Skip to main content
Skip to main content
✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव इरावती मराठी साहित्य

Main navigation

  • नवे लेखन
  • कथा
  • कविता
  • चर्चा
  • पाककृती
  • पर्यटन
  • ललितकला
  • नवे प्रतिसाद
काथ्याकूट

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ४)

न
निनाद
Tue, 08/24/2021 - 07:43
🗣 186 प्रतिसाद
आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा भाग काढत आहे.

वाचनखूण लावा
प्रतिक्रिया देण्यासाठी लॉगिन करा

  • Log in or register to post comments
  • 43810 views

🗣 चर्चा (186)
न
निनाद Tue, 08/24/2021 - 07:52 नवीन
ईशनिंदाच्या खोट्या आरोपामुळे सौदी अरेबियामध्ये २० महिने तुरुंगात घालवलेले हरीश बंगेरा भारतात परतले आहेत. उडुपी पोलिसांनी केलेल्या तपास असे उघडकीला आले की बनावट प्रोफाइलच्या मागे कर्नाटकातील मुदाबिद्री येथील अब्दुल हुयेझ आणि अब्दुल थुएझ या दोन मुस्लिम व्यक्ती आहेत. त्यांनी काही वर्षांपुर्वी त्यांच्या नावाखाली एक फेसबुक प्रोफाईल तयार केले होते. आणि छायाचित्र ज्यावर मक्का येथे काबाच्या छायाचित्रासह एक पोस्ट प्रकाशित करण्यात आली. यामुळे हरीश बंगेरा यांना सौदी मध्ये ताब्यात घेण्यात आले व अटकेत टाकले गेले. उडुपीच्या खासदार आणि कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांच्या प्रयत्नाने बंगेरा परत आले आहेत. अब्दुल हुयेझ आणि अब्दुल थुएझ यांना अटक झाली असली तरी कोर्टाने त्यांना २ दिवसात जामिनावर सोडून दिले आहे. हरीश बंगेरा जोपर्यंत त्याच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत तो विश्रांती घेणार नाही असे म्हणाले आहेत.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 08/24/2021 - 08:06 नवीन
हरीश बंगेरा जोपर्यंत त्याच्यावर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होत नाही तोपर्यंत तो विश्रांती घेणार नाही असे म्हणाले आहेत.
भारत सरकारने लावून धरला पाहिजे नाहितर कोणीही काहिही करेल आणि तिकडे राहणार्यान्ना त्याचा त्रास होईल..
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 08/24/2021 - 08:51 नवीन
भाजपाच्या नाशिक कार्यालयावर शिवसैनिकांची दगडफेक. मुंबईही दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. सत्तेत आली तरी शिवसेनेची गुंडगिरी कमी झाली नाही. राणेंनीही मुख्यमंत्र्याविषयी बोलताना जपून बोलायला पाहिजे होते, शेवटी ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. आवडो न आवडो त्या पदाचा मान ठेवायलाच पाहिजे. पोलिसांसमोर लोक दगडफेक करत आहेत, आणि पोलीस मात्र शांतपणे बघत आहेत. स्वतः च्या पक्षाची सत्ता असताना तरी कायद्यनुसार कारवाई करायला पाहिजे होती.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 09:04 नवीन
म्हणजे भाजपचे नेते काहीही बोताल वक्तव्य करतील आणी त्यावर प्रतिक्रीया ऊमटली तर शिवसेना गुंड?? कशाला शिवसैनिकाना डिवचायचं??
  • Log in or register to post comments
च
चंद्रसूर्यकुमार Tue, 08/24/2021 - 09:12 नवीन
राणेंचे वक्तव्य पूर्णपणे अनावश्यक होते. अमक्याला कानफाडीत मारायची, तमक्याला मारझोड करायची हीच शिवसेनेची मुळची संस्कृती आहे. राणे कुठेही असले तरी ३९ वर्षे शिवसेनेत असताना ते झालेले संस्कार कसे विसरणार? तरीही या निमित्ताने उध्दव ठाकरेंना हे प्रकरण अधिक संयमितपणे आणि अधिक प्रगल्भपणे हाताळायची संधी आयती राणेंनी आणून दिली होती ती त्यांनी व्यर्थ दवडली असे दिसते. मोदी आणि ठाकरे यांच्यात कसली तुलना करायची असेल तर मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी एका राज्याचे मुख्यमंत्री होते तर उध्दव दुसर्‍या राज्याचे मुख्यमंत्री सध्या आहेत ही केवळ पदाची तुलना करता येऊ शकेल. मोदी मुख्यमंत्री असताना त्यांच्यावर किती घाणेरड्या शब्दात टीका झाली होती. गंदी नालीका किडा वगैरे त्यांना म्हटले गेले होते. मराठी साहित्यात मोठे योगदान असलेल्या एका विचारवंतांनी 'माझ्याकडे बंदूक असती तर मी पहिली गोळी नरेंद्र मोदींना मारली असती' असली मुक्ताफळे उधळली होती. तत्कालीन सुपर पंतप्रधान मोदींना 'मौत का सौदागर' म्हणाल्या होत्या. अशी अनेक उदाहरणे आहेत. तरीही या सगळ्या घाणेरड्या टीकेकडे मोदींनी पूर्ण दुर्लक्ष केले होते. असल्या लोकांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिस कारवाई सोडाच कधी एफ.आय.आर दाखल झाल्याचेही ऐकिवात नाही. कसे गुजरातमध्ये पाऊल ठेवता तेच बघतो असली भाषाही कधी असल्या लोकांविरोधात कधी मोदीच नाही तर त्यांच्या सहकार्‍यांनीही वापरलेली नव्हती. तर असल्या टीकेला मोदींनी भीकच घातली नाही. अगदी तसे करायची नामी संधी राणेंनी उध्ववना न मागता दिली होती. पण अगदी प्रत्येक गोष्टीवर रिअ‍ॅक्ट केलेच पाहिजे, सगळे महाराष्ट्राचा अपमान करायला टपले आहेत असल्या भ्रमात राहिलेले लोक असा विचार करू शकतील ही शक्यता अगदीच थोडी. कंगनासारखी फुटकळ अभिनेत्री काहीतरी बोलल्यानंतर लगेच महाराष्ट्राचा अपमान म्हणून चवताळून अंगावर जाणारे हे लोक आहेत. त्यांच्याकडून प्रगल्भतेची अपेक्षा कशी करायची?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 09:27 नवीन
सेना आणी भाजपात हाच तर फरक आहे. सेना स्वाभिमानी आहे , कूणी काहीही बोललेलं सेना सहण करत नाही. पण भाजपचं तसं नाही स्वाभिमान वगैरेंशी भाजपला काहीही घेणंदेणं नाही. सत्ता मिळत असेल तर भाजपला अपमान झालेलाही चालतो आणी सत्तेसाठी ते स्वाभिमान गहाण टाकायला ही तयार असतात. संघाला दहशतवादी म्हणणारे कृपाशंकर भाजपला चालले तसेच सावरकरांचा अपमान करनारे नितेश राणे ही, काश्मिरात महबूबा चालल्या.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 08/24/2021 - 09:37 नवीन
चांगला जोक होता...अजुन येऊ द्या :)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 09:46 नवीन
ऊद्या जेव्हा सत्तेसाठी भाजप नेते सेना किंवा राष्ट्रवादीच्या पाया पडायला येतील तेव्हा तुम्हाला वाटनारा हा विनोद क्ती सत्य आहे ते कळेल. ;)
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 08/24/2021 - 10:10 नवीन
शिवसेनेने स्वबळावरच सत्ता स्थापन केली आहे.... ;)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 10:16 नवीन
जसं काही कर्नाटकात आणी मध्य प्रदेशात भाजपने हनवलंय तसं आमदार फोडूनच बनवलंय ;)
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 08/24/2021 - 10:21 नवीन
स्वाभीमान म्हणे... ;) कर्नाटकात आणी मध्य प्रदेशात शिवसेना आली की त्यावर बोला... :)
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 08/24/2021 - 10:28 नवीन
Mufti बरोबर सत्ता मिळवण्यासाठी युती केली तेव्हाच स्वाभिमान बघितला.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 08/24/2021 - 10:37 नवीन
आणि महाराष्ट्रात राजीनामे खिशात घेऊन सत्तेला चिकटलेल्या मुंगळयांचाही स्वाभीमान बघितला...
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 08/24/2021 - 10:29 नवीन
Mufti बरोबर सत्ता मिळवण्यासाठी युती केली तेव्हाच स्वाभिमान बघितला.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 10:33 नवीन
राज्यात ही सत्तेसाठी राष्ट्रवादीशी युती केली स्वाभिमान गहान टाकून.
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 08/24/2021 - 10:39 नवीन
हाच आहे शिवसेनेचा "स्वाभिमान गहान" ... ;) बादवे...काँग्रेसचे नाव टाकायचे विसरलात ;)
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 10:41 नवीन
पहाटे पहाटे, चोरून लपून ;)
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 08/24/2021 - 10:44 नवीन
शिवाजी पार्क मध्ये जमिनीला डोकं लावण्याचे नाटक केले म्हणजे झाले असे थोडीच आहे ;)
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 08/24/2021 - 11:53 नवीन
सेना पूर्णपणे जाळ्यात अडकली.. स्वाभिमान कसला ?? राणेन्कडे दुर्लक्ष करून ..लोकान्च्या कामाकडे लक्ष द्या म्हणाव ..
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 11:57 नवीन
अजून अनेक मंत्री आहेत भाजपकडे त्यानी अजून वक्तव्ये सेनेला असंच जाळ्यात अडकवावं.;)
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 08/24/2021 - 13:34 नवीन
हो.. सगळे मन्त्री लोकान्ची कामे करायलाच आहेत.. १०० कोटी गोळा करायला नाही...
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 13:59 नवीन
ख्या ख्या ख्या. कोरोनानिधी कुठे गडप झाला?? हिशेब का देत नाहीत?? 100 कोटी वर बोलण्याआधी केंद्राकडे हिशेब मग कोरोनानिधी चा.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 08/24/2021 - 14:52 नवीन
फुकटची लस टोचून घेतलीत ना? ती त्या कोरोना निधी खर्च करूनच मिळवली होती.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 15:22 नवीन
फूकट लस?? ख्या ख्या ख्या. पुर्ण बाराशे रूपयाला घेतलीय. हे काही काॅंग्रेस सरकार नाही फुकट लस द्यायला. पेट्रोल पंपावर बॅनर लावले म्हणजे लस फुकट होत नाही. पक्क व्यापारी सरकार आहे भाजपचं. बक्कळ कमावलेत लस विकून . फुकट लसीचे लिमीटेड स्लाॅट लगेच गायब होतात. पण विकत लस कितीही घ्या संपतच नाही. आणी तसंही कोरोना निधीतून लस दिली असं कुठे लिहीलंय??? कोरोना निधीचा हिशेब कुठेय?? किती खर्च केले लसीसाठी?? सगळा कोरोना निधी गेला कुठे?? हिशेब का लपवला जातोय??
  • Log in or register to post comments
स
सॅगी Tue, 08/24/2021 - 15:38 नवीन
हे काही काॅंग्रेस सरकार नाही फुकट लस द्यायला
महाविकार...आपलं ते...महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सरकारमध्ये नाही असे म्हणता?? ऐकावे ते नवलंच...
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर Tue, 08/24/2021 - 16:24 नवीन
थोडक्यात, तुम्ही पेपर वाचत नाही. फुकट मिळणाऱ्या लसीचे तुम्ही 1200 रुपये का दिले आणि ते कुणाच्या खिशात गेले काय माहिती! केंद्र सरकारने तर राज्य सरकारला लशी मोफत पुरवलेल्या आहेत हे खरं. बाकी तुम्हाला लस मोफर हवी आहे असं असेल तर राज्य सरकारने त्या लशी का गडप केल्यात आणि हॉस्पिटल्स ना त्या का पुरवलेत ते विचारायला हवं. Health is, after all, a state subject.
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/24/2021 - 11:20 नवीन
उद्धव आणि राणे एकाच माळेचे मणी आहेत. त्यांच्यात तसूभरही फरक नाही.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 08/24/2021 - 11:56 नवीन
+१ योग्य प्रतिसाद ..
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी Tue, 08/24/2021 - 11:18 नवीन
रस्त्यावर पडलेली घाण घरात आणून एखाद्या स्वच्छ भांड्यात ठेवली तरी सुवास न येता घरात दुर्गंधी पसरणारच. भाजपने महाराष्ट्रात इतर पक्षातील घाण भरण्याचा सपाटा लावला आहे. त्याचे परीणाम भाजपला भोगावे लागणारच. राणे कुटुंबियांची बेताल बरळ हा त्याचाच परीणाम आहे. जो बेताल माणूस राजकारणात पूर्णपणे संपलेला होता त्याचा कोणताही उपयोग नसताना आधी भाजपने पक्षात आणले, नंतर त्याला खासदार केले, नंतर त्याच्या मुलाला आमदार केले आणि आता राणेला केंद्रीय मंत्री केले. या सर्वाचा भाजपला काही उपयोग आहे का? जो स्वतः निवडून येऊ शकत नाही तो काय डोंबल शिवसेनेला संपविणार? २०१२ मध्ये नितेश राणेने मराठा संघटनांना उचकवून पुण्यातील गडकरींचा पुतळा तोडायला लावला कारण ते ब्राह्मण होते. पुतळा तोडणाऱ्यांना नितेशने ५ लाख रूपयांचे बक्षीस दिले होते. बहुसंख्य ब्राह्मण ज्या पक्षाला मत देतात त्या पक्षाने ब्राह्मणद्वेष्ट्याला पक्षात आणून मानाचे पाध देऊन काय साध्य केले? राणे भाजपला मते मिळवून देऊ शकणार नाही पण राणेमुळे काही ब्राह्मणांची मते भाजपविरोधात जातील. राणे कुटुंबीय भाजपला डोकेदुखी होणार हे नक्की. परंतु ही नसती डोकेदुखी भाजपने स्वत:च ओढवून घेतली आहे. आता भोगा आपल्या कर्माची फळे.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 11:26 नवीन
+१ शंबर टक्के सहमत श्रीगुरूजी. एका बाजुला खडसे, तावडे, बावनकुळे, मुंडे अश्या हाडाच्या भाजप नेत्याना बाजूला फेकले नी बाहेरून आलेल्या राणेंना मंत्रीपद दिले. निष्टेला भाजपात हे फळ. मी २०१७ पर्यंत भाजप समर्थक होतो. पण भाजपचं हे लोकाना गृहीत धरणं पाहून आज दुर गेलोय. नितेश राणेंने सावरकरांचा आदर्श पुढील पिढीला देणार का वगैरे ट्विट केले होते. सावरकरांची माफी न मागता ही त्याना भाजपात प्रवेश मिळाला. काल कृपाशंकर सिंह ला घेतलं भाजपात. राज्यात भाजपचं नेतृत्व लवकर बदललं नाही तर भाजप पुन्हा पन्नास च्या खाली जायला जास्त वेळ लागनार नाही.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 08/24/2021 - 11:59 नवीन
याबाबतीत सहमत ..
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 08/24/2021 - 16:15 नवीन
कारण ते ब्राह्मण होते.. निखालस चुकीची माहिती. गडकरी मराठा नव्हते हे सत्य आहे. परंतू ते ब्राह्मणही नव्हते. दे फनच्या प्रभावामुळे किंवा प्रसिद्धीमुळे अनेक आडनावे ब्रह्मणांत ढकलण्याची/ओढण्याची चुकीची रीत सध्या बोकाळली आहे. बाजी प्रभू देशपांडेही ब्राह्मण होते अशी चुकीची माहितीही आताशा पद्धतशीरपणे पसरवली जात आहे.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 08/24/2021 - 21:52 नवीन
> राणेंनीही मुख्यमंत्र्याविषयी बोलताना जपून बोलायला पाहिजे होते, लोकप्रतिनिधी बद्दल बोलताना आदरानेच व्यक्तव्य केले पाहिजे हे आवश्यक नाही. मुख्यमंत्री काही भो पंचम जॉर्ज नाहीत. जास्त मनाला लावून घेत असतील तर राजकारण सोडून घरी बसावे. राणे ह्यांना तुरुंगांत वगैरे टाकणे हे बिहार लेव्हल चे राजकारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे ह्यांनी काही इतके गंभीर व्यक्तव्य केले नव्हते. उलट ह्यापेक्षा अत्यंत घाणेरडी भाषा इतर महाराष्ट्रीय राजकारणी वापरत आले आहेत. किंबहुना अशी भाषा "नारोबा" शिळ्या सेनेत शिकले असावेत.
  • Log in or register to post comments
स
साहना Tue, 08/24/2021 - 21:52 नवीन
> राणेंनीही मुख्यमंत्र्याविषयी बोलताना जपून बोलायला पाहिजे होते, लोकप्रतिनिधी बद्दल बोलताना आदरानेच व्यक्तव्य केले पाहिजे हे आवश्यक नाही. मुख्यमंत्री काही भो पंचम जॉर्ज नाहीत. जास्त मनाला लावून घेत असतील तर राजकारण सोडून घरी बसावे. राणे ह्यांना तुरुंगांत वगैरे टाकणे हे बिहार लेव्हल चे राजकारण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नारायण राणे ह्यांनी काही इतके गंभीर व्यक्तव्य केले नव्हते. उलट ह्यापेक्षा अत्यंत घाणेरडी भाषा इतर महाराष्ट्रीय राजकारणी वापरत आले आहेत. किंबहुना अशी भाषा "नारोबा" शिळ्या सेनेत शिकले असावेत.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 23:29 नवीन
शेवटी ते शिवसेनाप्रमुख आहेत आणी राज्याचे माननीय मुख्यमंत्री देखील. त्यांचा मान आणी पद मोठंय. त्यांचा आदर करून त्यांच्या बद्दल जपूनच बोललं पाहिजे नाहीतर मग असे ऑफिस फुटतात नि पळता भुई थोडी होते.
  • Log in or register to post comments
ज
जॅक द रिपर Wed, 08/25/2021 - 22:33 नवीन
उद्दाम ठाकरेनी आदित्यनाथांबद्दल जे काही अकलेचे तारे तोडले होते ते एका मुख्यमंत्र्याने दुसर्‍या मुख्यमंत्र्याबद्दल उधळलेली स्तुतीसुमने आहेत का?
  • Log in or register to post comments
श
श्रीगुरुजी गुरुवार, 08/26/2021 - 06:06 नवीन
नारायण राणेंच्या वक्तव्यावरून शिवसेनेने साळसुदाचा आव आणून धुडगुस घातला. मुळात उद्धव ठाकरे, बाळ ठाकरे, राऊत वगैरे यापेक्षाही अर्वाच्य अनेकदा बोलले आहेत. राणेंनी २००५ मध्ये शिवसेना सोडल्यानंतर बाळ ठाकरेंनी सामनामधून राणेंबद्दल जितके असभ्य व अर्वाच्य लिहिले होते तितकी खालची पातळी आजवर कोणीही गाठलेली नाही. नाऱ्या, दीडफुट्या या शब्दांनी सामनात व जाहीर सभेत राणेंचा उद्धार केला होता. यापेक्षाही जास्त असभ्य व अर्वाच्य शब्द सामनातील अग्रलेखात वापरले होते. मी याला मोठा केला पण हा चड्डीत चिरकला असे लिहिल्याचे मी वाचले होते. काही शब्द इतके असभ्य होते की ते मी येथे सांगू शकत नाही. सोनिया गांधी, शरद पवार यांच्याबद्दलही सामनातून वारंवार अर्वाच्य शब्द वापरले होते. आज राणेंच्या शब्दांवर टीकेचा भडीमार होतोय. परंतु यापेक्षाही कितीतरी वाईट शब्द सामनातून व जाहीर सभेत वापरले गेले, तेव्हा मात्र ठाकरी भाषा असे कौतुक होत होते. मग आता आक्षेप का? काल एका मराठी वाहिनीवर याच विषयावर ३ मराठी पत्रकारांची चर्चा सुरू होती. राणेंच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकारणाची पातळी खूप खाली गेली आहे, असे तीनही पत्रकार व आयोजकांनी सांगितले. यापेक्षाही खालच्या भाषेत वरीष्ठ ठाकरे, कनिष्ठ ठाकरे, राऊत मागील अनेक दशके अनेक नेत्यांचा उद्धार करीत होते, तेव्हा ही पातळी वर होती का? तेव्हा यांनी कधी आक्षेप घेतला होता का? तेव्हा यांनी त्या अर्वाच्च असभ्य भाषेचे ठाकरी भाषा, शिवसेनेची स्टाईल अशा शब्दात कौतुक केले होते. जे पेरले तेच उगवले आहे.
  • Log in or register to post comments
र
रावसाहेब चिंगभूतकर गुरुवार, 08/26/2021 - 08:20 नवीन
उद्धव ठाकरेंविरोधात FIR UP मध्ये दाखल झाली आहे. हे क्रॉस स्टेट FIR प्रकरण नक्की कसं काम करतं?
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली गुरुवार, 08/26/2021 - 08:49 नवीन
शेकडो एफ आय आर राज ठाकरेंविरूध्द युपी नी बिहार मध्ये दाखल आहेत. पण राज ठाकरे कधी तीकडे गेले नाहीत.एफ आय आर राजकीय हेतूने दाखल होतात आणी नंतर पळवाटा काढून बंद हेतात किंवा मागे घेतल्या जातात. कारण जास्त प्रकरण ताणलं तर त्याचा कायदा सुव्यवस्थएवर परिणाम होऊ शकतो.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 09:04 नवीन
मोठी बातमी: शिवसैनिकांनी पुण्यातील भाजप कार्यालयात सोडल्या कोंबड्या https://t.co/ekVWPtYeWd #ShivSena #NarayanRane #UddhavThackeray #BJP #Pune
  • Log in or register to post comments
R
Rajesh188 Tue, 08/24/2021 - 09:12 नवीन
राणे केंद्रीय मंत्री आहेत किती जबाबदारी नी वक्तव्य करायला पाहिजेत.गल्ली मधील tinpat गुंडासारखी त्यांची भाषा असते.
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 09:20 नवीन
+१ राणे ठाकरे वादात भाजपचा चुराडा होतोय. असंगाशी संग प्राणांशी गाठ ही म्हण भाजपला लागू पडतेय.
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 08/24/2021 - 13:36 नवीन
भाजपाचा नाही ..लोकान्च्या वेळेचा .. कशाला सारख सारख दाखवतात.. मीडीया वाले.. माहित नाही..
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 08/24/2021 - 12:02 नवीन
राणे आणि ठाकरे यान्नी दोघान्नीहि आपल्याला कोणती जबाबदारी आहे ते ओळखून वागाव.. वक्तव्य करावीत
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 12:06 नवीन
मुळात केंद्रीय मंत्र्याने आपला कारभार सांभाळून आपल्या मंत्रालयाचा जनतेच्या विकासासाठी वापर करावा. पण केंद्रीय मंत्री ईथे भाजपचा प्रचार करायला वापरला जातोय. भाजपचाच प्रचार करायचा तर ईथे फडणवीस, दरेकर असे सध्या कुठलीही जबाबदारी नसलेले लोक आहेत ना?? केंद्रीय मंत्री जर गल्लोगल्ली आशिर्वाद मागत फिरेल तर जनतेची कामे कशी होनार??
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 08/24/2021 - 12:19 नवीन
केन्द्रिय मन्त्राने लोकान्मध्ये मिसळू नये अस तरी कुठे लिहिलय.. यात्रा काढल्या कि नकळत लोकान्च्या मध्ये मिसळून लोकान्ची काम होतात.. केन्द्रिय मन्त्राने फक्त प्रशासनिक काम करावीत, मन्त्रीमन्डळ बैठकीला हजर रहाव, अधिवेशनात खासदारान्च्या प्रश्नाना उत्तर द्यावीत एवढच नाही..
  • Log in or register to post comments
अ
अमरेंद्र बाहुबली Tue, 08/24/2021 - 12:27 नवीन
यात्रा काढल्या कि नकळत लोकान्च्या मध्ये मिसळून लोकान्ची काम होतात >>>> प्रणाम घ्यावा. _/\_
  • Log in or register to post comments
र
रामदास२९ Tue, 08/24/2021 - 12:36 नवीन
प्रणामाचा स्वीकार केला.. नमस्कार .. _/\_
  • Log in or register to post comments
र
रात्रीचे चांदणे Tue, 08/24/2021 - 10:04 नवीन
मोदी सरकार ने infrastructure asset monetisation plan सादर केला आहे. सदर plan नुसार 2025 पर्यंत 6 ला करोड चा निधी उभारण्याचा केंद्र सरकार चा प्रयत्न असणार आहे. रेल्वे, विमानतळ आणि कोळसा उतख्तनं या पासून जास्तीत जास्त निधी मिळणार आहे. शेखर गुप्तांनी cut the clutter मध्ये बऱ्यापैकी व्यवस्तीत समजावून सांगितला आहे. https://youtu.be/2L2CnIS3XME
  • Log in or register to post comments
N
Nitin Palkar Tue, 08/24/2021 - 16:35 नवीन
6 लाख करोड..
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • ›
  • »

Recent comments

  • गैरसमज आहे तुमचा. जगात आपल्या
    1 day 15 hours ago
  • कशातूंनही आपल्याला हवा तो
    1 day 15 hours ago
  • भक्तांनी मारुतीच्या बेंबीत
    1 day 15 hours ago
  • सुंदर !!
    1 day 15 hours ago
  • सहमत. इराण हा इस्राएल व
    1 day 15 hours ago

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
इरावती.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Iravatee.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा