे.
त्या दोघांकडे पूर्ण दुर्लक्ष करावे अशी विनंती इतर सगळ्यांनाच करत आहे. त्या दोघांना कोणत्याही साधकबाधक चर्चेत स्वारस्य नाही उगीचच राळ उडवायची आहे हे स्पष्ट दिसतच आहे. जिथेतिथे जाऊन घाण करणार्या सदस्यांना पूर्ण वाळीतच टाकायला हवे- त्यांचे अस्तित्वच विचारात घेऊ नये असे मला तरी वाटते.
भाजपला विरोध केला तर घाण
भाजपला विरोध करतात ते साधक बाधक चर्चा करत नाहीत
भाजपला विरोध करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करावे
भाजपला विरोध करणार्यांना वाळीत टाकावे
~
आपलाच आकाशगंगा मंगळ बुध शनि कुमार
येथे मतदारांस गृहीत धरून चालत नाही. तसे गृहीत धरल्यास काय होते याचे मार्गदर्शन राणे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून जरूर घ्यावे.या वाक्यांशी सहमत आहे. राखीव जागा दिल्याने व इतर सवलतींचा वर्षाव केल्याने आपल्याला बाय डिफॉल्ट मराठे डोळे झाकून मते देतील हे फडणवीसांचे गृहितक फोल ठरले. प्रगत मराठ्यांना मागास दाखवून राखीव जागा देताना आपण ब्राह्मणांवर अन्याय केला तरी ब्राह्मण आपल्यालाच मते देतील हे गृहितक सुद्धा चुकीचे ठरले. इतर मागासवर्गीय नेत्यांना कारस्थाने करून संपविले तरी इतर मागासवर्गीय मतदार डोळे झाकून भाजपलाच मत देतील हे गृहीतक सुद्धा फोल ठरले. देशात सर्वत्र भाजपला अनुकूल वातावरण असूनही महाराष्ट्रात २०१४ व २०१९ च्या तुलनेत मते कमी झाली व जागाही कमी झाल्या याचे कारण मतदारांना गृहीत धरणे. एवढे करूनही १०५ शिटा आल्या याचे कारण आयारामांची खोगीरभरती व सेनेशी युती. २०५ पैकी २ मित्रपक्षांचे आहेत व १७-१८ जण आयाराम आहेत. सेनेशी युती नसती तर ६० चा सुद्धा आकडा गाठला नसता. त्यामुळे कुबेर म्हणतात त्यात तथ्य आहे.