नाही. ह्यापुढे भाजपच्या लोकात जरब बसेल, येईल ते तोंडाला बोलण्याआधी चार वेळा विचार करतील. अटक केली ते बरेच केले. केंद्रीय मंत्र्याला अटक करून राज्याने केंद्राला आपली ताकद दाखवून दिलीय. मनात येईल त्याच्या मागे ईडीची चौकशी लावून त्रास द्यायचा केंद्राने सपाटा लावला होता. आपल्या हातात ताकद आहे हे दाखवण्याचा केंद्राचा प्रयत्न होता, राज्याकडेही ताकद असते आणी ते वापरू शकतात हे आता केंद्राला दिसेल. एकाच दगडात अनेक पक्षी मारल्या गेलेत.
भाजप मतदार आणि कार्यकर्ते यांना राणे नकोच आहे.
त्यांना राणे अणि त्याची दोन मुले हे त्रासदायक वाटत आहेत. ताळतंत्र सोडून जी बोल बच्चन देत होते तो भोवला आहे.
त्यामुळे भाजप नेते अंतर ठेउन आहेत.
याउलट सेना मतदार आणि कार्यकर्ते खुष आहेत.
राणे ला एकदा तरि धडा शिकवला याबाबत ते कहि महिने खुष राहतील.
जे भाजपाला अपेक्षित होत तेच झाल. :)
मुख्यमंत्री यांच्या भाषणातील घोळ :-
राणे यांनी केलेले वक्तव्य ज्यामुळे आत्ता जे नाट्य घडतयं :-
जाता जाता :- पुरोगामी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान असलेल्या व्यक्तीचा अमृत महोत्सव आणि हीरक महोत्सव यात १५ ऑगस्ट रोजीच गोंधळ उडावा हे या राज्याचे दुर्दैव !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kadhalikum Pennin... :- Kadhalan
भाषणातील चुकासाठी एका केंद्रीय मंत्र्याने राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कानाखाली मारायची भाषा करावी का ? 15 ऑगस्ट हा वर्धापनदिन आहे असे राणेंचे व्हिडीओ दाखवू का ? उगा चुकीच्या माणसाची पाठराखण करू नका. राणे आणि पिल्लांच्या शेकडो क्लिप्स आहेत.
उगा चुकीच्या माणसाची पाठराखण करू नका.
मुनी मी माझ्या प्रतिसादात राणेंच्या वक्तव्याचे समर्थन केलेले नाही, मी फक्त दोन्ही व्यक्ती काय बोलले त्याचे व्हिडियो दिले आहेत.
हा दुटप्पीपणा सोडला पाहिजे!
२०१८ मधील पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळेस उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारासाठी विरारला आले होते तेव्हा त्यांनी सभेत शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालताना चप्पल काढली नव्हती असा दावा शिवसेनेने केला होता. आणि त्याच चप्पलेने योगींना बडवावे असे वाटले असे सामनात छापून आले होते. त्यावेळेस सामनाचे मुख्य संपादक कोण होते? कार्यकारी संपादकांनी काहीही लिहिले तरी मुख्य संपादक त्या जबाबदारीतून मुक्त होतात का?
https://www.newindianexpress.com/nation/2018/may/26/felt-like-hitting-yogi-adityanath-with-his-footwear-uddhav-thackeray-1819801.html
तेव्हा योगींनी असे काही झाले होते याचेच खंडन केले. मुख्य संपादकांविरोधात एफ.आय.आर दाखल केला नाही की त्यांना ताब्यात घेतले नव्हते.
https://zeenews.india.com/maharashtra/dont-need-to-learn-from-them-yogi-adityanath-on-shiv-senas-charge-of-insulting-chhatrapati-shivaji-2111509.html
खरोखरच भाजपवाल्यांनी सत्ता कशी राबवावी हे ठाकरे, ममता बॅनर्जी वगैरेंपासून शिकावे. फार मवाळपणा दाखवतात.
पण आता जे राजकारण bjp करत आहे तसे कधीच बघितले नाही.
ज्या राज्यात विरोधी पक्षाचे सरकार आहे तेथे कायदा आणि सू व्यवस्था राहू नये म्हणून विविध बाटके त्या राज्यात सोडले जात आहेत.
अगदी नीच राजकारण bjp करत आहे.
बंगाल ला खूप बदनाम ह्या लोकांनी केले.
महाराष्ट्रात कंगना,अर्णव,आणि राणे हे बाटके इथे सोडून bjp स्वतः नामा निराळे राहून राज्यातील व्यवस्था बिघडवत आहेत.
Third क्लास राजकारण bjp करत आहे.
भाजपचे लोक .. गैरवापर वगैरे काहिहि म्हणाले तरि काही उपयोग नाही.. त्यानी पण सन्धी येण्याची वाट बघावी.. सत्तेसाठी आता तडजोड नको.. कोणी कितीही मोदीन्ना जाऊन भेटल तरी..
आम्ही राणेंच्या विधानाचे समर्थन करीत नाही, पण आम्ही त्यांचे समर्थन करतो, असे फडणवीस म्हणाले आहेत. म्हणजे नक्की काय? हे विधान सोडून राणेंच्या उर्वरित सर्व कृत्यांचे व विधानांचे समर्थन असा अर्थ आहे का?
राणेंना अटक करण्याचे अतिरेकी पाऊल उचलून ठाकरेंनी मोठी चूक केली आहे. राणेंवरील कलमे कोणत्याही न्यायालयात टिकणे अशक्य आहे. यातून राणेंनाच सहानुभुती मिळून फायदा होईल व सेनेचे नाक कापले जाईल. यामुळे भाजपत सुद्धा राणेंचे महत्त्व वाढून चंपा, शेलार, फडणवीस वगैरेंचे महत्त्व कमी होण्याची शक्यता आहे. फडणवीसानी आपले पक्षांतर्गत सर्व प्रतिस्पर्धी सहकारी संपविले आहेत. परंतु आता राणेंच्या रूपात एक नवीन प्रतिस्पर्धी निर्माण होण्याची शक्यता आहे.
सेना भाजपने लावलेल्या सापळ्यात अडकली आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे. राणेंबद्दल प्रेम अजिबात नाही, पण त्यांना बहुधा याच कामगिरीवर पाठवण्यात आलं होतं. शिवसैनिक रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन, तेही हिंसक करणे, हे ही बहुधा अपेक्षित असावं. गृह खाते राष्ट्रवादी कडे आहे आणि पोलीस गृहमंत्र्यांनी सांगितल्याशिवाय कारवाई करणार नाहीत. बहुधा दोन्ही बाजूने शिवसेनेला अडचणीत आणण्यासाठी चाली खेळल्या गेल्या आणि सेना अपेक्षेप्रमाणेच वागली. राणेंची प्रतिमा महाराष्ट्राबाहेर ठाकरे विरोधी नेता अशी झालीय आणि त्यांना याचा बहुधा फायदा मिळणार. बाकी law and order चा issue करून सरकार पाडायची किंवा पडायची वाट केंद्र पहात असणार आणि अशा गोष्टींनी त्यांना तसं करायची संधी मिळेल. निवडणुका होई पर्यंत शिवसेनेची प्रतिमा जनतेच्या मनात फारशी चांगली रहाणार नाही असं मला वाटतं. नको त्या गोष्टी उचलून सेना काट्याचा नायटा करते आणि तोंडावर पडते असं गेले कित्येक वेळा प्रमाणे याही वेळी घडणार बहुतेक.
आम्ही राणेंच्या विधानाचे समर्थन करीत नाही, पण आम्ही त्यांचे समर्थन करतो, असे फडणवीस म्हणाले आहेत. म्हणजे नक्की काय? हे विधान सोडून राणेंच्या उर्वरित सर्व कृत्यांचे व विधानांचे समर्थन असा अर्थ आहे का?>>>>
समानार्थी वाक्ये.
"आम्ही त्या व्यक्तीच्या विधानाच्या पाठीशी नाही, पण त्या व्यक्तीच्या पाठीशी आहोत."
"आम्ही दंगलीचे समर्थन करत नाही, पण आम्ही दंगल घडवून आणणाऱ्याच्या पाठीशी आहोत."
"आम्ही हत्येचे समर्थन करत नाही, पण आम्ही हत्या करणाऱ्या झुंडीच्या पाठीशी आहोत."
आणि - - -
"आम्ही देश विकण्याचे समर्थन करत नाही, पण आम्ही देश विकणाऱ्याच्या पाठीशी आहोत।"
सुशील शुक्ल
काही ही झाले तरी आम्ही नालायक पना करणार.
मराठी असून सुद्धा महाराष्ट्र ल खड्यात गाडणार.
त्या साठी किती ही लाचारी पत्करणार .मोदी , शाह खुश झाले पाहिजेत .
ह्या साठी आम्ही जगात ज्याला सर्वात नालायक समजले जाते ते कार्य पण आम्ही करू
पाठी मागे सरकणार नाही.
अशा वृत्ती चे राज्यातील bjp नेते आहेत.
असला "नरो वा कुंजरो वा" पवित्रा सारे राजकीय लोक घेतात. भाजप किंवा फडवणीस याला अपवाद नाहीत. बाकी शिवसेने चा थयथयाट त्यांच्या वर्तनाच्या अगदी विरोधी आहे. म्हणजे आम्ही कुणालाही काहीही बोलु, आम्हाला मात्र कुणी काहीही बोलायचे नाही असला तद्दन बालीशपणा ह्या लोकांचा असतो. लगेच मग सार्या महाराष्ट्राचा अपमान होतो. आजही सामना चे अग्रलेख बघा ... अर्वाच्य म्हणजे काय असते याचा दाखला ह्या मुखपत्राचे संपादकीय पाहिले की मिळतो.
मेडीया ला चघळायला नवीन चारा ह्या पलिकडे या घटनेला काहीही महत्त्व नाही. बाकी फलतु बाबतीत डीजे लावुन डान्स करणे हे झोपडपट्टी शिवसैनीकाला शोभते. त्यामुळे कोंबड्या सोडणे, काचा तोडणे झाले की मग फु़कट वडापाव + चहा मिळतो. तेव्हडेच हाताला काम ..
आंदोलन झाले की पक्षाच्या खर्चाने ताज. हॉटेल मध्ये जातात का ?
जात पण असतील सरकारी फुकट ची संपत्ती विकून पैसे खूप आले आहेत त्यांच्या कडे.
विमानतळ पासून रेल्वे,lic, बँका,सर्व विकून खूप पैसे आले आहेत.
परत बँकाचे करोड रुपये फुकट चे कर्ज पण घेतले आहे ते कधीच परत करायचे नाहीत.
फुकट चेच आहे.
बाकी पक्षा कडे असे फुकट चे पैसे नाहीत.
अशा काहीच किंमत नसलेल्या लोकांना सोडून धुरळा उढवायचा आणि त्या आडून स्व हित साधने,राष्ट्रीय संपत्ती मित्र ना दान करणे, असले उद्योग bjp करत आहे.
राष्ट्रीय संपत्ती ची लूट चालू आहे आणि त्या साठीच लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे.
Batik न्यूज चॅनल आहेत च साथ देण्यासाठी.
अशा काहीच किंमत नसलेल्या लोकांना सोडून धुरळा उढवायचा आणि त्या आडून स्व हित साधने,राष्ट्रीय संपत्ती मित्र ना दान करणे, असले उद्योग bjp करत आहे.
राष्ट्रीय संपत्ती ची लूट चालू आहे आणि त्या साठीच लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे.
Batik न्यूज चॅनल आहेत च साथ देण्यासाठी.
असले धंदे केंद्र सरकर ईडी , सीबीआय मागे लावून करते .. पण ईडी आणि सीबीआय पासून पळण्याचं, लपण्याचं कारण काय? मोदी मुख्यमंत्री असताना खोंग्रेसच्या केंद्र सरकारने किती शुक्लकाष्ठे मागे लावली तरी ते घाबरले, लपले नव्हते. कर नाही त्याला डर कशाची?
राणेना भाजपात घेण्यामागचा मुख्य हेतु कोकणातुन शिवसेनेनेला आव्हान देणे हा होता. सेना नेत्यांना साजेल अशी प्रक्षोभक वक्तव्ये करायची, शिवसेनेने मग कायदा हातात घेतला की मग भाजपा प्रवक्ते दिल्लित बसुन "हा तर लोकशाहीचा खून' म्हणायचे व राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करायचा.
राणे जी भाषा वापरतात तशीच भाषा 'सामना'मध्येही छापुन येत असते. मोदी/शहा वगैरेंचा अपमानास्पद उल्लेख तर असतातच.
ह्यावर आवर घालणारा, 'ठकास महाठक' नेता भाजपाला हवा होता. तो राणेंच्या रुपाने मिळाला.
फक्त त्यांचा तालुका इतकेच आहे बाकी ते मोठे विचारवंत नेते आहेत,त्यांच्या कडे राज्याच्या विकास ची दूर दृष्टी आहे असे काही नाही
साध्या भोळ्या कोकणी लोकांना वेडे बनवून हा करोडो रुपयाच्या संपत्ती चा मालक आहे.
कोकण आहे तसे अजुन पण मागास च आहे.
पावसात दर वर्षी वाहून जात च आहे.आणि may महिन्यात पाण्यासाठी वन वन तेथील जनता भटकत च आहे.
राणे स्वत आमदार बनू शकले नाहीत ते सेनेला टक्कर देणार ;)
संपले होते राणे. राणेना मंत्रापद मिळून फक्त त्यांचा वयक्तिक फायदा झालाय. भाजपला ह्यातून शुन्य आभटपूट मिळेल.
हिंदू हिताच्या गप्पा मारणारे बीजेपी वालेच देशभर हिंदू हिंदू मध्ये भांडण लावत आहे. एकमेका विरूद्ध हिंसाचार करण्यास bjp च कारणीभूत आहे.
हे कसले हिंदू चे हित करणार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Kadhalikum Pennin... :- Kadhalan